* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

9/17/26

चिंतेच्या मुळापाशी /At the Root of Anxiety.

मूळ लेखक: डॉ. रवींद्र श्रावस्ती

मूळ पुस्तक: आदिम दुःखाचे मुक्तिस्थानक हॉस्पिटल
प्रकाशक: नाग-नालंदा प्रकाशन
प्रकाशक: त्र्यंबकेश्वर मिरजकर

पुरुषप्रधान समाजव्यवस्थेमध्ये पुरुष वैद्यकीय वार्डमध्ये त्यांची संख्या भरपूर असणे, त्यांना भरपूर संख्येने अ‍ॅडमिट करणे नवल नाही. काही खुट्ट झाले तर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आणणे प्राधान्यक्रमाचे असणारच. उपलब्ध मनुष्यबळ आणि पैसा त्यांच्यावरच खर्च होणार, हे ओघाने आलेच.

यानिमित्ताने आणखी काही गोष्टी नोंदवता येतील. आजारी पुरुषांच्या सेवाशुश्रूषेला पुरुष माणसांची संख्या नगण्य. पण महिलांची संख्या मात्र लक्षणीय. पेशंटला धरणे, उचलणे, फिरविणे ही कामे पुरुष नातेवाईक करताना दिसतात. घास भरवणे, जखमांना मलम लावणे, ड्रेसिंग करणे, अंग चोळणे, हॉस्पिटलमध्ये स्वयंपाक करणे, येणाऱ्या-जाणाऱ्यांचे बघणे, रुग्णाचा आजार, त्यातील घडामोडी नातेवाईकांना कथन करणे, रुग्णांना सोबत करणे आदी कामे स्त्रियाच करताना दिसतात. त्याबाबत त्या कंटाळा किंवा टाळाटाळ कधीच करत नाहीत, मीच 'ती' कामे करते असा डांगोराही पिटत नाहीत. ही कामे घाण आहेत, त्यापासून दूर राहावे असे त्यांच्या मनाला वाटत नाही, पटतही नाही. उलट 'अशी सेवा' करणे हे आपले कर्तव्य आहे व त्यातच पुण्य आहे अशीच त्यांची भावना असते.

मूल असेल तर आई, नवरा रुग्ण असेल तर त्याची बायको किंवा आई वा बहीण, सासरा असेल तर सासू किंवा सून नावाच्या नात्याची बाईच सेवेला असते. या सेवा ताफ्यात लेक, बहीण नावाची स्त्रीही सामील असतेच.

पुरुष एक-दोन दिवस दवाखान्यात राहतील. त्यापेक्षा जास्त नाही. पण स्त्रिया मात्र अ‍ॅडमिट केल्यापासून डिस्चार्ज देईपर्यंत किंवा मृत्यूपर्यंत दवाखान्यातच राहून सेवाशुश्रूषा करताना दिसतात.

बरे, मेल मेडिकल वार्डमध्ये स्त्रियांसाठी काही वेगळ्या सुविधा असतात, असेही नाही. मासिक पाळीच्या वेळी वार्डात काय हालत होत असेल तिची. बाथरूम, संडास, चेंजिंग रूम काहीच वेगळे नसते. पुरुष जे संडास-बाथरूम वापरतील तेच स्त्रियांना वापरावे लागते. रात्री-अपरात्री याठिकाणी विनयभंग व बलात्काराच्या तुरळक घटना घडतात. त्याशिवाय सतत भीतीच्या असुरक्षिततेच्या वातावरणात राहणे, तिथेच साडी वगैरे बदलणे, कंगवाफणी करणे. लज्जा येईल; असुरक्षित वाटेल असेच आजूबाजूचे वातावरण. त्याचा एक विलक्षण ताण असतोच. अंघोळपाणी, सकाळचे प्रातर्विधी त्यांना सार्वजनिक जागी, अंधाऱ्या जागी शक्यतो रात्री करावे लागतात. थोडा विचार करा परक्या पुरुषांचा जिथे दिवसरात्र वावर आहे, तिथे या साऱ्या गोष्टी करताना स्त्रियांना कसे होत असेल? प्रसंगी काय काय दिव्यातून जावे लागत असेल?

सकाळचा स्वतःचा प्रातर्विधी, अंघोळपाणी, वेणीफणी, जेवणाखाण्याची तयारी, रुग्णाची स्वच्छता, देखभाल यासाठी लवकर उठावेच लागते. पेशंटच्या बेडजवळच झोपावे लागते. जनरल वार्डात रात्री पेशंट येतात. इतर रुग्ण मध्येच सिरिअस होतात. सारा वार्ड जागाच असतो. अशा वातावरणात झोप घेणे, किती झोप मिळणार?

सर्व काम करून झाल्यावर थोडे अन्न स्वतःच्या पोटात ढकलणे. अन्न थोडेच जाते. त्यातच स्वभावाने त्या भावनाशील. आपला नातेवाईक गंभीर आजारी आहे. त्याने काहीच अन्न खाल्ले नाही, थोडेच खाल्लेय. मग त्याही आपली तहान-भूक चहा-कॉफी किंवा पाण्यावरच भागवतात. त्यामुळे दवाखान्यातच त्या आजारी पडतात. दवाखान्यात असूनही तेथील वैद्यकीय सुविधांचा वापर त्या स्वतःसाठी कमी प्रमाणात करताना दिसतात.

'ह्यांचे अगोदर होऊ दे. मग माझे बघू'

असे वाक्य त्यांच्या तोंडून ऐकायला मिळते. एखादी पित्ताची Gelucil, Rantac किंवा तापाची Crocin वगैरे गोळी मागून त्या आपले आजारपण आटोपते घेतात. दुधाची तहान पाण्यावर भागवल्यासारखे, असो.


पुरुष, त्यांचे आजार आणि हॉस्पिटलमधला 'स्टे'

आता पुरुष, त्यांचे आजार, त्यांचा खर्च, हॉस्पिटलमधला त्यांचा 'स्टे' याबाबत घोडे.

पुरुषांमध्ये व्यसनाधीनता अधिक आहे. दारू पिणे हे त्यातले सर्वाधिक व्यसन, त्यामुळे दारूच्या अतिरेकाने कोमात जाणे, झटके येणे, दारूबरोबर इतर व्यसने करणे (उदा. अफू, गांजा) त्यांच्या आत्यंतिक सेवनामुळेही बेशुद्ध पडणे, झटके येणे. त्यातच मृत्यू येणे असले प्रकार घडतात. दारूच्या नशेत बाहेरख्यालीपणा वाढतो. वेश्यागमन असते. त्यामुळे गनोरिया, एड्ससारखे आजार होतात. दारूच्या नशेत अपघाताच्या घटना घडतात. स्वतःच्या जीवाबरोबर दुसऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होतो. त्यामुळे फ्रॅक्चर होणे, विविध अवयवांना इजा पोहोचून रक्तस्राव होणे; मेंदू, मज्जारज्जू, मणके यांना गंभीर आजार होऊन पॅरालिसिस होणे, शुद्ध हरपणे; मेंदूत रक्तस्राव होऊन कोमात जाणे, हातपाय लोळागोळा होणे या गोष्टी घडतात.

