* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: मध माशांना दगड मारु नका / Don't throw stones at honeybees.

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

१७/९/२५

मध माशांना दगड मारु नका / Don't throw stones at honeybees.

फॉलची सगळीकडे नाचक्की झाली.इतकी नाचक्की सार्वजनिक जीवनात खूप कमी लोकांना सहन करावी लागली होती.पण त्यांना त्यावर काही पश्चात्ताप झाला का? कधीच नाही.अनेक वर्षांनंतर हरबर्ट हूवरने एका सामाजिक भाषणात हे म्हटले होते,'अध्यक्ष हार्डीगला कुणा मित्राच्या विश्वासघातामुळे मानसिक आघाताने मरण आले.' श्रीमती फॉलने हे ऐकले तेव्हा त्या आपल्या खुर्चीतच उसळल्या.रडत रडत आपली मूठ आकाशाकडे ताणत त्या किंचाळल्या,"काय ? हार्डिंगचा विश्वासघात फॉल करतील? असंभव ! माझ्या पतीने कधीही कुणाचा विश्वासघात केला नाही.सोन्याने भरलेले हे घरसुध्दा माझ्या पतीकडून कुठलं चुकीच काम करवून घेऊच शकत नाही.उलट,त्यांचाच विश्वासघात केला गेलाय आणि त्यांना बळीचा बकरा बनवून सुळावर चढवले गेले आहे."


असेच होत असते.हाच मानवी स्वभाव आहे.प्रत्येक जण आपल्या चुकीच्या कामांचे खापर दुसऱ्यांवर फोडतो.तो परिस्थितीला दोष देतो,पण स्वतःला देत नाही.आपण सर्व हेच करतो.


त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा आपली कुणावर टीका करायची इच्छा होईल तेव्हा आपण अल केपोन,क्राउले आणि अल्बर्ट हॉलला लक्षात ठेवू.आम्हाला समजायला हवे की टीका ही बूमरँगसारखी असते.ती परतून आमच्यापाशीच येते,म्हणजेच बदल्यात ती व्यक्ती आमच्यावरच टीका करू लागते.आम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवले पाहिजे की ज्या व्यक्तीवर आम्ही टीका करीत आहोत,किंवा तिला सुधारण्याचा प्रयत्न करीत आहोत,ती उत्तरादखल स्वतःच्या समर्थनार्थ काही तरी तर्क लढवेल किंवा टॅटसारखं विनम्रपणे म्हणेल,"मी जे केलं त्याखेरीज मी अजून काय करू शकलो असतो?" १५ एप्रिल,१८६५ ला अब्राहम लिंकनचे पार्थिव एका स्वस्त लॉजिंग हाऊसच्या हॉलमध्ये ठेवले गेले होते.हा हॉल फोर्ड थिएटरच्या समोर होता जिथे विल्किस बूथने त्यांना गोळी घातली होती.लिंकनचा लांबलचक मृतदेह एका अंथरुणावर ठेवला होता,जे त्या शरीरापेक्षा बरेच लहान होते.रोजा बॉन्हरचे प्रसिध्द चित्र 'द हॉर्स फेयर'ची सवंग नक्कल त्या पलंगाच्यावरती टांगली होती आणि एक गॅसबत्ती पिवळा प्रकाश फेकत होती.


लिंकनच्या पार्थिवाच्या समोर उभे असलेले संरक्षणमंत्री स्टॅटन म्हणाले,"लोकांचे हृदय जिंकणारा सर्वश्रेष्ठ शासक आता या जगात राहिला नाही."


