तिसरी लाट अलविन टॉफलेर यांच्या Third Wave या पुस्तकाचा अनुवाद शरदिनी मोहिते यांनी केला आहे तर,प्रकाशक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुणे नोव्हेंबर १९९१ हे आहेत.याच पुस्तकातील लेख तीन भागामध्ये एप्रिल.२०२५. मध्ये प्रकाशित झालेले आहेत. इथून पुढे क्रमशःहे संपूर्ण पुस्तक प्रकाशित केले जाईल.
आपणा सर्वांचे पुनश्च धन्यवाद.विजय गायकवाड
निवेदन Request…
मानवजातीचे भवितव्य काय असेल हे जाणण्याच्या जिज्ञासेतून फ्युचरॉलॉजी किंवा फ्युचर स्टडीज् म्हणजेच भवितव्यशास्त्र या नव्या ज्ञानशाखेची तीसचाळीस वर्षांपूर्वी वाढ होऊ लागली.भारतात मात्र १९७० नंतर या नव्या ज्ञानशाखेचा विकास करण्याचे प्रयत्न सुरु झाले.एकविसाव्या शतकातील भारत कसा असेल याबद्दलची चित्रे तर अगदी अलीकडे रेखाटण्यात येऊ लागली भवितव्यशास्त्राच्या वाटचालीकडे सामान्य माणसांचेही लक्ष वेधण्यास कारणीभूत ठरलेल्या लेखकांमध्ये अल्विन टॉफलर या अमेरिकन लेखकास अग्रस्थान द्यावयास हवे.जुलै,१९७० मध्ये त्यांचे " फ्युचर शॉक " हे पुस्तक प्रसिद्ध झाले आणि ते इतके लोकप्रिय झाले की त्या पुस्तकाच्या लाखो प्रती खपल्या.१९२८ साली न्यूयॉर्कमध्ये जन्मलेल्या टॉफलरनी अनेक वर्षे वार्ताहर म्हणून काम केले आहे.१९८० साली त्याचे " द थर्ड वेव्ह" हे पुस्तक प्रकाशित झाले आणि त्याच्याही लाखो प्रती खपल्या.अनेक भाषांमध्ये त्याचे अनुवाद करण्यात आले.जपानमध्ये या पुस्तकाने विक्रीचे उच्चांक मोडून विक्रम केला.भांडवलशाही तसेच समाजवादी देशांतील उद्योगप्रधान समाज ज्या पेचप्रसंगांना तोंड देत आहे त्याची कारणमीमांसा करण्याचा टॉफलरनी या पुस्तकात प्रयत्न केला असल्यामुळे आणि तो करताना जडजंबाल भाषेचा अवलंब न करता सोप्या भाषेत विश्लेषण केल्यामुळे त्यांचे पुस्तक जगभरच्या वाचकांना आवडल्याशिवाय राहिले नाही.
तंत्रविद्या,अर्थव्यवस्था,राजकारण,कौटुंबिक जीवन, ऊर्जेचा वापर यासारख्या क्षेत्रातील बदलामुळे " तिसरी लाट" आली असून तिची परिणती नव्या संस्कृतीच्या उदयात होण्याची चिन्हे दिसत आहेत असे टॉफलरना वाटते.शेतीचा उदय ही मानवी संस्कृतीच्या इतिहासातील पहिली लाट होती.सतराव्या शतकाच्या अखेरीस ती ओसरली आणि त्यानंतरच्या काळात औद्योगिक क्रांतीच्या रूपाने दुसरी लाट आली.तिचाही भर १९५० नंतर ओसरु लागला असून औद्योगिक दृष्टया प्रगत देशांनी आता तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्याची तयारी केली पाहिजे असे टॉफलरचे म्हणणे आहे.
