नव्या भूमितीचे प्रणेते…
नॉन-युक्लिडियन जॉमेट्रीचा पाया घालण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या निकोलस लोबॅचेव्हस्कीचा जन्म रशियात १७९३ साली झाला.
त्याच्या आई-वडिलांनी पोलंडहून रशियात स्थलांतर केलं होतं.
लोबॅचेव्हस्कीच्या वयाच्या सातव्या वर्षीच त्याचे वडील वारले.तीन लहान मुलं पदरात असूनही लोबॅचेव्हस्कीची आई डगमगली नाही.गरिबीमुळे आपली मुलं अशिक्षित राहिली तर ते योग्य होणार नाही याची तिला कल्पना होती.तिन्ही मुलांना सुरुवातीला ती घरीच शिकवत असे.नंतर तिनं मुलांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून प्रयत्न केले. शिष्यवृत्ती मिळाल्यावर तिनं त्यांना शाळेत दाखल केलं.या सगळ्यामुळे लोबॅचेव्हस्की वयाच्या आठव्या वर्षी शाळेत गेला.त्याला लॅटिन भाषेत आणि गणितात चांगलीच गती होती.लोबॅचेव्हस्कीच्या बुद्धिमत्तेमुळे शिक्षक प्रभावित झाले.याच सुमारास रशियातल्या कझान इथे एक नवीन विद्यापीठ सुरू झालं होतं.लोबॅचेव्हस्कीला आणि त्याच्या मोठ्या भावाला तिथे प्रवेश मिळाला आणि शिष्यवृत्तीही मिळाली.लोबॅचेव्हस्की जेव्हा विद्यापीठात शिकायला होता तेव्हा तिथे पुरेसे शिक्षकच नव्हते आणि जे थोडेसे होते त्यांनाही स्वतःच्या विषयाचं फारसं ज्ञान नव्हतं.याचा परिणाम म्हणजे सुरुवातीला
प्राध्यापकांना जर्मनीतून बोलवावं लागे.असं असलं तरी थोड्या कालावधीतच हे विद्यापीठ भरभराटीला आलं. लोबॅचेव्हस्कीनं खरं तर वैद्यकीय शिक्षणासाठी या विद्यापीठात प्रवेश मिळवला होता.पण त्याला गणिताची खूपच आवड होती.
त्यामुळे त्यानं गणिताचा अभ्यासही चालू ठेवला.
कालांतरानं त्याचा गणित विभागातला सर्वश्रेष्ठ विद्यार्थी असा बहुमानही करण्यात आला.हा बहुमान मिळाल्यावर मात्र लोबॅचेव्हस्कीचा अहंकार जागृत झाला.दुसऱ्याची टिंगलटवाळी करणं, शिक्षकांना चिडवून त्रास देणं असे उद्योग तो करायला लागला.
एकदा तर वर्गात त्यानं चक्क फटाके फोडले होते.
यामुळे कंटाळून जाऊन प्राध्यापकांनी त्याच्या विरुद्ध तक्रार केली.त्याला 'सर्वश्रेष्ठ विद्यार्थी' असा जो बहमान मिळाला होता तोही त्याच्याकडून काढून घेण्यात आला.त्याला कॉलेजमधून काढून टाकावं असाही विचार सुरू झाला. पण एवढ्या बुद्धिमान मुलाला कॉलेजमधून काढू नये असं तक्रार करणाऱ्या प्राध्यापकांनाच वाटल्यामुळे त्याला कॉलेजात ठेवलं गेलं.तिथे त्याला गणित शिकवायला एम. सी. बार्टेकस नावाचे एक जर्मन गृहस्थ होते.ते गाऊसला ओळखत असत.समांतर रेषांच्या युक्लिडच्या त्या पाचव्या गृहीतकावर गाऊस विचार करतोय हे या बार्टकसनंच लोबॅचेव्हस्कीला सांगितलं.
यामुळेच याविषयीचा किडा लोबॅचेव्हस्कीच्या डोक्यात वळवळायला लागला आणि त्यानं यावर सखोल विचार करायला सुरुवात केली.यानंतर त्यानं युक्लिडचं पाचवं (सेल्फ कन्सिस्टंट) अशी नॉन-युक्लिडियन जॉमेट्री रचली.सर्वसाधारणपणे ज्या वयात मुलं पदवी शिक्षणाला सुरुवात करतात त्या वयात लोबॅचेव्हस्की चक्क एम.ए. झाला.
