* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

२३/१२/२५

सामूहिक निवासी प्रकल्प / Collective Housing Project

झाड मोठं झालं की त्याचा इतर जीवसृष्टीला मागल्या प्रकरणात वर्णन केल्याप्रमाणे उपयोग होतोच असं नाही.आताही अजस्र वृक्ष इतरांना राहण्यासाठी जागा देऊ शकतात,पण मात्र स्वखुशीने नाही.वटवाघुळ,मार्टिन पक्षी (पाकोळी प्रजातीचा पक्षी) आणि इतर पक्ष्यांना प्रौढ वृक्षांच्या मोठ्या फांद्या विशेष आवडतात.जाड फांद्या थंडी आणि उष्णतेपासून चांगले संरक्षण देतात.


युरोपमध्ये प्रौढ वृक्षांवर घरकामाची सुरुवात मोठ्या ठिपक्याचा सुतार किंवा काळ्या सुतार पक्ष्यांकडून होते.हे पक्षी खोडात जेमतेम एखाद-दोन इंच मोठं भोक पाडतात.

यासाठी त्यांना कुजलेल्या किंवा वठलेल्या झाडांपेक्षा सशक्त झाडेच आवडतात.जर शेजारी छान नवीन घर बांधता आलं तर आपण एखाद्या पडक्या घरात राहू का? याच विचारातून सुतार पक्ष्यांना आपल्या कुटुंबासाठी भक्कम घर हवे असते.सुतार पक्ष्यांकडे एका बैठकीत मोठं घर बांधण्याची ताकद असते.पण तरीही हे काम ते एकदम संपवत नाहीत.

छोटं भोक पाडून झाल्यावर ते महिनाभर सुट्टी घेतात.या काळात इथे कदाचित बुरशी स्थापित होईल.


बुरशीला साल भेदून आत शिरता येत नाही,म्हणून सुतार पक्ष्याचे हे छोटे भोक त्यांच्यासाठी आमंत्रणच असते या खिंडारीत शिरून ते चटकनलाकडावर आक्रमण करतात. 

झाडाला वाटते की नियोजनबद्ध सहकार्यातून आपल्यावर आक्रमण होत आहे.पण सुतार पक्ष्यासाठी हे केवळ श्रमाचे विभाजन असते.काही काळातच आतल्या लाकडाचे तंतू मऊ पडतात आणि सुतार पक्ष्याला भोक मोठे करता येते.


अखेर तो दिवस येतो की बांधकाम पूर्ण होऊन त्याला गृहप्रवेश शक्य होतो.अशा प्रकारे हा पक्षी अनेक घरं करतो.

एक मुलाची खोली तर एक शयनगृह आणि थोडा बदल मिळावा म्हणून एक छिद्र.याच्या घरात दर वर्षी नूतनीकरण होते.याचा पुरावा झाडाखाली पडलेल्या लाकडाच्या तुकड्यांतून मिळतो.नूतनीकरण करणं गरजेचं बनतं कारण आत घुसलेल्या बुरशीला थांबवणं आता अशक्य असतं.

बुरशी आत शिरत जाते आणि लाकूड मऊ आणि ओलसर करते.अशा वातावरणात कुटुंब वाढवणं योग्य नाही,हो ना? प्रत्येक वेळेस जेव्हा सुतार पक्षी हे ओलसर लाकूड काढून टाकतो तेव्हा त्याचे घर छान मोठं आणि स्वच्छ होत जातं.

काही काळातच घर इतकं मोठं आणि खोल होतं की आपली पहिली भरारी घेण्यासाठी पिल्लांना वर चढून जावं लागतं.

अशी वेळ आली की आता हे घर इतरांसाठी सोडणं योग्य होतं.ज्यांना लाकडावर काहीही काम करता येत नाही,अशांना हे घर आयते मिळते.नटहॅच (शिलींध्री पक्षी) हा पक्षी सुतार पक्ष्यांसारखेच वठलेल्या फांद्यांवर चोची मारून छोट्या किड्यांना बाहेर काढत असतो.सुतार पक्ष्याने सोडलेल्या घरात आपले घरटे करणे नटहॅचला सोपे जाते.पण तिथे एक समस्या असते. झाडाच्या ढोलीचे प्रवेशद्वार फार मोठे असते त्यामुळे त्यांच्या भक्षकांना आत शिरून पिल्लांना खाणे सोपे होते.म्हणून तो पक्षी अतिशय कलात्मक रीतीने या ढोलीवर माती लिंपून हे प्रवेशद्वार छोटे करतो.


द हिडन लाईफ ऑफ ट्रीज

पी ट र वो ह्ल ले बे न

अनुवाद - गुरुदास नूलकर

अरविंद घनश्याम पाटकर

 मनोविकास प्रकाशन


भक्षकांवरून एक गोष्ट आठवली.आपल्या भाडेकरूंना झाडांकडून एक विशिष्ट सेवा मिळते. लाकडाच्या गुणधर्मामुळे हे शक्य होते.लाकडाच्या तंतूंमधून ध्वनिप्रवाह छान होतो आणि म्हणूनच व्हायलीन किंवा गिटारसारख्या अनेक वाद्यांमध्ये लाकूड वापरले जाते.याचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला एक प्रयोग करता येईल.जमिनीवर पडलेल्या फांदीच्या निमुळत्या भागाला कान लावा आणि दुसऱ्या बाजूने तुमच्या मित्राला दगडाने हळूवार घासायला सांगा काय वातावरण शांत असल्यास कान लांब केला तरीही तुम्हाला हा आवाज अगदी स्पष्ट ऐकू येईल.लाकडाच्या या गुणधर्माचा वापर करून झाडाच्या ढोलीत राहणाऱ्या पक्ष्यांना धोक्याचा संकेत मिळू शकतो. मार्टिन किंवा खारी आपल्या नखाने खरवडण्याचा आवाज त्यांना उंच झाडावरही टिपता येतो.यामुळे पक्ष्यांना निसटून जाता येते. जर घरट्यामध्ये पिले असली तर ते भक्षकांचे लक्ष वेधून त्यांची दिशाभूल करतात.पण हा प्रयोग सहसा यशस्वी होत नाही. पण जरी पालकांना उडून जाता आल तरीही पुन्हा प्रजनन करून ते नुकसान भरपाई करू शकतात.


या सस्तन प्राण्यांच्या काही प्रजातींना आपल्या पिलांना वाढवण्यासाठी अनेक पण अशा प्रकारच्या ध्वनिप्रवाहाचा वटवाघळांना काहीच उपयोग नसतो.छिद्रांची गरज असते.युरोप आणि पश्चिम आशियामध्ये सापडणाऱ्या बेकस्टाईन वटवाघुळाच्या माद्या आपल्या पिलांना समूहात वाढवतात.थोडे दिवसच ते एका ठिकाणी थांबतात. नंतर दुसऱ्या ठिकाणी निघून जातात. त्यांच्यावर जगणाऱ्या सजीवांपासून वाचण्यासाठी असे केले जाते.जर वटवाघळाने पूर्ण मौसम एकाच ठिकाणी वास्तव्य केले तर अशा सजीवांची संख्या प्रचंड वाढते आणि वटवाघळांना त्याचा त्रास होतो.पण एका ठिकाणी थोडेच दिवस वास्तव्य केल्याने हे टळू शकते.घुबडांना मात्र सुतार पक्ष्यांच्या छिद्रांची जागा पुरत नाही,त्यांना काही वर्ष धीर धरावा लागतो. कालांतराने झाड कुजू लागतं आणि एखादी फांदी दुभंगून त्याचं प्रवेशद्वार मोठं होतं.जर त्यात सुतार पक्ष्यांनी अनेक छिद्रं करून ठेवलेली असतील तर घुबडाचं काम सोपं होतं.म्हणजे सुतार पक्ष्यांची एकावर एक रचलेली अपार्टमेंट्स असतात. लाकूड कुजण्याची प्रक्रिया चालू झाली की ही अपार्टमेंट्स एकमेकांना जोडली जातात.आणि असं झालं की मग टॉनी घुबडाची सोय होते. तो आता आपल्या मित्रमंडळींसोबत इथे येतो.पण त्या झाडाचे काय? स्वसुरक्षा करण्याचे त्याचे सर्व प्रयत्न निष्फळ होतात.आणि आता बुरशीवर आक्रमण करण्याची वेळ निघून गेलेली असते कारण भगदाडे मोठी झालेली असतात.पण जर का आपल्या बाहेरच्या जखमांवर झाडाला इलाज करता आला तर मात्र त्याचं आयुष्य वाढू शकतं. आतून कुजण्याची प्रक्रिया चालू राहिली तरी बाहेरून ते धडधाकट दिसतं आणि पोकळ स्टीलच्या नळीसारखे उभे राहून अजून एखादे शतक गाठू शकते.सुतार पक्ष्यांनी केलेल्या भोकाच्या जागी फुगवटा दिसला की झाड स्वतःला सावरण्याच्या प्रयत्नात असल्याचा पुरावा दिसतो. तरीही प्रचंड प्रयत्न करूनसुद्धा आपल्या खोडावरचे मोठे प्रवेशद्वार मात्र त्यांना बंद करता येत नाहीत. सुतारपक्षी निदर्यापणे नवीन झाडावर भोकं पाडतच राहतो.आता त्या कुजणाऱ्या खोडामध्ये अनेक प्रकारच्या सजीवांची वस्ती होते.लाकूड मुंग्या येऊन बुरसटलेले लाकूड खाऊ लागतात आणि त्यापासून कागदासारखी घरटी बनवायला सुरुवात करतात. घरट्याच्या भिंतीला अफिडने सोडलेले गोड द्रव लिपून घेतात.यावर बुरशी धरते आणि आपले जाळे पसरवून मुंग्यांचे घरटे मजबूत करते.दमट ओलसर छिद्रात अनेक प्रकारचे कीटक आकर्षित होतात. त्यांना अळ्या होण्यासाठी अनेक वर्षे लागतात त्यामुळे त्यांचा झाडाशी दीर्घकाळ संबंध टिकणारा असतो.कीटकांच्या अळ्यांमुळे बुरशी आणि इतर कीटकांना आमंत्रण मिळते आणि लाकडाचा भुसा सतत बाहेर जमिनीवर पडत राहतो.


घुबड, वटवाघूळ आणि उंदरांची विष्ठा ही त्या अंधार कोठडीत पडत असते.यामुळे लाकडाला पोषणद्रव्य मिळत राहतात आणि ब्लड नेक्ड् क्लिक बीटल, युरोपियन हरमिट बीटल आणि मोठा काळा बीटल या कीटकांची दीड इंचापर्यंत वाढ होते.परमिट बीटलना अंधार आवडतो त्यामुळे ते कुजणाऱ्या खोडाच्या बुंध्याशी राहतात.हे कीटक फारसे चालत किंवा उडत नाहीत त्यामुळे त्यांच्या अनेक पिढ्या एकाच झाडात राहू शकतात.वृद्ध वृक्षांना जपण्याचे हे महत्त्वाचे कारण आहे.जंगलातून वठलेले वृक्ष काढून टाकले तर या छोट्या काळ्या किड्यांचा अधिवास निघून जातो आणि त्यांना दुसरे झाड शोधण्याइतकी शक्ती नसते.