तिसऱ्या लाटेमुळे उदयाला येणाऱ्या युगात इलेक्ट्रॉनिक उद्योग,
अवकाश उद्योग,समुद्राच्या पोटात दडलेल्या खनिजांच्या आधारे विकसित झालेले उद्योग तसेच जीवोद्योग वगैरे नवनवोन उद्योगांना महत्व येणार आहे असे टॉफलरना वाटते.प्रसार माध्यमांचे विघटन व विकेंद्रीकरण होईल असे त्यांनी भाकित केले आहे. तिसऱ्या लाटेमुळे निर्माण होणाऱ्या नव्या युगात कुटुंबसंस्थेत कोणते बदल होतील,माहिती व ज्ञान यांना फार मोठे महत्व प्राप्त होणार असल्याने शिक्षण व्यवस्थेत कोणते फेरफार करावे लागतील वगैरे विषयांचाही टॉफलरने वेध घेतलेला आहे.जगभर वाचल्या गेलेल्या या पुस्तकाचे भाषांतर करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने श्रीमती शरदिनी मोहिते यांच्यावर सोपवली होती. त्यांनी केलेले भाषांतर वाचून टॉफलरच्या विचारांची मराठी वाचकांना तोंडओळख होईल असे वाटते.
य. दि. फडके,अध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,मुंबई : ८ जानेवारी,१९९१
प्रास्ताविक
आजच्या काळात आपल्या नजरेसमोर नाचणाऱ्या मथळ्यांकडे आपण भयचकित होऊन पहात रहातो, कारण हाच तो काळ ज्यात दहशतवादी ओलिसांबरोबर जीवघेणा खेळ खेळत आहेत,तिसऱ्या महायुद्धाच्या वावड्या उठत असतानाच ठिकठिकाणची चलने कोसळू लागलेली आहेत,वकिलाती जळत आहेत,कित्येक देशांतून बंडखोर टोळ्यांतील सैनिक आपल्या बुटांच्या नाड्या बांधत उठावाला सज्ज होत आहेत.सोन्याची किंमत सर्व भीतींचे संवेदनशील भारमापक-सर्व विक्रम मोडत आहे.बँका हादरताहेत.महागाई आवाक्याबाहेर भडकते आहे.
आणि जगातील सरकारे हतबल होऊन गेलेली आहेत.आणि या पार्श्वभूमीवर धोक्याचा,दुर्देवांचा इशारा देणान्यांचे समूहगान स्मशान-गीतांनी वातावरण भरून टाकत आहे तथाकथित रस्त्यावरचा माणूग म्हणू लागला आहे. की जग वेडे झाले आहे. आणि तज्ञांच्या मते हे सर्व प्रवाह सर्वविनाशाकडेच जगाला घेऊन चाललेले आहेत.परंतु या पुस्तकात एकदम वेगळा दृष्टिकोण सादर करण्यात आलेला आहे.
पुस्तकात म्हटले आहे,की जग वेडे होत चाललेले नाही. आणि तसे पाहू जाता वरवर निरर्थक दिसणान्या या घटनांच्या,गोंगाटाच्या आणि खणखणाटाच्या खालच्या घरात आश्चर्यकारक आणि अव्यक्त अशी आशादायक घाटणी काम करते आहे ! हे पुस्तक त्या घाटणीबद्दल आणि त्या आशेबद्दलच आहे.
तिसरी लाट' हे पुस्तक ज्या लोकांना मानवीकहाणी संपुष्टात येणे तर राहू द्याच नुकतीच सुरू झाली आहे असे वाटते,
अशांकरिता लिहिलेले आहे.तिसरी लाट' हया पुस्तकात दृष्टिकोण आहे,की काही घटनांचा,
प्रक्रिर्याचा आणि तत्त्वांचा वापर एखादी संस्कृती करून घेत असते.आणि स्वतःचे एक पायाभूत उत्पत्ति-शास्त्र तयार करत असते;आणि त्याच्या आधाराने ती वास्तवाचे स्पष्टीकरण करत असते.
