सर नमस्कार,
सर आज एक मनातील गोष्ट सांगु इच्छितो,सर खरोखरच मला तुमचा हेवा वाटायला लागलाय हो! कारण की सर आपली ओळख खरंतर दोन दिवसांचीच,प्रत्यक्षात आपली भेट झालीच नाही,आमच्या शाळेतील गव्हाणे सरांच्या माध्यमातून झाली.आणि ती ही मोबाईलच्या माध्यमातून,मला पहिल्यांदा वाटलं की ही व्यक्ती साधी एखादी शिक्षक वगैरे सरांच्या ओळखीची कोणी तरी असेल?पण सर मागच्या काही दिवसांपासून मी आपल्या पोस्ट वगैरे दररोज सातत्याने वाचतो आहे.पोस्टमध्ये आपण जे दर्जेदार लिखाण करता आणि मोठमोठ्या असामान्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्ती,मोठमोठे विचारवंत यांचे जे विचार पोस्ट करता.हे काही साध्यासुध्या व्यक्तीचं काम निष्चितच नाही.माझं आकलन हे सांगतय आपण एक असामान्य बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्वाचे धनी असुन वेडे आणि भुकेलेले (पुस्तकाचे/ज्ञानाचे) आहात.
हे करणे काही साध्यासुध्या व्यक्तीचे काम निश्चितच नाही.हे करण्यासाठी माणसांमध्ये पुस्तकाचं वेड आणि ज्ञानाची भूक लागते.आणि त्यासाठी अमूल्य वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो.नेमक हेच तुम्ही कसं साध्य करत आसाल?
ह्याचाच हेवा वाटतो.
तुमच्या ह्या प्रयत्नशील,कष्टाळू,बुद्धिमत्तेला, वृत्तीला सलाम.
सर,पुन्हा एक गोष्ट अनुवधानाने विसरून गेली.ती म्हणजे,आजच्या ह्या गतिमान युगात, धामधुमीच्या काळात माणसाला एकमेकांना बोलायला वेळ नाही,आपल्या कुटुंबाला द्यायला वेळ नाही?असं असताना आपण मोठमोठ्या महापुरुषांशी आणि पुस्तकांशी बोलता ह्याच मला आश्चर्य वाटत.
शेख जलील भाई , (लालू भाई) रायपूर,परभणी
***************************************************
प्रिय गायकवाड सर नमस्कार,
सर आपण लिहिलेली कथा
//कथा माणूसकीची -पोर्या //
ही अगदी माझ्या अंतर्मनाला स्पर्श करून गेली.
आणि मी माझ्या भुत- कालीन संघर्ष मय विध्यार्थी जिवन गाथेतील एक एक पाण उलटत गेलो.
आपल्या कथेत दिपक च्या रुपात स्वतःला पाहिलं.
आणि माझं ह्रदय भरून आलं , डोळे पाणावले.
सर,आता मी हे सांगावं की नाही मला कळेना झालं.
मला माहित नाही माझं आपल्या शी काय नातं आहे? कोणत्या ऋणानुबंधाने आपण जोडले गेलोत?
न जाणो का आपण मला आपलेसे वाटू लागले आहात.म्हणुन
मी माझे मन आपल्या पाशी मोकळे करत आहे,
जे आजपर्यंत कधीच कोणाशीही ह्या बाबतीत बोललो नाही.
सर आम्ही सहा भावंडे, चार बहिणी दोघे भाऊ.
आई वडील आणि आजी.
आठ एकर शेती , परिस्थिती बेताची. बालपण संपताच इयत्ता चौथीत असताना ७२ला दुष्काळ पडला . कुटुंबाची उपजीविका चालवण्यासाठी साठी वडिल बराशी खांदायला जायचे मोठाल्या बहिणी …
शेख जलील भाई , (लालू भाई) रायपूर,परभणी
**************************************
प्रिय साहेब,
आज बऱ्याच दिवसांनी तुमच्या ब्लॉगला भेट दिली.वाचन केलं आणि तिथून बाहेर येतांना मी काही अंशी समृद्ध झाल्याचं वाटलं.येथील प्रत्येक लेख हा प्रत्येकाचं ज्ञान वाढवून जगण्यातील आनंद वाढवणारा आहे.