पण त्याच्या बेशिस्त आणि बेमुर्वतखोर वागण्याला कंटाळून जाऊन विद्यापीठानं त्याला पदवीच दिली नाही.लोबॅचेव्हस्कीनं आपल्या दुर्वर्तनाबद्दल माफी मागितली तेव्हा कुठे त्याला पदवी देण्याचा पुनर्विचार करण्यात आला.लोबॅचेव्हस्कीला विद्यापीठानं शिष्यवृत्ती दिली होती.त्यामुळे ती वाया घालवणंही शक्य नव्हतं.या सर्वांवर विद्यापीठाने एक वेगळाच पण भन्नाट असा निर्णय घेतला.त्यांना वाटलं या कुशाग्र बुद्धीच्या मुलाला वर्गात बसवून खोडकरपणा करायला वाव देण्याऐवजी त्याला प्राध्यापकच करावं,म्हणजे त्याचा वात्रटपणा कमी होऊन त्याच्या बुद्धीचा फायदाही सगळ्यांना होईल.अशा प्रकारे लोबॅचेव्हस्की वयाच्या चक्क अठराव्या वर्षी कझान विद्यापीठात प्राध्यापक बनला.आणि आश्चर्य म्हणजे जबाबदारी अंगावर पडताच लोबॅचेव्हस्कीनं आपला व्रात्यपणा सोडून देऊन अतिशय उत्कृष्टपणे काम करायला सुरुवात केली.
लोबॅचेव्हस्कीचा विद्यापीठाबरोबरचा करार सहाच वर्षांचा असला,तरी त्यानं तिथे पुढे तब्बल २२ वर्ष काम केलं! त्याची कार्यक्षमता अफाट होती.पुढे त्यानं चांगला प्रशासक म्हणूनही नाव कमावलं.१८१९ ते १८२५ या सहा वर्षात लोबॅचेव्हस्कीनं अक्षरशः ढोर मेहनत केली.वयाच्या फक्त एकविसाव्या वर्षी त्यानं कझान परिसरातल्या सगळ्या प्राथमिक,माध्यमिक शाळा आणि विद्यापीठं यांच्या आर्थिक आघाडीवरही काम केलं आणि तिथल्या मुलांची नोंद करण्याचं काम एकट्या लोबॅचेव्हस्कीनं केलं.याशिवाय लोबॅचेव्हस्कीला मुलांच्या एकंदरीत प्रगतीविषयी रिपोर्ट पाठवावे लागत.यात बहुतांशी मुलांची राजकीय मतं काय आहेत हे लोबॅचेव्हस्कीला लिहन पाठवावं लागे. वयाच्या अड्डठ्ठाविसाव्या वर्षी विद्यापीठातल्या सगळ्या वर्गांना तो गणित आणि भौतिकशास्त्र शिकवत असे. एवढं सगळं कमीच होतं म्हणून की काय पण ग्रंथपाल म्हणूनही तोच काम करे.त्यापूर्वी विद्यापीठाचं ग्रंथालय अतिशय अव्यवस्थित होतं.त्यातली पुस्तकं नीट लावण्याचं कामही लोबॅचेव्हस्कीनं एकट्यानं कोणाचीही मदत न घेता केले.एकदा एक माणूस त्याचं ग्रंथालय बघण्यासाठी आला असताना त्या वेळी लोबॅचेव्हस्की पुस्तक लावण्यात मग्न होता. त्याचे केस विस्कटलेले होते.त्याचा हा अवतार बघून त्या माणसाला लोबँचेव्हस्की ग्रंथालयातला नोकर असावा असं वाटलं.त्यामुळे त्यानं लोबॅचेव्हस्कीला चांगलं काम केल्याबद्दल बक्षिसीही दिली! कहर म्हणजे लोबॅचेव्हस्कीनं ती स्वीकारलीही। (गणिती- गणिताची आवड निर्माण करणारे एक रसिली सफर,अच्युत गोडबोले,डॉ.माधवी ठाकूरदेसाई, मनोविकास प्रकाशन)
लोबँचेव्हस्कीनं ग्रंथालयाबरोबरच विद्यापीठाचं अतिशय अस्ताव्यस्त असलेलं म्युझियमही नीट लावायला घेतलं.