शिवाय स्वतःच्या अस्तित्वालाही न्याय देत असते.ह्या पुस्तकात एकमेकांशी टक्कर घेणाऱ्या लाटांचे रूपक योजण्यात आलेले आहे.अतिशय विसंवादी अशा माहितीचे सुसूत्रीकरण हा एकच या रूपकामागचा हेतु नाही;तर त्यायोगे विचारांचा गोंधळ नाहीसा होऊन स्वच्छ,प्रखर प्रकाशामध्ये आपल्याला माहीत असलेल्या गोष्टींचेच परंतु नितळ स्पष्ट चित्र आपल्याला दिसून येते.
शरदिनी मोहिते…!!!
लाटांची टक्कर / Collision of waves
एक | महान संघर्ष ■■■
एक नवीच संस्कृती आपल्या जीवनात उदयाला येते आहे,आणि सर्वत्रच आढळणारे अविचारी लोक तिला दडपून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.या नव्या संस्कृतीने आपल्या बरोबर नवीन प्रकारच्या कुटुंबरचना आणल्या आहेत;कामे करण्याच्या,
प्रेमाच्या,जगण्याच्या नव्या रीती आणल्या आहेत;नवेच अर्थशास्त्र आणले आहे,नवे राजकीय संघर्ष आणले आहेत;आणि या सर्वांहूनही विशेष म्हणजे नव्या स्वरुपाची जाण आणली आहे! या नव्या संस्कृतीचे काही अंश सध्या, आजमितीला अस्तित्वात आलेले आहेत.आणि लाखो लोकांनी आपले जीवन उद्याच्या तालाशो जुळवून घेण्यास सुरुवातही केलेली आहे.
इतर मात्र भविष्यकाळाला भ्यालेले आहेत,आणि निराशेच्या भरात जिवावर उदार होत,भूतकाळात निष्फळ झेपा घेत आपल्याला जन्म देणाऱ्या आणि आता मरु घातलेल्या जुन्याच जगाचे जतन करण्यात गढलेले आहेत.आपल्या जीवनकाळी या नव्या संस्कृतीचा उदय हीच एक सर्वात स्फोटक ठरेल अशी घटना होऊन राहिली आहे.
नजीकच्या भविष्यकाळाची समज आपल्याला देऊ शकणारी गुरुकिल्ली ठरेल अशी ही फार महत्त्वाची घटना आहे.अतिशय गहन अर्थ असलेली ही घटना दहा हजार वर्षापूर्वी शेतीचा शोध लागल्यानंतर मानवी जीवनात उफाळलेल्या बदलाच्या पहिल्या लाटेच्या, किंवा औद्योगिक क्रांतीमुळे सर्व जग हादरवून टाकणाऱ्या,जीवनच जणू पालटून टाकणाऱ्या बदलाच्या दुसऱ्या लाटेच्या तोडीची आहे! आपण या तिसऱ्या लाटेची म्हणजेच पुढच्या मोठ्या बदलाची बाळे आहोत.
या अभूतपूर्व बदलाची पूर्ण ताकद किंवा त्याचा आवाका वर्णन करायला शब्द अपुरे पडतात.काही जण प्रचंड अशा अंतराळ युगाबद्दल बोलतात,माहिती युग, इलेक्ट्रॉनिक युग,किंवा व्योमस्थ ग्रामाबद्दल बोलतात.
झिबिग्न्यू ब्रेझिन्स्कीने ( हा शब्द पुस्तकात अस्पष्ट असल्याकारणाने खात्री करण्यासाठी गुगलचा वापर केला आहे.) म्हटले आहे,की आपण तंत्राधिष्ठित आणि इलेक्ट्रॉनाधिष्ठित युगाच्या उंबरठ्यावर आहोत.डॅनियल वेल या समाजशास्त्र्याने 'उद्योगोत्तर समाजाच्या अस्तित्वात येण्याबाबतचे वर्णन केले आहे. रशियाच्या भविष्यवाद्यांनी 'तंत्रशास्त्रीय क्रांती'ची भाषा केली आहे.मी स्वतः 'अति उद्योगशील समाज' या विषयावर आजवर खूप लिहिले आहे.परंतु माझ्या स्वतःच्या व्याख्येसह यातील कोणतीही व्याख्या अभिव्यक्तीला पुरेशी वाटत नाही.
