* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: मध माशांना दगड मारु नका / Don't throw stones at honeybees.

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

१५/९/२५

मध माशांना दगड मारु नका / Don't throw stones at honeybees.

७ मे १९३१ या दिवशी न्यूयॉर्क शहरात एक जबरदस्त चकमक सुरू होती.चकमक शेवटच्या चरणात होती. अनेक आठवडे पिच्छा पुरवल्यावर पोलिसांनी शेवटी "टू गन-क्राउले" या कुप्रसिध्द खुन्याला चारी बाजूंनी घेरलं होत.हा खूनी सिगारेट,मद्य काहीच पीत नव्हता.वेस्टएंड अ‍ॅव्हेन्यूमध्ये आपल्या प्रेयसीच्या घरात तो दडून बसला होता.दीडशे पोलीस आणि हेरांनी जमिनीपासून छतापर्यंत त्याला चहूबाजूंनी घेरले होते.तो वरच्या मजल्यावर लपला होता.पोलिसांनी छतास छिद्र करून अश्रूधुराचा वापर करून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.त्यांनी आसपासच्या इमारतींवर मशिनगन रोखल्या होत्या.एका तासाहून अधिक वेळ या न्यूयॉर्कच्या भर वस्तीत पिस्तुल व मशीनगन्समधून गोळ्यांची बरसात सुरू होती.क्राउले एका खुर्चीआड लपून पोलिसांवर सतत गोळ्यांचा भडिमार करीत होता. दहा हजारांहून जास्त लोक ही रोमहर्षक चकमक प्रत्यक्ष बघत होते.अशा तऱ्हेचे दृश्य न्यूयॉर्कने याआधी कधी पाहिले नव्हते.


(मध गोळा करायचा असेल तर मधमाश्यांच्या पोळ्यावर दगड फेकू नका.मित्र जोडा आणि प्रभावशाली बना,डेल कार्नेगी,अनु- कृपा कुलकर्णी,मंजुर प्रकाशन हाउस)


जेव्हा टू गन-क्राउले पकडला गेला तेव्हा पोलीस कमिशनर ई.पी.मुलरुने म्हणाले की,न्यूयॉर्कच्या इतिहासात आतापर्यंतच्या

सर्वांत धोकादायक अपराध्यांपैकी तो एक होता.कमिशनरचे म्हणणे होते की,तो अतिशय उलट्या काळजाचा होता.


पण टू गन-क्राउले हा स्वतःला काय समजायचा? आम्हाला हे माहीत आहे,कारण ज्यावेळी पोलिस त्याच्यावर गोळ्या चालवत होते तेव्हा त्याने एक पत्र लिहिले.जेव्हा तो हे पत्र लिहीत होता तेव्हा त्याच्या जखमांमधून वाहणाऱ्या रक्ताचे डाग पत्रावर पडले होते. या पत्रात क्राउलेने लिहिले होते,

"माझ्या कोटाच्या आत एक दुःखी पण दयाळू हृदय आहे-एक असे हृदय जे कुणाला हानी पोहोचवू पाहत नाही."हे लिहिण्यापूर्वीची गोष्ट आहे. क्राउले लाँग आयलँडवरच्या खेड्यातल्या सूनसान रस्त्यावर आपल्या मैत्रिणीबरोबर मजा मारत होता.अचानक एक पोलीस त्याच्याजवळ येऊन त्याला त्याचं लायसेन्स दाखव,असे म्हणू लागला.काही न बोलता क्राउलेने आपले पिस्तूल काढून त्या पोलिसाच्या छातीवर एकामागून एक गोळ्या झाडल्या.जेव्हा तो पोलिस जमिनीवर कोसळला तेव्हा क्राउलेने कारमधून उडी मारली,त्याने त्या पोलिसाचे पिस्तूल काढले आणि त्याने त्या मृत पोलिसाच्या छातीत अजून एक गोळी झाडली. आणि हाच निष्ठुर खुनी आता म्हणत होता,"माझ्या या कोटाच्या खाली एक दुःखी पण दयाळू हृदय आहे,एक असे हृदय जे कुणाला इजा करू इच्छित नाही."