आताचा पक्ष्यांच्या संदर्भातील 'निसर्गाची नवलाई' पाहून वाचून हुशार असणारा माणूस शहाणा झाल्याशिवाय राहणार नाही.
तुमच्या वाचनाला आणि वेचण्याला माझा सलाम.
माधव गव्हाणे ( सॉक्रेटिस )
*****************************************
वाचनवेडं व्यक्तिमत्त्व ; सरळ,साधं,निरागस व्यक्तिमत्त्व म्हणजे मा.विजय गायकवाड. नुकतीच त्यांनी आपल्या वाचकप्रिय ब्लाॅगवर माझ्या ' मृत्यू सुंदर आहे ? ! ' या ग्रंथाला जागा दिली त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे! त्यात त्यांनी व्यक्त केलेली भावना नितांतसुंदर अशीचआहे.थोडेसे अवघड आणि अप्रिय असे या ग्रंथाचे टायटल व तसाच अप्रिय असा विषय . मृत्यूला सुंदर म्हणणारा माणूस हा ठार वेडा असणार अशीच अनेकांची समजूत होऊ शकते. अशा या विषयावर व या विषयावरील पुस्तकावर आपल्या ब्लॉगवर जागा देणे हे धाडसाचेच.हे धाडस दाखविल्याबद्दल विजयरावांचे कौतुक आणि साधुवाद!
तीनशे पानांचे हे पुस्तक व त्याची गाथा विजयरावांनी आपल्या ब्लॉगमध्ये बसवितांना फार मोठे कौशल्य बजावले आहे.त्यासाठी त्यांनी या पुस्तकातील निवडक उतारे,आशयगर्भ वाक्ये निवडून वाचकांची उत्कंठा वाढविली आहे! आपले अनुभव,त्यांची साक्ष व संगती त्यांनी इथे आवर्जून मांडली आहे.
पुन्हा एकदा ऋण व्यक्त करून निरोप घेतो!
आपला,
डॉ. रवींद्र श्रावस्ती, सांगली
*****************************************
धन्यवाद विजय सर..
आज तुमच्या माध्यमातून मा. डॉ. रविंद्र श्रावस्ती सरांचा 'मृत्यू सुंदर आहे ?' या पुस्तकाच्या माध्यमातून मृत्यूची सुंदर व्याख्या समजली.. जीवनाचा अंतिम स्थानक मृत्यू, परंतू जीवन सुंदर तर मृत्यू सुंदर..
मा. विजय सर आपल्यासारख्या व्यासंगाने त्यावर केलेलं समीक्षण खूपच सुंदर व वाचनिय, विवेचनिय आहे... सिग्नल माणूस ही संकल्पना खरेच सुंदर कल्पना आहे..
