जंगलापर्यंत पाणी पोचतं तरी कसं? किंवा अजून मागे जाऊन पृथ्वीतलावर तरी कुठून येतं? हा प्रश्न अगदी सोपा वाटला तरी याचं उत्तर तसं सोपं नाही.याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे पाण्याच्या पातळीपेक्षा जमिनीची पातळी उंचावर आहे.
गुरुत्वाकर्षणामुळे पाणी खालच्या पातळीकडे जायला हवं आणि असं झालं असतं तर भूखंड कोरडे पडले असते.असं होत नाही याचं एकमेव कारण म्हणजे ढगाने केलेला पाणीपुरवठा.
समुद्रावर ढंग तयार होतात,वाऱ्याने ते भूखंडाकडे ढकलले जातात.आणि भूखंडावर त्यांचं रूपांतर पावसात होतं.पण किनारपट्टीपासून काही शेकडो मैलांपर्यंतच असं होतं.जसे आपण भूखंडात आत आत जातो तसा पाऊस कमी होत जातो कारण ढग रिकामे होत जातात.साधारण किनारपट्टीपासून चारशे किलो
मीटरवर जमीन इतकी कोरडी होती की वाळवंटाला सुरुवात होते.आपण जर फक्त पर्जन्यवृष्टी वरती अवलंबून बसलो तर भूखंडाच्या एका निमुळत्या पट्टीवर जीवन फुलणं शक्य झालं असतं आणि आतला भाग कोरडाच राहिला असता.आणि याच कारणासाठी म्हणून झाडांचे आभार !
वनस्पतींमध्ये सर्वाधिक पालवी वृक्षांना असते.एक चौरस यार्ड जंगलासाठी सुमारे सत्तावीस चौरस यार्ड सूचीपर्णी किंवा रुंदपर्णी पानांचा डेरा असतो.
प्रत्येक पावसाचा काही भाग झाडांकडून घेतला जातो आणि तो पुन्हा बाष्पीभवन होऊन हवेत सोडला जातो. याच्या व्यतिरिक्त दर उन्हाळ्यात एक चौरस मैल जंगलासाठी सुमारे ८५०० घन यार्ड पाणी लागतं. या पाण्याचं बाष्पोत्सर्जन होत.
या वाफेचे नवीन ढग बनतात,जे आतल्या भागात जाऊन तिथे पाऊस पाडतात.पण या चक्राकार प्रक्रियेमुळे अगदी आतपर्यंत पाऊस पोचतो.असा पाण्याचा पंप इतका कार्यक्षम आहे की,अॅमेझॉन खोऱ्यासारख्या काही ठिकाणी,हजारो मैल आतपर्यंत मुसळधार पाऊस पडतो.
पण हा पंप सक्रिय होण्यासाठी काही अटी आहेत. त्यासाठी समुद्रापासून आतपर्यंत अखंड जंगल असलं पाहिजे.आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे किनारपट्टीवर असलेली जंगल या पंपाचा पाया आहे. तिथं जंगलं नसली तर हे शक्य होत नाही.हा महत्त्वाचा शोध लावण्याचं श्रेय शास्त्रज्ञ रशियामधील सेंट पीटर्सबर्गच्या अनस्तासिया माकारीवा यांना देतात.
जगामधील विविध जंगलातून केलेल्या संशोधनात हेच दिसून आलं.वर्षावने (रेनफॉरेस्ट) असो किंवा सायबेरिया मधील टाइगा,ही सर्व जंगलं जीवनदायी आर्द्रता अगदी आतपर्यंत पोहोचवतात.आणि संशोधकांना हेही दिसलं की,किनार
पट्टीवरची जंगलं गेली तर ही प्रक्रिया थांबते. हे म्हणजे विजेवर चालणाऱ्या पाण्याच्या पंपाचा शोषण करणारा पाईप टाकीतून काढून टाकण्यासारखं आहे.ब्राझीलमध्ये याची प्रचीती येते.इथे अॅमेझॉनची वर्षावने हळूहळू कोरडी होत चालली आहेत.
सुदैवाने,विरळ असली तरीही तिथे अजून जंगले आहेत.उत्तर गोलार्धातील सूचीपर्णी जंगले यापेक्षा वेगळ्या पद्धतीनेही हवामानावर आपला प्रभाव टाकतात आणि पाण्याचे नियोजन करतात. सूचीपर्णी झाडांमधून टरपिन नावाचे द्रव्य सोडले जाते. याचे मुख्य काम म्हणजे कीटक आणि आजारापासून झाडाचा बचाव करणे. या द्रव्याचे अणू जेव्हा हवेत राहतात तेव्हा आर्द्रता त्यांच्याभोवती घनरूपात जमा होते आणि त्याचे ढग बनतात.अशा प्रकारे ओसाड क्षेत्रापेक्षा दुप्पट घनतेचे ढग जंगलातून बनतात.
