* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: वेदनांचा सुंदर कोलाज : स्त्री — भाग २ /A Beautiful Collage of Pain: Women — Part 2

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

11/10/26

वेदनांचा सुंदर कोलाज : स्त्री — भाग २ /A Beautiful Collage of Pain: Women — Part 2

मूळ लेखक : डॉ. रवींद्र श्रावस्ती

  मूळ पुस्तक : आदिम दुःखाचे मुक्तिस्थानक हॉस्पिटल
 प्रकाशक : नाग-नालंदा प्रकाशन

Hysterical Conversion Reaction (HCR) आणि Hyperventilation Syndrome हे मनोकायिक आजार वरील मानसिक आजाराचीच रूपे! त्यामुळे त्यांचेही प्रमाण स्त्रियांमध्ये अधिकच असते. सदर रुग्ण खरे तर शारीरिक आजाराचीच लक्षणे घेऊन येतात. म्हणजे त्यांना कोणतातरी गंभीर आजार झाला आहे असेच बघणाऱ्याला वाटते. बघणाऱ्यालाच काय, ट्रीटमेंट देणाऱ्या डॉक्टरलासुद्धा काही क्षण तसेच वाटते, एवढी Perplexing ही बाब असते.

सर्व तपासण्या नॉर्मल येतात. रुग्णाला मानसिक आजार आहे म्हणून सांगावे की सांगू नये, हा डॉक्टरांसमोर पेच निर्माण होतो. खरे तर हा आजार ज्या स्त्रीला होतो, तिला तिच्या घरात सतत मानसिक व शारीरिक त्रासाला तोंड द्यावे लागते. त्यातून सुटकेचा मार्ग म्हणून असे आजार उद्भवतात. त्यामुळे रुग्णाचे हित लक्षात घेऊन तिच्या आजाराचे निदान मानसिक आजार असे न सांगता वेगळ्या स्वरूपात सांगितले जाते.

स्त्रियांच्या शरीरात सतत संप्रेरकीय (हार्मोनल) बदल होत असतात. शरीरात हार्मोन्सचे कमी-जास्त प्रमाणात (Fluctuations) स्राव स्रवले जातात. त्याबरोबरच थायरॉइड, अॅड्रिनल ग्रंथीचे आजार, ऑटोइम्यून आजार यामुळेही त्यांचे शरीर व मन खचते. बरे, या आजारांचे निदान तर लवकर होते? अजिबात नाही. एकतर त्या स्वतः वैद्यकीय तपासणीसाठी जात नाहीत. वरील आजारांची लक्षणे ही विशिष्ट प्रकारची नसतात, त्यामुळे डॉक्टर त्या क्षेत्रातला तज्ज्ञ असेल तरच निदान होते. निदान झाल्यावर त्या औषध नियमित घेतील, दीर्घकाळ घेतील असेही नाही. त्यांना औषधे नियमित आणून दिली जातील याची शक्यता कमीच.

स्त्री ही अन्नपूर्णा असते, असे मोठ्या दिमाखाने, गौरवाने सांगितले जाते. त्यामुळे होते काय, स्वयंपाक तिने करायचा (ती करतेच), सर्वांना प्रथम तिने खाऊ घालायचे आणि मग नंतर तिने जेवायचे. पूर्वी तर प्रथम पुरुष जेवायचे (त्यांना आग्रहाने भरपेट वाढायचे) आणि नंतर काही राहिलेले उरलेसुरले शिळेपाके अन्न घरातील स्त्रियांनी मागाहून खायचे. आजच्या आधुनिक प्रगत जगातही तेच चालू आहे. आधी पुरुष व मग स्त्रिया जेवतात. बऱ्याच वेळेला जेवणच शिल्लक राहत नाही. काहीबाही शिळेपाके अन्न किंवा बऱ्याच वेळेला पाणी पिऊन उपाशीच राहावे लागते. अशा प्रसंगी माझा आज उपवास आहे म्हणून वेळ मारून नेणाऱ्या स्त्रिया मी पाहिल्यात. माझ्या आईचे उदाहरण मी त्यासाठी पुरावा म्हणून सांगेन.

