या जगात फक्त एकच उपाय असा आहे,ज्यामुळे तुम्ही कुणाकडून काही काम करवून घेऊ शकता.याबाबत तुम्ही कधी विचार केला आहे काय ? होय फक्त एकच उपाय आणि तो म्हणजे व्यक्तीमध्ये काम करण्याची इच्छा निर्माण करणे.(लोकांशी व्यवहार करण्याचे अचूक उपाय,मित्र जोडाआणि प्रभावशाली बना,डेल कार्नेगी,मंजुल प्रकाशन,अनुवाद-कृपा कुलकर्णी) लक्षात ठेवा.याशिवाय अन्य कुठलाच उपाय नाहीच.हो.तुम्ही कुणाच्या छातीवर पिस्तुल रोखून त्याला घड्याळ काढून द्यायला विवश करू शकता.(तोपर्यंतच, जोपर्यंत तुम्ही त्यांच्यासमोर आहात.) मुलाला मारून किंवा माराचा धाक दाखवून तुम्ही त्याच्याकडून आपल्या मनासारखे करून घेऊ शकता.पण अशा रानटी उपायांचे परिणाम चांगले होत नाहीत.केवळ एकाच त-हेने मी तुमच्याकडून ती गोष्ट प्राप्त करून घेऊ शकतो.तो उपाय म्हणजे तुम्हाला ते द्यायचे जे तुम्हाला हवे आहे.तुम्हाला काय हवे आहे ?
सिग्मंड फ्रॉइड म्हणाले होते,की कुठलेही काम करण्यामागे मनुष्याच्या दोन मूलभूत प्रेरणा असतात. सेक्सची प्रेरणा आणि महान होण्याची प्रेरणा.
अमेरिकेचे महान दार्शनिक जॉन ड्युईने हीच गोष्ट थोडी वेगळ्या तन्हेने मांडली आहे.डॉ.ड्युई यांनी म्हटले होते की,मानवाच्या स्वभावात सर्वांत प्रबळ प्रेरणा 'महत्त्वपूर्ण होण्याची आकांक्षा' असते.'महत्त्वपूर्ण होण्याची आकांक्षा' हे वाक्य लक्षात ठेवा.हे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला हे वाक्य वारंवार आढळेल.
तुम्हाला काय हवे आहे? तसे तर आम्हाला अनेक गोष्टी हव्या असतात,पण बऱ्याच गोष्टी अशा असतात,ज्यांची आम्हाला प्रबळ इच्छा असते की त्याशिवाय आमचे चालतच नाही.बहुतेक लोकांमध्ये खाली दिलेल्या गोष्टी प्राप्त करण्याची आकांक्षा असते.
१. स्वास्थ्य व जीवनाची सुरक्षितता
२. भोजन
३. निद्रा
४. पैसे व पैशांनी खरेदी करावयाच्या वस्तू
५. स्वर्गसुख
६. सेक्सचे समाधान
७. मुलांचे कल्याण
८. महत्त्वाची भावना
आपल्या जवळपास या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात,फक्त एकाशिवाय.ही आकांक्षा तितकीच गहन व प्रचंड असते जितकी भोजन किंवा झोपेची आकांक्षा.ही क्वचितच पूर्ण होते.या आकांक्षेला फ्रॉइडने 'महान होण्याची आकांक्षा' असे म्हटले आहे;तर ड्युईने 'महत्त्वपूर्ण होण्याची आकांक्षा' असे म्हटले आहे.
लिंकनने एकदा एका पत्राच्या सुरुवातीला लिहिले होते, 'प्रत्येकाला स्तुती आवडते.'विलियम जेम्सने म्हटले होते, 'प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणात त्याची स्तुती व्हावी,ही लालसा दडलेली असते'.
लक्षात घ्या,त्याने या आकांक्षेला इच्छा,आवड अथवा कामना असे म्हटले नाही.त्याने म्हटले,'स्तुती व्हावी अशी लालसा.'
