* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२३/१०/२३

'कुब्र' जंगलाचा अनुभव देणारे पुस्तक.. A book introducing the 'Kubra' forest

सत्यजित पाटील यांचे कुब्र नावाचे पुस्तक बऱ्याच वेळा फेसबुक वर पाहण्यात आले  आणि माणिक पुरी सरांकडून ऐकण्यात आले होते.पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहिले तेव्हापासून त्यावरील चित्र आणि विषय काय असेल याविषयी उत्सुकता लागली होती.सदरील पुस्तक माणिक पुरी सरांनी पाठवून दिले.काही दिवस पुस्तक हातात घेता आले नाही.पण डोळ्यासमोरून चित्र आणि विषय बाजूलाही सारता आला नाही.शेवटी पुस्तक उत्सुकतेने वाचायला सुरुवात केली.अतुल देऊळगावकर सरांच्या अभ्यासपूर्ण प्रस्तावनेच्या सुरुवातीला फ्रेड्रिक नित्शे यांचं ' परमेश्वराचा मृत्यू झाला आहे'  हे वाक्य वाचून विचारात पडलो. पुस्तक वाचत  शेवटाकडे जाताना या सृष्टीला जगवणारा ,वाचवणारा कोण आहे..? खरा परमेश्वर कोण आहे...? हे स्पष्ट होतं आणि तो म्हणजे मला निसर्ग वाटतो.याचा पालनकर्ता निसर्गाचा ऱ्हास करणारा कोण...? हे पण स्पष्ट होतं तेव्हा फ्रेड्रिक नित्शे यांच्या वाक्याचं प्रयोजन कळू लागतं.आणि या निसर्गाचा म्हणजेच परमेश्वराचा खून करणारा माणूस असल्याची जाणीव होते.प्रस्तावना वाचल्यानंतर पुस्तकाविषयीचे आकर्षण अधिकच वाढू लागले. प्रस्तावनेतून पुस्तकाच्या विषयांमध्ये घुसण्याचा मार्ग सहज आणि सोपा झाला.

'कुब्र' म्हणजे काय.. हे समजायला लागले.सत्यजित पाटील यांनी ताडोबाचे पंच ज्ञानेंद्रियाद्वारे केलेलं अरण्यवाचन,निरीक्षण,समजून घेतलेल्या सूक्ष्म नोंदीचा समावेश कुब्रमध्ये  केला आहे.सत्यजित पाटील यांनी केलेल्या सूक्ष्म निरीक्षणामुळे त्यातील सत्यता वर्णनातून दिसून येते. 


जंगल पाहत फिरत असताना त्यांनी काळ -वेळ, साथ- संगत पाहिलेली नाही.जंगल म्हणजे त्यांचा श्वास असल्याची अनुभूती कुब्रमधील वर्णन वाचताना होते.ते एका ठिकाणी म्हणतात की 'घड्याळाला चिकटून असलेलं चित्त मुक्त असू शकत नाही.' म्हणून ते घड्याळ सुद्धा सहसा वापरताना दिसून येत नाहीत..इतकच नाही तर जंगल वाचन करत असताना जंगलात कॅमेरा न वापरता मनाच्या स्मृती पटलात सर्व नोंदी जशाच्या -तशा टिपून घेतात.हे पाहून त्यांचं खूप कौतुक करावंसं वाटतं.


कुब्रमध्ये वेगवेगळ्या प्रकरणाला दिलेली नावं खूप छान आहेत.त्यावरून त्या प्रकरणात काय असेल याची उत्सुकता लागून राहते.यातील प्रसंगाच्या नोंदी वाचताना लेखकांनी निरीक्षणाच्या वेळी दाखवलेला संयम,केलेले धाडस,क्षणांची आतुरतेने पाहिलेली वाट, यासाठी धरलेला धीर या सगळ्या गोष्टी अलौकिक आणि थक्क करणाऱ्या वाटतात.या नोंदीची काही उदाहरणं आपण पाहूयात म्हणजे त्यांनी निरीक्षणासाठी  केलेले धाडस आपल्याला दिसून येईल...


जंगलातून फिरत असताना आपण एखाद्या प्राण्यांना पाहण्यासाठी जात असतो.परंतु त्याचवेळी एखादा प्राणी सुद्धा आपल्याला पाहत असतो.अशावेळी आपण कानांची दृष्टी करून दूरचे पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.   नाहीतर आपल्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.बऱ्याच वेळा इतर प्राण्यांच्या वर्तन आणि आवाजावरून काही प्राण्यांची चाहूल लागते.थोडक्यात वाघाची चाहूल लागल्यावर सावध करण्यासाठी कोतवाल हा पक्षी अधिक विश्वसनीय असल्याची त्यांनी नोंद केलेली आहे.कोतवाल हा पक्षी दोन किलोमीटर अंतरावर वाघ असतानाच विशिष्ट आवाजाद्वारे सावधानतेचा इशारा देऊन टाकतो. याबाबतीत मोर ही इशारा देतो.परंतु मोराचा अंदाज एवढा अचूक असेल याची खात्री नाही ही त्यांनी अनुभवांती केलेली नोंद आहे. 


जंगल म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीचा खजिना असलेली खाण असते.या ठिकाणी खूप मोठी जीवसृष्टी वाढत असते,राहत असते.परंतु या ठिकाणी बऱ्याच वेळा माणसांच्या चुकीमुळे किंवा नैसर्गिक कारणामुळे आग लागून वणवा पसरतो आणि अनेक जीवजंतू,वनस्पती,

प्राणी, पक्षी नष्ट होऊन जातात.जे नुकसान कधीही भरून निघू शकत नाही.हे नुकसान टाळण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात.यामध्ये फायर लाईन (जाळ रेषा) तयार केल्या जातात .या फायर लाईनमुळे आग एका विशिष्ट टप्प्यापर्यंतच जाऊ शकते आणि पुढे नियंत्रणात आणण्याची शक्यता वाढवता येते . फायर लाईनच्या जागेवर उठणाऱ्या गवताचे त्यांचे निरीक्षण मला खूप महत्त्वाचं वाटतं . फायर लाईन केल्या नंतर तेथील गवत उन्हाळ्यात दरवर्षी जाळलं जातं.परंतु या फायर लाईनवर पावसाळ्यात नव्याने एकाच जातीचं सर्वत्र गवत उगव लेल दिसतं. हे गवत कुळात असलेल्या बियांचे गवत असतं.ही कुसळं  अग्नीरोधक असतात.यामुळे कुसळातील बियांचं आगीपासून संरक्षण होतं.बाकीचं सर्व गवत बियासगट जळून जाते आणि उरतं ते फक्त कुसळाचं बीज.जे पाऊस आल्यानंतर पुन्हा फायर लाईन दरम्यान उगवतं आणि आख्खी फायर लाईन या कुसळाच्याच गवताने भरून जाताना दिसून येते.इतकं बारकाईचं निरीक्षण या ठिकाणी दिसून येतं. 'जो तगतो तोच जगतो' हा सिद्धांत या ठिकाणी आठवतो.गवताच्या बाबतीतली इतकी बारकाईची नोंद मी यापूर्वी कुठेही वाचली नव्हती.ही मला खूप नवलईची आणि महत्त्वाची गोष्ट वाटते.


जंगल भ्रमंती दरम्यान त्यांना काही प्राण्यांमधील दिसून आलेली साहचर्याची नोंद या पुस्तकामध्ये आढळून येते.

अनेक प्राणी एकमेकांच्या संगतीने राहतात,विविध माध्यमातून सहकार्य करताना दिसून येतात.चितळ,हरीण आणि लंगूर नेहमीच एकत्र दिसतात.कारण लंगूर झाडावर राहतात आणि त्यामुळे वाघ किंवा शिकारी प्राणी येत असल्याची सूचना ते विशिष्ट आवाजातून चितळांना देत असावेत म्हणून ते सोबत राहत असावेत.ही सहकार्याची वृत्ती मानवांमध्ये वाढत गेली तर आज समाजात दिसून येणारी तेढ, वादविवाद कमी होण्यास खूप मदत होईल असे वाटते.


जंगल निरीक्षण करत असताना आपण फार सावधगिरीने जंगल पाहिलं पाहिजे.जंगलाचा आणि जंगलातील प्राण्यांचा सन्मान केला पाहिजे.त्यांच्या घरात जाऊन आपल्याकडून चुकीची कृती घडता कामा नये.कारण ते आपल्यापेक्षा अधिक संवेदनशील असतात. म्हणून जनावरांना आपले अस्तित्व आधीच कळत असतं.त्यामुळेच ते आपल्याला टाळून दुसरी वाट निवडतात.माणसांना टाळणं ही प्राण्यांची पहिली प्रतिक्रिया असते.असं सत्यजित पाटील यांनी निरीक्षणाअंती मांडलेलं मत आहे. 


हे मला खरं वाटतं.प्राण्याची भाषा,तरंग संवेदनावर आधारित असतात.आपले तरंग प्राणी ओळखतात आणि बऱ्याचदा आपल्याला वाट मोकळी करून देतात.म्हणून आपण पुन्हा - पुन्हा त्यांच्या वाटेवर जाणे बरे नाही.

जंगलातील मोठ्या प्राण्यांबरोबर अगदी छोटे प्राणी सुद्धा महत्त्वाचे असतात.याची नोंद सत्यजित पाटलांनी घेतलेली दिसून येते.कीटक वर्गातील पिंपळ माशी ची नोंद महत्वपूर्ण वाटते.अशा नोंदी मुळातून वाचल्या पाहिजेत.पिंपळमाशा किंवा यासारख्या छोट्या - छोट्या माशा नष्ट झाल्या तर मोठ-मोठे वृक्ष नष्ट होतील.

वातावरणाच्या एकंदर तापमानात सतत वाढ होत राहिली तर पिंपळमाशीच्या आयुष्य काळावर परिणाम होऊ शकतो आणि यामुळे जंगलाचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं.

   

या पुस्तकातील चक्करघीनी हा लेख अत्यंत महत्त्वपूर्ण वाटतो.या लेखातून लेखकाची जीवन -मृत्यू कडे बघण्याची दृष्टी दिसून येते . चक्करघीनी म्हणजेच जीवाच्या सृजनापासून ते देहाच्या विसर्जनापर्यंत होणारी प्रक्रिया या लेखांमध्ये मांडलेली आहे निसर्गाच्या  चक्करघीनीत कोणीही लहान किंवा मोठा नाही , कोणी कमी महत्त्वाचा किंवा अति महत्त्वाचा असेही नाही.पण यातल्या एकाचेही अस्तित्व नष्ट होणं म्हणजे कालांतराने कदाचित काही लाख वर्षांनी या चाकाला खीळ बसणं होय आणि हे सृष्टीला परवडणार नाही.अगदी मधमाशी सुद्धा त्यांच्या नजरेतून सुटलेली नाही.मधमाशीच्या नोंदी खूप महत्त्वाच्या वाटतात.मोहोळाचं पोळ असतं त्या पोळ्यातील कांदा नेमका कोणत्या ठिकाणी असतो याची नोंद खूप महत्त्वाची वाटते.मधमाशांच प्रजनन कसं होतं…? कामगार किंवा सैनिक माशा किती जन्माला याव्यात?


राणी माशा किती तयार झाल्या पाहिजेत?याचं सुद्धा नियोजन मधमाशा करत असतात. कीटकांना सुद्धा संवेदना,स्मृति असते.ते चेहरे लक्षात ठेवत असल्याची माहिती या लेखातून मिळाली.एखाद्या पोळ्यात दोन किंवा तीन राणी माशा जन्माला आल्या तर काही काळानंतर त्या राणीमाशी काही नरांना घेऊन नव्याने पोळ निर्माण करतात.ही मधमाशांमधील कुटुंबाची सामाजिकता अत्यंत महत्त्वाची वाटू लागते.ही गोष्ट माणसांनी स्वीकारली असावी म्हणून तर मोठे कुटुंब झालं की काही दिवसांनी त्या कुटुंबाचे वेगवेगळे कुटुंब झालेले दिसून येतात.


प्रत्येक जीव आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कृती करत असतो आणि अस्तित्व टिकवतो.

आपल्या घरात दिसणाऱ्या पालीवर काही अटॅक झाला तर ती शेपूट तोडून पळून जाते.त्याच पद्धतीने गडद तपकिरी रंगाची गांडूळ लेखकांना एक वेळा दिसली.