एखादे झाड जर वादळात तुटून पडले तरीही त्याच्याकडून मोठी समाजसेवा झालेली असते.जरी संशोधकांकडून यावर फार अभ्यास झालेला नसला तरीही आपल्याला एक गोष्ट नक्की माहीत आहे की, जंगलात अधिक वैविध्य असल्यास परिसंस्था संतुलित राहू शकते. जितक्या जास्त प्रजाती तितक्या कुणा एका प्रजातीचे वर्चस्व जंगलावर होण्याची शक्यता कमी, कारण त्याच्यावर नियंत्रण ठेवणारे त्याचे शत्रू तिथे असतात. आणि यामध्ये पडलेल्या झाडाच्या खोडाची मदत मिळते. सतराव्या प्रकरणात पाहिल्याप्रमाणे अशा वठलेल्या खोडापासून जंगलात पाण्याच्या उपलब्धतेवर नियंत्रण ठेवले जाते.



जीवनात विजयी करणारी गोष्ट..!


तो अगदी निवांतपणे गुरूंसमोर उभा होता.गुरू त्याच्या जाणकार नजरेने त्याला तपासत होते. नऊ-दहा वर्षांचा मुलगा,त्याला लहान मूल समजा.त्याला डावा हात नव्हता,तो बैलाशी झालेल्या भांडणात तुटला होता.तुला माझ्याकडून काय हवे आहे.गुरुने त्या मुलाला विचारले.त्या मुलाने गळा साफ केला.धैर्य एकवटले आणि म्हणाले - मला तुमच्याकडून कुस्ती शिकायची आहे. एक हात नाही आणि कुस्ती  शिकायची आहे ? विचित्र गोष्ट आहे. का? शाळेतील इतर मुले मला आणि माझ्या बहिणीला दादागिरी करतात. मला टुंडा म्हणतात.सगळ्यांच्या मेहरबानीने माझे आयुष्य उध्वस्त केले आहे गुरुजी.मला माझ्या हिंमतीवर जगायचे आहे.कोणाच्याही दयेची गरज नाही. माझे आणि माझ्या कुटुंबाचे संरक्षण कसे करावे हे मला माहित असले पाहिजे.योग्य गोष्ट आहे.पण आता मी म्हातारा झालोय आणि कोणाला शिकवत नाही.तुला माझ्याकडे कोणी पाठवले? मी अनेक गुरूकडे गेलो. मला कोणी शिकवायला तयार नाही.एका ज्येष्ठ गुरूने तुमचे नाव सांगितले.फक्त तेच तुला शिकवू शकतात.कारण त्यांच्याकडे फक्त वेळ आहे आणि शिकायला कोणी नाही,म्हणून त्यांनी मला सांगितले.


ते उद्धट उत्तर कोणी दिले असेल हे गुरूना समजले.

अशा गर्विष्ठ लोकांमुळेच वाईट स्वभावाचे लोक या खेळात आले,हे गुरूना माहित होते.ठीक आहे.उद्या सकाळी उजाडण्यापूर्वी आखाड्यात पोहोचा माझ्याकडून शिकणे सोपे नाही,हे मी आधीच सांगत आहे. कुस्ती हा प्राणघातक खेळ आहे.स्वतःचे रक्षण करण्यासाठी त्याचा वापर करा.मी जे शिकवतो त्यावर पूर्ण विश्वास ठेव.आणि माणसाला या खेळाची नशा चढते.त्यामुळे डोकं थंड ठेव समजले?


होय गुरू.समजले आपण म्हणसाल त्या प्रत्येक गोष्टीचे मी पालन करीन.मला तुमचा शिष्य करा. त्या मुलाची इच्छा पूर्ण झाल्यामुळे त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. गुरूंच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले.गुरु आपल्या एकुलत्या एक शिष्याला शिकवू लागले.माती तुडवली गेली,मुग्दुलवरून धूळ झटकली गेली आणि या एक हाताच्या मुलाला कसे शिकवायचे या विचारात गुरूचे डोळे लागले.गुरूने त्याला फक्त एक डाव शिकवला आणि दररोज मुलाला प्रशिक्षण देण्यास भाग पाडले.सहा महिन्यांसाठी दररोज फक्त एक डाव.एके दिवशी सद्गुरूंच्या वाढदिवशी शिष्याने पाय दाबताना प्रकरण छेडायला सुरुवात केली.गुरुजी,सहा महिने झाले आहेत,मला या डावाचे बारीकसारीक मुद्दे चांगले समजले आहेत आणि मला काही नवीन डाव देखील शिकवा.गुरू तिथून उठले आणि निघून गेले.त्याने गुरूला नाराज केल्याने मुलगा परेशान झाला. मग गुरूच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तो शिकत राहिला.

अजून काही शिकायचे आहे.असे त्याने कधीच विचारले नाही.गावात कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्यात मोठी बक्षिसे होती.प्रत्येक आखाड्यातील निवडक पैलवान स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आले होते. गुरुजींनी उद्या सकाळी शिष्याला बैलांसह गाडी घेऊन बोलावले.जवळच्या गावात जायचे आहे. सकाळी तुला कुस्तीच्या डावात सहभागी होण्यासाठी जायचे आहे.हात नसलेल्या या मुलाने कुस्तीचे पहिले दोन सामने जिंकले.तसेच विरोध करणाऱ्या सर्व गुरूचे चेहरे उतरले.बघणारे थक्क झाले.हात नसलेले मूल कुस्तीत कसे जिंकू शकते? कोणी शिकवले?आता तिसऱ्या कुस्तीत समोरचा खेळाडू नवशिक्या नव्हता.पण मुलाने ही कुस्ती सुद्धा आपल्या नीटनेटक्या चालीने जिंकली आणि बाजी मारली.


आता या मुलाचा आत्मविश्वास वाढला आहे. संपूर्ण मैदान आता त्याच्यासोबत होते.मीही जिंकू शकतो,ही भावना त्याला प्रबळ करत होती.काही वेळातच तो अंतिम टप्प्यात पोहोचला.ज्या आखाड्याने त्या मुलाला या म्हाताऱ्या गुरुकडे पाठवले होते,त्या गर्विष्ठ पैलवानाचा शिष्य शेवटच्या कुस्तीत या मुलाचा प्रतिस्पर्धी होता.हा कुस्तीपटू तेवढ्याच वयाचा असूनही ताकद आणि अनुभवाच्या बाबतीत तो या मुलापेक्षा वरचढ होता.त्याने अनेक मैदाने मारली होती.तो या मुलाला काही मिनिटांत चित करेल हे स्पष्ट होते.पंचांनी सल्ला दिला,कुस्ती घेणे योग्य होणार नाही.कुस्ती ही बरोबरीची असते.मानवता आणि समानतेनुसार ही कुस्ती रद्द करण्यात आली आहे.बक्षीस दोघांमध्ये समान विभागले जाईल.पंचांनी त्यांचा हेतू उघड केला.कालच्या या मुलापेक्षा मी खूप अनुभवी आणि बलवान आहे.ही कुस्ती मीच जिंकणार, ही गोष्ट सोळा आणे खरी आहे.त्यामुळे मला या कुस्तीचा विजेता बनवायला हवे.तेथें स्पर्धक अहंकारनी बोलला.


मोठ्या भावापेक्षा मी नवीन आणि अनुभवाने लहान आहे.माझ्या गुरूनी मला प्रामाणिकपणे खेळायला शिकवले आहे. न खेळता जिंकणे हा माझ्या गुरुचा अपमान आहे. माझ्या सोबत खेळा आणि माझ्यासाठी जे आहे ते द्या.मला ही भिक्षा नको आहे. त्या देखण्या तरुणाचे स्वाभिमानी शब्द ऐकून लोकांनी टाळ्या वाजवल्या.अशा गोष्टी ऐकणे चांगले पण हानिकारक असते. पंच निराश झाले. काही कमी की जास्त झाले तर?आधीच एक हात गमावला आहे,अजून काही आणखी नुकसान होऊ नये? मूर्ख कुठला.!


कुस्ती सुरू झाली आणि उपस्थित सर्वजण थक्क झाले.

संधीच्या शोधात मुलाने टाकलेला डाव आणि बाजी त्या मोठ्या स्पर्धकाला झेलता आली नाही.तो मैदानाबाहेर पडला होता.कमीत कमी प्रयत्नांत त्या नवशिक्या स्पर्धकाने त्या जुन्या स्पर्धकाला धूळ चारली होती.आखाड्यातत पोहोचल्यावर शिष्याने आपले पदक काढून सद्गुरूंच्या चरणी ठेवले. सद्गुरूंच्या पायाची धूळ कपाळावर लावून त्याने आपले डोके मातीने माखले.


गुरुजी, मला एक गोष्ट विचारायची होती. विचारा... मला फक्त एक डावच माहित आहे. तरीही मी कसा जिंकलो?


तू दोन डाव शिकला होतास.त्यामुळेच तू जिंकलास.कोणते दोन डाव गुरुजी?


पहिली गोष्ट,तु हा डाव इतक्‍या चांगल्या प्रकारे शिकलास की त्यात चुकीला वाव नव्हता.मी तुझ्याशी झोपेत कुस्ती लढवली तरीही तू या डावात चूक करत नाहीस.तुमच्या प्रतिस्पर्ध्याला हे माहित होते की तुम्हाला हा डाव माहित आहे, पण तुम्हाला फक्त हा एकच डाव माहित आहे हे त्याला थोडे माहीत होते का? आणि गुरू,दुसरी गोष्ट काय होती? दुसरी गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. प्रत्येक डावासाठी प्रतिडाव आहे! असा कोणताही डाव नाही ज्याची तोड नाही.असा दावा केला जाऊ शकत नाही.तसेच या डावाचा ही एक तोड होता.मग माझ्या प्रतिस्पर्ध्याला तो डाव कळणार नाही का? हे त्याला माहीत होते. पण तो काही करू शकला नाही.तुम्हाला माहीत आहे का? कारण त्या तोडीत डाव टाकणाऱ्या स्पर्धकाचा डावा हात धरावा लागतो! आता तुम्हाला समजले असेल की हात नसलेला साधा मुलगा विजेता कसा झाला? ज्या गोष्टीला आपण आपली दुर्बलता समजतो, तिला आपले सामर्थ्य बनवून जगायला शिकवतो,विजयी तोच खरा सद्गुरू.आतून आपण कुठेतरी कमकुवत आसतो,अपंग आहोत.त्या कमकुवतपणावर मात करून जगण्याची कला शिकवणारा गुरु हवा आहे.आपल्याकडे दोन हात आहेत... एक स्वतःला मदत करण्यासाठी आणि दुसरा इतरांना मदत करण्यासाठी आजपासून इतरांवर अवलंबून न राहता स्वतःची आणि इतरांची मदत केली पाहिजे.




