* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१३/१०/२४

तक्रारी दूर अशा करा.Do away with complaints

शेवटी त्यांनी किल्ला सर केला आणि शेवटी आज ते या स्थितीला पोहोचले आहेत.वॉल स्ट्रीटचे सगळ्यात महत्त्वाचे एक्झिक्युटीव्हपण त्यांच्याकडे सल्ला आणि मार्गदर्शन घेण्यासाठी येतात.त्यांना त्यांच्या रेकॉर्डचा अभिमान होता.त्यांना असायलाच हवा होता आणि याबाबत बोलायला त्यांना आवडत होतं.आपली गोष्ट सांगितल्यावर त्यांनी शेवटी क्यूबेलिसला संक्षिप्तपणे त्याच्या अनुभवाच्या बाबतीत विचारलं आणि व्हाइस प्रेसिडेंटला बोलावून सांगितलं,"मला असं वाटतं की, आपण या माणसाच्या शोधात होतो." मिस्टर क्यूबेलिसने आपल्या संभाव्य मालकाच्या बाबतीत सगळी माहिती गोळा करण्याचे कष्ट घेतले होते.त्यानी समोरच्या व्यक्तीमध्ये आणि त्याच्या प्रश्नांमध्ये रस घेतला होता.त्याने समोरच्या व्यक्तीला बोलण्याकरता प्रोत्साहित केले होते आणि त्यामुळे त्याचा चांगला प्रभाव पडला आणि त्याचा सुखद परिणाम झाला.सॅक्रेमेंटो,कॅलिफोर्नियाच्या रॉय जी.ब्रेडले यांची बरोबर त्याच्या उलट समस्या होती.जेव्हा एक संभाव्य चांगला कर्मचारी ब्रेडलेच्या फर्ममध्ये नोकरीकरता आपली शिफारस करत होता,

तेव्हा त्यांनी त्याची गोष्ट सांगितली.रॉयने आम्हाला सांगितले की,आमच्या फर्ममध्ये एक छोटी ब्रोकरेज फर्म होती.


याकरता आमच्या इथे कोणताही जास्तीचा लाभ जसं मेडिकल इन्श्युरन्स,पेंशन किंवा दवाखान्याचा खर्च उचलायची कोणतीच व्यवस्था,सोय नव्हती.प्रत्येक प्रतिनिधी एक स्वतंत्र एजंट होता.

आम्ही संभाव्य ग्राहकांकरता लीडसुद्धा उपलब्ध करू शकत नव्हतो कारण आम्ही त्यांच्याकरिता जाहिरातपण देऊ शकत नव्हतो,जसे की आमचे मोठे प्रतिस्पर्धा करत होते.रिचर्ड प्रायरला त्या प्रकारचा अनुभव होता जो आम्हाला हवा होता.आधी माझ्या असिस्टंटने इंटरव्ह्यू घेतला आणि त्याला आमच्या कामाला गेलेल्या सगळ्या नकारात्मक गोष्टी सांगितल्या. जेव्हा तो माझा ऑफिसमध्ये आला तेव्हा तो थोडा निराश वाटत होता.मी त्याला आपल्या फर्ममध्ये काम करण्याचा एकुलता एक  फायदा सांगितले ला की,तो स्वतंत्र कॉन्ट्रॅक्टर बनू शकतो आणि एक प्रकारे तो सेल्फ-एप्लॉयड् आहे.जेव्हा तो इंटरव्यूकरता आला तेव्हा त्याच्या डोक्यातखुप साऱ्या नकारात्मक गोष्टी होत्या;पण जेव्हा त्याने या फायद्याच्या बाबतीत बोलायला सुरुवात केली,तेव्हा तो एक एक करून आपल्या नकारात्मक विचारांपासून मुक्त होऊ लागला.


अनेक वेळा असं वाटलं की,जसा तो स्वतःशीच बोलतो आहे,जसा तो आपल्या मनातच विचार करतो आहे.अनेक वेळा माझ्या मनात आलं की, मी त्याच्या विचारांना स्पष्ट करू;पण मी असं नाही केलं, जेव्हा इंटरव्यू संपला,तेव्हा मला असं वाटलं की,त्याने स्वतःच स्वतःला विश्वास दिला की,तो आमच्या फर्ममध्ये काम करेल.

कारण की मी एक चांगला श्रोता होतो आणि मी डिकलाच जास्त बोलण्याचा मोका दिला, याकरता त्याने आपल्या मनात दोन्ही बाजूंना चांगल्या प्रकारे तोललं आणि तो सकारात्मक निष्कर्षावर

पोहोचला,ज्याला त्याने स्वतः करता एका आव्हानासारखं घेतले.

आम्ही त्याला कामावर ठेवून घेतलं आणि आज तो आमच्या फर्ममध्ये सर्वश्रेष्ठ प्रतिनिधींमधून एक आहे.इथपर्यंत की आमचे मित्रपण आमच्या सोयी-सुविधांच्या बाबतीत ऐकण्याऐवजी स्वतःच्या सुविधांबाबत ऐकणं जास्त पसंत करतील.


फ्रेंच दार्शनिक रोशफूकोने म्हटलं होतं,जर तुम्हाला शत्रू बनायचं असेल,तर तुमच्या मित्रांच्या पुढे जा.जर तुम्ही मित्र होऊ इच्छित असाल तर आपल्या मित्रांना स्वतःच्या पुढे जाऊ द्या. काय हे खरे आहे? हो,कारण जर तुमचे मित्र निघून जाताहेत तर ते स्वतः ला महत्त्वपूर्ण समजत आहेत जेव्हा तुम्ही त्यांच्या पुढे निघून जाता तर ते किंवा त्यांच्यामधले काही हीन आणि मत्सरी असू शकतात.


न्यू यॉर्क सिटीमध्ये मिडटाउन पर्सनल एजन्सीची हेनरीटा जी सगळ्यात लोकप्रिय प्लेसमेंट काउंसलर होती.सुरुवातीच्या महिन्यांमध्ये हेनरीटाचा आपल्या सहकाऱ्यांमध्ये कोणी मित्र नव्हता. का? कारण प्रत्येक दिवशी ती आपली शेखी मिरवत होती की,आज तिने किती प्लेसमेंट केले,आज तिने किती नवीन अकाउंट उघडले,आज तिने किती यश मिळवलं.


मी आपलं काम खूप चांगल्या रितीने करत होते आणि मला याचा गर्व होता,हेनरीटाने आमच्या वर्गातले माझे सहकारी माझ्या सफलतेमध्ये आनंद घ्यायच्याऐवजी चिडत होते.मला वाटायचं त्यांनी मला पसंत करावं.मी त्यांना खांच मित्र बनवायला बघत होते.या कोर्सचे काही उपाय ऐकल्या बरोबर मी आपल्या बाबतीत बोलणं कमी करून टाकलं.माझ्या सहकाऱ्यांजवळ आपली शेखी मिरवण्याकरता बरंच काही असायचं आणि माझ्या सफलतेबद्दल ऐकल्यावर ते आपल्या सफलतेबद्दत सांगायला आसुसलेले असत.आता जेव्हा आमच्याकडे गप्पा मारायला वेळ असतो तेव्हा मी त्यांना विचारते की,त्यांचा दिवस कसा गेला आणि मी आपल्या यशाचा उल्लेख तेव्हाच करते जेव्हा ते मला याबाबतीत विचारतात. - समोरच्या व्यक्तीला जास्त बोलू द्या.