ग्रंथपालाबरोबर तो म्युझियमचा क्युरेटरही झाला.१८२५ साली झार अलेक्झांडरचा मृत्यू झाल्यावर सरकारनं नवा क्युरेटर नेमला आणि लोबॅचेव्हस्कीची म्युझियमच्या कामातून सुटका झाली.लोबॅचेव्हस्कीच्या विद्यापीठात राजकारण मात्र बरंच चालत असे.त्याला कंटाळून बरेचसे जर्मन प्राध्यापक विद्यापीठ सोडून गेले.त्यामुळे लोबॅचेव्हस्कीवर खूप जबाबदाऱ्या पडल्या. त्यानं त्याही चांगल्या प्रकारे निभावल्या. त्यामुळे अगदी लहान वयातच लोबॅचेव्हस्की विद्यापीठाचा मुख्य संचालक बनला.या पदाबरोबर येणाऱ्या जबाबदारीची जाणीव लोबॅचेव्हस्कीला होती.त्यानं मन लावून काम केलं.त्याच्या कारकिर्दीत विद्यापीठ वाढलं, समृद्ध झालं आणि भरभराटीला आलं.
लोबॅचेव्हस्कीचं आपल्या विद्यापीठावर एवढं प्रेम होतं,की ज्या वेळी सरकारनं विद्यापीठाचं नूतनीकरण करायचं ठरवलं त्या वेळी लोबॅचेव्हस्कीनं स्वतः आर्किटेक्चर शिकून घेतलं आणि सगळ्या इमारतींचा आराखडा स्वतः तयार केला.त्यानं या इमारती नंतर इतक्या सुंदर बनवल्या की त्या सरकारी इमारती वाटूच नयेत ! लोबॅचेव्हस्कीनं स्वतः जातीनं लक्ष घातल्यामुळे या इमारतींना लागणारा खर्चही कमी झाला.लोबॅचेव्हस्की उत्कृष्ट व्यवस्थापक होता.१८६० मध्ये युरोपमध्ये कॉलऱ्याची साथ पसरली.सगळीकडे माणसं पटापट मरायला लागली.त्याबरोबर लोबॅचेव्हस्कीनं आपल्या विद्यापीठात आणि शहरात बाहेरच्या इतर माणसांना यायला बंदी केली. त्या काळी पुस्तकावरच्या बाइंडिंगमुळे कॉलरा पसरतो असा एक समज सर्वत्र पसरला होता.त्यामुळे त्यानं बाइंडिंग नसलेली हस्तलिखित पुस्तकं मागवली. कझान विद्यापीठाच्या वाचनालयात ती पुस्तकही निर्जंतुक केली जात असत.या सगळ्यांमुळे यूरोपभर,रशियात सगळीकडे कॉलरा पसरत असतानाही विद्यापीठ त्यातून वाचवलं.लोबॅचेव्हस्की अफाट काम करे.तो कधीही थकत नसे.
विद्यापीठातर्फे तो एक रिसर्च जर्नलही प्रकाशित करत असे.त्याचं नाव 'कझान मेसेंजर' असं होतं.युक्लिडच्या भूमितीला शह देणारी भूमिती त्यानं याच कझान मेसेंजरमध्ये १८२३-२४ मध्ये प्रकाशित केली.लोबॅचेव्हस्कीनं एक वेधशाळाही उभारली होती.एक व्लोबचेव्हस्कीकडे चांगली गुणग्राहकता होती.एकदा एका दुकानात काम करणारा माणूस गणिताचं पुस्तक वाचताना त्यानं बघितला.गणितावर प्रेम करणाऱ्या माणसाचं आयुष्य अस दुकानात काम करून फुकट जाऊ नये म्हणून त्यानं लगेच त्याला विद्यापीठात घेतलं.पुढे शिकून हा मुलगा भौतिकशास्त्राचा प्राध्यापक झाला.
मजुरांसाठी गणिताचे वर्ग घेण्याची कल्पना लोबॅचेव्हस्कीच्याच डोक्यातून आली.
ज्या मुलाला वात्रटपणाबद्दल विद्यापीठातून काढून टाकणार होते,त्याच मुलानं विद्यापीठाची एवढी भरभराट केली हे बघून संस्थाचालक अचंबित झाले! लोबॅचेव्हस्कीनं संस्थेच्या विकासासाची स्वतःला वाहून घेतल्यामुळे त्याला पुढे गणितावर संशोधन करायला वेळच मिळाला नाही.त्यानं लग्नही चाळिसाव्या वर्षी केलं.