व्यसनांमुळे मानसिक आजार जडतात. अस्वस्थपणा, नैराश्य, संशयी स्वभाव, समाजविघातक वागणूक यामुळे शत्रुत्व वाढते. प्रचंड अस्वस्थलेपण व नैराश्य यामुळे आत्महत्या करण्याचे विचार मनात बळावतात. त्यासाठीचे मार्ग शोधले जातात. त्यात गळफास लावून घेण्यापासून विविध विषांचे प्राशन करण्यापर्यंतचे अनेक प्रयत्न केले जातात. त्यामुळे मेल वार्डामध्ये वारेमाप दारू पिलेले, विष पिऊन पडलेले, गळफास लावून घेतलेले, अपघात करून घेतलेले, इतर औषधांचा वापर करून आत्महत्येचा प्रयत्न केलेले लोक अ‍ॅडमिट होतात. दारूचा दुष्परिणाम होऊन कावीळ होणे, लिव्हर खराब होणे, रक्तस्राव होणे, लकवा मारणे, हृदयरोग यांचे प्रमाण वाढते.

दारूच्या व्यापारातून शासनाला कर मिळतो. तीच दारू लोक पितात; आजारी होऊन शासकीय रुग्णालयात औषधोपचारासाठी येतात. सरकारला त्यांच्या औषधोपचारावर पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागतो. लोकांच्या, सरकारच्या पैशाचा असा चुराडा होतो.

याच दारूमुळे गुन्हेगारी, वेश्यागमन आदी गोष्टी आल्याच. लिंगविषयक आजार आलेच.

दारूच्या व्यसनाखालोखाल तंबाखूचे व्यसन सर्वाधिक आहे. तंबाखूमुळे हृदयरोग, रक्तदाब, लकवा मारणे, फुफ्फुसाचे विकार, कॅन्सर आदी रोग होतात. याही आजारावर शासन, समाज यांचाच पैसा वाया जातो.

तरुणपिढी यात बरबाद होते ही त्यातली घातक बाब होय. रोगट (शारीरिक, मानसिक) तरुण पिढी देशाच्या विकासात काय भर घालेल?


आता खर्चाविषयी

असे दिसून येते की, मुलींपेक्षा मुलांना, स्त्रियांपेक्षा पुरुषांना रोगाच्या निदान-उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये तत्परतेने अ‍ॅडमिट केले जाते. पुरुषांना अ‍ॅडमिट करा म्हटले की तुलनेने जास्त लवकर होकार दिला जातो. मुलांना लवकर अ‍ॅडमिट केले जाते. त्यामानाने मुलींना, स्त्रियांना गंभीर अवस्था झाल्याशिवाय अ‍ॅडमिट केले जात नाही. पुरुष रुग्णांच्या पटपट तपासण्या केल्या जातात. महागड्या तपासण्या करतानाही फारशी खळखळ केली जात नाही. प्रसंगी कर्ज काढले जाते. पण उपचार केला जातो.


हॉस्पिटल स्टे

हॉस्पिटल स्टेबाबतः पुरुषांचा हॉस्पिटल स्टे (राहण्याचा काळ) भरपूर दिवस असला तर सहन केला जातो. लवकर डिस्चार्ज द्या म्हणून विनंती केली जात नाही, तशी कटकट नसते. ट्रीटमेंट ऑप्शनबाबत पर्याय विचारले जात नाहीत. कोणत्याही महागड्या ट्रीटमेंटबाबत ताबडतोब होकार दिला जातो.

पुरुष रुग्ण महिनोन्महिने हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट राहिले तरी चालतात. यामागे Gender bias आहेच. त्याचबरोबर आणखी एका दुर्लक्षित बाबीकडे मला लक्ष वेधायचे आहे. रुग्ण सेवेसाठी गरज असते हॉस्पिटलमध्ये राहू शकणाऱ्या व्यक्तीची. पडेल ते काम करू शकेल, भावनिक ताण सहन करूनही सेवा देऊ शकेल अशी व्यक्ती. प्रत्येक घरात कुणी ना कुणी तरी अशी एखादी 'उपयुक्त', 'शहीद' स्त्री असतेच. तिचा होकार असो वा नसो; इच्छा असो वा नसो तिला या गोष्टीसाठी अपॉईंट केले जातेच. स्वतःचाच नैतिक दबाव, पुरुषी दबाव, स्त्री संस्कारांतून आलेली सेवाभावी वृत्ती, तसली भावनिक गुंतणूक यामुळे स्त्रिया हॉस्पिटलमध्ये रहावयास लवकर तयार होतात. मुळातली सोशीकवृत्ती (पारंपरिक स्त्री संस्कारातून आलेली), त्यागीवृत्ती सोबतीला असतेच. हॉस्पिटलच्या रोगट, अस्वच्छ, अस्वस्थ, असुरक्षित, गैरसोयीच्या वातावरणात स्त्रियांनाच ढकलले जाते; बळी दिले जाते. प्रत्येक कुटुंबात अशी आजारपणातील सेवाशुश्रूषेसाठी एखादी स्त्री 'अलॉट' केलेली असतेच. रिझर्व्ह फिमेल फोर्स!


पुरुषी मानसिकता आणि आरोग्य

पुरुषांमध्ये नैसर्गिक आजारापेक्षा 'मॅन मेड' आजार भरपूर आहेत. व्यसनाधीनता, बाहेरख्यालीपणा, तथाकथित 'पुरुषी'पणाच्या नावाखाली हाय रिस्क बिहेविअरमुळे अपघात व लैंगिक आजार यांचे प्रमाण पुरुषांमध्ये जास्त आहे.

भावनिक बुद्ध्यंक उच्छृंखलतेकडे झुकणारा असल्यामुळे भावनिक आंदोलनात अप्स अँड डाऊन्स भरपूर असतात. पुरुषी आकांक्षेचे संस्कारित बाळकडू, प्रत्येक पातळीवर पुरुष म्हणून प्राधान्य, लाड, चोचले यांची बरसात यामुळे बेधडकपणा, आक्रमकता, अपघाती वृत्ती; त्यातून येणारे अस्वस्थलेपण, नैराश्य यांना पुरुषी वृत्ती बळी पडते. त्यातूनच व्यसनाधीनता वाढते. मानसिक, शारीरिक रोगटपणा वाढतो. आत्महत्या करण्याच्या प्रवृत्तींना खतपाणी मिळते. आत्महत्येचे मार्ग चोखाळले जातात.

आत्महत्या करण्याचे मार्गही 'पुरुषीच' असतात. चालत्या वाहनाखाली वा धावत्या रेल्वेखाली उडी घेणे, गळफास लावून घेणे, नदीत-विहिरीत उडी मारून आत्महत्या करणे. त्याखालोखाल विष पिणे (शेतकरी असेल तर कीटकनाशक घेऊन), झोपेच्या गोळ्यांचे अतिसेवन, दारूचे अतिरेकी सेवन याद्वारे मृत्यूला कवटाळले जाते.


मुलगा आणि मुलगी : वेगवेगळे मापदंड

भारतीय आईवडील पुरुष लिंगालाच महत्त्व देत असल्यामुळे घरात मुलगा व मुलगी यांच्याबाबत कायम वेगवेगळे मापदंड असतात. मुलांचे भरपूर लाड, साधनांची तत्पर देवाणघेवाण, चुकांवर पांघरूण असले प्रकार असतात. 'मर्दानगी'चे संस्कार वडील, चुलते, आजोबा यांच्याकडून कळत-नकळत मिळतच असतात.

'मुलीसारखा काय रडतोस? तू काय बांगड्या भरलायस काय? अंगात नॅट असंल तर करून दाव' असले 'मर्दानगी' जागवणारे संस्कार पदोपदी मिळत असतात. मुलाने काही 'मर्दानगी'च्या चुका केल्याच तर त्याकडे एकतर कानाडोळा केला जातो किंवा सौम्य शिक्षा देऊन, जुजबी समज देऊन प्रकरण मिटविले जाते. काही वेळा अप्रत्यक्षपणे सदर गोष्टींना प्रोत्साहनही दिले जाते.