लिंकन लोकांची मने कसे जिंकायचे? त्यांच्या यशाचे रहस्य काय होते? मी दहा वर्ष लिंकनची खूप जीवनचरित्रे वाचली आहेत आणि एक पुस्तक 'लिंकन द अननोन' लिहायला तीन वर्षे घेतली आहेत.माझी अशी खात्री आहे की मी लिंकनचे व्यक्तिमत्त्व व घरगुती जीवनाबद्दल जितके विस्तृत अध्ययन केले आहे,तेवढे क्वचितच कुणी केले असेल.मी लिंकन ज्या त-हेने लोक-व्यवहार करीत त्याबद्दलही सखोल अध्ययन केले आहे.लिंकन टीका करत असत का? हो.तरूण असताना इंडियानाच्या पीजन क्रीक व्हॅलीमध्ये ते लोकांवर भरपूर टिका तर करीतच,पण पत्रांमधून व कवितांद्वारेही लोकांची टर उडवीत असत आणि अशा टिकात्मक कविता छापवून आणत. एकदा अशाच एका पत्राने द्वेषाची अशी आग भडकवली जी जीवनभर जळत राहिली.


जेव्हा लिंकन इलिनॉयमध्ये वकिली करीत होते,तेव्हा ते उघड उघड आपल्या विरुध्द असलेल्या लोकांवर आक्रमण करीत पत्रे लिहीत असत आणि त्यांना वर्तमानपत्रात छापून आणत असत.एकदा मात्र प्रकरण जरा जास्तच वाढले.


१८४२ मध्ये लिंकनने जेम्स शील्डस् नावाच्या एका दांभिक व मुजोर राजनेत्यावर व्यंग लिहिले.लिंकनने एका निनावी पत्राद्वारे हे व्यंग पाठवले,जे 'स्प्रिंगफिल्ड जर्नल'मध्ये छापून आले.पूर्ण शहरात शील्डचे हसे होत होते.संवेदनशील व दांभिक शील्ड्सचा तिळपापड झाला.त्याने हे व्यंग कुणी लिहिले हे शोधून काढले. आपल्या घोड्यावर चढून त्याने लिंकनला शोधून काढले आणि त्याला द्वंद्वयुध्दासाठी आव्हान दिले.लिंकन द्वंद्वयुध्द करू इच्छित नव्हते,पण त्यांच्यासमोर सन्मानासहित यातून बाहेर पडण्याचा मार्गसुद्धा नव्हता. त्यांना शस्त्र निवडायला सांगितले.त्यांचे हात लांब होते म्हणून त्यांनी तलवार निवडली.त्यांनी एका वेस्ट पॉइंट ग्रॅज्युएटकडून तलवार चालवण्याचे प्रशिक्षण घेतले.ज्या दिवशी द्वंद्वयुध्द होणार होते,त्या दिवशी ते आणि शील्ड मिसिसिपी नदीकाठी भेटले. त्यांच्यापैकी एकाचा मृत्यू अटळ होता.शेवटच्या क्षणी मात्र मित्रांच्या मध्यस्थीमुळे द्वंद्वयुध्द टळलं.लिंकनच्या आयुष्यातली ही सर्वांत भयंकर घटना होती.यामुळे त्यांना लोकांशी कसा व्यवहार करायचा याबद्दलचा एक अमूल्य धडा मिळाला.यानंतर त्यांनी कुणाच्याही बाबतीत अपमानकारक पत्रे लिहिली नाहीत आणि कधी कुणाची टर उडवली नाही;ना कधी कुणाची निंदा केली.गृहयुध्दाच्या वेळी लिंकन पोटोमॅकच्या सत्तेसाठी एकामागून एक नवीन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करीत गेले आणि त्यांपैकी प्रत्येकाने मॅककॅलन,पोप, बर्नसाइड,हुकर,मीड - या सर्वांनी इतक्या मोठ्या चुका केल्या की लिंकन इकडून तिकडे येरझारा घालत राहिले;पण त्यांनी कुणावरही टीका केली नाही.


अर्धा देश या अयोग्य सेनापतींना नावे ठेवीत असताना लिंकन यांच्या हृदयात कुणाही बाबतीत दुर्भावना नव्हती, सर्वांसाठी सद्भावनाच होती.ते शांत राहिले.त्यांचं प्रिय वचन होते- "कुणावरही टीका करू नका,म्हणजे तुमच्यावरही टीका होणार नाही."