दुर्दैवानं १८४२ च्या सुमारास विद्यापीठाला आग लागली.त्यात त्याला अभिमान वाटणाऱ्या सगळ्या इमारती जळाल्या. इतकंच नाही तर त्याची अत्यंत आवडती वेधशाळाही जळून राख झाली.पण लोबॅचेव्हस्कीचा आशावाद एवढा दुर्दम्य होता की दोन वर्षांत त्यानं विद्यापीठ पुन्हा पहिल्यासारखं उभं केलं आणि आगीचं कुठे नामोनिशाणही राहिलं नाही.याच वर्षी गाऊसमुळे लोबॅचेव्हस्कीची रॉयल सोसायटी ऑफ गॉटिंजेन इथे त्याच्या नॉन-युक्लिडियन जॉमेट्रीवरच्या कामामुळे फॉरेन करस्पाँडंट म्हणून नेमणूक झाली.अतिशय व्यस्त असून आणि प्रशासकीय आणि शिकवण्याच्या कामाचं जबरदस्त ओझं स्वतःच्या डोक्यावर असूनही गणिताच्याच नाही तर माणसाच्याच इतिहासात मैलाचा दगड ठरेल अशी भूमिती लोबॅचेव्हस्कीनं शोधली हे विशेष !
लोबॅचेव्हस्कीचं हे छाती दडपून टाकणारं काम बघून त्याला सरकारकडून वाहवा मिळाली असेल किंवा त्याच्यावर बक्षिसांची खैरात झाली असेल असं कोणालाही वाटेल. पण लोबॅचेव्हस्कीला या सगळ्या कामाचा मोबदला म्हणून सरकारकडून 'त्याची सेवा आता नकोय' असं पत्र मिळालं.याचं कोणतंही कारण त्याला सरकारकडून सांगितलं गेलं नाही.
लोबॅचेव्हस्कीसारखा माणूस मिळणार नाही,त्याला काढू नका, असं त्याच्या सहकाऱ्यांनी पदोपदी सांगूनसुद्धा लोबॅचेव्हस्कीला घरी बसवलं गेलं.हा अपमान आणि ही वंचना सहन करणं लोबॅचेव्हस्कीच्या ताकदीपलीकडचं होतं. लोबॅचेव्हस्की त्यामुळे पूर्णपणे खचून गेला. ज्या संस्थेसाठी आपण आयुष्य वेचलं त्याच संस्थेपासून आपल्याला दूर राहावं लागणं ही कल्पनाच सहन करणं त्याला शक्य झालं नाही.
सेवामुक्तीनंतर लोबॅचेव्हस्कीला विद्यापीठात फार फार तर गणिताचा अभ्यास करण्याची मुभा मिळाली.यानंतर त्याच्या आयुष्यात संकटांची मालिका सुरू झाली.हळूहळू त्याची दृष्टी अधू होत गेली.१८५५ साली कझान विद्यापीठानं सुवर्णजयंती साजरी केली.त्या वेळी झालेल्या समारंभात लोबॅचेव्हस्कीनं पँजिओमेट्री नावाचं आपलं संपूर्ण गणितावरचं एक पुस्तक सादर केलं. या वेळेपर्यंत तो पूर्णपणे आंधळा झाला होता.हे पुस्तक त्यानं दुसऱ्याकरवी लिहून घेतलं होतं.
पुढील शिल्लक राहिलेला भाग…३०.०८.२४ या दिवशीच्या लेखामध्ये…
वाचणीय नोंद:-अगदी अलीकडच्या काही वर्षांपर्यंत हुक्केरी हे एक मोठं शहर होतं. त्याच्या अंतर्गत अनेक छोटी शहरं होती.इथला महसूलही मोठा होता. शिवाय इतरही अनेक फायदे होते.इथल्या सुभेदाराला खूप सोयीसुविधा होत्या इथं. इथं सुभेदार म्हणून विजापूरच्या आदिलशहानं रूस्तुम इ जमानला नामजद केलं होतं.या भागात शिवाजीराजांच्या कुरबुरी वाढल्या होत्या. इथले काही प्रदेशही त्यांनी ताब्यात घेतले होते. अंगी असणारं धाडस आणि ते योजत असलेल्या नव नव्या युक्त्या यामुळं त्यांना सतत यश मिळत होतं.अनेक युक्त्या
प्रयुक्त्या करून ते शत्रूला बरोबर अडचणीत आणत असत.कधी गनिमीकाव्यानं तर कधी अगदी समोरासमोर हल्ला करत असत.प्रसंगी दोन पावलं मागंही जात असत.