तर वरील 'मॅनमेड' आजारांबरोबर हृदयरोग, लठ्ठपणा, मधुमेह, फुफ्फुसाचे आजार, कॅन्सर (तंबाखू, विडी), पोटाचे, यकृताचे विकार, कॅन्सर (दारू), आतड्याचे, मुखाचे कॅन्सर (तंबाखू, दारू), लिंगविषयक आजार हेही पुरुषांमध्ये आहेतच.

आपण पुरुषी मानसिकतेचे संवर्धन करतोय. त्यातून अनेक 'मेल जेंडर स्पेसिफिक' आजारांना आमंत्रण देतोय, हे कधी कळणार आम्हांला?


भाग समाप्त — चिंतेच्या मुळापाशी

संपादकीय तथ्यपडताळणी

मूळ लेखातील भूमिका आणि निरीक्षणे स्वतंत्र ठेवून खालील प्रमुख दाव्यांची पडताळणी केली आहे.

१. महिलांना आरोग्यसेवेत पुरुषांच्या तुलनेत कमी प्रवेश मिळतो का?

निष्कर्ष: अंशतः बरोबर

भारतातील संशोधनात काही आरोग्यस्थितींमध्ये महिलांचा रुग्णालयीन वापर, हॉस्पिटलमधील मुक्काम आणि आरोग्यखर्चाचा वाटा पुरुषांपेक्षा कमी आढळला आहे. त्यामुळे लेखातील लिंगाधारित आरोग्य-असमानतेचा मुख्य मुद्दा उपलब्ध संशोधनाशी सुसंगत आहे.

मात्र प्रत्येक रुग्णालयात, प्रत्येक कुटुंबात किंवा प्रत्येक आजारात हाच नमुना आढळतो असे म्हणता येत नाही.

२. महिलांवर रुग्णसेवेची जबाबदारी अधिक पडते का?

निष्कर्ष: अंशतः बरोबर

भारतासह अनेक समाजांमध्ये unpaid caregiving म्हणजे विनामोबदला रुग्णसेवा आणि कुटुंबीयांची काळजी घेण्याचे काम महिलांवर अधिक पडते, असे सामाजिक संशोधन दर्शवते.

मात्र “प्रत्येक कुटुंबात अशी एक स्त्री असतेच” हे लेखकाचे सामाजिक निरीक्षण आहे; त्याला सार्वत्रिक सांख्यिकीय तथ्य म्हणता येत नाही.

३. पुरुषांमध्ये दारूच्या सेवनामुळे आरोग्यधोके अधिक असतात का?

निष्कर्ष: निश्चित

दारूचे सेवन यकृताचे आजार, काही कर्करोग, हृदयरोग, मानसिक आरोग्याच्या समस्या आणि अपघातांसह अनेक आरोग्यधोक्यांशी संबंधित आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार दारूमुळे होणाऱ्या मृत्यूंचा भार पुरुषांमध्ये महिलांपेक्षा मोठा आहे.

४. तंबाखूमुळे गंभीर आजार आणि आर्थिक भार निर्माण होतो का?

निष्कर्ष: निश्चित

तंबाखू सेवनाचा संबंध हृदयरोग, स्ट्रोक, फुफ्फुसांचे आजार आणि विविध कर्करोगांशी आहे. भारतात तंबाखूमुळे होणाऱ्या आजार आणि अकाली मृत्यूंचा आर्थिक भार मोठा असल्याचे WHO च्या अभ्यासातून दिसते.

५. पुरुषांमध्ये व्यसन, अपघात आणि उच्च-जोखीम वर्तन अधिक आहे का?

निष्कर्ष: अंशतः बरोबर

दारू आणि काही इतर व्यसनांचा वापर पुरुषांमध्ये अधिक असल्याचे अनेक अभ्यासांत दिसते. त्याचबरोबर अपघात आणि काही उच्च-जोखीम वर्तनांमध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक असू शकते.

मात्र “पुरुषी मानसिकता हीच या आजारांची थेट कारणीभूत आहे” असा वैज्ञानिक कारण-परिणामाचा सरळ निष्कर्ष उपलब्ध पुराव्यांवरून काढता येत नाही.

६. पुरुषांच्या आरोग्यावर महिलांपेक्षा अधिक खर्च होतो का?

निष्कर्ष: अंशतः बरोबर

भारतातील काही अभ्यासांमध्ये पुरुष आणि महिलांच्या आरोग्यखर्चात लिंगभेद आढळतो आणि काही परिस्थितींमध्ये पुरुषांच्या आरोग्यावर अधिक खर्च झाल्याचे दिसते.

मात्र हा निष्कर्ष सर्व आजार, सर्व कुटुंबे आणि सर्व रुग्णालयांना लागू होतो असे म्हणता येत नाही.

७. पुरुषांच्या आत्महत्येच्या पद्धतींना “पुरुषी” म्हणता येते का?

निष्कर्ष: वादग्रस्त

पुरुष आणि महिलांमध्ये आत्महत्येच्या पद्धतींमध्ये फरक आढळू शकतो. परंतु “पुरुषी मार्ग” हे वैद्यकीय किंवा वैज्ञानिक वर्गीकरण नाही. उपलब्ध साधने, सामाजिक परिस्थिती, मानसिक आरोग्य, संस्कृती आणि इतर घटक यामध्ये भूमिका बजावतात.

८. पुरुषांना हृदयरोग, मधुमेह, लठ्ठपणा, कर्करोग इत्यादी आजार होतात का?

निष्कर्ष: निश्चित

होय. पुरुषांमध्ये हृदयरोग, मधुमेह, लठ्ठपणा, फुफ्फुसांचे विकार, विविध कर्करोग आणि यकृताचे आजार आढळतात. तंबाखू व दारू यांसारखे जोखीम घटक काही आजारांचा धोका वाढवतात.

मात्र हे आजार केवळ पुरुषांचे आजार नाहीत; महिलांनाही हे आजार होतात.


ऐतिहासिक व सामाजिक संदर्भभूमी

या लेखाचा केंद्रबिंदू केवळ पुरुष किंवा महिला कोण अधिक आजारी पडतात हा प्रश्न नाही. लेखकाचा मुख्य सामाजिक मुद्दा असा आहे की लिंगाधारित सामाजिक भूमिका आरोग्य, उपचार, रुग्णसेवा आणि आरोग्यखर्चावर परिणाम करू शकतात.

एका बाजूला पुरुषांना कुटुंबातील आर्थिक व सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा सदस्य मानून त्यांच्या उपचारांना प्राधान्य दिले जाऊ शकते. दुसऱ्या बाजूला महिलांकडून घरगुती आणि रुग्णसेवेचे विनामोबदला काम अपेक्षित असू शकते.

यामुळे “रुग्ण” आणि “रुग्णाची सेवा करणारी व्यक्ती” या दोन्ही भूमिकांमध्ये लिंगभेदाचा अभ्यास करणे आवश्यक ठरते.

दारू आणि तंबाखूच्या संदर्भात लेखाचा मुद्दा अधिक ठोस वैद्यकीय पुराव्यांशी जोडता येतो. या व्यसनांमुळे वैयक्तिक आरोग्याबरोबरच कुटुंब आणि समाजावर आर्थिक भार पडतो.


काय निश्चित? काय वादग्रस्त?

निश्चित

  • तंबाखू अनेक गंभीर आजारांचा महत्त्वाचा जोखीम घटक आहे.

  • दारू अनेक गंभीर आजार, अपघात आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांशी संबंधित आहे.

