न्यूयॉर्कच्या ब्रूक्लीन प्रांतातल्या झोपडपट्टीत मायकेल जॉर्डनचा जन्म झाला त्याला चार बहिणी होत्या आणि त्यांच्या वडिलांची कमाई संपूर्ण कुटुंबासाठी पुरेशी नव्हती.त्यांचे शेजारी पण खूप गरीब होते.तिथल्या वातावरणात मायकेल जॉर्डनला त्याचे भविष्य अंध:कारमय दिसत होते.आत्मचिंतनात हरवलेल्या मायकेलला त्याच्या वडिलांनी पाहिले आणि त्यांनी त्याच्यासाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला.१३ वर्षाच्या जॉर्डनला वडिलांनी वापरलेल्या जुना एक कपडा दिला आणि त्याला विचारले "हा कपडा किती किमतीचा असेल?"
जॉर्डन उत्तरला असेल १ डॉलरचा वडील म्हणाले,याला तू कुणाला तरी २ डॉलरला विकू शकशील का?"
हा जर २ डॉलरला विकलास तर आपल्या कुटुंबासाठी ती खूप मोठी मदत होईल.जॉर्डनने डोके खाजवले आणि म्हणाला,मी प्रयत्न करतो पण यशाची खात्री देऊ शकत नाही.जॉर्डनने कपडा स्वछ धुतला,उन्हात वाळवला.
त्याच्याकडे इस्त्री नव्हती,म्हणून त्याने तो कपडा अंथरुणाखाली ठेवला.दुसऱ्या दिवशी एका गर्दीच्या ठिकाणी कपडा विकायला घेऊन गेला.५-६ तासांच्या प्रतीक्षेनंतर एका गिर्हाईकाने तो कपडा जॉर्डन कडून २ डॉलरला विकत घेतला.जॉर्डन आनंदाने धावतच घरी आला. १० -१२ दिवसांनंतर त्याचे वडील म्हणाले, जे कापड तू २ डॉलरला विकलेस त्याला १० डॉलर किम्मत येईल का रे?"
जॉर्डन म्हणाला कसं शक्य आहे? २ डॉलर मिळताना नाकी नऊ आले.वडील म्हणाले प्रयत्न तरी करून बघ.खूप वेळ विचार केल्यानंतर जॉर्डनला आयडिया सुचली.त्याने त्याच्या चुलत भावाच्या मदतीने जुन्या धुतलेल्या कापडावर डोनाल्ड डक आणि मिकी माउस ची चित्रे रंगवली,आणि ज्या शाळेत श्रीमंत मुलं शिकतात अशा शाळेच्या बाहेर शाळा सुटण्याच्या वेळेत जाऊन कपडा विकायला उभा राहिला.
एका मुलाला ती चित्रे असलेला कपडा खूप आवडला.
त्याने आई जवळ कडून हट्ट करून तो कपडा जॉर्डन कडून १० डॉलरला विकत घेतला. शिवाय आईने जॉर्डनचे कौतुक केले आणि अजून १० डॉलर त्याला टीप दिली.
२० डॉलर ही मोठी रक्कम होती,जवळ जवळ त्याच्या वडिलांच्या महिन्याच्या पगारा इतकी.जेंव्हा जॉर्डनने वडिलांना २० डॉलर दिले आणि ते त्याला कसे मिळाले याची कहाणी सांगितली तेंव्हा वडील आनंदले आणि अजून एक वापरलेला कापडा त्यांनी जॉर्डनला दिला आणि म्हणाले, हा कपडा तू २०० डॉलरला विकू शकशील का?आता यावेळी जॉर्डनने वडिलांचे चॅलेंज कुठलेही आढेवेढे न घेता आत्मविश्वासाने स्वीकारले. २-३ महिन्यानंतर सुप्रसिद्द चित्रपट "Charlie's Angels" ची नायिका Farah Fawcett न्यूयॉर्क मध्ये तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली.प्रेस कॉन्फरन्स नंतर जॉर्डन सुरक्षारक्षकां मार्फततिच्यापर्यंत पोहोचला आणि त्याने तिला कापडावर सही करण्यासाठी विनंती केली.
