* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

३/७/२५

काम हीच देणगी \ Work is a gift

थोड्याच वेळात आम्ही विमानतळाच्या खालच्या मजल्यावर आलो.जेसनने सगळे सामान बाजूला काढले होते.गस् पुढे गेला,पार्किंग केलेला त्याचा डीलक्स पिक-अप ट्रक आणून त्याने दारात आमच्यापुढे उभा केला.असलं वाहन बोस्टनमध्ये क्वचितच बघायला मिळतं.मी आणि मागरिटसाठी त्याने दार उघडले.आणि जेसनकडे वळून म्हणाला, 


"नुसता उभा नको राहूस.त्या बॅगा चढव ट्रकमध्ये."


जेसनने सगळे सामान ट्रकच्या मागच्या भागात चढवलं आणि संकोचून विचारलं,"मी कुठे बसू ?"


गस् म्हणाला,"बस तिकडेच मागे.नाहीतर ये चालत. मला काही फरक पडत नाही."


गस् वर चढला आणि ट्रक चालवू लागला.जेसन मागच्या भागात सामानामध्ये अवघडून बसला. गस्ने जोरात ट्रक सुरू केला.त्याचे गचके त्याला बसत होते.


गस् त्याच्या विस्तीर्ण पसरलेल्या रँचकडे चालला होता.आम्ही रेडच्या आठवणी काढत होतो. जेसनबाबत रेड जी भरपाई करू बघत होता त्याविषयी मदत करण्याची तयारी बोलून दाखवत होतो.पुढचे चार आठवडे गस् जेसनला कामाची नीती शिकवणार होता.आम्ही दुसऱ्या दिवशीच ऑस्टिनला जायला निघणार होतो.दुसऱ्या एका अशिलाचे काम आम्हाला करायचे होते.


संपतो की नाही,असं वाटायला लागलेला खडबडीत रस्ता एकदाचा संपून आम्ही वळण घेतले.काही अंतर गेल्यावर पाटी होती,गस् कॉल्डवेल यांचे रँच. मित्रांचे स्वागत आहे.

अवैध प्रवेश करणाऱ्यांना गोळी घालण्यात येईल.


त्याचे कामगार आणि खूप सारी कुत्री होती.गस्ने मी आणि मागरिटला आरामशीर घराकडे नेले.मागे वळून जेसनला ओरडून म्हणाला,"नुसता ट्रकमध्ये बसू नकोस.सामान घे खाली." कॉल्डवेल-रँचमधे दुसरा दिवस सकाळी लवकर सुरू होईल असं मला आणि मागरिटला गस्ने सांगितले.जेसनला जरा दमात घ्यायचं,त्याने ठरवले होते.


दुसऱ्या दिवशी सकाळी मी,मागरिट आणि कॉल्डवेलच्या सर्व कुटुंबियांनी सहाच्या आधीच दणदणीत नाश्ता केला.आम्ही कॉफीचा दुसरा कप घेत होतो तेव्हा गस् म्हणाला,"मी जाऊन

त्या निद्रासुंदरीला घेऊन येतो.आजचा दिवस मजेदार जाईल,

खरोखरी शिकवणीचा.तुम्हाला कळलं ना मला काय म्हणायचं आहे ते!"


गस् जिना चढतानाचा आवाज ऐकला आम्ही.त्याने धाडकन जेसनच्या खोलीचा दरवाजा उघडल्याचा आवाजही ऐकला.

मोठ्या आवाजात तो ओरडला, "काय रे गड्या,जिवंत आहेस ना ? इथं दिवसभर झोपून रहतोयस ? चल उठ,कपडे कर अन् ये खाली."


छान कडक कॉफीचा स्वाद घेत आमच्या गप्पा चालल्या होत्या.तेवढ्यात गस् येऊन बसला. पाठोपाठ काही वेळातच झोपाळलेला जेसनही आला.टेबलाशी येऊन तो बसला न बसला तोच गस् उभा राहून म्हणाला,"मस्त झाला नाश्ता.चला कामाची वेळ झाली."


जेसनने त्याच्याकडे डोळे विस्फारून पाहिले.आणि तो भांडखोर स्वरात म्हणाला, "मला मिळेल का नाश्ता ?"


गस् जरासा हसला अन् म्हणाला,"उद्या सकाळी प्रथम सकाळी सकाळी गस् कॉल्डवेलच्या घरातून भुकेल्या अवस्थेत कोणी कधी बाहेर पडत नाही. पण दिवसभर कोणी झोपून राहिलं तर मी काहीच करू शकत नाही."


खिडकीतून बाहेर बघत जेसन म्हणाला,"अजून उजाडलंही नाहीये."


गस्ने गालात जीभ फिरवली आणि म्हणाला,"छान निरीक्षण आहे तुझं.मला वाटलं मला प्रत्येक गोष्ट शिकवायला लागते की काय ? त्या कोठीच्या खोलीकडे जा अन् तुला तिथे कामावर जाताना घालायचे कपडे मिळतात का बघ.तुझ्या अंगावरचे हे कपडे त्यासाठी अगदी अयोग्य आहेत. आपल्याला पाच मिनिटात निघायचं आहे."


जेसनला त्याच्या कामाच्या ठिकाणी सोडून मी आणि मागरिट यांना ऑस्टिनला जाण्यासाठी घेऊन जायचे गस्ने कबूल केले.आम्ही ऑस्टिनला जाण्यापूर्वी जेसनने कामाला सुरूवात केल्याचं आम्ही बघणार होतो.आम्ही ट्रकच्या पुढच्या भागात बसेपर्यन्त जेसन धावतच खोलीकडून आला आणि सहजपणे मागील भागात जाऊन बसला.तो बसतो न बसतो तोच गस्ने जोरात ट्रक चालू करून, फाटकाबाहेर पडून,एका मैदानातून जाऊन मग थांबवला.सूर्य उगवत होता तेव्हा गस् रँचच्या दूरच्या एका कोपऱ्यात गेला.तिथे कुंपणाला लावण्याच्या खांबांचा एक मोठा ढीग जमिनीवर पडला होता. गस्ने ट्रकमधून खाली उडी मारली आणि मोठ्याने म्हणाला,"अरे ए,त्या बिछान्याबाहेर पड.असा मिळेल तिथे पडून रहाणारा कोणी मी याआधी पाहिला नाही."


गस् आणि जेसनच्या मागे मी आणि मागरिट चालायला लागलो.दृष्टीच्या टप्प्यात खूप दूरवर शेवटच्या खांबाच्या जागेपर्यन्त गेलो.गस् अभिमानाने सांगत होता,"कुंपणाचा हा 101 वा खांब.तुमचं स्वागत असो." चटकन् त्याने खांबासाठी खड्डा कसा खणायचा,खांब कसा रोवायचा आणि तार कशी खेचून घ्यायची याचं प्रात्यक्षित जेसनला दाखविले.


पंचाहत्तरीतही त्याची ताकद व जोम विश्वास बसणार नाही असा होता. सगळ्या गोष्टी कशा सहज आहेत हे त्यामुळे दिसत होते.जेसनकडे बघून तो म्हणाला,"तू कर बरं आता प्रयत्न.

ट्रकजवळ मी आणि मागरिटच्या जवळ येऊन तो उभा राहिला.


जेसन कसाबसा धडपडत कामाला लागला.त्याच्या हालचाली गंमतीदार दिसत होत्या."एक तर हे करण्याचं तुला हळू हळू जमेल;नाहीतर तू धडपडत बसशील.दुपारच्या जेवणासाठी कोणीतरी येईल आणि तुला घेऊन जाईल."


घाबरून जेसन ओरडला,"किती लांब आहे हे कुंपण ?" मला आणि मागरिटला ट्रकमध्ये चढताना हात देत गस् म्हणाला,

"फार तर मैलभर.मग आपण दुसऱ्या दिशेने करायचं काम.

काळजी करू नको. भरपूर काम आहे तुला करायला.

ककुंपणाच्या एकेका खांबासाठी जर का एकेक डॉलर मिळाला असता तर मी आणि त्या भल्या रेड स्टीव्हन्सने सर्व टेक्ससभर खणलं असतं."


जेसनला कामावर सोडून आम्ही निघालो.


जवळजवळ चार आठवड्यांनी मी आणि मागरिट आमचं काम यशस्वीपणे करून ऑस्टीनमधल्या टेक्सस या राजधानीच्या गावाहून परतलो.पुन्हा गस्नं आमचं विमानतळावर स्वागत केलं,दोन तासाच्या त्या रँचपर्यंत पोचण्याच्या प्रवासात न राहवून मी विचारलं,"कसं चाललंय जेसनचं ?"


गस् गालात जीभ फिरवून म्हणाला,"मला खात्री वाटत नव्हती,तो पार पाडेल अशी.दमवणारं ऊन, किडे,उन्हाळी गळवं,घामोळं यामुळे ते सोपं नव्हतच.पण तुम्हाला सुखद धक्का मिळणार आहे."


रँचवर पोचताच जेसन पहिल्या दिवशी कामाला लागला तिकडेच गस्ने आम्हाला नेले.मी पाहिले, कुंपण खूप दूरवर घातलं गेलं होतं.आणि जेसन दिसत नव्हता.आणखी दूरवर गस्ने आम्हाला नेले. थोडं चढून गेल्यावर दूरवर जेसन दिसला मला.आश्चर्यकारक बदल झाला होता त्याच्यात.उन्हामुळे तो रापला होता,कष्ट करून हटकला होता.आणि आम्ही येईपर्यन्त कामात व्यवस्थित दंग होता. आम्ही ट्रकमधून उतरताच हात उंचावून आमच्याकडे आला.


मी विचारलं,"हे सगळे खड्डे खणून त्यात खांब तू रोवलेस की काय ?"