  • पुरुषांमध्ये दारूशी संबंधित आरोग्यभार मोठा आहे.

  • भारतात आरोग्यसेवा आणि आरोग्यखर्चात लिंगभेदाचे पुरावे उपलब्ध आहेत.

  • महिलांवर unpaid caregiving चा भार तुलनेने अधिक पडू शकतो.

अंशतः बरोबर

  • पुरुषांना उपचारासाठी अधिक तत्परतेने अ‍ॅडमिट केले जाते.

  • महिलांवर रुग्णसेवेची जबाबदारी अधिक पडते.

  • पुरुषांच्या आरोग्यावर महिलांपेक्षा अधिक खर्च केला जातो.

हे दावे काही संशोधनाशी सुसंगत आहेत; परंतु सर्व कुटुंबे आणि सर्व रुग्णालयांना लागू होणारे सार्वत्रिक नियम नाहीत.

वादग्रस्त

  • पुरुषांचे आजार मोठ्या प्रमाणावर “मॅन मेड” आहेत.

  • आत्महत्येच्या पद्धती “पुरुषी” असतात.

  • पुरुषी मानसिकताच विशिष्ट आजारांचे थेट मूळ कारण आहे.

हे मुद्दे सामाजिक विश्लेषणाच्या दृष्टीने मांडलेले आहेत; त्यांना सर्वमान्य वैद्यकीय तथ्य म्हणून मांडताना सावधगिरी आवश्यक आहे.


संदर्भ व स्रोत

ऑनलाइन स्रोत १ — WHO India — Tobacco
WHO India — Tobacco

ऑनलाइन स्रोत २ — WHO — Alcohol
WHO — Alcohol

ऑनलाइन स्रोत ३ — WHO India — Tobacco-related economic burden
WHO India — Tobacco-related economic burden

ऑनलाइन स्रोत ४ — Sex differences in utilisation of hospital care in India
PubMed Central — Sex differences in utilisation of hospital care in India

ऑनलाइन स्रोत ५ — Gender Difference in Health-Care Expenditure in India
PubMed Central — Gender Difference in Health-Care Expenditure in India



9/15/26

भाग 3 — डीएनए, माहिती आणि जीवनाचे रहस्य Part 3 — DNA, Information and the Mystery of Life 

भाग ३ — आरएनए जग आणि लुकाचा प्रवास

Part 3 — The RNA World and the Journey to LUCA

१९४३मध्ये बेलचले, ब्रिटनमध्ये एक हुशार गणितज्ञ अ‍ॅलन ट्युरिंग त्याच्या अत्यंत भेदक अंतर्दृष्टीचे प्रत्यक्ष वास्तवात अवतरणे अनुभवत होता.

त्याचे म्हणणे असे होते की, अंकांनी अंकाची गणना होते. त्याच्या या तत्त्वावर आधारित कोलोसस नावाचा एक संगणक जर्मन सैन्याच्या लॉरेनट्झ विसंकेती यंत्राचे संदेश उलगडण्यासाठी बनविला होता.

रूपभेदयोग्य वा परिवर्तनीय क्रमादेश (प्रोग्राम) असलेले 'कोलोसस' एक जागतिक यंत्र होते. त्या वेळी जीवनाचं रहस्य आणि हे यंत्र यांच्या संबंधाबद्दल कोणालाही कल्पना नव्हती. मात्र ट्युरिंग त्यातल्या त्यात जीवन रहस्याच्या जवळ पोहोचला असावा.

आनुवंशिकता ही रूपभेदयोग्य असा संग्रहित क्रमादेश आहे, आणि चयापचय हे सार्वत्रिक यंत्र आहे. यांना जोडणारा दुवा म्हणजे संकेत (कोड), एक अमूर्त संदेश आहे. हा संदेश एका रासायनिक, भौतिक वा अपदार्थिक रूपातही समाविष्ट होऊन अवतीर्ण होतो. त्याचे रहस्य म्हणजे तो स्वतःची प्रत स्वतःच तयार करू शकतो.

या जगातील संसाधने वापरून स्वतःचे पुनरुत्पादन करू शकणारे काहीही 'जिवंत' मानले जाते. या काहीही जिवंत असलेल्यांचे स्वरूप म्हणजे अंकात्मक संदेश, एक अंक, एक लिपी, एक शब्द असे असू शकते.

क्लाइड शेनॉन नावाची एक शांत, एकांतप्रिय हुशार व्यक्ती न्यूजर्सीमधील प्रिंसटनमध्ये, याच वेळी काही काळापूर्वी मनात आलेल्या एका कल्पनेवर विचार करीत होती.

ही कल्पना काय होती बरे? ती अशी होती की, माहिती आणि अपक्षय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि दोन्हींचा संबंध हा ऊर्जेशी आहे.

कमी अपक्षय असलेल्या यंत्रणेत जास्त माहिती साठवलेली असते. वाफेच्या इंजिनामध्ये भरपूर माहिती सामग्री असल्यामुळे ते ज्वलन होणाऱ्या कोळशापासून मिळणाऱ्या ऊर्जेला जुंपून तिचे रूपांतर परिभ्रमण गतीमध्ये करू शकते.

त्याचप्रमाणे मानवी शरीरही कार्य करते. शेनॉनच्या मेंदूमध्ये अॅरिस्टॉटलची माहिती आणि न्यूटनचे भौतिकशास्त्र यांची गळाभेट झाली होती.

ट्युरिंगप्रमाणेच शेनॉननेही जीवशास्त्राबद्दल विचार केला नव्हता. परंतु जीवन वा जिवंतपणा, म्हणजे काय? या प्रश्नासंबंधीची त्याची अंतर्दृष्टी जास्त सयुक्तिक होती. जीवन म्हणजे डीएनएमध्ये लिहिलेली अंकात्मक माहितीच आहे.

जीवनाच्या उत्पत्तीच्या अगदी सुरुवातीला जो आदि शब्द अवतरला होता, तो डीएनए नव्हता. जीवन थोडे स्थिरस्थावर झाल्यावर श्रमाची विभागणी दोन विभिन्न कार्यामध्ये झाली.

एक म्हणजे रासायनिक कार्य (चयापचय) आणि दुसरे म्हणजे माहिती संग्रहविषयक कार्य (पुनरुत्पादन). या टप्प्यानंतरच डीएनएचे आगमन झाले.

मात्र डीएनएमध्ये जी शब्दांची नोंद असते, ती तंतोतंतपणे अनेक युगांमधून वर्तमानात संक्रमित झाली.

सूक्ष्मदर्शक यंत्राच्या खाली मानवाच्या डिंबामधील केंद्रक ठेवला आहे, अशी कल्पना करा. तुम्हाला शक्य असल्यास सर्वांत मोठे डाव्या बाजूला व सर्वांत लहान उजव्या बाजूला अशा आकारमानाप्रमाणे तेवीस गुणसूत्रांची मांडणी करा; सर्वांत मोठ्या गुणसूत्राला गुणसूत्र १, हे नाव पूर्णतः सहजपणे व अहेतुकपणे दिले गेले आहे.

ही गुणसूत्रे भिंगाच्या साह्याने जवळ आणल्यास प्रत्येक गुणसूत्राला एक लांबट व एक छोटी भुजा असल्याचे दिसून येईल. एक चिमूटभर आकाराच्या बिंदूने ते एकमेकांपासून अलग होतात. या बिंदूला सेंट्रोमियर असे म्हणतात.