गांडूळ हातात घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी हातात धरलेला भाग तेवढाच गांडूळानी तोडून टाकला आणि उर्वरित गांडूळ लपून बसण्याचा प्रयत्न करताना दिसून आले.हे वाचताना 'सर सलामत तो पगडी पचास' ही म्हण आठवते.प्राणी खूप हुशार असतात.त्यांची प्रत्येक कृती ही अनुभवातून आलेली असते.त्यामागे त्यांच्या अनेक पिढीचे चिंतन असतं असं वाटतं. प्राण्यांमधील हुशारपणा जाणून घेतल्यानंतर माणसातील शहाणपणाच्या मर्यादा सुद्धा हळू-हळू लक्षात येऊ लागतात.जंगलात त्यांना दीप्तीवान म्हणजे चमकणारी गोम दिसली. निरीक्षणाअंती त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांच्या शरीरात एक रसायन असतं.ते विकर हवेच्या संपर्कात आलं आणि  प्राणवायुशी विकराचा संयोग झाला की ते प्रकाशतं आणि त्यातून हिरवा,निळसर,थोडा पांढरा प्रकाश दिसू लागतो.

यामुळे प्राण्यावर हल्ला करणारा प्राणी गोंधळून जातो आणि दीप्तीवान गोमीचा जीव वाचतो.प्रत्येक जीवाला आपला जीव कशा पद्धतीने वाचवला पाहिजे याची सर्व सोय निसर्गाने उपलब्ध करून दिलेली आहे,फक्त त्याचा योग्य वेळी वापर करता आला पाहिजे हे या दीप्तीवान गोमीला वाचताना कळून आले.


माणसाप्रमाणे प्राणी सुद्धा आजारी पडतात. त्यावेळी ते निसर्गातीलच वनस्पतींचा उपयोग करतात.वटवाघळे पोट दुखू लागली तर बेहडाचे देठाकडचे पाने खाताना दिसून येतात.लंगुर वानर करंजीचे पानं खात असताना शेंड्याकडील टोकाकडीलच पानाचा भाग खातात.कारण पानाच्या वरील भागात अलकाईड नावाचं रसायन असतं आणि हे रसायन आरोग्याला घातक असल्यामुळे ते पानाचा टोकाकडील भाग खातात,इतकच नव्हे तर वाघासारखा प्राणी शिकार केल्यानंतर शिकार केलेल्या प्राण्याचा आतड्याचा भाग आधी दूर नेऊन फेकून देतो.तो भाग खाण्याचं टाळतो.यामुळे ती शिकार दोन ते तीन दिवस व्यवस्थित रित्या टिकून राहते. प्राण्यांमधील हे शहाणपण माणसाला घेता आलं तर माणसांचं सुद्धा आरोग्य चांगले राहू शकते. अन्न कसं आणि किती खाल्लं पाहिजे या गोष्टी सुद्धा प्राण्यांकडून शिकण्यासारख्या आहेत.


अणूवृक्ष संदर्भातील लेख मुळातून वाचण्यासारखा आहे.अणूवृक्ष म्हणजे करोडो जिवाणू एकत्र येऊन बनलेलं एक सूक्ष्म झाड असतं.सेंद्रिय पदार्थ कुजण्याच्या जागी हे हमखास आपणास आढळून येत. यासंदर्भातील निरीक्षण अत्यंत अभ्यासपूर्ण आहेत.


प्राण्यांमधील समन्वय,साहचर्य आणि कळपाची एकता ही वाखण्यासारखी आहे.आकाराने आणि शक्तीने लहान प्राणी कितीतरी मोठ्या असणाऱ्या प्राण्यांची सहजरीत्या शिकार करू शकतात,  कारण त्यांच्यात असलेली संघभावना आणि आपल्या कळपाविषयी असलेली निष्ठा महत्त्वाची असते.रान कुत्रे कळपाने राहून मोठ्या -मोठ्या सांबराची सहजरित्या शिकार करतात. जेव्हा सांबरच्या पिल्लाची शिकार होते तेव्हा शिकार झालेल्या पिल्ल्याच्या आईची मनस्थिती वाचताना आपलंही मन  गलबलून जाते.पण हा निसर्गाचा नियम आहे.कळपाचे नैसर्गिक सावधपण हे भीतीतून जन्माला येत नाही तर तो एक सहज भाव असतो. याउलट माणूस जंगलात वावरतो तो भीतीचा पूर्वग्रह सोबत घेऊन.माणसाचं सावधपण हे नैसर्गिक नसतं आणि म्हणून जंगलात वावरताना माणसाच्या मनाला सतत भीतीचे दंश होत राहतात.


कोळ्यांचे शहाणपण हे खूप विशेष वाटलं. कोळी जाळे विणून कीटकांची शिकार करून खात असतात.यातील काही कोळी हे दिवसा जाळं पडद्याप्रमाणे गुंडाळून ठेवतात आणि रात्रीला ते जाळं सोडून त्यात कीटकांना अडकवतात.त्यांच्यातील संवेदनशीलता खूप महत्त्वाची आणि हुशारपणाची वाटली.एखाद्या भुसभुशीत ठिकाणी गोल छोट्या आकाराचा खड्डा केलेला असतो.त्यामध्ये सुद्धा कोळी राहतात हे नव्याने कळाले.आम्ही त्याला लहानपणी  हल्ल्या असं म्हणत होतो.त्यात मुंगी वगैरे टाकली तर ते खाण्यासाठी तो हल्ल्या वर यायचा त्यालाच ' सिंहमुंगी 'म्हणतात असे यातून कळाले. कोळ्यांची संवेदनशीलता ही खूप महत्त्वाची वाटत.ती अतिशय नाजूक स्पंदन सुद्धा ओळखतात.


प्राणी त्यांच्यातील शहाणपण सृष्टीतील अन्य घटकांचे अहित करण्यासाठी वापरत नाहीत. त्यांच्या शहाणपणाच्या कृतीने निसर्गचक्रात समतोलपणा राहतो.याउलट माणसाचा शहाणपणा स्वतःसहित सगळ्यांचे अहित आणि सृष्टीचा विध्वंस करणारे आहे. जंगलातील साधन संपत्तीचे म्हणजे झाडांची आणि प्राण्यांची शिकार करण्यासाठी माणूस आपला शहाणपणा अतिरेकापर्यंत जाऊन वापरतो. याचा परिणाम जंगलाचा सौंदर्य आणि जंगलाचा प्राण संपण्यावर होतो.जंगलातील झाड ही त्या जंगलाचा श्वास असतात.प्राण्यांचा निवारा असतात.ती झाडं कापण्यासाठी माणसं अनेक प्रकारचे उपाय करत असतात.यातील कंपनघागर हे प्रकरण खूप मनाला विचार करायला लावते.


जंगलातील वृक्ष तोडत असताना तोडण्याच्या साधनांचा कुऱ्हाडीचा आवाज दूरपर्यंत जाऊन वनरक्षकांना कळू नये म्हणून त्या ठिकाणी वृक्षातोड करणारे लोक एक पाण्याची घागर भरून ठेवतात ,कारण झाड तोडताना होणाऱ्या आवाजाची कंपने ही घागर शोषून घेते आणि कुऱ्हाडीचा आवाज दूरपर्यंत जात नाही.


 ही गंभीर बाब लेखकाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी केलेली कार्यवाही खूप धाडसी वाटू लागते.माणसाचा शहाणपणा हा कोणाच्या हिताचा आहे …हा प्रश्नही निर्माण होतो.शहराची भूक भागवण्यासाठी सागवानाची सर्रासपणे कत्तल केली जाते हे खूप घातक आहे.हे कुठेतरी थांबायला हवे.


हिरवा वनवा हे प्रकरण खूप महत्त्वाचे आहे. नाव वाचल्याबरोबर वाचकाचे मन आकर्षित होते. जंगलात भारतीय वनस्पती बरोबर काही परकीय वनस्पती अतिशय वेगाने वाढत आहेत. या परकीय वनस्पतींना नष्ट करणारे कीटक या ठिकाणी नसल्यामुळे त्या फोफावत आहेत. यामुळे भारतीय मूळ वनस्पती आणि गवताचे अस्तित्व धोक्यात येताना दिसत आहे . थोडक्यात आपल्या भागात सर्रासपणे वाढणारी टणटणी किंवा घाणेरी नावाची वनस्पती अति वेगाने वाढत असताना भारतीय वनस्पती आणि गवतांना पाठवून गळपाटून टाकत आहे . यासोबतच भूतगांजा सारखी वनस्पती सुद्धा भारतीय रानगवतांचा प्राण घेत आहे . तृणगवतावर जगणाऱ्या प्राण्यांना याचे परिणाम भोगावे लागत आहेत.

या वनस्पती नष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.या गोष्टीकडे सुद्धा लेखकाने आपले लक्ष वेधलेले आहे.अशा हिरव्यागार वनस्पती अतिशय वेगाने वाढत आहेत.ज्या पर्यावरणाला घातक आहेत.यालाच लेखकाने 'हिरवा वनवा' ही दिलेली उपमा अतिशय समर्थक आणि योग्य वाटू लागते.


जंगलावर या ना त्या प्रकारे सतत आक्रमण सुरू असतं.हे कुठेतरी थांबायला हवे नाहीतर हे जंगल नष्ट व्हायला आणि सृष्टी भस्म व्हायला वेळ लागणार नाही.डॉ.सलीम अली एका ठिकाणी म्हणतात की " मानव जात नाहीशी झाली तर या वनस्पती,पक्षी, प्राणी यांचे काही बिघडणार नाही पण ही जीवसृष्टी नष्ट झाली तर मानवजात मात्र जगू शकणार नाही ." हे मानवांनी आता शिकलं पाहिजे पुढच्या पिढींना आपण काय देणार आहोत? यावर विचार केला पाहिजे.पर्यावरण समृद्ध करण्यासाठी या प्राण्यांकडून आपल्याला काही शिकता येईल का? याचा विचार केला पाहिजे कारण या सृष्टीतील वनस्पती,प्राणी यांचं अस्तित्व असेपर्यंत आणि त्यांचे अस्तित्व नष्ट झाल्यानंतर ते या पर्यावरणासाठी पोषक असतात. वनस्पतीची वाळून गेलेली लाकडं ही जंगलातच राहिली तर पावसाच्या पाण्याने ती कुजून मातीत मिसळून जातात,त्यामुळे ती माती समृद्ध होते.समृद्ध झालेल्या मातीत अनेक वनस्पती जिवाणू तयार होतील. जी जंगल समृद्ध करणारी असतील.माणसाचं मात्र असं नाही माणूस जंगलाला खायला उठलेला आहे . जंगल समृद्ध करण्यासाठी वनस्पती प्राणी जीवन वाढवतात म्हणून तरी माणसाने त्यांच्या मनातील निसर्ग उद्ध्वस्त करणारे विषाणू मारून टाकावेत.हा विचार हे कुब्र वाचल्यानंतर वाचकाच्या मनात निर्माण होतो.( कुब्र लेखक सत्यजीत पाटील,प्रकाशन - शब्दालय)


कुब्रमध्ये तिन्ही ऋतूंचं वर्णन केलेले आहे.प्रत्येक ऋतूचे वर्णन वेगवेगळ्या प्रकरणात अनुभव मांडले आहेत.हे वर्णन लेखकाने आपल्या तन-मन-धन आणि जंगलावरील निष्ठेपायी केले आहे.यासाठी त्यांनी केलेले धाडस आणि संयमाने केलेले निरीक्षण याची खरोखर कमाल करावी वाटते वाक्यरचना करताना क्रियापदांचा काही ठिकाणी वापर नसल्याने वाक्य तोडल्यासारखी वाटतात.तरीही वाचनाची आतुरता मात्र कायम राहते.

    

अतुल देऊळगावकर यांची प्रस्तावना आणि वसंत आबाजी डहाके यांनी केलेली पाठ राखण आणि पुस्तकातील लेखकांचे निरीक्षण अनुभव यामुळे हे पुस्तक अतिशय सुंदर झाले आहे वाचकाच्या मनात जंगला विषयी प्रेम आणि डोळ्याला जंगलाकडे पाहण्याची दृष्टी देणारे आहे.


आवडते शिक्षक,भरपुर वाचन करणारे आमचेही मार्गदर्शक मित्र माधव गव्हाणे (सॉक्रेटिस ) यांनी केलेले पुस्तक परीक्षण


स्वतःसाठी एक झोपडी बांध आणि जिवंत असतानाच स्वतःची चिरफाड करण्याची प्रक्रिया सुरू कर...! एमर्सन एकदा हेन्री डेव्हिड थोरोला म्हणाला होता.


