* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

१७/९/२५

मध माशांना दगड मारु नका / Don't throw stones at honeybees.

फॉलची सगळीकडे नाचक्की झाली.इतकी नाचक्की सार्वजनिक जीवनात खूप कमी लोकांना सहन करावी लागली होती.पण त्यांना त्यावर काही पश्चात्ताप झाला का? कधीच नाही.अनेक वर्षांनंतर हरबर्ट हूवरने एका सामाजिक भाषणात हे म्हटले होते,'अध्यक्ष हार्डीगला कुणा मित्राच्या विश्वासघातामुळे मानसिक आघाताने मरण आले.' श्रीमती फॉलने हे ऐकले तेव्हा त्या आपल्या खुर्चीतच उसळल्या.रडत रडत आपली मूठ आकाशाकडे ताणत त्या किंचाळल्या,"काय ? हार्डिंगचा विश्वासघात फॉल करतील? असंभव ! माझ्या पतीने कधीही कुणाचा विश्वासघात केला नाही.सोन्याने भरलेले हे घरसुध्दा माझ्या पतीकडून कुठलं चुकीच काम करवून घेऊच शकत नाही.उलट,त्यांचाच विश्वासघात केला गेलाय आणि त्यांना बळीचा बकरा बनवून सुळावर चढवले गेले आहे."


असेच होत असते.हाच मानवी स्वभाव आहे.प्रत्येक जण आपल्या चुकीच्या कामांचे खापर दुसऱ्यांवर फोडतो.तो परिस्थितीला दोष देतो,पण स्वतःला देत नाही.आपण सर्व हेच करतो.


त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा आपली कुणावर टीका करायची इच्छा होईल तेव्हा आपण अल केपोन,क्राउले आणि अल्बर्ट हॉलला लक्षात ठेवू.आम्हाला समजायला हवे की टीका ही बूमरँगसारखी असते.ती परतून आमच्यापाशीच येते,म्हणजेच बदल्यात ती व्यक्ती आमच्यावरच टीका करू लागते.आम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवले पाहिजे की ज्या व्यक्तीवर आम्ही टीका करीत आहोत,किंवा तिला सुधारण्याचा प्रयत्न करीत आहोत,ती उत्तरादखल स्वतःच्या समर्थनार्थ काही तरी तर्क लढवेल किंवा टॅटसारखं विनम्रपणे म्हणेल,"मी जे केलं त्याखेरीज मी अजून काय करू शकलो असतो?" १५ एप्रिल,१८६५ ला अब्राहम लिंकनचे पार्थिव एका स्वस्त लॉजिंग हाऊसच्या हॉलमध्ये ठेवले गेले होते.हा हॉल फोर्ड थिएटरच्या समोर होता जिथे विल्किस बूथने त्यांना गोळी घातली होती.लिंकनचा लांबलचक मृतदेह एका अंथरुणावर ठेवला होता,जे त्या शरीरापेक्षा बरेच लहान होते.रोजा बॉन्हरचे प्रसिध्द चित्र 'द हॉर्स फेयर'ची सवंग नक्कल त्या पलंगाच्यावरती टांगली होती आणि एक गॅसबत्ती पिवळा प्रकाश फेकत होती.


लिंकनच्या पार्थिवाच्या समोर उभे असलेले संरक्षणमंत्री स्टॅटन म्हणाले,"लोकांचे हृदय जिंकणारा सर्वश्रेष्ठ शासक आता या जगात राहिला नाही."


लिंकन लोकांची मने कसे जिंकायचे? त्यांच्या यशाचे रहस्य काय होते? मी दहा वर्ष लिंकनची खूप जीवनचरित्रे वाचली आहेत आणि एक पुस्तक 'लिंकन द अननोन' लिहायला तीन वर्षे घेतली आहेत.माझी अशी खात्री आहे की मी लिंकनचे व्यक्तिमत्त्व व घरगुती जीवनाबद्दल जितके विस्तृत अध्ययन केले आहे,तेवढे क्वचितच कुणी केले असेल.मी लिंकन ज्या त-हेने लोक-व्यवहार करीत त्याबद्दलही सखोल अध्ययन केले आहे.लिंकन टीका करत असत का? हो.तरूण असताना इंडियानाच्या पीजन क्रीक व्हॅलीमध्ये ते लोकांवर भरपूर टिका तर करीतच,पण पत्रांमधून व कवितांद्वारेही लोकांची टर उडवीत असत आणि अशा टिकात्मक कविता छापवून आणत. एकदा अशाच एका पत्राने द्वेषाची अशी आग भडकवली जी जीवनभर जळत राहिली.


जेव्हा लिंकन इलिनॉयमध्ये वकिली करीत होते,तेव्हा ते उघड उघड आपल्या विरुध्द असलेल्या लोकांवर आक्रमण करीत पत्रे लिहीत असत आणि त्यांना वर्तमानपत्रात छापून आणत असत.एकदा मात्र प्रकरण जरा जास्तच वाढले.


१८४२ मध्ये लिंकनने जेम्स शील्डस् नावाच्या एका दांभिक व मुजोर राजनेत्यावर व्यंग लिहिले.लिंकनने एका निनावी पत्राद्वारे हे व्यंग पाठवले,जे 'स्प्रिंगफिल्ड जर्नल'मध्ये छापून आले.पूर्ण शहरात शील्डचे हसे होत होते.संवेदनशील व दांभिक शील्ड्सचा तिळपापड झाला.त्याने हे व्यंग कुणी लिहिले हे शोधून काढले. आपल्या घोड्यावर चढून त्याने लिंकनला शोधून काढले आणि त्याला द्वंद्वयुध्दासाठी आव्हान दिले.लिंकन द्वंद्वयुध्द करू इच्छित नव्हते,पण त्यांच्यासमोर सन्मानासहित यातून बाहेर पडण्याचा मार्गसुद्धा नव्हता. त्यांना शस्त्र निवडायला सांगितले.त्यांचे हात लांब होते म्हणून त्यांनी तलवार निवडली.त्यांनी एका वेस्ट पॉइंट ग्रॅज्युएटकडून तलवार चालवण्याचे प्रशिक्षण घेतले.ज्या दिवशी द्वंद्वयुध्द होणार होते,त्या दिवशी ते आणि शील्ड मिसिसिपी नदीकाठी भेटले. त्यांच्यापैकी एकाचा मृत्यू अटळ होता.शेवटच्या क्षणी मात्र मित्रांच्या मध्यस्थीमुळे द्वंद्वयुध्द टळलं.लिंकनच्या आयुष्यातली ही सर्वांत भयंकर घटना होती.यामुळे त्यांना लोकांशी कसा व्यवहार करायचा याबद्दलचा एक अमूल्य धडा मिळाला.यानंतर त्यांनी कुणाच्याही बाबतीत अपमानकारक पत्रे लिहिली नाहीत आणि कधी कुणाची टर उडवली नाही;ना कधी कुणाची निंदा केली.गृहयुध्दाच्या वेळी लिंकन पोटोमॅकच्या सत्तेसाठी एकामागून एक नवीन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करीत गेले आणि त्यांपैकी प्रत्येकाने मॅककॅलन,पोप, बर्नसाइड,हुकर,मीड - या सर्वांनी इतक्या मोठ्या चुका केल्या की लिंकन इकडून तिकडे येरझारा घालत राहिले;पण त्यांनी कुणावरही टीका केली नाही.


अर्धा देश या अयोग्य सेनापतींना नावे ठेवीत असताना लिंकन यांच्या हृदयात कुणाही बाबतीत दुर्भावना नव्हती, सर्वांसाठी सद्भावनाच होती.ते शांत राहिले.त्यांचं प्रिय वचन होते- "कुणावरही टीका करू नका,म्हणजे तुमच्यावरही टीका होणार नाही."


जेव्हा श्रीमती लिंकन आणि इतर लोक दक्षिण प्रांताच्या लोकांवर टीका करीत तेव्हा लिंकन म्हणत,"त्यांच्यावर टीका करू नका, आम्ही जर त्या परिस्थितीमध्ये असतो तर आम्हीही तसेच वागले असतो." पण जर आलोचना करायचीच असती तर ती लिंकनने करणेच योग्य ठरले असते.एका उदाहरणावरून आम्हाला हे कळू शकते.


गट्सबर्गचे युध्द १८६३ च्या जुलै महिन्याच्या पहिल्या तीन दिवसात लढले गेले होते. ४ जुलैला रात्री जनरल ली दक्षिण दिशेने मागे हटू लागला.वादळी पावसामुळे पूर आला होता.जेव्हा ली आपल्या पराजित सेनेसह पोटोमॅकला पोचला तेव्हा त्याने पाहिले,की त्याच्यासमोर पुराने तुडंब भरलेली नदी आहे जिला पार करणे शक्यच नव्हते.त्यांच्या मागे विजेती युनियन आर्मी उभी होती.ली पार फसून चुकला होता.त्याच्यापाशी वाचण्याचा अन्य कोणताच मार्ग उरला नव्हता. 


लिंकनला ही परिस्थिती समजून आली.ही ईश्वरी कृपेने मिळालेली एक सुवर्णसंधी होती... लीच्या सेनेला हरवण्याचा मोका,ज्यामुळे युध्द तत्काळ समाप्त झाले असते.म्हणून आशावादी मनाने लिंकनने जनरल मीडला आदेश दिला की ते युध्दाबाबत कुठलीही सभा न घेता तत्काळ लीवर हल्ला करतील.लिंकनने आपले आदेश टेलिग्राफ केले आणि मग एका विशेष संदेशवाहकाला मीडपाशी पाठवून तत्काळ कारवाई करायला सांगितले.पण मीडने काय केले? त्याला जे आदेश मिळाले होते त्याच्या बरोबर उलट काम त्याने केले.लिंकनने मनाई केली होती तरी त्याने सैन्याची एक सभा बोलवली.तो हल्ला करायला बिचकला.त्याने टाळाटाळ केली.सर्व प्रकारचे बहाणे करून त्यांना टेलिग्राफ पाठवला.त्याने लीवर हल्ला करायला सपशेल नकार दिला.शेवटी पुराचं पाणी ओसरले आणि ली आपल्या सेनेसह नदी पार करून सुरक्षित निघून गेला.लिंकनचा रागाने तीळपापड झाला."याचा अर्थ काय आहे?" लिंकन आपल्या मुलासमोर किंचाळत होते."हे देवा ! याचा काय अर्थ होतो ? किती सुवर्णसंधी होती ! शत्रू आमच्या कब्जात होता.आम्हाला फक्त हात पसरून त्याला पकडायचे होते आणि तरी आम्ही त्याला आपल्या हातून निसटून जाऊ दिले.माझे आदेश होते तरी माझी सेना इंचभरही हालली नाही.परिस्थिती अशी होती की कुणीही जनरल लीला हरवू शकत होते.जर मी तिथे असतो तर मी त्याच्यावर स्वतःच्या हातांनी चाबकाचे फटकारे ओढले असते." घोर निराशेने लिंकन बसले आणि त्यांनी मीडला पत्र लिहिले.