हा विषय इथे चर्चेला घ्यायचे कारण म्हणजे त्या निमित्ताने स्त्रियांच्या आहाराबाबत काही बाबी नोंदवणे व त्याचा त्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक जीवनावर काय परिणाम होतो, त्याचा लेखाजोखा मांडणे अगत्याचे वाटले म्हणून. स्त्रियांमध्ये पांडुरोग (Anaemia), पोटाचे पचनाचे विकार, संसर्गजन्य आजार (पांडुरोग व कुपोषण यामुळे संसर्गजन्य आजार वाढतात), कुपोषण (Malnutrition) आदी आजार होतात.

भूक उलटून गेल्यावर जेवणास मिळणे, अपुरे वा शिळे अन्न मिळणे, काही वेळेला तेही न मिळणे, भूक मंदावणारे आजार त्यामुळे योग्य आहार घेतला जात नाही. उपवास, शाकाहारी जेवणावरच भर यामुळेही कुपोषण होते.

स्त्रियांवर स्वयंपाकाची जबाबदारी असल्यामुळे त्यांना स्वतः स्वयंपाक बनवावा लागतो. स्वतः बनविलेले अन्न त्यांना खायची इच्छाच होत नाही. थोड्याफार जेवणावर त्या आटोपते घेतात. तिचा जीवनाचा सर्वांत जास्त काळ किचनमध्येच जातो. तेथील कोंदट, कुबट, दमट, उष्ण वातावरण निरुत्साह निर्माण करणारे, श्वसनाचे विकार जडवणारे, फार काळ उभे राहिल्यामुळे व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास, गुडघेदुखी, पिंढऱ्यादुखी यांचा त्रास त्यांना सोसावा लागतो.

'अतिथी देवो भव'च्या अतिरेकामुळे घरात किती अन्न शिल्लक आहे त्याचा विचार न करता येणाऱ्या पाहुण्यांना, आगंतुकांना अतिआग्रहाने घरातल्या पुरुषाकडून खायला घातले जाते. त्यामुळे घरच्या 'अन्नपूर्णे'ला अर्धपोटी किंवा उपाशी राहावे लागते.

गरोदरपणात व बाळंतपणानंतर Nutritional Needs वाढलेल्या असतात.

वर उल्लेख केलेल्या अनेक गोष्टींमुळे त्यांची पूर्तता होत नाही. या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊन स्त्रीवर्गाचे कुपोषण अनेक पटीने वाढते.

या कुपोषित बायका मग अनेक आजारांना बळी पडतात. रक्त कमी होणे (रक्तक्षय), ऑस्टिओपोरोसिस (हाडांची झीज), आहारघटकांची कमतरता, पचनाचे विकार, जंतुसंसर्गाचे आजार (Infections), आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड (थायरॉइड ग्रंथीची सूज), थायरॉइड ग्रंथीचे आजार, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, या सर्व आजारांमुळे शारीरिक क्षमता कमी होते. थोड्याही कामाने त्या थकतात. शारीरिक, मानसिक दौर्बल्यामुळे अन्यायाचा प्रतिकार केला जात नाही. तसाच अत्याचार सहन केला जातो. आयुष्याच्या एका विशिष्ट वळणावर नैराश्य गाठते. त्यातून सुटण्याचे दोनच मार्ग. मार्ग एक आत्महत्या, मार्ग दोन- मनाने खचत खचत जाणे आणि स्वतःला तसेच हळूहळू विझविणे! (मानसिक हत्या)