११.१०.२४ या लेखातील शेवटचा भाग…


🍂 

१.

आपण जगत असतो आपलं 

एकाकी बकाकी नातं घेऊन 

प्रत्येक नातं व्यस्तच असतं

त्याचं त्याचं आयुष्य उघडून

२.

त्यानं का जगू नये,बघू नये

स्वत:चं अस्संल तस्संल खातं 

ज्यात त्यानं साठवलंय जुनं

माणसांशी जगू म्हटलेले नातं

३. 

आयुष्यं बविष्यं असतात अनेक 

जगून घेतली,तगवून ठेवली तर

सुंदर असतं,कलंदर असतं बरंच 

माणूस काणूस बिलंदर नसता तर

४.

फुलपाखरांनं हलकंच चुंबून घ्यावं

फुलाला,मुलाला,अन्य जगाला

पावन झालं असतं,गगन चुंबन 

 जर आगळं भान असतं माणसाला 

🍂

•रवींद्र श्रावस्ती



११/१०/२४

तक्रारी दूर अशा करा.Do away with complaints

जास्त करून लोक दुसऱ्यांना आपली गोष्ट खूप बोलतात.

याऐवजी तुम्हाला समोरच्याला जास्त बोलण्याचा मोका द्यायला पाहिजे.ते आपल्या बिझेनस आणि आपल्या समस्यांच्या बाबतीत तुमच्यापेक्षा जास्त जाणतात.याकरता तुम्ही त्यांना प्रश्न विचारा.त्यांना आपली गोष्ट सांगू द्या.


जर तुम्ही त्यांच्याशी असहमत आहात,तर तुमच्यामध्ये ही इच्छा जागू शकते की,त्यांची गोष्ट मध्येच तोडायची; पण असं मुळीच करू नका.ही एक भयंकर खोड आहे. कारण त्यांच्या डोक्यात खूपसे विचार असतात.ज्यांना ते व्यक्त करू इच्छितात,याकरता ते तुमच्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत.हेच योग्य होईल की,त्यांची गोष्ट धैर्याने आणि लक्षपूर्वक ऐका.याबाबतीत गंभीर राहा.त्यांना आपले विचार पूर्णपणे व्यक्त करायला प्रोत्साहित करा. काय ही पद्धत बिझनेसमध्ये कामाला येते? या बघू या. ही एक सेल्समनची गोष्ट आहे,ज्याला नाइलाजाने गप्प राहायला लागलं.


अमेरिकेच्या एका मोठ्या ऑटोमोबाईल निर्मात्याला वर्षभराकरता आहोल्ट्री फॅब्रिकची गरज होती.तीन मोठ्या निर्मात्यांनी आपले नमुने पाठवले.मोटर कंपनीच्या एक्झिक्युटीव्हने त्याची तपासणी केली. त्यानंतर प्रत्येक निर्मात्याला एक नोटीस पाठवली की, एका निश्चित दिवसाचा त्यांना वेळ दिला जाईल म्हणजे ते आपल्या कॉन्ट्रॅक्टवर शेवटचं विवरण देऊ शकतील.


विस्तृत विवरण देण्याकरता कंपनीच्या निर्मात्यांचे प्रतिनिधी निश्चित दिवशी उपस्थित झाले.योगायोगाने जी.बी.आर.नावाच्या प्रतिनिधीचा काही आजारामुळे घसा खराब झाला.जेव्हा कॉन्फरन्समध्ये एक्झिक्युटीव्हसमोर बोलायची माझी वेळ आली तेव्हा नेमके काय झाले हे मिस्टर आर.ने माझ्या क्लासमध्ये सांगितले.ते म्हणाले की,तेव्हा माझा आवाज निघत नव्हता.मी मुश्किलीने हळूहळू बोलू शकत होतो.मला एका खोलीत नेले गेले आणि मी तिथे टेक्सटाइल इंजिनिअर परचेसिंग एजंट,सेल्स डायरेक्टर आणि कंपनीच्या प्रेसिडेंटसमोर उभा राहू शकलो.मी बोलायला उभा राहिलो आणि हिमतीने माझी गोष्ट समोर ठेवण्याचा प्रयत्न केला;पण मी काही शब्दांपेक्षा जास्त बोलू शकलो नाही.ते सगळे लोक एका टेबलाच्या चारी बाजूंनी बसले होते,याकरता मी एका कागदावर लिहिलं माझा घसा खराब आहे,मी बोलू शकत नाही.कंपनीच्या प्रेसिडेंटने सांगितलं तुमच्या बाजूने मी बोलेन आणि त्यांनी बोलणं सुरू केलं.त्यांनी माझे सँपल्स दाखवले आणि त्यांची विशेषता सांगितली.माझ्या प्रॉडक्टच्या गुणवत्तेवर एक इंटरेस्टिंग वादविवाद झाला आणि प्रेसिडेंट माझ्या बदल्यात बोलत होता म्हणून त्याने चर्चेमध्ये माझंच प्रतिनिधित्व केलं.पूर्ण चर्चेत माझा सहभाग फक्त हसणे,डोकं हलवणे आणि चेहऱ्यावर हावभाव दाखवणे इथंपर्यंतच सीमित राहिला.


या अद्भुत मीटिंगमुळे मला कॉन्ट्रॅक्ट मिळाले.पाच लाख गज फॅब्रिक्सची ऑर्डर,ज्याची एकंदर किंमत १६,००,००० डॉलर्स होती.ही आजपर्यंत मिळालेल्या ऑर्डर्समधली माझ्या जीवनातील सगळ्यात मोठी ऑर्डर होती.


मी समजलो की,जर माझा घसा बसला नसता तर माझ्या हातातून कॉन्ट्रॅक्ट निघून गेले असते.याकरता, कारण पुर्ण मामल्याच्या बाबतीत माझे विचारच चुकीचे होते.भाग्यवश मी समजू शकलो की,अनेक वेळा दुसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यात आपल्याला जास्त फायदा मिळतो.


बिझनेसप्रमाणेच कुटुंबातही आपल्याला दुसऱ्यांच्या गोष्टी ऐकल्यामुळे जास्त फायदा मिळतो.आपल्या मुलीबरोबर बार्बरा विल्सनचे संबंध वेगानी बिघडत होते. लॉरी आधी एक चांगली आणि शांत मुलगी होती;परंतु आता ती चिडचिडी आणि टिनएजच्या वयात येऊन बदलली होती.बार्बराने तिला रागवलं,घाबरवलं,धमकावलं,समजवलं;पण कुठलाच फायदा झाला नाही.