२१/१२/२५

लोकांशी अचूक व्यवहार असे करा.Deal with people correctly.

सांगण्याची आता आवश्यकता नाही की मी या गोष्टीवर अत्यंत खुश होतो.पुढच्या रविवारी चर्चमध्ये इतर स्त्रियांना तिने ही घटना सांगितली आणि अनेक स्त्रियांनी मला येऊन सांगितले,की इतकी शहाणपणाची गोष्ट आम्ही या आधी कधीच ऐकली नव्हती.तेव्हा कुठे मला स्तुती करण्याच्या शक्तीचा प्रत्यय आला."


लॉरेंस जिगफेल्ड ऑडवेअर धूम माजवणारा सुप्रसिध्द निर्माता होता.तो एक असा निर्माता होता,ज्याच्यात 'अमेरिकन तरुणींना ग्लॅमरस' बनवण्याची विलक्षण प्रतिभा होती.प्रत्येक वेळी ते अशा एखाद्या सामान्य तरुणीला निवडत असे,जिच्याकडे कुणी पुन्हा वळूनसुध्दा पाहणार नाही.मग ते तिच्यात कायापालट करीत.

प्रशंसा व आत्मविश्वासाचे महत्त्व जाणवल्यामुळे त्यांना माहिती होते की केवळ प्रशंसा व महत्त्व दिल्याने सामान्य स्त्रीसुद्धा स्वतःला सुंदर मानू लागते.ते व्यवहारी होते.त्यांनी कोरसमध्ये गाणाऱ्या मुलींचा पगार आठवड्याला तीस डॉलरपासून वाढवून ७५ डॉलर्स केला.ते विशाल अंतःकरणाचे होते.फॅडलीजच्या सादरीकरणाच्या पहिल्या रात्री त्यांनी सर्व कलाकारांना तार पाठवली आणि यामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक मुलीला अमेरिकन ब्युटी गुलाब दिले.


एकदा माझ्यावर डाएटिंगचे भूत सवार झाले अन् मी सहा दिवस उपास केला.सहाव्या दिवशी मला तेवढी भूक लागत नव्हती,जेवढी दुसऱ्या दिवशी लागली होती. आम्ही सगळेच हे जाणतो की जर एखाद्याच्या परिवाराला किंवा कर्मचाऱ्यांना सहा दिवस खायला मिळाले नाही तर तो स्वतःला अपराधी मानेल.पण जर ही व्यक्ती परिवार किंवा कर्मचाऱ्यांची स्तुती सहा दिवस, सहा आठवडे किंवा साठ वर्षापर्यंत करणार नाही,तेव्हा त्याला जरासुध्दा अपराधी वाटणार नाही.आम्ही हे विसरतो की स्तुतीसुद्धा भोजनासारखीच आमची अनिवार्य गरज आहे.


जेव्हा महान अभिनेता अल्फ्रेड लुटने 'रियुनियन इन व्हिएन्ना'

मध्ये प्रमुख भूमिका केली,तेव्हा त्यांनी म्हटले होते, "मला ज्या गोष्टीची सर्वाधिक गरज आहे ती आहे - आत्मसन्मानासाठीचं पोषण." आम्ही आपली मुले,मित्र आणि कर्मचाऱ्यांच्या शरीराचं पोषण करतो;पण आम्ही त्यांच्या आत्मसन्मानाचं किती पोषण करतो? आम्ही त्यांना उर्जेसाठी मांस व बटाटे उपलब्ध करून देतो,पण आम्ही त्यांना प्रशंसेचे दयाळू शब्द द्यायला विसरुन जातो,जे वर्षानुवर्ष त्यांच्या आठवणीत पहाटेच्या ताऱ्यांच्या संगीतासारखे गुंजेल.


पॉल हार्वेने आपल्या 'द रेस्ट ऑफ द स्टोरी' या रेडियो कार्यक्रमात सांगितले,की कशा त-हेने खरी प्रशंसा एखाद्या व्यक्तीचे जीवन बदलून टाकते.त्यांनी एक घटना ऐकवली.अनेक वर्षांपूर्वी डेट्रॉइटच्या एका शिक्षिकेने स्टेव्ही मॉरिसला म्हटले की वर्गात हरवलेल्या एका उंदराचा शोध घ्यायला त्याने मदत करावी.

निसर्गाने स्टेव्हीला डोळे दिले नसतील.पण त्या ऐवजी स्टेव्हीची श्रवणशक्ती अतिशय तेज होती.स्टेव्हीमध्ये असे काही होते,जे त्या पूर्ण वर्गात कुणापाशीच नव्हते.पण हे असे प्रथमच घडले होते की त्याच्या श्रवणशक्तीसाठी कुणी त्याची प्रशंसा केली होती.अनेक वर्षांनंतर स्टेव्हीचे म्हणणे आहे की ती प्रशंसा त्यांच्या नवीन जीवनाची सुरुवात होती.त्या घटनेनंतर त्यांनी आपल्या ऐकण्याच्या क्षमतेचा विकास केला आणि स्टेव्ही वंडरच्या रंगमंचीय नावाला स्विकारून ते सत्तरच्या दशकाचे महान पॉप सिंगर व गीतकार झाले.अनेक वाचक या शब्दांना वाचताना मनात म्हणतील 'अच्छा! लबाडी ! लांगूलचालन ! मी याचा उपयोग करून पाहिला आहे समजदार लोकांसमोर.पण हे प्रकार चालत नाहीत.'


अगदी बरोबर आहे! लबाडी शहाण्या लोकांसमोर चालत नाही.ती उथळ,स्वार्थी आणि खोटी असते.तिला असफल व्हायलाच हवे आणि ती असफल होतेच.तसे तर अनेक लोक प्रशंसेचे इतके भुकेले असतात की ते लबाडीला स्तुती समजून पचवून टाकतात,ज्याप्रमाणे एखादा भुकेलेला मनुष्य गवत व किडे-मुंगळे खाऊन टाकतो.


महाराणी व्हिक्टोरियालापण खोटी स्तुती आवडत असे. प्रधानमंत्री बेंजामिन डिस्त्राइलीने हे स्विकार केले होते, की ते महाराणीची खोटी स्तुती करतात.त्यांच्याच शब्दात सांगायचं तर 'ते मोठ्या चमच्याने लोणी लावत असतात.' परंतु डिस्त्राइली ब्रिटनचे सर्वांत सुसंस्कृत, योग्य व चतुर व्यक्ती होते.ते या कलेत निपुण होते.जी गोष्ट त्यांचा हेतू सफल करून गेली,ती तुमच्या आमच्यासाठी योग्य ठरेलच असे काही म्हणता येणार नाही.दीर्घ काळासाठी खोटी स्तुती करण्याने फायदा कमी अन् तोटाच जास्त होऊ शकतो.अशी खोटी स्तुती म्हणजे खोटा शिक्का आहे.जर तुम्ही त्याला खरा शिक्का म्हणून बाजारात चालवण्याचा प्रयत्न केलात तर ते तुमच्या अंगाशी येऊ शकते.प्रशंसा व खोटी स्तुती यात काय फरक आहे? याचे उत्तर अगदी सोपे आहे.एक खरी असते आणि दुसरी खोटी. एक हृदयातून निघते आणि एक स्वार्थातून.एक निस्वार्थी असते,तर दुसरी स्वार्थपूर्ण ! एकीची प्रत्येक ठिकाणी स्तुती होते तर दुसरीची हर ठिकाणी निंदा.


मी मेक्सिको शहरात हल्लीच चापुल्टेपेक पॅलेसमध्ये एक मेक्सिकन हिरो जनरल अल्वारो ऑब्रेगॉनची मूर्ती बघितली. त्या मूर्तीखाली जनरल ऑब्रेगॉनच्या तत्त्वज्ञानाचे बुध्दिमत्तापूर्ण शब्द लिहिले होते : "आपल्यावर हल्ला करणाऱ्या शत्रुंना घाबरू नका; उलट त्या मित्रांना घाबरून असा जे तुमची खोटी स्तुती करतात."


नाही,नाही,नाही ! मी तुम्हाला खोटी स्तुती व लबाडी करायला सांगत नाहीए.मी तर अगदी वेगळेच सांगतोय. मी तुम्हाला एक नवीन जीवन सुरू करायला सांगतोय. मला परत सांगू द्या 'मी तुम्हाला एक नवीन जीवन सुरू करायला सांगतोय.'


सम्राट पंचम जॉर्जने बकिंगहॅम राजवाड्यात आपल्या अभ्यासिकेच्या भिंतीवर सहा सूत्रे लिहून ठेवली होती. त्यातले एक सूत्र असे होते,"मला हे शिकवा की ना मी कुणाची खोटी स्तुती करेन आणि ना कुणाकडून स्वतःची खोटी स्तुती ऐकण्यासाठी उत्सुक राहीन." मी एकदा लबाडीची व्याख्या वाचली होती जी इथे पुन्हा सांगण्यासारखी आहे- "लबाडी किंवा खोटी स्तुती समोरच्याला तेच सांगते जो तो स्वतःबद्दल विचार करतो."


"तुम्ही जी वाटेल ती भाषा वापरा," राल्फ वॉल्डो इमर्सनने म्हटले होते."तुम्ही नेहमी तेच सांगाल जे तुम्ही आहात." जर आम्हाला फक्त लबाडीच करायची असेल तर सर्वांशी लबाडीने वागून आम्ही सहजपणे मानवी संबंधाचे विशेषज्ञ बनू शकतो.