त्याचा निरपराध चेहरा पाहून तिने लगेचच कापडावर सही केली.आता जॉर्डन मोठमोठ्याने ओरडू लागला, "Miss Farah Fawcett ने सही केलेले कापड घ्या, Miss Farah Fawcett ने सही केलेले कापड घ्या.थोड्याच वेळात ते कापड त्याने ३०० डॉलरला विकलं.तो जेंव्हा घरी आला आणि सर्व हकीकत वडिलांना सांगितली आणि ३००डॉलर त्यांच्या हातात दिले,तेंव्हा वडिलांच्या डोळ्यात अश्रू आले.ते म्हणाले,मला तुझा अभिमान आहे,तू करून दाखवलस.
रात्री जेंव्हा जॉर्डन वडिलांच्या शेजारी झोपला तेंव्हा वडिलांनी जॉर्डनला विचारले,"बाळा,तीन जुने कपडे विकण्याच्या अनुभवातून तू काय शिकलास? जॉर्डन म्हणाला,जिथे प्रबळ इच्छा असेल तिथे मार्ग नक्की दिसतो.वडिलांनी त्याला घट्ट जवळ घेतले आणि म्हणाले,तू जे सांगतोस ते काही चूक नाही,पण माझा हेतू वेगळा होता.मला तुला दाखवून द्यायचं होतं की,ज्या जुन्या कपड्याची किंमत १ डॉलर सुद्धा नाही त्याची किंमत आपण वाढवू शकतो,तर बोलणाऱ्या,
चालणाऱ्या,विचार करणाऱ्या माणसांचं काय?
आपण काळे सावळे असू किंवा गरीब असू, आपली किंमत पण वाढू शकते.वडिलांच्या या वाक्याने जॉर्डन खूपच प्रभावित झाला.वापरलेल्या जुन्या कापडाला जर मी प्रतिष्ठा देऊ शकतो,तर स्वतःला का नाही? स्वतःला कमी पणा घेण्यात काहीच हित नाही.
त्यानंतर जॉर्डनला वाटू लागलं, की माझं भविष्य खूप सुंदर आणि उज्वल असेल.काही वर्षांनी मायकेल जॉर्डन उत्कृष्ट बास्केटबॉल खेळाडू बनला.
भेट एका वाढदिवसाची...
मी सुचेता.आज माझा वाढदिवस.सचिन सकाळीच म्हणाला,"आज काही करू नकोस,मी लंचला बाहेर घेऊन जातोय तुला एक वेगळीच ट्रीट आहे."लग्नाला दहा वर्षे झालीत,सचिनला मी चांगलीच ओळखते.काहीतरी जगावेगळे अनुभव देण्यात किंवा मजेशीर प्रसंग उभे करण्यात तो माहीर होता.मुले चार वाजल्यानंतर शाळेतून येणार म्हणजे आमची लंच फक्त दोघांचीच असणार होती.दोघेही बारा वाजता बाहेर पडलो.सचिनने गाडी भरधाव सोडली होती.मध्येच विचारात मग्न झाला की गाडी स्लो होत होती.मी मनात समजून गेले की हा आज एक वेगळाच अनुभव किंवा रोमांचक प्रसंग घडवणार.
गाडी एका नवीन मॉलच्या पार्कींग मधे उभी करून आम्ही लिफ्टमधे शिरलो.सचिनने पाचव्या मजल्याचे बटण दाबलेले मी पाहीले.एकदम वरचा मजला.. तिथे तर मल्टीप्लेक्स असणार,क्वीक बाईट्सचे स्टॉल असणार.तिथे काय वाढदिवस करायचा..
एवढ्यात पाचवा मजला आला.खाण्यापिण्याचे वेगवेगळे स्टॉल दोन्ही बाजूनी सजले होते.सचिन कुठेही न पहाता भरभर चालत होता.शेवटी एका बंद दारासमोर आलो वर पाटी होती,
"Dialogue in the dark" आश्चर्यात पडले.
अंधारातील संभाषण ?