गुप्तांगाचे आजार आणि स्त्री

हात, पाय, नखे, बोटे, पोट, छाती हे जसे शरीराचे भाग आहेत, तशीच जननेंद्रियेसुद्धा शरीराचेच भाग आहेत. स्त्री हे नरकाचे द्वार आहे. ती पुरुषांना बिघडविते. कामवासना जागृत करून पुरुषाला कह्यात ठेवते अशी इथली पुराणे, धर्मसूत्रे, स्मृती नावाचे ग्रंथ सांगत राहतात. त्यामुळे कामवासना ही नैसर्गिक न मानता त्याला पाप या संकल्पनेत ढकलले जाते. इथल्या आध्यात्मिक, सांस्कृतिक क्षेत्राने स्त्री-पुरुषांच्या नैसर्गिक लैंगिक भावनांना कायमच तिटकाराने, तुच्छतेने पाहायला शिकविले. त्यामुळे कामवासना, लिंगवासना ही दडून, गुप्तपणे भागविली गेली. तिच्याकडे विकृती म्हणून बघितले गेले. पंचेंद्रियांचे सुख मान्य केले गेले; पण लिंगेंद्रिय/जननेंद्रिय यांचे सुख पाप मानले गेले. त्या शरीराच्याच अवयवांना गूढ, गुप्त, तिरस्कृत ठरविले. त्यामुळे त्यांचे आरोग्य हा चिंतनाचा आणि चिंतेचा विषय कधीच झाला नाही, या अवयवांना गुप्तांग का म्हणतात ते वरील विवेचनावरून स्पष्ट होईल असे वाटते. गुप्तांगांबरोबर लज्जाही जोडली गेलीय. त्यामुळे या अवयवांचे आजार गुप्त, झाकून ठेवण्यातच धन्यता मानली जाते. त्यामुळे या आजारांचे निदान बहुतेक केसेसमध्ये उशिराच होते, तोपर्यंत रोगाने गंभीर रूप धारण केलेले असते.

बऱ्याच वेळेला लाजून आजाराच्या नेमक्या तक्रारी न सांगता थकवा आलाय, कणकण आहे, भूक लागत नाही असल्या थातूरमातूर तक्रारी सांगितल्या जातात. बरीच महिने, वर्षे त्यामुळे थातूरमातूर उपचार करण्यातच खर्ची पडतात. व्हायचे तेच होते, गुप्तांगांचे आजार बळावतात. पेशंटला 'शॉक स्टेज'मध्ये आणले जाते. जिथून मृत्यूचे दार सहजासहजी उघडले जाते. सदर भागांच्या कॅन्सरचेही तसेच होते. निदान होईतो कॅन्सर शरीरभर पसरलेला असतो. मग ऑपरेशन करून कॅन्सर काढता येत नाही.

जिवंतपणी मारणाऱ्या, जाळणाऱ्या औषधांचा, रेडिएशनचा मारा केला जातो. दुखरा, खंगता मृत्यू हेच भागधेय उरून राहते.

आरोग्य यंत्रणांचा वापर आणि स्त्री आरोग्य

आतापर्यंत हे सिद्ध झालेय की स्त्रियांच्या आरोग्याबाबत, रोगाच्या उपचाराबाबत उशीर केला जातो, हेळसांड केली जाते. पुरुषांना लगेच दाखविले जाते. त्यांच्यासाठी महागडे पर्यायसुद्धा स्वीकारले जातात. प्रसंगी कर्ज काढून उपचार केला जातो. स्त्रियांच्या बाबत एक तर कमी स्त्रियांच्या वाट्याला पुरुषांसारखे तत्परतेचे, पदरमोड करून औषधोपचार केले याचे भाग्य लाभते. 'तपासण्या नंतर करू. अॅडमिट नंतर करू. आता तात्पुरत्या गोळ्या द्या. घरी अडचण आहे हो. पोटापाण्याचे काय करायचे? वेळ नाही. रजा नाही. एवढे काहीही झाले नाही. निमताळी आहे. मुद्दाम ढोंग करते. नाटकं करते, तिला काही झाले नाही', आदी उद्गार, शेरे ऐकायला मिळतात.

बऱ्याच वेळेला सोशीक, समंजस, कुटुंबवत्सल व त्यागी स्वभावाच्या स्त्रियाच तपासण्या करून घेण्यास, अॅडमिट होऊन उपचार घेण्यास तयार नसतात. त्यामागे आर्थिक अडचणी येतील, नवऱ्याला त्रास होईल, मुलाबाळांची शाळा बुडेल, त्यांच्या खाण्याची आबाळ होईल असा विचार असतो.

दवाखान्यात सोबत कोण राहणार? हा प्रश्नही असतोच. पुरुष कसे राहतील? त्यांना नोकरी आहे, दवाखान्यातली दगदग, ताणतणाव, घाण त्यांना सहन होणार नाही. इ.