माधव गव्हाणे यांनी केलेली ही 'स्व' ची चिकित्साच आहे.



२१/१०/२३

'स्तुती' भोजनासारखीच गरजेची आहे. 'Praise' is as necessary as food.'

" एका खेडुत स्त्रीने दिवसभर काबाडकष्ट करून आपल्या परिवारासमोर जेवणाऐवजी लाकडाचा भुसा ठेवून दिला.

जेव्हा पती व मुलांनी या अजब प्रकाराचे कारण विचारले,तेव्हा त्या स्त्रीने उत्तर दिले,"मला वाटलं की तुमचं लक्ष याकडे जातच नाही की तुमच्यासमोर जेवण ठेवलं जातं की भुसा.गेली वीस वर्षे मी तुम्हा लोकांसाठी जेवण बनवते आहे पण तुम्ही मला कधी सांगितलं नाही की तुम्ही भुसा खात आहात."


घरातून पळून गेलेल्या महिलांबाबत काही काळापूर्वी संशोधन झाले.पळून जाण्यामागचे कारण होते 'प्रशंसेचा अभाव' आणि मी पैज लावतो,की हेच कारण घरातून पळून जाणाऱ्या नवऱ्यांचेही असणार!आम्ही बहुतेक वेळा आपल्या जोडीदाराला हे सांगायची तसदीच घेत नाही की आम्ही त्याच्या/तिच्यामुळे प्रभावित आहोत म्हणून.


माझ्या वर्गात एका सदस्याने आपल्या जीवनातली एक घटना ऐकवली ज्यामध्ये त्याच्या पत्नीने त्याच्यापाशी एक आग्रह धरला होता.त्याची पत्नी व अन्य महिला चर्चमध्ये एका आत्मसुधार कार्यक्रमात सामील झाल्या.एक दिवस त्याच्या पत्नीने त्याला तिच्यातले सहा दोष काढायला सांगितले,जे सुधारल्याने ती अधिक चांगली पत्नी होऊ शकेल.तिचा पती हे ऐकून हैराण झाला.तो म्हणाला..

"पत्नीच्या अशा आग्रहाने मी आचंबित झालो.खरे पाहिले तर मी सहज तिच्या हातात तिच्यातल्या दोषांची यादी देऊ शकलो असतो,ज्यामध्ये सुधारणेची गरज होती.ईश्वर जाणतो की तीसुध्दा अशा हजार गोष्टींची यादी माझ्या हातात देऊ शकली असती ज्यांमध्ये मला सुधारणेची आवश्यकता होती; पण मी असे केले नाही.मी तिला म्हटलं,"मला याबाबत विचार करायला वेळ दे.मी उद्या सकाळी तुला याचे उत्तर देईन.'


दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठलो आणि फुलवाल्याला फोन करून माझ्या पत्नीसाठी सहा गुलाबांच्या फुलांचा नजराणा पाठवायला सांगितला.सोबत एक चिठ्ठी होती,"मला तुझे सहा दोष माहीत नाहीत,जे सुधारण्याची गरज आहे.तू जशी आहेस तशीच मला फार आवडतेस."


त्या संध्याकाळी जेव्हा मी घरी परतलो तेव्हा तुम्ही सांगू शकाल का की दरवाजात माझं स्वागत कुणी केलं?अगदी बरोबर!माझ्या पत्नीने!तिच्या डोळ्यांत अश्रू भरले होते.हे

सांगण्याची आता आवश्यकता नाही की मी या गोष्टीवर अत्यंत खुश होतो.पुढच्या रविवारी चर्चमध्ये इतर स्त्रियांना तिने ही घटना सांगितली आणि अनेक स्त्रियांनी मला येऊन सांगितले,की इतकी शहाणपणाची गोष्ट आम्ही या आधी कधीच ऐकली नव्हती.तेव्हा कुठे मला स्तुती करण्याच्या शक्तीचा प्रत्यय आला.'


लॉरेंस जिगफेल्ड ऑडवेअर धूम माजवणारा सुप्रसिध्द निर्माता होता.तो एक असा निर्माता होता,

ज्याच्यात 'अमेरिकन तरुणींना ग्लॅमरस' बनवण्याची विलक्षण प्रतिभा होती.प्रत्येक वेळी ते अशा एखाद्या सामान्य तरुणीला निवडत असे, जिच्याकडे कुणी पुन्हा वळूनसुध्दा पाहणार नाही.मग ते तिच्यात कायापालट करीत.प्रशंसा व आत्मविश्वासाचे महत्त्व जाणवल्यामुळे त्यांना माहिती होते की केवळ प्रशंसा व महत्त्व दिल्याने सामान्य स्त्रीसुद्धा स्वतःला सुंदर मानू लागते.ते व्यवहारी होते.त्यांनी कोरसमध्ये गाणाऱ्या मुलींचा पगार आठवड्याला तीस डॉलरपासून वाढवून ७५ डॉलर्स केला.

ते विशाल अंतःकरणाचे होते.फॅडलीजच्या सादरीकरणाच्या पहिल्या रात्री त्यांनी सर्व कलाकारांना तार पाठवली आणि यामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक मुलीला अमेरिकन ब्यूटी गुलाब दिले..


एकदा माझ्यावर डाएटिंगचे भूत सवार झाले अन् मी सहा दिवस उपास केला.सहाव्या दिवशी मला तेवढी भूक लागत नव्हती,जेवढी दुसऱ्या दिवशी लागली होती.आम्ही सगळेच हे जाणतो की जर एखाद्याच्या परिवाराला किंवा कर्मचाऱ्यांना सहा दिवस खायला मिळाले नाही तर तो स्वतःला अपराधी मानेल.पण जर ही व्यक्ती परिवार किंवा कर्मचाऱ्यांची स्तुती सहा दिवस,सहा आठवडे किंवा साठ वर्षापर्यंत करणार नाही,तेव्हा त्याला जरासुध्दा अपराधी वाटणार नाही.आम्ही हे विसरतो की स्तुतीसुद्धा भोजनासारखीच आमची अनिवार्य गरज आहे.


जेव्हा महान अभिनेता अल्फ्रेड लुटने 'रियुनियन इन व्हिएन्ना' मध्ये प्रमुख भूमिका केली,तेव्हा त्यांनी म्हटले होते,


" मला ज्या गोष्टीची सर्वाधिक गरज आहे ती आहे - आत्मसन्मानासाठीचं पोषण."


आम्ही आपली मुले,मित्र आणि कर्मचाऱ्यांच्या शरीराचं पोषण करतो;पण आम्ही त्यांच्या आत्मसन्मानाचं किती पोषण करतो ?आम्ही त्यांना उर्जेसाठी मांस व बटाटे उपलब्ध करून देतो,पण आम्ही त्यांना प्रशंसेचे दयाळू शब्द द्यायला विसरुन जातो,जे वर्षानुवर्ष त्यांच्या आठवणीत पहाटेच्या ताऱ्यांच्या संगीतासारखे गुंजेल.


पॉल हार्वेने आपल्या 'द रेस्ट ऑफ द स्टोरी' या रेडियो कार्यक्रमात सांगितले,की कशा तऱ्हेने खरी प्रशंसा एखाद्या व्यक्तीचे जीवन बदलून टाकते.त्यांनी एक घटना ऐकवली.अनेक वर्षांपूर्वी डेट्रॉइटच्या एका शिक्षिकेने स्टेव्ही मॉरिसला म्हटले की हरवलेल्या एका उंदराचा शोध घ्यायला त्याने मदत करावी.निसर्गाने स्टेव्हीला डोळे दिले नसतील.पण त्या ऐवजी स्टेव्हीची श्रवणशक्ती अतिशय तेज होती. स्टेव्हीमध्ये असे काही होते,जे त्या पूर्ण वर्गात कुणापाशीच नव्हते.पण हे असे प्रथमच घडले होते की त्याच्या श्रवणशक्तीसाठी कुणी त्याची प्रशंसा केली होती.

अनेक वर्षांनंतर स्टेव्हीचे म्हणणे आहे की ती प्रशंसा त्यांच्या नवीन जीवनाची सुरुवात होती.त्या घटनेनंतर त्यांनी आपल्या ऐकण्याच्या क्षमतेचा विकास केला आणि स्टेव्ही वंडरच्या रंगमंचीय नावाला स्विकारून ते सत्तरच्या दशकाचे महान पॉप सिंगर व गीतकार झाले.


अनेक वाचक या शब्दांना वाचताना मनात म्हणतील 'अच्छा! लबाडी ! लांगूलचालन ! मी याचा उपयोग करून पाहिला आहे समजदार लोकांसमोर.पण हे प्रकार चालत नाहीत. '


अगदी बरोबर आहे ! लबाडी शहाण्या लोकांसमोर चालत नाही.ती उथळ,स्वार्थी आणि खोटी असते.तिला असफल व्हायलाच हवे आणि ती असफल होतेच. 


तसे तर अनेक लोक प्रशंसेचे इतके भुकेले असतात की ते लबाडीला स्तुती समजून पचवून टाकतात,ज्याप्रमाणे एखादा भुकेलेला मनुष्य गवत व किडे-मुंगळे खाऊन टाकतो.


महाराणी व्हिक्टोरियालापण खोटी स्तुती आवडत असे.प्रधानमंत्री बेंजामिन डिस्त्राइलीने हे स्विकार केले होते,की ते महाराणीची खोटी स्तुती करतात.त्यांच्याच शब्दात सांगायचं तर 'ते मोठ्या चमच्याने लोणी लावत असतात.'परंतु डिस्त्राइली ब्रिटनचे सर्वांत सुसंस्कृत,योग्य व चतुर व्यक्ती होते.ते या कलेत निपुण होते.जी गोष्ट त्यांचा हेतू सफल करून गेली,ती तुमच्या आमच्यासाठी योग्य ठरेलच असे काही म्हणता येणार नाही. दीर्घ काळासाठी खोटी स्तुती करण्याने फायदा कमी अन् तोटाच जास्त होऊ शकतो.अशी खोटी स्तुती म्हणजे खोटा शिक्का आहे.जर तुम्ही त्याला खरा शिक्का म्हणून बाजारात चालवण्याचा प्रयत्न केलात तर ते अंगाशी येऊ शकते.तुमच्या प्रशंसा व खोटी स्तुती यात काय फरक आहे ? याचे उत्तर अगदी सोपे आहे.एक खरी असते आणि दुसरी खोटी. एक हृदयातून निघते आणि एक स्वार्थातून.एक निस्वार्थी असते,तर दुसरी स्वार्थपूर्ण ! एकीची प्रत्येक ठिकाणी स्तुती होते तर दुसरीची हर ठिकाणी निंदा.


मी मेक्सिको शहरात हल्लीच चापुल्टेपेक पॅलेसमध्ये एक मेक्सिकन हिरो जनरल अल्वारो ऑब्रेगॉनची मूर्ती बघितली.त्या मूर्तीखाली 


जनरल ऑब्रेगॉनच्या तत्त्वज्ञानाचे बुध्दिमत्तापूर्ण शब्द लिहिले होते : "आपल्यावर हल्ला करणाऱ्या शत्रुंना घाबरू नका;उलट त्या मित्रांना घाबरून असा जे तुमची खोटी स्तुती करतात. '


नाही,नाही,नाही!मी तुम्हाला खोटी स्तुती व लबाडी करायला सांगत नाहीए.मी तर अगदी वेगळेच सांगतोय.मी तुम्हाला एक नवीन जीवन सुरू करायला सांगतोय.मला परत सांगू द्या.'मी तुम्हाला एक नवीन जीवन सुरू करायला सांगतोय.'


सम्राट पंचम जॉर्जने बकिंगहॅम राजवाड्यात आपल्या एक अभ्यासिकेच्या भिंतीवर सहा सूत्रे लिहून ठेवली होती.त्यातले एक सूत्र असे होते, 


"मला हे शिकवा की ना मी कुणाची खोटी स्तुती करेन आणि ना कुणाकडून स्वतःची खोटी स्तुती ऐकण्यासाठी उत्सुक राहीन."


 मी एकदा लबाडीची व्याख्या वाचली होती जी इथे सांगण्यासारखी आहे- 


"लबाडी किंवा खोटी स्तुती समोरच्याला तेच सांगते जो तो स्वत:बद्दल विचार करतो."


"तुम्ही जी वाटेल ती भाषा वापरा,"राल्फ वॉल्डो इमर्सनने म्हटले होते,"तुम्ही नेहमी तेच सांगाल जे तुम्ही आहात.'