एकाच तत्थ्यावर भर दिला जात असल्याने यापैकी काही शब्दसमूह आपली जाण विकसित करण्याऐवजी मर्यादितच करतात,काही जण ठामपणे प्रतिपादन करतात, की आपल्या जीवनात एक नवाच समाज कुठल्याही तणावाशिवाय किंवा झगड्याशिवायच अगदी सहजपणे अस्तित्वात येऊ शकेल.यातली कोणतीही व्याख्या आपल्यात वेगाने घडू पहाणाऱ्या बदलाच्या ताकदीबाबत,आवाक्याबाबत,चैतन्याबाबत किवा ते निर्माण करीत असलेल्या दबावाबाबत अगर संघर्षाबाबत काही सांगण्याच्या दृष्टीने केवळ सुरूवात करते आहे असे देखील वाटत नाही.
लवकरच मानवता प्रगतीच्या दिशेने प्रचंड झेप घेणार आहे.आजपर्यंत कधीही घडली नसेल एवढी प्रचंड सामाजिक उलथापालथ आणि सर्जनशील पुनर्रचना आता घडणार आहे तिची पूर्णपणे ओळख पटण्यापूर्वीच आपण लक्षणीय अशी नवीन संस्कृती उभारण्याच्या उद्योगाला लागलो आहोत.तिसच्या लाटेचा अर्थ हा आहे.
आतापर्यंत मानववंशाने बदलांच्या दोन लाटांचा अनुभव घेतलेला आहेच.या दोन्ही लाटांनी आपल्यापूर्वी अस्तित्वात असलेली संस्कृती मोठ्या प्रमाणात नाहीशी केली,पुसून टाकली आणि तिच्या जागी जीवनाचे असे नवे क्रम आणून बसवले की जे त्या पूर्वीच्या लोकांच्या कधी ध्यानीमनीही आले नसतील ! शेतीचा क्रांतिकारक शोध ही बदलाची पहिली लाट हजारो वर्षे उधाणत होती;तर औद्योगिक कांतीची दुसरी लाट केवळ तीनशे वर्षात काम करुन गेली.आता इतिहासाने म्हणजेच काळाने खूपच मोठ्या प्रमाणात वेग धारण केलेला आहे.आता येऊ पहाणारी बदलाची तिसरी लाट पूर्वीचा इतिहास पुसून टाकीत येत्या काही दशकातच पूर्ण होण्याची शक्यता आहे.त्यामुळेच अशा या स्फोटक काळात भूतलावर वास्तव्य असलेल्या आपणा सर्वांनाच या तिसऱ्या लाटेच्या आघाताचा जोर जाणवत आहे.
या तिसऱ्या लाटेचा परिणाम प्रत्येकावर होतो आहे. कारण ती आपली कुटुंबे उध्वस्त करते आहे;तिने आपल्या अर्थव्यवस्थेला भेलकांडून सोडले आहे,ती आपल्या राज्यसंस्था दुर्बल कंरुन सोडत आहे, तिच्यामुळे आपल्या मूल्यांच्या ठिकऱ्या ठिकऱ्या होत आहेत.मनुष्यांच्या एकमेकांशी असलेल्या निरनिराळया संबंधातील ताकदीला तिने जणू आव्हान देऊन ठेवले आहे.आज धोक्यात असलेल्या उच्च वर्गातील लोकांच्या अधिकारांना आणि खास हक्कांना ती हटकते आहे. उद्या उठणाऱ्या निरनिराळया ठळक संघर्षाना तिने जणू पार्श्वभूमी तयार करुन ठेवली आहे.