आपल्या जीवनाच्या या टप्यावर लिंकन एकदम शांत,संयमित होते.त्यांची भाषा खूपच शालीन व संयमित असे. १८६३ मध्ये लिंकनद्वारा लिखित हे पत्र टोकाच्या निंदेपेक्षा कमी नव्हते.


" प्रिय जनरल,


मला नाही वाटत की ली वाचून पळून गेल्यामुळे गंभीर परिस्थिती उद्भवली आहे ह्याची तुम्हाला काही कल्पना असेल.तो आमच्या मुठीत होता.त्याला पकडलं असतं तर युध्द समाप्त झालं असतं.पण आता मात्र युध्द दीर्घ काळापर्यंत सुरू राहील.जेव्हा तुम्ही मागच्या सोमवारी नदीच्या या किनाऱ्याला लीवर हमला करू शकला नाहीत,तर आता तुम्ही तो नदीपार सुरक्षितपणे पळून गेल्यावर कसा काय हल्ला करणार आहात? तुम्ही तुमचे दोन तृतीयांशपेक्षा जास्त सैन्य त्या किनाऱ्याला नेऊ शकत नाही.अशी आशा करणे निश्चितपणे अतार्किक आहे आणि तुम्ही फार काही करू शकाल असे मला वाटत नाही.एक मौल्यवान संधी तुमच्या हातून निसटून गेली आहे याबद्दल मला अत्यंत खेद आहे."


जनरल मीडला हे पत्र वाचून काय वाटले असावे?


मीडला हे पत्र कधीच मिळाले नाही.लिंकनने ते पाठवलेच नाही.हे पत्र लिंकनच्या मृत्यूनंतर त्यांच्या फाइलमध्ये मिळाले.


माझा असा अंदाज आहे आणि फक्त अंदाजच आहे की हे पत्र लिहिल्यावर लिंकनने खिडकीबाहेर पाहिले असेल आणि तो स्वतःशीच बोलला असेल,"एक मिनिट ! कदाचित मी घाई करत असेन.व्हाइट हाऊसच्या शांत वातावरणात बसून मीडवर हल्ला करण्याचा सल्ला देणे माझ्यासाठी सोपे आहे,पण जर मी गट्सबर्गमध्ये असतो आणि जर मी इतकी कत्तल बघितली असती,जितकी मीडने मागच्या आठवड्यात पाहिली आहे,जर माझ्या कानातही जखमी आणि मरणाऱ्या लोकांच्या किंकाळ्या पडल्या असत्या,तर कदाचित मीसुद्धा हल्ला करायला तयार झालो नसतो.जर मी मीडसारखा सुरक्षात्मक प्रवृत्तीचा असतो तर त्याने जे केले तेच मी केले असते. तशी पण आता संधी हातची गेलेलीच आहे.जर मी हे पत्र पाठवीन तर त्यामुळे माझा राग तर शांत होईल,

पण त्यामुळे मीडला खूप दुःख पोचेल.तो माझ्यावर टीका करेल आणि स्वतःला सिध्द करायचा प्रयत्न करेल. यामुळे दुर्भावना निर्माण होईल,सेनापतीच्या रुपात मीडची उपयुक्तता चांगलीच प्रभावित होईल आणि त्यानंतर तो कदाचित सैन्यातून राजीनामासुध्दा देईल."तर मी जसे आधी सांगितले त्याप्रमाणे,लिंकनने ते पत्र बाजूला ठेवून दिले.कटू अनुभवांनी त्यांना हे कळलं होतं की तीव्र टिकेमुळे व रागावण्यामुळे काहीच फायदा होत नाही.


प्रसिध्द लेखक मार्क ट्वेन कधीकधी आपलं भान हरपून रागारागात इतके जहाल पत्र लिहीत असत की कागदाला आग लागावी.उदा.एकदा त्यांनी रागारागात एका व्यक्तीला पत्र लिहिले,

"तुम्हाला जिवंत गाडलं गेलं पाहिजे.तुम्हाला असं व्हावंसं वाटलं तर मला सांगा, म्हणजे मी तशी व्यवस्था करेन."अजून एका प्रसंगी त्यानी एका संपादकाला पत्र लिहून सांगितलं की, "तुमचा प्रूफरीडर माझ्या व्याकरणाच्या आणि विरामचिन्हांच्या चुका काढून त्या सुधारण्याचा प्रयत्न करतो." ट्वेननेआदेश दिला की,"पुढच्या वेळी प्रूफरीडरला सांगा की आपल्या सूचना स्वतःच्या सडलेल्या मेंदूतच राहू देत."


शिल्लक भाग पुढील लेखामध्ये….!




१५/९/२५

मध माशांना दगड मारु नका / Don't throw stones at honeybees.

७ मे १९३१ या दिवशी न्यूयॉर्क शहरात एक जबरदस्त चकमक सुरू होती.चकमक शेवटच्या चरणात होती. अनेक आठवडे पिच्छा पुरवल्यावर पोलिसांनी शेवटी "टू गन-क्राउले" या कुप्रसिध्द खुन्याला चारी बाजूंनी घेरलं होत.हा खूनी सिगारेट,मद्य काहीच पीत नव्हता.वेस्टएंड अ‍ॅव्हेन्यूमध्ये आपल्या प्रेयसीच्या घरात तो दडून बसला होता.दीडशे पोलीस आणि हेरांनी जमिनीपासून छतापर्यंत त्याला चहूबाजूंनी घेरले होते.तो वरच्या मजल्यावर लपला होता.पोलिसांनी छतास छिद्र करून अश्रूधुराचा वापर करून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.त्यांनी आसपासच्या इमारतींवर मशिनगन रोखल्या होत्या.एका तासाहून अधिक वेळ या न्यूयॉर्कच्या भर वस्तीत पिस्तुल व मशीनगन्समधून गोळ्यांची बरसात सुरू होती.क्राउले एका खुर्चीआड लपून पोलिसांवर सतत गोळ्यांचा भडिमार करीत होता. दहा हजारांहून जास्त लोक ही रोमहर्षक चकमक प्रत्यक्ष बघत होते.अशा तऱ्हेचे दृश्य न्यूयॉर्कने याआधी कधी पाहिले नव्हते.


(मध गोळा करायचा असेल तर मधमाश्यांच्या पोळ्यावर दगड फेकू नका.मित्र जोडा आणि प्रभावशाली बना,डेल कार्नेगी,अनु- कृपा कुलकर्णी,मंजुर प्रकाशन हाउस)


जेव्हा टू गन-क्राउले पकडला गेला तेव्हा पोलीस कमिशनर ई.पी.मुलरुने म्हणाले की,न्यूयॉर्कच्या इतिहासात आतापर्यंतच्या

सर्वांत धोकादायक अपराध्यांपैकी तो एक होता.कमिशनरचे म्हणणे होते की,तो अतिशय उलट्या काळजाचा होता.


पण टू गन-क्राउले हा स्वतःला काय समजायचा? आम्हाला हे माहीत आहे,कारण ज्यावेळी पोलिस त्याच्यावर गोळ्या चालवत होते तेव्हा त्याने एक पत्र लिहिले.जेव्हा तो हे पत्र लिहीत होता तेव्हा त्याच्या जखमांमधून वाहणाऱ्या रक्ताचे डाग पत्रावर पडले होते. या पत्रात क्राउलेने लिहिले होते,

"माझ्या कोटाच्या आत एक दुःखी पण दयाळू हृदय आहे-एक असे हृदय जे कुणाला हानी पोहोचवू पाहत नाही."हे लिहिण्यापूर्वीची गोष्ट आहे. क्राउले लाँग आयलँडवरच्या खेड्यातल्या सूनसान रस्त्यावर आपल्या मैत्रिणीबरोबर मजा मारत होता.अचानक एक पोलीस त्याच्याजवळ येऊन त्याला त्याचं लायसेन्स दाखव,असे म्हणू लागला.काही न बोलता क्राउलेने आपले पिस्तूल काढून त्या पोलिसाच्या छातीवर एकामागून एक गोळ्या झाडल्या.जेव्हा तो पोलिस जमिनीवर कोसळला तेव्हा क्राउलेने कारमधून उडी मारली,त्याने त्या पोलिसाचे पिस्तूल काढले आणि त्याने त्या मृत पोलिसाच्या छातीत अजून एक गोळी झाडली. आणि हाच निष्ठुर खुनी आता म्हणत होता,"माझ्या या कोटाच्या खाली एक दुःखी पण दयाळू हृदय आहे,एक असे हृदय जे कुणाला इजा करू इच्छित नाही."


क्रॉउलेला देहांताची शिक्षा सुनावण्यात आली.जेव्हा त्याला सिंगसिंग येथील जेलमध्ये मृत्युदंडासाठी नेण्यात येत होते,तेव्हा तो म्हणाला,"ही लोकांना मारण्याची शिक्षा आहे का? नव्हे,ही स्वतःला वाचवण्याची शिक्षा आहे."या कथेचा सारांश असा,की क्राउले हा स्वतःला कुठल्याच गोष्टींसाठी दोषी मानत नव्हता.


अपराध्यांमध्ये ही सामान्य गोष्ट आहे का? जर तुम्हाला असं वाटत असेल तर आता हे ऐका :


"मी लोकांचे भले करण्यात आपल्या जीवनाची चांगली वर्षे गमावली,जेणेकरून ते सुखी राहू शकतील आणि त्याबद्दल मला शिव्या ऐकायला मिळताहेत आणि पोलिसांपासून लपून छपून फिरावे लागतेय."हे वाक्य अल केपोनचे आहे जो अमेरिकेतला अतिशय कुविख्यात बदमाश होता.शिकागोमध्ये त्याच्यासारखा धोकादायक गँगलीडर दुसरा कुणी नव्हता.पण अल केपोन स्वतःला दोषी किंवा अपराधी मानत नव्हता.तो स्वतःला परोपकारी समजत असे.एक असा परोपकारी, ज्याला लोक नीटपणे समजून घेऊ शकले नाहीत.


नेवार्कचा गुंडही टोळीयुध्दात मरण्याआधी असंच म्हणाला होता.हा गुंड डच शुल्टज् न्यूयॉर्कमधला सर्वांत कुख्यात अपराधी होता,ज्याने एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की तो लोकांचे भले करतो. या विधानाबद्दल त्याला पूर्ण विश्वास होता.