जर आम्हाला फक्त लबाडीच करायची असेल तर सर्वांशी लबाडीने वागून आम्ही सहजपणे मानवी संबंधाचे विशेषज्ञ बन् शकतो.


जेव्हा आम्ही कुठल्याच निश्चित विषयाबद्दल विचार करीत नसतो,तेव्हा आपल्या फावल्या वेळात ९५ टक्के वेळ आम्ही स्वत:बद्दलच विचार करीत असतो.जर आम्ही स्वत:बद्दल विचार करणे थोडे कमी केले तर दुसऱ्यांच्या चांगल्या गुणांबद्दल विचार करायला लागू,तेव्हा मग आम्हाला लबाडीची किंवा खोटी स्तुती करण्याची गरजच वाटणार नाही.खोट्या स्तुतीला पहिल्याच नजरेत,

तोंडाबाहेर पडायच्या आधीच ओळखले जाऊ शकते आणि ती अगदी उथळ व खोटी असते.


आजच्या जगात खरी स्तुती दुर्मिळ झाली आहे. असे काय होते कोण जाणे की चांगल्या क्रमांकानी उत्तीर्ण झालेल्या आपल्या मुलाची किंवा मुलीची स्तुती करण्याचा आम्हाला बरेचदा विसरच पडतो किंवा आम्ही आपल्या मुलाला त्यावेळी प्रोत्साहित करायला विसरून जातो, जेव्हा ते पहिल्यांदा चांगला केक यशस्वीपणे बनवतात किंवा पाखरांसाठी घरटे बनवतात. मुलांना आपल्या आई - वडिलांकडून झालेल्या स्तुतीने जो आनंद मिळतो, त्यापेक्षा जास्त आनंद अन्य कुठल्याच गोष्टीने मिळत नाही.


पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही क्लबमध्ये चांगल्या भोजनाचा आनंद घ्याल,तेव्हा खानसाम्याला नक्की निरोप पाठवा की जेवण रुचकर होते आणि जेव्हा कोणी थकलेला विक्रेता तुमच्याशी सभ्यपणे वागेल तेव्हासुध्दा या गोष्टीचा उल्लेख जरूर करा.


प्रत्येक पादरी,प्रत्येक भाषण देणारा आणि प्रत्येक सार्वजनिक वक्ता हे जाणतो की जर श्रोत्यांमधून एकाही व्यक्तीने टाळी वाजवली नाही तर किती वाईट वाटते आणि किती उत्साहभंग होतो.व्यावसायिकांना जे लागू होते ते ऑफिस,दुकाने, कारखान्यांमधले कर्मचारी, कुटुंबीय आणि मित्र परिवार यांना तर दुपटीने लागू होते.

आमच्या संबंधात आम्हाला याचा कधी विसर पडायला नको की आमचे साथीदार अखेर मानव आहेत आणि स्तुतीचे भुकेले आहेत.हाच तो अस्सल शिक्का आहे ज्याला प्रत्येक जण पसंत करतो.


आपल्या प्रत्येक दिवसाच्या प्रवासात कृतज्ञतेच्या ठिणग्या मार्गावर पसरवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला नवल वाटेल की कशा तऱ्हेने या ठिणग्यांमुळे मैत्रीच्या छोट्या-छोट्या वाती उजळतील,ज्यामुळे तुमच्या भावी प्रवासात तुम्हाला ऊब मिळेल.


न्यू फेयरफिल्ड,कनेक्टिकट इथल्या पामेला डनहॅमच्या अनेक जबाबदाऱ्यांपैकी एक जबाबदारी होती नवीन कर्मचाऱ्याच्या देखरेखीची,ज्याचे काम अत्यंत वाईट होते.दुसरा कर्मचारी त्याची खूपटर उडवत असे तो किती वाईट काम करतो असे सांगत.ही खूपच वाईटपध्दत

होती.आणि दुकानातला अमूल्य वेळ वाया जात असे. ( मित्र जोडा,डेल कार्नेगी,अनु-कृपा कुलकर्णी,मंजुल पब्लिशिंग हाऊस )


पॅमने या कर्मचाऱ्याला प्रेरणा देण्याचे अनेक उपाय अंमलात आणले,पण काही लाभ झाला नाही.मग तिला असे लक्षात आले की कधी तरी तो कुठले तरी काम चांगल्या तऱ्हेने करून घेतो. पॅमने निर्णय घेतला की जेव्हा कधी अशी संधी येईल तेव्हा ती इतरांसमोर त्याची स्तुती करेल. असे केल्यावर सर्वांना दिसून आले की दर दिवशी त्याच्या कामात सुधारणा होत गेली आणि लवकरच तो आपले काम चांगल्या तऱ्हेने करू लागला.आता सर्व जण त्याची स्तुती करतात आणि त्याला सन्मान देतात.खऱ्या स्तुतीने सकारात्मक परिणाम मिळाले,उलट आलोचना व टिकेने हाती काहीच आले नव्हते.


लोकांना टोमणे मारून जखमी केल्याने ते कधीच बदलत नाहीत,न त्यामुळे काही सकारात्मक प्रभाव पडतो.म्हणून असे वर्तन करणे निरर्थक असते.एक जुनी म्हण आहे,जी मी माझ्या आरशावर चिकटवून ठेवली आहे.ती मी रोज वाचतो :


मी या रस्त्यावर फक्त एकदाच चालेन... म्हणून जर मी काही चांगले काम करू शकतो किंवा कुणाचे भले करू शकतो तर मी ते आत्ताच करेन. मी त्याला टाळणार नाही, दुर्लक्ष करणार नाही. कारण पुन्हा मी या रस्त्यावर परतून येणार नाही.


इमर्सनने म्हटले होते,"प्रत्येक व्यक्ती माझ्यापेक्षा कुठल्या ना कुठल्या गोष्टीत सरस असते.मी त्याची ती गोष्ट शिकून घेतो."


जर हे इमर्सनसाठी खरे असेल तर तुमच्या माझ्या बाबतीत तर ते हजार पटीने जास्त खरे आहे.आम्ही आपल्या इच्छांबद्दल विचार करणे सोडायला हवे.आम्ही लबाडीला विसरायला हवे, प्रामाणिकपणे खरी प्रशंसा करायला हवी, मनापासून स्तुती करायला व मुक्तकंठाने कौतुक करायला हवे.जर तुम्ही असे कराल तर तुम्हाला असे आढळून येईल,की लोक तुमच्या शब्दांना त्यांच्या आठवणींच्या तिजोरीत ठेवतील आणि आयुष्यभर त्यांना ते शब्द आठवत राहतील. तुम्ही जे म्हटलं ते तुम्ही विसरून जाल,पण ते मुळीच विसरणार नाहीत.

१९/१०/२३

चांगल्या जगाचे स्वप्न प्लेटो… Plato dreams of a better world...

प्लेटोच्या त्या अमर ग्रंथांचे नाव 'रिपब्लिक'असे आहे.या रिपब्लिकमध्ये प्लेटोने आपले ते आदर्श जगत् मांडले आहे.प्लेटोच्या रिपब्लिकची आपल्याला नीट कल्पना येण्यासाठी आपण त्या रिपब्लिकमधील नागरिकांच्या जीवनाकडे पाहूया.जन्मल्यापासून मरेपर्यंत ते आपले जीवन कसे कंठतात,ते पाहू या. 


त्या रिपब्लिकमधील मुले म्हणजे सामाजिक सामुदायिक संभोगाची फळे आहेत.उत्कृष्ट संतती जन्मावी म्हणून उत्कृष्ट पुरुषांचा उत्कृष्ट स्त्रियांशी संयोग घडवून आणावयाचा.पुरुषांची या स्त्रियांवर जणू सामुदायिक मालकी! वैयक्तिक विवाह नाहीत,खासगी कुटुंबे नाहीत! मुले जन्मताच शासनसंस्थेने ती ताब्यात घ्यावयाची आईबापांपासून घेऊन त्यांना सरकारी बालसंगोपनगृहात नेऊन ठेवायचे.आईबापांना मुले आणि मुलांना आईबाप ओळखता येत नाहीत असे होईल,तरच मानवी विश्वबंधुत्व कल्पनेत न राहता प्रत्यक्षात येणे शक्य होईल; कारण अशा साम्यवादी शासनसंस्थेत प्रत्येक जण खरोखरच दुसऱ्याचा भाऊ होणे शक्य होईल.आईबापांनी आपले लैंगिक अनुभव त्या त्या ठरवीक व्यक्तीपुरतेच मर्यादित ठेवावेत असे नाही.मुले सरकारच्या स्वाधीन केल्यावर त्यांना स्वेच्छाविलास करण्याची इच्छा असेल,तर त्यांनी खुशाल तसे करावे.परंतु त्यांनी अशा संभोगातून मुले जन्माला येऊ देता कामा नयेत.त्यांनी गर्भपात करण्याची दक्षता घ्यावी.अशा रीतीने अनिर्बंध प्रेमाची गोष्ट व्यक्तीच्या सारासार विवेकतेवर सोपवून दिली आहे.या बाबतीतही स्त्रियांना व पुरुषांना सारखीच मोकळीक. नागरिकांच्या खासगी जीवनात सरकारने लुडबूड करू नये.आता त्या मुलांकडे वळू या.जन्मत:च मुलास सरकारी संगोपनगृहात पाठवावयाचे.या सर्व मुलांना ती वीस वर्षांची होईपर्यंत एकत्र शिक्षण द्यावयाचे.या प्राथमिक शिक्षणात संगीत आणि शरीरसंवर्धक व्यायाम यांचा अंतर्भाव व्हावा.

व्यायामाने शरीर प्रमाणबद्ध व सुंदर असे होईल.संगीताने आत्म्याचे सुसंवादीपण वाढेल, मनाची प्रसन्नता वाढेल.

"ज्या माणसाच्या आत्म्यात संगीत नाही,तो विश्वासार्ह नाही." अशा माणसाचे मन खुरटलेले असते,पंगू व विकृत असते;अशाचे वासनाविकार असंयत असतात; तिथे ताळ ना तंत्र,संयम ना विवेक, सद्सदाबद्दलच्या अशा माणसाच्या कल्पना सदैव दूषित व विकृत असतात. त्याची सद्सद्विवेक शक्तीच जणू भ्रष्ट होते.संगीत म्हणजे प्लेटोला परम ऐक्य वाटे,परम सुसंवादिता वाटे.संगीत ऐकू येणारे असो वा ऐकू न येणारे असो;ते बाह्य वा आंतरिक असो, ध्वनीचे असो वा आकाशातील ताऱ्यांचे असो, सर्व विश्वाच्या पाठीमागे संगीताचे परम तत्त्व आहे;ते नसते तर या जगाचे,या विश्वाचे,कधीच तुकडे झाले असते व जगात साराच स्वैर गोंधळ माजला असता.सर्वत्र अव्यवस्थेचे साम्राज्य पसरले असते.संगीत म्हणजे विश्वाचा प्राण, विश्वाचा आत्मा.ग्रह-तारे म्हणजे विश्वाचे शरीर, हे संगीत जर या विश्वशरीरात नसेल,संगीताचा प्राण जर या पृथ्वीत नसेल.तर ही पृथ्वी म्हणजे निःस्सार वाटेल.मग पृथ्वी म्हणजे केवळ जळून गेलेला कोळसा.केवळ निःसार राख! स्वर्गात व अंतरिक्षात जर संगीत नसेल.या अनंत ताऱ्यांत व ग्रहांत जर संगीत नसेल,तर हे तारे,हे सारे तेजोगोल,

म्हणजे चिमूटभर राखच समजा.


म्हणून प्रत्येकाच्या शिक्षणात संगीत हा महत्त्वाचा व आवश्यक भाग असला पाहिजे.मुलगा व मुलगी वीस वर्षांची होण्यापूर्वी त्यांना संगीताचे सम्यक् शिक्षण दिले पाहिजे.तसेच व्यायामाचेही. ज्या शाळांतून हे शिक्षण द्यावयाचे,त्या शाळा मुलांमुलींसाठी अलग नकोत.एकत्रच शिक्षण असावे.मुलामुलींनी एकत्र काम करावे.एकत्र खेळावे.व्यायाम करताना मुलगे व मुली यांनी कपडे काढले पाहिजेत.प्लेटो म्हणतो,"माझ्या आदर्श राज्यातील स्त्रियांना सद्गुणांची भरपूर वस्त्रे असतील." खोटी लज्जा करायची काय ? मूर्खपणाचे लाजणे नको.