खाण्याच्या स्टॉलचे नाव विचित्र वाटले.दार उघडून आत गेलो तर फक्त एक काऊंटर व त्या मागे टाय सूट मधला एक माणूस.टेबल खुर्च्या वगेरे कांहीच दिसत नव्हते आम्हाला पहाताच तो लगबगीने पुढे आला, "वेलकम सचिन सर,हॅप्पी बर्थ डे टू यू मॅडम" याचा अर्थ सचिन अगोदरच याला भेटून सर्व ठरवून आला होता. "सर,मॅडम यु आर अवर स्पेशल गेस्टस टुडे काय घेणार ते ठरवा." त्याने काऊंटर वर नेत आमच्या समोर मेनू कार्ड ठेवले.
सचिनने ते माझ्याकडे सरकवले.मी गोंधळले होते.टेबलवर बसण्या आधीच ऑर्डर द्यायची प्रथा पहिल्यांदाच अनुभवत होते.काहीतरी विचित्र वाटत होते.हसऱ्या मुद्रेने सचिन माझी मजा पहात होता.मी ऑर्डर दिली आणि तो माणूस आम्हाला घेऊन निघाला.
एक दरवाजा उघडला समोर एक छोटासा बोळकंडी सारखा रस्ता दिसला. दोघे किंवा तिघेच जातील एवढाच रुंद.आम्ही त्याच्या मागोमाग निघालो.पहिले वळण आले आणि बाहेरून येणारा उजेड खूपच कमी झाला.त्या पॅसेजमधे दिवे अजिबात नव्हते.आणखी एक दोन वळणांनंतर अंधार खूपच वाढला.मी सचिनचा हात घट्ट पकडून दुसऱ्या हाताने भिंतीला स्पर्शत चाचपडत चालले होते.सचिन माझ्या हातावर थोपटत मला धीर देत होता.
पुढच्या वळणानंतर डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही असा मिट्ट काळोख होता पण हवा मोकळी व थंड येवू लागली होती.बहुदा आम्ही एका हॉलमध्ये पोचलो होतो.
"संपत" त्या माणसाने हाक मारली.
"येस सर," अंधारातच उत्तर आले.कुणीतरी जवळ आल्याची चाहूल लागली.
"हे आपले आजचे स्पेशल गेस्ट,मॅडमचा बर्थडे आहे. गीव्ह देम स्पेशल ट्रीट.ऑर्डर मी घेतलीच आहे.त्याना टेबलवर ने."
"येस सर,"अंधारातच आवाज आला.आता संपत आमचे हात धरून त्या अंधारातून नेत होता.खुर्ची ओढल्याचा आवाज आला त्याने माझा हात खुर्चीच्या पाठीवर ठेवला.तसाच सचिनचाही ठेवला असावा.आम्ही बसलो.मी समोरच्या टेबलवर हात फिरवून अंदाज घेतला.या मिट्ट काळोखात जेवण दिसणार कसे आम्ही जेवणार कसे ही कसली सचिनची जगावेगळी पार्टी असे कितीतरी प्रश्नांचे काहूर मनात उठले होते.असा कधी बर्थडे असतो का?पण त्याच्यावर माझा विश्वास होता.
काहीतरी निश्चित वेगळेपणा जाणवणार व मला अतिशय आश्चर्यात तो टाकणार याची खात्री वाटत होती.
पुढ्यात प्लेटस् मांडल्याचे आवाजावरून समजले.वेटर्सचे येणे जाणे चाहुलीने समजत होते.संपतने हात पकडून दोन्ही डिश कुठे आहेत ते दाखवले.चमचा हातात दिला.