मी या विषयावर न्यूयॉर्कच्या सिंग-सिंग जेलचे अधिकारी लुइस लॉसशी दीर्घ पत्रव्यवहार केला आहे.ते म्हणतात, "या जेलमधील खूपच कमी अपराधी स्वतःला वाईट समजतात.तुम्ही आणि मी जसे आहोत तशीच ती माणसे आहेत.म्हणून ते असा तर्क लढवतात आणि स्वतःला योग्य शाबित करण्याचा प्रयत्न करतात.ते तुम्हाला सांगू शकतात की त्यांनी तिजोरी का फोडली किंवा त्यांना गोळी का चालवावी लागली.चूक-बरोबर तर्काद्वारे अधिकांश अपराधी आपला अपराध योग्य ठरवण्याचा प्रयत्न करतात आणि असं मानतात की त्यांना सजा मिळायला नको होती."


जर अल केपोन,क्राउले,डच शूल्टज् आणि जेलच्या भिंतीआड कैदी असलेले कुख्यात अपराधी स्वतःला दोषी मानत नाहीत तर ते लोक काय करतात ज्यांना तुम्ही-आम्ही भेटतो ?


अमेरिकन स्टोर्सच्या चेनचे संस्थापक जॉन वानामेकरने हे स्विकारले होते की,'तीस वर्षांपूर्वी मला हे समजून आले की कुणालाही दोष देणे हा मूर्खपणा आहे. माझ्यासमोर स्वतःच्याच मर्यादा पार करण्याचे आव्हान पुरेसे आहे आणि ईश्वराने बुद्धीचा नजराणा सर्वांनाच एकसारखा दिला नाही,त्यामुळे मी फारसे डोके खपवत नाही.'


वानामेकरने हा धडा लवकर शिकून घेतला,पण मला हा धडा शिकायला तेहत्तीस वर्षे लागली.ज्या दरम्यान माझ्याकडून अनेक चुका घडल्या आणि तेव्हा कुठे मला असं आढळून आलं की शंभरातील नव्व्याण्णव लोक कुठल्याही गोष्टीसाठी स्वतःला दोषी मानत नाहीत, आपली चूक कधीच कबूल करत नाहीत.


कुणावर टिका करण्याने काही लाभ होत नाही.समोरची व्यक्ती आपला बचाव करू लागते,बहाणे बनवू लागते किंवा तर्क लढवू लागते.टीका धोकादायक असू शकते, कारण त्यामुळे त्या व्यक्तीच्या बहुमूल्य आत्मसन्मानाला ठेच पोचते,

तिचे मन दुखावले जाते अन् ती तुमच्याबद्दल आकस ठेवते.


जगप्रसिध्द मनोवैज्ञानिक बी.एफ.स्किनरने आपल्या काही प्रयोगांद्वारे हे सिध्द केले आहे,की ज्या जनावराला चांगल्या वागणुकीबद्दल बक्षीस दिले जाते ते त्या जनावरापेक्षा लवकर शिकते ज्याला वाईट वागणुकीबद्दल शिक्षा दिली जाते.नंतर झालेल्या संशोधनाद्वारे हे कळून आलं की माणसाच्या बाबतीतही खरे आहे.टिकेमुळे कुणीच सुधारत नाही. याउलट संबंध मात्र नक्कीच बिघडतात.अजून एक महान मनोवैज्ञानिक हॅन्स सॅल्येनं म्हटलं आहे, "जेवढे आम्ही स्तुतीसाठी भुकेले असतो,तेवढेच निंदेला घाबरतो."


आलोचना किंवा निंदा केल्याने कर्मचारी,परिवाराचे सदस्य आणि मित्रांचे मनोबल खचते आणि त्या स्थितीत काहीच बदल किंवा सुधारणा होत नाही ज्यासाठी आलोचना केली जाते.


एनिड,ऑक्लाहामाचे जॉर्ज बी.जॉन्स्टन एका इंजिनियरिंग कंपनीचे सुरक्षा अधिकारी होते.त्यांची अजून एक जबाबदारी अशी होती की जेव्हा कर्मचारी फिल्डमध्ये काम करत असतील तेव्हा त्यांनी हेल्मेट घातले आहे की नाही हे बघायचे.आधी त्यांना कुणा कर्मचाऱ्याने हेल्मेट घातले नसले की अजिबात सहन होत नसे.ते नियमांचा दाखला देत त्यांना नियमांचे सक्त पालन करण्यास सांगत.याचा परिणाम असा होई की कर्मचारी त्यांच्या आदेशाचे मारून-मुटकून पालन तर करीत,पण ते गेल्याबरोबर हेल्मेट काढून टाकत.यावर त्यांनी दुसरा उपाय शोधून काढला.पुन्हा जेव्हा त्याने काही कर्मचाऱ्यांना बिना हेल्मेट पाहिले तेव्हा त्यांनी त्यांना 'हे हेल्मेट आरामदायी नाही का?' असे विचारले.मग हसत त्यांना सांगितले की,इजा होण्यापासून बचाव होण्यासाठी हेल्मेट घालणे आवश्यक आहे.कामाच्या वेळी स्व-सुरक्षेसाठी ते घालायलाच हवे.याचा परिणाम असा झाला की कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने हेल्मेट घालायला सुरुवात केली आणि त्यांच्या मनातील रागाची भावना नाहीशी झाली.


इतिहासात तुम्हाला अशी हजारो उदाहरणे आढळतील, जी सांगतात की टीका करण्याने काहीच फायदा होत नाही.थिओडोर रुझवेल्ट आणि राष्ट्रपती टॅटमधल्या विवादाचे उदाहरण घ्या.एक असा विवाद ज्यामुळे रिपब्लिकन पार्टीचे विभाजन झाले,वुड्रो विल्सनला व्हाइट हाऊसमध्ये बसवून दिले आणि पहिल्या महायुध्दात मोठ्या चकचकीत अक्षरात काही ओळी नमूद केल्या आणि इतिहासाचा रोखच बदलून टाकला.


जेव्हा रुझवेल्ट १९०८ मध्ये व्हाइट हाऊसच्या बाहेर गेले तेव्हा त्यांनी टॅटचे समर्थन केले,जे राष्ट्रपती म्हणून निवडून आले.मग रुझवेल्ट सिंहाची शिकार करायला आफ्रिकेत निघून गेले.

परतल्यावर त्यांनी परिस्थिती बघितली तर ते भडकून उठले.त्यांनी अनुदारवादासाठी टॅटची टीका करणे सुरू केले आणि तिसऱ्यांदा स्वतः राष्ट्रपती होण्याचा प्रयत्न केला.त्यांनी बुल मूस पार्टीचे संगठन केले आणि जी.पी.ओ.ला जवळपास उध्वस्त केले.पुढच्या निवडणूकीत विलीयन हॉवर्ड टॅट व त्यांची रिपब्लिकन पार्टीचा दारुण पराभव झाला आणि त्याला केवळ व्हर्मांट व ऊटाइमध्येच सफलता मिळाली. या पार्टीचा हा आतापर्यंतचा सर्वांत लाजिरवाणा पराभव होता.या पराभवासाठी रुझवेल्टने टॅटला दोषी ठरवले, पण राष्ट्रपती टॅटने स्वतःला दोषी मानले का? अजिबात नाही.डोळ्यात अश्रू घेऊन भरल्या गळ्याने टॅट म्हणाला, "मी जे केलं, त्याखेरीज मी काय करू शकलो असतो ?"यात दोष कुणाचा होता? रुझवेल्टचा की टॅटचा ? खरे सांगायचे तर हे मला माहिती नाही आणि मला त्याची पर्वाही नाही.मी फक्त सांगू इच्छितो की, रुझवेल्टची टिका टॅटकडून हे वदवून घेऊ शकली नाही की तो दोषी होता.यातून फक्त हेच हाती लागले की टॅट स्वतःच्या बचावासाठी समर्थन देऊ लागले आणि डोळ्यांत पाणी आणून म्हणाले, "मी जे केले,त्याखेरीज मी काय करू शकलो असतो?"


टिपॉटडोम ऑईल स्कँडलचंच उदाहरण घ्या. १९२० च्या दशकाच्या सुरुवातीला हा वर्तमानपत्राचा चर्चेचा विषय होता.त्याने देशाला मुळासकट हलवून टाकले. लोकांच्या आठवणीत अमेरिकन सार्वजनिक जीवनात इतके मोठे प्रकरण याआधी कधीच झाले नव्हते.इथे त्या प्रकरणाबद्दल काही तथ्ये सांगितली जातील. 


हार्डिंगच्या कॅबिनेटमधल्या मंत्री अल्बर्ट बी. फॉलला एल्क हिल आणि टीपॉट डोममध्ये तेलाचा सरकारी भांडार लीजवर द्यायचा होता.ते तेलभांडार,नौसेनेच्या भविष्यकालीन उपयोगासाठी वेगळे ठेवले होते.फॉलने त्याचा लिलाव केला,की त्यांच्यासाठी टेंडर मागवले ? नाही.त्याऐवजी त्यांनी आपला मित्र डाडवर्ड एल. डॉहेनीला हे फायद्याचे कंत्राट थाळीत आयते वाढून दिले.

आणि यावर डॉहेनीने काय केले? त्याने ताबडतोब फॉलला दहा लाख डॉलर्स काढून दिले आणि त्याला 'कर्ज' हे नाव दिले.मग फॉलने जिल्ह्याच्या युनायटेड स्टेट्स मरीन्सला आदेश दिला की एल्क हिल भांडारातून निघणाऱ्या तेलाचा फायदा उठवणाऱ्या कंपन्या त्या जागेपासून हटवल्या जातील.जेव्हा कंपन्यांना बंदुकीच्या धाकावर तिथून हटवले गेले तेव्हा त्यांनी दुःखी होऊन कोर्टात धाव घेतली आणि मग टीपॉट डोम प्रकरणाचा रहस्यभेद झाला.त्यामुळे इतका तमाशा झाला की हार्डिंग सरकार धोक्यात आले.पूर्ण देश हादरून गेला.रिपब्लिकन पार्टीचे भविष्य अंधकारमय दिसू लागले आणि अल्बर्ट बी. फॉलला तुरुंगात जावे लागले.


लेख अपूर्ण एकुण तीन भागात…त्यातील हा पहिला भाग….!!!

१३/९/२५

मी... माझा बाप... आणि माझी आई... !!! Me... my father... and my mother... !!!


हि मला भेटली होती साधारण तीन वर्षांपुर्वी ... ! 

वय साधारण 35,सोबत 5-6 वर्षांचा मुलगा...! 

एका धार्मिक स्थळाबाहेर मागुन खायची. 

औषधं देता देता ... चांगली ओळख झाली.मला ती दादा म्हणायला लागली ! 