जुन्या पारंपरिक औद्योगिक संस्कृतीशी या नव्याने येऊ घातलेल्या संस्कृतीचा अनेक बाबतीत विसंवाद आहे. एकाचवेळी ती अतिशय प्रगत औद्योगिक कलाशास्त्राभिमुख आहे आणि तशीच औद्योगिकीकरणाला विरोध करणारीही आहे.ही तिसरी लाट आपल्याबरोबर खराखुरा जीवनमार्ग आणत आहे.नवीन असे विविध ऊर्जा उगम,ज्यांच्या भागांची जुळणी आगळी ठरेल अशा यंत्रांनी युक्त अशा कारखान्यांतून वापरल्या जाणाऱ्या उत्पादन पद्धती, विकेंद्रित कुटुंबे,जिला 'इलेक्ट्रॉनिक कुटीर' म्हणावे अशी नवीच एखादी प्रथा,स्वरुपात आमूलाग्र बदललेल्या भविष्यकालीन शाळा आणि संस्था अशा गोष्टी तिच्या पायाभूत गोष्टी ठरतील.उगम पावत असलेली ही नवीच संस्कृती आपल्यासाठी वर्तणुकीची, जीवनक्रमाची नवीच संथा उलगडेल आणि आपल्याला आदर्शवादाच्या,केंद्रीकरणाच्या पार नेईल.शक्ती,पैसा आणि ताकद यांच्या केंद्रीभवनाच्या देखील पार नेईल.
जुन्याला आव्हान देत ही नवीन संस्कृती नोकरशाह्या उलथून टाकेल,राज्याचे कामच कमी करुन टाकेल आणि साम्राज्यवादाच्या पलिकडे गेलेल्या या जगात अर्धस्वायत्त अर्थव्यवस्थेचा उदय घडवून आणेल. यासाठी आज आपल्याला माहीत आहेत त्यापेक्षा अधिक लोकशाहीयुक्त,अधिक परिणामकारक,अधिक साधीसुधी सरकारे आवश्यक आहेत.ह्या संस्कृतीचा जगाकडे पहाण्याचा स्वतःचा असा खास दृष्टिकोण आहे.काळाबाबत तसेच अवकाश,तर्क आणि कार्यकारणभाव यांच्या संबंधातही तिची स्वतःची अशी रीत आहे.आपल्या असेही ध्यानात येईल,की संस्कृतीच्या ह्या तिसऱ्या लाटेने उत्पादक आणि ग्राहक यांच्यामधली ऐतिहासिक दरी बुजवण्याच्या कामाला सुरूवात केलेली आहे.आणि ती उद्याच्या नव्या अर्थकारणाचा उदय घडवून आणत आहे.इतर कारणांप्रमाणेच याही एका कारणामुळे आपल्याकडून मिळणाऱ्या अक्कलहुषारीच्या मदतीने ती आपल्याला ज्ञात असलेल्या इतिहासातील पहिली खरीत्री 'मानवी' संस्कृती ठरेल.
क्रांतिकारी पूर्वपक्ष
वरवर विरोधाभास दर्शविणाऱ्या भविष्याच्या दोन प्रतिमांनी लोकांच्या मनावर पकड बसविलेली आहे. बऱ्याच लोकांची अशी समजूत आहे,की जे जग त्यांना परिचित आहे,ते आहे तसेच कायम राहणार आहे. त्यामुळे आता आपल्या पुढ्यात ठाकलेल्या अगदी नव्याच जीवनमार्गाची त्यांना कल्पनाच येत नाही;संपूर्ण नव्या संस्कृतीची तर गोष्टच सोडा.एक मात्र खरे की काहीतरी बदल घडतोय हे त्यांना समजते आहे,पण त्यांना वाटते,की हे बदल नाहीसे होऊन जातील, आपल्याला परिचित आलेल्या आर्थिक चौकटीत किंवा राजकीय प्रणालीत काही बदल होणार नाही.त्यांना असा विश्वास वाटतो,की भविष्यातही आपल्याला वर्तमानच आढळत राहील.