त्याच्या नजीक १२० अक्षरांचा अनुक्रम दिसेल, As, Cs, Gs व Ts यांचा! पुन्हा पुन्हा पुनरावृत्तीत होणारा. दोन पुनरावृत्तींमध्ये यादृच्छिक मजकुराचा भाग असतो.

परंतु १२० अक्षरांचा परिच्छेद मात्र ओळखीच्या संगीतातल्या धुनीसारखा पुन्हा पुन्हा येत राहतो, शंभरपेक्षा जास्त वेळा. हा छोटा परिच्छेद इतक्या निकट असतो की आपल्याला मूळ शब्दाचे पडसाद ऐकू येऊ शकतात.

हा परिच्छेद म्हणजे एक छोटे जनुकच. हे जनुक बहुदा मानवी शरीरातील सर्वांत क्रियाशील जनुक असावे. याची एकशेवीस अक्षरे अव्याहतपणे छोट्या आरएनएच्या तंतूमध्ये छायाप्रतीत होतात. या प्रतीला 5S आरएनए म्हणतात.

प्रथिनाच्या गुच्छाबरोबर आणि इतर आरएनएच्या बरोबर या आरएनएचा संयोग होऊन एक निगुतीने विणलेले, एकत्र गुंफलेले रायबोसोम नावाचे यंत्र तयार होते.

त्याचे कार्य म्हणजे डीएनएमधील पाककृतीचे भाषांतर प्रथिनामध्ये करणे. (आणि प्रथिने डीएनएला स्वतःची प्रतिकृती करण्याची क्षमता प्रदान करतात).

सॅम्युल बटलरच्या शब्दांत सांगायचे तर, एक प्रथिन म्हणजे एका जनुकाचा दुसरे जनुक तयार करण्याचा मार्ग, तर एक जनुक म्हणजे एका प्रथिनाचे दुसरे प्रथिन तयार करण्याचा मार्ग होय.

स्वयंपाकाला पाककृतीची गरज असते, आणि पाककृतीला स्वयंपाकी लागतो! जीवनामध्ये प्रथिन आणि डीएनए या दोन प्रकारच्या रसायनांच्या परस्परक्रियेचा खेळ चालू असतो.

रसायनत्व, जिवंतपणा, श्वासोच्छ्वास, चयापचय आणि वर्तन या सर्वांचे प्रतिनिधित्व प्रथिने करतात. जीवशास्त्रीय भाषेत यालाच दृश्यरूप (फिनोटाइप) म्हणतात.

तर माहिती, पुनरुत्पादन, प्रजनन व समागम यांचे प्रतिनिधित्व डीएनए रेणू करतो. जीवशास्त्रज्ञ याला वंशप्रकृती (जिनोटाइप) म्हणतात.

यातील कोणी एक दुसऱ्याशिवाय अस्तित्वात असू शकत नाही. हे आधी कोंबडी का आधी अंडे? (डिंब) या प्रसिद्ध कोड्यासारखे आहे. आधी डीएनए का आधी प्रथिन?

डीएनए हा एक हतबल, निष्क्रिय असा, एकही रासायनिक क्रिया उत्प्रेरित करीत नसणारा गणिती तुकडा असल्याने, तो सर्वप्रथम अस्तित्वात येणारा रेणू नसणार.

पण प्रथिन रेणूही तसा नसणार, कारण तो तर एक निखळ रसायन असून स्वतःची हुबेहूब प्रत तयार करण्यास असमर्थ आहे.

डीएनएने प्रथिनांचा किंवा प्रथिनांनी डीएनएचा शोध लावला असणे अशक्य वाटते. जर शब्दांनी जीवनाच्या धाग्यावर त्यांच्या पुसटशा खुणा मागे ठेवल्या नसत्या, तर हे गोंधळात टाकणारे कोडे सुटलेच नसते.

आज आपल्याला माहीत आहे की अंड्याचे आगमन कोंबडीच्या फार आधी झालेले आहे. (सर्व पक्ष्यांच्या आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचे पूर्वज अंडी घालत होते.) आरएनए प्रथिनांच्या पूर्वी आल्याचे जास्तीत जास्त पुरावे मिळत आहेत.

डीएनए व प्रथिने या दोन जीवरेणू जगताला जोडणारा दुवा आहे, आरएनए जीवरेणू!

डीएनएच्या मुळाक्षरातील संदेशाचे भाषांतर प्रथिनांच्या मुळाक्षरांमध्ये करण्यासाठी आरएनएचे प्रामुख्याने उपयोजन केले जाते.

परंतु ज्या पद्धतीने त्यांचे वर्तन घडते, त्यावरून प्रथिने व डीएनए या दोन्ही रेणूंचाही पूर्वज आरएनए असावा यात तिळमात्र शंका उरत नाही.

डीएनए म्हणजे दिल्ली (राजधानी) असेल तर आरएनए म्हणजे भारत (देश) आहे.

सुरुवातीला ज्या आदि शब्दाबद्दल आपण बोलत होतो तो शब्द आरएनए आहे.

आरएनएच्या (प्रथिन व डीएनएपेक्षाच्या) प्राधान्यक्रमामुळे आणि प्राथमिकतेमुळे या रेणूने काही छोट्या खुणा मागे ठेवल्या आहेत.

आजही अप्रत्यक्षपणे डीएनएमधील घटक आरएनएमधल्या घटकांमध्ये फेरबदल करून तयार केले जातात. शिवाय डीएनएमधील T अक्षरे आरएनएमधील U अक्षरांपासून बनलेली आहेत.

बरीचशी आधुनिक विकरे जरी प्रथिनांची बनलेली असली, तरी त्यांच्या कार्यप्रवणतेसाठी ती आरएनएवर अवलंबून असतात.

याशिवाय कुणाच्याही साहाय्याशिवाय आरएनए स्वतःची प्रत तयार करू शकतात. (जे की डीएनए व प्रथिने करण्यास असमर्थ आहेत.)

त्यांच्यासाठी योग्य घटकांचा पुरवठा केल्यास ते घटकांना एकत्रित बांधून त्यापासून एक संदेश तयार करतील.

जर आपण पेशीच्या अंतरंगात नजर टाकली, तर आपल्याला दिसेल की सर्वप्रथम मूलभूत कार्यांसाठी आरएनए असणं गरजेचं आहे.

जनुकापासून आरएनएच्या स्वरूपात असलेला संदेश कोण घेते? तर त्यावर अवलंबित असलेले विकर!

संदेशवाहक (मेसेंजर) आरएनए तो संदेश घेऊन आरएनए व प्रथिनांनी बनलेल्या रायबोसोम या यंत्राजवळ जातो. येथे संदेशाचे प्रथिनांच्या भाषेत भाषांतर होते.

यासाठी संक्रमक (ट्रान्सफर) आरएनए हा दुभाषी लागतो. तो प्रथिनांच्या भाषेतील मुळाक्षरे म्हणजे अमिनो आम्ल हेरून त्यांना रायबोसोम या प्रथिने बनवणाऱ्या जागेवर आणतो.

या सर्व घटकांच्या जनुकातील संदेशाचा (ज्याची मुळाक्षरे A, G, C वा आहेत) प्रथिनांच्या (ज्याची मुळाक्षरे बावीस प्रकारची अमिनो आम्ल आहेत) भाषेत भाषांतर होते.

यापलीकडे आरएनए एक उत्प्रेरक म्हणूनही कार्य करू शकतो (जे डीएनए करू शकत नाही); जसे की दुसऱ्या आरएनएसहित इतर रेणूंना दुभंगणे, तसेच त्यांना जोडणे.