दरवेळी मला कोडं पडायचं... हा मुलगा कुणाचा ? जर तीचा असेल,तर याचे वडिल कुठं आहेत ? याला वडिल असतील,तर मग हि एकटीच कशी दिसते ? 

एकेदिवशी मी विचारलंच... ! 

.... लहानपणीच आईवडील वारले,जवळचं कुणी नाही...पुर्णतः निराधार. 

जगण्यासाठी भीक मागणं हे सोपं काम निवडलं. दिवसा भीक मागायची आणि रात्री कुठंतरी आडोसा शोधुन झोपायचं,हा रोजचा दिनक्रम !

रानटी जनावरं फक्त जंगलातच नाही,तर समाजातही अनेक ठिकाणी सापडतात. 

मला तर वाटतं नरभक्षक जनावरं जंगलात आणि मादीभक्षक जनावरं समाजात राहतात ! 

अशाच एका मादीभक्षक जनावराच्या तावडीत ती एका रात्री सापडली... आरडाओरडा केला...पण तो ऐकायला कुणालाच वेळ नव्हता... ! प्रत्येकाला कुठंतरी पोचायचं होतं... ! 

या झटापटीत एक मुल हिच्या पदरात पडलं... !

एकटीची जगायची भ्रांत,त्यात अजुन एकाची भर पडली. ठिक आहे,जगात आपलं असं कुणीच नव्हतं, आता आपलं म्हणावं,असं आपलं मुल तरी आपल्याबरोबर आहे,आधार होईल भविष्यात जगण्याचा या सकारात्मक विचारानं तीनं आईपण जपलं...मुलाला जमेल तसं ती त्याला वाढवत गेली.! आणि याचवेळी मला ती भेटली होती.... तीनेक वर्षांपुर्वी ! 

'काम का नाही करत गं ?' मी तीला तेव्हा विचारायचो. 

ती फक्त मान डोलवत गुढ हसायची. 

वेगवेगळे व्यवसाय मी तीला सुचवायचो...मदत करतो असं म्हणायचो.पण ती ऐकल्यासारखं करायची
...आणि पोराला हाताला धरुन दुर जायची ! उदास होवुन शुन्यात बघत रहायची ! बरोबर आहे,इतक्या मोठ्या विश्वासघाताची भेट मिळाल्यानंतर तीनं माझ्यावर तरी का विश्वास ठेवावा ? 

भरल्या पोटानं दिलेला सल्ला उपाशी पोटी पचत नाही हेच खरं !

गाण्यातले सुर हरवतात तेव्हा ते गाणं बेसुर होतं... आणि जगण्यातला नुर हरवला की ते जगणं भेसुर होतं... ! 

असं सर्वच हरवलेलं ती...!

एकट्या राहणाऱ्या या तरुण मुलीला सांभाळुन घेणारा,मनासारखा कुणीतरी जोडीदार मिळाला, म्हणजे ती डिप्रेशन मधुन बाहेर येईल असं मला डाॕक्टर म्हणुन सारखं वाटायचं.

डिप्रेशन च्या पेशंटला औषध न लगे... ! 

औषध "नल" गे तीजला !

औषध फक्त त्या पेशंटचा हक्काचा "नल" ! 

अत्याचार झालेल्या,भीक मागणा-या मुलीला तीच्या मुलासह कोण स्विकारणार ? हा मोठा प्रश्न होता.तीला हा हक्काचा "नल" कधी सापडणार.... ? कसा ? दिवसांवर दिवस जात होते.अशात मला एक तरुण भेटला.चुणचुणीत आणि गोड बोलणारा. 

यानेही आयुष्यात खुप थपडा खाल्ल्या होत्या, ढोलासारख्या !

थपडा मारुनही ढोल नाद निर्माण करतो.... ! 

हा सुद्धा त्या ढोलासारखाच ! 

थपडा खावुनही बोलणं आणि वागणं अतिशय नम्र आणि गोड,एक नाद निर्माण करणारं ! 

आपल्या शब्दांत नम्रता आणि गोडवा असेल तर शब्दांना वजन प्राप्त होतं.शब्दांतली नम्रता आणि गोडवा हरवला की याच शब्दांचा स्वतःला भार होतो आणि दुस-याला ओझं !

असो, तर, यालाही मी काम करण्यासाठी विनवलं...! 

याला भीक मागायचीच नव्हती... कमीपणा वाटायचा याला भीक मागण्यात... व्यवसाय सुरु करण्याची जिद्द होती याच्यात,पण संधी मिळत नव्हती ! 

मी हात देतोय म्हटल्यावर,झट्दिशी त्याने तो पकडला.व्यवसाय सुरु केला... आणि बघता बघता छान चालायलाही लागला... ! 

अतिशय प्रामाणिक आणि मनमिळावु असलेला हा मुलगा मला आवडायचा. 

एकदा गंमतीने याला म्हटलं...'काय मालक ? आता लग्न करा की राव ...!'

'करु की सर,तुम्ही बघा मुलगी... सांगाल त्या मुलीशी लग्न करतो...' तो म्हणाला होता. 

हसुन हा विषय तिथं संपला खरा...

पण "सांगाल त्या मुलीशी लग्न करतो..." या त्याच्या वाक्यानं मला रात्र रात्र झोप यायची नाही...! एकदा मनाचा हिय्या करुन याला "ती" ची सर्व परिस्थिती सांगितली.

हात जोडुन म्हणालो..करशील का रे लग्न तीच्याशी ?

क्षणभर विचार करत,माझ्या नजरेला नजर भिडवुन म्हणाला,'माझ्यासारख्या भीक मागणा-याला तुम्ही हात देवुन बाहेर काढलंत सर,मी रोज विचार करायचो की या डाॕक्टरच्या उपकाराची परतफेड कशी करायची ?' 

'उभं असलेल्या माणसाला पाडायला फार ताकद लागत नाही,पडलेल्या माणसाला उठवायला जास्त ताकद लागते,हे मी तुमच्याकडनं शिकलो सर...' 

'तुम्ही मला तेव्हा उठवलंत...आता पडलेल्या कुणालातरी उठवायची पाळी माझी आहे... तुम्ही जे माझ्यासाठी तेव्हा केलंत,आज ते मी पुन्हा करणार तुमच्यासाठी ...!'

माझ्या डोळ्यात पाणी ठरेना! 

तो तीच्याशी लग्नाला तयार झाला या पेक्षाही आपण सावरल्यावर,दुस-याला हात द्यायचा असतो,हे तो शिकला यात मला जास्त आनंद होता...! माझ्यापेक्षा लहान आहे तो... पण मला त्याचे पाय धरावेसे वाटले...!

 पाय तरी कसं म्हणु ? 

चरण म्हणणंच जास्त योग्य ! 

भरकटतं ते पाऊल,घसरतात ते पाय... आणि दिशा दाखवतात ते चरण... ! 

अत्याचारीत मुलीला तीच्या मुलासह स्विकारण्याची तयारी आणि तीच्या मुलाला आपलं नाव देवुन त्यांच्या आयुष्याला दिशा देण्याचा विचार करणा-या त्या तरुणाचे पाय मला जणु चरणच भासले... !

यानंतर दोघांची भेट घडवुन आणली !

दोघांनी एकमेकांना समजुन घेवुन,पुर्ण विचाराअंती निर्णय घ्यावा.कोणताही निर्णय घेण्याचा समसमान अधिकार दोघांनाही आहे,कसलीच बळजबरी कुणी कुणावर करणार नाही या बोलीवर त्यांना बोलणं आणि भेटण्याची संधी दिली. 

एकेदिवशी दोघांनी हसत हसत येवुन निर्णय दिला... आम्ही दोघेही स्वखुशीनं लग्नाला तयार आहोत... ! 

तरुण मुलीच्या लग्नाची काळजी असणा-या वधुपित्याची काय गत होत असेल हे मी त्यावेळी प्रत्यक्ष अनुभवलं ! 

आयुष्याच्या या नाटकात यावेळी सगळ्याच भुमिका मलाच पार पाडाव्या लागल्या. हे नाटक मी खरोखर जगलो...! 

मीच पुरोहीत होवुन कधी लग्नाची तारीख काढली... तर मीच माझ्याशी बैठक घेवुन दोन्ही बाजुची यादीही केली ..!

मुलाची बहिण होवुन मीच माझ्याशी भांडलो... तर मुलीची आई होवुन स्वतःशीच उगीच रडलो...! 

या लग्नात मी वरातही झालो... आणि वरातीची म्हातारी घोडीही झालो...!

मुंडावळ्या बनुन कधी कपाळावर झळकलो तर पायताण बनुन पायातही सरकलो... !

भर लग्नात मीच माझ्यावर रुसलो आणि मीच माझी समजुत काढुन पुन्हा खोटंखोटं हसलो ... !

आणि त्याच्याबरोबर जातांना,ज्या क्षणी दादा म्हणत मला तीनं गळामिठी मारली त्याक्षणी त्या मी तीचा बापच झालो... !

आज या लग्नाला दोन वर्षे झाली. 

दोघंही आनंदात आहेत,तीच्या अगोदर असलेल्या मुलासह ! या मुलाचं मला कौतुक वाटतं... आपल्या आईच्या लग्नाला तो हजर होता...! 

कळता झाल्यावर लोक त्याला टोचुन बोलतील का... ? सध्या माझ्याकडं या प्रश्नाचं उत्तर नाही !

असो ! 

जमिनीवर पडते ती सावली... ! हि सावली कुणाला आधार देते तेव्हाच ती छाया होते !!!

हे दोघेही एकमेकांना आधार देत,मुलाची छाया बनले आहेत.बीनबापाच्या मुलाला त्याने आपलं नाव दिलं आहे,ख-या अर्थानं तो बाप झाला आहे...! बेसुर आणि भेसुर आयुष्य आता संगीत झालंय !संगीत ऐकायला दरवेळी त्यातलं काही कळावंच लागतं असं नाही... मैफिल जमली की गायकाच्या हृदयात आधी तार झंकारते... ती ऐकु आली म्हणजे झालं... ! 

पहिली दाद या झंकाराला दिली...की कागदावरचे शब्द मोहरुन कविता होतात... ! या कवितेत गाणा-याचा आणि ऐकणा-याचा भाव एकरुप झाला की त्याचं भावगीत तयार होतं... ! 

या दोघांच्या या गाण्याला दाद देणारा मी फक्त रसिक !!! 

आज हे सारं आठवायचं कारण म्हणजे...

"ती" अजुन एकदा आई होणार आहे हे मला "त्या"ने जानेवारी 2020 मध्ये सांगितलं.म्हणाला सर आत्ता चौथा महिना सुरु आहे तीला... 