साधी सरळ अशी ही विचारसरणी वेगवेगळ्या प्रकारांनी प्रकट होते.एका पातळीवर ती गोष्ट उद्योजक,शिक्षक, पालक राजकारणी यांनी घेतलेल्या निर्णयामागच्या, विशेष परीक्षण न केलेल्या कल्पनेच्या स्वरूपात दिसते. त्यापेक्षा वरच्या दिखाऊ किंवा कृत्रिम सफाई प्राप्त झालेल्या पातळीवर ती संख्याशास्त्र कॉम्प्युटरने पुरवलेला पूर्वपक्ष आणि भविष्यवेत्त्याच्या निरर्थक बोलण्याचा वेष घालून येते.यातल्या कुठल्याही प्रकाराने पाहिले तरी भविष्यकालीन जग प्रामुख्याने,'आहे तसेच दिसते.ओद्योगिकीकरणाची दुसरी लाट जगाला अक्षरशः पुरून उरली आहे
अलिकडे घडलेल्या काही घटनांनी मात्र भविष्यकालीन जगाची ही ठाम प्रतिमा मोठ्या प्रमाणात हादरवून टाकलेली आहे.एकामागून एक संकटे येत राहिली, मथळे ठळकपणे कडाडत राहिले,इराण भडकला, माओला उघड विरोध करण्यात आला,तेल किमती आकाशाला भिडल्या,महागाई वेड्यासारखी भडकली, दहशत-वाद पसरला,सरकारे अशा गोष्टींवर काबू ठेवण्यात अयशस्वी झाली आणि अशी निराशाजनक उदासवाणी दृश्ये उत्तरोत्तर लोकप्रिय होत गेली.जाणि अशा प्रकारे सतत मिळत रहाणाऱ्या अशा वाईट बातम्यांवर विनाश चित्रित करणारे चित्रपट,बायबल कथांवर आणि प्रतिष्ठित विचारवंतांनी प्रकाशित केलेल्या दुःस्वप्नवत् पटकथा,अशा सर्व मसाल्यावर पोसले गेलेले बहुसंख्य लोक अशा निर्णयाप्रत येतात की भविष्यच संभवत नसल्यामुळे आजचा समाज पुढे भविष्यात कसा असेल याची कल्पना करणेच शक्य नाही.त्यांच्या दृष्टीने महाप्रलयंकारी युद्ध काही मिनिटांच्या अवकाशावर येऊन ठेपले आहे.पृथ्वी तिच्या घोर विनाशाप्रत येऊन ठेपली आहे.
भविष्यकाळाच्या हया दोन कल्पना वरवर पाहताना एकदम वेगळ्या वाटतात परंतु त्यांचे दोषीचे समान असे मानसिक आणि राजकीय परिणाम संभवतात.दोन्ही कल्पनांच्या प्रभावामुळे कल्पनाशक्ती व इच्छाशक्ती पांगळी होऊन जाते.
उद्याचा समाज म्हणजे आज जे काही आहे त्याचीच खूप वाढवलेली अशी आवृत्ती असेल तर मग त्याच्यासाठी फार थोडे असे काही आपल्याला करावे लागेल.उलट,आपल्या डोळयादेखतच समाज विनाश पावणार असेल तर आपण काहीच करू शकत नाही. थोडक्यात,भविष्याकडे पहाण्याच्या या दोन्ही विचारसरणी आपल्याला अलिप्त आणि अकर्तृत्ववान करतात.दोन्हीही आपल्याला अकर्मात भिजवून टाकतात.तरी देखील आपले काय घडते आहे,याचा विचार करीत असताना साधे सरळ 'पानिपत' किवा तसलाच दुसरा एखादा पर्याय एवढीच मर्यादा श्रापल्याला असणार नाही.'उद्या' चा विचार करण्याचे आणखी कितीतरी स्वच्छ आणि विधायक मार्ग आहेत. हे मार्ग आपल्याला भविष्यासाठी तयार करतील आणि मुख्य म्हणजे वर्तमान बदलण्याच्या दृष्टीने मदत करतील