यामुळे पावसाची तर शक्यता वाढतेच पण ढगांमुळे सुमारे ५ टक्के सूर्यप्रकाश प्रतिबिंबित होतो आणि त्या भागातले तापमान कमी होते.आता सूचीपर्णी झाडांच्या आवडीप्रमाणे वातावरण गार आणि ओलसर होते. जंगले आणि हवामानाचा हा परस्परसंबंध बघता, जंगलांमुळे जागतिक हवामान बदलाचा वेग नक्कीच कमी होत असेल.मध्य युरोपीय परिसंस्थांना नियमित पाऊस महत्त्वाचा असतो,कारण पाणी आणि जंगलाचा असा अतूट संबंध आहे.
जंगलं,ओढे,तळी या सर्व परिसंस्थांना त्यांच्या रहिवाशांना स्थिर वातावरण द्यायचे असते.गोड्या पाण्यातली गोगलगाय या प्राण्याला परिसंस्थेतला बदल फारसा प्रिय नाही.त्यांच्या प्रजाती लांबीला जेमतेम ०.०८ इंचापर्यंत असतात.साधारण ४६ अंश फॅरनहाईटपेक्षा जास्त तापमान त्यांना आवडत नाही.याचं कारण म्हणजे त्यांचे पूर्वज हिमयुग संपत होते तेव्हा विरघळणाऱ्या हिमनद्यातून राहात होते.
यांच्या आवडीची परिस्थिती जंगलांमधल्या स्वच्छ झऱ्यांमधून मिळते.भूगर्भातील पाणी जमिनीच्या पृष्ठभागावर येते तेव्हा ते शीतल असते. खोल जमिनीत असलेले हे पाणी उष्णतेपासून सुरक्षित असते, त्यामुळे थंडी सारखेच उन्हाळ्यातही गार असते.आज इथे हिमनद्या नाहीत पण त्या गोगलगायींसाठी हे पाणी योग्य आसरा देते.पाणी याचा अर्थ भूगर्भातील पाण्याला वर्षभर पृष्ठभागावर झऱ्याच्या स्वरूपात यायला हवे.आणि असे झरे बनवण्यासाठी जंगलाची भूमिका महत्त्वाची ठरते. जंगलाची जमीन पडणारा सर्व पाऊस एका मोठ्या स्पंज बोळ्यासारखा शोषून घेते.पानांमुळे पावसाचा जमिनीवर पडण्याचा जोर कमी होतो आणि थेंब हळुवारपणे मातीवर पडतात.इथली जमीन भुसभुशीत असल्यामुळे पाणी शोषले जाते.थेंब एकत्र येऊन त्याचा ओघ होऊन वाहून जाऊ शकत नाही.एकदा का माती पाण्याने चपचपित झाली की मग अतिरिक्त आर्द्रता हळुवारपणे सोडून दिली जाते. पण वर्षानुवर्ष त्यालाही शोषून घेऊन त्याचा प्रवास खोल जात राहतो.या अतिरिक्त आर्द्रतेला सूर्यप्रकाश पुन्हा दिसण्यासाठी काही दशकं लागणार असतात. त्यामुळे वातावरणाची दुष्काळ किंवा अतिवृष्टी अशी दोलायमान परिस्थिती होत नाही. तो बुडबुडणारा झरा चालूच राहतो.