'होय बाबा,आता सगळे कामधंदे सोडुन दुपटी शिवत बसतो मी ...' माझ्या या बोलण्यावर "तो" लाजला होता. 

यानंतर दवाखान्यात नोंदणी, तपासण्या वैगेरे आटोपुन 19 जुन 2020 ला ती प्रसुत झाली. मुलगा झाला ! 

"त्या"ला आणि "ती"ला भेटायला आज 20 जुन ला मी पेढे घेवुन गेलो. 

दोघांच्या डोळ्यातला आनंद लपत नव्हता.

लाॕकडाउन मुळे याचा व्यवसाय ठप्प आहे, भल्याभल्यांची गाळण उडाली आहे, याचा कसा टिकाव लागणार ?

पण हरकत नाही,ये भी सही ! 

चालतांना कधीतरी काटेही टोचलेलं बरं असतं, म्हणजे माणुस त्याच जागी रेंगाळत नाही... काटे बोचायला लागले की,ती जागा सोडण्यासाठी का होईना,पण चालणाराचा वेग वाढतो... ! 

तो,नको नको म्हणत असतांना,त्याच्या खिशात साडेचार हजार रुपये कोंबले. 

तो म्हणाला, 'सर, हाॕस्पिटलची बिलं,औषधांचा खर्च आणि बाकीचंही सगळं तुम्हीच करताय,वर अजुन हे पैसे कशाला... ?' 

'पहिली डिलीव्हरी माहेरीच असते बाबा,पोरीच्या बापालाच करावं लागतंय सगळं...' मी खळखळुन हसत म्हणालो... 

मी हसत होतो आणि मागं मला तीच्या हुंदक्यांचा आवाज जाणवत होता ... !

ती नाहीच बोलली काही... पण तीचे डोळे बोलायचे थांबत नव्हते... ! 

मी बाळाकडे पाहिलं... इतकं देखणं बाळ... ! 

कमळ चिखलात उगवतं हेच खरं... !

'तुझ्यासारखंच आहे गं बाळ' मी म्हटलं. 

पालथ्या मुठीनं डोळे पुसुन ती हसायला लागली... !

कोणत्याही रडणा-या आईजवळ जावुन बाळाचं कौतुक करावं,स्सेम तुझ्यावरच गेलंय बघ म्हणावं... ती हसणारच !

कारण वजन फुलांचं होत असतं,सुगंधाचं नाही...!

एखाद्या आईच्या ममतेचं वजन कसं करणार ? 

ते ही या न दिसणाऱ्या सुगंधासारखंच !

"बाळाचं नाव काय ठेवायचं ठरवलंय ?" निरोप घेत मी उठत सहजच विचारलं. 

अगदी सहज आवाजात ती म्हणाली,'हो ठरवलंय ना ! अभिजीत नाव ठेवणार आहे आम्ही बाळाचं ... !' 

'क्काय ... ?' खुप जोरात मी हे वाक्य ओरडुन बोललो असेन.कारण दवाखान्यातल्या अनेकांनी चमकुन पाहिलं माझ्याकडं ! 

जीभ चावत,हळु आवाजात म्हटलं...,'का गं ? अभिजीत का ?'

म्हणाली, 'दादा, मला ना आई,ना बाप,ना भाऊ ना बहिण...पण तुम्ही माझी आई, बाप,भाऊ आणि बहिण होवुन ती उणिव भरुन काढली ! 

आज माझ्या मुलाचं नाव मी जर अभिजीत ठेवलं तर मला त्याला सतत जाणिव करुन देता येईल...

कितीही मोठा झालास तरी कधीतरी,तान्हं बाळ होवुन,मुल नसलेल्या आईचं मुल हो....

अनाथ एखाद्या बहिणीचा भाऊ हो...

रस्त्यांत तळमळत पडलेल्या पोराची कधीमधी आई हो...आणि माझ्यासारख्या रस्त्यांवर पडलेल्या एखाद्या पोरीचा आयुष्यात कधीतरी बाप हो...

मी शिकवीन त्याला...

पुढचं तीला बोलता येईना... 

आणि मलाही ऐकु येईना....

जगातल्या कोणत्याही पुरस्कारापेक्षा माझ्यासाठी हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार होता... !

माझा सन्मान होता !

दवाखान्यातुन मी निघालो... तर "तो" आडवा आला,म्हणाला, 'सर, ठेवु ना तुमचंच नाव बाळाला... ? तुमची परवानगी हवीय... !' 

म्हटलं, 'येड्या,परवानगी कसली मागतोस,माझा बाप झालास की रे आज... बाप परवानगी मागत नाही... ! 

तो माझ्या पायाशी झुकला... ! 

आणि मी, नव्यानंच मला जन्म देणाऱ्या माझ्या आईबापाच्या पायाशी नतमस्तक झालो... !

20.6.20

डाॕ.अभिजीत सोनवणे,डाॕक्टर फाॕर बेगर्स


११/९/२५

जंगल म्हणजे पाण्याचा पंप / A forest is a water pump,

जंगलापर्यंत पाणी पोचतं तरी कसं? किंवा अजून मागे जाऊन पृथ्वीतलावर तरी कुठून येतं? हा प्रश्न अगदी सोपा वाटला तरी याचं उत्तर तसं सोपं नाही.याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे पाण्याच्या पातळीपेक्षा जमिनीची पातळी उंचावर आहे.

गुरुत्वाकर्षणामुळे पाणी खालच्या पातळीकडे जायला हवं आणि असं झालं असतं तर भूखंड कोरडे पडले असते.असं होत नाही याचं एकमेव कारण म्हणजे ढगाने केलेला पाणीपुरवठा. 


समुद्रावर ढंग तयार होतात,वाऱ्याने ते भूखंडाकडे ढकलले जातात.आणि भूखंडावर त्यांचं रूपांतर पावसात होतं.पण किनारपट्टीपासून काही शेकडो मैलांपर्यंतच असं होतं.जसे आपण भूखंडात आत आत जातो तसा पाऊस कमी होत जातो कारण ढग रिकामे होत जातात.साधारण किनारपट्टीपासून चारशे किलो

मीटरवर जमीन इतकी कोरडी होती की वाळवंटाला सुरुवात होते.आपण जर फक्त पर्जन्यवृष्टी वरती अवलंबून बसलो तर भूखंडाच्या एका निमुळत्या पट्टीवर जीवन फुलणं शक्य झालं असतं आणि आतला भाग कोरडाच राहिला असता.आणि याच कारणासाठी म्हणून झाडांचे आभार !


वनस्पतींमध्ये सर्वाधिक पालवी वृक्षांना असते.एक चौरस यार्ड जंगलासाठी सुमारे सत्तावीस चौरस यार्ड सूचीपर्णी किंवा रुंदपर्णी पानांचा डेरा असतो. 


प्रत्येक पावसाचा काही भाग झाडांकडून घेतला जातो आणि तो पुन्हा बाष्पीभवन होऊन हवेत सोडला जातो. याच्या व्यतिरिक्त दर उन्हाळ्यात एक चौरस मैल जंगलासाठी सुमारे ८५०० घन यार्ड पाणी लागतं. या पाण्याचं बाष्पोत्सर्जन होत. 


या वाफेचे नवीन ढग बनतात,जे आतल्या भागात जाऊन तिथे पाऊस पाडतात.पण या चक्राकार प्रक्रियेमुळे अगदी आतपर्यंत पाऊस पोचतो.असा पाण्याचा पंप इतका कार्यक्षम आहे की,अ‍ॅमेझॉन खोऱ्यासारख्या काही ठिकाणी,हजारो मैल आतपर्यंत मुसळधार पाऊस पडतो.


पण हा पंप सक्रिय होण्यासाठी काही अटी आहेत. त्यासाठी समुद्रापासून आतपर्यंत अखंड जंगल असलं पाहिजे.आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे किनारपट्टीवर असलेली जंगल या पंपाचा पाया आहे. तिथं जंगलं नसली तर हे शक्य होत नाही.हा महत्त्वाचा शोध लावण्याचं श्रेय शास्त्रज्ञ रशियामधील सेंट पीटर्सबर्गच्या अनस्तासिया माकारीवा यांना देतात. 


जगामधील विविध जंगलातून केलेल्या संशोधनात हेच दिसून आलं.वर्षावने (रेनफॉरेस्ट) असो किंवा सायबेरिया मधील टाइगा,ही सर्व जंगलं जीवनदायी आर्द्रता अगदी आतपर्यंत पोहोचवतात.आणि संशोधकांना हेही दिसलं की,किनार

पट्टीवरची जंगलं गेली तर ही प्रक्रिया थांबते. हे म्हणजे विजेवर चालणाऱ्या पाण्याच्या पंपाचा शोषण करणारा पाईप टाकीतून काढून टाकण्यासारखं आहे.ब्राझीलमध्ये याची प्रचीती येते.इथे अ‍ॅमेझॉनची वर्षावने हळूहळू कोरडी होत चालली आहेत.

सुदैवाने,विरळ असली तरीही तिथे अजून जंगले आहेत.उत्तर गोलार्धातील सूचीपर्णी जंगले यापेक्षा वेगळ्या पद्धतीनेही हवामानावर आपला प्रभाव टाकतात आणि पाण्याचे नियोजन करतात. सूचीपर्णी झाडांमधून टरपिन नावाचे द्रव्य सोडले जाते. याचे मुख्य काम म्हणजे कीटक आणि आजारापासून झाडाचा बचाव करणे. या द्रव्याचे अणू जेव्हा हवेत राहतात तेव्हा आर्द्रता त्यांच्याभोवती घनरूपात जमा होते आणि त्याचे ढग बनतात.अशा प्रकारे ओसाड क्षेत्रापेक्षा दुप्पट घनतेचे ढग जंगलातून बनतात.


 यामुळे पावसाची तर शक्यता वाढतेच पण ढगांमुळे सुमारे ५ टक्के सूर्यप्रकाश प्रतिबिंबित होतो आणि त्या भागातले तापमान कमी होते.आता सूचीपर्णी झाडांच्या आवडीप्रमाणे वातावरण गार आणि ओलसर होते. जंगले आणि हवामानाचा हा परस्परसंबंध बघता, जंगलांमुळे जागतिक हवामान बदलाचा वेग नक्कीच कमी होत असेल.मध्य युरोपीय परिसंस्थांना नियमित पाऊस महत्त्वाचा असतो,कारण पाणी आणि जंगलाचा असा अतूट संबंध आहे.