क्रॉउलेला देहांताची शिक्षा सुनावण्यात आली.जेव्हा त्याला सिंगसिंग येथील जेलमध्ये मृत्युदंडासाठी नेण्यात येत होते,तेव्हा तो म्हणाला,"ही लोकांना मारण्याची शिक्षा आहे का? नव्हे,ही स्वतःला वाचवण्याची शिक्षा आहे."या कथेचा सारांश असा,की क्राउले हा स्वतःला कुठल्याच गोष्टींसाठी दोषी मानत नव्हता.


अपराध्यांमध्ये ही सामान्य गोष्ट आहे का? जर तुम्हाला असं वाटत असेल तर आता हे ऐका :


"मी लोकांचे भले करण्यात आपल्या जीवनाची चांगली वर्षे गमावली,जेणेकरून ते सुखी राहू शकतील आणि त्याबद्दल मला शिव्या ऐकायला मिळताहेत आणि पोलिसांपासून लपून छपून फिरावे लागतेय."हे वाक्य अल केपोनचे आहे जो अमेरिकेतला अतिशय कुविख्यात बदमाश होता.शिकागोमध्ये त्याच्यासारखा धोकादायक गँगलीडर दुसरा कुणी नव्हता.पण अल केपोन स्वतःला दोषी किंवा अपराधी मानत नव्हता.तो स्वतःला परोपकारी समजत असे.एक असा परोपकारी, ज्याला लोक नीटपणे समजून घेऊ शकले नाहीत.


नेवार्कचा गुंडही टोळीयुध्दात मरण्याआधी असंच म्हणाला होता.हा गुंड डच शुल्टज् न्यूयॉर्कमधला सर्वांत कुख्यात अपराधी होता,ज्याने एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की तो लोकांचे भले करतो. या विधानाबद्दल त्याला पूर्ण विश्वास होता.


मी या विषयावर न्यूयॉर्कच्या सिंग-सिंग जेलचे अधिकारी लुइस लॉसशी दीर्घ पत्रव्यवहार केला आहे.ते म्हणतात, "या जेलमधील खूपच कमी अपराधी स्वतःला वाईट समजतात.तुम्ही आणि मी जसे आहोत तशीच ती माणसे आहेत.म्हणून ते असा तर्क लढवतात आणि स्वतःला योग्य शाबित करण्याचा प्रयत्न करतात.ते तुम्हाला सांगू शकतात की त्यांनी तिजोरी का फोडली किंवा त्यांना गोळी का चालवावी लागली.चूक-बरोबर तर्काद्वारे अधिकांश अपराधी आपला अपराध योग्य ठरवण्याचा प्रयत्न करतात आणि असं मानतात की त्यांना सजा मिळायला नको होती."


जर अल केपोन,क्राउले,डच शूल्टज् आणि जेलच्या भिंतीआड कैदी असलेले कुख्यात अपराधी स्वतःला दोषी मानत नाहीत तर ते लोक काय करतात ज्यांना तुम्ही-आम्ही भेटतो ?


अमेरिकन स्टोर्सच्या चेनचे संस्थापक जॉन वानामेकरने हे स्विकारले होते की,'तीस वर्षांपूर्वी मला हे समजून आले की कुणालाही दोष देणे हा मूर्खपणा आहे. माझ्यासमोर स्वतःच्याच मर्यादा पार करण्याचे आव्हान पुरेसे आहे आणि ईश्वराने बुद्धीचा नजराणा सर्वांनाच एकसारखा दिला नाही,त्यामुळे मी फारसे डोके खपवत नाही.'


वानामेकरने हा धडा लवकर शिकून घेतला,पण मला हा धडा शिकायला तेहत्तीस वर्षे लागली.ज्या दरम्यान माझ्याकडून अनेक चुका घडल्या आणि तेव्हा कुठे मला असं आढळून आलं की शंभरातील नव्व्याण्णव लोक कुठल्याही गोष्टीसाठी स्वतःला दोषी मानत नाहीत, आपली चूक कधीच कबूल करत नाहीत.