मिसेस विल्सनने क्लासमध्ये सांगितलं,एक दिवस मी हार मानली.लॉरीला मी बाहेर जायला मना केलं;पण तिने माझं सांगणं ऐकलं नाही आणि ती घरातलं काम करण्याअगोदर आपल्या मैत्रिणीला भेटायला निघून गेली.जेव्हा ती परत आली तेव्हा मी दहा हजार वेळा तिच्यावर ओरडायला हवं होतं;परंतु माझ्यात रागवण्याची ताकदच नव्हती.मी तिच्याकडे दुःखाने बघितले आणि फक्त इतकच म्हटलं की,असं का वागतेस लॉरी ? लॉरीने माझी परिस्थिती बघितली आणि मला शांत स्वरात म्हणाली की,तुला खरंच जाणून घ्यायचंय ? मी 'हो' म्हणून डोकं हालवलं यानंतर लॉरीने आधी तर घाबरत आपली गोष्ट सुरू केली;पण काही वेळानंतर तिच्या मनातलं सगळं काही बाहेर निघालं.मी तिचं बोलणं कधीच ऐकत नव्हते.जेव्हा ती तिचे विचार आणि भावना मला सांगू इच्छित होती तेव्हा मी तिला आदेश देऊन गप्प करत होते.मला हे जाणवलं की, माझी मुलगी माझ्याकडून एका मित्रत्वाच्या नात्याची अपेक्षा करत होती,

जेव्हा की मी रागवणाऱ्या आईची भूमिका निभावत होते. किशोरावस्थेतले तणाव मी तिच्यासोबत शेअर करावेत,असं तिला वाटत होतं


मी नेहमी तिच्यासमोर फक्त बोलतच राहत होते,जेव्हा की मला तिची गोष्ट ऐकायला हवी होती.मी तिची गोष्ट ऐकण्याच्या बाबतीत कधी लक्षच दिलं नाही.त्या दिवसानंतर मी तिचं बोलणं ऐकणं सुरू केलं.आता ती मला सांगून टाकते की,तिच्या डोक्यात काय चाललं आहे आणि आता आमचे संबंध खूप चांगले आहेत. आता तिच्यात सुधारणा झाली आहे.


मित्र जोडा आणि प्रभावशाली बना,डेल कार्नेगी,मंजुल प्रकाशन..


न्यू यॉर्कच्या एका पेपरमध्ये फायनान्शियल पानावर एक मोठी जाहिरात छापली.ज्यात नोकरीकरता खूपच योग्य व अनुभवी उमेदवार हवा होता.चार्ल्स टी.क्यूबेलिसने दिल्या गेलेल्या बॉक्स नं.वर आवेदन पाठवून दिलं. काही दिवसांनंतर त्याला इंटरव्ह्यूला बोलवलं गेलं. जाण्याच्या आधी त्या कंपनी आणि तिथल्या मालकाच्या बाबतीत वॉल स्ट्रीटकडून जेवढी शक्य होती,तेवढी माहिती मिळवायचा प्रयत्न केला.इंटरव्ह्यूच्या वेळी त्याने म्हटलं की,तुमच्या कंपनीचा रेकॉर्ड इतका चांगला आहे की,इथे काम करणे मला अभिमानास्पद वाटेल. मला वाटतं की,२८ वर्ष आधी तुम्ही फक्त एक डेस्क रूम आणि एक स्टेनोग्राफरच्या बरोबर बिझनेस सुरू केला होता.काय हे खरं आहे?


प्रत्येक यशस्वी व्यक्तीला आपल्या सुरुवातीच्या केलेल्या संघर्षाबाबत बोलायला खूप आवडतं.ही व्यक्तीपण याचा अपवाद नव्हती.त्यांनी खूप वेळपर्यंत आपली गोष्ट सांगितली की,कोणत्या प्रकारे ४५० डॉलर्स आणि एका स्वप्नाबरोबर त्यांनी आपल्या व्यवसायाचा प्रवास सुरू केला.त्यांनी सांगितलं की,टीका,टर आणि निराशेच्या नंतरही त्यांनी आपली हिंमत हरली नाही. सुरुवाती-सुरुवातीला तर त्यांना एका दिवसात सोळा तासांपर्यंत काम करावं लागत होतं आणि ते रविवार आणि सुट्टीच्या दिवसांमध्ये पण काम करत होते.


राहिलेला शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…!

९/१०/२४

देवीची पूजा Goddess worship

आम्ही मांडलेली "देवींची" पूजा...!


नमस्कार 


सध्या नवरात्र सुरू आहेत,देवीचे आगमन झाले आहे. मंडपात, घरात आणि इतरही अनेक ठिकाणी देवी विराजमान झाल्या आहेत. प्रत्येक जण भक्तीभावाने देवीची पूजा करतच आहे... !


हे झालं देवीचं मूर्ती स्वरूप... !!! 


पण या व्यतिरिक्त सुद्धा,चालती बोलती देवी वेगवेगळ्या रूपात,आपल्या आजूबाजूला कायम वावरत असते.आपल्या आयुष्यावर यांचाच प्रभाव असतो. ! पहिली आई,दुसरी आज्जी,तिसरी मावशी,चौथी आत्या,पाचवी बहीण, सहावी पत्नी,सातवी मुलगी, आठवी सून, नववी नात... हीच आहेत आपल्या आयुष्यातील देवीची नऊ रूपे...!!!


मूर्ती स्वरूपातील देवी सोबतच,आपल्या घरातील या देवींची सुद्धा पूजा मांडूया का ? 


यांच्या पूजेला हार,नारळ,अगरबत्ती,फुलं यांची गरजच नसते. 


वेगवेगळ्या रूपात,आपल्याच घरात आपल्या आसपास वावरणाऱ्या या देवी माता... ! 


'आपल्या घरातल्या,याच देवी माता आपल्या खऱ्या देवी असतात,आपल्यासाठी त्या झिजतात...आणि मुकुट घालायची वेळ येते,तेव्हा मात्र तो काढून आपल्या डोक्यावर ठेवतात...!'


'या देवीला मिळालेला प्रसाद, ती आपल्या ताटात ठेवते आणि स्वतःच्या पदरात शीळी भाकर घेऊन तृप्त होते...'


'फाटका पदर घेऊन राब राब राबते,आणि आपल्याला भरजरी बनवते...' 


'आता मी संपलो,म्हणत असतानाच,कुठल्यातरी रूपात ती येते आणि आपल्याला पुन्हा जन्माला घालते... पुन्हा पुन्हा जन्माला घालते...! आपल्याच घरातल्या या देवींची पूजा कशी मांडावी...  ??? ती ला काही द्यावं,इतके आपण अजून "श्रीमंत" झालेलो नाही...! 


'तू आहेस गं माऊली,म्हणून मी आहे,तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला काही अर्थ नाही, तू मायेनं भरलेला "घट" आहेस आणि आयुष्यभर मी माझ्या मनात तो "*स्थापन"* करूनच जगणार आहे... हाच माझा भाव... "भक्ती" म्हणून स्वीकार कर गं माऊली !!! आयुष्यभर मी तुला मान देईन, सन्मान देईन, मनापासून आदर करेन;हिच मी केलेली "उपासना" आहे ...!!!" तुझ्या शिवाय मी पूर्णपणे रिता आहे,याची जाणीव तुझ्या सुद्धा मनी असू देत हां देवी ... कारण माझी तीच "श्रद्धा" आहे...!!!" 