बोलताना त्याच्या डोळ्यात चमक होती."हो,मीच प्रत्येक खांब रोवलाय.आणि एका सरळ रांगेत आहेत ते."


जेसनच्या खांद्यावर हात ठेवून गस् म्हणाला,"तू करशील की नाही असं वाटत होतं,पण तू मस्तच काम केलंस.साठ एक वर्षांपूर्वीच मला आणि रेडला कळलं की अशा प्रकारचं काम उत्तम दर्जाचं आणि अभिमानास्पद केलं तर तुम्ही नंतरच्या आयुष्यात काहीपण करू शकता.मला वाटतं तू हा धडा शिकलास.आता तू बोस्टनला परतू शकतोस."


जेसन उत्तरला,"हा टप्पा संपवायला थोडंच काम उरलंय.उद्या सकाळी निघालं तर ?" मला या उत्तराने धक्काच बसला.


दुसऱ्या दिवशी नाश्ता झाल्यावर गस्ने आम्हाला विमानतळावर सोडले.जेसनने कर्तव्यदक्षतेने सामान पोर्चपर्यन्त आणून ठेवले.पण यावेळी गस्ने ट्रक ऐवजी नवी कॅडिलॅक बाहेर काढली होती.


जेसनने हसून विचारले,"मिस्टर कॉल्डवेल,ट्रक कुठाय तुमचा ?"


गसूने हसून उत्तर दिले,"माझ्या एका उत्तम कामगाराला सामानाच्या ट्रकमधून नेववणार नाही मला.चला निघूया विमानतळाकडे.


तीस हजार फूट उंचीवरून,अमेरिकेच्या मध्य भागावरून आम्ही उडत होतो.रेड स्टीव्हन्सने जेसनला कष्टाबाबत जो धडा शिकवला ते विचार मनात घोळत होते.हा धडा माझ्या मनावर ठसला तसाच जेसनच्या मनावरही ठसू दे म्हणजे झालं.


०१.०७.२५ या लेखातील दुसरा भाग…


१/७/२५

काम हीच देणगी \ Work is a gift

आस्थेने काम करणाऱ्याला कष्ट जाणवत नाहीत.


मी कबूल करतो की पुढचे आठवडे माझे मन उत्सुक आणि अस्वस्थ होते.पण पुढच्या महिन्याची पहिली तारीख आली आणि सर्व संपले. 


ऑफीसमध्ये बसून मी इतर कामे करीत बसलो होतो.त्यात मन रमवण्याचा प्रयत्न करत होतो.पण मनाच्या कोपऱ्यात जेसन स्टीव्हन्स थोड्याच वेळात यायचा आहे हे वाटत होतं.


शेवटी फोन खणखणला आणि जेसन स्टीव्हन्स कॉन्फरन्स रूममध्ये बसला आहे ही बातमी मिस हेस्टिंग्जने सांगितली.

मी जरूर त्या फायली घेतल्या आणि कपाटातला रेड स्टीव्हन्सचा तो खोका मिस मागरिटने काढला.आम्ही दोघे कॉन्फरन्स रूममध्ये गेलो,तो तिथे टेबलावर पाय ठेऊन खुर्चीत रेलून जेसन बसला होता.मी खोलीत पलिकडे गेलो आणि टेबलावरचा तो खोका मिस् मागरिटच्या दिशेने असा जोरात सरकवला की मध्ये आलेल्या जेसनच्या पायावर तो आदळला आणि त्याचे पाय आपोआप कॉन्फरन्स टेबलावरून खाली गेले.


मी म्हणालो, "गुड मॉर्निंग जेसन,अरे खुर्ची मिळवून तू छान बसला आहेस.फर्निचरचा नीट वापर कसा करायचा ते काही जणांना नीट कळतच नाही."


माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून त्रासिक नजरेने माझ्याकडे बघत तो म्हणाला, "सरळ इथल्या कामाला सुरूवात करू या ना ? मला खूप कामे पडली आहेत.खूप लोकांना भेटायचे आहे."


मी मोठ्याने हसून म्हटलं, "अरे, तुला कामं पडली आहेत आणि लोकांना भेटायचं आहे असा माझा अंदाज आहेच.पण तुला वाटतं तसंच ते काही नसेलही."


मी दुसरी टेप काढून मागरिटजवळ दिली.व्हिडिओ प्लेअरमध्ये ठेवून तिने प्लेअर सुरु केला.क्षणभरातच त्या मोठ्या पडद्यावर रेड स्टीव्हन्सची छबी दिसायला लागली. तो म्हणाला, "गुड मॉर्निंग टेड अन् मिस हेस्टिंग्ज, हे जरा कंटाळवाणं काम स्वीकारल्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो,आणि जेसन,मी पुन्हा एकदा तुला नियमांची आठवण करून देतो.पुढील वर्षात ठरलेल्या वेळी समजा कधी तू आला नाहीस किंवा तुझं वागणं मिस्टर हॅमिल्टनला खटकलं तर तो हा सगळा खटाटोप थांबवून टाकील आणि तुला माझ्या सर्वोत्तम देणगीला मुकावं लागेल."


"मी तुला मिस्टर हॅमिल्टनबाबत सावध करतो.तो शांत,खूप सहनशील असलेला दिसतो खरा,पण तू त्याला फार जर ताणलस,त्याचा अंत पाहिलास तर मात्र आपण पिंजऱ्यातून एक गुरकावणारा वाघ बाहेर काढलाय समज."


गोंधळलेल्या नजरेने जेसनने माझ्याकडे पाहिले.मी शांत नजरेने त्याच्याकडे पाहिले.


रेड जरासा थांबला.गतकाळातल्या आठवणी त्याला येत होत्या.पुढे तो म्हणाला, "जेसन, मी तुझ्याहून बराच लहान होतो तेव्हा एक साधा दोन अक्षरी शब्द 'काम' यापासून मिळणारं समाधान मी शिकलो होतो.माझ्या विशाल संपत्तीमुळे तू आणि सगळे कुटुंबीय एका आनंदाला मुकले आहेत. दिवसभर घाम गळेपर्यन्त काम करण्यात केवढीतरी मजा असते."


खोल उच्छ्वास टाकत गरागरा डोळे फिरवणारा जेसन मी बघत होतो.


रेडचं बोलणं चालू होतं. "तू खोलात जाण्याअगोदर मी जे सांगणार आहे ते तू धिक्कारण्याआधी मला तुला सांगायचंय की माझ्याकडे जे सर्व आहे किंवा तुझ्या कडे जे जे आहे ते सर्व मी कष्ट करून मिळवलं आहे.हे तू पक्क लक्षात ठेव.तुमच्या जवळ जे जे आहे ती तुमची कमाई हे तुम्हाला अज्ञात ठेवून तुमचा आनंद हिरावून घेतलाय मी. मी त्यासाठी दिलगीर आहे."


"लुइझियाना,तो दलदलीचा प्रदेश,माझ्या तेथील अगदी सुरवातीच्या आठवणी म्हणजे केलेले काबाडकष्ट.त्या लहान वयात कंबरडं मोडेपर्यन्त करावे लागणारे कष्ट अगदी नको वाटत.माझ्या आईवडिलांना खूप माणसांना जेवू-खाऊ घालावं लागायचं आणि उत्पन्न तर तुटपुंज.मग आम्हाला खायला हवं,तर काम करणं आलंच.मी नंतर टेक्ससला आलो.


आणि स्वावलंबी झालो.तेव्हा लक्षात आलं की मेहनत करणं माझ्या अंगात मुरलंय.आणि उर्वरित आयुष्यात मी त्यातून आनंदच घेऊ लागलो."


"जेसन,जगात मिळण्यासारख्या सगळ्या उत्तम गोष्टी तुला मिळाल्या आहेत.सगळीकडे हिंडलास, सर्व काही बघितलंस,सगळ्या गोष्टी करायला मिळाल्या तुला.एक गोष्ट नाही मिळाली तुला. 


आपल्या कष्टांनी या गोष्टी मिळवण्यातला आनंद नाही मिळाला तुला. तुला फुरसद मिळते ती कष्टाचं फळं म्हणून,काम टाळण्याचा मार्ग म्हणून नव्हे."


"मिस्टर हॅमिल्टन आणि मिस् मागरिट यांच्याबरोबर उद्या सकाळी तुला एका छोट्या प्रवासाला जायचंय.

अल्पाईन,टेक्ससच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या रँचवर माझा एक जुना मित्र रहातो. त्याला तू भेटायचं आहे.मंदीच्या काळात,माझ्या तरूणपणी जिवंत रहाण्यासाठी झगडावं लागत होतं,तेव्हा मला गस् कॉल्डवेल भेटला.तेव्हा आम्हाला दाबून काम करण्यातली ताकद म्हणजे काय ते समजलं. हा धडा तुला शिकवायला त्याच्या सारखा दुसरा कोणी नाही."


"मी आधीच गस कॉल्डवेलला एक पत्र लिहून परिस्थिती कशी आहे ते कळवलं आहे.मिस्टर हॅमिल्टनने ते पत्र अल्पाईन,टेक्ससला पाठवून दिलं आहे.गस् कॉल्डवेल तुझी वाट पहात असेल."


"नीट लक्षात ठेव.केव्हाही माझ्या मृत्युपत्रात दर्शवल्याप्रमाणे तू वागला नाहीस किंवा तुझ्या वर्तनामुळे मिस्टर हॅमिल्टन दुखावला गेला तर ही सारी धडपड लगेच थांबवली जाईल.आणि तू सर्वोत्तम देणगीला मुकशील."


पडदा अंधारला.