मी ज्याला' क्रांतिकारी पूर्वपक्ष' म्हणतो,त्याच्यावर हे पुस्तक आधारलेले आहे.त्याची कल्पना अशी आहे की, आगामी दशकामध्ये जरी खूप चढउतार होणार असले, वादळे उठणार असली,कदाचित् सर्वदूर पसरणारी हिंसाही अस्तित्वात येणार असली तरी देखील आपण स्वतःचा पूर्णपणे नाश होऊ देणार नाही,करून घेणार नाही.त्याची अशीही कल्पना आहे,की आपण जे धक्कादायक बदल सध्या अनुभवतो आहोत,ते गोंधळाचे किंवा निरुद्देश्य नाहीत,तर ते उत्तम,स्वच्छ आणि सरळ कित्ता तयार करणारे आहेत शिवाय त्याची अशी कल्पना आहे की,हे बदल आपल्या जीवनाच्या, कामाच्या,
खेळण्याच्या,विचाराच्या धाटणीत जो प्रचंड बदल होतो आहे,त्यात भर घालत आहेत;आणि त्यामुळे हवासा वाटणारा शहाणा,आणि समजदार भविष्यकाळ शक्य आहे.तेव्हा थोडक्यात,जे घडणार आहे ते या प्रस्तावानंतरच.आणि आता जे घडत आहे ते म्हणजे इतिहासातील मोठीच झेप ठरणारी जागतिक स्वरूपाची एक क्रांतीच होय.
हेच थोडे वेगळया भाषेत सांगावयाचे तर असे म्हणता येईल की,हे पुस्तक या कल्पनेतून झरत गेले आहे,की आपण एका जुन्या संस्कृतीतील शेवटच्या पिढीपैकी आहोत,आणि नव्या संस्कृतीच्या पहिल्या पिढीपैकी ठरणार आहोत.आपल्याला व्यक्तिशःजो गोंधळ,ज्या यातना,परिस्थितीच्या पूर्ण जाणिवेचा जो अभाव अनुभवावा लागत आहे,त्याचे मूळ आपल्यातल्या झगड्यात आहे,आपल्या राजकीय संस्थांत आहे मरू घातलेल्या संस्कृतीच्या दुस-या आणि जन्माला येत असलेल्या व धडाक्यात आपली जागा घेऊ पहाणाऱ्या तिसच्या संस्कृतीच्या लाटेतील संघर्षात आहे.
आणि ज्या वेळी आपल्याला हे समजेल,त्या वेळी आपल्याला एरव्ही निरर्थक वाटणाऱ्या कितीतरी घटना अनाकलनीयही वाटू लागतील.बदलाची एक विस्तृत घडण आपल्यापुढे स्पष्ट होईल.
अस्तित्वासाठीची धडपड पुनः शक्य होईल,आणि अर्थपूर्ण वाटू लागेल.थोडक्यात हा क्रांतिकारी पूर्वपक्ष आपली बुद्धी आणि इच्छाशक्ती मुक्त करून टाकतो.
आघाडीची धार
आपल्या पुढघात असलेले हे बदल क्रांतिकारी आहेत. एवढेच म्हणून मात्र भागणार नाही.कारण त्यांच्यावर ताबा मिळवून त्यांना दिशा दाखविण्यापूर्वी आपणास त्यांची ओळख करून घेऊन त्यांचे योग्यप्रकारे पृथःवकरण करण्यासाठी नवा दृष्टिकोण बाळगणे आवश्यक आहे.त्याच्याशिवाय आपल्याला यश येणार नाही.याचा एक परिणामकारक नवा मार्ग लाटेच्या आघाडीचे सामाजिक पृथःक्करण हा असेल.या रीतीने आपण सतत उलगडत जाणाऱ्या बदलाच्या लाटांच्या रूपाने इतिहासाकडे पाहू शकू.आणि प्रत्येक लाटेची आघाडीची धार आपल्याला कुठे नेत आहे,याचा विचार करु शकू….अपुर्ण हा शिल्लक बाग पुढील लेखात…!