तुला अर्पण करू शकेन,असं माझं माझ्याकडे काही शिल्लकच नाही... ..... तरीही माझ्या हृदयाची धडधड, मी तुलाच अर्पण करतो... डोळे उघडल्यावर दिसणारा प्रकाश,पांढरा रंग म्हणून मी तुला अर्पण करतो...डोळे मिटल्यावर न दिसणारा अंधार,काळा रंग म्हणून मी तुला अर्पण करतो...ज्यामुळे मी जिवंत आहे; त्या रक्ताचा लाल रंग मी तुला अर्पण करतो... 


ज्या आभाळात झेप घेण्यासाठी दरवेळी मला तू प्रोत्साहन देतेस,त्या आभाळाचा निळा रंग मी तुला अर्पण करतो...

ज्या पृथ्वीवर मी तुझ्यामुळे जिवंत आहे, त्या पृथ्वीचा हिरवा रंग मी तुला अर्पण करतो... माझ्या डोळ्यात तेवत असणाऱ्या ज्योतीचा तो पिवळा रंग मी तुला अर्पण करतो... 


आमच्यासाठी आयुष्यभर जळतेस, जळालेल्या त्या राखेचा करडा रंग मी तुला अर्पण करतो...


तुला पाहून,नेहमीच माझ्या "जीवात जीव येतो"... 


चल,आज हा बीन रंगाचा जीव सुद्धा तुलाच अर्पण करतो... !!! 


माझ्या या अर्पण करण्यालाच मी पूजा म्हणतोय...! 


स्वीकार करा.... आई,आजी,मावशी,आत्या,ताई, मुली,सुनबाई,गोडुल्या नाती आणि सौ...! 


काही चुकलं असेल तर पदरात घ्या... 


नेहमी घेता तसंच.... !!! 


असो.... 


माझं एक कुटुंब घरात आहे आणि दुसरं याचक कुटुंब,माझ्या आयुष्यातील इतर नऊ देवी,रस्त्यावर दुसऱ्यांच्या दयेवर जगत आहेत,हा माझा सल आहे...! पायात काटा घुसावा आणि तो निघूच नये...तेव्हा जी वेदना होते,तीच ही वेदना आहे...! 


आपल्याला कोणतीही वेदना झाली,की मग बाम लाव,शेक देवून बघ,गोळी खा किंवा आणखी काहीतरी करून बघ असे अनेक उपाय करत असतो... माझ्या या वेदनेवरचा,असाच एक उपाय म्हणून,या नवरात्रात आम्ही रस्त्यावरच्या सर्व आई, आजी,मावशी,आत्या,ताई,मुली,सुनबाई,गोडुल्या नाती यांचे पूजन करायचे ठरवले आहे... ! 


"माऊली" म्हणून त्यांची पूजा करून,त्यांना सन्मान द्यायचे ठरवले आहे.... नवीन साडीचोळी द्यायचे ठरवले आहे... ! 


दरवर्षी आपल्या साथीने आम्ही हे करतच असतो.... याही वर्षी करत आहोत... ! 


दिलेला हा सन्मान नवरात्रींपुरता मर्यादित न राहता, आयुष्यभर त्यांना मिळावा इतकीच माझी "मनीषा" आहे.... 


आम्ही दोघे मिळून हिच प्रार्थना करतोय ... 

बाकी आमच्या हातात दुसरं आहेच काय ??? 



सप्टेंबर महिन्याचा लेखाजोखा


मागच्या आठवड्यात नेहमीप्रमाणेच आमच्या याचक लोकांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी शे दीडशे किलोच्या बॅगा मोटरसायकलवर घेतल्या आणि घराबाहेर पडलो. 


घराबाहेर पडताना सौ म्हणाली,'कचरा टाकायच्या प्लास्टिकच्या बॅगा संपल्या आहेत,त्या येताना घेऊन ये.भिक्षेकर्‍यांची कामं संपल्यानंतर,मी बोहरी आळी मध्ये सौ ची आज्ञा पाळून कचरा टाकण्यासाठी लागणाऱ्या पिशव्या आणण्यासाठी गेलो. 


त्या दुकानात एक गोलमटोल शेठजी बहुतेक नुकतेच जेवण करून,दात टोकरत,खुर्चीवर रेलून आराम करत बसले होते. 


मी गेलो आणि त्यांना म्हणालो,'प्लास्टिकच्या पिशव्या द्या...' 


ते जांभई देत कंटाळवाणे पणाने म्हणाले, 'कशासाठी हव्यांत रे ?' ' कचरा टाकण्यासाठी'


शेठजींनी न उठता थोडासा हात लांबवत,बाजूच्या रॅक वरून,पिशवीचा एक गठ्ठा काढला आणि उठण्याचे कष्ट न घेत,काउंटरवर माझ्या दिशेने, कुत्र्याला तुकडा फेकावा तसा एक गठ्ठा फेकला. पिशव्या अगदीच तकलादू होत्या... 


मी त्यांना म्हणालो 'अहो साहेब,या अगदीच साध्या पिशव्या आहेत... जरा चांगल्या क्वालिटीच्या द्या की... !' आळसावून,ढेरीवरून हात फिरवत,या दातातली काडी त्या दाताकडे फिरवत,पुन्हा एक जांभई देत ते म्हणाले,कचराच टाकायचा आहे ना रे? त्याला कशाला चांगल्या क्वालिटीच्या पिशव्या लागतात ? कचऱ्याच्या पिशव्यांना कशाला जास्त पैसे घालवतोस बाबा ?  


मध्यमवर्गीय माणसाला,पैशाचं गणित मांडून काहीही सांगितलं तरी ते त्याला पटतं...! 


अर्थातच मलाही ते पटलं. 


'तू दिवसाला किती कमवत असशील ? त्यात भारी प्लास्टिकच्या पिशव्या घ्यायची वार्ता कशाला करतो रे... तुला परवडणार आहेत का  त्या ???' माझ्या गाडीकडे आणि माझ्या एकूण अवतारा कडे वाकून बघत,ते परत जांभई देत बोलले. यात माझ्याबद्दल काळजी होती की उपहास ? हे त्यांच्या जांभई देणाऱ्या चेहऱ्याकडे पाहून कळलं नाही.मी स्वतःच्या अवताराकडे आणि गाडीकडे हसून पाहिले... ! 


भिक्षेकर्‍यांशी नातं जुळवण्याच्या नादात, त्यांच्यासह गटाराबाजूला लोळून माझ्याही कपड्यांचा अवतार झालेला असतो...


चिखलात लोळून आलेली म्हैस माझ्यापेक्षा बरी दिसते... ! 


सूट बूट घातलेलाच डॉक्टर असतो... 

हेच सर्वांच्या डोक्यात फिट बसलेलं आहे...

मग माझ्यासारख्या भिक्षेकऱ्यात बसून "मळखाऊ झालेल्या बैलाला" कोण डॉक्टर म्हणेल ? 


म्हणायला अंगावर डॉक्टरचा पांढरा ॲप्रन असतो... घरून निघताना तो पांढराच असतो... 


पण भिक्षेकऱ्यात दिवसभर बसून काम करताना, भिक्षेकऱ्यांचाच रंग मला लाभतो... अवघा रंग मग एकची होतो... ! मग,एक तर ते तरी माझ्यासारखे दिसतात किंवा मी तरी त्यांच्यासारखा दिसायला लागतो... 


आम्हा दोघांमध्ये सांगण्यासारखा काही फरकच उरत नाही.... अद्वैतचा नेमका अर्थ हाच असावा का ? 