तर हे असे आहे.

शास्त्रीय उपचारांपेक्षा पर्यायी उपचार पद्धतीवर अंधविश्वास

यावर चर्चा करण्यापूर्वी एका गोष्टीची नोंद करू इच्छितो. स्त्री रुग्ण पुरुष डॉक्टरांना त्यातल्या त्यात स्त्रीरोगतज्ज्ञ पुरुष डॉक्टरांना दाखविण्याचे टाळतात. आता त्याचे प्रमाण कमी झालेय. तरीही लेडीज डॉक्टरांना दाखविण्याकडे काहींचा कल असतो, हे खरे आहे. बरे या लेडीज डॉक्टर्स तर भरपूर संख्येने समाजात आहेत? मुळीच नाहीत. त्यामुळे त्यांना प्राधान्यक्रमाने दाखविणाऱ्या स्त्री रुग्णांना कमीच संधी आहेत. त्यामुळे पुरुष डॉक्टरांना दाखविण्याशिवाय पर्याय उरत नाही. पुरुष डॉक्टरांना दाखविलेच तर गुप्तांगाच्या तपासण्या टाळल्या जातात, वेळा पाळत नाहीत, अर्धवट उपचार घेतात.

अॅलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद उपचारपद्धती समाजात असताना त्यांचा वापर न करण्याकडेही स्त्रियांचा कल असतो. अंगारे-भंडारे, मंत्र-तंत्र, झाडपाला, देशी औषधे (?), जडीबुटी, कसल्याशा साइड इफेक्ट नसलेल्या (?) पावडरी, मंतरलेले पाणी, नारळ, मॅग्नेट, जादुई गादी अशी बरीच लिस्ट लांबवता येईल. या गोष्टींना स्त्रियांची पसंती असते. स्त्रिया यांचा वापर करतात. त्यात औषधी गुण आहेत की नाहीत? त्यांना मान्यता आहे का? त्याने काही नुकसान होऊ शकते का? हे प्रश्न त्यांच्या लेखी नसतातच मुळी.

कुणी साळकाई, माळकाई सांगेल तिकडे धावतात. बुवा-बाबा, मांत्रिक-तांत्रिक, तथाकथित आयुर्वेदिक उपचार करणारे, अशा कुणाकडेही जातात. व्यवस्थित शिक्षण घेतलेले आधुनिक वैद्यकीय तज्ज्ञ असताना वरील लोकांच्या नादाला लागून शरीराचे आणि पैशाचे मातेरे करून घेतात. व्रतवैकल्ये, उपासतापास, नवससायास रोगमुक्तीसाठी करताना त्या दिसतात.

शस्त्रक्रिया टाळल्या जातात. आजार दडवून ठेवतात. उपचारादरम्यान पॅनिक अटॅक येणे, दवाखान्यातून पळ काढणे, निराशेचे झटके येणे, साधी सलाईन लावताना आरडाओरड, रडारड, आदळआपट, धावाधाव करणे, यात स्त्रियाच आघाडीवर असतात.

रक्त दिसले, साधे टोचले तर डोळे पांढरे करणाऱ्या, भोवळ येऊन कोसळणाऱ्या स्त्रिया भेटतातच.

तर असे रोग आणि अशा स्त्रिया!

स्त्री रुग्णबाई, तूही ग्रेट!

वेदनांचा सुंदर कोलाज : स्त्री

संपादकीय तथ्यपडताळणी, संदर्भ-स्रोत आणि SEO

१. संपादकीय भूमिका

हा लेख डॉ. रवींद्र श्रावस्ती यांच्या लेखनावर आधारित आहे. लेखातील मूळ विचार, अनुभव आणि मांडणी यांचा आदर राखून खालील तथ्यपडताळणी स्वतंत्रपणे करण्यात आली आहे.

लेखातील काही विधाने वैद्यकीय माहितीवर आधारित आहेत, तर काही लेखकाची निरीक्षणे, अनुभव किंवा सामाजिक भाष्य आहेत. त्यामुळे प्रत्येक विधानाला वैज्ञानिक तथ्य समजणे योग्य ठरणार नाही.