"हे हास्यास्पद आहे." जेसन रागाने माझ्यावर खेकसला.मी हसून म्हटलं,"तुझ्याशी वागणं तसं त्रासदायकच आहे.पण रेड स्टीव्हन्ससारख्या मित्राखातर अशा काही गोष्टी कराव्या लागतात. सकाळी पावणेसात वाजता मी तुला विमानतळावर भेटतो."


जेसनने माझ्याकडे अशा नजरेने बघितले की मी जणू मंदबुद्धि माणूस असावा.तो म्हणाला, "नंतरच्या वेळेत नाहीत का उड्डाणं ?"


मला वाटलं होतं त्यापेक्षा मी शांतपणे उत्तरलो, "हो. आहेत ना.पण मिस्टर कॉल्डवेलला वेळ घालवण मुळीच आवडत नाही,कळेलंच नंतर तुला ते.तर मग भेट्या उद्या."


जेसन ऑफिसमधून गेला आणि मिस् मागरिटने जरूर ती व्यवस्था केली.


दुसऱ्या दिवशी सकाळी विमानतळावरचा सेवक दारं बंद करण्याच्या बेतात होता झोपाळलेल्या अवस्थेतला जेसन स्टीव्हन्स प्रवाशांच्या चौकातून दौडत आला.मागरित सेवकाला तिकिटे दिली आणि आम्ही विमानात बसलो.


विमानात पहिल्या वर्गाच्या पहिल्या दोन सीट्स मी आणि मागरिट यांच्या होत्या.आम्ही तिथे जाऊन बसलो.जेसन गोधळून उभा होता,कारण पहिल्या वर्गात आता रिकामी नव्हती.


माझ्याकडे पाहून तो म्हणाला,"मला कुठंय जागा ?"


त्याच्या या प्रश्नाला मागरिटने तिच्या खास कमावलेल्या शैलीत उत्तर दिले.मला ठाऊक होतं तसं करताना तिची सारखी करमणूक होत होती.ती म्हणाली, "मिस्टर स्टीव्हन्स तुम्हाला सीट नं. एफ् 23 मिळाली आहे."


जेसनला तिने तिकिटाचा फाडलेला भाग दिला. पाय आपटत तो साध्या वर्गात जाऊन बसला.


मिडलँड-ओडेसा विमानतळावर आम्ही विमानातून बाहेर पडलो.आम्हाला न्यायला गस् कॉल्डवेल आला होताच.रेड स्टीव्हन्सचा मित्र आणि सहचर म्हणून मी गेल्या काही वर्षांपासून त्याला ओळखत होतो.आम्हा दोघांचा जिवलग मित्र समान असल्यामुळे दोघांना एकमेकांबद्दल जिव्हाळा वाटत होता.हस्तांदोलन करताना त्याने माझा हात असा छान दाबला की त्याचे वय जणू पस्तीस वर्षांचे होते. तो तर पंचाहत्तरीचा आहे हे मला माहीत होते. मागरिटला त्याने विनम्र अभिवादन केले. पण जेसनच्या बाबत मात्र तो जरा करडाच वागला.


जेसनला तो म्हणाला, 'रेड स्टीव्हन्स मी बघितलेल्यात सर्वात मस्त माणूस होता. तु कसं काय निभावून नेणार आहेत कोण जाणे ?"


जेसन त्याच्या या भावनाशून्य स्वागताला काही उद्धट उत्तर देण्याच्या आत गस् त्याला ओरडला, "अरे,तिकडे खाली जाऊन सामान का शोधून काढत नाहीस ? जरा उपयोग होऊ दे की तुझा." ( सर्वोत्तम देणगी,जिम स्टोव्हॅल )


शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…

२९/६/२५

कथा सापाच्या आवाजाची The story of the snake's voice

हात,पाय किंवा इतर कुठला असा चालता येण्यासारखा अवयव नसतानाही ज्याला चालता येते असा साप हा एकमेव प्राणी आहे.

आपले डोके उभे करून जलद गतीने जमिनीवरून चालणारा साप कुणी पाहिलाय ? त्याच्या गतीतले तेजस्वी सौंदर्य कुणी न्याहाळलंय ? कुठंही हिसका नाही.पाण्यातील माशाला गतीतली विविधता नाही.डौलदार वळण,सुबक आकार,रमणीय सौंदर्य,

तेजस्वी डोळ्यांतील भेदकता,अन्नावाचून दीर्घकाळ राहणारा,कात टाकून पुनःपुन्हा तरुण होणारा, अशी एक ना अनेक गूढे असलेला साप आजच्या विज्ञानयुगात जिज्ञासेचा विषय वाटतो.वाघ-सुसरीची वाटत नाही इतकी भीती माणसाला सापाची वाटते. त्यातल्या काही जातींना जालीम विषांची देणगी मिळाली आहे.त्यांचा दंश कित्येकदा इतका दाहक असतो की माणूस तडफडून मृत्यू पावतो.म्हणूनच त्याला काळसर्प म्हटले आहे.


अशा त्याच्या अलौकिक गुणधर्मामुळे आदिमानवाने त्याला देवळात बसवून देव मानले तर त्यात आश्चर्य नाही.त्याला पूज्य मानण्याची प्रथा जगातील अनेक देशांत अजूनही अस्तित्वात आहे.चरक, सुश्रुत व वाग्भट संहिता या वैद्यकीय ग्रंथांत सापाचे प्रकार सांगून सर्पदंशावर उपाय सांगितले आहेत.विषाची परीक्षा पाहू नये म्हणतात.


त्याकरिता वाग्भटाने सल्ला दिला आहे,'ज्या ठिकाणी सर्वांची भीती असेल त्या ठिकाणी फिरताना दिवसा छत्री व विशेष करून रात्रीच्या वेळी हातात खुळखुळा व काठी बाळगावी.छत्रीच्या सावलीने व काठीच्या आवाजाने साप भिऊन पळून जातात.' संस्कृत कोषवाङ्मयात सापांविषयी विपुल माहिती आहे. अभिधानचिंतामणी कोषात सापाच्या वीस नावांचा उल्लेख आहे.

त्याचे एक नाव पवनाशन- म्हणजे हवेवर जगणारा असे आहे.त्याच्या अवयवांचा परिचय करून देताना नागाला दृष्टिविष असल्याचा लक्षणीय उल्लेख आहे.कुक्कुटारी सर्पाचा रंग कोंबड्याच्या वर्णासारखा असून तो कुक्कुटासारखाच स्वर काढत असल्याचा निर्देश महत्त्वपूर्ण आहे.भविष्य पुराणातील अध्याय ३३ म्हणजे सर्पसंहिताच आहे.त्यात सर्पाचे अनेक प्रकार सांगून त्याची रानओळख,वितरण व सवयी-आचरणाविषयी माहिती दिली आहे.

त्याच्या विणीविषयी दिलेली माहिती तर अभूतपूर्व म्हणावी लागेल.

सर्पज्ञांनी कश्यप ऋषीचा ठिकठिकाणी संदर्भ दिला आहे.ऋषी कश्यपाचा उल्लेख महाभारतातही आला आहे.त्याने कद्रू व विनता ह्या दोघी बहिणींशी विवाह केला.कद्रूने सर्वांना जन्म दिला तर विनतानं गरुडांना जन्म दिला.


 मानववंश आणि दैवत कथांचा विलक्षण मेळ घालण्यात व्यासांची प्रतिभाच दिसून येते.पण अभिधानचिंतामणी कोष वगळता सर्पाच्या आवाजाचा उल्लेख कुठेही आढळत नाही.


तीच स्थिती कर्नल खंडेराव घारपुरे व विष्णु गोविंद चिपळोणकर यांच्या सर्पावरील मराठी ग्रंथांतून आढळून येते.चिपळोणकरांचा 'हिंदुस्थानातील सर्प' हा ग्रंथ तर एका शतकापूर्वी लिहिला गेलेला.मराठीतून इतका शास्त्रशुद्ध ग्रंथ माझ्या वाचण्यात नाही.


देवाच्या अस्तित्वाविषयी जेवढे गुढ आहे.तेवढेच सापाच्या आवाजाविषयी आहे आधुनिक सर्पतज्ञांचे मत असे की सापाला स्वरतंतूच नसतात तर आवाज कुठून येणार? हा भ्रमाचा भोपळा पडला तो नवेगावबांधचे माधवराव पाटील आणि गांधारी जवळ राहणाऱ्या निरगूने कितीतरी वेळा सापाचा आवाज जंगलात ऐकला होता.सापाच्या आवाजाची ओळख पाटील निरगूकडून शिकले.त्याचे प्रत्यंतर एकदा पाटलांबरोबर चळ्याकाठाने भटकत असताना आले.


सूर्य मावळतीकडे झुकला होता.आभाळ गर्जू लागलेले. विजा चमकू लागलेल्या आणि टर्रर्रर्र आवाज येऊ लागला.गावातल्या चिंचेच्या झाडावरच्च्या घरट्याकडे आभाळातून जाणारे बगळे-ढोकरी क्षणभर उडायचे थांबले.पडारीतून बागडणारी चिमणी पाखरे एकाएकी शांत झाली.तशीच तुऱ्यांना चिकटून राहिली.एखाद्या चिनी चित्रातल्या पाखरासारखी. जंगलात चीचिर ची करीत ओरडणारा तित्तिरही गप्प झाला.


"सायब, ऐकलं काय ?"


"काय ?"


"टवऱ्या मुहाडोर सापाचा आवाज." मला वाटले होते की हा येणारा आवाज लावा पक्ष्याचा असावा.पण तो होता सापाचा.साप एवढ्या मोठ्याने ओरडू शकतो यावर माझा विश्वासच बसला नसता.पण पाटील मोठे सर्पज्ञानी आहेत.