एवढ्यात मागवलेले पदार्थ आल्याचे त्यांच्या घमघमाटाने माहीत पडले."वाढतो" म्हणत संपत एक एक पदार्थ डिश मधे वाढू लागला.सर्व झाल्यावर म्हणाला "मी वाढले आहे.आपल्याला कांही दिसणार नाही पण वास आणि स्पर्शाचा उपयोग करून जेवायची एक वेगळीच मजा येईल व तुम्हाला आनंद देईल याची खात्री देतो."त्या अंधारात मी चाचपडत रोटी तोडली,अंदाजाने एका भाजीत हात घातला पहिला घास तोंडात गेला.मग चार पाच घास असेच अंदाज घेण्यात गेले.डाव्या हाताने मी प्लेट पकडली होती. त्यामुळे प्रत्येक पदार्थाची जागा उजव्या हाताला समजू लागली होती.आणि अहो आश्चर्यम् आता त्या अंधारात देखील जेवण मी सहज जेवू शकत होते. हा आगळा अनुभव पदार्थांची मजा तर देतच होता पण या खेळाचा आगळा आनंद आम्ही दोघे पुरेपूर अनुभवत होतो.सचिन कोणत्या पदार्थाचा घास घेतोय हे मी विचारले की तोही विचारायचा.केव्हा आमचे उत्तर एकच असायचे केव्हा वेगळे असायचे हा खेळ खरच जाम मजा देत होता.त्या मिट्ट काळोखात स्पर्श, वास आणि आवाज हेच काम करत होते. मधुनच संपत भाज्या वाढत होता.आम्हाला त्या संपल्या की आहेत हे समजत नव्हते पण त्याला दिव्य दृष्टी असल्या सारखा तो आमची बडदास्त ठेवत होता,शेवटी स्वीटडिश आली ती मात्र त्याने आमच्या हातात दिली.माझा वाढदिवस, अंधारातील जेवणाचा,तो ही मजा देऊन गेला. कदाचित कँडल लाईट डिनर पेक्षाही मजा आली होती."आपण जाणार असाल तेव्हा सांगा,मी आपल्याला बाहेर घेऊन जाईन."संपतने सांगीतले तसा सचिन म्हणाला,"अरे बिल तर बाहेरच द्यावे लागणार,चल निघू आपण."
संपतने माझी खुर्ची हळुवार सरकवली.माझा हात पकडला.तसाच सचिनचाही पकडला असावा.तो आम्हाला घेऊन सराईता सारखा तो काळोख कापत बाहेर निघाला.पॅसेजमधे आल्याचे सहज समजले.हात आपोआप पॅसेजच्या भिंतीवर गेला.दोन वळणानंतर अंधुक प्रकाश दिसू लागला आणि संपतचा हात सोडून आता आम्ही चालू शकत होतो.
काउंटरच्या दालनात पोचलो.सचिन बिल देण्यासाठी गेला.आमची काळजी घेणाऱ्या संपतचे आभार मानण्या साठी पाठमोऱ्या संपतला मी हाक मारली.संपत वळला. त्याच्याकडे पहाताच मी जागच्या जागीच थिजले.
संपतच्या डोळ्यांच्या जागी फक्त खाचा होत्या.तो ठार आंधळा होता.
"येस मॅडम,"काय बोलू तेच समजेना.पण सहानभूतीने भरलेले शब्द निघालेच, "संपत या स्थितीतही तू छान आदरातिथ्य केलेस.कायम लक्षात राहील." मॅडम तुम्ही जो अंधार आज अनुभवलात तो आम्हाला रोजचाच आहे. पण आम्ही त्याच्यावर विजय मिळवलाय.
We are not disabled,we are differently able people.We can lead our life without any problem with all joy and happiness as you enjoy."
आम्ही अपंग नाही,आम्ही वेगळे असे सक्षम लोक आहोत.आम्ही आमचे जीवन कोणत्याही समस्येशिवाय सर्व आनंदाने आणि आनंदात जगू शकतो जसे तुम्ही आनंद घेत आहात."
माझ्या सहानुभूतीने भरलेल्या बोलण्याची मलाच लाज वाटली.सहानभुतीची गरज नसलेला एक सशक्त माणूस मला सचिनने भेटवला होता. असा वाढदिवस होणे नाही.सचिन तुझा मला अभिमान वाटतो.सचिन बिल देऊन माझ्याकडे आला.बिल माझ्या हातात दिले.नेहमी सचिनच्या खर्चावर पाळत ठेवणारी मी बिल पहायला गेले तो तळटिपेवर लक्ष गेले.
We do not accept tips, Please think of donating your eyes, which will bring light to somebody's life.
आम्ही टिप्स स्वीकारत नाही,कृपया तुमचे डोळे दान करण्याचा विचार करा,ज्यामुळे कोणाच्या तरी आयुष्यात प्रकाश येईल.
एका इंग्लीश मेसेजचा स्वैर अनुवाद आहे.
लेखक - अनामिक
वाचता..वाचता..वेचलेले