विजय सर समीक्षकाचा प्रवास योग्य दिशेने चालू आहे,आपल्यामधील प्रतिभा वाखन्यजोगे आहे.. आपल्या पुढील प्रवासास हार्दिक शुभेच्छा
कवी संतोष शेळके
*******************************************
मृत्यू सुंदर आहे? या पुस्तकाचे लेखक आदरणीय डॉक्टर रवींद्र श्रावस्ती यांनी अथक परिश्रम करून हे पुस्तक लिहिलंय हे अत्यंत अभिमानास्पद आहे. त्यांचे मी प्रथमतः हार्दिक अभिनंदन करतो व पुढील कार्यास शुभेच्छा देतो. मानवी जीवन हे सुख-दुःखाच्या आडव्या उभ्या धाग्यांनी विणलेला एक सुंदर रुमाल आहे असं म्हटलं जातं ,म्हणजेच जीवनामध्ये अनेक अडीअडचणी सुख-दुःख येणारच त्या सुख दुःखा मध्ये प्रेरणा देणारे प्रभावी असेच हे पुस्तक आहे. सुंदरता ही कुठलेही ठिकाणावर अवलंबून असत नाही, सुंदरता ही छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा असते, यामधून बरंच काही शिकता येतं. आपले जीवन जितकं साधं-सरळ आनंदी सुखी असेल तेवढाच आपला मृत्यु ही तसाच असेल. जन्म आणि मृत्यू या दोन्ही मध्ये जो कालावधी आहे त्याला जीवन म्हणतात. ते जीवन सुखी आनंदी कसं जगायचं हे पुस्तक सांगतं. मृत्यू सुंदर जगण्याची प्रेरणा देतो. मृत्यू येण्यापूर्वी आपले आयुष्य जगून घेतले पाहिजे. आपण बुद्ध, महावीर, सूफी संत रुमी, कबीर अशा थोर मानवतावादी थोरांचे दृष्टिकोन देऊन मनाला प्रेरणा दिली आहे. आयुष्य मोकळ्या मनाने जगा. जे नाविन्यपूर्ण असेल ते स्वीकारा. आयुष्य हे फुलपाखरा सारखे जगा. आपला मृत्यू सुंदर कसा करायचा हे आपण चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलेला आहे यातच या पुस्तकाचे यश आहे. नक्कीच हे पुस्तक सर्व वाचकांना आवडेल आणि प्रभावी ठरेल असे मला वाटते. आदरणीय गायकवाड साहेबांनी या पुस्तकाचा सारांश सांगितलेला आहे ते खूपच मनाला भावते. त्यावरून हे पुस्तक किती दर्जेदार आणि प्रभावी आहे हे समजतं. अशा प्रकारचे उच्च दर्जाचे पुस्तक, लेख वाचायला मिळतात, ही आमची धन्यता आहे असेच म्हणावे लागेल. धन्यवाद.
राजेश कान्हेकर
************************************
मा. विजय गायकवाड सर,
सस्नेह नमस्कार !
माहे सप्टेंबर 2022 च्या जलसंवाद या मासिकामध्ये प्रकाशित झालेला आपला पाऊस : एक चिंतन हा दीर्घ लेख नुकताच वाचण्यात आला.
पावसाबद्दल आपल्या हळव्या मनात उमटणारे विचाराचे तरंग मला खूप भावले. तसा पाऊस प्रत्येकाला वेगवेगळा भासत असतो.पावसाची हरेकाची अनुभूती ही वेगवेगळी असते,हीच जाणीव आपण या लेखामध्ये करून दिली.
पाऊस खऱ्या अर्थाने प्रत्येकाला अविष्कृत करत असतो.पावसाचे पडणे ही क्रिया एखाद्याच्या आयुष्यात जितकी आनंददायी असते तितकीच एखाद्याला ती खूप क्लेशकारक वाटते.मात्र पाऊस या एकाच घटकाचे आपण केलेले चिंतन हे सर्व बाजूंनी महत्त्वपूर्ण आहे.
मॅथ्यू,हेन्री डेव्हिड थोरो, व्हर्जीनिया वूल्फ,जयंत कुलकर्णी, हेरॅक्लिट्स,नोम चोमस्की या लोकप्रिय विचारवंतांचे पावसाच्या सदर्भातील उतमोत्तम्म दाखले देऊन वाचकाला चिंब चिंब केले.त्याचबरोबर द बायोलॉजी ऑफ बिलिफ आणि द गॉड डिल्यूजन रिचर्ड डॉकिन्स सारख्या पाश्चिमात्य ग्रंथाचे समर्पक उदाहरण दिल्याने लेखाचे वजन वाढले.