कल्याणचे श्री. लालू दुर्वे महाराष्ट्र व मध्य प्रदेशातल्या घनदाट जंगलातून शिकारीच्या निमित्ताने गेली तीन तपे फिरत आहेत.त्यांना मी एकदा सहज सापाच्या आवाजाविषयी विचारले,तेव्हा त्यांनी सांगितले... "१९४७ च्या सुमारास हिसव हाल स्टेशनपासून १५ मैलांवर हरणाच्या शिकारीसाठी गेलो होतो.हरणाच्या शोधात फिरता फिरता दूर कुठून तरी कवड्याच्या ओरडण्याचा आवाज आला.आमच्याबरोबर जो जाणता भिल्ल होता तो म्हणाला, 'तिकडं जाऊ नका. ते किडं... म्हणजे साप ओरडत फिरतंय.ते फार खतरनाक आहे.'


परवा गरुड-घुबडाच्या शोधात नाशिकजवळच्या पेठला गेलो होतो.तेथे आवरी गुरुजींची योगायोगाने भेट झाली. हा ५०-६० वर्षांचा जंगलात राहणारा निसर्गज्ञानी.ह्या कोकणी गृहस्थाने सापाविषयी अगदी बारीकसारीक माहिती गोळा केली आहे.बोलण्याच्या ओघात सर्पाच्या आवाजाचा विषय निघाला. मी विचारलं-


"गुरुजी, तुम्ही कधी सापाचा आवाज ऐकलात काय ?"


"होय."


"कधी, कुठं ऐकायला मिळाला तो आवाज ? कसा असतो ?"


"सांगतो साहेब,आता या गोष्टीला १५-१६ वर्षं झालीत. पेठजवळ ४-५ किलोमीटर अंतरावर जुनोठी गाव आहे. मी तिथलाच.गाव तसं लहानच.गावाबाहेर मारुतीचं देऊळ. तिथं मी रोज सांज वेळी दिवा लावायला जात असे.त्या दिवशी मी दिवा लावून घरी येत होतो.वाटेत पडीक जागा आहे.तिथं वीतभर गवत उगवलेल. इतक्यात चिव चिव असा कोंबडीच्या पिलासारखा आवाज कानी पडला.मला वाटलं अशा सांज पारी इथं कोंबडीचा आवाज कसा ? एखादं पिलू चुकून मागं तर राहिलं नाही ? पुन्हा तर्क केला की अशा वेळी गावाबाहेर कुठलं पिलू असणार ! मला आठवण झाली ती माझे मामा अर्जुन भोये व चुलता लक्ष्मण आवारी यांची.

त्यांच्या बोलण्यात मी ऐकलं होतं की सापदेखील असाचा आवाज काढतो.खात्री करावी म्हणून मी जरा सावधगिरीनं तिथं उभा राहिलो.आभाळात अष्टमीचा चंद्र डोक्यावर होता.आभाळ अगदी स्वच्छ.चंद्राचा प्रकाश तिथल्या उंच विरळ गवतावर पडला होता.

त्यातून चिव चिव आवाज आता दुसऱ्याच ठिकाणाहून येत होता. समोर गवत हालत होतं.नागमोडी.आणि थोड्यावेळानं साप चांदण्यातून जाताना चमकला. थांबून थांबून तो आवाज कानी पडत होता.तो नागच होता.उंच फणा काढून तो जाताना दिसला.विषाची परीक्षा पाहणं नको म्हणून मी तिथून गावाकडं पळ काढला.


"आणि दुसरा प्रसंग त्याच वर्षातला.गावाला लागून जंगल.एक दोन फर्लांगावर. पहाटे मी जंगलात गुरं चारायला नेली.तसं आजूबाजूला दिसण्याइतकं चांदणं पडलं होतं.इतक्यात गांजी लावाचा आवाज कानी पडला.गांजी लावा रानात हालचाल झाली की एकमेकांना चिक् चिक् आवाजानं साद घालतात. इतक्यात एक लावा त्या आवाजाच्या दिशेनं माझ्या डोक्यावरून उडत गेली.

आणि तिथं जाऊन हळूच विसावली.पण ती तशीच भडकून-चमकून दुसऱ्या दिशेनं उडाली.तेव्हा मला विशेष वाटलं नाही.पण दुसऱ्याच दिशेनं आणखी एक लावा तिथं जाऊन धडकली.तोच ती भडकून उडाली.मी त्या ठिकाणी डोळ्यात जीव आणून पाहात होतो.त्या ठिकाणची गवताची पाती एखादा सर्प जाताना हालतात तशी नागमोडी हालत होती.तो सर्पच होता.गावचा गुराखी त्रिंबक रावजी राऊत असे प्रसंग व आवाज दिवसा उजेडी आणि रात्रीही पाहिल्या-ऐकल्याचं सांगायचा.तो म्हणायचा, 'साप गांजी लावाचा हुबेहूब आवाज काढून-फसवून त्यांना जवळ बोलावतो.नजीक येताच तिला दंश करून पकडतो.'


"आणखी एक असाच प्रसंग आठवतो." ते सांगू लागले. "नाशिकजवळच्या हरसूळजवळ ठाणेपाडा इथं माझा दोस्त रामा रावजी सापटे राहातो. तिन्ही-त्रिकाळ जंगलात भटकणारा हा वारनी पला गुरुस्था अरण्य विद्या मी त्याच्याकडूनच शिकलो.

एकदा तो व मी जवळच रायत्याला राहणारा आमचा मित्र किसन जानू गवळी याच्याकडे मुक्कामाला गेलो.रात्री बराच वेळ गप्पा मारल्या.शिकार,भुतंखेतं,जादूटोणा,मंत्र-तंत्र, करणी,भानामती अशा एक ना अनेक विषयांवर गप्पा रंगात आल्या होत्या.तोच रामा सपाटे म्हणाला, 'ऐका तर काय आरडतंय!' आम्ही लक्षपूर्वक ऐकत होतो. तसा आवाज आम्ही जंगलात-रानावनात भटकताना अनेक वेळा ऐकला होता.त्यामुळे आम्हाला नवल वाटले नाही. मी विचारले, 'डरगा लाहुरी ओरडतंय नव्हं!'


"ना, तो आवाज सापाचा आहे.डरगा लाहुरी कधी रातीची बोंबलत नाही.तिचा आवाज लांब तर सापाचा आवाज तीक्ष्ण असतो." अशी त्याने दोहोंच्या आवाजातली ओळखण सांगितली.


"साप केवळ कोंबडी किंवा लाहुरी पक्ष्यासारखं ओरडतात असं नव्हे तर ते जनावरांसारखेदेखील आवाज काढताना मी ऐकलंय." गुरुजी पुढे सांगत होते.


"ते कसं?" मी.


"त्या वेळी मी गुजरातमधील धरमपूर येथे होतो. धरमपूर पेठपासून ७०-८० कि. मी. अंतरावर आहे. आता या गोष्टीला तीन तपं झाली.पूर्वी ह्या रस्त्यानं दिवसा जायलादेखील भीती वाटे इतकी किर्र झाडी होती.आता एखाददुसरी वस्ती तरी दिसतेय.त्या काळात वाटेत माणूसदेखील भेटायचं मुष्कील.त्यावेळी मी डांग सेवा मंडळाचा कार्यकर्ता होतो. एकदा जवळच असलेल्या मारवाड गावात गेलो. सोनू नायक व चित्ता नायक या वारल्यांच्या घरी मुक्कामाला होतो. गावाभोवती घनदाट जंगल.रात्रीची जेवणं झाली. मी पथारी पसरून अंग टाकलं.

दिवसभराच्या श्रमामुळं मला लगेच झोप लागली.रात्री मध्येच झोप चाळवली. जंगलातून दुरून बकरी ओरडते तसा बे ऽ बे ऽऽ असा आवाज कानी पडला.मी जवळच झोपलेल्या चित्ता नायकाला जागं केलं. त्यानं विचारलं, 'गुरुजी झोप येत नाही काय ?'


"अरे चित्ता, रानात कवापासून बकरी आरडतीय.वाघानं तर गाठली नसेल ?"


"गुरुजी, तो बकरीचा आवाज नाही.एखाद अर्धा कोसावरून तो आवाज येतो तो आरा-अजगराची जात-सापाच्या मादीचा.ती माजावर आलीय.नराला साद घालतेय. हा आवाज कधी सात-आठ दिवस तर प्रसंगी एक-दोन महिनेही ऐकू येतो."


आभाळातल्या चांदणीकडे मी पाहिलं.मध्यरात्र झाली होती.

सापाचं जुगणं कधी पाहू नये म्हणतात.पण असं दर्शन झाल्यावर बरी वाईट भावना आम्हा लोकांत दृढ नाही.ते थंडीचे दिवस होते.मी पेठहून उबरद गावाकडे जाताना वाटेत जंगलात धामणीची रतिक्रीडा पाहिली.वेळ असावी सकाळी दहा-अकरा वाजताची.ती एकमेकांना गुंडाळून जमिनीपासून दोन फूट उंच उभी होती.बाकीचं धड जमिनीवरच काटकोनात लोळत होतं. त्या वेळी ते चीत्कार करीत.एकमेकांचे चुंबन घेत होते. पण आवाज नर की मादी करीत होती हे मात्र कळले नाही." (जंगलाचं देणं,मारुती चितमपल्ली, प्रकाशक-मकरंद भास्कर कुलकर्णी,साहित्य प्रसार केंद्र सीताबर्डी नागपूर)


पेठच्या वनविश्रामगृहात व्हरांड्यात बसून आम्ही बराच वेळ बोलत होतो.बाहेर किर्र अंधार होता.इतक्यात वादळी पावसाला सुरुवात झाली.तेवढ्यात विजेचे दिवे गेले.वनविश्रामगृहात अंधार पडला.चौकीदाराने पितळेचा लँप टेबलावर आणून ठेवला.