या पडताळणीचा उद्देश लेखकाच्या विचारांमध्ये बदल करणे नसून वाचकांना कोणती माहिती वैद्यकीयदृष्ट्या मान्य आहे, कोणत्या विधानाला अधिक संदर्भ आवश्यक आहेत आणि कोणत्या दाव्यांना पुरेसा आधार उपलब्ध नाही, हे समजावून सांगणे हा आहे.

२. तथ्यपडताळणी

अ. मासिक पाळी आणि स्त्रियांच्या शारीरिक समस्या

१. मासिक पाळीच्या काळात पोटदुखी, डोकेदुखी, थकवा आणि मनःस्थितीत बदल होऊ शकतात.

पडताळणी : सत्य.

ही मासिक पाळीशी संबंधित आढळणारी लक्षणे आहेत. मात्र प्रत्येक स्त्रीला ही सर्व लक्षणे होतातच असे नाही. लक्षणांचे स्वरूप आणि तीव्रता व्यक्तीनुसार बदलते.

२. प्रत्येक स्त्रीला मासिक पाळीचा त्रास सारखाच होतो.

पडताळणी : असत्य.

मासिक पाळीचा अनुभव प्रत्येक स्त्रीसाठी वेगळा असू शकतो. काहींना सौम्य त्रास होतो, तर काहींना तीव्र वेदना किंवा इतर समस्या जाणवतात.

३. मासिक पाळी साधारण सात दिवस चालते.

पडताळणी : अंशतः सत्य.

सामान्यतः मासिक पाळीचा कालावधी साधारण २ ते ७ दिवस असू शकतो. प्रत्येक स्त्रीचा कालावधी सात दिवसांचा असतो असे नाही.

४. मासिक पाळीतील तीव्र वेदना किंवा अतिरक्तस्राव दुर्लक्षित करावा.

पडताळणी : असत्य.

तीव्र वेदना, अतिरक्तस्राव किंवा दैनंदिन जीवनावर परिणाम करणारी लक्षणे असल्यास वैद्यकीय तपासणी आवश्यक असू शकते.

आ. मानसिक आरोग्य आणि सामाजिक परिस्थिती

१. स्त्रियांमध्ये चिंता आणि नैराश्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक आहे.

पडताळणी : सत्य.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार स्त्रियांमध्ये नैराश्य आणि चिंता विकार अधिक प्रमाणात आढळतात. मात्र त्यामागे एकच कारण नसते.

२. घरगुती जबाबदाऱ्या, हिंसा, आर्थिक असमानता आणि सामाजिक दबाव यांचा स्त्रियांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.

पडताळणी : सत्य.

सामाजिक आणि आर्थिक असमानता, हिंसा, भेदभाव आणि काळजी घेण्याच्या जबाबदाऱ्यांचा स्त्रियांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

३. स्त्रियांमधील मानसिक आजारांचे कारण केवळ घरगुती ताणतणाव आहे.

पडताळणी : असत्य.

मानसिक आरोग्यावर जैविक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक अशा अनेक घटकांचा एकत्रित परिणाम होतो.

४. स्त्रियांवरील हिंसेचा त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो.

पडताळणी : सत्य.

हिंसेमुळे नैराश्य, चिंता, मानसिक आघात आणि प्रजनन आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

इ. HCR आणि Hyperventilation Syndrome

१. Hysterical Conversion Reaction (HCR) या संज्ञेचा वैद्यकीय इतिहास आहे.

पडताळणी : सत्य.

Conversion Disorder आणि Hysteria या जुन्या वैद्यकीय संज्ञा आहेत. आधुनिक वैद्यकीय साहित्यात Functional Neurological Disorder (FND) ही संज्ञा अधिक वापरली जाते.

२. HCR हा केवळ स्त्रियांच्या मानसिक तणावामुळे होतो.

पडताळणी : अपुरा पुरावा.

Functional Neurological Disorder चे स्वरूप गुंतागुंतीचे आहे. प्रत्येक रुग्णामागे मानसिक संघर्ष किंवा ताणतणाव असतोच असे नाही. त्यामुळे त्याचे एकाच कारणाने स्पष्टीकरण करता येत नाही.