पाऊस हा प्रत्येकाला वेगवेगळा भेटतो.वेगवेगळा भासतो.जसे की,पावसात भिजणारी प्रेयसी-प्रियकर,शेतीची मनोभावे सेवा करणारा कास्तकार,अती पावसाने गळणाऱ्या झोपडीत वास्तव्यास असलेला गरीब श्रमजीवी आणि पावसाचा निखळ आनंद उपभोगणारा एखादा शहरी गर्भश्रीमंत या इत्यादींच्या पावसाच्या अनुभूती ह्या भिन्न भिन्न असल्या तरीही आपण लिहिलेलं एक वाक्य मात्र सर्वार्थाने सर्वांना लागू पडेल असे आहे ते म्हणजे,आपलं आणि पावसाचं जिवाभावाचे नातं फार पुरातन आहे.इतिहास शोधायला गेलो की आपला इतिहास हा जवळच सापडतो,आपला इतिहास हा पाऊसच आहे.आपलं लेखन ताजं, खमंग आणि निर्मळ आहे.अशा लेखनशैलीतून वाचकांची भूक आणि तृष्णा निश्चित भागेल,हे निर्विवाद !
आपल्या लेखन प्रवासास खूप खूप शुभेच्छा!
आपला
सचिन शिंदे
सचिन शिंदे
*************************************
शहीद भगतसिंह यांची जेल डायरी हे पुस्तक प्रेमावर आधारित असून, त्यात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची तमा न बाळगता भगतसिंहाने अहोरात्र लढा दिला.
भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे हा माझ्या आयुष्याचा उद्देश आहे. त्यासाठी मी स्वतःला देश कार्यासाठी अर्पण केले आहे. माझी मातृभूमी गुलामीत असताना मला कसल्याही सुखसोयी, आरामाचे आकर्षण वाटत नाही या वाक्यातून भगतसिंहाच्या रक्तारक्तात देश प्रेम भरलेले आहे हे दिसून येते. भगतसिंग यांना जेव्हा तुरुंगवास होतो तेव्हा त्यांनी तिनशे दोन ग्रंथ वाचून काढले तसेच फासावर जाण्यापुर्वी क्रांतिकारी लेनिनचे पुस्तक वाचत होते या प्रसंगावरून त्यांना देशप्रेमा सोबतच वाचन किती प्रिय होते हे दिसून येते. 'बेटा भगत, इतक्या लहान वयात तू मला सोडून जात आहेस त्यावर भगत सिंह याचे उत्तर वाचताना अंगावर अक्षरशः शहारे येतात.' अतिशय हृदयस्पर्शी,भावस्पर्शी पुस्तक असून हे पुस्तक नक्कीच प्रत्येकाच्या मनाला भावेल यात कुठलीही शंका नाही.भगतसिंह यांचे गुंतागुंतीचे कार्य अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत लेखकाने मांडले त्यामुळे हे पुस्तक भारतात लोकप्रिय होईलच. लेखकांनी हे पुस्तक लिहिण्यास तीन वर्षाचा कालावधी लागला यावरून हे पुस्तक किती प्रभावी, दर्जेदार आहे हे लक्षात येते. आदरणीय विजय गायकवाड साहेबांनी आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीत पुस्तकाचे विश्लेषण करून पुस्तक किती दर्जेदार आहे हे सांगायला विसरले नाहीत. आज या देशाला भगतसिंहाच्या विचाराची गरज आहे असे मला वाटते. प्रत्येक तरुणाने पुस्तकाचा आदर्श घ्यावा हीच अपेक्षा. धन्यवाद.
मी माझ्या परीने लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. काही चुका आढळल्यास त्याबद्दल क्षमा असावी.