द हिडन लाईफ ऑफ ट्रीज,पी ट र वो ह्ल ले बे न,अनुवाद -
गुरुदास नूलकर,अरविंद घनश्याम पाटकर,मनोविकास प्रकाशन
पण तो सतत बुडबुडत राहतो असेही नाही.अनेकदा तो दलदलीच्या गडद ठिपक्यासारखा दिसतो.त्यातून येणारे पाणी ओढ्याच्या दिशेने जात असते.तुम्ही जर गुडघ्यावर बसून हा झरा जवळून पाहिलात तर त्यातून पाण्याच्या बारीक धारा येताना दिसतील.पण हे भूजल आहे का पृष्ठभागावरचं पावसाचं उरलंसुरलं पाणी आहे? त्यासाठी तुम्हाला थर्मामीटर वापरावं लागेल. पाण्याचं तापमान ४८ अंश फॅरनहाईटपेक्षा कमी आहे का? तर मग ते नक्कीच झऱ्याचे पाणी आहे.पण असं कोण थर्मामीटर घेऊन हिंडतो? तर मग त्याला दुसरा उपाय म्हणजे घट्ट बर्फ जमा झालेला असताना इथे येऊन पहा.आजूबाजूलाही डबकी आणि जमिनीवर साचलेलं पावसाचं पाणी बर्फरूपी असेल,पण या झऱ्यातून मात्र द्रवरूपातच पाणी येत असतं.गोड्या पाण्यातल्या गोगलगायींचा हाच तर अधिवास आहे. इथंच त्यांना हवे तसेच तापमान मिळते.पण ही परिस्थिती काही फक्त जंगलातल्या जमिनीमुळे होत नाही.उन्हाळ्यामध्ये असा सूक्ष्म अधिवास गरम होऊन गोगलगायींना ताप होऊ शकतो.पण अशा वेळेस झाडांचा डेरा सूर्यप्रकाश अडवतो.
जंगलांकडून ओढ्यांना अशीच किंवा याहीपेक्षा महत्त्वाची सेवा मिळते.
यांना ज्याप्रमाणे सतत ताजे पाणी मिळत असते तसे ओढ्याला होत नाही त्यामुळे त्यांच्या तापमानात जास्त प्रमाणात बदल होऊ शकतो.बाहेरच्या जगात जीवनाची सुरुवात करण्याची वाट बघणारे सॅलमँडर आणि बेडकांची पिले या ओढ्यात असतात.
टिकवण्यासाठी त्यांनाही पाण्याची गरज असते. पण जर पाण्याचा बर्फ झाला तर पिले या ओढ्यात असतात.गोड्या पाण्यातील गोगलगायी प्रमाणेच प्राणवायू टिकवण्यासाठी त्यांनाही पाण्याची गरज असते.पण जर पाण्याचा बर्फ झाला तर पिले मरतील.आणि इथे पानझडी वृक्षाची मदत होते. हिवाळ्यात जेव्हा सूर्याची उष्णता कमी होते तेव्हा त्यांच्या फांद्या ऊब देतात.ओबडधोबड जमिनीवरील पाण्याच्या प्रवाहामुळे बर्फ होण्याचे टळते.वसंत ऋतूत जेव्हा सूर्य वर चढतो आणि उष्णता वाढते तेव्हा या झाडांना पालवी फुटते आणि वाहणाऱ्या ओढ्याला सावली मिळते.पुन्हा पानझडीच्या ऋतूत थंडीची चाहूल लागते तेव्हा पानगळ सुरू होते आणि ओढ्यासाठी आकाश उघडे होते.पण सूचीपर्णी वृक्षांच्या खालून वाहणाऱ्या ओढ्यांसाठी परिस्थिती अशी सोपी नसते. हिवाळ्यात प्रचंड थंडी पडते आणि पाणी गोठू शकते. हवेत पुन्हा ऊब यायला वसंताची वाट पाहावी लागते म्हणून ओढ्यात जलचरांना प्रतिकूल परिस्थिती असते. स्प्रूस वृक्षांना आपले पाय ओले करायला आवडत नसल्यामुळे जंगलात असे अंधारातून वाहणारे ओढे फार आढळत नाहीत.पण लागवडीच्या जंगलात मात्र सूचीपर्णी वृक्ष आणि ओढ्यांमधील जीवांचे असे द्वंद्व चालू असते.झाडे वठल्यावरही ओढ्यांच्या आयुष्यातले त्यांचे महत्त्व संपत नाही.बीच वृक्ष एखाद्या ओढ्यावर वठून पडला की तो तिथं काही दशकं राहतो.त्याचे छोटे धरण तयार होते आणि तिथं जलचरांसाठी पाण्याचे संथ आसरे तयार होतात.फायर सॅलमँडरच्या पिल्लांना याचा फायदा होतो.ती छोट्या पालीसारखी दिसतात, पण त्यांच्या कानामागे मऊ श्वसन अवयव असतो. त्यांच्या शरीरावर बारीक गडद खुणा असतात आणि शरीराला पाय जुळतात तिथे एक पिवळा ठिपका असतो.जंगलातल्या थंड पाण्यात ते क्रॉफिश माशांसाठी दबा धरून बसतात.हे त्यांचे आवडते खाद्य आहे.यांना शुद्ध पारदर्शक पाणी लागते आणि ही वठलेली झाडं त्यांना तसे पाणी पुरवते.ओढ्यातून येणारी माती,कचरा पडलेल्या झाडांमुळे तयार झालेल्या धरणात अडकतो आणि सूक्ष्म जीवांना त्याचे विघटन करायला वेळ मिळतो.