मानवी शरीर उघडे दिसले म्हणून त्यात लाजण्यासारखे किंवा अश्लील वाटण्यासारखे काय आहे? तिथे असमंजसपणे हसण्याची थट्टामस्करी करण्याची जरुरी नाही.मुलांच्या शिक्षणात घोकंपट्टी नको,कंटाळवाणे

पणाही नको;केवळ पढीकपणा नको, केवळ हमालीही नको; केवळ बैठेपणा व पुस्तकीपणा नको;केवळ शारीरिक श्रमही नको.शिक्षणाचा बोजा न वाटता ते परम आनंदप्रद वाटले पाहिजे.शिक्षण म्हणजे आपला छळ असे मुला-मुलींना वाटता कामा नये.योग्य अशा गुरुजनांच्या देखरेखीखाली सर्वसाधारण मुलाला मनाची व शरीराची योग्य वाढ करून घेता येईल, ते भरपूर खेळेल व भरपूर ज्ञानानंदही मिळवील.शाळा म्हणजे मनोबुद्धीचा आखाडा,

बौद्धिक क्रीडांगण,तिथे विचारविनिमयाचा मनोहर खेळ खेळण्यात मुले सुंदर स्पर्धा करतील,ज्ञानांत व विचारांत एकमेकांच्या पुढे जाण्यासाठी पराकाष्ठा करतील,

स्वतःमधील उत्कृष्टत्व प्रकट करण्यासाठी धडपडतील.


वयाची वीस वर्षे होईपर्यंत अशा प्रकारचे शारीरिक व मानसिक शिक्षण या आदर्श राज्यव्यवस्थेत मुलांना दिले जाईल.मुले वीस वर्षांची झाली म्हणजे एकदा चाळण मारायची निवड करायची.पुढे आणखी शिकायला जी असमर्थ असतील,त्यांना शूद्र वर्गात घालावयाचे.त्यांनी शारीरिक श्रम उचलायचे,तसेच वैश्यकर्मही उचलायचे.

शेतकरी कामकरी व वैश्य हे सारे या वर्गात.आदर्श राज्यव्यवस्थेत हे हीन धातू यांना काढून टाकल्यावर जे राहतील,त्यांचे शिक्षण पुढे चालू करायचे.


पुढे आणखी दहा वर्षे म्हणजे मुले तीस वर्षांची होईपर्यंत त्यांना विज्ञानविद्या शिकवायची.अंकगणित,भूमिती,

ज्योतिर्विद्या हे विषय शिकवायचे.हे विषय व्यवहारोपयोगी म्हणून नाही शिकवायचे,तर सौंदर्यदृष्टी यावी,प्रमाणबद्धता यावी,म्हणून शिकवायचे.अंकगणिताचा उपयोग केवळ बाजारात देवघेवीसाठी करणे हे कमीपणाचे आहे,असे प्लेटोच्या आदर्श राज्यामधील प्रतिष्ठित सज्जन मानीत.

गणिताचा उपयोग हिशोबासाठी किंवा इमारती बांधण्यासाठी,पूल बांधण्यासाठी किंवा यंत्रे करण्यासाठी करणे हे आदर्श राज्यातील सन्मान्य नागरिक कमी प्रतीचे मानीत.प्लेटो या बाबतीत समकालीन ग्रीकांशी सहमत होता.ग्रीक लोकांना यांत्रिक संशोधनात किंवा भौतीक सुधारणा करण्यात गोडी वाटत नसे,त्यांना ती आवड नव्हती.तिकडे त्यांची प्रवृत्ती नसे.मूर्त व प्रत्यक्ष इंद्रियगम्य ज्ञानापेक्षा अमूर्त व अप्रत्यक्ष इंद्रियातीत ज्ञानाकडेच ते भरारी मारू पाहत. अंकगणिताचा अभ्यास प्लेटोच्या मते फक्त दोन गोष्टींसाठीच करणे बरे.वस्तूंच्या दृश्य विविधतेतून शाश्वत एकतेकडे जाण्यासाठी तत्त्वज्ञान्याला गणिताचे साह्य होते;दुसरी गोष्ट म्हणजे लष्करी सेनापतीला त्यायोगे आपले शिपाई नीट रांगांत उभे करता येतात,त्यांच्या चारचारांच्या रांगा करता येतात,

निरनिराळ्या छोट्या-मोठ्या पलटणी करता येतात.

दहांच्या,शंभराच्या, हजारांच्या अशा टोळ्या करता येतात.गणिताचा सखोल अभ्यास फक्त तत्त्वज्ञानी व सेनानी यांनीच करावा.तीस वर्षांचे वय होईपर्यंत मुलांचा विज्ञानाचा अभ्यास पूर्ण होईल. आणि मग पुन्हा चाळण मारायची, पुन्हा निवड. अधिक उच्च शिक्षण घेण्यास जे असमर्थ ठरतील त्यांना बाजूस काढायचे, त्यांचा मध्यम वर्ग बनवायचा. शिपायांचा, सैनिकांचा, लढवय्यांचा हा वर्ग. आदर्श राज्याचे हे पालनकर्ते, रक्षणकर्ते.प्लेटो जरी परम थोर विचारस्त्रष्टा होता तरी चिनी, हिंदू व ज्यू यांची थोर दृष्टी त्याच्याजवळ नव्हती. शांतीचे ध्येय ग्रीक मनोबुद्धीच्या कक्षेच्या पलीकडचे होते. अती उत्कृष्ट असे ग्रीक मत, अती सुसंस्कृत व परमोन्नत असे ग्रीक मतसुद्धा शांतीचा आदर्श कल्पू शकत नव्हते. प्लेटोच्या आदर्श राज्यात सैनिकांना महत्त्वाचे कार्य आहे. 'सैनिकांशिवाय राष्ट्र' ही गोष्ट 'गुलामांशिवाय राष्ट्र' याप्रमाणेच अशक्य वस्तू आहे असे प्लेटोला वाटे.राज्य म्हटले म्हणजे तिथे दास हवे तसे सैनिकही हवे..! प्लेटोच्या भव्य-दिव्य प्रतिभेचे व अपूर्व बुद्धिमत्तेचे कौतुक वाटते.आपणास त्याच्याबद्दल परत आदर वाटतो. परंतु युद्धावरचा त्याचा विश्वास व गुलामगिरीला त्याने दिलेली परवानगी या दोन गोष्टींचा कलंक त्याच्या प्रतिभाचंद्रिकेला लागलेला आहे.


आपण दोन वर्ग पाहिले.शेतकरी,कामकरी व व्यापारी यांचा खालचा वर्ग व नंतर हा क्षत्रियांचा दुसरा मध्यम वर्ग. विसाव्या वर्षी ज्यांची मनोबुद्धी कमी दर्जाची दिसेल त्यांचा खालचा वर्ग, तिसाव्या वर्षी मनोबुद्धीचा अधिक विकास करून घ्यायला जे असमर्थ दिसतील, त्यांचा मध्यम वर्ग. या दोन चाळण्यांनंतर जे उरतील. त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यास करावयाचा.आता ही तीस वर्षांची वेचक मुले आहेत. आदर्श राज्यकारभार चालवण्यास योग्य अशी ही मंडळी. प्लेटोच्या आदर्श राज्यात लैंगिक समानता आहे. स्त्री-पुरुषांना विकासाची, गुणवर्धनाची, पूर्ण मोकळीक आहे, समानता आहे. दोघांनाही समान शिक्षण, समान संधी. जीवनाची महत्त्वाची कामे अंगावर घेताना स्त्री-पुरुषांना कोणतेही स्थान आपापल्या योग्यतेनुरूप घेण्याची मुभा आहे. पाच वर्षे तत्त्वज्ञानाचा अभ्यास केल्यावरही अभ्यासक्रम पूर्ण झाला असे नाही. चांगला राज्यकारभार चालवायला ही मुले अद्याप समर्थ नाही झाली, अजून कसोटी आहे. विचारांच्या राज्यातून प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात उतरून त्यांनी आता परीक्षा द्यावयाची. दुसऱ्यांच्या जीवनाला वळण देण्याची जबाबदारी उचलण्यापूर्वीच जीवन काय आहे हे त्यांनी अनुभवले पाहिजे, जगातील टक्केटोणपे त्यांनी खाल्ले पाहिजेत, पंधरा वर्षे प्रत्यक्ष जगात त्यांनी वावरले पाहिजे. आता वय पन्नास वर्षांचे होईल. आता तत्त्वज्ञानी राजेराण्या व्हायला ती सारी समर्थ ठरतील. आदर्श राज्यात तत्त्वज्ञानीच शास्ता होण्यास पात्र असतो. तत्त्वज्ञानी तरी शास्ते झाले पाहिजेत किंवा शास्त्यांनी तरी तत्त्वज्ञानी बनले पाहिजे. जोपर्यंत अशी स्थिती येत नाही, तोपर्यंत जगातील दुःखांचा अंत होणार नाही. "शिक्षणामुळे व नैसर्गिक योग्यतेमुळे तत्त्वज्ञानी हेच उत्कृष्ट स्त्री-पुरुष.शासनसंस्थेने जे उत्कृष्ट स्त्री-पुरुष निर्माण केले, ते म्हणजे हे तत्त्वज्ञ; आणि जे उत्कृष्ट आहेत.त्यांनीच राज्यकारभाराचे सुकाणू हाती घेणे योग्य. या तत्त्वज्ञानी शासकांचा शेवटचा, तिसरा, परमोच्च वर्ग.खालच्या व मधल्या वर्गांनी या उच्च वर्गाचे ऐकलेच पाहिजे. या उच्चवर्गीय शास्त्यांत प्रामाणिकपणा असावा म्हणून त्यांची खासगी मालमत्ता असता कामा नये. त्यांचे जे काही असेल ते सारे सामुदायिक ते सार्वजनिक भोजनालयात जेवतील,बराकीतून झोपतील. स्वार्थी वैयक्तिक हेतू नसल्यामुळे हे शास्ते लाचलुचपतीच्या अतीत राहतील.एकच महत्त्वाकांक्षा सदैव त्यांच्या डोळ्यांसमोर असेल आणि ती म्हणजे मानवांमध्ये न्यायाची कायमची प्रस्थापना करणे.आदर्श शासनपद्ध तीचे असे हे संपूर्ण चित्र आपण पाहिले.या आदर्श राज्यपद्धतीच्या नगरीच्या दरवाजावर "न्यायाची नगरी ती ही "अशी अक्षरे आपण खोदून ठेवू या. या न्यायाच्या नगरीत शिरून तिच्यातील काही मनोहर विशेष,काही प्रसन्न व गमतीचे प्रकार, पाहू या.पहिली गोष्ट म्हणजे,या तत्त्वज्ञानी शासकांनी ग्रीकांचा धार्मिक आचार्य व उद्गाता महाकवी जो होमर त्याला व त्याच्या महाकाव्यांना हद्दपार केले आहे.त्या महाकाव्यांतील देव वासनाविकारांनी बरबटलेल्या मानवाप्रमाणे आदळआपट करतात. इलियडमधील देवदेवता पोरकट वाटतात.किती त्यांचे अहंकार ! किती त्यांचे काम-क्रोध.असला हा धर्म निकामी आहे,त्याची शुद्धता केली पाहिजे,त्याच्यातील सारा रानटीपणा नष्ट केला पाहिजे.दुष्ट रूढी,भ्रामक कल्पना,चमत्कार, इत्यादी गोष्टी धर्मांतून हद्दपार केल्या पाहिजेत. मानवी बुद्धीला न पटणारा,तिच्याशी विसंगत असणारा असा धर्म असण्यापेक्षा धर्मच नसलेला बरा.

प्लेटोच्या आदर्श राज्यामध्ये देवदेवतांची ही अशी दुर्दशा आहे.परंतु मानवा- मानवांतील संबंध कसे राखायचे ? मानवांतील व्यवहार कसे चालवायचे? मुख्य गोष्ट म्हणजे या सर्व व्यवहारांत न्यायबुद्धी असावी.केवळ धंदेवाईकपणा ही गोष्ट त्याज्य आहे.ती मानवाचा अधःपात करणारी आहे.धंदेवाईक माणसाला यशस्वी रीतीने धंदेवाईक होणे व प्रामाणिकही असणे या दोन्ही गोष्टी कशा साधतील ? 