पावसाळी किडे-पतंग दिव्याभोवती पिंगा घालू लागले.जेवणे उरकून आम्ही पलंगावरच्या मच्छरदाणीत प्रवेश केला. बाहेर डासांची विलक्षण गुणगुण ऐकू येत होती. कौलावर पाऊस थड् थड् वाजत होता.आजूबाजूच्या झाडांची पाने सळसळत होती.एकदा-दोनदा घुबडाचा घुग्‌घुग् असा दीर्घ स्वर कानी आला आणि वातावरणात विरला.थोड्या वेळाने वादळ शमले.नवीन जागेत लवकर झोप येत नसल्याचा माझा अनुभव आहे.


इतक्यात शेजारच्या पलंगावरून आवरी गुरुजींचा आवाज आला.


"साहेब, तुम्ही पलंगावरच असा.खाली उतरू नगा."


"का बरं?" मी किंचित घाबरल्या स्वरात म्हटलं.


"इथल्या सतरंजीवरून एक जीवाणू सरपटत जात असल्याचा आवाज मला ऐकू येतोय."


मी उशालगतच्या छोट्या विजेरीच्या प्रकाशात पाहिले. एक मोठा नाग सरपटत दारातून मागच्या व्हरांड्यात जाताना दिसला.उजेडात त्याची त्वचा चमकत होती. गुरुजींनी हळूच पलंगावरून उतरून दिव्याची वात मोठी केली तसा सळकन् वीज चमकल्याचा भास झाला आणि व्हरांड्यातून नाहीसा झाला. गुरुजींनी दारं बंद केली.नंतर रात्री मला झोप आलीच नाही।

२७/६/२५

काळोखाच्या क्षेत्रात /In the realm of darkness

पाण्यापेक्षा माती आपल्यासाठी अधिक गूढ आहे, रूपकात्मक आणि शब्दशः सुद्धा.असं म्हणतात की, आपल्याला जितकी चंद्राची माहिती आहे त्यापेक्षा कमी ज्ञान सागराच्या तळाचे आहे आणि माती मधल्या जीवसृष्टीचे तर याहीपेक्षा कमी ज्ञान आहे. 


हे खरं आहे की,सूक्ष्मजीवांच्या अनेक प्रजाती आज माहीत आहेत आणि मातीबद्दलही बऱ्याच नवनवीन गोष्टी संशोधनातून येतात.तरीही आपल्या पायाखालच्या गुंतागुंतीच्या दुनियेची ही फक्त आंशिक माहिती आहे. जंगलामध्ये जवळजवळ अर्धा जैविक माल जमिनीखाली असतो.इथले बहुतांश सजीव साध्या डोळ्यांना दिसत नाहीत.त्यामुळे कोल्हा,काळा सुतार पक्षी किंवा फायर सॅलमँडरबद्दल जितके आपल्याला कुतूहल आहे तितके या सूक्ष्म सजीवांचे नाही.


पण झाडांच्या आयुष्यात या सूक्ष्म जीवांचे महत्त्व फार आहे.

जंगलातून मोठे सजीव आले नाहीत तरी झाडाला फार फरक पडणार नाही.हरणे,रानडुक्कर,मांसाहारी जनावरे आणि अनेक पक्षी जंगलात नसले तरी परिसंस्थेत फार परिणाम होणार नाही,जंगल वाढतच राहील.पण त्यांच्या पायाखालचे सूक्ष्मजीव नसले तर मात्र मोठा फरक पडेल.मूठभर मातीमध्ये जितके सूक्ष्मजीव असतात तितकी पृथ्वीची लोकसंख्याही नसेल.चमचाभर मातीमध्ये कित्येक मैलबुरशीच्या जाळ्याचे तंतू असतात.या सर्वांच्या योगदानातून झाडांसाठी मातीचे मूल्यवर्धन होते.या सूक्ष्मजीवांबद्दल बोलण्याआधी आपण पहिल्यांदा माती कशी तयार झाली,ते पाहू.उघडे किंवा सैल रचनेत असलेल्या दगडातून आर्द्रता आणि पोषणद्रव्यांचा योग्य साठा होत नाही.भूवैज्ञानिक प्रक्रियेतून,उदाहरणार्थ हिमयुगातील कडक थंडीमुळे या दगडांना तडे गेले. हिमनद्यांनी त्यांचे छोटे छोटे तुकडे केले.कालांतराने त्यांची बारीक वाळू बनली.हिमयुग संपल्यावर पाण्याने या वाळूचा थर दऱ्याखोऱ्यातून पसरविले किंवा वादळ वाऱ्यामुळे दूरवर पसरून त्यांचे जाड थर रचले गेले.


द हिडन लाईफ ऑफ ट्रीज,पी ट र वो ह्ल ले बे न

अनुवाद - गुरुदास नूलकर,अरविंद घनश्याम पाटकर

 मनोविकास प्रकाशन


सूक्ष्मजंतू,बुरशी आणि वनस्पती पाण्यातून येत गेली आणि त्यांच्या विघटनामुळे वाळूत जैविक मालाची भर पडली.पुढील हजारो वर्षांत तिथे झाडे उगवायला सुरू झाली आणि मातीची गुणवत्ता वाढत गेली.झाडांच्या मुळांमुळे मातीची धूप टळली आणि त्यावर जैविक माल पडत गेला.ही दगडी कोळशाची प्राथमिक अवस्था होती.धूप किंवा झीज ही जंगलासाठी सर्वांत धोकादायक प्रक्रिया असते.जोरदार पाऊस किंवा काही हवामानाच्या घटनांमुळे माती वाहून जाते.जर जंगलाला पावसाचे पाणी शोषून घेता आले नाही तर पाणी वाहून जाताना मातीही घेऊन जाते.

यामुळेच पावसाळ्यात वाहणारे पाणी तपकिरी रंगाचे दिसते. पावसामुळे एका चौरस मैलातून दोन हजार नऊशे टन माती वर्षाकाठी वाहून जाऊ शकते.आणि एका वर्षात जेमतेम दोनशे नव्वद टन माती त्याच क्षेत्रावर तयार होऊ शकते.

त्यामुळे काही काळातच तिथे फक्त दगड उरतात.ज्या क्षेत्रात काही शतकांपूर्वी शेती झाली तिथे आज अशी मातीविरहित क्षेत्र दिसून येतात.या तुलनेत जिथे अजून जंगलं शाबूत आहेत तिथे एका चौरस मैलात जेमतेम एक ते चौदा टन मातीची झीज होते.

किंबहुना अशा ठिकाणी झाडाखालची माती अधिक खोल आणि पोषणयुक्त होत जाते ज्यामुळे तिथल्या जंगलाला पोषक वातावरण तयार होते.


आता मातीतील जीवसृष्टीकडे वळू.खरंतर ही काही फार प्रेक्षणीय नाही.हे सजीव इतके सूक्ष्म असतात की, डोळ्याने तर नाहीच पण भिंगातूनही दिसणार नाहीत. बीटल माईट,स्प्रिंगटेल किंवा स्युडो सेंटीपीड हे नक्कीच ओरंग ऊटंग आणि हम्पबॅक व्हेल माशाइतके आकर्षक नसतात,पण हे सजीव अन्नसाखळी मधले प्राथमिक घटक असल्यामुळे त्यांना जमिनीवरील प्लॅकटन (पाण्यात तरंगणारे सूक्ष्म प्लवक) म्हणता येईल. दुर्दैवाने संशोधकांना या जीवांमध्ये म्हणावा तितका रस नाही.यांच्या हजारो प्रजातींचा शोध लागला आहे पण त्यांना फक्त उच्चारायला अवघड लॅटिन नावं दिलेली आहेत. अजून अगणित प्रजाती आपल्याकडून दखल घेतली जाण्याची वाट पाहात आहेत. 


तुमच्या घराच्या मागच्या जंगलात अजून खूप गुपित आपली वाट पाहात आहेत.तोच काय तो दिलासा! 


याबद्दल आपल्याला आज जी थोडी माहिती आहे, त्यावर जरा बोलू.मघाशी बीटल माईटचा उल्लेख झाला. यांना 'ऑरिबॅटिड माईट' असेही म्हणतात.युरोपमध्ये यांच्या हजारो प्रजाती सापडतात.हे सजीव जेमतेम ०.०४ इंच लांब असतात आणि आखूड पायाच्या कोळ्यांसारखे दिसतात,तपकिरी रंगाच्या दोन छटा असलेले त्यांचे शरीर जमिनीच्या रंगात मिसळून जाते. आपल्या घरांमधल्या धुळीत ही माईट असतात. झडणाऱ्या मानवी त्वचेवर ते जगतात पण काही जणांना त्यांच्या अ‍ॅलर्जीचा त्रास होऊ शकतो.काही बीटल माईट झाडांभोवती अशाच प्रकारे झडलेल्या सालांवर आणि पानांवर जगतात.ही नसती तर गळणारी पानं आणि सालांचा कित्येक यार्ड उंच ढीग झाला असता.बीटल माईटची भुकेली सेना हा ढीग फस्त करते.माईटच्या इतर काही प्रजाती बुरशीवर जगतात.बुरशीच्या बारीक तंतूंमधून वाहणारे द्रव्य ते शोषून घेतात.याव्यतिरिक्त झाडांनी आपल्या मित्र बुरशीसाठी बनविलेली साखरही बीटल माईट शोषून घेतात.