राजेश कान्हेकर
*******************************************
मा.विजय गायकवाड साहेब आपण आज "लौकिक जीवन जगण्याचे मौलिक तत्व सांगणारी शहीद भगतसिंग यांची जेल डायरी" अर्थातच शहीद-ए-आजम भगतसिंग यांच्या डायरी वरील आपण आपले मनोगत आपल्या शब्दात व्यक्त केले आहे.
मला हे मनोगत वाचत असताना डोळे पाणावले होते. मन भरुन आले होते. देशासाठी भगतसिंग यांनी आपले सारे जीवन, आपला वेळ, आपले कौशल्य आपली तरुणाई या देशाला अर्पण केली हि करताना आपल्या आईला {श्रीमती विद्यावती कौर - पंजाबमाता} ते म्हणाले, बेबेजी मी या देशात एकसाथ तेजोमय दीप लावत आहे ज्यात ना तेल आहे ना तुप आहे. हा दीप माझ्या बलिदानाच्या रक्तावर आणि विचारांवर तेवत राहील. तुम्हाला या देशात उद्या कुठेही अन्यायाशी, भ्रष्टाचाराशी लढणारा तरुण दिसला तर तो तुमचा भगतसिंग आहे असे समजा." हे सर्व वाचताना दुःख देखील निशब्द झाले आहे नव्हे डोळे पाणावले आहेत. इतका असीम त्याग समर्पण करुन शहीद-ऐ-आझम भगतसिंग आपल्या ७१३ दिवसांच्या तुरुगवासात ३०२ पुस्तके वाचून चार ग्रंथ लिहिणारे डायरीत पुढे म्हणतात, भविष्यवाणी करतात, "मी मेल्यावर लवकरच भारताला स्वातंत्र्य मिळेल नंतरची काही दशके धामधुमीत जातील आणि मग या देशाला पुन्हा माझी आठवण येईल."
या शहीद-ए-आझम भगतसिंग यांच्या म्हणण्यानुसार आज या देशाला शहीद-ए-आझम भगतसिंगांच्या विचारांची नितांत आवश्यकता आहे.
शहीद-ए-आझम भगतसिंगांच्या विचार आणि त्यागी समर्पणास ग्रेट सॅल्युट. विनम्र अभिवादन.
मा. विजय गायकवाड साहेब आपण आपल्या मनोगतात जे शहीद-ए-आझम भगतसिंगांचे अनमोल विचार आणि घटना शब्दबध्द केलेले आहेत आणि आपले शब्दात व्यक्त होणे प्रचंड भारदस्त आहे साहेब याबद्दल आपले मनापासून आभार.
आपला स्नेहांकित शितल खाडे सांगली.
******************************************
नमस्कार गायकवाड सर,
'प्रवास' या पुस्तकाची समीक्षा वाचली आणि त्यावरच्या प्रतिक्रियाही वाचल्या. खरं तर पुस्तक वाचनाची आवड असणं, ती कोणत्याही परिस्थितीत जपणं, पुस्तकातल्या फक्त ओळी न वाचता त्या पलीकडचं बघणं आणि ते लेखकाला सांगणं असं फार कमी वाचकांना जमतं. त्या यादीत तुम्ही आहात.
पुस्तक एका दमात वाचून संपवणारी अनेक मंडळी असतात. पण ओळी या नुसत्या शब्दांच्या माळा नसून त्या व्यक्त होणाऱ्या भावनाही असतात हे फार कमी लोकांना कळतं.
प्रवास हे पुस्तक यंत्रांचा इतिहास असल्याने त्यात रुक्षपणा येणार याची आम्हाला भीती वाटत होती. त्यामुळे हा रुक्षपणा टाळून वाचकांना यंत्रांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलता येईल यासाठी आम्ही अक्षरशः दिवस रात्र झटलो आणि हे पुस्तक घडलं. तुमच्यासारख्या वाचकांच्या भरभरून कौतुक करणाऱ्या प्रतिक्रिया हे आमची मेहनत सफल झाल्याचीच साक्ष देतं.