जेव्हा श्रीमती लिंकन आणि इतर लोक दक्षिण प्रांताच्या लोकांवर टीका करीत तेव्हा लिंकन म्हणत,"त्यांच्यावर टीका करू नका, आम्ही जर त्या परिस्थितीमध्ये असतो तर आम्हीही तसेच वागले असतो." पण जर आलोचना करायचीच असती तर ती लिंकनने करणेच योग्य ठरले असते.एका उदाहरणावरून आम्हाला हे कळू शकते.


गट्सबर्गचे युध्द १८६३ च्या जुलै महिन्याच्या पहिल्या तीन दिवसात लढले गेले होते. ४ जुलैला रात्री जनरल ली दक्षिण दिशेने मागे हटू लागला.वादळी पावसामुळे पूर आला होता.जेव्हा ली आपल्या पराजित सेनेसह पोटोमॅकला पोचला तेव्हा त्याने पाहिले,की त्याच्यासमोर पुराने तुडंब भरलेली नदी आहे जिला पार करणे शक्यच नव्हते.त्यांच्या मागे विजेती युनियन आर्मी उभी होती.ली पार फसून चुकला होता.त्याच्यापाशी वाचण्याचा अन्य कोणताच मार्ग उरला नव्हता. 


लिंकनला ही परिस्थिती समजून आली.ही ईश्वरी कृपेने मिळालेली एक सुवर्णसंधी होती... लीच्या सेनेला हरवण्याचा मोका,ज्यामुळे युध्द तत्काळ समाप्त झाले असते.म्हणून आशावादी मनाने लिंकनने जनरल मीडला आदेश दिला की ते युध्दाबाबत कुठलीही सभा न घेता तत्काळ लीवर हल्ला करतील.लिंकनने आपले आदेश टेलिग्राफ केले आणि मग एका विशेष संदेशवाहकाला मीडपाशी पाठवून तत्काळ कारवाई करायला सांगितले.पण मीडने काय केले? त्याला जे आदेश मिळाले होते त्याच्या बरोबर उलट काम त्याने केले.लिंकनने मनाई केली होती तरी त्याने सैन्याची एक सभा बोलवली.तो हल्ला करायला बिचकला.त्याने टाळाटाळ केली.सर्व प्रकारचे बहाणे करून त्यांना टेलिग्राफ पाठवला.त्याने लीवर हल्ला करायला सपशेल नकार दिला.शेवटी पुराचं पाणी ओसरले आणि ली आपल्या सेनेसह नदी पार करून सुरक्षित निघून गेला.लिंकनचा रागाने तीळपापड झाला."याचा अर्थ काय आहे?" लिंकन आपल्या मुलासमोर किंचाळत होते."हे देवा ! याचा काय अर्थ होतो ? किती सुवर्णसंधी होती ! शत्रू आमच्या कब्जात होता.आम्हाला फक्त हात पसरून त्याला पकडायचे होते आणि तरी आम्ही त्याला आपल्या हातून निसटून जाऊ दिले.माझे आदेश होते तरी माझी सेना इंचभरही हालली नाही.परिस्थिती अशी होती की कुणीही जनरल लीला हरवू शकत होते.जर मी तिथे असतो तर मी त्याच्यावर स्वतःच्या हातांनी चाबकाचे फटकारे ओढले असते." घोर निराशेने लिंकन बसले आणि त्यांनी मीडला पत्र लिहिले.

आपल्या जीवनाच्या या टप्यावर लिंकन एकदम शांत,संयमित होते.त्यांची भाषा खूपच शालीन व संयमित असे. १८६३ मध्ये लिंकनद्वारा लिखित हे पत्र टोकाच्या निंदेपेक्षा कमी नव्हते.