प्लेटोच्या आदर्श राज्यात गुन्हेगारांना करूणेने वागविण्यात येते,त्यांच्यावर अंकुश असतो,बंधने असतात;

परंतु त्यांना शिक्षा देण्यात येत नाही. मनुष्य गुन्हा करतो:

कारण त्याला नीट शिक्षण मिळालेले नसते.ज्याला स्वतःचे ज्ञान नाही,आपल्या सभोवतालच्या बंधूंविषयीही ज्याला ज्ञान नाही.अशा अज्ञानी पशुसम मनुष्याची कीवच करायला हवी.खोडसाळ व दुष्ट घोडा फटके मारून साळसूद होणार नाही.वठणीवर येणार नाही.ज्या मनुष्याला सामाजिक बुद्धी नाही.सर्वांशी मिळून-मिसळून कसे वागावे; सर्वांच्या हितसंबंधास अविरोधी वर्तन कसे ठेवावे,हे ज्याला कळत नाही,अशा मनुष्याला केवळ बहिष्कृत किंवा अस्पृश्यप्रमाणे मानून तो सुधारेल असे नाही.गुन्हेगार वेडा असेल तर त्याचे वेडेपण तुम्ही दूर केले पाहिजे.तो अज्ञानी असेल तर तुम्ही त्याचे अज्ञान दूर केले पाहिजे.परंतु सूडबुद्धीने तुम्ही त्याला कधीही,केव्हाही,

शासन करता कामा नये,शिक्षा देता कामा नये.


मानसिक रोगटपणाप्रमाणेच शारीरिक रोगटपणाही अज्ञानजन्यच असतो.काळजी घेतली तर रोगराई बऱ्याच प्रमाणात कमी करता येईल.आरोग्य वाढवता येईल.परंतु ज्यांचे रोग दुःसाध्य आहेत त्यांना मरायचे असेल,आत्महत्या करायची असेल,तर कारुण्यबुद्धीने त्यांना तशी परवानगी देण्यात येईल.कारण घुटमळणाऱ्या व कंटाळवाण्या रोगापेक्षा मरण बरे.


वकील म्हणजे एक पीडाच,परंतु आदर्श राज्यात त्यांची जरुरी राहणार नाही.या अनावश्यक आपत्तींचा त्रास प्लेटोच्या राज्यात नाही.कारण जेथे ज्ञान आहे,

समंजसपणा आहे,तिथे कोर्टकचेऱ्यांची फिर्यादांची वगैरे जरुरीच नाही. आदर्श राज्यात कायदे फारच थोडे असतील आणि त्यांचा अर्थ करणे सोपे व सरळ असेल. आदर्श राज्यातील तत्त्वज्ञानी शास्त्यांस पुरतेपणी माहित असते की,एखादा नवीन कायदा करणे म्हणजे गुन्हेगारांचा आणखी एक नवीन वर्ग निर्माण करणे होय.भाराभर कायदे केल्याने गुन्हे कमी होत नसतात.आदर्श राज्यांतील तत्त्वज्ञानी राज्यकर्ते स्वतःचे नियंत्रण कसे करावे, स्वत:वर संयम कसा ठेवावा,हे जनतेस शिकवतील तर मग देखरेख करण्याची,पोलीस वगैरे राखण्याची फारशी जरुरी राहणारच नाही.


आदर्श राज्यातील शासनसंस्था एकच गोष्ट सदैव पाहील.प्रजेचे हित,मंगल कसे होईल,प्रजेला सुख कसे लाभेल,याच एका गोष्टीकडे तेथील शास्ते रात्रंदिवस पाहतील.सुख,स्वास्थ्य,शांती, निरामयता,इत्यादी गोष्टी प्रजेस देणे हे शासकाचे काम राहील.


इमर्सन म्हणतो,"मला आरोग्य द्या व प्रकाश द्या.मग मी मोठ्या सम्राटांचा दिमाखही हास्यास्पद करीन.त्यांच्याहून मी अधिक सुखी व खूष असेन." 


प्लेटोच्या दृष्टीने आरोग्य,समाधान व प्रकाशपूर्ण आयुष्य-सौंदर्यमय असा हा जीवनक्रम म्हणजे सुखाची सीमा होय.निळ्या आकाशात 'सुंदर सोनेरी' प्रकाश असावा,

तसे जीवनात सुखसमाधान असावे,सौंदर्य असावे.प्लेटोचे ध्येय काय?सौंदर्याचे जीवन,न्यायाचे जीवन,प्रेममय जीवन,

'सत्यं शिवं सुंदर'चे जीवन,प्लेटोचे हे ध्येय आहे.प्लेटोच्या तत्त्वज्ञानात हे तिन्ही शब्द जणू समानार्थकच आहेत.

सज्जन मनुष्य म्हणजेच सुखी मनुष्य,सुखी असणे म्हणजेच सज्जन असणे.चांगले असणे;आणि हा सज्जन नेहमी न्यायी असतोच.जो सुखी व सज्जन असतो, त्याच्या जीवनात अविरोध असतो.त्याच्या जीवनात प्रमाण असते,

मेळ असतो,म्हणून त्याच्या जीवनात शांतीचे संगीत असते.असा मनुष्य सौदर्यासाठी तहानलेला असतो.सर्वत्र मधुरता असावी,सुंदरता असावी,अशी उत्कंठा व असोशी त्याला असते.सौदर्य सर्वत्र व्हावे, दिसावे,म्हणून तो प्रयत्न करीत राहतो; सौंदर्यांसाठी तो धडपडतो.आपल्या सुंदर मुलांच्या रूपाने,कलात्मक कृतींच्या रूपाने किंवा उदात्त व उदार अशा कर्माच्या रूपाने,तो स्वतःमधील सौंदर्यच प्रकट करीत असतो. शारीरिक,बौद्धिक व आंतरिक सौदर्य तो मूर्त करू पाहतो.सौंदर्य ही अमृताची जननी आहे. जिथे सौंदर्य आहे तिथे अमरता आहे.सौंदर्य असेल,तर अमृतत्वाचा अमरपट्टा मिळेल.सुंदर वस्तू निर्मून आपण मृत्यूवर विजय मिळवतो, मरणाला जिंकून घेतो.


बुद्ध प्रेमधर्मांचे आचार्य,कन्फ्यूशियस न्यायाचे उद्गाते,

जेरेमिया शांतीचा संदेश देणारे आणि प्लेटो सौंदर्याचे महान सद्गुरू,सौंदर्याची उपासना प्लेटो शिकवितो.त्याने अशी एक नगरी बांधली की,ज्यामध्ये थोर मानव नांदत.ही नगरी प्रकाशदेवतेला,अपोलोला त्याने अर्पण केली.ही नगरी त्याने तारामंडळात ठेवून दिली.अशा हेतूने की भविष्यकालीन शिल्पकारांनी आदर्श म्हणून स्वतःच्या क्रांतिकारक स्वप्नांसाठी एक दिव्य उदाहरण म्हणून,

तिच्याकडे सदैव बघावे.परंतु केवळ नवीन समाजसृष्टीचे एक स्वप्न खेळवून, एक दिव्यचित्र रंगवूनच,समाधान मानणारा प्लेटो नव्हता.कन्फ्यूशियसप्रमाणे स्वतःच्या तात्त्विक व ध्येयवादी विचारांना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याने धडपड केली.रायराक्यूसचा राजा डायोनिशियस त्याने प्लेटोला आदराने बोलावले. प्लेटो सिसिली येथे गेला.त्याने डायोनिशियसला शहाण्या माणसांप्रमाणे राज्य कसे करावे,हे शिकविले.परंतु प्लेटोचे काही क्रांतिकारक विचार ऐकून तो राजा घाबरला त्याने प्लेटोला गुलाम

करून विकले व प्लेटोच्या क्रांतीतून स्वतःला वाचविले.


प्रामाणिक व न्यायी राज्यपद्ध तीला जग अद्याप तयार नव्हते.प्लेटोच्या एका शिष्याने त्याची खंडणी भरली आणि प्लेटो मुक्त झाला;त्याचे स्वातंत्र्य त्याला मिळाले.तो पुन्हा अथेन्सला आला,आणि आपल्या त्या तत्त्वज्ञान मंदिराच्या उपवनात बसून तो पूर्वीप्रमाणे पुन्हा तात्त्विक विचार देत राहिला,आपली उपनिषदे देत राहिला.

कितीतरी वर्षे असा हा महान ज्ञानयज्ञ त्याने चालविला होता;प्रकाश देत होता आणि तो एक्याऐंशी वर्षांचा झाला.

एका तरुण मित्राचे लग्न होते.आशीर्वाद देण्यासाठी म्हणून तो तिथे गेला होता.तिथे लग्नातील थट्टाविनोद चालला होता.सर्वत्र गडबड,हशा,आनंद होता.तो आनंदी गोंधळ त्याच्या प्रकृतीस मानवला नाही.तो थकला. 'माफ करा' असे म्हणून तो जरा विश्रांती घेण्यासाठी,थोडी झोप घ्यावी,डुलकी घ्यावी म्हणून शेजारच्या खोलीत गेला. इकडे थट्टामस्करीस ऊत आला.खानपानगान जोरात चालले.त्या लग्नाच्या वऱ्हाडाला जणू त्या थकल्या- भागलेल्या वृद्ध तत्त्वज्ञान्याची विस्मृतीच झाली!इकडे हा सारा धांगडधिंगा चालला असता थोडी विश्रांती मिळावी म्हणून तो तिकडे धडपडत होता.परंतु त्या पलीकडच्या खोलीत प्लेटोला गाढ झोप लागली होती.शेवटची गाढ झोप.या जगातील अर्थहीन आवाज,निरर्थक गोंगाट अतःपर त्याची शांती भंगविणार नाहीत.त्याची विश्रांती मोडणार नाहीत.तत्त्वज्ञानांचा हा सम्राट,याला शेवटी समदृष्टी अशा त्या मृत्यूदेवाच्या आदर्श राज्यातील आमंत्रण आले.


१७.१०.२३ या लेखातील पुढील शेवटचा भाग

१७/१०/२३

सर्वोत्तम जगाचे स्वप्न दाखविणारा प्लेटो.. Plato who dreams of the best world.

इतिहासकारांनी युद्धातील विजयांवर फार भर दिला आहे.परंतु संस्कृतीची गती पाहिली की युद्धातील विजयात वैभव नाही,आणि पराजयात लज्जास्पद असे काही नाही,ही गोष्ट दिसून येईल.संस्कृतीच्या विकासाचा व वाढीचा युद्धातील जयापजायाशी काहीही संबंध नाही.एखाद्या राष्ट्राला मिळविण्यासाठी युद्धातील विजयाचीच आवश्यकता असते असे नाही. स्पार्टाने पेलापोनेशियन युद्धात विजय मिळविला,परंतु त्यामुळे स्पार्टाचे महत्त्व वाढले नाही.त्याची कीर्ती वाढली नाही.स्पार्टन लोक अज्ञात व रानटी राहिले.अथेन्सचा त्या लढाईत पराजय झाला;परंतु मानवी प्रगतीचे निशाण हाती घेऊन अथेन्सच पुढे सरसावले.


विजयाची पूजा करणाऱ्या मानवजातीच्या शिक्षकांना ह्या ऐतिहासिक गोष्टीचा सहज कसा विसर पडला कोणास ठाऊक..! विजयाची स्तोत्रे गाणाऱ्या या लोकांना आठवण करून देण्याची जरुरी आहे की, प्लेटो व ॲरिस्टॉल ह्या ग्रीक इतिहासातील अलौकिक बुद्धीच्या विभूती पराभूत राष्ट्राच्याच नागरिक होत्या.


ख्रि. पू. ४२७ मध्ये प्लेटोचा जन्म झाला. पेरिक्लसच्या मरणानंतर एक वर्षाने तो जन्मला. गटेप्रमाणे प्लेटोलाही ईश्वराने सर्व प्रकारच्या देणग्या दिल्या होत्या.कोणतीही उणीव नव्हती. सुखी आईबाप,सुंदर शरीर,निरोगी निकोप मन, आरोग्य,सारे त्याच्याजवळ होते.प्लेटो या शब्दाचा अर्थ 'रूंद खाद्यांचा'.तो होताच तसा. पेलोपोनेशियन लढाईच्या धुमचक्रीच्या काळात तो लहानाचा मोठा होत होता.त्याला प्रारंभी लष्करी पेशा आवडला,परंतु वयाच्या विसाव्या वर्षी सॉक्रेटिस ची व त्याची गाठ पडली. सॉक्रेटिसचा प्रभाव त्याच्यावर पडला आणि युद्धाचा धंदा सोडून तो ज्ञानोपासनेकडे वळला.