कुजणारे लाकूड असो किंवा मेलेली गोगलगाय, प्रत्येकावर चरणारे बीटल माईट जंगलात सापडतात. जन्म घेणारी वनस्पती असो अथवा मरून पडलेले झाड प्रत्येक ठिकाणी बीटल माईट असतात,त्यामुळे या परिसंस्थेचे अविभाज्य घटक म्हणून त्यांना मानलं जातं.


आता भुंग्यांकडे (वीव्हिल) वळू.कान हरवलेल्या पिटुकल्या हत्तीसारख्या दिसणाऱ्या या कीटकांत पृथ्वीतलावरील सर्वाधिक प्रजाती आहेत.फक्त युरोप खंडातच यांच्या चौदाशे प्रजाती मिळतात.खाण्यापेक्षा आपल्या पोराबाळांच्या पालकत्वात भुंग्यांचे जास्त लक्ष असते.पान आणि कोवळ्या खोडांमध्ये आपल्या सोंडेने छोटी भोकं पाडून त्यात ते आपली अंडी घालतात.तिथे या अंड्यातून निघालेल्या पिल्लांना भक्षांपासून संरक्षण असते आणि ती शांतपणे झाडाच्या आतला भाग किंवा पानं खात खात ती आपला मार्ग बनवतात. 


जंगलाच्या जमिनीवर राहणारे काही भुंगे उडू शकत नाहीत,कारण त्यांना या परिसंस्थेच्या संथ चालीची आणि निरंतर अस्तित्वाची सवय झालेली असते.एका वर्षात ते फार फार तर तीस फूट प्रवास करतात,कारण त्या पुढे जाण्याची त्यांना गरजच पडत नाही.समजा एखादे झाड वठले आणि आजूबाजूची परिस्थिती बदलली तर तिथल्या भुंग्याला फक्त शेजारच्या दुसऱ्या झाडापर्यंत पोचायचा प्रवास करावा लागतो.मग तिथे पोचून तो कुजणाऱ्या पाल्यावर आपले पोट भरेल. जंगलात भुंगे असणे हे जंगल इतिहासकालीन असल्याचे निदर्शक आहे.जर मध्ययुगामध्ये जंगल साफ केले गेले आणि नंतर पुन्हा लागवड झाली तर तिथे हे कीटक दिसत नाहीत


कारण साफ झालेल्या जंगलापासून दुसऱ्या जंगलापर्यंत ते पोचू शकत नाहीत.आत्तापर्यंत आपण बोललेल्या सर्व प्राण्यांच्यात एक साम्य आहे.सर्व प्राणी सूक्ष्म असल्यामुळे फार छोट्या परिसरात त्यांचा परिणाम जाणवतो.मध्य यूरोपीय प्राचीन जंगलात हे ठीक होते. पण बहुतांश जंगलात मानवी हस्तक्षेप झालेले आहेत. त्यामुळे बीचच्या जागी स्प्रूस दिसतात,ओक वृक्षांची जागा डग्लस फरने घेतली आहे आणि विशाल वृक्षांच्या ठिकाणी यौवनातील झाडे उभी आहेत.अशा प्रकारच्या अल्पवयीन जंगलात जनावरांना खाद्य मिळत नाही त्यामुळे त्यांचे अस्तित्व संपून गेले.तरीही काही ठिकाणी आज जुनी पानझडी जंगले आहेत जिथे मूळच्या जैवविविधतेला आसरा मिळतो.आता जर्मनीमध्ये सूचीपर्णी जंगलांच्यापेक्षा पानझडी वृक्षांची लागवड सुरू झाली आहे.पण वादळात मोडलेल्या स्प्रूसच्या जागी एखादा बीच जरी उभा राहिला तरी बीटल माईट आणि स्प्रिंगटेल पुन्हा तिथे कसे पोहोचू शकतील? हे कीटक आयुष्यभरात जेमतेम तीन फूट चालतात. बाव्हेरियन जंगलासारख्या सुरक्षित वनक्षेत्रात पुन्हा एकदा घनदाट प्राचीन जंगले उभी राहतील,अशी अपेक्षा आपल्याला करता येईल का? हो, हे नक्कीच शक्य आहे.


माझ्या जंगलात काही विद्यार्थी संशोधकांनी सूचीपर्णी झाडांशी निगडित सूक्ष्मजीवांचा अभ्यास केला आहे. त्यातून त्यांना असे दिसते की,हे जीव दूरपर्यंत जाऊ शकतात.जुन्या स्प्रूसच्या लागवडीत तर हे नक्कीच दिसून येते.या तरुण संशोधकांना स्प्रूस जंगलात विशेष स्प्रिंगटेल सापडले.पण ह्यूमेल मधल्या या जंगलात जेमतेम शंभर वर्षांपूर्वी लागवड झाली होती.त्याच्या आधी फक्त प्राचीन बीच वृक्ष होते,जसे मध्य युरोपात सापडतात.तर मग सूचीपर्णी जंगलात वाढणारे हे स्प्रिंगटेल ह्यूमेलला कसे आले,

पोचले ? माझ्या अंदाजाप्रमाणे हे कीटक पक्ष्यांच्या पिसामध्ये चिकटून इथे आले असावेत.पक्ष्यांना पानगळीत लोळायला खूप आवडते.असे करून त्यांची पिसे स्वच्छ होतात.आणि तेव्हाच हे छोटे जीव त्यांच्या पिसात अडकून बसतात. दुसऱ्या कुठल्या जंगलात जाऊन तिथे लोळण घेतली की तिथे जाऊन पडतात.

स्प्रूस जंगलातील विशेष प्रजातींना जे लागू होतं तेच कदाचित पानझडी वृक्षप्रेमी प्रजातींनाही लागू होत असेल.


जर का भविष्यात पुन्हा प्रौढ अवस्थेतील पानझडी जंगले इथे आली तर पक्षी योग्य त्या कीटकांना तिथे पोचवायची काळजी घेतील. पण कील आणि ल्युनेबर्गला झालेल्या अभ्यासात असे दिसते की या सूक्ष्म कीटकांची परत वारी होण्यासाठी प्रचंड कालावधी लागेल."


ल्युनेबर्गच्या सुपीक जमिनीवर शंभर वर्षांपूर्वी ओक वृक्षांची लागवड झाली.शास्त्रज्ञांना वाटले की काही दशकातच बुरशीचे जाळे तयार होईल आणि सूक्ष्म जिवाणू मातीत वाढू लागतील.पण आजही तिथे त्यांचं विपुल वैविध्य - दिसत नाही.याचा जंगल परिसंस्थेवर निश्चितच विपरीत परिणाम होतो.शिवाय जन्म आणि कुजण्याच्या विघटन प्रक्रियेचे पोषणचक्र कार्यक्षम होत नाही.त्यात भर म्हणजे शेतीच्या वेळेस वापरलेल्या खतांतील नत्र अजूनही इथल्या मातीत सापडते.इथलं एक जंगल इतर ठिकाणच्या लागवडीपेक्षा झपाट्याने वाढतय,हे खरं आहे,पण ही झाडं पुरेशी धडधाकट नाहीत.त्यामुळे दुष्काळ काढणं त्यांना अवघड जात. इथली माती पूर्ववत कधी होईल,हे आपल्याला माहीत नाही.पण इतकं कळलं आहे की एक शतक त्यास पुरेसं नाही.मातीचं पुनरुज्जीवन होण्यासाठी आपल्याला प्राचीन जंगलांना मानवी हस्तक्षेपापासून सुरक्षित ठेवावं लागतं.अशा ठिकाणी मृदेतील वैविध्य जिवंत राहतं आणि याचा उपयोग बाजूच्या परिसरात त्यांचा प्रसार होण्यासाठी होतो.आणि यासाठी काही मोठा त्याग करावा लागत नाही,हे आपल्याला ह्यूमेलच्या लोकांनी इतकी वर्षं दाखवून दिलं आहे.त्यांनी एक बीच वृक्षाचं जंगल सुरक्षित ठेवलं आणि कल्पकतेनं त्याचं मार्केटिंग केलं.

जंगलाच्या एका भागात जंगलातील स्मशानभूमी केली आहे.इथे मृतांच्या नातेवाइकांना जिवंत झाडाखाली आपल्या लाडक्या व्यक्तीची थडगी बनवण्यासाठी झाड भाड्याने दिलं जाते.आहे की नाही ही छान कल्पना ? अजून एक भाग उद्योगधंद्यांना भाड्याने दिला जातो जिथे त्यांना निसर्गसंवर्धनाची जबाबदारी पूर्ण करता येते. अशा गोष्टींमुळे लाकडाचा वापर होत नाही व निसर्ग आणि माणूस दोघेही खुश राहतात.


आजच्या एकविसाव्या शतकात जंगलाची सुरक्षा आणि संवर्धनाचा खर्च अशा प्रकारे विविध मार्गातून जगभरात काढला जात आहे.ग्वाटेमाला मधील 'माया बायोस्फियर रिझर्व' सारख्या ठिकाणी शिक्षण आणि उपयुक्ततेचा मेळ घडवून आणला जातो.तिथे स्थानिक लोकांकडून पर्यटक जंगलाची माहिती घेतात. त्यामुळे तिथे स्थानिक लोक लाकूडतोड किंवा शेती करत नाहीत.