" प्रिय जनरल,


मला नाही वाटत की ली वाचून पळून गेल्यामुळे गंभीर परिस्थिती उद्भवली आहे ह्याची तुम्हाला काही कल्पना असेल.तो आमच्या मुठीत होता.त्याला पकडलं असतं तर युध्द समाप्त झालं असतं.पण आता मात्र युध्द दीर्घ काळापर्यंत सुरू राहील.जेव्हा तुम्ही मागच्या सोमवारी नदीच्या या किनाऱ्याला लीवर हमला करू शकला नाहीत,तर आता तुम्ही तो नदीपार सुरक्षितपणे पळून गेल्यावर कसा काय हल्ला करणार आहात? तुम्ही तुमचे दोन तृतीयांशपेक्षा जास्त सैन्य त्या किनाऱ्याला नेऊ शकत नाही.अशी आशा करणे निश्चितपणे अतार्किक आहे आणि तुम्ही फार काही करू शकाल असे मला वाटत नाही.एक मौल्यवान संधी तुमच्या हातून निसटून गेली आहे याबद्दल मला अत्यंत खेद आहे."


जनरल मीडला हे पत्र वाचून काय वाटले असावे?


मीडला हे पत्र कधीच मिळाले नाही.लिंकनने ते पाठवलेच नाही.हे पत्र लिंकनच्या मृत्यूनंतर त्यांच्या फाइलमध्ये मिळाले.


माझा असा अंदाज आहे आणि फक्त अंदाजच आहे की हे पत्र लिहिल्यावर लिंकनने खिडकीबाहेर पाहिले असेल आणि तो स्वतःशीच बोलला असेल,"एक मिनिट ! कदाचित मी घाई करत असेन.व्हाइट हाऊसच्या शांत वातावरणात बसून मीडवर हल्ला करण्याचा सल्ला देणे माझ्यासाठी सोपे आहे,पण जर मी गट्सबर्गमध्ये असतो आणि जर मी इतकी कत्तल बघितली असती,जितकी मीडने मागच्या आठवड्यात पाहिली आहे,जर माझ्या कानातही जखमी आणि मरणाऱ्या लोकांच्या किंकाळ्या पडल्या असत्या,तर कदाचित मीसुद्धा हल्ला करायला तयार झालो नसतो.जर मी मीडसारखा सुरक्षात्मक प्रवृत्तीचा असतो तर त्याने जे केले तेच मी केले असते. तशी पण आता संधी हातची गेलेलीच आहे.जर मी हे पत्र पाठवीन तर त्यामुळे माझा राग तर शांत होईल,

पण त्यामुळे मीडला खूप दुःख पोचेल.तो माझ्यावर टीका करेल आणि स्वतःला सिध्द करायचा प्रयत्न करेल. यामुळे दुर्भावना निर्माण होईल,सेनापतीच्या रुपात मीडची उपयुक्तता चांगलीच प्रभावित होईल आणि त्यानंतर तो कदाचित सैन्यातून राजीनामासुध्दा देईल."तर मी जसे आधी सांगितले त्याप्रमाणे,लिंकनने ते पत्र बाजूला ठेवून दिले.कटू अनुभवांनी त्यांना हे कळलं होतं की तीव्र टिकेमुळे व रागावण्यामुळे काहीच फायदा होत नाही.


प्रसिध्द लेखक मार्क ट्वेन कधीकधी आपलं भान हरपून रागारागात इतके जहाल पत्र लिहीत असत की कागदाला आग लागावी.उदा.एकदा त्यांनी रागारागात एका व्यक्तीला पत्र लिहिले,

"तुम्हाला जिवंत गाडलं गेलं पाहिजे.तुम्हाला असं व्हावंसं वाटलं तर मला सांगा, म्हणजे मी तशी व्यवस्था करेन."अजून एका प्रसंगी त्यानी एका संपादकाला पत्र लिहून सांगितलं की, "तुमचा प्रूफरीडर माझ्या व्याकरणाच्या आणि विरामचिन्हांच्या चुका काढून त्या सुधारण्याचा प्रयत्न करतो." ट्वेननेआदेश दिला की,"पुढच्या वेळी प्रूफरीडरला सांगा की आपल्या सूचना स्वतःच्या सडलेल्या मेंदूतच राहू देत."


शिल्लक भाग पुढील लेखामध्ये….!