ही अशी एक कायमस्वरूपी मानवी भूक आहे आणि जी व्यक्ती लोकांच्या या प्रशंसेच्या भुकेला संतुष्ट करते ती लोकांना आपल्या आधीन करू शकते.लोक त्याच्यावर इतके प्रेम करतील की त्याला दफन करणारे त्याच्या मरणामुळे दुःखी होतील.माणूस आणि अन्य प्राण्यांमध्ये हाच फरक आहे,की मानवामध्ये महत्त्वपूर्ण होण्याची आकांक्षा असते.जेव्हा मी मिसुरीमध्ये शेतावर मजूर म्हणून काम करीत होतो तेव्हा माझे वडील चांगल्या जातीचे उत्तम ड्युरॉक,जर्सी डुक्कर व गुरे पाळत होते.आम्ही डुकरांना व गुरांना मेळ्यांमध्ये भरणाऱ्या प्रदर्शनांना नेत असू. प्रदर्शनात आम्ही डझनावरी पुरस्कार जिंकले.माझ्या वडिलांनी मलमलच्या पांढऱ्या तुकड्यांवर निळ्या रिबिनी लावल्या होत्या.जेव्हा कधी वडिलांचे मित्र अथवा पाहुणे घरी येत,तेव्हा ते त्यांना आपले पांढऱ्या रंगाचे लांबलचक मलमलचे तुकडे मोठ्या अभिमानाने दाखवत.तुकड्याचे एक टोक ते पकडत असत व दुसरे मी.अशा प्रकारे ते आपल्या निळ्या रिबिनींचं प्रदर्शन करीत.असे पुरस्कार त्यांना आपण महत्त्वपूर्ण असल्याची प्रचिती देत असत.
जर आमच्या पूर्वजांमध्ये महत्त्वपूर्ण होण्याची इतकी प्रबळ आकांक्षा नसती,तर सभ्यतेचा,संस्कृतीचा विकास अशक्य होता याशिवाय आम्ही आजसुद्धा जनावरांसारखेच राहिलो असतो.
महत्त्वपूर्ण होण्याच्या ह्याच आकांक्षेमुळे दुकानातला एक अशिक्षित अन् गरीब कारकून कायद्याची पुस्तके वाचण्यासाठी प्रेरित झाला.पुस्तके त्याने रद्दीवाल्याकडून ५० सेंट्सला खरेदी केली होती. तुम्ही कदाचित या कारकुनाचे नाव ऐकले असेल.त्याचे नाव होते,'लिंकन.'
महत्त्वपूर्ण होण्याच्या याच आकांक्षेमुळे डिकन्सला आपली सुप्रसिद्ध कादंबरी लिहिण्याची प्रेरणा मिळाली. याच आकांक्षेमुळे रेनला पाषाणात सिंफनी लिहायला प्रेरित केले.याच रॉकफेलरने करोडो डॉलर्स कमावले पण ते कधीच खर्च केले नाहीत.याच आकांक्षेमुळे तुमच्या शहरातला सर्वांत सधन असा टोलेजंग वाडा बांधला जातो,जो मनुष्याच्या आवश्यकतेपेक्षा खूपच मोठा असतो.हीच आकांक्षा तुम्हाला अत्याधुनिक कपडे घालायला भाग पाडते,अत्याधुनिक कार खरेदी करायला भाग पाडते आणि आपल्या हुशार मुलांच्या बाबतीत बोलायला भाग पाडते.
हीच आकांक्षा आपल्या मुला-मुलींना टोळ्यांमध्ये सामील करून त्यांच्याकडून अपराध करवते.न्यू यॉर्कच्या एका भूतपूर्व पोलीस कमिशनरांच्या म्हणण्यानुसार साधारणतःतरुण गुन्हेगारांत इतका अहंभाव असतो,की अटक झाल्यावर सर्वांत प्रथम त्याची वर्तमानपत्राची मागणी असते ज्यात त्याचा फोटो छापून आलेला असतो.मिळणाऱ्या शिक्षेविषयी त्याला चिंताच नसते.वर्तमानपत्रात सुप्रसिद्ध खेळाडू, सिनेस्टार्स किंवा राजनेत्यांबरोबर त्याचा फोटो छापून आल्याने त्याला जास्तच आनंद होतो.
आता तुम्ही मला सांगा,कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला महत्त्वपूर्ण होण्याचा अनुभव येतो?मी सांगतो तुम्ही काय आहात.या गोष्टीमुळेच तुमचे चारित्र्य निर्धारित होते,ही तुमच्यासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे.उदा.जॉन डी. रॉकफेलरला चीनच्या पेकिंग शहरातील एक इस्पितळ बांधण्यासाठी करोडो रुपये दान करण्यात महत्त्वपूर्ण असल्याची प्रचिती येत होती.अशा अनेक लोकांच्या भल्यासाठी ज्यांना ना तुम्ही बघितले आहे ना कधी बघणार आहात अशा लोकांसाठी तुम्ही दान करू इच्छिता.
दुसरीकडे डिलिंजर हा एक डाकू लूटमार करण्यात आणि खुनी बनण्यातच महानतेचा अनुभव घेत असे.जेव्हा एफ.बी.आय.चे अधिकारी त्याचा शोध घेत होते तेव्हा तो सिनेसोटाच्या एका फॉर्महाउसमध्ये घुसला आणि अधिकाऱ्यांना म्हणाला, "मी डिलिंजर आहे." त्याला आपण देशातील सर्वांत चर्चित अपराधी आहोत,याचा गर्व वाटत होता.तो म्हणाला, 'मी तुम्हाला काही इजा करणार नाही,पण मी डिलिंजर आहे.'