कांपाऊस पडून गेल्यावर काही वेळा पाण्यावर फेस येतो पण ते काही काळजीचे कारण नाही.हे जरी पर्यावरणीय संकट वाटले तरी तसं ते नसतं.छोट्या धबधब्यांमुळे हवेतले ह्यूमिक अॅसिड पाण्यात विरघळते आणि त्याचा फेस तयार होतो. हे अॅसिड पान आणि लाकूड विघटन होताना तयार होते आणि जंगलाच्या परिसंस्थेला अतिशय फायदेशीर ठरतात.मध्य युरोपात जंगलातून छोटी तळी तयार होण्यासाठी वठलेल्या झाडांची तशी फारशी जरूर नसते.तळी बनवण्यात एका लुप्त होण्याच्या मार्गावरून परतलेल्या जनावरांची मोठी मदत होते. तो प्राणी म्हणजे बीव्हर.उंदरांच्या कुळातला,साठ पाऊंडाच्या वर भरणारा हा प्राणी खरंच झाडांना आवडतो का,याबद्दल मला शंका आहे.प्राणिमात्रेमधील बीव्हर हा लाकूडतोड्या आहे.हा प्राणी तीन ते चार इंच जाड खोडाचे झाड एका रात्रीत खाली पाडू शकतो.
याहून मोठी झाडं पाडायला त्याला जास्त रात्रपाळ्या कराव्या लागतात.यामधून बीव्हरला फक्त काड्या काटक्या आणि छोट्या फांद्या हव्या असतात.याचा तो खाद्य म्हणून वापर करतो.
तो हिवाळ्याची सोय म्हणून प्रचंड प्रमाणात काटक्यांचा साठा करतो,आणि कालांतराने त्याचे गोदाम मोठे होत जाते. कांट्यांनी त्याच्या छोट्या गुहेचे दार झाकले जाते. याहून अधिक सुरक्षा मिळावी म्हणून बीव्हर गुहेचे प्रवेशद्वार पाण्याखाली बांधतो.त्यांचे भक्षक आत येऊ शकत नाही.बाकी घरातली वावराची जागा पाण्याच्या वरती असल्यामुळे कोरडी असते.
पण मौसम बदलला की पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात बदलते त्यामुळे बीव्हर ओढ्यावर धरणं बांधतो आणि त्याच्या मागे मोठी तळी तयार होतात.अशा तळ्यामुळे ओढ्याचा प्रवाह संथ होतो आणि तिथं पाणथळ जागा तयार होते.अशा जागा आल्डर आणि विलोच्या झाडांना आवडतात. पण बीच मात्र आपले पाय ओले करू इच्छित नसतो. या भागातली रोपटी मात्र फार वाढू शकत नाही कारण ते बीव्हरचे खाद्य बनतात. बीव्हरमुळे जरी जंगलाचे नुकसान झाले तरी पाण्याचा पुरवठा नियंत्रित करून ते आपल्या परिसरात त्यांचा उपयुक्त प्रभाव पडतात. आणि पाणथळ भागात वाढणाऱ्या अनेक सजीवांना इथं आसरा मिळतो.
प्रकरणाच्या शेवटी आपण पुन्हा पावसाकडे वळू. पाऊस जो जंगलाचा एकमेव पाण्याचा स्रोत आहे! बाहेर चक्कर मारताना पाऊस आला की कशी तब्येत खुश होते.पण जर का तुम्ही तयारीनिशी गेला नसाल तर मात्र फार आल्हाददायक वाटणार नाही.तुम्ही जर युरोपमध्ये राहात असाल तर प्रगल्भ पानझडीचे वृक्ष एक विशिष्ट सेवा देऊन पावसात तुमची मदत करतीलः चॅफिंच (कोकीळ प्रजातीचा पक्षी) नावाचा एक पक्षी तुम्हाला पाऊस पडणार असल्याचा इशारा देईल. पाऊस नसलेल्या दिवशी या डोक्याचा तपकिरी लालसर पक्षी चिप चिप चिप चु..इ चु..इ..चु..इ ची..ऊ असा ओरडत असतो. त्याला पावसाची चाहूल लागताच तो मोठ्यांदा 'रन रन रन',म्हणजे 'पळा पळा पळा' असे ओरडतो.