ते आपल्या सैन्याला खूप जपत असेत विनाकारण त्यांचे प्राण संकटात टाकत नसे.कधी धूर्तपणाची खेळी करून तर कधी समोरच्या सरदाराला एखादं मोठं अमिष दाखवून ते आपला डाव साधत असत.त्यांची प्रत्येक चाल अगदी आश्चर्यकारक अशीच असे.रूस्तुम इ जमान मोठ्या सैन्यासह चालून येत असल्याच्या खबरा शिवाजीराजांना अगोदरच लागल्या होत्या.तरीही तो राज्याच्या सीमेपर्यंत येईतोवर त्यानी कोणतीही हालचाल केली नव्हती.त्याला अगदी सहज येऊ दिलं होतं. त्याच्या सैन्याला अन्न,पाणी,
घोड्यांना चारा कसलीही रसद मिळणार नाही अशा ठिकाणापर्यंत येऊ द्यायचं त्याचं धोरण होतं. अशी रसद त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही याची दक्षता शिवाजी
राजांनी घेतली होती.जेव्हा आपल्या सैन्यासह रूस्तुम इ जमान अगदी जवळ आला तेव्हा शिवाजीराजांनी आपला एक सरदार त्याच्याकडे पाठवला.या सरदारावर शिवाजीराजापाची कामगिरी सोपविली होती आणि तो रुस्तुम इ जमानचा मित्र होता.हा सरदार स्वराज्यात येण्यापूर्वी विजापूरच्या दरबारातच होता.त्याच्याकडून झालेल्या एका चुकीमुळे त्याला तिथून हाकलून लावण्यात व्याल होत.नंतर तो शिवाजीराजांच्या आश्रयाला आला होता.हा सरदार अतिशय हुशार होता, चाणाक्ष होता.अशा वाटाघाटी करण्यात त्याचा हातखंडा होता.समोरच्याला तो आपल्याला हवा तसा निर्णय घ्यायला भाग पाडत असे असा त्याचा लौकिक होता.शत्रूला बोलतं करण्यात कुणीही त्याचा हात धरू शकत नव्हता. याला त्याच्यावर सोपविलेले काम नीट समजावून देत शिवाजीराजांनी शत्रुच्या गोटात पाठवून दिले. रूस्तुम इ जमाननं त्याचं अगदी प्रेमानं आगत स्वागत केलं.त्या दोघांत बराच वेळ बोलणीही झाली.शिवाजीराजांच्या सरदारानं आपल्याला हवं ते त्याच्या गळी उतरवलं.सद्यःस्थितीत शिवाजी
राजांवर विजय मिळवणं अतिशय कठीण आहे याचं भान ठेवून रूस्तुम इ जमाननं त्याच्याकडून आलेली ३०००० पॅगोडा ची भलीभक्कम रक्कम भेट म्हणून स्वीकारली आणि आपलं सैन्य मागं घेतलं.खरं तर अतिशय चातुर्यानं हा निर्णय घ्यायला त्याला भाग पाडण्यात आलं होतं. (५ मे १६६० च्या एका डच पत्रानुसार आपलं सैन्य मागं घेण्यासाठी रूस्तुमजमाननं शिवाजीराजांकडून ४०००० पॅगोडाची लाच घेतल्याचा उल्लेख आहे.) परंतु ही गोष्ट विजापूरच्या अदिलशहापासून फार दिवस लपून राहिली नाही.त्यानं रूस्तुम इ जमानला विजापुरच्या दरबारात बोलावून घेतलं आणि त्याचा शिरच्छेद केला.या सगळ्या घडामोडीत रूस्तुम इ जमानच्या मुलाचा हात नसल्याची खात्री पटल्यावर अदिलशहाने हुक्केरीचा सरदार म्हणून त्याची नियुक्ती केली. पण त्याच्या अधिकारावर मात्र मर्यादा घालण्यात आली रूस्तुम इ जमानकडे असणारे महसूल वसुलीचे आणि इतर महत्त्वाचे अधिकार बादशहानं काढून घेतले होते.यानंतर त्यानं दुसरा एक सरदार मोठ्या सैन्यासह शिवाजीराजांवर पाठवून दिला.शिवाजीशी लढाई करण्यासाठी त्याला सर्व त्या सुविधा पुरविल्या होत्या.
वाचता.. वाचता.. वेचलेले !!