जेव्हा आम्ही कुठल्याच निश्चित विषयाबद्दल विचार करीत नसतो,तेव्हा आपल्या फावल्या वेळात ९५ टक्के वेळ आम्ही स्वतःबद्दलच विचार करीत असतो.जर आम्ही स्वतःबद्दल विचार करणे थोडे कमी केले तर दुसऱ्यांच्या चांगल्या गुणांबद्दल विचार करायला लागू, तेव्हा मग आम्हाला लबाडीची किंवा खोटी स्तुती करण्याची गरजच वाटणार नाही.खोट्या स्तुतीला पहिल्याच नजरेत,तोंडाबाहेर पडायच्या आधीच ओळखले जाऊ शकते आणि ती अगदी उथळ व खोटी असते.आजच्या जगात खरी स्तुती दुर्मिळ झाली आहे. असे काय होते कोण जाणे की चांगल्या क्रमांकानी उत्तीर्ण झालेल्या आपल्या मुलाची किंवा मुलीची स्तुती करण्याचा आम्हाला बरेचदा विसरच पडतो किंवा आम्ही आपल्या मुलाला त्यावेळी प्रोत्साहित करायला विसरून जातो,जेव्हा ते पहिल्यांदा चांगला केक यशस्वीपणे बनवतात किंवा पाखरांसाठी घरटे बनवतात.मुलांना आपल्या आई-वडिलांकडून झालेल्या स्तुतीने जो आनंद मिळतो,त्यापेक्षा जास्त आनंद अन्य कुठल्याच गोष्टीने मिळत नाही.पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही क्लबमध्ये चांगल्या भोजनाचा आनंद घ्याल,तेव्हा खानसाम्याला नक्की निरोप पाठवा की जेवण रुचकर होते आणि जेव्हा कोणी थकलेला विक्रेता तुमच्याशी सभ्यपणे वागेल तेव्हासुध्दा या गोष्टीचा उल्लेख जरूर करा. प्रत्येक पादरी,प्रत्येक भाषण देणारा आणि प्रत्येक सार्वजनिक वक्ता हे जाणतो की जर श्रोत्यांमधून एकाही व्यक्तीने टाळी वाजवली नाही तर किती वाईट वाटते आणि किती उत्साहभंग होतो. व्यावसायिकांना जे लागू होते ते ऑफिस, दुकाने, कारखान्यांमधले कर्मचारी, कुटुंबीय आणि मित्र परिवार यांना तर दुपटीने लागू होते.आमच्या संबंधात आम्हाला याचा कधी विसर पडायला नको की आमचे साथीदार अखेर मानव आहेत आणि स्तुतीचे भुकेले आहेत.हाच तो अस्सल शिक्का आहे ज्याला प्रत्येक जण पसंत करतो.


आपल्या प्रत्येक दिवसाच्या प्रवासात कृतज्ञतेच्या ठिणग्या मार्गावर पसरवण्याचा प्रयत्न करा.तुम्हाला नवल वाटेल की कशा तन्हेने या ठिणग्यांमुळे मैत्रीच्या छोट्या-छोट्या वाती उजळतील,ज्यामुळे तुमच्या भावी प्रवासात तुम्हाला ऊब मिळेल.


न्यू फेयरफिल्ड,कनेक्टिकट इथल्या पामेला डनहॅमच्या अनेक जबाबदाऱ्यांपैकी एक जबाबदारी होती नवीन कर्मचाऱ्याच्या देखरेखीची,ज्याचे काम अत्यंत वाईट होते.दुसरा कर्मचारी त्याची खूप टर उडवत असे आणि तो किती वाईट काम करतो असे सांगत.ही खूपच वाईट पध्दत होती आणि दुकानातला अमूल्य वेळ वाया जात असे.पॅमने या कर्मचाऱ्याला प्रेरणा देण्याचे अनेक उपाय अंमलात आणले,पण काही लाभ झाला नाही.मग तिला असे लक्षात आले की कधी तरी तो कुठले तरी काम चांगल्या त-हेने करून घेतो.पॅमने निर्णय घेतला की जेव्हा कधी अशी संधी येईल तेव्हा ती इतरांसमोर त्याची स्तुती करेल.असे केल्यावर सर्वांना दिसून आले की दर दिवशी त्याच्या कामात सुधारणा होत गेली आणि लवकरच तो आपले काम चांगल्या त-हेने करू लागला. 


आता सर्व जण त्याची स्तुती करतात आणि त्याला सन्मान देतात.खऱ्या स्तुतीने सकारात्मक परिणाम मिळाले,उलटआलोचना व टिकेने हाती काहीच आले नव्हते.लोकांना टोमणे मारून जखमी केल्याने ते कधीच बदलत नाहीत,न त्यामुळे काही सकारात्मक प्रभाव पडतो.म्हणून असे वर्तन करणे निरर्थक असते.एक जुनी म्हण आहे, जी मी माझ्या आरशावर चिकटवून ठेवली आहे. ती मी रोज वाचतो :


मी या रस्त्यावर फक्त एकदाच चालेन... म्हणून जर मी काही चांगले काम करू शकतो किंवा कुणाचे भले करू शकतो तर मी ते आत्ताच करेन. मी त्याला टाळणार नाही,दुर्लक्ष करणार नाही.कारण पुन्हा मी या रस्त्यावर परतून येणार नाही.


इमर्सनने म्हटले होते,"प्रत्येक व्यक्ती माझ्यापेक्षा कुठल्या ना कुठल्या गोष्टीत सरस असते.मी त्याची ती गोष्ट शिकून घेतो."


जर हे इमर्सनसाठी खरे असेल तर तुमच्या माझ्या बाबतीत तर ते हजार पटीने जास्त खरे आहे.आम्ही आपल्या इच्छांबद्दल विचार करणे सोडायला हवे. आम्ही लबाडीला विसरायला हवे प्रामाणिकपणे खरी प्रशंसा करायला हवी,मनापासून स्तुती करायला व मुक्तकंठाने कौतुक करायला हवे. जर तुम्ही असे कराल तर तुम्हाला असे आढळून येईल,की लोक तुमच्या शब्दांना त्यांच्या आठवणींच्या तिजोरीत ठेवतील आणि आयुष्यभर त्यांना ते शब्द आठवत राहतील. तुम्ही जे म्हटलं ते तुम्ही विसरून जाल,पण ते मुळीच विसरणार नाहीत.


खरी स्तुती करण्याची सवय लावून घ्या.(समाप्त)

१९/१२/२५

लोकांशी अचूक व्यवहार असे करा.Deal with people correctly

अनेक विशेषज्ञांचे मत आहे,की महत्त्वपूर्ण होण्याची जाणीवच माणसांना वेडं करून सोडते यात जे लोक वेडे होतात ते वेडेपणातच,स्वप्नलोकात स्वतःला महत्त्वपूर्ण मानतात.ते स्वतःलाच महत्त्व देतात,जे त्यांना वास्तव जगात मिळत नाही.अमेरिकेत जितके मनोरुग्ण आहेत त्यांची संख्या इतर आजारांनी पीडित असलेल्या रुग्णांपेक्षा जास्त आहे.


वेडेपणाचे कारण काय असते? या प्रश्नाचे कुणीही योग्य उत्तर देऊ शकणार नाही.पण आम्हाला हे नक्की माहीत आहे,की सिफीलिससारखा रोग मेंदूच्या पेशी नष्ट करतो आणि याचा परिणाम म्हणजेच वेडेपणा असतो.खरे तर जवळपास अर्धे मानसिक रोग शारीरिक कारणांनी होतात.उदा.मानसिक आघात,

दारु,मादक किंवा विषारी पदार्थ आणि अपघात;पण उरलेले अर्धे आयुष्य हा या कहाणीचा सर्वांत भयंकर हिस्सा आहे - उरलेल्या अर्धवेड्या लोकांच्या मेंदूच्या पेशींमध्ये कुठलीच शारीरिक गडबड झालेली नसते.पोस्टमॉर्टेम परीक्षणांमध्ये जेव्हा मरणाऱ्या रुग्णांच्या मेंदूच्या पेशी मायक्रोस्कोपखाली बघितल्या गेल्या तेव्हा त्या तेवढ्याच निरोगी होत्या जेवढ्या तुमच्या-माझ्या असतात.


मग हे लोक वेडे का होतात ?


मी हा प्रश्न चार प्रमुख मनोचिकित्सालयातल्या एका प्रमुखाला विचारला.या प्रमुखाला आपल्या विषयातल्या ज्ञानासाठी अनेक पुरस्कार व सन्मान मिळाले होते. त्याने स्पष्टपणे मला सांगितले की,लोक वेडे का होतात हे त्यालां माहिती नाही.कुणीच याचे पूर्णपणे कारण जाणत नाही.परंतु तो असेही म्हणाला,की जे लोक वेडे होतात त्यांच्यापैकी बरेचजण वेडेपणाच्या अवस्थेत त्या महत्त्वपूर्ण भावनेचा अनुभव घेतात,जी त्यांना वास्तव जगात मिळत नाही.या तज्ज्ञाने मला एक कहाणी ऐकवली-


"माझ्या एका स्त्री रुग्णाच्या विवाहाचा दुःखद अंत झाला होता.तिला प्रेम,शारीरिक समाधान,मुले आणि सामाजिक प्रतिष्ठा हवी होती.पण जीवनाने तिच्या या आशांवर पाणी फिरवले.तिचा पती तिच्यावर प्रेम करीत नव्हता.तो तिच्याबरोबर जेवणसुद्धा करीत नसे.तिला त्याचे जेवण वरच्या मजल्यावरच्या त्याच्या खोलीत वाढायला सांगत असे.त्यांना मुलेबाळे नव्हती आणि तिला सामाजिक प्रतिष्ठाही नव्हती.ती वेडी झाली आणि आपल्या कल्पनेत तिने आपल्या पतीला घटस्फोट दिला आणि पुन्हा एकदा आपल्या लग्नाआधीचे नाव लावायला लागली.तिला आता असे वाटतेय,की ती एका श्रीमंत माणसाची पत्नी झाली आहे आणि ती स्वतःला इतरांनी लेडी स्मिथ म्हणावे असा आग्रह धरते.


मुलांबद्दल बोलायचं तर ती अशी कल्पना करते,की प्रत्येक रात्री ती एका नव्या बाळाला जन्म देते.जेव्हा मी तिला बघायला जातो तेव्हा ती म्हणते, 'डॉक्टर, काल रात्री मी एका बाळाला जन्म दिलाय.'

तिच्या भ्रमाचे जहाज वास्तवाच्या खडकावर आपटून चक्काचूर झाले आहे.पण वेडाच्या काल्पनिक प्रदेशात ती आपली स्वप्नं खरी करते आहे." हे दुःखदायी आहे का? मला माहीत नाही.तसे या डॉक्टरने असे पण म्हटले,"काश! मी तिचे वेड दूर करून एकवार पुन्हा तिची विचार करण्याची,समजण्याची शक्ती परत आणू शकलो असतो.पण कदाचित मी तसे केले नसते.ती आज जेवढी आनंदी / आहे तेवढी या आधी कधीच नव्हती."


जर अनेकजण महत्त्व मिळण्याच्या भावनेसाठी इतके भुकेले आहेत की ते त्यापायी खरोखरीच वेडे होऊ शकतात,तर जरा विचार करा की तुम्ही आणि मी आपल्या आसपासच्या लोकांची खरी प्रशंसा करून किती मोठा चमत्कार करू शकतो आणि किती तरी प्राप्त करू शकतो.


चार्ल्स श्वाब अमेरिकन उद्योगधंद्याच्या त्या पहिल्या व्यक्तींपैकी एक होते,ज्यांना एका वर्षात दहा लाख डॉलर्सपेक्षाही जास्त पगार (तेव्हा आयकर नसे आणि दरमहा ५० डॉलर्स कमावणारा माणूस श्रीमंत समजला जायचा) मिळत होता.त्यांना अँड्रयू कार्नेगीने १९२१ मध्ये युनायटेड स्टेटस् स्टील कंपनीचे पहिले अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आणि त्यावेळी श्वाबचे वय फक्त ३८ होते.(नंतर श्वाब यू.एस.स्टील सोडून गोत्यात आलेल्या बेथलेहम स्टील कंपनीचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी तिला अमेरिकेतील सर्वाधिक लाभदायक कंपन्यांमधील एक बनवली).