काही ठिकाणी जंगल संवर्धनाचे काम प्रतिष्ठेशी जोडण्यात आले आहे,जसे स्कॉटलंड मध्ये ! इथे तुम्हाला पूर्वीच्या प्रतिष्ठित लोकांच्या मालकीची जमीन विकत घेता येते.त्यामुळे लाकूड तोडणाऱ्या धंद्यांना बाहेर ठेवलं जातं आणि तिथे प्राचीन कॅलिडोनियन जंगल परिसंस्थेचं पुनरुज्जीवन होऊ शकत आहे.काही ठिकाणी असंभाव्य संस्थांची भागीदारी आहे,जसे अमेरिकेमध्ये ! राष्ट्रीय वन्य जीवन आणि मत्स्य संस्था लांब पानाच्या पाईन परिसंस्थेला टिकवण्याचं काम करीत आहे,त्यांना अमेरिकेच्या संरक्षण खात्याकडून मदत मिळत आहे.याचं कारण म्हणजे सैन्य दलाच्याभोवती जंगल असणं हे त्यांच्या पथ्यावर पडतं.अशा कित्येक पद्धतीने आपल्याला जंगले सुरक्षित आणि उत्पादनक्षम ठेवता येतात.



२५/६/२५

नाझारेथचा ज्यू येशू / The Jew Jesus of Nazareth

येशू जूडाच्या डोंगरात भटकत राहिला.मानवजातीने त्याला उडाणटप्पू ठरवले होते.जॉन बॅप्सिटस्ट याच्याप्रमाणे त्यालाही आढळून आले की,माणसे पशूच्याच प्रतिकृती आहेत.निराशेच्या गर्तेत पडलेले लोक त्याच्याभोवती गोळा झाले.कोळी,कामगार वगैरे दरिद्री लोक त्याचे अनुयायी झाले.त्याने त्यांना भावी सुखाची-स्वर्गातील राज्याची आशा दाखवली, अंधारमग्रांना आशेचा किरण दाखवला. "सोडा आपूले घरदार" तो म्हणाला, "चला माझ्या पाठोपाठ.प्रभूच्या नव्या राज्यात आपण शहरे,पुरे,पट्टणे हिंडत जाऊ, या गावाहून त्या गावी जाऊ,पृथ्वीवर सर्वत्र प्रभूचे राज्य स्थापू,ईश्वराचा झेंडा चोहोंकडे नेऊ."


त्याच्याभोवती जमा झालेले भिकारी म्हणजे बेजबाबदार व मजा करू पाहणाऱ्या लोकांचा जथ्था!त्यांना खाणेपिणे व भांडणे या गोष्टी आवडत.एकदा एका गावी त्यांचे स्वागत कोणीच केले नाही म्हणून त्या गावाला काडी लावायला ते निघाले;पण ख्रिस्ताने त्यांचे मन वळवले व त्यांना तसे करू दिले नाही.जगातल्या रूढींकडे पाहून तोंड वेंगाडण्यात त्यांना परमानंद वाटे. रविवारी म्हणजे प्रार्थनेच्या पवित्र दिवशी काही वेडेवाकडे,अपवित्र काम करताना ते कोणास आढळले तर ते असा युक्तिवाद करीत की,"लोकांसाठी रविवार आहे, रविवारसाठी लोक नाहीत." जे त्यांचे ऐकत नसत, ऐकायला तयार नसत,त्यांना ते शिव्याशाप देत व त्यांची निंदा करीत. "तुम्ही जणू मृतवत् मुडदे आहात!" असे ते त्यांना हिणवीत.ईश्वराने त्यांचा नाश करावा म्हणून ते प्रार्थना करीत.

सोडोम व गोमारा येथील लोकांचा जसा पूर्वी प्रभूने नायनाट केला तसाच याही लोकांचा त्याने नायनाट करावा म्हणून ते प्रभूला प्रार्थीत.ते जणू गॅलिलीतले समाजवादीच होते! अनुयायी फार अतिरेक करू लागले,तर त्यांचा मुख्य नेता ख्रिस्त त्यांस आवरी; पण खुद्द येशूही कधीकधी अत्यंत संतापे,प्रक्षुब्ध होई. ख्रिस्ताची वाणी व त्यांची कृत्ये अद्यापि पुरेशी सुसंस्कृत झाली नव्हती.

आपला संदेश न ऐकणाऱ्यांवर तो संतापे, त्याला धीर धरवत नसे.तो उतावळा व अधीर होता. निराशेच्या भरात एकदा तो म्हणाला,"जो माझ्या शब्दांवर विश्वास ठेवणार नाही,तो नरकात जाईल." आयुष्याच्या या काळात त्याच्या ठायी सहनशीलता नव्हती,सौम्यता नव्हती.तो एकदम रागावे, संतापे, प्रक्षुब्ध होई. कधीकधी क्रोध आवरणे त्याला अशक्य होई.जोरदार व तेजस्वी शब्दांनी ऐकणाऱ्यांचा हृदयपालट झाला नाही की तो हात उगारावयासही मागेपुढे पाहत नसे.हातात चाबूक घेऊन तो अन्यायाचे शासन करण्यास उभा राही;हाती तलवार घेऊन तो पृथ्वीवर स्वर्गाचे राज्य आणू पाही.


पण त्याच्या ठायी दैवी विनोदही होता व मुलांवर तर तो अपार प्रेम करी.तो जिथे जिथे जाई,तिथे तिथे त्याच्याभोवती मुले गोळा होत व त्याला म्हणत,"या, आमच्याबरोबर खेळायला या." तो त्यांच्याबरोबर हसे, खेळे.एक मुलगा खांद्यावर आहे,एक हाताला ओळखंबा घेत आहे,पुष्कळ जण त्याच्या पाठीमागून येत आहेत, अशा थाटात त्याची ती ऊन लागून तांबूस-पिंगट झालेली धिप्पाड मूर्ती रस्त्यावरून जाताना नेहमी दिसे, ती मुले पॅलेस्टाइनमधली लोकगीते मोठमोठ्याने गात व हावभाव करीत त्याच्याबरोबर हिंडत,ख्रिस्ताचे एखाद्या गावी आगमन म्हणजे तेथील मुलांना जणू सुटीचा दिवस ! तो नाझारेथचा गोड मुरलीवाला मुलांना इतके मोहून टाकी की,पृथ्वीच्या टोकापर्यंत कोठेही त्याच्याबरोबर जावयास ती आनंदाने तयार असत.


येशूची सारी आशा त्या बाळगोपाळांवर होती. 'हे माझे बाळसवंगडी म्हणजेच जगाची,प्रभूची व माझी आशा !' तो म्हणे,"ईश्वराचे राज्य अशा सरळ,निष्पाप,निर्मळ व प्रेमळ मुलांसाठीच असते.मुलांना त्याचे म्हणणे पटकन समजे.नवीन राज्याच्या ज्या अद्भुत कथा तो सांगे,त्या मुलांना खऱ्या वाटत.त्यात त्या निष्पाप बालकांना असंभाव्य वा अशक्य काहीच वाटत नसे.तो स्वतः त्या मुलांना घेऊन त्या रम्य आनंदभुवनात जाणार होता".त्या नवीन मंगल भूमीत द्वेष-मत्सर असणार नाहीत,दुःख असणार नाही,रोग असणार नाहीत,मरण येणार नाही!" असे तो सांगे.मुले त्याच्याजवळ बसून तल्लीनतेने ऐकत,आश्चर्याने त्यांचे डोळे विस्तारीत होत.येशू त्यांच्या डोळ्यांसमोर जी कल्पनारम्य चित्रे उभी करी,त्यामुळे त्यांची तोंडे आशेने व श्रद्धेने चमकू लागत."या पृथ्वीवर ही मुलेच नवीन स्वर्ग उभारतील,तो निर्माण करण्यास मदत करतील,मोठ्या माणसांच्या हातून हे काम होणार नाही,"असे त्याला वाटे.जे वयाने वाढलेले असतात,ते बिघडलेले असतात.साहसी वृत्ती,आत्मविश्वास,त्याग, श्रद्धा इत्यादी गुण त्यांच्या ठायी नसतात.न्याय्य वस्तुस्थितीतील वैगुण्ये,जगातील दुःखे व निराशा त्यांच्या हृदयात खोल रुतून बसलेली असतात,ते केवळ संसारी असतात.व्यवहारापुरते राहतात.या रानटी जगातील व्यावहारिक शहाणपणामुळे त्यांना सौम्य व शांत अशा एका नव्या जगातील सौंदर्ये दिसत नाहीत.


ख्रिस्त वयाने मोठ्या असलेल्या प्रौढांजवळ स्वर्गीय राज्याविषयी बोलत,तेव्हा त्यांना त्याचाही अर्थही समजत नसे.ते गैरसमज करून घेत व त्या राज्यात कोणाला कोणते अधिकार मिळणार याबाबत त्याच्याशी भांडू लागत ! ते त्याला विचारीत,"ते स्वर्गाचे राज्य आल्यावर तुमच्या उजव्या बाजूला कोण असणार, डाव्या बाजूला कोण बसणार,मंत्री कोण होणार, सेनापती कोण होणार?" ते लोक वयाने वाढलेले असले तरी एका दृष्टीने अडाणी मुलेच आहेत असे त्याला आढळून येई.दरिद्री,करुणास्पद पण वंदनीय मूल.

वाईट करण्याची त्यांची शक्ती तेवढी वाढलेली होती;इतर बाबर्तीत ते मूलच होते,अपरिपक्वच होते.आणि भोवतालच्या अशा लोकांत वावरतावावरता,त्यांचे अडाणी प्रश्न ऐकताऐकता ख्रिस्ताला हळूहळू कळून चुकले की,तो मुलांमध्येच वावरत होता.काही मोठी मुले, काही छोटी मुले;पण सारी मुलेच ! त्या मुलांच्या जगात एकटा तोच काय तो मनाने व बुद्धीने वाढत होता,प्रौढ व परिपक्व होत होता.बौद्धिक व नैतिकदृष्ट्या तोच तेवढा वाढत होता.आणि हे कळून आल्यावर तो रागावेनासा झाला.तो त्यांची कीव करू लागला.त्याला त्यांच्याबद्दल करुणा वाटू लागली.


