जास्त करून लोक दुसऱ्यांना आपली गोष्ट खूप बोलतात.
याऐवजी तुम्हाला समोरच्याला जास्त बोलण्याचा मोका द्यायला पाहिजे.ते आपल्या बिझेनस आणि आपल्या समस्यांच्या बाबतीत तुमच्यापेक्षा जास्त जाणतात.याकरता तुम्ही त्यांना प्रश्न विचारा.त्यांना आपली गोष्ट सांगू द्या.
जर तुम्ही त्यांच्याशी असहमत आहात,तर तुमच्यामध्ये ही इच्छा जागू शकते की,त्यांची गोष्ट मध्येच तोडायची; पण असं मुळीच करू नका.ही एक भयंकर खोड आहे. कारण त्यांच्या डोक्यात खूपसे विचार असतात.ज्यांना ते व्यक्त करू इच्छितात,याकरता ते तुमच्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत.हेच योग्य होईल की,त्यांची गोष्ट धैर्याने आणि लक्षपूर्वक ऐका.याबाबतीत गंभीर राहा.त्यांना आपले विचार पूर्णपणे व्यक्त करायला प्रोत्साहित करा. काय ही पद्धत बिझनेसमध्ये कामाला येते? या बघू या. ही एक सेल्समनची गोष्ट आहे,ज्याला नाइलाजाने गप्प राहायला लागलं.
अमेरिकेच्या एका मोठ्या ऑटोमोबाईल निर्मात्याला वर्षभराकरता आहोल्ट्री फॅब्रिकची गरज होती.तीन मोठ्या निर्मात्यांनी आपले नमुने पाठवले.मोटर कंपनीच्या एक्झिक्युटीव्हने त्याची तपासणी केली. त्यानंतर प्रत्येक निर्मात्याला एक नोटीस पाठवली की, एका निश्चित दिवसाचा त्यांना वेळ दिला जाईल म्हणजे ते आपल्या कॉन्ट्रॅक्टवर शेवटचं विवरण देऊ शकतील.
विस्तृत विवरण देण्याकरता कंपनीच्या निर्मात्यांचे प्रतिनिधी निश्चित दिवशी उपस्थित झाले.योगायोगाने जी.बी.आर.नावाच्या प्रतिनिधीचा काही आजारामुळे घसा खराब झाला.जेव्हा कॉन्फरन्समध्ये एक्झिक्युटीव्हसमोर बोलायची माझी वेळ आली तेव्हा नेमके काय झाले हे मिस्टर आर.ने माझ्या क्लासमध्ये सांगितले.ते म्हणाले की,तेव्हा माझा आवाज निघत नव्हता.मी मुश्किलीने हळूहळू बोलू शकत होतो.मला एका खोलीत नेले गेले आणि मी तिथे टेक्सटाइल इंजिनिअर परचेसिंग एजंट,सेल्स डायरेक्टर आणि कंपनीच्या प्रेसिडेंटसमोर उभा राहू शकलो.मी बोलायला उभा राहिलो आणि हिमतीने माझी गोष्ट समोर ठेवण्याचा प्रयत्न केला;पण मी काही शब्दांपेक्षा जास्त बोलू शकलो नाही.ते सगळे लोक एका टेबलाच्या चारी बाजूंनी बसले होते,याकरता मी एका कागदावर लिहिलं माझा घसा खराब आहे,मी बोलू शकत नाही.कंपनीच्या प्रेसिडेंटने सांगितलं तुमच्या बाजूने मी बोलेन आणि त्यांनी बोलणं सुरू केलं.त्यांनी माझे सँपल्स दाखवले आणि त्यांची विशेषता सांगितली.माझ्या प्रॉडक्टच्या गुणवत्तेवर एक इंटरेस्टिंग वादविवाद झाला आणि प्रेसिडेंट माझ्या बदल्यात बोलत होता म्हणून त्याने चर्चेमध्ये माझंच प्रतिनिधित्व केलं.पूर्ण चर्चेत माझा सहभाग फक्त हसणे,डोकं हलवणे आणि चेहऱ्यावर हावभाव दाखवणे इथंपर्यंतच सीमित राहिला.
या अद्भुत मीटिंगमुळे मला कॉन्ट्रॅक्ट मिळाले.पाच लाख गज फॅब्रिक्सची ऑर्डर,ज्याची एकंदर किंमत १६,००,००० डॉलर्स होती.ही आजपर्यंत मिळालेल्या ऑर्डर्समधली माझ्या जीवनातील सगळ्यात मोठी ऑर्डर होती.
मी समजलो की,जर माझा घसा बसला नसता तर माझ्या हातातून कॉन्ट्रॅक्ट निघून गेले असते.याकरता, कारण पुर्ण मामल्याच्या बाबतीत माझे विचारच चुकीचे होते.भाग्यवश मी समजू शकलो की,अनेक वेळा दुसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यात आपल्याला जास्त फायदा मिळतो.