३. Hyperventilation Syndrome मध्ये श्वास वेगाने होणे, छातीत दुखणे आणि चक्कर येणे अशी लक्षणे असू शकतात.

पडताळणी : सत्य.

ही या विकाराशी संबंधित आढळणारी काही लक्षणे आहेत.

४. Hyperventilation Syndrome केवळ स्त्रियांनाच होतो.

पडताळणी : असत्य.

हा त्रास कोणत्याही लिंगाच्या व्यक्तीला होऊ शकतो. काही गटांमध्ये तो अधिक आढळू शकतो; परंतु तो फक्त स्त्रियांपुरता मर्यादित नाही.

ई. हार्मोन्स, थायरॉइड आणि इतर आजार

१. हार्मोन्समधील बदलांचा मासिक पाळी आणि मनःस्थितीवर परिणाम होतो.

पडताळणी : सत्य.

मासिक पाळीच्या चक्रात हार्मोन्सची महत्त्वाची भूमिका असते. हार्मोन्समधील बदलांमुळे काही स्त्रियांना शारीरिक आणि भावनिक लक्षणे जाणवू शकतात.

२. थायरॉइडचे आजार स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा अधिक आढळतात.

पडताळणी : सत्य.

थायरॉइडचे आजार स्त्रियांमध्ये तुलनेने अधिक आढळतात.

३. थायरॉइडच्या त्रासामुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते.

पडताळणी : सत्य.

थायरॉइड हार्मोन्समधील असंतुलनामुळे मासिक पाळीच्या चक्रावर परिणाम होऊ शकतो.

४. प्रत्येक स्त्रीला हार्मोन्समधील बदलांमुळे मानसिक आजार होतो.

पडताळणी : असत्य.

हार्मोन्सचा परिणाम व्यक्तीनुसार बदलतो. प्रत्येक स्त्रीला मानसिक आजार होतो असा निष्कर्ष काढता येत नाही.

उ. रक्तक्षय, पोषण आणि स्वयंपाकघरातील परिस्थिती

१. भारतातील १५ ते ४९ वयोगटातील ५७ टक्के स्त्रियांमध्ये रक्तक्षय आढळतो.

पडताळणी : सत्य.

भारताच्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या पाचव्या फेरीतील (NFHS-5, २०१९–२१) आकडेवारीनुसार १५ ते ४९ वयोगटातील स्त्रियांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण ५७ टक्के होते.

२. स्त्रियांमधील रक्तक्षयाचे कारण केवळ अपुरे अन्न आहे.

पडताळणी : असत्य.

लोहाची कमतरता, रक्तस्राव, संसर्ग, काही आनुवंशिक आजार आणि इतर पोषणविषयक कारणांमुळे रक्तक्षय होऊ शकतो.

३. चुलीचा धूर आणि घरातील वायुप्रदूषण स्त्रियांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

पडताळणी : सत्य.

प्रदूषणकारी इंधन वापरल्यामुळे निर्माण होणारा धूर श्वसनसंस्थेसह इतर आरोग्य समस्यांचा धोका वाढवू शकतो. स्वयंपाकघरात अधिक वेळ घालवणाऱ्या स्त्रियांना त्याचा अधिक संपर्क येऊ शकतो.

४. घरकाम आणि स्वयंपाकाचा ताण स्त्रियांच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो.

पडताळणी : सत्य.

घरगुती कामांचा मोठा भार, विश्रांतीचा अभाव आणि काळजी घेण्याच्या जबाबदाऱ्यांचा शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

ऊ. स्त्रियांचे शरीर, लैंगिक आरोग्य आणि सामाजिक गैरसमज

१. शरीरावर गोंदण किंवा टोचण्याच्या प्रक्रियेमुळे संसर्गाचा धोका असतो.

पडताळणी : सत्य.

अस्वच्छ उपकरणे किंवा योग्य निर्जंतुकीकरणाचा अभाव असल्यास संसर्ग आणि रक्तातून पसरणाऱ्या काही आजारांचा धोका असतो.