तो त्याच्या आयुष्यातला संक्रमणाचा क्षण होता. सहानुभूतीची व प्रेमाची वेगळीच दृष्टी त्याला फुटली. मुलांचा द्वेष वा मत्सर करण्यात त्याच्यावर रागावण्यात, त्यांच्याशी आदळआपट करण्यात काय अर्थ? त्यांना शिव्याशाप देण्याचा,त्यांना शिक्षा करण्याचा काय उपयोग? ज्यांना विचार नाही,ज्ञान नाही,त्यांच्यावर तलवार उगारण्याचा काय उपयोग? का आपण फुकट दातओठ खावेत? प्रेमळ शब्दांनीच त्यांची कानउघाडणी करणे बरे नव्हे का? करुणेच्या,क्षमेच्या शस्त्रानेच त्यांना शिक्षा करणे अधिक शहाणपणाचे नाही का होणार ?


म्हणून त्याने आपला पवित्रा बदलला,आपले धोरण बदलले,जगात झगडे उत्पन्न करण्याची इच्छा आता त्याच्या ठायी राहिली नाही.त्याने आपला तापट स्वभाव सोडला.तो शांत व संयमी झाला.अत्याचाराने वा हिंसेने अन्यायाविरुद्ध लढणे त्याने सोडून दिले.सदैव युद्धाची भाषा वापरून पापाला डिवचण्याचे वा चिडवण्याचे त्याने बंद केले.इतकेच नव्हे;


तर तो शांततेच्या सनातन युद्धातला शांततेने लढणारा कर्मवीर बनला.तो चाबूक व तलवार टाकून देऊन क्षमा,दया व प्रेम या अधिक प्रभावी व प्रबळ शस्त्रास्त्रांनी सज्ज झाला.


तो मानवांमध्ये सदिच्छेचा संदेश पसरवीत फिरणारा परिव्राजक बनला. "शत्रूला ठार मार" अशी प्रार्थना देवाला करणारा पूर्वीचा येशू आता राहिला नाही. तो आता पर्वतोपनिषद् देणारा, परिणतप्रज्ञ असा सर्वस्वी निराळा महात्मा झाला.आता त्याचा संदेशही बदलला; शत्रूवर प्रेम करा,त्याच्या अज्ञानाची कीव करा, अडाण्यांना कळावे समजावे म्हणून त्यांना शिकवा. तुम्हांला शिव्याशाप देतील त्यांनाही आशीर्वाद द्या. छळणाच्याही आत्म्यांसाठी प्रार्थना करा.दुष्ट हृदयाच्या लोकांना रोगी समजून त्यांची शुश्रूषा करा.त्यांचे हृदय शुद्ध व निरोगी होण्यासाठी दयाळू वैद्याप्रमाणे त्यांच्यावर प्रेम करा,आजारी माणूस सेवा करणाऱ्यासच वाताच्या भरात मारतो,तद्वत् हे रोगी हृदयाचे मानव त्रास देऊ लागले, मारू लागले,तरीही त्यांची सेवाच करीत जा.


शेवटी ख्रिस्ताला अटक झाली.त्याचे सारे शिष्य आपणही गिरफ्तार होऊ भीतीने पळून गेले ! त्याचे शत्रू त्याच्या रक्तासाठी तहानलेले होते;पण या सॉक्रेटिसप्रमाणेच ख्रिस्तानेही आपल्या बचावाची काहीही तयारी केली नाही.हातात तलवार घेऊन पीटर त्याला वाचवू पाहत होता,पण येशूने मंद स्मित केले. भाले,तलवारी वगैरे नेहमीची जुनाट हत्यारे घेऊन मारण-मरणाचा खेळ खेळण्याच्या स्थितीच्या पलीकडे तो गेला होता.तो या झगड्यांच्या पलीकडे गेला होता. ती पोरकट भांडणे त्याने केव्हाच मागे टाकली होती! 


तलवारीने मिळविलेल्या विजयातून पुन्हा नवीन युद्धेच निर्माण होतात हीही गोष्ट त्याने नीट ओळखली होती.

आश्चर्यचकित झालेल्या पीटरला तो म्हणाला,"म्यानात घाल ती तलवार। जे तलवार हाती घेतील ते तलवारीनेच मरतील!"


रोमन सैनिकांसमक्ष उच्चारलेले ते शब्द म्हणजे जणू भविष्यवाणीच होती.! पण रोमनांनी त्या शब्दांकडे लक्ष दिले नाही.पायलेटने त्याला मरणाची शिक्षा फर्मावली! रोमन रिवाजाप्रमाणे क्रॉसवर खिळे ठोकून त्याला ठार मारण्यात आले! खिस्ताबरोबर दोन चोरही त्याच्या दोन्ही बाजूंस क्रॉसवर चढविले गेले.त्यांनी अपार वेदना होऊ लागल्यामुळे शिव्याशाप दिले;पण ख्रिस्ताने क्षमा केली.क्रॉसवरून लोंबकळणाऱ्या त्या तिघांच्याही मरणकाळच्या किंकाळ्या मात्र एकमेकांत मिसळून गेल्या.

अव्यवस्थित अशा या जगात कोठेच नीट न बसू शकणारे असे ते तिघे दुर्दैवी,करुणास्पद जीव होते !


मानवी ख्रिस्ताचे माझ्या मते हे असे चित्र आहे.घरच्यांनी नाकारलेला,नागरिकांनी धमकावलेला,मित्रांनी सोडलेला,शत्रूनी क्रॉसवर चढविलेला,अनुयायांकडून आतापर्यंत विपरीत अर्थ केला गेलेला,असा हा येशू ख्रिस्त काही जादूगार नव्हता.त्याने चमत्कार केले नाहीत.पण द्वेषाने पेटलेल्या या जगात त्याने दाखविलेले प्रेम हाच खरोखर थोर व अपूर्व चमत्कार नव्हे काय? त्याने केलेल्या चमत्कारांच्या म्हणून ज्या कथा गॉस्पेल्समध्ये वर्णिल्या आहेत,

त्याहून त्याने शत्रूबद्दल दाखविलेले प्रेम हा कितीतरी पटींनी मोठा चमत्कार नव्हे काय ? अर्वाचीन रूढ अर्थाने तो चर्चवाला नव्हता. त्याला विधिविधानांचा तिटकारा होता.कोंडलेली व गजबजलेली प्रार्थना-मंदिरे त्याला आवडत नसत. त्याचे चर्च मोकळ्या जागेत होते.रस्त्याच्या कडेचा एखादा दगड हेच त्याचे व्यासपीठ,तद्वतच जाडाभरेडा व प्रवासामुळे जीर्णशीर्ण झालेला एखादा झगा हाच त्याचा पोशाख असे.आणि आपल्या मातृभूमीची गाणी गाणारे ज्यू मजूर त्याचे साथीदार असत.ख्रिस्त आज जिवंत असता तर आपल्या नावाने चालणारी युद्धे,तद्वतच करण्यात येणारे द्वेष-मत्सर,छळ व अपराध पाहून तो विस्मितच झाला असता.ज्या ज्यू राष्ट्राने ख्रिश्चनांना देव दिला त्याच ज्यूंची निंदा चर्चवाले करीत आहेत,असे त्याला दिसले असते.एका ज्यू धर्ममार्तंडाने त्याला मरणाची शिक्षा फर्मावली,एवढ्याचसाठी आपली सारी ज्यू जात धिक्कारली जात असलेली त्याला दिसली असती,तर त्याने ख्रिश्चन चर्चला सौम्यपणे सांगितले असते की,आपणास जन्म देणारी माताही एक ज्यू बाईच होती.ख्रिस्त जर आज जर्मनीत येईल,तर तेथील ख्रिश्चन विद्यार्थी त्याला ज्यू समजून त्याच्या पाठीस लागतील.तो रुमानियात जाईल,तर त्याला तेथील लोक धावत्या आगगाडीच्या डब्याच्या खिडकीतून बाहेर फेकून देतील.तो पॅलेस्टाईनमध्ये जाईल तर अरब लोक त्याला ठार करतील व जवळच उभे असणारे ख्रिस्तीधर्मी इंग्रज सैन्य ती गंमत पाहत राहील. अमेरिकेतही पुष्कळशा कॉलेजात ख्रिस्ताला प्रवेश मिळणार नाही.थोडक्यात म्हणजे,आज जर ख्रिस्त जिवंत होऊन येईल,तर त्यालाही ख्रिश्चन राष्ट्रांना स्वतःच्या धर्माकडे घेऊन जाणे अशक्यप्राय होईल व मान हलवून म्हणावे लागेल,"हे प्रभो, हे तात, यांना क्षमा कर.आपण काय करीत आहोत हे यांना कळत नाही." तर मग ख्रिस्ताचे जीवन काय फुकटच गेले? तो काय उगीचच जगला? बिलकूल नाही.बर्नार्ड शॉ सर्वांना बजावून सांगत आहे की, "ख्रिस्ताचे जीवन विफल झाले असे अद्यापि म्हणता येणार नाही.

कारण,त्याच्या पद्धतीने प्रयोग करून पाहण्याचे शहाणपण अद्यापि कोणीही दाखविलेले नाही."


पण शौंच्या या म्हणण्यात नेहमीप्रमाणे अतिशयोक्ती आहे.कारण दोन माणसांनी ख्रिस्ताच्या पद्धतीचा अवलंब केलेला आहे;एक म्हणजे ज्यू तत्त्वज्ञानी स्पायनोझा व दुसरे म्हणजे हिंदूधर्मी गांधी.ख्रिश्चन जनतेला पुन्हा ख्रिस्ताकडे घेऊन जाण्यात ज्यू व हिंदू यांना अद्यापिही यश येण्याचा संभव आहे.