कार्नेगीने चार्ल्स श्वाबला एका वर्षात दहा लाख डॉलर्स किंवा दररोज तीन हजार डॉलर्सपेक्षा अधिक पगार का दिला ? श्वाब अतिशय हुशार होते म्हणून? नाही.मग काय ते स्टील उद्योगातले सर्वांत मोठे माहीतगार होते म्हणून ? नाही.स्वतः श्वाबचे हे मानणे होते की त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या अनेक लोकांना त्यांच्यापेक्षा स्टील बनवण्याबद्दल जास्त ज्ञान होते.


श्वाब म्हणतात की त्यांना इतका जास्त पगार मिळण्याचे सर्वांत मोठे कारण हे होते,की ते लोकांबरोबर व्यवहार करण्याच्या कलेत निपुण होते.मी त्यांना हे कसे काय शक्य झाले असे विचारले.मी त्यांचे रहस्य त्यांच्याच शब्दात सांगतो.असे शब्द,जे सुवर्णाक्षरात लिहून प्रत्येक शाळा, घर, दुकान आणि ऑफिसात टांगून ठेवायला हवेत. असे शब्द जे मुलांनी पाठ करून टाकायला हवेत. जे जीवनात कधीही कामी येणार नाहीत असे ग्रामर किंवा ब्राझीलचे वार्षिक पर्जन्यमान पाठ करण्यापेक्षा, तुमचे व माझे जीवन आमूलाग्र बदलून जाईल असे ते शब्द…


असे आहेत श्वाब यांचे शब्द...


"मी मानतो की माझी सर्वांत मोठी हातोटी आपल्या कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवण्याची कला आहे आणि स्तुती व प्रोत्साहनाद्वारे लोकांकडून सर्वोत्तम काम मी करवून घेतो.वरिष्ठांच्या टीकेपेक्षा या जगात दुसरी कुठलीच गोष्ट अशी नाही जी कोणाच्याही महत्त्वाकांक्षेला पायदळी तुडवू शकेल.मी कधीच कुणाची निंदा करीत नाही.मी प्रोत्साहन देण्यावर विश्वास ठेवतो जेणेकरून कर्मचारी काम करायला प्रेरित होतील.म्हणूनच मी स्तुती करायला तत्पर असतो आणि चूक काढण्यात कंजूषी करतो.जर मला एखादी गोष्ट पसंत पडली तर मी मनापासून तारीफ करतो आणि मुक्त कंठाने प्रशंसा करतो."


तर श्वाब असे करीत.पण सामान्य लोक काय करतात? अगदी याच्या उलट.जर त्यांना एखादी गोष्ट आवडली नाही तर ते आपल्या कर्मचाऱ्यांवर तोंडसुख घेतात.जर त्यांना एखादी गोष्ट आवडली तर मात्र ते त्याबद्दल काहीही बोलत नाहीत.एक जुनी म्हण आहे : "मी एक चुकीचे काम केले,ज्यासाठी मला नेहमीच दोष दिला गेला.मी दोनदा चांगले काम केले, परंतु त्याबद्दल मला कधीच कुणी ऐकवले नाही."


श्वाबचे म्हणणे होते,"जीवनाच्या माझ्या दीर्घ प्रवासात मी जगातल्या अनेक देशांच्या महान व्यक्तींना भेटलो आहे.आजपर्यंत अशी व्यक्ती भेटली नाही,मग ती कितीही उच्च पदावर असेल,जी टीकेऐवजी स्तुतीच्या वातावरणात जास्त चांगले काम करू शकत नसेल."श्वाबच्या मते अँड्रयु कार्नेगीच्या अपूर्व यशाच्या प्रमुख कारणांपैकी हे एक कारण होते.कार्नेगी आपल्या सहकाऱ्यांची समूहात,तसेच खासगीमध्येही नेहमी प्रशंसा करत.


कानेंगी तर आपल्या कबरीच्या दगडावरसुध्दा आपल्या कर्मचाऱ्यांची तारीफ करणे विसरले नाहीत.त्यांनी स्वतःसाठी हा स्मृतिलेख लिहून ठेवला होता-"इथे तो मनुष्य झोपला आहे जो जाणत होता की आपल्यापेक्षा जास्त समजदार लोकांना आपल्या आसपास कसे एकत्रित करायचे."प्रामाणिक प्रशंसेचं हेच ते रहस्य,ज्यामुळे जॉन रॉकफेलर इतके यशस्वी झाले.जेव्हा त्यांचे भागीदार एडवर्ड टी.बेडफोर्ड यांच्यामुळे दक्षिण अमेरिकेच्या एका करारामध्ये कंपनीला ४० टक्के नुकसान झाले,तेव्हा रॉकफेलर त्यांच्यावर टीका करू शकत होते.पण ते जाणत होते की बेडफोर्डने त्यांच्याकडून पूर्ण प्रयत्न केला होता.तसेही आता नुकसान तर झालेच होते.म्हणून रॉकफेलरने त्यांचे अभिनंदन करण्याचे कारण शोधूनच काढले.त्यांनी बेडफोर्डचे अभिनंदन करताना म्हटले,"तुम्ही खर्चाची ६० टक्के रक्कम तर वाचवली,हे फार चांगले झाले," पुढे असेही म्हणाले,"आपण आपल्या मेंदूचा वापर नेहमीच इतक्या चांगल्या तन्हेने करू शकत नाही."


आता मी एक कहाणी सांगणार आहे,ज्यात सत्य नक्कीच दडलेले आहे.


"एका खेडुत स्त्रीने दिवसभर काबाडकष्ट करून आपल्या परिवारासमोर जेवणाऐवजी लाकडाचा भुसा ठेवून दिला.जेव्हा पती व मुलांनी या अजब प्रकाराचे कारण विचारले,तेव्हा त्या स्त्रीने उत्तर दिले,"मला वाटलं की तुमचं लक्ष याकडे जातच नाही की तुमच्यासमोर जेवण ठेवलं जातं की भुसा.गेली वीस वर्षे मी तुम्हा लोकांसाठी जेवण बनवते आहे पण तुम्ही मला कधी सांगितलं नाही की तुम्ही भुसा खात आहात."


घरातून पळून गेलेल्या महिलांबाबत काही काळापूर्वी संशोधन झाले.पळून जाण्यामागचे कारण होते 'प्रशंसेचा अभाव' आणि मी पैज लावतो,की हेच कारण घरातून पळून जाणाऱ्या नवऱ्यांचेही असणार! आम्ही बहुतेक वेळा आपल्या जोडीदाराला हे सांगायची तसदीच घेत नाही की आम्ही त्याच्या/तिच्यामुळे प्रभावित आहोत म्हणून.माझ्या वर्गात एका सदस्याने आपल्या जीवनातली एक घटना ऐकवली ज्यामध्ये त्याच्या पत्नीने त्याच्यापाशी एक आग्रह धरला होता.त्याची पत्नी व अन्य महिला चर्चमध्ये एका आत्मसुधार कार्यक्रमात सामील झाल्या.एक दिवस त्याच्या पत्नीने त्याला तिच्यातले सहा दोष काढायला सांगितले,जे सुधारल्याने ती अधिक चांगली पत्नी होऊ शकेल. 


तिचा पती हे ऐकून हैराण झाला.तो म्हणाला, "पत्नीच्या अशा आग्रहाने मी आचंबित झालो.खरे पाहिले तर मी सहज तिच्या हातात तिच्यातल्या दोषांची यादी देऊ शकलो असतो,ज्यामध्ये सुधारणेची गरज होती.ईश्वर जाणतो की तीसुध्दा अशा हजार गोष्टींची यादी माझ्या हातात देऊ शकली असती ज्यांमध्ये मला सुधारणेची आवश्यकता होती;पण मी असे केले नाही.मी तिला म्हटलं,"मला याबाबत विचार करायला वेळ दे.मी उद्या सकाळी तुला याचे उत्तर देईन."


दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठलो आणि फुलवाल्याला फोन करून माझ्या पत्नीसाठी सहा गुलाबांच्या फुलांचा नजराणा पाठवायला सांगितला. सोबत एक चिठ्ठी होती,"मला तुझे सहा दोष माहीत नाहीत,जे सुधारण्याची गरज आहे.तू जशी आहेस तशीच मला फार आवडतेस."


त्या संध्याकाळी जेव्हा मी घरी परतलो तेव्हा तुम्ही सांगू शकाल का की दरवाजात माझं स्वागत कुणी केलं? अगदी बरोबर ! माझ्या पत्नीने ! तिच्या डोळ्यांत अश्रू भरले होते. हे …! अपुर्ण

१७/१२/२५

लोकांशी अचूक व्यवहार असे करा.Deal with people correctly.

या जगात फक्त एकच उपाय असा आहे,ज्यामुळे तुम्ही कुणाकडून काही काम करवून घेऊ शकता.याबाबत तुम्ही कधी विचार केला आहे काय ? होय फक्त एकच उपाय आणि तो म्हणजे व्यक्तीमध्ये काम करण्याची इच्छा निर्माण करणे.(लोकांशी व्यवहार करण्याचे अचूक उपाय,मित्र जोडाआणि प्रभावशाली बना,डेल कार्नेगी,मंजुल प्रकाशन,अनुवाद-कृपा कुलकर्णी) लक्षात ठेवा.याशिवाय अन्य कुठलाच उपाय नाहीच.हो.तुम्ही कुणाच्या छातीवर पिस्तुल रोखून त्याला घड्याळ काढून द्यायला विवश करू शकता.(तोपर्यंतच, जोपर्यंत तुम्ही त्यांच्यासमोर आहात.) मुलाला मारून किंवा माराचा धाक दाखवून तुम्ही त्याच्याकडून आपल्या मनासारखे करून घेऊ शकता.पण अशा रानटी उपायांचे परिणाम चांगले होत नाहीत.केवळ एकाच त-हेने मी तुमच्याकडून ती गोष्ट प्राप्त करून घेऊ शकतो.तो उपाय म्हणजे तुम्हाला ते द्यायचे जे तुम्हाला हवे आहे.तुम्हाला काय हवे आहे ?


सिग्मंड फ्रॉइड म्हणाले होते,की कुठलेही काम करण्यामागे मनुष्याच्या दोन मूलभूत प्रेरणा असतात. सेक्सची प्रेरणा आणि महान होण्याची प्रेरणा.


अमेरिकेचे महान दार्शनिक जॉन ड्युईने हीच गोष्ट थोडी वेगळ्या तन्हेने मांडली आहे.डॉ.ड्युई यांनी म्हटले होते की,मानवाच्या स्वभावात सर्वांत प्रबळ प्रेरणा 'महत्त्वपूर्ण होण्याची आकांक्षा' असते.'महत्त्वपूर्ण होण्याची आकांक्षा' हे वाक्य लक्षात ठेवा.हे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला हे वाक्य वारंवार आढळेल.