बिझनेसप्रमाणेच कुटुंबातही आपल्याला दुसऱ्यांच्या गोष्टी ऐकल्यामुळे जास्त फायदा मिळतो.आपल्या मुलीबरोबर बार्बरा विल्सनचे संबंध वेगानी बिघडत होते. लॉरी आधी एक चांगली आणि शांत मुलगी होती;परंतु आता ती चिडचिडी आणि टिनएजच्या वयात येऊन बदलली होती.बार्बराने तिला रागवलं,घाबरवलं,धमकावलं,समजवलं;पण कुठलाच फायदा झाला नाही.
मिसेस विल्सनने क्लासमध्ये सांगितलं,एक दिवस मी हार मानली.लॉरीला मी बाहेर जायला मना केलं;पण तिने माझं सांगणं ऐकलं नाही आणि ती घरातलं काम करण्याअगोदर आपल्या मैत्रिणीला भेटायला निघून गेली.जेव्हा ती परत आली तेव्हा मी दहा हजार वेळा तिच्यावर ओरडायला हवं होतं;परंतु माझ्यात रागवण्याची ताकदच नव्हती.मी तिच्याकडे दुःखाने बघितले आणि फक्त इतकच म्हटलं की,असं का वागतेस लॉरी ? लॉरीने माझी परिस्थिती बघितली आणि मला शांत स्वरात म्हणाली की,तुला खरंच जाणून घ्यायचंय ? मी 'हो' म्हणून डोकं हालवलं यानंतर लॉरीने आधी तर घाबरत आपली गोष्ट सुरू केली;पण काही वेळानंतर तिच्या मनातलं सगळं काही बाहेर निघालं.मी तिचं बोलणं कधीच ऐकत नव्हते.जेव्हा ती तिचे विचार आणि भावना मला सांगू इच्छित होती तेव्हा मी तिला आदेश देऊन गप्प करत होते.मला हे जाणवलं की, माझी मुलगी माझ्याकडून एका मित्रत्वाच्या नात्याची अपेक्षा करत होती,
जेव्हा की मी रागवणाऱ्या आईची भूमिका निभावत होते. किशोरावस्थेतले तणाव मी तिच्यासोबत शेअर करावेत,असं तिला वाटत होतं.
मी नेहमी तिच्यासमोर फक्त बोलतच राहत होते,जेव्हा की मला तिची गोष्ट ऐकायला हवी होती.मी तिची गोष्ट ऐकण्याच्या बाबतीत कधी लक्षच दिलं नाही.त्या दिवसानंतर मी तिचं बोलणं ऐकणं सुरू केलं.आता ती मला सांगून टाकते की,तिच्या डोक्यात काय चाललं आहे आणि आता आमचे संबंध खूप चांगले आहेत. आता तिच्यात सुधारणा झाली आहे.
मित्र जोडा आणि प्रभावशाली बना,डेल कार्नेगी,मंजुल प्रकाशन..
न्यू यॉर्कच्या एका पेपरमध्ये फायनान्शियल पानावर एक मोठी जाहिरात छापली.ज्यात नोकरीकरता खूपच योग्य व अनुभवी उमेदवार हवा होता.चार्ल्स टी.क्यूबेलिसने दिल्या गेलेल्या बॉक्स नं.वर आवेदन पाठवून दिलं. काही दिवसांनंतर त्याला इंटरव्ह्यूला बोलवलं गेलं. जाण्याच्या आधी त्या कंपनी आणि तिथल्या मालकाच्या बाबतीत वॉल स्ट्रीटकडून जेवढी शक्य होती,तेवढी माहिती मिळवायचा प्रयत्न केला.इंटरव्ह्यूच्या वेळी त्याने म्हटलं की,तुमच्या कंपनीचा रेकॉर्ड इतका चांगला आहे की,इथे काम करणे मला अभिमानास्पद वाटेल. मला वाटतं की,२८ वर्ष आधी तुम्ही फक्त एक डेस्क रूम आणि एक स्टेनोग्राफरच्या बरोबर बिझनेस सुरू केला होता.काय हे खरं आहे?
प्रत्येक यशस्वी व्यक्तीला आपल्या सुरुवातीच्या केलेल्या संघर्षाबाबत बोलायला खूप आवडतं.ही व्यक्तीपण याचा अपवाद नव्हती.त्यांनी खूप वेळपर्यंत आपली गोष्ट सांगितली की,कोणत्या प्रकारे ४५० डॉलर्स आणि एका स्वप्नाबरोबर त्यांनी आपल्या व्यवसायाचा प्रवास सुरू केला.त्यांनी सांगितलं की,टीका,टर आणि निराशेच्या नंतरही त्यांनी आपली हिंमत हरली नाही. सुरुवाती-सुरुवातीला तर त्यांना एका दिवसात सोळा तासांपर्यंत काम करावं लागत होतं आणि ते रविवार आणि सुट्टीच्या दिवसांमध्ये पण काम करत होते.
राहिलेला शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…!