जंगलं,ओढे,तळी या सर्व परिसंस्थांना त्यांच्या रहिवाशांना स्थिर वातावरण द्यायचे असते.गोड्या पाण्यातली गोगलगाय या प्राण्याला परिसंस्थेतला बदल फारसा प्रिय नाही.त्यांच्या प्रजाती लांबीला जेमतेम ०.०८ इंचापर्यंत असतात.साधारण ४६ अंश फॅरनहाईटपेक्षा जास्त तापमान त्यांना आवडत नाही.याचं कारण म्हणजे त्यांचे पूर्वज हिमयुग संपत होते तेव्हा विरघळणाऱ्या हिमनद्यातून राहात होते.


यांच्या आवडीची परिस्थिती जंगलांमधल्या स्वच्छ झऱ्यांमधून मिळते.भूगर्भातील पाणी जमिनीच्या पृष्ठभागावर येते तेव्हा ते शीतल असते. खोल जमिनीत असलेले हे पाणी उष्णतेपासून सुरक्षित असते, त्यामुळे थंडी सारखेच उन्हाळ्यातही गार असते.आज इथे हिमनद्या नाहीत पण त्या गोगलगायींसाठी हे पाणी योग्य आसरा देते.पाणी याचा अर्थ भूगर्भातील पाण्याला वर्षभर पृष्ठभागावर झऱ्याच्या स्वरूपात यायला हवे.आणि असे झरे बनवण्यासाठी जंगलाची भूमिका महत्त्वाची ठरते. जंगलाची जमीन पडणारा सर्व पाऊस एका मोठ्या स्पंज बोळ्यासारखा शोषून घेते.पानांमुळे पावसाचा जमिनीवर पडण्याचा जोर कमी होतो आणि थेंब हळुवारपणे मातीवर पडतात.इथली जमीन भुसभुशीत असल्यामुळे पाणी शोषले जाते.थेंब एकत्र येऊन त्याचा ओघ होऊन वाहून जाऊ शकत नाही.एकदा का माती पाण्याने चपचपित झाली की मग अतिरिक्त आर्द्रता हळुवारपणे सोडून दिली जाते. पण वर्षानुवर्ष त्यालाही शोषून घेऊन त्याचा प्रवास खोल जात राहतो.या अतिरिक्त आर्द्रतेला सूर्यप्रकाश पुन्हा दिसण्यासाठी काही दशकं लागणार असतात. त्यामुळे वातावरणाची दुष्काळ किंवा अतिवृष्टी अशी दोलायमान परिस्थिती होत नाही. तो बुडबुडणारा झरा चालूच राहतो.


द हिडन लाईफ ऑफ ट्रीज,पी ट र वो ह्ल ले बे न,अनुवाद -

 गुरुदास नूलकर,अरविंद घनश्याम पाटकर,मनोविकास प्रकाशन


पण तो सतत बुडबुडत राहतो असेही नाही.अनेकदा तो दलदलीच्या गडद ठिपक्यासारखा दिसतो.त्यातून येणारे पाणी ओढ्याच्या दिशेने जात असते.तुम्ही जर गुडघ्यावर बसून हा झरा जवळून पाहिलात तर त्यातून पाण्याच्या बारीक धारा येताना दिसतील.पण हे भूजल आहे का पृष्ठभागावरचं पावसाचं उरलंसुरलं पाणी आहे? त्यासाठी तुम्हाला थर्मामीटर वापरावं लागेल. पाण्याचं तापमान ४८ अंश फॅरनहाईटपेक्षा कमी आहे का? तर मग ते नक्कीच झऱ्याचे पाणी आहे.पण असं कोण थर्मामीटर घेऊन हिंडतो? तर मग त्याला दुसरा उपाय म्हणजे घट्ट बर्फ जमा झालेला असताना इथे येऊन पहा.आजूबाजूलाही डबकी आणि जमिनीवर साचलेलं पावसाचं पाणी बर्फरूपी असेल,पण या झऱ्यातून मात्र द्रवरूपातच पाणी येत असतं.गोड्या पाण्यातल्या गोगलगायींचा हाच तर अधिवास आहे. इथंच त्यांना हवे तसेच तापमान मिळते.पण ही परिस्थिती काही फक्त जंगलातल्या जमिनीमुळे होत नाही.उन्हाळ्यामध्ये असा सूक्ष्म अधिवास गरम होऊन गोगलगायींना ताप होऊ शकतो.पण अशा वेळेस झाडांचा डेरा सूर्यप्रकाश अडवतो.


जंगलांकडून ओढ्यांना अशीच किंवा याहीपेक्षा महत्त्वाची सेवा मिळते.


यांना ज्याप्रमाणे सतत ताजे पाणी मिळत असते तसे ओढ्याला होत नाही त्यामुळे त्यांच्या तापमानात जास्त प्रमाणात बदल होऊ शकतो.बाहेरच्या जगात जीवनाची सुरुवात करण्याची वाट बघणारे सॅलमँडर आणि बेडकांची पिले या ओढ्यात असतात.

टिकवण्यासाठी त्यांनाही पाण्याची गरज असते. पण जर पाण्याचा बर्फ झाला तर पिले या ओढ्यात असतात.गोड्या पाण्यातील गोगलगायी प्रमाणेच प्राणवायू टिकवण्यासाठी त्यांनाही पाण्याची गरज असते.पण जर पाण्याचा बर्फ झाला तर पिले मरतील.आणि इथे पानझडी वृक्षाची मदत होते. हिवाळ्यात जेव्हा सूर्याची उष्णता कमी होते तेव्हा त्यांच्या फांद्या ऊब देतात.ओबडधोबड जमिनीवरील पाण्याच्या प्रवाहामुळे बर्फ होण्याचे टळते.वसंत ऋतूत जेव्हा सूर्य वर चढतो आणि उष्णता वाढते तेव्हा या झाडांना पालवी फुटते आणि वाहणाऱ्या ओढ्याला सावली मिळते.पुन्हा पानझडीच्या ऋतूत थंडीची चाहूल लागते तेव्हा पानगळ सुरू होते आणि ओढ्यासाठी आकाश उघडे होते.पण सूचीपर्णी वृक्षांच्या खालून वाहणाऱ्या ओढ्यांसाठी परिस्थिती अशी सोपी नसते. हिवाळ्यात प्रचंड थंडी पडते आणि पाणी गोठू शकते. हवेत पुन्हा ऊब यायला वसंताची वाट पाहावी लागते म्हणून ओढ्यात जलचरांना प्रतिकूल परिस्थिती असते. स्प्रूस वृक्षांना आपले पाय ओले करायला आवडत नसल्यामुळे जंगलात असे अंधारातून वाहणारे ओढे फार आढळत नाहीत.पण लागवडीच्या जंगलात मात्र सूचीपर्णी वृक्ष आणि ओढ्यांमधील जीवांचे असे द्वंद्व चालू असते.झाडे वठल्यावरही ओढ्यांच्या आयुष्यातले त्यांचे महत्त्व संपत नाही.बीच वृक्ष एखाद्या ओढ्यावर वठून पडला की तो तिथं काही दशकं राहतो.त्याचे छोटे धरण तयार होते आणि तिथं जलचरांसाठी पाण्याचे संथ आसरे तयार होतात.फायर सॅलमँडरच्या पिल्लांना याचा फायदा होतो.ती छोट्या पालीसारखी दिसतात, पण त्यांच्या कानामागे मऊ श्वसन अवयव असतो. त्यांच्या शरीरावर बारीक गडद खुणा असतात आणि शरीराला पाय जुळतात तिथे एक पिवळा ठिपका असतो.जंगलातल्या थंड पाण्यात ते क्रॉफिश माशांसाठी दबा धरून बसतात.हे त्यांचे आवडते खाद्य आहे.यांना शुद्ध पारदर्शक पाणी लागते आणि ही वठलेली झाडं त्यांना तसे पाणी पुरवते.ओढ्यातून येणारी माती,कचरा पडलेल्या झाडांमुळे तयार झालेल्या धरणात अडकतो आणि सूक्ष्म जीवांना त्याचे विघटन करायला वेळ मिळतो.

कांपाऊस पडून गेल्यावर काही वेळा पाण्यावर फेस येतो पण ते काही काळजीचे कारण नाही.हे जरी पर्यावरणीय संकट वाटले तरी तसं ते नसतं.छोट्या धबधब्यांमुळे हवेतले ह्यूमिक अ‍ॅसिड पाण्यात विरघळते आणि त्याचा फेस तयार होतो. हे अ‍ॅसिड पान आणि लाकूड विघटन होताना तयार होते आणि जंगलाच्या परिसंस्थेला अतिशय फायदेशीर ठरतात.मध्य युरोपात जंगलातून छोटी तळी तयार होण्यासाठी वठलेल्या झाडांची तशी फारशी जरूर नसते.तळी बनवण्यात एका लुप्त होण्याच्या मार्गावरून परतलेल्या जनावरांची मोठी मदत होते. तो प्राणी म्हणजे बीव्हर.उंदरांच्या कुळातला,साठ पाऊंडाच्या वर भरणारा हा प्राणी खरंच झाडांना आवडतो का,याबद्दल मला शंका आहे.प्राणिमात्रेमधील बीव्हर हा लाकूडतोड्या आहे.हा प्राणी तीन ते चार इंच जाड खोडाचे झाड एका रात्रीत खाली पाडू शकतो.

याहून मोठी झाडं पाडायला त्याला जास्त रात्रपाळ्या कराव्या लागतात.यामधून बीव्हरला फक्त काड्या काटक्या आणि छोट्या फांद्या हव्या असतात.याचा तो खाद्य म्हणून वापर करतो. 


तो हिवाळ्याची सोय म्हणून प्रचंड प्रमाणात काटक्यांचा साठा करतो,आणि कालांतराने त्याचे गोदाम मोठे होत जाते. कांट्यांनी त्याच्या छोट्या गुहेचे दार झाकले जाते. याहून अधिक सुरक्षा मिळावी म्हणून बीव्हर गुहेचे प्रवेशद्वार पाण्याखाली बांधतो.त्यांचे भक्षक आत येऊ शकत नाही.बाकी घरातली वावराची जागा पाण्याच्या वरती असल्यामुळे कोरडी असते.


पण मौसम बदलला की पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात बदलते त्यामुळे बीव्हर ओढ्यावर धरणं बांधतो आणि त्याच्या मागे मोठी तळी तयार होतात.अशा तळ्यामुळे ओढ्याचा प्रवाह संथ होतो आणि तिथं पाणथळ जागा तयार होते.अशा जागा आल्डर आणि विलोच्या झाडांना आवडतात. पण बीच मात्र आपले पाय ओले करू इच्छित नसतो. या भागातली रोपटी मात्र फार वाढू शकत नाही कारण ते बीव्हरचे खाद्य बनतात. बीव्हरमुळे जरी जंगलाचे नुकसान झाले तरी पाण्याचा पुरवठा नियंत्रित करून ते आपल्या परिसरात त्यांचा उपयुक्त प्रभाव पडतात. आणि पाणथळ भागात वाढणाऱ्या अनेक सजीवांना इथं आसरा मिळतो.