तुमचा वाचनप्रवास असाच चालू ठेवा. समीक्षा लिहीत रहा. तुमच्या प्रतिक्रियेमुळे आम्हा लेखकांना बळ मिळतं.
वाचत रहा, लिहीत रहा आणि आनंदी रहा.
धन्यवाद,
आसावरी निफाडकर
*******************************************
आपण माझ्या पुस्तका बद्दल लिहिलेला अभिप्राय वाचला. मनापासून खुप आवडला. मला हे पुस्तक पुर्ण करण्यास तीन वर्ष लागली होती. आज तुमचा अभिप्राय वाचून माझी मेहनत सार्थ झाल्यासारखी वाटते. केवळ भगत सिंह समजून घेण्यासाठी हा अट्टाहास मी आणि माझ्या काहीं मित्रांनी या पुस्तकं रूपाने सुरू केला होता. ते पूर्णत्वास जात आहे असं दिसते. आपणास कळवण्यात आनंद होतोय की माझ्या पुस्तकाची आवृत्ती संपली असून नवीन आवृत्ती लवकरच प्रकाशित होणार आहे. आपली प्रतिक्रिया हे माझं नाहि शहीद भगतसिंग यांच यश आहे. आपले मनापासून आभार, आणि आपल्या साहित्यातील मुशाफिरीसाठी शुभेच्छा
'शहीद भगतसिंह यांची जेल डायरी '
लेखक - अभिजीत भालेराव
आदरणीय नमस्कार!
मी आपला ब्लॉग रोज वाचतो.... आणि त्याची प्रिंट काढून फाईल करून ठेवतो.
आपल्या अप्रतिम लेखनीचा हा कप्पा…!! आपल्या अप्रतिम सदाबहार लेखणीची ही जादूई किमया… दिवसेंदिवस वृद्धिंगत होणारी आणि नवीनतम् देणारी… आणि प्रेरणादायी व अर्थपूर्ण आहे.....
आपलं लिखाण म्हणजे खूप काही सांगणारं, शिकविणारं आणि प्रोत्साहित करणारं….... आणि हे सारं सारं शब्दबद्ध होण्यासाठी…जवळ असावं लागतं सातत्यपूर्ण वाचन, मनन, चिंतन आणि लेखन… …काही जपावं आणि टिपावं लागतं… हे सर्व आपण करत आहात...
प्रत्येक लेख मनुष्य जीवनाच्या जुन्या आठवणी हळुवारपणे भावविश्वात घेऊन जातो. त्या जुन्या आठवणींची सुंदर मांडणी आपण करत आहात. वाचताना बालपणीची प्रत्येक गोष्ट डोळ्यासमोरून तरळून जाते. साध्या भाषेतील सहजसुलभ सुंदर लेखन हे तुमचे गुणवैशिष्ट्य अधिक भावते.
आपले विचार प्रगल्भ आणि हृदयाचा ठाव घेणारे आहेत.. आपण असेच लिहित रहा असे मनापासून सांगावेसे वाटते...
खूप छान मांडणी. सर्व स्तरांतील लोकांना सहज समजेल अशी मांडणी आहे. उत्तम लेखन. अभ्यासपूर्ण लेखन. शब्दसागराचा मोठा साठा आपल्याकडे आहे. लिहित रहा. साहित्यक्षेत्रात आपण एक दिवस उंचीवर असाल…
काय बोलावे व काय लिहावे हे सुचत नाही. पण रोज तुमच्या लेखाची आतुरतेने वाट पहात असतो.
आपले लिखाण कमी शब्दांत आणि सुबक मांडणी. खूप हलके फुलके कथन; परंतु आशयाच्या खोलीसह प्रत्येक लेख असतो
आपल्या लेखनीला दाद द्यावी तेवढी थोडीच…खूप खूप शुभेच्छा..!!!
आपला वाचन आणि लिखाणाचा प्रवास असाच बहरत जावा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
तुमचा स्नेहांकित,
सुनिल घायाळ आणि परिवार!