आरएनए या रेणूंचे विभाजन करू शकतो, त्यांची टोके एकत्र बांधू शकतो, स्वतःचे काही बांधणी ठोकळे वा ठसे बनवू शकतो आणि आरएनएची साखळी वाढवू शकतो.

तो तर स्वतःवरच कृती करून काही मजकुरांचा तुकडा तोडून पुन्हा दोन टोके सांधूही शकतो.

१९८०च्या सुरुवातीला आरएनएच्या या लक्षणीय गुणधर्माचा शोध (थॉमस सेच व सिडने ऑल्टमन) लागल्यामुळे जीवनाच्या उत्पत्तीसंबंधीच्या आकलनाची आपली दृष्टीच बदलली.

आता अशी शक्यता वाटत आहे की प्रारंभिक जनुक (Ur जनुक) म्हणजे एक हुबेहूब प्रतिनिर्मीक उत्प्रेरक (रेप्लिकेटर कॅटलीस्ट) असा संयुक्त रेणू असावा.

हा रेणू म्हणजे आदि शब्द, जो भोवतालची रसायने वापरून स्वतःच्या प्रती निर्माण करीत होता. हे आदि जनुक आरएनएचे बनले असावे!

आरएनएच्या रेणूच्या क्रिया उत्प्रेरित करण्याच्या क्षमतेवर आधारित यादृच्छिकरीत्या पुन्हा पुन्हा निवड करून (परीक्षानळीमध्ये) आरंभापासून उदय व विकास घडवून आणणे शक्य होईल! म्हणजेच जवळजवळ जिवाच्या उत्पत्तीचे पुन्हा केलेले सादरीकरणच!

सर्वांत आश्चर्यकारक परिणाम म्हणजे या कृत्रिम आरएनए रेणूमध्ये असलेल्या मजकुराच्या एका पसरलेल्या भागात आणि रायबोसोममधील आरएनएवरील मजकुरात, या दोन्हींमध्ये विलक्षण साम्य आहे (जसे की गुणसूत्र एकवरील ५ जनुक)!

चार अब्ज वर्षांपूर्वी (जेव्हा या विश्वाचे वय फक्त १० अब्ज वर्ष होते) पृथ्वीचा नुकताच जन्म झाला होता; तेव्हा आदि डायनासोर, आदि मासे, आदि कीटक, आदि वनस्पती, आदि कवक, आदि जिवाणू या कुणाच्याही पूर्वी आरएनएचे जग असावे.

आपल्याला हे रायबो जीव (आरएनएचे) कसे दिसत असावेत हे माहीत नाही. आपण जीवरासायनिक दृष्ट्या ते जिवंत राहण्यासाठी काय करत असावेत, याचा फक्त अंदाज बांधू शकतो.

त्यांच्याही आधी काय व कोण सजीव असावेत हे आपल्याला ज्ञात नाही. आजच्या सजीवांमध्ये असणाऱ्या आरएनएच्या कार्याच्या हाती असलेल्या धाग्यादोऱ्यावरून आपण त्यांच्या एकेकाळच्या अस्तित्वाची खात्री मात्र जरूर देऊ शकतो.

भाग समाप्त — आदि शब्दापासून आरएनए जगापर्यंत


9/13/26

भाग २ — डीएनए, माहिती आणि जीवनाचे रहस्य Part 2 — DNA, Information and the Mystery of Life

डीएनएचा द्विसर्पिल धागा म्हणजे एक माहिती संचय आहे. यामधील संदेश हा रसायनांच्या सांकेतिक लिपीत लिहिलेला असतो. एक रसायन रेणू म्हणजे एक अक्षर समजा. आपण इंग्रजीमध्ये लिहितो तशाच प्रकारे ही आनुवंशिक सांकेतिक लिपी एकरेषीय भाषा आहे.

इंग्रजी भाषेमध्ये असते तसेच या भाषेतही प्रत्येक अक्षर तेवढेच महत्त्वाचे आहे आणि या अर्थाने ही भाषा इंग्रजीसारखीच अंकात्मक (डिजिटल) आहे. विशेष म्हणजे ही डीएनएची भाषा इंग्रजीपेक्षा खूपच सुलभ आहे, कारण या भाषेत केवळ चारच मुळाक्षरे आहेत; ती म्हणजे A, C, G, T.

आज आपल्याला ज्ञात झाले आहे की जनुके म्हणजे एक प्रकारच्या सांकेतिक पाककृती आहेत. परंतु फार कमी जणांनी असे अनुमान केले होते. विसाव्या शतकाच्या पहिल्या अर्धशतकात जनुके म्हणजे काय, हा गाजलेला प्रश्न अनुत्तरित राहिला होता.

आपण आता जरा मागे जाऊ या. डीएनएच्या सममित (सीमेट्रिकल) रचनेचा शोध लागलेल्या वर्षात म्हणजे १९५३मध्ये, नाहीतर त्यामागे दहा वर्षे म्हणजे १९४३ पर्यंत जाऊ या.

दहा वर्षानंतर जे काही जण हा रहस्यभेद करण्यासाठी झटले ते १९४३मध्ये वेगळ्या प्रकारच्या कामात गुंतले होते.

डीएनएचा शोध लावणारा एक जण फ्रेन्सीस क्रिक गुंतला होता, 'पोर्ट माऊथ' येथील खाणींच्या आकृतिबंधावर काम करण्यात. तर दुसरा 'जेम्स वॅटसन' वयाच्या पंधराव्या वर्षात पदवीपूर्व अभ्यासक्रमासाठी शिकागो विद्यापीठात नाव नोंदवित होता. त्याने स्वतःचे आयुष्य पक्षिशास्त्रासाठी समर्पित करायचा निश्चय केला होता.

तर तिसरा 'माऊरीस विलकीन्स' अमेरिकेमध्ये अणुबॉम्बची रचना करण्यासाठी सहाय्य करीत होता. चौथी 'रोझलिंड फ्रैंकलिन' ब्रिटिश सरकारसाठी कोळशाच्या संरचनेचा अभ्यास करीत होती.

१९४३मध्ये 'ऑशवित्झ' येथे 'जोसेफे मेंगल' एका जुळ्यावर प्रयोग करीत होता. तो अनुवंशशास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु त्याचे सुप्रजननशास्त्र विषयक (युजेनिक्स) प्रयोग मात्र खऱ्या ज्ञानप्रकाशाचा मार्ग नाही, असे लक्षात येते. मेंगलचे निष्कर्ष भविष्यातील वैज्ञानिकांसाठी कुचकामी ठरतील.

डब्लिनमध्ये याच सुमारास मेंगलचा आश्रित व समानधर्मी इरविन श्रोडिंजर हा ट्रिनिटी महाविद्यालयात जीवन म्हणजे काय? यावरील व्याख्यान मालिकेचा प्रारंभ करीत होता.

त्याला ज्ञात होते की, गुणसूत्रात जीवनाचे रहस्य दडलेले आहे. परंतु ते कशा प्रकारे, कोणत्या स्वरूपात अस्तित्वात आहे, ते मात्र त्याला समजून येत नव्हते.

त्याच्या मते गुणसूत्रांमध्ये एक प्रकारची सांकेतिक लिपी आहे, जिच्यामध्ये एका व्यक्तीचा संपूर्ण वाढीची आणि तिच्या परिपक्व अवस्थेमधील कार्याची संपूर्ण पद्धती साठवलेली आहे.

तो म्हणतो की डीएनए हा एक मोठा रेणू असू शकतो; परंतु आनुवंशिकतेचा संदेश व माहिती साठवण्यासाठी तो फारच छोटा ठरेल.