तुम्हाला काय हवे आहे? तसे तर आम्हाला अनेक गोष्टी हव्या असतात,पण बऱ्याच गोष्टी अशा असतात,ज्यांची आम्हाला प्रबळ इच्छा असते की त्याशिवाय आमचे चालतच नाही.बहुतेक लोकांमध्ये खाली दिलेल्या गोष्टी प्राप्त करण्याची आकांक्षा असते.


१. स्वास्थ्य व जीवनाची सुरक्षितता


२. भोजन


३. निद्रा


४. पैसे व पैशांनी खरेदी करावयाच्या वस्तू


५. स्वर्गसुख


६. सेक्सचे समाधान


७. मुलांचे कल्याण


८. महत्त्वाची भावना


आपल्या जवळपास या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात,फक्त एकाशिवाय.ही आकांक्षा तितकीच गहन व प्रचंड असते जितकी भोजन किंवा झोपेची आकांक्षा.ही क्वचितच पूर्ण होते.या आकांक्षेला फ्रॉइडने 'महान होण्याची आकांक्षा' असे म्हटले आहे;तर ड्युईने 'महत्त्वपूर्ण होण्याची आकांक्षा' असे म्हटले आहे.


लिंकनने एकदा एका पत्राच्या सुरुवातीला लिहिले होते, 'प्रत्येकाला स्तुती आवडते.'विलियम जेम्सने म्हटले होते, 'प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणात त्याची स्तुती व्हावी,ही लालसा दडलेली असते'.

लक्षात घ्या,त्याने या आकांक्षेला इच्छा,आवड अथवा कामना असे म्हटले नाही.त्याने म्हटले,'स्तुती व्हावी अशी लालसा.'


ही अशी एक कायमस्वरूपी मानवी भूक आहे आणि जी व्यक्ती लोकांच्या या प्रशंसेच्या भुकेला संतुष्ट करते ती लोकांना आपल्या आधीन करू शकते.लोक त्याच्यावर इतके प्रेम करतील की त्याला दफन करणारे त्याच्या मरणामुळे दुःखी होतील.माणूस आणि अन्य प्राण्यांमध्ये हाच फरक आहे,की मानवामध्ये महत्त्वपूर्ण होण्याची आकांक्षा असते.जेव्हा मी मिसुरीमध्ये शेतावर मजूर म्हणून काम करीत होतो तेव्हा माझे वडील चांगल्या जातीचे उत्तम ड्युरॉक,जर्सी डुक्कर व गुरे पाळत होते.आम्ही डुकरांना व गुरांना मेळ्यांमध्ये भरणाऱ्या प्रदर्शनांना नेत असू. प्रदर्शनात आम्ही डझनावरी पुरस्कार जिंकले.माझ्या वडिलांनी मलमलच्या पांढऱ्या तुकड्यांवर निळ्या रिबिनी लावल्या होत्या.जेव्हा कधी वडिलांचे मित्र अथवा पाहुणे घरी येत,तेव्हा ते त्यांना आपले पांढऱ्या रंगाचे लांबलचक मलमलचे तुकडे मोठ्या अभिमानाने दाखवत.तुकड्याचे एक टोक ते पकडत असत व दुसरे मी.अशा प्रकारे ते आपल्या निळ्या रिबिनींचं प्रदर्शन करीत.असे पुरस्कार त्यांना आपण महत्त्वपूर्ण असल्याची प्रचिती देत असत.

जर आमच्या पूर्वजांमध्ये महत्त्वपूर्ण होण्याची इतकी प्रबळ आकांक्षा नसती,तर सभ्यतेचा,संस्कृतीचा विकास अशक्य होता याशिवाय आम्ही आजसुद्धा जनावरांसारखेच राहिलो असतो.


महत्त्वपूर्ण होण्याच्या ह्याच आकांक्षेमुळे दुकानातला एक अशिक्षित अन् गरीब कारकून कायद्याची पुस्तके वाचण्यासाठी प्रेरित झाला.पुस्तके त्याने रद्दीवाल्याकडून ५० सेंट्सला खरेदी केली होती. तुम्ही कदाचित या कारकुनाचे नाव ऐकले असेल.त्याचे नाव होते,'लिंकन.'


महत्त्वपूर्ण होण्याच्या याच आकांक्षेमुळे डिकन्सला आपली सुप्रसिद्ध कादंबरी लिहिण्याची प्रेरणा मिळाली. याच आकांक्षेमुळे रेनला पाषाणात सिंफनी लिहायला प्रेरित केले.याच रॉकफेलरने करोडो डॉलर्स कमावले पण ते कधीच खर्च केले नाहीत.याच आकांक्षेमुळे तुमच्या शहरातला सर्वांत सधन असा टोलेजंग वाडा बांधला जातो,जो मनुष्याच्या आवश्यकतेपेक्षा खूपच मोठा असतो.हीच आकांक्षा तुम्हाला अत्याधुनिक कपडे घालायला भाग पाडते,अत्याधुनिक कार खरेदी करायला भाग पाडते आणि आपल्या हुशार मुलांच्या बाबतीत बोलायला भाग पाडते.


हीच आकांक्षा आपल्या मुला-मुलींना टोळ्यांमध्ये सामील करून त्यांच्याकडून अपराध करवते.न्यू यॉर्कच्या एका भूतपूर्व पोलीस कमिशनरांच्या म्हणण्यानुसार साधारणतःतरुण गुन्हेगारांत इतका अहंभाव असतो,की अटक झाल्यावर सर्वांत प्रथम त्याची वर्तमानपत्राची मागणी असते ज्यात त्याचा फोटो छापून आलेला असतो.मिळणाऱ्या शिक्षेविषयी त्याला चिंताच नसते.वर्तमानपत्रात सुप्रसिद्ध खेळाडू, सिनेस्टार्स किंवा राजनेत्यांबरोबर त्याचा फोटो छापून आल्याने त्याला जास्तच आनंद होतो.


आता तुम्ही मला सांगा,कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला महत्त्वपूर्ण होण्याचा अनुभव येतो?मी सांगतो तुम्ही काय आहात.या गोष्टीमुळेच तुमचे चारित्र्य निर्धारित होते,ही तुमच्यासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे.उदा.जॉन डी. रॉकफेलरला चीनच्या पेकिंग शहरातील एक इस्पितळ बांधण्यासाठी करोडो रुपये दान करण्यात महत्त्वपूर्ण असल्याची प्रचिती येत होती.अशा अनेक लोकांच्या भल्यासाठी ज्यांना ना तुम्ही बघितले आहे ना कधी बघणार आहात अशा लोकांसाठी तुम्ही दान करू इच्छिता.

दुसरीकडे डिलिंजर हा एक डाकू लूटमार करण्यात आणि खुनी बनण्यातच महानतेचा अनुभव घेत असे.जेव्हा एफ.बी.आय.चे अधिकारी त्याचा शोध घेत होते तेव्हा तो सिनेसोटाच्या एका फॉर्महाउसमध्ये घुसला आणि अधिकाऱ्यांना म्हणाला, "मी डिलिंजर आहे." त्याला आपण देशातील सर्वांत चर्चित अपराधी आहोत,याचा गर्व वाटत होता.तो म्हणाला, 'मी तुम्हाला काही इजा करणार नाही,पण मी डिलिंजर आहे.'


हो,डिलिंजर आणि रॉकफेलरमध्ये हा महत्त्वाचा फरक होता,की वेगवेगळ्या गोष्टींतून त्यांना महत्त्वपूर्ण होण्याचा अनुभव येत होता.


इतिहास अशा रोचक उदाहरणांनी भरलेला आहे,की प्रसिद्ध लोकांनी महत्त्वपूर्ण बनायची आपली आकांक्षा कशा त-हेने अभिव्यक्त केली.जॉर्ज वॉशिंग्टनला 'हिज माइटीनेस', 'द प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स' असे म्हणवून घ्यायला आवडत असे.

कोलंबसने 'अ‍ॅडमिरल ऑफ द ओशन अ‍ॅण्ड व्हाइसरॉय ऑफ इंडिया' या नामांकनासाठी निवेदन दिले होते.कॅथरीन ज्या पत्रांवर 'हर इंपिरियल मॅजेस्टी' असं लिहिलं नसेल अशी पत्रं वाचत नसे.श्रीमती लिंकन तर व्हाइट हाउसमध्ये श्रीमती ग्रॅटवर वाघिणीसारखी डाफरली होती -"तू माझ्या परवानगीशिवाय माझ्यासमोर बसण्याची हिंमत कशी केलीस?"


आमच्या देशातल्या करोडपतींनी अ‍ॅडमिरल बर्डच्या अंटार्क्टिका अभियानासाठी १९२८मध्ये यासाठी धन दिले,की बर्फाच्छादित रांगांना त्याचे नाव दिले जावे. प्रसिद्ध लेखक व्हिक्टर ह्युगोंनी पॅरिस शहराचे नाव त्यांच्या नावावरून ठेवले जाईल अशी इच्छा व्यक्त केली होती.महान शेक्सपिअरसुद्धा आपल्या कुटुंबासाठी 'कोट ऑफ आर्म्स' प्राप्त करून आपले नाव अधिक महत्त्वपूर्ण बनवू पाहत होता.सहानुभूती व लक्ष आकर्षून घेण्यासाठी तसेच महत्त्वपूर्ण होण्याचा अनुभव घेण्यासाठी लोक आजारी पडण्याचा बहाणा करतात.श्रीमती मॅकिन्लेचंच उदाहरण घ्या.त्यांना महत्त्वपूर्ण झाल्याची जाणीव तेव्हाच व्हायची जेव्हा ते आपल्या पतीला म्हणजेच अमेरिकेच्या राष्ट्रपतींना देशाच्या महत्त्वपूर्ण बाबींकडे दुर्लक्ष करायला विवश करीत असत.अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या पत्नीला असे वाटत असे,की पतीने त्यांचं कामधाम सोडून माझ्यापाशी तासन्तास बसून राहावे आणि आपल्याला बाहुत घेऊन संतुष्ट करण्याचा प्रयत्न करावा.पतीचे लक्ष स्वतःकडे खेचून घेण्यासाठी त्या इतक्या व्याकुळ होत, की त्यांनी जोर देऊन सांगितले,'दंतवैद्याकडे जातानाही पतीने माझ्याबरोबरच असायला हवं.' एकदा जेव्हा त्यांना दातांच्या डॉक्टरकडे एकटीलाच जावे लागले (कारण त्याच वेळी त्यांच्या पतीची गृहमंत्र्यांशी-जॉन हे यांच्याशी मीटिंग ठरलेली होती) तेव्हा इतक्या क्षुल्लक कारणावरून या बाईंनी तमाशा उभा केला होता.