कुणावर टिका करण्याने काही लाभ होत नाही.समोरची व्यक्ती आपला बचाव करू लागते,बहाणे बनवू लागते किंवा तर्क लढवू लागते.टीका धोकादायक असू शकते, कारण त्यामुळे त्या व्यक्तीच्या बहुमूल्य आत्मसन्मानाला ठेच पोचते,

तिचे मन दुखावले जाते अन् ती तुमच्याबद्दल आकस ठेवते.


जगप्रसिध्द मनोवैज्ञानिक बी.एफ.स्किनरने आपल्या काही प्रयोगांद्वारे हे सिध्द केले आहे,की ज्या जनावराला चांगल्या वागणुकीबद्दल बक्षीस दिले जाते ते त्या जनावरापेक्षा लवकर शिकते ज्याला वाईट वागणुकीबद्दल शिक्षा दिली जाते.नंतर झालेल्या संशोधनाद्वारे हे कळून आलं की माणसाच्या बाबतीतही खरे आहे.टिकेमुळे कुणीच सुधारत नाही. याउलट संबंध मात्र नक्कीच बिघडतात.अजून एक महान मनोवैज्ञानिक हॅन्स सॅल्येनं म्हटलं आहे, "जेवढे आम्ही स्तुतीसाठी भुकेले असतो,तेवढेच निंदेला घाबरतो."


आलोचना किंवा निंदा केल्याने कर्मचारी,परिवाराचे सदस्य आणि मित्रांचे मनोबल खचते आणि त्या स्थितीत काहीच बदल किंवा सुधारणा होत नाही ज्यासाठी आलोचना केली जाते.


एनिड,ऑक्लाहामाचे जॉर्ज बी.जॉन्स्टन एका इंजिनियरिंग कंपनीचे सुरक्षा अधिकारी होते.त्यांची अजून एक जबाबदारी अशी होती की जेव्हा कर्मचारी फिल्डमध्ये काम करत असतील तेव्हा त्यांनी हेल्मेट घातले आहे की नाही हे बघायचे.आधी त्यांना कुणा कर्मचाऱ्याने हेल्मेट घातले नसले की अजिबात सहन होत नसे.ते नियमांचा दाखला देत त्यांना नियमांचे सक्त पालन करण्यास सांगत.याचा परिणाम असा होई की कर्मचारी त्यांच्या आदेशाचे मारून-मुटकून पालन तर करीत,पण ते गेल्याबरोबर हेल्मेट काढून टाकत.यावर त्यांनी दुसरा उपाय शोधून काढला.पुन्हा जेव्हा त्याने काही कर्मचाऱ्यांना बिना हेल्मेट पाहिले तेव्हा त्यांनी त्यांना 'हे हेल्मेट आरामदायी नाही का?' असे विचारले.मग हसत त्यांना सांगितले की,इजा होण्यापासून बचाव होण्यासाठी हेल्मेट घालणे आवश्यक आहे.कामाच्या वेळी स्व-सुरक्षेसाठी ते घालायलाच हवे.याचा परिणाम असा झाला की कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने हेल्मेट घालायला सुरुवात केली आणि त्यांच्या मनातील रागाची भावना नाहीशी झाली.


इतिहासात तुम्हाला अशी हजारो उदाहरणे आढळतील, जी सांगतात की टीका करण्याने काहीच फायदा होत नाही.थिओडोर रुझवेल्ट आणि राष्ट्रपती टॅटमधल्या विवादाचे उदाहरण घ्या.एक असा विवाद ज्यामुळे रिपब्लिकन पार्टीचे विभाजन झाले,वुड्रो विल्सनला व्हाइट हाऊसमध्ये बसवून दिले आणि पहिल्या महायुध्दात मोठ्या चकचकीत अक्षरात काही ओळी नमूद केल्या आणि इतिहासाचा रोखच बदलून टाकला.


जेव्हा रुझवेल्ट १९०८ मध्ये व्हाइट हाऊसच्या बाहेर गेले तेव्हा त्यांनी टॅटचे समर्थन केले,जे राष्ट्रपती म्हणून निवडून आले.मग रुझवेल्ट सिंहाची शिकार करायला आफ्रिकेत निघून गेले.