हो,डिलिंजर आणि रॉकफेलरमध्ये हा महत्त्वाचा फरक होता,की वेगवेगळ्या गोष्टींतून त्यांना महत्त्वपूर्ण होण्याचा अनुभव येत होता.
इतिहास अशा रोचक उदाहरणांनी भरलेला आहे,की प्रसिद्ध लोकांनी महत्त्वपूर्ण बनायची आपली आकांक्षा कशा त-हेने अभिव्यक्त केली.जॉर्ज वॉशिंग्टनला 'हिज माइटीनेस', 'द प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स' असे म्हणवून घ्यायला आवडत असे.
कोलंबसने 'अॅडमिरल ऑफ द ओशन अॅण्ड व्हाइसरॉय ऑफ इंडिया' या नामांकनासाठी निवेदन दिले होते.कॅथरीन ज्या पत्रांवर 'हर इंपिरियल मॅजेस्टी' असं लिहिलं नसेल अशी पत्रं वाचत नसे.श्रीमती लिंकन तर व्हाइट हाउसमध्ये श्रीमती ग्रॅटवर वाघिणीसारखी डाफरली होती -"तू माझ्या परवानगीशिवाय माझ्यासमोर बसण्याची हिंमत कशी केलीस?"
आमच्या देशातल्या करोडपतींनी अॅडमिरल बर्डच्या अंटार्क्टिका अभियानासाठी १९२८मध्ये यासाठी धन दिले,की बर्फाच्छादित रांगांना त्याचे नाव दिले जावे. प्रसिद्ध लेखक व्हिक्टर ह्युगोंनी पॅरिस शहराचे नाव त्यांच्या नावावरून ठेवले जाईल अशी इच्छा व्यक्त केली होती.महान शेक्सपिअरसुद्धा आपल्या कुटुंबासाठी 'कोट ऑफ आर्म्स' प्राप्त करून आपले नाव अधिक महत्त्वपूर्ण बनवू पाहत होता.सहानुभूती व लक्ष आकर्षून घेण्यासाठी तसेच महत्त्वपूर्ण होण्याचा अनुभव घेण्यासाठी लोक आजारी पडण्याचा बहाणा करतात.श्रीमती मॅकिन्लेचंच उदाहरण घ्या.त्यांना महत्त्वपूर्ण झाल्याची जाणीव तेव्हाच व्हायची जेव्हा ते आपल्या पतीला म्हणजेच अमेरिकेच्या राष्ट्रपतींना देशाच्या महत्त्वपूर्ण बाबींकडे दुर्लक्ष करायला विवश करीत असत.अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या पत्नीला असे वाटत असे,की पतीने त्यांचं कामधाम सोडून माझ्यापाशी तासन्तास बसून राहावे आणि आपल्याला बाहुत घेऊन संतुष्ट करण्याचा प्रयत्न करावा.पतीचे लक्ष स्वतःकडे खेचून घेण्यासाठी त्या इतक्या व्याकुळ होत, की त्यांनी जोर देऊन सांगितले,'दंतवैद्याकडे जातानाही पतीने माझ्याबरोबरच असायला हवं.' एकदा जेव्हा त्यांना दातांच्या डॉक्टरकडे एकटीलाच जावे लागले (कारण त्याच वेळी त्यांच्या पतीची गृहमंत्र्यांशी-जॉन हे यांच्याशी मीटिंग ठरलेली होती) तेव्हा इतक्या क्षुल्लक कारणावरून या बाईंनी तमाशा उभा केला होता.
लेखिका मेरी रॉबर्टस् राइनहार्टने मला एका निरोगी प्रतिभावंत महिलेबद्दल सांगितलं होतं,जी महत्त्वपूर्ण असल्याची भावना अनुभवण्यासाठी आजारी पडली होती.राइनहार्ट म्हणाल्या,"एक दिवस या महिलेला कुठल्या तरी कठीण परिस्थितीशी सामना करावा लागला,कदाचित वाढत्या वयाशी.तिला पुढील आयुष्यातील एकटेपण दिसून येत होते.तिच्या आयुष्यात कुठलेच स्वप्न,कुठलीच आशा नव्हती." त्या पुढे सांगू लागल्या,"ती आजारी पडून अंथरूणाला खिळली आणि पुढची दहा वर्षे तिची म्हातारी आई तिची सेवा करीत राहिली.तिच्यासाठी जेवण नेऊ लागली.
एक दिवस ती वृद्ध आई थकून मरण पावली. काही महिने युवती दुःख करीत अंथरूणातच पडून राहिली.मग एक दिवस उठली, कपडे बदलले आणि तिने पुन्हा नव्याने जगायला सुरुवात केली."
अपुर्ण.. शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…!