क्रिक, वॉटसन, विलकीन्स व फ्रैंक्लिन यासारख्या वैज्ञानिकांच्या पिढीला गुणसूत्राच्या अंतरंगाचे हे यथार्थ सूचन प्रेरणादायी ठरले. या प्रेरणेमुळे अत्यंत कठीण समस्येचे धागेदोरे हाती लागत होते.

परंतु उत्तराच्या बऱ्याच जवळ येत असताना श्रोडिंजर मात्र हा मार्ग सोडून दुसरीकडे उत्तर शोधताना दिसतो. त्याला वाटत होते की त्याच्या आवडत्या पुंज (क्वांटम) सिद्धांतामध्ये रेणूंची आनुवंशिकता धारण करण्याच्या क्षमतेचे उत्तर दडलेले आहे.

त्याच्या या प्रकारचा पाठपुरावा करण्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. कारण जीवनाच्या रहस्याचा आणि पुंज स्थितीचा अन्योन्य संबंध नाही. या रहस्याचा भेद मुळात पदार्थविज्ञानाकडून होणे शक्य नाही.

त्याच वेळी न्यूयॉर्कमध्ये एक सहासष्ट वर्षांचा कॅनेडियन वैज्ञानिक ओसवाल्ड आयव्हरी कशात गुंतला होता?

डीएनए रेणू हे आनुवंशिकतेचे रासायनिक प्रकटीकरण आहे, हे त्याने ओळखले होते. ते निर्विवादपणे सिद्ध करू शकणाऱ्या प्रयोगांवर तो शेवटचा हात फिरवीत होता.

केवळ साधे रासायनिक द्रव्य शोधून न्यूमोनियाच्या निष्प्रभ, निरुपद्रवी जिवाणूंना रोगकारक जिवाणूंमध्ये रूपांतरित करता येते, हे त्याने अनेक कल्पक प्रयोगांती सिद्ध केलेच होते.

१९४३मध्ये त्याने हा बदल घडविणारा पदार्थ जेव्हा शुद्ध केला, तेव्हा तो डीएनए आहे या निष्कर्षापर्यंत तो आला.

परंतु त्याने हा निष्कर्ष प्रसिद्ध करताना इतक्या सावध भाषेत मांडला की खूप नंतरच्या काळापर्यंतही शास्त्रज्ञांकडून त्याची दखल घेतली नाही.

त्याच्या भावाला, रॉयला त्याने लिहिलेल्या पत्रात (१९४३) तो लिहितो, 'जर आपण बरोबर असू, (अर्थात त्या वेळी सिद्ध झाले नव्हते) तर जीवरासायनिक क्रिया व पेशींची वैशिष्ट्ये ठरवण्यामध्ये केंद्राम्ल (न्यूक्लिक अॅसिड) हे केवळ संरचनात्मक दृष्ट्या महत्त्वाचे नसून, कार्यात्मक दृष्टीनेही सक्रिय पदार्थ ठरतात.'

आणि मग पुढे जाऊन याचा अर्थ असा होतो की एखाद्या ज्ञात रासायनिक पदार्थांद्वारे पेशीमध्ये अपेक्षित व आनुवंशकीय बदल प्रवृत्त करणे शक्य आहे.

आयव्हरी रहस्यभेदापर्यंत जवळजवळ पोहोचला होता. पण अजूनही तो रासायनिक मार्गावरच विचार करीत होता.

१६४८मध्ये जॉन बापटिस्ट वॅन हेलमॉन्टसुद्धा अशाच प्रकारचा अंदाज बांधत म्हणाला होता की, सर्व जीवन एक रसायनतत्त्व आहे.

जेव्हा फेड्रीच व्होलरने अमोनियम क्लोराईड व सिल्वर साईनाइड यापासून कृत्रिम युरिया बनवली, तेव्हा तो उद्गारला की काही सजीवता तर नक्कीच रसायनतत्त्वांची बनलेली आहे!

यापूर्वी युरिया हा रासायनिक पदार्थ फक्त सजीवांमधील तयार होत होता. या प्रयोगाने रासायनिक व जैविक जगांना विभागणाऱ्या आत्तापर्यंतच्या पवित्र समजुतीला धक्का दिला.

फुटबॉल म्हणजे पदार्थविज्ञान तसेच जीवन म्हणजे रसायनशास्त्र असे म्हणणे जरी खरे असले, तरी त्यात एक रुक्षपणा जाणवतो.

जीवन खरंतर ढोबळ अनुमानाने तीन अणूंचे रसायन आहे. हे अणू म्हणजे हायड्रोजन, कार्बन आणि ऑक्सिजन (प्राणवायू), जे एकमेकांशी जोडून सजीवांतील ९८% अणू रेणू बनवितात.

डीएनएमध्ये असे काय आहे की ज्यामुळे या जीवरेणू आनुवंशिक गुणधर्म धारण करू शकेल, याची कल्पना आयव्हरी करू शकला नाही. अर्थात याचे उत्तर रसायनशास्त्र देऊ शकणार नव्हतेच.

भाग समाप्त — डीएनएच्या माहितीचा शोध


9/11/26

जीवसृष्टीचा पहिला हुंकार ! English Title: Chromosome 1 — The First Stirring of Life

गुणसूत्र - १

मूळ लेखक : मॅट रिडले

पुस्तक : जीनोम — २३ गुणसूत्रांची चित्तवेधक आत्मकथा
अनुवाद : डॉ. सुनीती धारवाडकर
प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन


भाग १

समुद्राच्या पाण्यात बुडबुड्यांचं स्फुरणं, फुटणं, विरणं असं सतत चालू असतं; तद्वतच एक जीवरूप विरताना त्यातून दुसरं जीवरूप आकारास येतं! (जीवो जीवस्य जीवनम्!)

Alexander Pope, An Essay On Man

जीवनाच्या प्रारंभी एक जीवरासायनिक 'शब्द' होता, जो सदैव स्वतःच्या प्रती काढण्यात मग्न होता. ऊर्जेच्या अपक्षयाच्या (एनट्रॉपी) स्वरूपातील प्रवाहामधले चिमुकले भोवरे पकडून त्यांना जिवंत करण्यासाठी रसायनांची रचना कशी असावी, याचा शोध या आदि शब्दानेच लावला. हा शब्द म्हणजे पृथ्वीवरील जीवाचा पहिला हुंकार होता.

याच शब्दाने धुळकट अवस्थेत असलेल्या आपल्या अचेतन पृथ्वीच्या भूपृष्ठाचे परिवर्तन एका हिरव्यागार चैतन्यमय स्वर्गात केले. अंतिमतः हा शब्द बहरून आला, फुलून आला. आणि त्याच्या कल्पकतेतून त्याने स्वतःचाच शोध घेऊ शकणाऱ्या आणि स्वजाणीव असणाऱ्या अशा मेंदू नावाच्या, असामान्य साधनाची निर्मिती केली.

पृथ्वीच्या चार अब्ज (बिलियन) वर्षांच्या इतिहासात मी खरोखरच आज जिवंत आहे, हे माझे भाग्यच म्हणावे लागेल. मी एवढा नशीबवान आहे की सजीवांच्या या पन्नास लक्ष प्रजातींमध्ये मी एक सजग मानवप्राणी म्हणून जन्माला आलो.

मी पृथ्वीवरील एका अशा देशात जन्मलो की जिथे जीवनाचा हा पहिलावहिला शब्द शोधला गेला. डीएनएच्या संरचनेचा शोध म्हणजे जगातील एक महान आणि आश्चर्यकारक अशा गुपिताचे उलगडणे!