प्रकरणाच्या शेवटी आपण पुन्हा पावसाकडे वळू. पाऊस जो जंगलाचा एकमेव पाण्याचा स्रोत आहे! बाहेर चक्कर मारताना पाऊस आला की कशी तब्येत खुश होते.पण जर का तुम्ही तयारीनिशी गेला नसाल तर मात्र फार आल्हाददायक वाटणार नाही.तुम्ही जर युरोपमध्ये राहात असाल तर प्रगल्भ पानझडीचे वृक्ष एक विशिष्ट सेवा देऊन पावसात तुमची मदत करतीलः चॅफिंच (कोकीळ प्रजातीचा पक्षी) नावाचा एक पक्षी तुम्हाला पाऊस पडणार असल्याचा इशारा देईल. पाऊस नसलेल्या दिवशी या डोक्याचा तपकिरी लालसर पक्षी चिप चिप चिप चु..इ चु..इ..चु..इ ची..ऊ असा ओरडत असतो. त्याला पावसाची चाहूल लागताच तो मोठ्यांदा 'रन रन रन',म्हणजे 'पळा पळा पळा' असे ओरडतो.



९/९/२५

गटे : हा पाहा खरा मनुष्य Gate:Yeah,look,real man


गटेने वायमार हे पन्नास वर्षांपर्यंत जागतिक साहित्याचे केंद्र बनवले.त्याने तिथे बुद्धिमान स्त्री-पुरुष जमवून त्यांच्या नेतृत्वाखाली तत्त्वज्ञानाच्या चर्चा व वाड्मयसेवा करण्याचा उपक्रम केला.तिथे ते प्रेमाशी खेळत.तिथे बांधलेल्या एका छोट्या नाट्यगृहाचा गटे व्यवस्थापक होता.येथेच त्याने त्या शतकातील काही सर्वोत्कृष्ट नाटके लिहिली.तारुण्य होते,तोपर्यंत त्याचे लिखाण वासनोत्कट व क्षोभकारक होते.कधीकधी ते छचोर व छिनालही वाटे.'स्टेला' नामक नाटकात नायक आपली पत्नी व आपले प्रेमपात्र दोघांशीही नीट राहतो व तिघेही सुखी आहेत असे दाखवून त्याने बहुपत्नीतत्वाची तरफदारी केल्याबद्दल बहुजन समाजाने खूप कावकाव केली.तेव्हा घाबरून गटेने नाटकाचा शेवटचा भाग बदलून पुन्हा लिहिला.पत्नी व प्रेयसी दोघींशीही नीट कसे राहावे हे कळेनासे झाल्यामुळे नायक डोक्यात पिस्तूल मारून घेऊन आत्महत्या करून हा प्रश्न सोडवतो,अशी कलाटणी गटेने संविधानकाला दिली.

पण हळूहळू गटेच्या वाङ्मयातील यौवनसहज उन्माद, मादकता,निश्चित बेदरकारपणा व सुखविलास-लोलुपता कमीकमी होत जातात.त्याचा तारुण्यातील जोम ओसरतो.तो अतःपर जगाला नष्ट करू पाहणारा बंडखोर राहत नाही,तर जगाचे स्वरूप समजून घेणारा तत्त्वज्ञानी बनतो.अतःपर त्याचे ध्येय एकच. मरेपर्यंत एकच ध्यास,अधिक प्रकाश,अधिक सौंदर्य तो कुरूपतेतही सुंदरता व नम्रतेतही प्रतिष्ठा पाही.वॉल्ट व्हिटमनप्रमाणे मानव कितीही खालच्या वर्गातील असो, त्याला त्यांच्याविषयी उत्कट प्रेम वाटे. 

तो राजासमोर तर लवेच;पण अत्यंत दीनदरिद्री माणसे भेटली,तर त्यांनाही प्रणाम करी.खाटीक, भटारखानेवाले,मेणबत्त्या करणारे वगैरे लोकांशी मरेपर्यंत त्याची दोस्ती असे.तो म्हणतो, "या लोकांबद्दल मला किती प्रेम वाटते ! माझे प्रेम या खालच्या वर्गातील लोकांसाठी परत आले आहे." खाणीतील लोकांना भेटून आल्यावर तो म्हणाला, "ज्यांना आपण खालच्या वर्गाचे समजतो, तेच देवाच्या दृष्टीने परमोच्च वर्गाचे आहेत."

पददलितांसाठी त्याला वाटणारी सहानुभूती केवळ शाब्दिक अगर आलंकारिक नव्हती.त्याला दरसाल एक हजार डॉलर पगार मिळे.या पगारांतून तो दोन अनोळखी लोकांनाही पोशी.ते मदत मागत व तो नेहमी देई.त्याला स्वतःला कधीही हालअपेष्टा भोगाव्या लागल्या नाहीत.पण तो दुसऱ्यांच्या दुःखाशी सहानुभूती दाखवी.स्वतःच्या जीवनापलीकडे पाहण्याचे कवीचे क्रांतदर्शित्व त्याच्या ठायी होते.

एका लॅटिन कवीने म्हटले आहे,"मानवांची दुःखे पाहून देव रडतात."

त्याप्रमाणे गटे हे अश्रू मानीत होता.त्याचे दैवी मन गरिबांचे दुःख पाहून रडे.बुद्धी व्यापक असेल.
त्यालाच गरिबांची दुःखे जाणता येतात.

गटेची मनोबुद्धी अठराव्या शतकात अत्यंत सर्वगामी व सर्वसंचारी होती.तो कवी,चित्रकार व संगीतज्ज्ञ होता. एवढेच नव्हे,तर वरच्या दर्जाचा शास्त्रज्ञही होता. जगातल्या बाह्य विविधतेच्या मुळाशी एकताच आहे हे त्याने कवीच्या प्रतिभेच्या योगे ओळखले व विज्ञानवेत्ता या नात्याने ही एकता सिद्ध करण्याची खटपट केली, वनस्पतिशास्त्र,शरीरशास्त्र व रंगप्रक्रिया यांचा प्रेपूर अभ्यास करून त्याने वनस्पतींची स्थित्यंतरे' हा ग्रंथ लिहिला व दाखवले की,वैभवशाली पाने म्हणजेच फुले. फुले म्हणजेच पूर्व विकसित पाने.पानांची काव्यात परिणती म्हणजेच फले.फुले म्हणजे पानाचे काव्य ! मानवी कवटीचे बारकाईने निरीक्षण करून त्याने मनुष्य व खालचे प्राणी यांतील दुवा जोडणाऱ्या एका हाडाचा शोध लावला.

मानवजातीशी संबद्ध अशा प्रत्येक विषयाची टेरेन्सप्रमाणे त्यालाही आवड होती.त्याला फक्त युद्धाची आवड मात्र नव्हती.गटे हा शांतात्मा,शांततेचा उपासक होता.कार्ल ऑगस्ट फ्रेंचांशी झगडत होता,
तेव्हा त्याने गटेला सैन्यात बोलावून लष्करी हालचाली पाहण्यास सांगितले.सैन्याची छावणी होती तिथे गटे गेला,पण तेथील लढायांत त्याला रस नव्हता.त्याने छावणीच्या आसपासच्या फुलांचा व दगडांचा अभ्यास केला.त्याला आपल्या राष्ट्राविषयी अत्यंत प्रीती होती,नितांत भक्ती होती.पण तो संकुचित दृष्टीने देशभक्त नव्हता.तो देशभक्तीने भरलेली युद्धगीते रचेना.म्हणून त्याला कोणी बुळा,नेभळा म्हटले,तेव्हा त्याने उत्तर दिले, 

"मला ज्याचा अनुभव आला नाही,असे काहीही मी कधीच उच्चारले नाही... स्वतः प्रेम केल्यावरच मी प्रेमगीते लिहिली.कोणाचाही द्वेष न करता मी द्वेषगीते कशी लिहू?"

आयुष्याच्या मध्यभागी त्याला तीन सुंदर व रमणीय वस्तू मिळाल्या - प्रेमळ पत्नी,गोजिरवाणा पुत्र व निष्ठावंत मित्र.तीन दैवी देणग्या ! वयाच्या एकोणचाळिसाव्या वर्षी,म्हणजे १७८८ साली ख्रिश्टियेन व्हल्पियसशी त्याची गाठ पडली.प्रथम ती त्याची रखेली होती.पण पुढे दोघांनी कायदेशीररीत्या लग्न केले. १७८९ साली त्याला मुलगा झाला.१७९४ साली प्रख्यात नाटककार शिलर याच्याशी त्याचा दाट परिचय झाला.त्या वेळी गटे पंचेचाळीस वर्षांचा होता व शिलर पस्तीस वर्षांचा होता.

गटे व शिलर यांच्या कोणत्याही उत्कृष्ट काव्यापेक्षा त्यांची मैत्री ही अधिक सुंदर कविता होती.त्यांची मैत्री म्हणजे एक देवसदृश मानव व एक मरणोन्मुख माणूस यांची मैत्री होती.शिलर आजारी होता.त्याचे एक फुफ्फुस गेले होते.गटे ग्रीक वृत्तीचा होता.
त्याला निसर्गाविषयी परमादर होता.शिलर ख्रिश्चन होता. त्याला न्यायाची तहान होती.दोघांनीही बंडखोरीपासून प्रारंभ केला. पण दोघेही शेवटी शांत वृत्तीचे झाले. 

गटेची बंडखोरी त्याच्या सुखासीनतेने मारली,शिलरची बंडखोर वृत्ती त्याच्या दारिद्र्यामुळे गारठली.पण दोघांचाही कलेच्या बंडखोरीवर अद्यापही विश्वास होता. सामान्य माणसांचे श्रेष्ठ मानव बनवण्याचे साधन म्हणजे काव्य असे त्यांना वाटे.काव्य हे मानवांना अती मानव करणारे पवित्र माध्यम आहे या विश्वासाने दोघेही सहकार्याने काम करू लागले.सौंदर्योपासना हा त्यांचा धर्म होता.सौंदर्योपासनेच्या साधनेने ते जगाचा व आपलाही उद्धार करू पाहत होते.दोघेही परस्परांच्या प्रतिभेचे पूरक होते.दोघांचे हे सुंदर व मंगल मैत्रीचे प्रेम अकरा वर्षे टिकले व शिलर मरण पावला.गटेने दार लावून घेतले व तो आपल्या खोलीत एखाद्या लहान मुलाप्रमाणे ओक्साबोक्सी रडला.एका मित्राला तो लिहितो, 'माझे अर्धे अस्तित्वच जणू संपले ! माझा अर्धा प्राणच जमू गेला! या काळातील माझी रोजनिशी कोरी आहे. माझे जीवन जणू शून्य, रिक्त झाले होते, असे ती कोरी पृष्ठे दाखवीत आहेत !'