भीक मागणाऱ्या लोकांसाठी अख्खा दवाखाना मोटर

सायकलवर न्यायचा,म्हणून माझ्या मोटरसायकलला चार ते पाच ताडपत्रीच्या मजबूत बॅगा अडकवलेल्या असतात.या बॅगा आता खूप जुन्या झाल्या आहेत.रस्त्यावर सतत धुळीत फिरल्यामुळे त्या खूप कळकट झाल्या आहेत; माझ्याच

सारख्या... या बॅगेत आणि माझ्या अंगावर शे दीडशे किलोचे सामान असते. 


माझ्या जुन्या मोटरसायकलवर लादलेले हे सामान पाहून;

मला बरेच लोक खाद्यपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या कंपन्यांचा डिलिव्हरी बॉय समजतात... 


अनेक वेळा कुरियर बॉय समजतात... !


वृद्धांना लागणाऱ्या आणि अपंग व्यक्तींसाठी असणाऱ्या कुबड्या,काठ्या याही माझ्या गाडीला अडकवलेल्या असतात...रस्त्यावर या वस्तूंची विक्री करणारा विक्रेता समजून,'हे केवढ्याला दिले रे' म्हणूनही अनेक जण विचारतात.गाडीवर कुबडी बघून अनेक लोक मला अपंग समजतात... दया भावनेने बघतात... 


शहरात काही वाईट घटना घडली,तर मोटरसायकलवर भलं मोठं सामान घेऊन फिरणाऱ्या माझ्याकडे,पोलीस संशयाने बघतात. वाटेत अडवून झडती घेतात,आडवे तिडवे प्रश्न विचारतात.संशयाची खात्री होईपर्यंत त्यांच्या नजरेत मी अतिरेकी असतो.बऱ्याच वेळानंतर,मी अतिरेकी नाही हे त्यांना पटतं...पण डॉक्टर आहे;यावर ते विश्वास ठेवत नाहीत. गाढवावर भरभक्कम सामान लादावं आणि त्यानं ते वहावं... माझ्यासारख्या अशा गाढवाला कोण डॉक्टर समजेल ? फिल्डवर मी जेव्हा कमरेचे किंवा हातापायाचे पट्टे, वॉकिंग स्टिक,कुबड्या,भिक्षेकर्‍यांना देत असतो, तेव्हा "चांगल्या घरातले" (??) लोक,कार मधून उतरून मला म्हणतात,'या वस्तू आम्हाला केवढ्याला देतो बोल... ?' 


'अहो,मी डॉक्टर आहे,या वस्तू विकायला नाही आणल्या.''गप रे... पांढरा कोट घातला म्हणजे कोण डॉक्टर होतं का रे... ? तू डॉक्टरचा "आशीस्टंट" पण वाटत नाय,काय नाटक करतो,तू डॉक्टर असण्याचं राव ?' 


मला हसावं का रडावं तेच कळत नाही...! 


माझं बालपण खेड्यातलं,दुष्काळी भागातलं. 


माझी आजी आणि आई पाच पाच किलोमीटर पायपीट करत डोक्यावर हंडे ठेवून नदीवरून / विहिरीवरून पाणी भरायची... 


आजी बऱ्यापैकी सधन होती,पण पैसे असले म्हणून नदीला आपल्या दारात आणता येत नाही किंवा विहिरीला दावणीला बांधून गोठ्यात सुद्धा ठेवता येत नाही...! तहान लागली की नदीकडे किंवा विहिरीकडे आपल्यालाच जावं लागतं...! 


लहान असताना मी मग आई आणि आजी सोबत पाण्याला जाऊन,माझ्या ताकदीप्रमाणे पाच सात लिटर पाणी बसेल अशी कळशी;पाण्याने भरून खांद्यावरून घेऊन यायचो..

तेवढीच आई आणि आजीला मदत !!! पुढे आयुष्यातल्या जगण्या आणि जगवण्याच्या लढाईने ... मला कमरेच्या मणक्यामध्ये चार गॅप आणि मानेच्या मणक्यामध्ये तीन गॅप बक्षीस म्हणून दिले.खूप वेळा हि दुखणी जागी होतात... आणि लहान बाळाला थोपटून झोपवावे,त्याप्रमाणे या दुखण्यांना मी झोपवून ठेवतो.डॉक्टर सांगतात,जास्त वजन उचलायचं नाही. पण या सर्व पिशव्या गाडीवर ठेवायला आणि गाडीवरून उतरून पुन्हा भिक्षेकरी बसले आहेत तिथपर्यंत न्यायला,वजन उचलावेच लागते. 


इतक्या वजनाच्या बॅगा हातात घेऊन चालले की कमरेतून आणि मानेतून कळ उठते... 


मग मी हे सर्व सामान माझ्या खांद्यावर घेऊन चालायला लागतो... पूर्वी पाण्याने भरलेली कळशी खांद्यावर ठेवून आणायचो तसाच... ! पूर्वी मी हे असं पाणी भरायचो,ते माझ्या आजीला आणि आईला केवळ मदत व्हावी म्हणून...


आज हे असं खांद्यावरून सामान वहावं लागतंय, तेही माझ्या रस्त्यावरच्या आजीला आणि आईला मदत व्हावी म्हणूनच... 


आज आई आणि आजीचे चेहरे फक्त बदललेले आहेत....


तर,मला हे असं खांद्यावरून सामान नेताना अनेक लोकांना मी हमाल सुद्धा वाटतो... !!!


या सर्व गोष्टींचा मला पुर्वी खूप राग यायचा... चिडचिड व्हायची.... त्रास व्हायचा... ! 


एकदा माईकडे (आदरणीय सौ सिंधुताई सपकाळ) हि चिडचिड व्यक्त केली. 


माई म्हणाल्या, "धन्याचा तो माल,आपण फक्त भारवाही हमाल" या एका वाक्यात समजून जा राजा... ! 


सर्वांग तापानं फणफणावं .... मग कुणीतरी येऊन काढा द्यावा आणि हळूहळू ताप ओसरून जीवाला शांतता मिळावी...तसं काहीसं या वाक्यानं माझं झालं. मी विचार करायला लागलो... समाजाला तळागाळातल्या लोकांना मदत करायची आहे... समाज माझ्यावर विश्वास ठेवून,हि मदत तळागाळात पोचवण्यासाठी माझ्याकडे विश्वासाने सुपूर्त करत आहे...मी ते तळागाळापर्यंत पोहोचवत आहे... मग कोणी "डिलिव्हरी बॉय"*म्हणाले तर वाईट कशाला वाटायला हवं...?  उलट करोडो लोकातून डिलिव्हरी बॉय म्हणून समाजाने विश्वासाने फक्त माझी निवड केली आहे... मी किती भाग्यवान... !


समाजाने दिलेलं प्रेम आणि माया मी मदतीच्या स्वरूपात,खालपर्यंत पोचवत आहे... मी कुरिअर बॉय असण्याचा मला अभिमान आहे...! 


खुशाल कुणालाही म्हणुदे मला हमाल,पण मी तर भिक्षेकरी समाजाची पालखी वाहणारा मानाचा भोई आहे... ! 