त्या दिवसापासून सॉक्रेटिसच्या मरणापर्यंत तो त्याचा शिष्य होता.सॉक्रेटिसाच्या अवतीभोवती असणाऱ्या तरुण बुद्धि मंतांच्या मेळव्यात तोही शिरला.हे सारे तरुण कधी सॉक्रेटिसबरोबर जात, तर कधी त्याला आपापल्या घरी ते बोलावीत. तिथे मग विचार - भोजनाची मोठी मौज असे. अथेन्समधील मी मी म्हणणारे तत्त्वज्ञ व पंडित तिथे गोळा होत.सॉक्रेटिस त्या सर्वांना कोंडीत नेई.आणि शेवटी आपला मूर्खपणा ते कबूल करीत.त्या चर्चा ऐकणे म्हणजे ज्ञानामृताची मधुर मेजवानी होती.सॉक्रेटिस दिसायला कुरूप होता. परंतु वृत्तीने तो संत होता.शांत स्वभावाचा व सौम्य वृत्तीचा तो होता.थट्टाविनोद त्याला आवडे. कधीकधी संस्फूर्त होऊनच जणू तो बोले.पायात काही न घालणारा हा थोर तत्त्वज्ञानी अथेन्समधील कोणासही वादांत हटवीत असे.धंद्याने तो शिल्पकार,

मूर्तिकार होता;परंतु बहुधा कधीही तो ते काम करीत नसे.तिकडे त्याच्या कुटुंबीयांची उपासमार होत असे.इथे तो सामाजिक न्यायावर प्रवचने देत असे.तो स्वतःला अत्यंत शहाणा समजे; कारण तो म्हणे, "मला समजत नाही,एवढे तरी मला समजते;परंतु इतरांना एवढेही समजत नाही.' - त्याच्यापूर्वी होऊन गेलेल्या तत्त्वज्ञान्यांनी जीवनाचे कोडे सोडविण्याचा प्रयत्न केला होता.सॉक्रेटिसाला त्यात गोडी नव्हती.


तो म्हणे,"जग जाणण्याची हिंमत नका धरू.तो अहंकार आहे.तुम्ही स्वतःला समजून घेतले तरी पुष्कळ होईल.


"स्वतःला समजून घ्या." हे त्याच्या तत्त्वज्ञानाचे सार आहे.

सॉक्रेटिस म्हणे, "ज्ञान म्हणजे सद्गुण." लोक दुष्टपणामुळे चुका करतात असे नव्हे;तर ते अडाणी असतात.गुन्हेगार हा मूर्ख तरी असतो किंवा माथेफिरू तरी असतो;परंतु दोन्ही प्रकारच्या गुन्हेगारांना आपण काय करतो, ते कळत नसते.तत्त्वज्ञानाचे मुख्य कर्तव्य ज्ञान कसे मिळवावे, शहाणे कसे व्हावे,हे शिकविणे हे होय. सॉक्रेटिसने लोकांना शहाणे करण्याचे,त्यांना शिकवण्याचे व्रत आमरण चालविले.लोकांस आवडो वा नावडो,तो त्यांना शिकवित राही.तो गंमतीने एकदा म्हणाला,


"मी सुईण आहे. लोकांच्या मनात जे विचार असतात,

त्यांच्या पोटात ज्या गोष्टी असतात त्या नीट सहजपणे बाहेर पडाव्यात यासाठी मी लोकांना मदत करीत असतो."


परंतु दुसऱ्याने आपणास शिकवावे,आपणास सुचवावे,हे आवडत नसते.विचार करणे ही गोष्ट सुखाची नाही.

विचारप्रसूती वेदनांशिवाय नाही. म्हणून पुष्कळ जण विचार करणेच टाळतात. कशाला त्रास,असे ते म्हणतात.

तसेच रस्त्यात किंवा सार्वजनिक जागी आपल्या अज्ञानाचे सर्वांसमोर प्रदर्शन व्हावे,चारचौघांत मूर्खपणाची शोभा व्हावी,ही गोष्ट कोणास रुचणार?ज्यांचा मूर्खपणा तो प्रकट करी ते त्याला विदूषक म्हणत.कधीकधी ते त्याला मारहाणसुद्धा करीत. त्याच्या अंगावर हात टाकीत.परंतु सॉक्रेटिस कधी रागावत नसे.तो स्वतःचा विनोदी स्वभाव गमावून बसत नसे. ( मानवजातीची कथा,हेन्री थॉमस,अनु.सानेगुरुजी ) 


तो रस्त्यातच माणसांना थांबवी व गोधळून टाकणारे प्रश्न त्यांना विचारी यामुळे पुष्कळ जण त्याचे शत्रू बनले.

विशेषतः राजकारणी लोकांचा मूर्खपणा चव्हाट्यावर आणण्यात त्याला फार आनंद वाटे.ह्या मुत्सद्यांना व राजकारणपटूंना चांगल्या राज्यकारभाराचे काडीइतकेही ज्ञान नाही असे तो सभोवती असणाऱ्या लोकांना दाखवून देई.आणि नंतर त्या मुत्सद्यांना म्हणे, "तुम्हाला काही कळत नाही,तर राज्यकारभार कशाला चालवता? चांभाराने गलबत चालवू पाहण्याप्रमाणे हा अव्यापारेषु व्यापार आहे."


शहरातील तरुणांमध्ये त्याने बौद्धिक जिज्ञासा निर्माण केली.नवीन नवीन - विचार त्यांच्या डोक्यांत त्याने भरले,

आणि तरुण मुले हे नवीन विचार घेऊन घरी येत व आपल्या आईबापांशी त्या बाबतीत चर्चा करीत.आपली पोरे आपणापेक्षा शहाणी होत चालली हे पाहून अडाणी आईबाप चिडत;रागावत.सारे वृद्ध शेवटी सॉक्रेटिसवर रागावले.ते म्हणू लागले, "हा आमच्या मुलांना बिघडवीत आहे."


आणि एके दिवशी बाजारातील प्रमुख ठिकाणी 'सॉक्रेटिसवर अमुक अमुक आरोप आहेत' असे पत्रक लागले.


"सॉक्रेटिसवर असा गुन्हा केल्याचा आरोप आहे की,ज्या देवदेवतांची हे शहर पूजा करते,त्या देवदेवतांची पूजा तो करीत नाही.एवढेच नव्हे; तर आपल्या कल्पनेप्रमाणे नवीनच देवदेवता निर्मित आहे,प्रचारात आणीत आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे तरुणांना तो बिघडवीत आहे.या अपराधास शिक्षा म्हणजे मरण.'


ज्या सरकारी धर्ममार्तंडांनी,धर्मरक्षण करणाऱ्या ज्या सरकारी लोकांनी सॉक्रेटिसवर हा आरोप लादला होता,

त्यांचा सॉक्रेटिसवर वैयक्तिक दात होता;म्हणून त्याच्या रक्तासाठी ते तहानलेले होते.आरोप करणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी एकाचे नाव अ‍ॅनिटस असे होते.

सॉक्रेटिसने त्याच्या मुलाला बिघडवले होते.बापाबरोबर धंद्यात शिरू नको असे सॉक्रेटिसाने त्याला सांगितले होते.

अ‍ॅनिटस हा कातड्याचा व्यापारी होता.त्याचा मोठा भरभराटलेला धंदा होता.आपल्या कौटुंबिक कारभारात सॉक्रेटिसने ढवळाढवळ करावी,याचा त्याला राग आपल्या कातड्याच्या धंद्यात आपल्या मुलाचे सहकार्य आपणास मिळावे म्हणून सॉक्रेटिसला ठार करण्याचे त्याने ठरविले.

ज्या ज्यूरींसमोर सॉक्रेटिस उभा होता. तिच्यातील लोक निःपक्षपाती व न्यायी निर्णय देतील असे चिन्ह नव्हते.तशा मनःस्थितीत ते ज्यूरर्स नव्हते.नुकतेच एक दीर्घकालीन युद्ध संपले होते.क्रांती,प्रतिक्रांती वगैरे प्रकार होऊन गेले होते.यामुळे अ‍ॅथीनियन लोकांचा विवेक, समतोलपणा नष्ट झाला होता.तरीही सॉक्रेटिसने बचवावी नीट तयारी केली असती,तर तो सुटता. परंतु जाणूनबुजून त्याने तसे करण्याचे नाकारले. तो आता जवळजवळ सत्तर वर्षांचा झाला होता.


 तो म्हणाला,"सत्तर वर्षे जगलो.पुष्कळ नाही का झाले? पुरे की आता.तो पुन्हा म्हणाला,मनाच्या व बुद्धीच्या सर्व शक्ती शाबूत,अविकृत असताच मरण येणे बरे नाही का? पुढे आणखी म्हातारे होणे व दुसरे बाल्य अनुभवविणे

,इंद्रियांच्या सर्व शक्ती नष्ट झाल्यावर जगणे,यापेक्षा निरोगी मरण बरे."


त्याने जे भाषण केले,त्यात बचावासाठी म्हणून तो बोलला नाही.स्वत:चे प्राण वाचावे म्हणून त्याने भाषण केले नव्हते.त्याने आपले तत्त्वज्ञानच त्या भाषणात पुन्हा नीट मांडले. तो म्हणाला, "मी रडेन,प्राणांची भीक मागेन, तुमच्या पाया पडेन अशी अपेक्षा तुम्ही कदाचित केली असेल.माझ्या मुलाबाळांनी,आप्तेष्टांनी, तुमच्यासमोर येऊन माझ्यासाठी पदर पसरावा, असे कदाचित् तुम्ही अपेक्षित असाल.परंतु मी अशी प्रर्थना करीन तर मी गुन्हा मान्य केला असे नाही का होणार? माझे कर्तव्य एकच आहे; तुम्हांलाही खरे ज्ञान देणे,तुम्हाला शिकविणे, तुमचे मतपरिवर्तन झाले तर बघणे." 


ज्ञानसंशोधनासाठी त्याने आयुष्य वेचले. शहाणपणा,सत्य यांसाठी सारे जीवन अर्पिण्याचा त्याच कृतनिश्चय होता.

हेच त्याचे जीवनध्येय होते.तो स्वतः चे व दुसऱ्याचे परीक्षण करी, पृथक्करण करी.खरे काय ते शोधू पाही.

जरी मृत्यूच्या छायेत तो उभा होता,जरी त्याच्यासमोर मरण उभे होते,तरी त्या क्षणीही स्वत:वर आरोप लादणाऱ्यांस तो शिकवू इच्छित होता.त्यांनी आपणावर दया करावी म्हणून तो तिथे बोलू इच्छित नव्हता.


न्यायाधीशांनी त्याला विचारले, "आम्ही तुम्हाला कोणती शिक्षा द्यावी असे तुम्हांला वाटते?" सॉक्रेटिस म्हणाला, "मी तुमच्या व या शहराच्या हितासाठीजे काही केले.त्यात तुम्ही मला पाठिंबा दिला पाहिजे.मी जी सेवा केली,

तिच्यासाठी तुम्ही मला उरलेल्या आयुष्यभर जनतेच्या तिजोरीतून पोसले पाहिजे." परंतु न्यायाधीशांनी निराळाच विचार केला,निराळाच निर्णय घेतला. त्यांनी त्याला मरणाची शिक्षा सांगितली आणि स्वतःच्या तोंडाला चिरंतन काळोखी फासून घेतली.


"सॉक्रेटिस तीस दिवस तुरुंगात होता.त्याला शृंखलाबद्ध करून ठेवण्यात आले होते.एखाद्या सामान्य गुन्हेगाराप्रमाणे त्याला अंथरुणावर खिळवून ठेवण्यात आले होते.शेवटी विषाचा पेला त्याला दिला गेला.त्या वेळेस त्याच्या त्या कोठडीसमोर त्याचे जे निकटवर्ती,परमप्रिय मित्र जमले होते,ते रडले.त्यांना शोकावेग आवरेना, अश्रू आवरेनात.परंतु शेवटपर्यंत सॉक्रेटिस मात्र शांत व आनंदी होता.


सॉक्रेटिस मेल्यावर अथेन्स शहर सोडून जाणे बरे असे प्लेटोस वाटले.तत्त्वज्ञानी लोकांनी त्या वेळेस अथेन्समध्ये राहणे सुरक्षितपणाचे नव्हते. प्लेटो परिव्राजक बनला.बारा वर्षे तो जगभर हिंडला.तो इटलीत व सिसिलीत गेला.तिथे पायथॅगोरसच्या संप्रदायाशी त्याचा परिचय झाला.