गटे म्हातारा होईतो जगला,पण दीर्घ जीवनासाठी त्याला एकाकीपणा भोगावा लागला.ज्यांच्या ज्यांच्यावर त्याचे प्रेम होते ती सारी मंडळी एकामागोमाग एक गेली.त्याचे प्रियतम मित्र,त्याची पत्नी,त्याची बहीण व अखेर त्याचा एकुलता एक मुलगा सारी सोडून गेली,तरी तो शूरासारखा सतत पुढे-पुढेच जात होता.आपले आनंद व आपल्या वेदना यांना तो अमर गीतांचे स्वरूप देत होता. त्याने एकूण साठ पुस्तके लिहिली.भावगीते, शोकगीते, उपहासगीते,महाकाव्ये,निबंध,कादंबऱ्या,नाटके, भुताखेतांच्या व पऱ्यांच्या अद्भुत गोष्टी, देव, दानव व मानव यांच्या सात्त्विक कथा,दंतकथांवर उभारलेल्या तात्त्विक कथा,सारे प्रकार त्याने अमर कलांवतांच्या हाताने हाताळले व शेवटी आपली सारी प्रतिमा केंद्रीभूत करून त्याने आपले अमर महाकाव्य लिहिले व जगाला दिले,तेच फॉस्ट होय. याचा पूर्वार्ध तो तीस वर्षे लिहित होता.उत्तरार्धाला आणखी पंचवीस वर्षे लागली. फॉस्ट या महाकाव्याचा अर्थ काय,हे आता पाहू या.फॉस्ट लिहिताना मानवजात समजून घेणे हा गटेचा उद्देश होता.मानवजातीच्या शक्तीचे मोजमाप करून मानवांची कर्तव्ये काय,हे त्याला सांगायचे होते. नाटकाची प्राणभूत कल्पना आरंभीच्या काव्यमय प्रस्तावात आहे.मानवी आत्म्याविषयी देव सैतान यांच्या पैज लागते.सैतानाला मर्त्य मानवांविषयी मुळीच आदर नसतो.सैतान म्हणजे शाश्वत संशयात्मा,'काही नाही, सारे निःसार आहे.'असे म्हणणारा.'असण्यापेक्षा नसणे व जीवनापेक्षा मरण अधिक श्रेयस्कर'‌अशी सैतानाची श्रद्धा होती. नियतीचा जो अनंत खेळ चाललेला आहे. त्यात सैतानाला सार वाटत नसे.ती माणसांना मातीत मिळवण्यासाठी त्यांना निर्मिते.ज्या शाश्वत शून्यातून हा दिकालात चालणारा निरुपयोगी खेळ सुरू झाला. ज्यातून हे विश्वयात्रेला निघाले.त्या पोकळ शून्यात असणेच बरे असे सैतानाला वाटे.सैतानाचे ध्येय एकच, सर्जनाला विरोध,सृष्टीचा खेळ अगर विचार चालू न देणे, मानवांचा व देवाचा सद्भाव नाकारणे.सैतान म्हणतो, "म्हातारा डॉ.फौस्ट- महापंडित व मानवातला अत्यंत सरळ व न्यायी पुरुषसुद्धा.जर मी त्याला मोहात पाडीन तर,अधःपाताच्या अंतिम टोकाला पोहोचेल."पण ईश्वर अधिक जाणतो व म्हणतो,"मनुष्य अपूर्ण आहे व अंधारातून धडपडत जात असतो,
जीवनात सतत पापे करीत असतो,हे खरे.पण आपल्या पापांतूनच तो अंतःप्रेरणेने जणू प्रकाशाकडे जात असतो.देवाचा व सैतानाचा करार होतो व सैतानाने फौस्टला मोह पाडून त्याच्या अमर आत्म्याचा नाश करता येतो का पाहावे, असे ठरते.जर एखाद्या जाणाऱ्या क्षणाला 'हे क्षणा,तू थांब.किती सुंदर आहेस तू!' असे म्हणावे लागून फौस्ट पुढे जायचे नाकारील,तर सैतान विजयी असे ठरायचे होते.फौस्टचा पूर्वार्ध सर्वांना माहीतच आहे.

सैतान फौस्टला नवतारुण्य व जगातील नाना स्वार्थी सुखे देऊन मोहात पाडतो.सौंदर्य,संपत्ती,विषयसुखे, बेछूटपणा,प्रेमाच्या जबाबदाऱ्या न पत्करता त्याची सुखे तेवढी भोगणे,सारे सैतान फौस्टला देत असतो.
सैतानाने सांगितल्याप्रमाणे फौस्ट मागरिटला प्रेमपाशात अडकवतो व स्वतःची पापे व दुःखे भोगायला तिला सोडून जातो.कथेच्या या पहिल्या भागात त्याची सर्वत्र चुका करण्याकडे प्रवृत्ती आहे.तो वासनाविकारांकडे एकदम वळतो,पण या सर्व कुमार्गात असा प्रसंग केव्हाच येत नाही की,जेव्हा एखाघा क्षणाला 'तू किती सुंदर आहेस ! थांब' असे म्हणण्याचा मोह त्याला पडावा.मागरिटच्या मरणानंतर सैतान त्याला निराळ्याच प्रकारच्या मोहात पाडू पाहतो.फौस्ट मानवजातीचे प्रतीक आहे.आपणाला जीवनातील प्रत्येक अनुभव यावा,असे त्याला वाटते.मानवांबरोबर राहावे,श्रमावे,त्यांच्याबरोबरच मानवजातीचे गलबत फुटेल तेव्हाची संकटे भोगावीत,त्या विपत्तीत त्यांचे भागीदार व्हावे असे त्याला उत्कटपणे वाटते.'प्रत्येक वेदनेसाठी हृदय उघडे करून मानवांचे सारे आनंद व त्यांची सारी दुःखे अनुभवण्याची' त्याला तळमळ लागलेली असते.
सैतान फौस्टला एक राजाच्या दरबारचा सल्लागार करतो.तो तिथे गटेप्रमाणे आपल्या कर्तबगारीने व योग्य सेवेने मानसन्मान मिळवतो.राजा कृतज्ञता दाखवतो.पण त्याला सुख मिळत नाही व वर्तमानकाळातील जीवनामुळे तो निराश होतो. भूतकाळातील सारे जीवन-सारे मानवी जीवन तो डोळ्यांसमोर आणू पाहतो.प्राचीन काळातील हेलेनला तोजणू पुन्हा सजीव करतो व तिच्याशी लग्न लावू पाहतो. (जसे गटेने ग्रीक कवींच्या विचारांशी लग्न लावले होते) पण हेलेनला आलिंगन देताच ती अदृश्य होते व तिचा फक्त झगा उरतो.प्राचीन ग्रीसचे जीवन समजून घेणे फौस्टला व गटेलाही जमत नाही.त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी प्राचीनांचा तो सुंदर आत्मा त्यांच्या हाती सापडत नाही.फक्त बाहेरचे कवचच त्यांच्या हाती येते.फौस्ट अशा प्रकारे एका अनुभवातून दुसऱ्या अनुभवात जातो.पण त्याला कशातही सुख वाटत नाही.'त्याचे साधे चालणे म्हणजेही सतरांदा ठेचाळणे व पडणे होते.' तो जे जे हाती घेतो.त्यात त्याला अपयशच येते.कधी काळी विजय मिळालाच,
तरी तो पोकळ असतो व त्यामुळे त्याची अधिकच निराशा होते.युद्धातील विजय म्हणजे मरणच होय.दोन्ही बाजूंचा विनाश झालेला असतो. सैतान त्याला मोठमोठी शहरे व राज्ये,किल्ले,सुंदर स्त्रिया,
वैभवशाली कृत्ये,शाश्वत यशःश्री सारे काही देतो. पण फौस्ट शेवटी या सर्व गोष्टींना विटतो.त्याच्या जीवनाची कमान आता पूर्ण होऊन खाली उतरू लागते.

 तारुण्यातील सुखे,मध्यमावस्थेतील महत्कृत्ये यातून त्याला सारभूत असे काहीच मिळत नाही.त्याच्या डोळ्यांवरची झापड उडते.त्याची प्रांती नष्ट होते.चिंता त्याच्या घराचा कब्जा घेते.तारुण्यातील वासनांच्या निखाऱ्यांची जळून राख झालेली असते.तो अंध होतो व जीवनावधी चाललेला सुखाचा उद्योग आता पुरे,असे त्याला वाटू लागते.पण आश्चर्य हे की,ज्या क्षणी तो सुखाचा नाद सोडतो,त्याच क्षणी ते त्याला लाभते. समुद्राजवळची अफाट दलदल दूर करून ती जागा मानवी निवासाला योग्य अशी बनविण्याची एक विशाल कल्पना त्याला सुचते.तो म्हणतो, "येथे मी घरे बांधीन, त्यात लाखो लोक स्वातंत्र्यात नांदतील व रोज काम करून अधिकाधिक स्वतंत्र होतील." हा विचार मनात येऊन त्याचे हृदय आनंदाने भरून जाते.तो आयुष्यभर याच आत्मविस्मृतीच्या ध्येयाकडे नकळत जात होता.हाच तो शेवटचा मंगल क्षण,सोन्याचा क्षण ! याला तो म्हणू शकतो, "क्षणा, थांब. किती रे सुंदर तू!" अखेर त्याच्या जीवनातील परमोच्च क्षण येतो व त्याचे जीवन समाप्त होते.सैतानाचा जय झाला,असे बाह्यतः तरी दिसते.विजयाचे बक्षीस म्हणून सैतान फौस्टचा आत्मा नेऊ इच्छितो,पण गुलाबपुष्पवृष्टीत देवदत फौस्टचा आत्मा स्वर्गात नेतात.कारण,

फौस्टने खूप चुका केल्या,खूप पापे केली,तरी या साऱ्या धडपडीतून व चुकांतून तो नकळत प्रकाशाकडेच जात होता.

स्वर्गात सर्वांत आधी त्याला कोण बरे अभिवादन करते? मागरिटच.तिने पाप केलेले असते व फौस्टच्या पापामुळे तिला मरावे लागलेले असते.पण सारे विसरले जाते, साऱ्यांची क्षमा करण्यात येते.ती आता त्याला सन्मार्ग दाखवते.पुरुषाची शाश्वत उद्धारकर्ती स्त्रीच होय.

०७.०९.२५ या लेखातील शेवटचा भाग…