हा मान केव्हढा मोठा ? हा नशीबवान "मानकरी" मीच आहे...!!!" आशीस्टंट"* म्हणतात... म्हणूदे...  रस्त्यावरच्या आई बापाचा हात धरून त्यांना चालायला मदत करणाऱ्या मदतनीसालाच कुणी "आशीस्टंट" म्हणत असतील,तर असा आशीस्टंट होण्यासाठी मी मरूनही पुन्हा जन्मेन ! 


माझ्या अवतारावरून नसेल समजत मला कुणी डॉक्टर... नको समजू दे... पण एखाद्याची "वेदना" समजणारा मी "वैद्य" तर झालो आहे... ! एकाच जन्मात इतक्या भूमिका करायला मिळाल्या ऋणी आहे मी निसर्गाचा... आणि समाजाचा ! 


या महिन्यात गणेशोत्सव होता. 


रस्त्यावरच्या वृद्ध याचकांना रस्त्यावरच वैद्यकीय सेवा दिली,स्टथोस्कोप ने आरती करून,गोळ्या औषधांचा नैवेद्य वाहिला... निराधार अवस्थेत पडलेल्या लोकांना मोठ्या दवाखान्यात ऍडमिट करून उपचार करवून घेतले... ज्यांना दिसत नाही अशांचे डोळ्यांचे ऑपरेशन करवून घेतले... चष्मे दिले... ! प्रसाद म्हणून त्यांचे आशीर्वाद घेतले...! 


भीक मागणाऱ्या निराधार महिलांना व्यवसाय टाकून द्यायला मदत केली. जोगवा मागणाऱ्या एका आईची मुलगी... आई सोबत यायची.तिला काहीतरी काम करण्यासाठी विनवण्या केल्या, ती तयार सुद्धा झाली,पण आता काम काय द्यायचं ? 


पोलीस,युनिफॉर्म,सिक्युरिटी अशा गोष्टीत तिला रुची होती.पण जॉब मिळत नव्हता. 


दिपाताई परब,सख्ख्या बहिणी प्रमाणेच प्रेम करणारी माझी एक ताई."रणरागिणी" या नावाने लेडी बाउन्सर्सचा ग्रुप तयार करणारी ती पहिली भारतीय महिला आहे. 


दिपाताई कडे मी एक शब्द टाकला आणि दिपाताईने पुढचा मागचा काहीही विचार न करता तिला एका दिवसात कामावर रुजू करून घेतले.मी ऋणी आहे दिपाताई चा !!! 


परवा परवा पर्यंत याचना करणारी हि मुलगी, युनिफॉर्म मध्ये जेव्हा माझ्यासमोर उभी राहिली तेव्हा,माझ्या डोळ्यातून खरोखर त्यावेळी अश्रू ओघळले... ! 


या महिन्यात अशा कितीतरी भिक्षेकर्‍यांचे; भिक्षेकरी म्हणून विसर्जन केले आणि कष्टकरी... गावकरी म्हणून नामकरण केले ! भीक मागणाऱ्या पालकांच्या कित्येक मुलांचे युनिफॉर्म फाटले होते,त्यांना या महिन्यात नवीन युनिफॉर्म घेऊन दिले... शाळेत जाण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले.बुद्धीच्या देवतेची आम्ही अशी पूजा मांडली...!!! गेल्या तीन वर्षांपासून रोजचे अन्नदान सुरू आहे. याही महिन्यात भरभरून केले.... पितृपंधरवडा असतानाही आणि नसतानाही...! 


असो... 


केलेल्या कामासह,तुमच्यासमोर आज मनातल्या भावना मांडल्या... 


आतापर्यंत हमाल झालो... कुरियर बॉय झालो... डिलिव्हरी बॉय झालो... आशीस्टंट झालो... 


जन्मतानाही मी माकड म्हणूनच जन्माला आलो... 


हळूहळू माणूस म्हणूनही याच जन्मात, जन्म व्हावा हिच प्रार्थना... !!! 


१ ऑक्टोबर २०२४


डॉ.अभिजीत आणि डॉ.मनीषा सोनवणे

डॉक्टर फॉर बेगर्स,सोहम ट्रस्ट पुणे.




७/१०/२४

कौटुंबिक अग्निपरीक्षा A family ordeal

ही एक घरगुती किरकोळ शोकांतिका आहे. कार्ल आणि ॲन त्यांच्या पाच वर्षांच्या मुलीला, लेस्लीला नवे कोरे खेळणे,व्हिडिओ गेमशी कसे खेळावे हे दाखवत आहेत;

पण लेस्ली त्या खेळण्याशी खेळू लागताच तिला मदत करायला उत्सुक असलेल्या पालकांनी तिला केलेली अति मदत आड येऊ लागली.दोन्ही बाजूंनी परस्पर

विरोधी फर्माने बरसू लागली.


"अगं, उजवीकडे,उजवीकडे... थांब. थांब. थांब!" ॲन लेस्लीची आई कळकळीने सांगू लागली.बिचारी लेस्ली ओठांवर जीभ टेकवून, विस्फारलेल्या डोळ्यांनी जसजशी आईच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी धडपडू लागली तसतसा आईचा आवाज अधिकच उत्सुक आणि चिंतातुर होऊ लागला.


"बघितलंस? तू सरळ रेषेत जात नाहीयेस... डावीकडे जा! डावीकडे!" कार्लने,मुलीच्या वडिलांनी तुटकपणे हुकूम सोडला.


मध्यंतरी 'काय म्हणावं याला !' अशा आविर्भात डोळे कपाळाकडे वळवत ॲन मध्ये टपकली आणि ओरडून म्हणाली "थांब. थांब!"


लेस्ली ना आपल्या आईला खुश करून शकली ना वडिलांना.ताणामुळे तिचा चेहरा रडवेला झाला आणि डोळे पाण्याने डबडबले.


लेस्लीच्या आसवांकडे कानाडोळा करीत तिचे आई-बाबा किरकोळ कारणावरून भांडत राहिले. "ती हा दांडा इतका उंच नेत नाहीये!" आई भडकून बाबांना सांगू लागली.


लेस्लीच्या गालांवरून आसवं ओघळू लागली. तरीही दोघांपैकी एकानेही अशी काही हालचाल केली नाही की,लेस्लीला कळावे की,त्यांना तिची काळजी आहे.तिचे रडणे त्यांच्या लक्षात आले आहे.शेवटी तिनेच आपली आसवं हाताच्या पालथ्या पंजांनी पुसावीत म्हणून हात उचलताच तिच्या वडिलांनी फटकारले,"ठीक आहे,पुन्हा तुझा हात दांड्यांवर ठेव बघू... तुला काही शिकायचंच नाही.ठीक,उचल वर!" आणि तिची आई ओरडली, "हं,अगदी जरासे बाजूला घे!" परंतु आता लेस्ली हलके हलके हुंदके देत आपल्या तीव्र मनोवेदनेत बुडून गेली.


अशा क्षणी मुलं गहन धडे शिकतात.कदाचित लेस्लीने या दुःखद संभाषणाअंती असा निष्कर्ष काढला असेल की,आपले आई-बाबा,इतकेच काय इतर कोणालाही तिच्या भावनांची पर्वा नाही.जेव्हा अशा घटना बालपणी वारंवार घडतात,अगणित वेळा घडतात तेव्हा त्या अत्यंत मूलभूत असा भावनिक धडा शिकवतात जो आयुष्यभरात - कणीच विसरता येत नाही. 