परतल्यावर त्यांनी परिस्थिती बघितली तर ते भडकून उठले.त्यांनी अनुदारवादासाठी टॅटची टीका करणे सुरू केले आणि तिसऱ्यांदा स्वतः राष्ट्रपती होण्याचा प्रयत्न केला.त्यांनी बुल मूस पार्टीचे संगठन केले आणि जी.पी.ओ.ला जवळपास उध्वस्त केले.पुढच्या निवडणूकीत विलीयन हॉवर्ड टॅट व त्यांची रिपब्लिकन पार्टीचा दारुण पराभव झाला आणि त्याला केवळ व्हर्मांट व ऊटाइमध्येच सफलता मिळाली. या पार्टीचा हा आतापर्यंतचा सर्वांत लाजिरवाणा पराभव होता.या पराभवासाठी रुझवेल्टने टॅटला दोषी ठरवले, पण राष्ट्रपती टॅटने स्वतःला दोषी मानले का? अजिबात नाही.डोळ्यात अश्रू घेऊन भरल्या गळ्याने टॅट म्हणाला, "मी जे केलं, त्याखेरीज मी काय करू शकलो असतो ?"यात दोष कुणाचा होता? रुझवेल्टचा की टॅटचा ? खरे सांगायचे तर हे मला माहिती नाही आणि मला त्याची पर्वाही नाही.मी फक्त सांगू इच्छितो की, रुझवेल्टची टिका टॅटकडून हे वदवून घेऊ शकली नाही की तो दोषी होता.यातून फक्त हेच हाती लागले की टॅट स्वतःच्या बचावासाठी समर्थन देऊ लागले आणि डोळ्यांत पाणी आणून म्हणाले, "मी जे केले,त्याखेरीज मी काय करू शकलो असतो?"


टिपॉटडोम ऑईल स्कँडलचंच उदाहरण घ्या. १९२० च्या दशकाच्या सुरुवातीला हा वर्तमानपत्राचा चर्चेचा विषय होता.त्याने देशाला मुळासकट हलवून टाकले. लोकांच्या आठवणीत अमेरिकन सार्वजनिक जीवनात इतके मोठे प्रकरण याआधी कधीच झाले नव्हते.इथे त्या प्रकरणाबद्दल काही तथ्ये सांगितली जातील. 


हार्डिंगच्या कॅबिनेटमधल्या मंत्री अल्बर्ट बी. फॉलला एल्क हिल आणि टीपॉट डोममध्ये तेलाचा सरकारी भांडार लीजवर द्यायचा होता.ते तेलभांडार,नौसेनेच्या भविष्यकालीन उपयोगासाठी वेगळे ठेवले होते.फॉलने त्याचा लिलाव केला,की त्यांच्यासाठी टेंडर मागवले ? नाही.त्याऐवजी त्यांनी आपला मित्र डाडवर्ड एल. डॉहेनीला हे फायद्याचे कंत्राट थाळीत आयते वाढून दिले.

आणि यावर डॉहेनीने काय केले? त्याने ताबडतोब फॉलला दहा लाख डॉलर्स काढून दिले आणि त्याला 'कर्ज' हे नाव दिले.मग फॉलने जिल्ह्याच्या युनायटेड स्टेट्स मरीन्सला आदेश दिला की एल्क हिल भांडारातून निघणाऱ्या तेलाचा फायदा उठवणाऱ्या कंपन्या त्या जागेपासून हटवल्या जातील.जेव्हा कंपन्यांना बंदुकीच्या धाकावर तिथून हटवले गेले तेव्हा त्यांनी दुःखी होऊन कोर्टात धाव घेतली आणि मग टीपॉट डोम प्रकरणाचा रहस्यभेद झाला.त्यामुळे इतका तमाशा झाला की हार्डिंग सरकार धोक्यात आले.पूर्ण देश हादरून गेला.रिपब्लिकन पार्टीचे भविष्य अंधकारमय दिसू लागले आणि अल्बर्ट बी. फॉलला तुरुंगात जावे लागले.


लेख अपूर्ण एकुण तीन भागात…त्यातील हा पहिला भाग….!!!