२. स्त्रीने विशिष्ट कपडे घातल्यामुळे तिच्यावर लैंगिक अत्याचार होतो.

पडताळणी : असत्य.

कपड्यांना लैंगिक अत्याचाराचे कारण ठरवता येत नाही. लैंगिक अत्याचाराची जबाबदारी अत्याचार करणाऱ्या व्यक्तीची असते. कपड्यांच्या आधारे पीडितेला दोष देणे चुकीचे आहे.

३. स्त्रिया नेहमी पर्यायी उपचारांनाच प्राधान्य देतात.

पडताळणी : सर्वसाधारण दावा सिद्ध नाही.

काही स्त्रिया पूरक किंवा पर्यायी उपचारांचा वापर करतात. मात्र त्यावरून सर्व स्त्रियांबद्दल असा निष्कर्ष काढता येत नाही.

४. रक्त पाहून स्त्रियांना नेहमी चक्कर येते किंवा त्या बेशुद्ध पडतात.

पडताळणी : पुरावा अपुरा.

काही व्यक्तींना रक्त पाहिल्यावर चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडण्यासारखी vasovagal प्रतिक्रिया येऊ शकते. ही केवळ स्त्रियांची सार्वत्रिक शारीरिक प्रवृत्ती नाही.

३. सत्य-असत्य : महत्त्वाच्या दाव्यांचा सारांश

सत्य ठरलेले मुद्दे

·        मासिक पाळीत वेदना आणि इतर शारीरिक लक्षणे होऊ शकतात.

·        स्त्रियांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण मोठे आहे.

·        थायरॉइडचे आजार स्त्रियांमध्ये तुलनेने अधिक आढळतात.

·        हिंसेचा स्त्रियांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो.

·        घरातील धूर आणि वायुप्रदूषण आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.

·        घरकामाचा असमान भार आणि सामाजिक दबाव आरोग्यावर परिणाम करू शकतात.

अंशतः सत्य ठरलेले मुद्दे

·        मासिक पाळीचा कालावधी सात दिवस असतो.

·        Hyperventilation Syndrome काही स्त्रीवर्गात अधिक आढळू शकतो.

·        काही स्त्रिया पूरक किंवा पर्यायी उपचारांचा वापर करतात.

असत्य ठरलेले मुद्दे

·        सर्व स्त्रियांना मासिक पाळीचा त्रास सारखाच होतो.

·        HCR केवळ स्त्रियांनाच होतो.

·        स्त्रियांच्या कपड्यांमुळे लैंगिक अत्याचार होतात.

·        रक्तक्षयाचे कारण फक्त अपुरे अन्न आहे.

पुरावा अपुरा असलेले मुद्दे

·        स्त्रिया नेहमी पर्यायी उपचार निवडतात.

·        रक्त पाहून स्त्रिया नेहमी बेशुद्ध पडतात.

·        स्त्रियांच्या मानसिक आजारांचे एकमेव कारण घरगुती ताणतणाव आहे.

४. संपादकीय निष्कर्ष

या लेखातील मासिक पाळी, रक्तक्षय, मानसिक आरोग्य, थायरॉइड, घरगुती कामाचा ताण आणि हिंसेचे आरोग्यावरील परिणाम यांसंबंधी अनेक मुद्द्यांना वैद्यकीय व सामाजिक संशोधनाचा आधार आहे.

मात्र HCR चे स्पष्टीकरण, स्त्रियांच्या उपचारपद्धतींबाबतचे सर्वसाधारण दावे आणि कपड्यांचा लैंगिक अत्याचाराशी जोडलेला संबंध याबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

मूळ लेखातील लेखकाचे विचार आणि मांडणी कायम ठेवून ही तथ्यपडताळणी स्वतंत्र विभागात देणे योग्य ठरेल.

ही माहिती वैद्यकीय निदान किंवा उपचारांचा पर्याय नाही. आरोग्यविषयक तक्रारी असल्यास पात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

५. संदर्भ व स्रोत

खालील स्रोत लेखातील आरोग्यविषयक आणि सामाजिक दाव्यांची पडताळणी करण्यासाठी उपयुक्त आहेत.