पायथॅगोरसला "माणसे पकडणारा " असे म्हणत त्याच्या संप्रदायात गूढता होती.या पायथॅगोरसला अंकगणितांत उपनिषदे दिसत, भूमितीत दैवी सत्ये भेटत.अशा या अध्यात्मवादी पंथाशी परिचित झाल्यावर प्लेटो गलबतात बसून इजिप्तमध्ये गेला.इजिप्तमधील प्राचीन ज्ञानाचे मधुबिंदू त्याने गोळा केले.ज्यूडा व हिंदुस्थान या देशांत तो गेला होता असे म्हणतात;परंतु याबाबत शंका आहे;कारण ज्यू वा हिंदू लोकांच्या प्रेषितांची त्यांच्या आध्यात्मिक विचारांची किंवा न्यायासाठी,सत्यासाठी जी एक प्रखर व उत्कृष्ट अशी शोधक वृत्ती त्यांच्यामध्ये होती,तिची प्लेटोला माहिती होती,असे दिसत नाही.प्लेटोला वाटत होते की, "न्यायासाठी तहानलेले आपणच या पृथ्वीवरचे पहिले." ज्या विषयावर आपण लिहीत आहोत,त्यावर तसे आजपर्यंत कोणीही लिहिलेले नाही.असे त्याला वाटे.जे विचार आपण देत आहोत ते या जगात प्रथम आपणच देत आहोत असा त्याचा विश्वास होता. अशी त्याची प्रामाणिक समजूत होती. तो लिहितो, "आजपर्यंत न्यायाची स्तुती कोणी केली नाही.अन्यायाचा धिक्कार कोणी केला नाही. आपल्या हृदयात असणाऱ्या असत्प्रवृत्तीतील सर्वांत दुष्ट प्रवृत्ती म्हणजे अन्यायाची आहे.परंतु ही गोष्ट आजपर्यंत कोणाच्याच लक्षात आली नाही.ही अन्याय प्रवृत्ती आपल्या हृदयात का दृढमूल होऊन बसली आहे,याचे संशोधन आजपर्यंत कोणीही केले नाही.तसेच मनुष्यातील सर्वांत थोर सत्प्रवृत्ती म्हणजे न्यायाची होय. तिचाही विचार कोणी केला नाही.

"प्लेटोसारख्या थोर विचारवंतांचा हिंदू वा ज्यू तत्त्वज्ञान्यांशी परिचय असता,तर त्याने असे लिहिले नसते. प्रवासानंतर तो परत आला,त्या वेळेस त्याचे वय चाळीस वर्षांचे होते.


अथीनियन लोकांच्या भावना शांत झालेल्या होत्या,

वातावरण पुन्हा स्वतंत्र विचाराला अनूकूल होते.

भूतकाळात प्राण अत्यंत स्वस्त झाले होते; तसे आता नव्हते.जीवनाची किंमत लोक पुन्हा समजू लागले होते. तत्त्वज्ञान शिकविण्यात आता धोका नव्हता.

परंतु फार क्रांतिकारक विचार सांगण्याचे काम अद्यापही जरा जपूनच करायला हवे होते.नाजूक प्रवृत्तीच्या नागरिकांचे मन दुखावेल असे काही केले नाही म्हणजे झाले;अगदीच पाखंडी मते नसली म्हणजे झाले;सनातनी मतांविरुद्ध उघड बंड नसले म्हणजे झाले.तेवढी काळजी घेऊन विचारस्वातंत्र्य राखायला हरकत नव्हती.


प्लेटोने तत्त्वज्ञानमंदिर उघडले.त्या ज्ञानमंदिरात बसून आपल्या विद्याथ्यांशी तो जीवन-मरणाच्या भवितव्याविषयी बोले.फावल्या वेळी तो लिही. ज्या जगाने सॉक्रेटिसला मरणाची शिक्षा दिली, त्या जगाला प्लेटो विटला होता.तो मनामध्ये अधिक निर्दोष जगाची स्वप्ने खेळवीत बसे.ते आपले आदर्श जंग,ते आपले पूर्णतचे स्वप्न, त्याने त्या जगद्वविख्यात संवादाच्या रूपाने जगासमोर मांडले आहे.ते नाट्यरूप संवाद अमर आहेत,

अद्वितीय आहेत.त्या संवादांत सॉक्रेटिस हे प्रमुख पात्र आहे.परंतु सॉक्रेटिसाच्या तोंडी घातलेले विचार मात्र सॉक्रेटिसचे नसून प्लेटोचे आहेत.प्लेटोचे स्वप्न सॉक्रेटिस बोलून दाखवीत आहे.आवाज सॉक्रेटिसचा आहे.परंतु विचार प्लेटोचे आहेत.


सॉक्रेटिसाने स्वर्गातील तत्त्वज्ञान भूतलावर आणले असे म्हणतात.प्लेटोने ते तत्त्वज्ञान पुन्हा वर स्वर्गात नेले.किंवा असे म्हणू या की,पृथ्वीच स्वर्गाची प्रतिमा व्हावी म्हणून या पृथ्वीचीच पुनर्रचना करण्याचा त्याने प्रयत्न केला.तो लिहितो, "ही पृथ्वी म्हणजे एक खोल अंधारी गुहा आहे.

बुद्धीचा व ज्ञानाचा प्रकाश तिथे पोहोचू शकत नाही;

आपण या गुहेत शृंखलाबद्ध करून ठेवलेले कैदी आहोत,

जे पदार्थ आपण येथे पाहतो ते सत्यतेच्या छाया आहेत.

आपल्या डोळ्यांसमोर वस्तूंच्या या छाया काळ्या अंधाऱ्या भिंतीवर क्षणभर नाचतात व नाहीशा होतात. सत्यमेव जगत्,परिपूर्ण जगत् कल्पनेत आहे. वस्तूंचे सद्रूप,वस्तूंचे अंतिम परिपूर्ण स्वरूप,तिथे वर,स्वर्गात आहे.ज्या जगात आपण जगतो,ते त्या सद्रूप व परिपूर्ण सृष्टीचे अपूर्ण असे प्रतिबिंब आहे." 


मूसाप्रमाणे प्लेटोही स्वतःमधील दिव्यतेचेच अनंतपटीने वाढविलेले स्वरूप म्हणजे परमेश्वर, असे मानतो.

स्वत:मधील ज्ञान व साधुता,शिवता व सुंदरता यांचे परिपूर्ण रूप म्हणजे प्लेटोचा परमेश्वर.. प्लेटो ज्याप्रमाणे आपल्या तत्त्वज्ञानाच्या उद्यानात बसे, त्याप्रमाणे त्याचा तो परमेश्वरही स्वर्गातील त्या परिपूर्ण अशा 'परमधर्मा'त असतो.प्लेटो ज्याप्रमाणे आपल्या उपवनात बसून सुंदर जगाच्या परिपूर्ण कल्पनेचा विचार करीत बसे.जवळ असलेल्या अपूर्ण व सदोष वस्तुजातातून त्या आदर्श जगाची प्रतिकृती करू बघे,तद्वतच तो परमेश्वरही जणू वरती करीत असतो.दगडाधोंड्यांतून,काट्यांतून परमेश्वर स्वर्ग निर्मू पाहत होता;परंतु स्वर्गाचे ध्येय दूर राहून ही पृथ्वी मात्र त्याने निर्मिली. मातीतून देवदूत निर्माण करण्याच्या ध्येयाने प्रभू काम करू लागला;परंतु देवदूताऐवजी त्याच्या हातून हा मानवच घडला.


परंतु प्लेटोच्या आध्यात्मात रमायला आपणास अवसर नाही व त्याची जरुरीही नाही.त्याला स्वत:लाच त्या बाबतीत निःशंकता नव्हती.तो धुक्यातच वावरत असे.सारे अध्यात्मवादी एक प्रकारच्या संदिग्धतेत,

अस्पष्टतेतच,वावरत असतात.सौंदर्याची कल्पना व परमेश्वर यांचा संबंध काय ? आदर्शभूत सौंदर्य व ईश्वर एकरूपच का? जो स्वर्गीय विश्वकर्मा सौंदर्याची कल्पना मानवांच्या रूपाने आविर्भूत करू पाहतो,त्या विश्वकर्म्याचे व त्या ध्येयपूर्त सुंदरतेचे नाते काय? ती निर्दोष सौंदर्याची कल्पना ईश्वराचाच एक भाग का? ती ध्येयभूत सौंदर्यवस्तू म्हणजे का ही सौदर्यवस्तू ईश्वराहून अधिक आहे,स्वंयभू आहे? ईश्वरातीत आहे? जर ही आदर्शभूत सौंदर्याची कल्पना ईश्वरनिरपेक्ष व ईश्वराहून स्वतंत्र अशी निराळी असेल,तर त्या कल्पनेचे विशिष्ट गुणधर्म काय ? ही ध्येयभूत वस्तू कोणी,कधी,केव्हा निर्मिली ? इतर काही प्रश्नांना प्लेटोजवळ उत्तर नाही.येथे प्लेटो निरुत्तर आहे.

काही प्रश्नांना तो गुळमुळीत व संदिग्ध अशी उत्तरे देतो.परंतु ती उत्तरे म्हणजे खात्री न पटविणारी अशी गूढगुंजने आहेत.अज्ञानाच्या अनंत सिंधूत तो फारच पुढे जातो.स्वतःस न झेपणाऱ्या खोल पाण्यात तो शिरतो.

त्याच्या पाठोपाठ जाण्यात अर्थ नाही;आपण बुडू, जगातील सर्वांत थोर व बुद्धिमान ॲरिस्टॉल, तत्त्वज्ञान्यांचा व बुद्धि मंतांचा तो अनभिषिक्त सम्राट,त्यालाही कधीकधी प्लेटोच्या त्या गूढगुंजनांचे आकलन होत नसे.


ईश्वराविषयींच्या कल्पनांचे जाळे विणणे जेव्हा प्लेटो थांबवितो,ईश्वराविषयींचे सिद्धांत मांडीत बसणे बंद करतो व स्वतःच्या मनातील विचार बोलू लागतो,तेव्हा जगातील परम-थोर आचार्य म्हणून तो यथार्थपणे शोभतो.प्लेटो कधी जुना वाटत नाही.तो चिरंजीवपणे अर्वाचीन आहे.तो नित्य नवीन आहे.कोणत्याही युगात तो नवीनच वाटेल.

त्याची राजकीय व सामाजिक मते त्याच्या काळाच्या फार पुढे होती;एवढेच नव्हे,तर आजच्या काळाच्याही फार पुढे गेलेली आहेत. असे म्हणावे लागेल.तो विसाव्या शतकातील विचारांच्याही पुढे गेलेला आहे.आजचा असा एकही अत्यंत महत्त्वाचा प्रश्न नाही की,जो प्लेटोने चर्चिला नाही.मानवी नाटकाचे सर्वांगीण व सर्वकष असे निरीक्षण,

परीक्षण,त्याने केले आहे.मानवाचे विश्वबंधुत्व,सुप्रजानन-शास्त्र, संततिनियमन,सामुदायिक पत्नीत्व, कुटुंबपद्धतीचा अस्त,मुलांची स्टेटकडे मालकी, स्त्री-पुरुषांची समानता,खासगी मालमत्तेचा अस्त.अनिर्बंध मोकळे प्रेम,ग्रंथनियंत्रण,दारूबंदी,इत्यादी शेकडो 

प्रश्नांवर प्लेटोने प्रकाश पाडला आहे.त्या संवादातून अशा अनेक समस्यांवर त्याने चर्चा केली;परंतु या ज्या चर्चा त्याने केल्या,त्यांचा हेतू काय ? प्लेटोसमोर एकच ध्येय होते,एकच उद्दिष्ट होते.पृथ्वीवर न्यायाची प्रस्थापना व्हावी,हाच एक ध्यास त्याला लागलेला आहे.अंतर्बाह्य न्याय- राजसंस्थेत न्याय,व्यक्तीच्या अंतरंगांत न्याय.त्याला अशा प्रकारची शासनाव्यवस्था हवी होती,


असे जग हवे होते की,जेथे सॉक्रेटिससारख्यांचा वध न होता,त्यांना राजा म्हणून सिंहासनावर बसविता आले असते.


अपुर्ण पुढील भाग १९.१०.२३ रोजी