कौटुंबिक जीवन ही आपल्याला भावनिक अध्ययन शिकवणारी पहिली शाळा असते. या भट्टीत आपण तावून सुलाखून निघताना हे शिकत असतो की,स्वतःबद्दल कोणत्या भावना बाळगाव्यात आणि इतर आपल्या भावनांना कशा प्रतिक्रिया देतील.या भावनांबद्दल कसा विचार करावा आणि आपल्याजवळ प्रतिक्रिया करण्याचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत, आपल्या आशा आणि भय कसे व्यक्त करावे आणि इतरांच्या आशा आणि भय कसे समजून घ्यावे.पालक त्यांच्या मुलांना प्रत्यक्ष काय सांगतात किंवा त्यांच्याशी कसे वागतात केवळ एवढ्याच गोष्टीतून हे भावनिक प्रशिक्षण मिळत नसते तर ते स्वतःच्या भावना हाताळताना आणि नवरा-बायको म्हणून परस्परांशी वागताना मुलांसमोर कोणता आदर्श ठेवतात यातूनही घडत असते.या बाबतीत काही पालक उपजत उत्तम भावनिक शिक्षक असतात,तर इतर मात्र या बाबतीत भयानक क्रूर असतात.पालक आपल्या मुलांना कसे वागवतात यासंदर्भात शेकडो अभ्यास केले गेले आहेत ते कठोर शिस्तपालनाचे आग्रही आहेत की, मुलांच्या भावना समजून घेण्याइतके समंजस आहेत,

त्यांच्याशी थंड तटस्थपणाने वागतात की, मायेची उब देतात,अशा अनेक गोष्टींचा मुलांच्या भावविश्वावर खोल परिणाम होत असतो जो आयुष्यभर टिकून राहतो.अगदी अलीकडेच असा स्पष्ट अहवाल प्राप्त झाला आहे की, भावनिक बुद्धिमत्ता असलेले पालक मुलांसाठी वरदानरूप असतात.एक जोडपे आपल्या बालकाशी प्रत्यक्षपणे कसे वागते,याच्या जोडीला ते त्यांच्या परस्परांच्या भावना कसे हाताळते ही बाब त्यांच्या मुलाना फार जबरदस्त धडे शिकवत असते;कारण मूलं शिकण्यात हुशार असतात आणि कुटुंबात घडणाऱ्या सूक्ष्मातिसूक्ष्म भावनिक देवाणघेवाणीशी ते एकरूप होत असतात. 


वॉशिंग्टन विद्यापीठात कॅरोल हुवेन आणि जॉन गॉटमन यांच्या नेतृत्वाखाली एका संशोधन चमूने,पालक आपल्या मुलांना कसे हाताळतात, वागतात याविषयी जोडप्या परस्पर घडणाऱ्या आंतरक्रियांचे सूक्ष्म विश्लेषण केले तेव्हा त्यांना आढळून आले की,जी जोडपी वैवाहिक जीवनात भावनिकपातळीवर सक्षम होती तीच त्यांच्या मुलांच्या भावनिक चढ- उतारादरम्यान त्यांना परिणामकारक मदत करू शकत होती.


एखाद्या कुटुंबाची पहिली भेट तेव्हा घेतली गेली जेव्हा त्यांचे एखादे मूल फक्त पाच वर्षांचे होते आणि त्यानंतर ते मूल नऊ वर्षांचे झाल्यावर त्यांना पुन्हा भेट दिली गेली.

पती-पत्नी एकमेकांशी कसे बोलतात याचे निरीक्षण करण्याव्यतिरिक्त या संशोधनकर्त्यांनी या गोष्टीचेही निरीक्षण केले की,त्या कुटुंबात आई किंवा वडील त्यांच्या लहान मुलांना व्हिडिओ गेमसारखे खेळणे वापरायला कसे शिकवतात. यात लेस्लीच्या कुटुंबाचाही समावेश होता.वरवर पाहता ही बाब निरुपद्रवी वाटू शकते;परंतु पालक आणि मुलं यांच्यात कोणते भावनिक प्रवाह वाहत आहेत याचा बोध करून देणारी ही अत्यंत प्रभावशाली बाब ठरली.काही आई-वडील वरील उदाहरणातील ॲन आणि कार्लसारखी उद्दाम,घमंडी,मुलांच्या अजाणपणा

विषयी सहनशील नसलेली,रागाने भडकून उठणारी किंवा तुच्छतेने आवाज चढवणारी,तर काही त्यांच्या मुलांना 'शंखोबा, मूर्ख' म्हणून त्यांना खाली बघायला लावणारी होती.थोडक्यात लग्न संबंधाला खिळखिळे करणाऱ्या इतरांचा तिरस्कार आणि तुच्छ मानण्याच्या त्याच वृत्तीला बळी पडलेले होते.इतर काही पालक आपल्या मुलांच्या चुका शांतपणे,धीर धरून सहन करणारे,स्वतःच्या इच्छा बळजबरीने त्याच्यावर लादण्याऐवजी त्याला त्याच्यापरीने तो खेळ शिकता यावा म्हणून मदत करणारे होते.


व्हिडिओ गेम खेळायला शिकवणे ही बाब पालकांच्या भावनिकशैलीचे नेमके मोजमाप करणारे समर्थ साधन ठरले.अतिसर्वसामान्य असणाऱ्या तीन भावनिक अकार्यक्षम बालसंगोपन शैली पुढीलप्रमाणे आहेत :


• मुलांच्या भावनांकडे सपशेल दुर्लक्ष करणे असे पालक मुलांच्या भावनांना किरकोळ शुल्लक समजतात किंवा असा वैताग मानतात जो दूर होण्यासाठी त्यांना वाट पाहावी लागणार आहे.ते मुलांच्या अशा भावुक क्षणांचा उपयोग करून मनाने त्यांच्याजवळ जाऊ शकत नाहीत किंवा त्यांना भावनिकपातळीवर सक्षम होण्याचे धडेही देऊ शकत नाहीत.


अति मोकळीक देणे : मुलाला काय वाटत आहे याची असे पालक नोंद घेतात,परंतु ते असे मानतात की,आपल्या भावनिक वादळाला मूल जसे तोंड देत आहे तसे देऊ द्यावे,अगदी ते इतरांना मारत असले तरीही.मुलांच्या भावनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालकांप्रमाणेच हे पालक

देखील त्यांच्या मुलाला,दुसरी पर्यायी भावनिक प्रतिक्रिया काय असू शकेल हे दाखवून देण्याची तसदी क्वचितच घेतात.मुलाची प्रत्येक इच्छा,भावनिक अस्वस्थता कमी करण्यासाठी त्याला काही लालूच देतील किंवा त्याने दुःखी होऊ नये वा रागावू नये म्हणून त्याच्याशी 'तू असे केलेस/केले नाहीस तर तुला अमुक देऊ" अशी सौदेबाजी करतात.