लेखिका मेरी रॉबर्टस् राइनहार्टने मला एका निरोगी प्रतिभावंत महिलेबद्दल सांगितलं होतं,जी महत्त्वपूर्ण असल्याची भावना अनुभवण्यासाठी आजारी पडली होती.राइनहार्ट म्हणाल्या,"एक दिवस या महिलेला कुठल्या तरी कठीण परिस्थितीशी सामना करावा लागला,कदाचित वाढत्या वयाशी.तिला पुढील आयुष्यातील एकटेपण दिसून येत होते.तिच्या आयुष्यात कुठलेच स्वप्न,कुठलीच आशा नव्हती." त्या पुढे सांगू लागल्या,"ती आजारी पडून अंथरूणाला खिळली आणि पुढची दहा वर्षे तिची म्हातारी आई तिची सेवा करीत राहिली.तिच्यासाठी जेवण नेऊ लागली.

एक दिवस ती वृद्ध आई थकून मरण पावली. काही महिने युवती दुःख करीत अंथरूणातच पडून राहिली.मग एक दिवस उठली, कपडे बदलले आणि तिने पुन्हा नव्याने जगायला सुरुवात केली."


अपुर्ण.. शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…!







१५/१२/२५

समुद्राच्या लाटांवर एक वर्ष / A year on the waves of the sea

जोनाथन फ्रैंकलिन या मध्य आणि दक्षिण अमेरिकेचा अभ्यास करणाऱ्या पत्रकाराने जोस सॅल्वडोर अल्वरेंगासोबत वर्षभर मुक्काम करून 'फोरथर्टीएट डेज' हे पुस्तक लिहिलं.सुरुवातीला जोनाथनचाही अल्वरेंगाच्या हकीगतीवर विश्वास बसत नव्हता;पण सर्व शक्यता तपासून पाहिल्यावर अल्वरेंगाने सांगितलेली प्रत्येक गोष्टी खरी आहे,असं त्याच्या लक्षात आलं आणि त्यातून एक उत्तम पुस्तक उभं राहिलं.


अल्वरेंगा त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो,की खात राहिलास तर तू मरणार नाहीस;पण त्याला ते पटत नाही.एकदा कोडोंबाच्या मनात येतं,मागील लेखावरून पुढे…हा आपला शेवटचा प्रवास भाग तिसरा व शेवटचा…


असं मरणाची वाट बघत राहण्यापेक्षा सरळ शार्कच्या झुंडीसमोर उडी मारलेली काय वाईट ! एकदा अल्वरेंगाचं लक्ष नाही हे बघून तो उडी मारायचा प्रयत्नही करतो;पण तेवढ्यात अल्वरेंगा त्याला सावरतो. पुढे काही दिवस कोडोंबा खाण्यासाठीही जागचा उठत नाही.अल्वरेंगाच त्याला खायला घालतो,पाणी पाजतो; पण त्याची जगण्याची इच्छा आणि टिकून राहण्याची ताकद कमी कमी होत चालल्याचं अल्वरेंगालाही जाणवू लागलेलं असतं.बोट भरकटून तीन महिने उलटून गेलेले असतात.एके दिवशी कोर्डोबा नेहमीपेक्षा जास्तच थकलेला वाटतो.बहुतेक त्याला आतून मरणाची चाहूल लागलेली असते.आता मी फार काळ जगत नाही,असं तो सतत पुटपुटत राहतो.अखेर अल्वरेंगाचाही धीर सुटतो.तो कोर्डोबावर ओरडतो,"तू मरू शकत नाहीस. तुला जगायला पाहिजेस.तू मेलास तर मी एकटा काय करू इथे?" पण हा उद्रेक ऐकायलाही कोर्डोबा जिवंत नसतो.त्याचे प्राण गेलेले असतात.


अल्वरेंगा धाय मोकलून रडतो.इतके दिवस दोघांच्या टीमचं नेतृत्व अल्वरेंगाकडे असलं तरी कोर्डोबाची त्याला सोबत असते.शिवाय,

आपल्यापेक्षा लहान आणि आपल्या जबाबदारीवर आलेला मुलगा म्हणून त्याची काळजी घेण्याचंही काम अल्वरेंगा पार पाडत असतो. आता अचानक ते काम संपून जातं.वर आकाश आणि खाली समुद्र यामध्ये आता अल्वरेंगा पूर्ण एकटा पडतो. आपल्या मृत सोबत्याचं शरीर समुद्रात फेकून देण्याचं धाडसही त्याला होत नाही.हा धक्का सहन करण्याचा सोपा मार्ग त्याला सापडतो,तो म्हणजे असं घडलंच नाही असं मानणं ! कोर्डोबा मेलाच नाहीये असं मानून तो त्याच्याकडे बघत बोलत राहतो.स्वतःच कोर्डोबाच्या वतीने उत्तरंही देतो.एक आठवडा उलटतो.कोर्डोबाचं शरीर तसंच पडून असतं.एके रात्री ताऱ्यांकडे पाहत अल्वरेंगा कोर्डोबाच्या शेजारी पहुडलेला असतो. त्याच्याशी बोलत असतो.अचानक झोपेतून जाग आल्याप्रमाणे त्याला जाणवतं की आपण एका मृतदेहाशी बोलतो आहोत.आपलं मानसिक संतुलन बिघडलं तर नाही ना अशी शंका त्याला येऊ लागते. शेवटी धीर गोळा करून तो कोर्डोबाचा मृतदेह पाण्यात ढकलतो.चार महिने उलटतात.

अल्वरेंगा जिवंत असतो, पण एकटेपणाचा धक्का त्याला अजून पचवता आलेला नसतो.कोर्डोबाच्या आठवणीने त्याला अनेकदा रडू फुटतं.आपण जगलो-वाचलोच तर कोर्डोबाच्या आईला कसं तोंड दाखवणार याची चिंताही त्याला सतत खात असते.आपला नेहमीचा उत्साह,खंबीरपणा,जिवावरच्या संकटातही जागी असणारी विनोदबुद्धी आपल्याला सोडून चालली की काय अशी शंका त्याला येऊ लागते.


पण तसं होत नाही.अल्वरेंगा लवकरच याही दुःखातून बाहेर पडतो,एकटेपणाला सरावतो;एवढंच नव्हे,तर त्याचा आनंदही घ्यायला लागतो.एकटं असण्याचे काही फायदे असल्याचंही त्याच्या लक्षात येऊ लागतं.मिळणाऱ्या अन्नपाण्याचे दोन भाग करण्याची आता गरज नसते.शिवाय कोर्डोबाला समजावत राहण्यात जी शक्ती खर्च होत असते तीही आता वाचते. त्या बोटीवर त्याचं त्याचं असं एक जग तयार होतं.


या प्रवासात समुद्रातलं एक वेगळंच जग त्याच्यासमोर उलगडत असतं.पट्टीचा मच्छीमार असूनही त्याला आजवर ते कधीही बघायला मिळालेलं नसतं.


आकाशातले ग्रह-तारे त्याला नव्याने दिसू लागतात. चंद्राच्या कलांसोबत त्याचं जगणं जोडलं जातं.कधी एखादा महाकाय देवमासा त्याला दिसतो,तर कधी एखादा अनोखा पक्षी.शार्कची फौज तर कायमच त्याच्या बोटीच्या चहुबाजूंनी घोंघावत असते.

एकदा त्याला बोटीपासून पंचवीस फुटांवर एक मोठ्या माशासारखा आकार वाहून जाताना दिसतो.त्याला लगडलेले मासे आणि वरून उडणारे पक्षी यामुळे तो मेलेला मासा असावा असं त्याला वाटतं.त्याची उत्सुकता एवढी वाढते की मागचा-पुढचा विचार न करता तो समुद्रात उडी टाकतो.पोहायला लागल्यावर त्याच्या लक्षात येतं,की आपल्या शरीरात समुद्रामध्ये पोहण्याची ताकद उरलेली नाही आणि स्नायूंना व्यायामही राहिलेला नाही.तो कसाबसा पोहत त्या गोष्टीपर्यंत जातो.जवळ गेल्यावर लक्षात येतं की तो मासा वगैरे नसून थर्माकोलचा मोठा तुकडा आहे.त्या तुकड्याचा उपयोग होईल,असा विचार करून तो तुकडा घेऊन परत बोटीकडे जायला निघतो,पण आपण बोटीपर्यंत पोहोचू की नाही याची त्याला खात्री वाटेनाशी होते.आपण अशी अविचारी उडी कशी काय घेतली याचं त्याला आश्चर्य वाटतं.वाटेत शार्कनी हल्ला केला तर काय,याचाही विचार त्याने उडी मारताना केलेला नसतो. अखेरीस कसाबसा तो बोटीत येऊन चढतो आणि सुटकेचा निःश्वास टाकतो.पाच महिने उलटून गेल्यावर पहिल्यांदा सुटकेची खरीखुरी आशा तयार होते. अल्वरेंगा आइसबॉक्समध्ये झोपलेला असताना त्याला मोठमोठ्यांदा संगीत वाजत असल्याचा आवाज ऐकू येतो.उठून बघतो तर एक भली मोठी क्रूझ शेजारून चाललेली असते.अल्वरेंगा खच्चून ओरडतो,दिसेल ती वस्तू बोटीवर आपटून आवाज करतो,वस्तू फेकून मारतो;पण कशाचाच उपयोग होत नाही.ते प्रचंड धूड अल्वरेंगाची दखलही न घेता तिथून निघून जातं.अल्वरेंगा त्याकडे अविश्वासाने बघतच राहतो.एखादी बोट जवळ आली की आपली सुटका नक्की,असं अल्वरेंगाला आतापर्यंत वाटत असतं,तो भ्रम आता दूर होतो.बोट जवळ आली तरी तिला आपण दिसूच असं नाही,हा नवाच हृदयात धडकी भरवणारा शोध त्याला लागतो.त्याची उरलीसुरली आशाही संपून जाते.आता किनाऱ्याला लागलो तरच आपण वाचणार,हे अल्वरेंगाला कळून चुकतं.थोडक्यात,याचा अर्थ असा की,आता बचावण्याची शक्यता फारच कमी आहे! आपण समुद्रात नेमके कुठे आहोत,इथून सगळ्यात जवळचा किनारा कुठे आहे, आपण त्याच दिशेने चाललो आहोत की नाही,कशाचाच त्याला पत्ता नसतो. अचानक त्याला जाणवतं की आपण मरणाचे दमलेलो आहोत.आपल्या मनातली ऊर्जाही संपत चालली आहे. किती तरी काळ तो निराशेच्या गर्तेत पडून राहतो.त्या खोल अंधारातून त्याला बाहेर काढते ती त्याची मुलगी. आता १३ वर्षांची झालेली त्याची मुलगी सतत त्याच्या डोळ्यांसमोर येत असते.आपण तिला सोडून पळून गेल्याबद्दल तिची माफी मागण्यासाठी तरी आपण जगलंच पाहिजे,असं तो स्वतःला सांगत राहतो.