१. जागतिक आरोग्य संघटना (WHO) — मासिक पाळीचे आरोग्य

https://www.who.int/news-room/fact-sheets/detail/menstrual-health

२. NHS — मासिक पाळीतील समस्या

https://www.nhs.uk/conditions/period-pain/

३. NHS — मासिक पाळीपूर्वीची लक्षणे (PMS)

https://www.nhs.uk/conditions/pre-menstrual-syndrome/

४. WHO — स्त्रियांचे आरोग्य

https://www.who.int/health-topics/women-s-health

५. WHO — नैराश्य

https://www.who.int/news-room/fact-sheets/detail/depression

६. WHO — चिंता विकार

https://www.who.int/news-room/fact-sheets/detail/anxiety-disorders

७. WHO — स्त्रियांवरील हिंसा

https://www.who.int/news-room/fact-sheets/detail/violence-against-women

८. भारत सरकार — NFHS-5 आणि रक्तक्षयविषयक माहिती

https://www.pib.gov.in/Pressreleaseshare.aspx?PRID=1795421

९. MSD Manual — Hyperventilation Syndrome

https://www.msdmanuals.com/professional/pulmonary-disorders/symptoms-of-pulmonary-disorders/hyperventilation-syndrome

१०. MSD Manual — Functional Neurological Symptom Disorder

https://www.msdmanuals.com/professional/psychiatric-disorders/somatic-symptom-and-related-disorders/functional-neurological-symptom-disorder

११. अमेरिकेची Office on Women's Health — थायरॉइडचे आजार

https://womenshealth.gov/a-z-topics/thyroid-disease

१२. WHO — घरगुती वायुप्रदूषण

https://www.who.int/news-room/fact-sheets/detail/household-air-pollution-and-health

१३. UK Government — गोंदण आणि शरीर टोचण्याशी संबंधित आरोग्यविषयक माहिती

https://www.gov.uk/government/publications/tattooing-and-body-piercing

पुस्तकाचा संदर्भ

·        मूळ लेखक : डॉ. रवींद्र श्रावस्ती

·        पुस्तक : आदिम दुःखाचे मुक्तिस्थानक हॉस्पिटल

·        प्रकाशक : नाग-नालंदा प्रकाशन

·        प्रकाशनाशी संबंधित नाव : त्र्यंबकेश्वर मिरजकर

·        आवृत्ती आणि प्रकाशन वर्ष : उपलब्ध माहिती नसल्यामुळे नमूद केलेले नाही.

६. SEO तपशील

SEO Title: वेदनांचा सुंदर कोलाज : स्त्री | स्त्रियांचे आरोग्य आणि सामाजिक वास्तव

Meta Description: स्त्रियांच्या मासिक पाळीपासून मानसिक आरोग्यापर्यंत, रक्तक्षयापासून सामाजिक प्रश्नांपर्यंत विविध वेदनांचा वेध घेणारा डॉ. रवींद्र श्रावस्ती यांचा विचारप्रवर्तक लेख.

Focus Keyword: स्त्रियांचे आरोग्य

Secondary Keywords:

·        स्त्रियांचे मानसिक आरोग्य

·        मासिक पाळी

·        स्त्रियांमधील रक्तक्षय

·        महिलांचे आरोग्य

·        स्त्रियांचे सामाजिक प्रश्न

·        स्त्रियांचे शारीरिक आरोग्य

English Title: A Beautiful Collage of Pain: Women

URL Slug: beautiful-collage-of-pain-women

७. लेखक आणि पुस्तकाचा परिचय

मूळ लेखक : डॉ. रवींद्र श्रावस्ती

पुस्तक : आदिम दुःखाचे मुक्तिस्थानक हॉस्पिटल

प्रकाशक : नाग-नालंदा प्रकाशन

या लेखातून स्त्रीच्या शारीरिक वेदना, मानसिक संघर्ष, आरोग्यविषयक प्रश्न आणि सामाजिक वास्तव यांचा विचार मांडण्यात आला आहे.

मूळ पुस्तक वाचून या विचारांचा अधिक सखोल संदर्भ समजून घेता येईल.