• अवमानात्मक वागणे,मुलाला काय वाटत आहे याबद्दल आस्थेवाईकपणा न दाखवणे : असे पालक खासकरून नापसंती दाखवणारे असतात,त्यांची टीका तसेच शिक्षा दोन्हीही कठोर असतात. उदा. ते फर्मान सोडतील की, मुलाने आपला राग अजिबात दिसू देता कामा नये आणि त्याने थोडीदेखील चिडचिड केली की, त्याला शिक्षा देतात.मूल आपल्या बाजूने काही खुलासा देण्याचा प्रयत्न करीत असते तेव्हा ते त्याच्यावर रागाने ओरडतात,"मला उलटून बोललास तर खबरदार,"असा दम देतात."


शेवटी पालकांचा एक प्रकार असाही आहे जे त्यांच्या मुलांच्या अशा हळव्या क्षणी त्यांच्याशी असे वागतात जसा एखादा भावनिक प्रशिक्षण देणारा किंवा गुरू वागतो.अशा प्रसंगांना मुलांना भावनिक शिक्षण देण्याची संधी समजून ते अशी एकही संधी दवडत नाहीत.ते त्यांच्या मुलांच्या भावनांचा पुरेसा गंभीरपणे विचार करून नेमके कशामुळे तो अस्वस्थ झाला आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतात. ("टॉमीने तुला दुःखावले म्हणून तु रागावलायस का?" मुलाच्या भावनांची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी सकारात्मक मार्गानी त्याला मदत करतात. "त्याला मारण्याऐवजी पुन्हा तुला त्याच्यासोबत खेळावेसे वाटेपर्यंत तू एकटाच एखाद्या खेळण्याशी खेळ की!")


पण पालकांना मूलांचे असे परिणामकारक भावनिक प्रशिक्षक बनता यावे यासाठी मुळात त्यांना स्वतःला भावनिक बुद्धिमत्तेच्या मूलभूत तत्त्वांचे सखोल ज्ञान असायला हवे.मुलांना दिला जावा असा एक मूलभूत भावनिक धडा म्हणजे भावनांमधील भेद कसा ओळखावा.जो पिता स्वतःच दुःखाच्या सागरात गटांगळ्या खात आहे तो त्याच्या मुलाला हे समजावून सांगू शकणार नाही की, एखादे नुकसान झाल्यावर होणारा शोक आणि एखादा दुःखद चित्रपट पाहताना वाटणारे दुःख आणि त्या मुलाला ज्याच्याबद्दल काळजी वाटते त्याच्याबाबतीत काही वाईट घडल्यास जाणवणारे दुःख यात काय अंतर आहे.भावनांच्या या सूक्ष्म छटांव्यतिरिक्त इतर गुंतागुंतीच्या भावनांबद्दल अशीच सूक्ष्म जाण जागवावी लागते.उदा. दुखावलेल्या भावनांतून राग जन्म घेतो.मूल जसजसे वयाने वाढू लागते तसतसे विशिष्ट भावनिक धडे शिकण्याच्या त्याच्या सज्जतेत आणि ती त्याची त्यावेळची गरजही असते भावनिक त्याच्या - बदल होत जातो.आपण प्रकरण मध्ये पाहिल्यानुसार जे पालक आपल्या बालकांच्या भावनांशी ताळमेळ साधतात.अशी मुले समभावाचे धडे अर्भकावस्थेतच गिरवू लागतात.जरी काही भावनिक कौशल्ये अशी असतात की,ज्यात मित्रांच्या संगतीत काही वर्षे घालवल्यानंतरच पारंगत होता येते,तरीही भावनिक पातळीवर कार्यक्षम असलेले पालक त्यांच्या मुलांनी भावनिक बुद्धिमत्तेची पुढील मूलतत्त्वे शिकावीत म्हणून बरेच काही करू शकतात- त्यांच्या भावना कशा ओळखाव्या,त्यांना कसे हाताळावे आणि कसा लगाम घालावा,समभाव बाळगणे आणि त्यांच्या नातेसंबंधात उद्भवणाऱ्या भावना हाताळणे.अशा पालकांच्या मुलांवर होणाऱ्या असाधारण परिणामांचा आवाका फार मोठा असतो.वॉशिंग्टन विद्यापीठातील चमूला आढळून आले की,आपल्या भावना हाताळू न शकणाऱ्या पालकांच्या तुलनेत जे पालक कुशलतेने आपल्या भावना हाताळू शकतात त्यांची मुलं चांगली प्रगती करतात,पालकांप्रति जास्त आपुलकी दाखवतात आणि त्यांच्या पालकांसाठी अधिक ताण निर्माण करीत नाहीत; पण याहीपलीकडे जाऊन ही मुलं स्वतःच्या भावनांना चांगल्याप्रकारे हाताळू शकतात. (इमोशनल इंटेलिजन्स,भावनिक बुध्दिमत्ता,

डॅनिअल गोलमन,अनुवाद-प्रा.पुष्पा ठक्कर,साकेत प्रकाशन.) अस्वस्थ झाल्यावर स्वतःला शांत करण्यात यशस्वी होतात आणि कमी प्रमाणात अस्वस्थ होतात.अशी मुलं शारीरिक पातळीवरदेखील अधिक शिथिल,शांत असतात,त्यांच्या रक्तात ताण निर्माण करणारे स्त्राव कमी पातळीवर असतात.शिवाय भावनिक उद्दीपन सुचवणारी इतर शारीरिक चिन्हेदेखील कमी असतात. आपण प्रकरण ११ मध्ये पाहिलेच आहे की, अशी स्थिती आयुष्यात पुढेही टिकून राहिली तर चांगल्या शारीरिक आरोग्याच्यादृष्टीने तो शुभसंकेत असतो.इतर काही सामाजिक लाभही आहेत.त्यांच्या सोबत्यांना ते जास्त आवडतात,त्यांच्यात लोकप्रिय असतात,शिक्षक त्यांच्याकडे अधिक कुशल मुलं या दृष्टिकोनातून पाहतात.पालक तसेच शिक्षकांच्यादृष्टीने अशा मुलांमध्ये उद्धटपणा किंवा आक्रमकपणा सारख्या वर्तनविषयक समस्या फारशा नसतात.शेवटी,काही बोधात्मक फायदेही आहेत-अशी मुलं चांगल्याप्रकारे लक्ष देऊ शकतात.त्यामुळे साहजिकच ते चांगले शिकणारे असतात.त्यांचा बुद्धिगुणांक स्थिर असूनही ज्या पाच वर्षीय मुलांचे पालक चांगले भावनिक प्रशिक्षक होते,


ती मुलं तिसरीत पोहोचेपर्यंत गणित आणि वाचनात उच्चगुणांक मिळवू लागली.शालेय अध्ययनात तसेच एकंदर आयुष्यात उपयोग व्हावा म्हणून मुलांना भावनिक कौशल्ये शिकवणे किती महत्त्वाचे आहे हे स्पष्ट करण्यासाठी हा एकच बळकट मुद्दा पुरेसा आहे. तर अशारीतीने ज्या मुलांचे पालक भावनिकदृष्ट्या कुशल असतात त्यांच्या मुलांना मिळणारे विशेष,आकस्मिक फायदे आश्चर्यजनक आहेत, अगदी थक्क करणारे आहेत त्यांची व्याप्ती भावनिक बुद्धिमत्तेच्या व्याप्तीपलीकडे आहे.