सहा महिने उलटतात.तीच बोट,तेच रूटिन,तोच एकटा प्रवासी.अल्वरेंगाला आता केबिन फिवरचा त्रास होऊ लागलेला असतो बोटीवर अडकून पडल्यामुळे होणारा क्लॅस्ट्रोफोबिया.त्यावरही अल्वरेंगा उपाय शोधून काढतो.


आपल्या आसपासच्या समुद्राची त्याला आता नीट ओळख झालेली असते.शार्क कधी येतात,कधी लांब असतात हे त्याला कळू लागलेलं असतं.शार्क आसपास नाहीत असं पाहून थोड्या थोड्या दिवसांनी तो समुद्रात उतरायला सुरुवात करतो.त्या दोन-पाच मिनिटांच्या पोहण्यामुळे त्याला जो काही आनंद मिळतो तो अवर्णनीय असतो. सुटकेची इच्छा कितीही तीव्र असली तरी या एकान्तातल्या आयुष्याचीही वेगळी मजा आहे असं अल्वरेंगाला जाणवतं.  आसपास कोणीही माणसं नाहीत,त्यामुळे नातेसंबंधांची कटकट नाही,चुका नाहीत की आपल्या हातून काही पाप घडेल याची भीती नाही.फक्त आपण आणि आपण..एकदा अल्वरेंगा आइसबॉक्समध्ये झोपला असताना अचानक त्याच्या बोटीला धक्के बसू लागतात.त्याचं मन उसळी खातं.बोट किनाऱ्याला लागली की काय ?पण उठून पाहतो तर एक देवमासा त्याच्या बोटीला खेटून चाललेला असतो.नेहमीच्या माशांपेक्षा तो किती तरी मोठा असला तरी ते एक पिल्लू असतं.हे धूड आपली बोट उलटवणार तर नाही ना अशी त्याला शंका येते. पण तो मासा फक्त बोटीच्या आसपास फिरत राहतो.


तो अल्वरेंगाला त्रासही देत नाही आणि तिथून निघूनही जात नाही.दिवसरात्र तो त्याच्या बोटीसोबतच पोहू लागतो.थोड्या दिवसांतच अल्वरेंगाला त्याची सोबत आवडू लागते.तो त्या व्हेलच्या बच्च्याशी गप्पा मारू लागतो.मनात साचलेल्या गोष्टी त्याला सांगू लागतो. जमिनीवरचे-समुद्रावरचे स्वतःचे अनुभव ऐकवू लागतो. त्याच्यामुळे अल्वरेंगाचं एकटेपणाचं दुःख किती तरी कमी होतं.अशी सोबत असेल तर आपण कितीही दिवस समुद्रात काढू शकतो असं अल्वरेंगाला वाटतं. पण हा पाहुणा एक दिवस आला तसा निघून जातो आणि अल्वरेंगा पुन्हा एकटा पडतो.

कुणाशी तरी बोलायला हवं,या ऊर्मीतून तो खाण्यासाठी पकडलेल्या एका पक्ष्याशीच गप्पा मारू लागतो.त्याला न मारता त्याला पाळीव पक्षी बनवतो.


एक वर्ष उलटतं.अल्वरेंगा अजूनही जिवंत असतो. समुद्रातल्या या पर्यावरणात रोज होणारे बदल बघत राहणं हेच आता आपलं कायमचं आयुष्य आहे की काय,असं त्याला वाटू लागलेलं असतं.काही दिवसांनी अचानक समुद्रातले मासे कमी होऊ लागतात,पक्षी कमी होतात.त्याच्याकडचा अन्नसाठा झपाट्याने संपत जातो. त्याने खाण्यासाठी मारून ठेवलेले सगळे पक्षी संपतात, तेव्हा तो नाइलाजाने आपल्या पाळीव पक्ष्याला, पांचोला मारून खाण्याची वेळ त्याच्यावर येते.थोड्या दिवसांनी पिण्याचं पाणीही संपतं.काही दिवस पुन्हा एकदा उपासमार सहन करण्याची वेळ अल्वरेंगावर येते. पण तेही दिवस कसेबसे जातात.त्यातही अल्वरेंगा तग धरून राहतो.पुन्हा पाऊस पडतो.पुन्हा मासे दिसू लागतात.आधीपेक्षा मोठ्या आकाराचे पक्षी अल्वरेंगाच्या बोटीवर येऊन विसावतात.हा बदल म्हणजे जमीन जवळ आल्याची खूण की समुद्रात आणखी आत शिरल्याची ? अल्वरेंगाला ते कळण्याचा काही मार्गच नसतो.एके दिवशी अल्वरेंगाला एक जहाज आपल्याच दिशेने येताना दिसतं.एवढंच नव्हे,तर डेकवरची माणसं आपल्याकडेच बघत असल्याचंही त्याच्या लक्षात येतं. 


तो आनंदाने वेडापिसा होतो.आता आपली सुटका होणारच,आता काही अडथळा येऊ शकत नाही,असं म्हणत तो त्या माणसांच्या दिशेने हात करतो.ती माणसंही त्याला हात करतात.आता कोणत्याही क्षणी जीवरक्षक बोटी पाण्यात उतरतील,या आशेने अल्वरेंगा वाट बघत असतो;पण घडतं भलतंच.ती माणसं तशीच 'अच्छा' करत असताना बोट त्याच्यापासून दूर निघून जाते.बहुतेक अल्वरेंगा मासेमारीसाठी समुद्रात आला असावा असं त्यांना वाटत असावं.अल्वरेंगाला ही निराशा सहन करणं अशक्य होतं.इतके दिवस आपण काय काय म्हणून सहन केलं नाही! दरवेळी निराशा गिळून आपण पुढच्या संधीची वाट पाहत राहिलो. आणि आता संधी इतक्या जवळ येऊनही आपल्याला हुलकावणी का देते आहे हे त्याला कळत नाही.या घटनेने अचानक अल्वरेंगाचा जगण्यातला रस संपून जातो.खाण-पिणं सोडून तो नुसता पडून राहू लागतो. आपण कोर्डोबाला जसं हळूहळू संपत जाताना पाहिलं तसंच स्वतःलाही पाहण्याची वेळ आपल्यावर येणार असं त्याला वाटू लागतं.प्रत्येकाच्या मरणाची सुरुवात वेगळी अनोखी असणार असं अल्वरेंगाला वाटत असतं.स्वतःच्या मरणाबद्दल त्याला उत्सुकताही असते.कोर्डोबाच्या मरणाची सुरुवात त्याच्या पोटापासून झालेली असते


अल्वरेंगाला जाणवतं,आपले गुडघ्यापासून खालचे पाय बधिर होत चालले आहेत.वरून पाऊस कोसळत असतानाही उठून आडोशाला बसण्याची इच्छाही अल्वरेंगाला होत नाही.पक्षी बोटीवर त्याच्या शेजारी येऊन बसतात,तरीही तो त्यांना पकडायला जात नाही की त्याच्या अंगावर बसून त्याला चोची मारणाऱ्या पक्ष्यांना हाकलत नाही.आपण एक मृतदेहच आहोत असं त्याला वाटू लागतं.पण आता त्याला जाणवतं की आपण मृत्यूसाठी तयार आहोत.या समुद्रात एक वर्ष आपण टिकून राहिलो हेही कमी नाही.आपलं हे कर्तृत्व कुणाला कळलं नाही तरी बेहत्तर,पण त्यामुळे आपण स्वतःवर जाम खूष आहोत.आता कधीही मेलो तरी सुखाने मरू,असं म्हणत तो जीवनेच्छा सोडून देतो..


.. पण नशिबात काही वेगळंच लिहिलेलं असतं.एके संध्याकाळी त्याला जागा येते तर दूरवर प्रकाशच प्रकाश दिसतो.ते जहाज नक्कीच नसतं.एवढे दिवे म्हणजे हे नक्कीच एखादं गाव असणार.हा भास नाही ना याची खात्री करून घेण्यासाठी तो पुन्हा काही वेळाने त्या दिशेला पाहतो.अजूनही दिवे चकाकतच असतात.तो किनारा असतो हे नक्की.पण बोट किनाऱ्यापर्यंत नेणार कशी ? आता नशीबच आपली बोट तिकडे नेऊ शकतं.. त्यामुळे त्याचा विचार न करता अल्वरेंगा पडून राहतो. आणखी काही दिवस जातात.एके सकाळी अल्वरेंगा डोकं वर काढतो,तर समोर नारळाच्या झाडांनी व्यापलेलं बेट असतं.अल्वरेंगाच्या छातीचे ठोके वाढू लागतात. नदी असती तर वडी मारून पोहत जाता आला असत इतका किनारा जवळ असतो;पण अल्वरेंगाकडे तेवढी शक्ती नसते आणि शार्कच्या हल्ल्याची भीतीही. पण आता मात्र केवळ वाट बघत राहणं त्याला असह्य होतं. या अवस्थेवर मात करण्यासाठी तो बोटीवर आहे- नाही ते सगळं खायला सुरुवात करतो. पोट तुडुंब भरल्यावरही न थांबता खात राहतो. अखेर बोट इतकी जवळ येते की आता तो त्या पाण्यात उभाही राहू शकत असतो.बोटीतून बाहेर पडून अल्वरेंगा चालत किनाऱ्यापर्यंत येतो.आपण चालू शकतो हेही त्याला विसरायला झालेलं असतं.आता आयुष्य म्हणजे बोटीच्या पंचवीस फुटांतली धडपड न राहता आपण मुक्त झालो आहोत, या आनंदाने तो तिथेच कोसळतो. त्याला जाग येते तेव्हा दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली असते.या बेटावर माणसं राहतात की ते निर्मनुष्य आहे की इथे नरभक्षक आदिमानव राहतात याची अल्वरेंगाला कल्पना नसते.पण इथे कुणीही राहत नसलं तरीही मी आनंदाने इथे जगेन,असा विचार त्याच्या मनात येतो.पण तशी वेळ येत नाही.थोड्याच वेळात बेटावर राहणाऱ्या एका आदिवासी कुटुंबाला तो सापडतो.तारीख असते ३० जानेवारी २०१४.एल सॅल्वडोरपासून तब्बल १०,००० किलोमीटर भरकटत अखेर ऑस्ट्रेलियाच्या ईशान्येला असलेल्या मार्शल आयलंड्स बेटसमूहामधल्या एका छोट्या बेटावर अल्वरेंगा येऊन पोहोचलेला असतो.तग धरून राहण्यासाठी समोर येणाऱ्या संकटांशी अन् बदलांशी जुळवून घेण्याची माणसाची शक्ती किती कमालीची असते हे दाखवून देणाऱ्या अल्वरेंगाचं नाव इतिहासात कायमचं नोंदवलं गेलेलं असतं.