****************************************
नमस्कार मी विलास माने
मी बरीच वेडी माणसे पाहिलेली आहेत त्यापैकीच एक वेडा माणूस जो दिसायला साधा राहणीमान साधे पण आपल्या पुस्तक वाचनातून शास्त्राच्या आधारावर ज्ञानाचा वापर समजावून घेऊन अनेक शास्त्रज्ञ तत्त्ववेत्ते व सूक्ष्मात सूक्ष्म अतिसूक्ष्म अशा अनेक बाबींचा अभ्यास करून समजावून घेऊन तो जीवनात उतरण्याचा प्रयत्न करणारा साधा माणूस विजय गायकवाड सर त्यांचा सहवास मला लाभतो आहे त्यांच्या वाचनातील काही गोष्टी मला प्रत्यक्षरीत्या किंवा ब्लॉगच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचत आहेत हे मी माझे भाग्य समजतो.
विजय गायकवाड सर यांचे जलसंवाद मधील पाऊस एक चिंतन,एक छोटी गोष्ट जगणं मोठं करून सांगणारी,
एक छोटी घटना जी बरंच काही सांगून जाते,
भाऊस्पर्शी मनाला चटका लावणारी गोष्ट,पाऊस एक चिंतन,शिक्षणयात्री मधील अद्भुत प्रेम, माणसाला माणसाशी ओळख करून देणारा पुस्तक रुपी प्रवास,
मानवी नातं उलगडून सांगणाऱ्या भाजलेल्या शेंगा,
असे अनेक लेख गायकवाड सर यांनी अतिशय सुरेख रित्या लिहिले त्यांचे लिखाण अप्रतिम असल्यामुळे रोज रोज वाचावेसे वाटते.
"सर्वियन कादंबरीकार मिलोराद" यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात" जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही"
मला वाटतं गायकवाड सरांचे लेख माझ्यासारखेच अनेक वाचक मनापासून वाचत असणार यात शंका नाही सरांचे लेक वाचल्यानंतर कोणत्या माणसाशी कसे वागावे हे समजू लागते. प्राण्यांशी व निसर्गाशी आपुलकी निर्माण होते.पैसा हाच सर्व नाही या गोष्टीवर आपला विश्वास बसतो.विश्वात आपले अस्तित्व किती किरकोळ आहे हे समजते. विश्व किती अफाट आहे याची जाणीव होते.धर्म जातीपेक्षा माणुसकी हीच सर्वश्रेष्ठ व श्रेयस्कर आहे. याची समज येते, माणसांनी निसर्गाचा कशा प्रकारे नाश केला आहे हे समजते. अहंकाराचा नाश केल्यानंतर समृद्ध जीवन जगता येते याची अनुभूती येते. त्यामुळेच मानवी भावस्पर्शी मनाला चटका लागून राहते. कारण मला अश्मयुगापासून आतापर्यंत प्रवासाचा मार्ग समजला.मानवी नातं उलगडून वाचत असताना भरून येते.असं हृदयस्पर्शी व भावस्पर्शी लेख मनाला उभारी देतात असेच लिखाण करण्यासाठी विजय गायकवाड सरांना माझ्याकडून खुप खुप शुभेच्छा.
आपलाच
विलास माने
आरे छान लेख असतात.असे लेख कुणीही पाठवतही नाही.लोकांना बिन उपयोगाचे जोक्स,पोस्ट वाचण्यात खूप मज्जा वाटते.त्या खोट्या गोष्टी जगभरात क्षणात पोहचतात.चांगल्या गोष्टी लोकांना आवडतही नाहीत व त्या पोहचतही नाहीत.सामाजात फक्त १० टक्के लोकच आहेत.ते फक्त चांगल्या गोष्टीचा मनापासून स्विकार करतात.
सौ.काचंन जाधव ( ताई )