मागे वळून माझ्याबरोबर जीवनाच्या उत्पत्तीच्या प्रवासाकडे चला; मला आशा आहे की, मी आदि शब्दाच्या मोहिनीचा तुम्हाला प्रत्यय आणून देऊ शकतो.

इ. स. १७९४मध्ये बहुश्रुत कवी व काया चिकित्सक इरासमस डार्विनच्या मनात आले होते, की 'प्राणी अस्तित्वात येण्यापूर्वी जमीन व समुद्र यांना वनस्पतीने व्यापले होते. तसेच या प्राण्यांची कुटुंबेही इतर प्राण्यांच्या कुटुंबांच्या फार पूर्वीपासून अस्तित्वात होती. यावरून आपण असे अनुमान काढू शकतो का की, हा एकाच प्रकारचा जैविक धागा आहे आणि हा धागा सेंद्रिय जीवनाचे कारण आहे, मूळ आहे?'

त्या काळात हे खरोखरच एक विस्मयकारक अनुमान होते. केवळ 'तमाम सेंद्रिय जीवन एकमात्र सेंद्रिय उत्पत्ती वाटून घेते' या ध्वनित होणाऱ्या विधानासाठी ते विस्मयकारक ठरत नाही; ना की त्याच्या नातवाने चार्ल्स डार्विनने या विषयावर पुस्तक लिहिण्याच्या पासष्ट वर्षे आधीचे हे विधान होते म्हणून; तर यासाठीही की 'धागा' यासारखा आगळावेगळा शब्द वापरल्यामुळे!

खरोखरीच जीवनाचे रहस्य एका धाग्यात दडलेले आहे, एका धाग्यात जीवन गुंफले गेले आहे!

पण तरीही एक धागा 'जिवंत' असे काही, कसे काय बनवू शकतो?

जीवनाची व्याख्या तशी पटकन शब्दांमध्ये पकडता येण्यासारखी नाही. मात्र जीवन हे दोन विभिन्न अशा कौशल्याने बनले आहे, हे नक्की सांगता येते. एक म्हणजे पुनरुत्पादन क्षमता आणि दुसरे म्हणजे सूत्रबद्धता निर्माण करण्याची क्षमता.

सजीव आपल्या स्वतःची हुबेहूब प्रत बनवीत असतो. ससे दुसऱ्या सशांनाच जन्म देतात. डॅडेलियॉन वनस्पती दुसऱ्या डॅडेलियॉनलाच जन्माला घालतात.

पण ससे या व्यतिरिक्तही काही करतात. ते गवत खातात, त्याचे रूपांतर त्यांच्यातील मांसामध्ये करतात. जगातल्या निर्हेतुक अस्ताव्यस्ततेमधून (केऑस्) ते स्वतःच सुसंघटित व संमिश्र शरीर बनवितात.

ते उष्मागतिकी शास्त्राच्या (थर्मोडायनॅमिक्स) दुसऱ्या नियमाचे पालन करीत नाहीत; कारण ते बंदिस्त प्रणाली नाहीत. या शास्त्राचा दुसरा नियम सांगतो की एका बंदिस्त प्रणालीमध्ये प्रत्येक गोष्टीचा कल हा सुसंघटितपणाकडून अस्ताव्यस्ततेकडे जाण्याचा असतो.

अर्थात ससे सुसंघटित अशा छोट्या 'मोळ्या', छोटे 'गडे' बनवितात. ते संमिश्रता घडवितात, ती ऊर्जेच्या विनियोगाची किंमत मोजून! (तसे तर काहीच फुकट नसते.)

इरविन श्रोडिंजरच्या भाषेत सजीव प्राणी त्यांच्या पर्यावरणातील सुसंघटितपणा पितात.

सजीवांकडे असलेली कळीची गोष्ट म्हणजे माहिती साठवण्याची आणि ती वापरण्याची क्षमता. सजीवांकडे प्रजोत्पादनाची क्षमता कशामुळे येते, तर त्याच्याकडे असलेल्या अस्तित्वाच्या पाककृतीमुळे; आणि ही पाककृती म्हणजे नवीन शरीर, नवीन जीव तयार करण्यासाठी लागणारी माहिती.

सशाच्या डिंबामध्येच (Egg) नवीन सशांच्या शरीराची जुळणी करण्यासाठी लागणाऱ्या सूचना असतात. परंतु चयापचयाच्या द्वारे होणारी सुसंघटितपणाची निर्मिती, ही माहितीवरसुद्धा अवलंबून असते. ही माहिती म्हणजे सुसंघटितपणा निर्माण करणाऱ्या साधनाची निर्मिती व त्याची देखभाल करण्यासाठीच्या सूचना!

ज्या प्रकारे एक केक बनवण्याची पाककृती पूर्वचिन्हांकित आणि पूर्वसूचित केलेली असते, त्याचप्रमाणे एका परिपक्व सशाच्या सजीव धाग्यामध्ये त्याच्या प्रजोत्पादन व चयापचय करण्याच्या क्षमतांसकट, नवीन ससा बनवण्याची कृती साठवलेली असते.

आपल्याला ही कल्पना अ‍ॅरिस्टॉटलपर्यंत मागे गेल्यासही दृष्टीस पडते. त्याच्या म्हणण्यानुसार अंड्यामध्ये (डिंबामध्ये) कोंबडीची संकल्पना अध्याहृत आहे.

रसायनशास्त्र व पदार्थविज्ञान यांच्या अनेक पिढ्यांखाली गाडल्या गेलेल्या माहिती तत्त्वाचे अरिस्टॉटलचे अंधुक आकलन, आता आधुनिक अनुवंशशास्त्राच्या संशोधनाच्या प्रभावाखाली पुन्हा वर आले आहे.

मॅक्स डेलब्रक गमतीत म्हणाला होता की, या ग्रीक संताला डीएनएच्या शोधासाठी मरणोत्तर नोबेल पुरस्कार द्यायला पाहिजे.

भाग समाप्त — जीवनाचे रहस्य एका धाग्यात दडलेले आहे






9/9/26

विद्येविना विकासाचा 'अर्थ'बोध Development Has No Meaning Without Education

मूळ लेखक / स्रोत / संदर्भ

संदर्भग्रंथ : Amartya Sen — The Country of First Boys and Other Essays
प्रकाशक : Oxford University Press
लेख/संदर्भ : ग्रंथांचिया द्वारी — अतुल देऊळगावकर
प्रकाशक : विश्वकर्मा पब्लिकेशन, पुणे
अनुवादक : उल्लेख नाही


विकासाचा खरा अर्थ

गेली तीन दशके जगातील निवडक विचारवंतांमध्ये डॉ. अमर्त्य सेन यांचे नाव अग्रभागी आहे. जागतिक समस्यांवरील त्यांचे भाष्य ऐकण्यासाठी अवघे जग सदैव सज्ज असते. अर्थशास्त्रातील कूट समस्या असो वा मंदीतून बाहेर पडण्याचे उपाय, सेन यांचे मत अनिवार्य असते. जोसेफ स्टिगलिट्झ, पॉल क्रुगमन, अॅग्नेस डीटन, थॉमस पिकेटी, अँथनी अॅटकिन्सन हे जगातील आघाडीचे अर्थवेत्ते, ‘आर्थिक विषमता, गरिबी, जागतिकीकरणाचे लाभ’ हे आज कळीचे ठरलेले मुद्दे जागतिक विषयपत्रिकेवर आणण्याचे श्रेय अर्थतत्त्वज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांनाच देतात.

आज विकासाच्या भाषेचा बोलबाला आहे. The Country of First Boys या पुस्तकातून सेन यांनी भूक, शिक्षण, आरोग्य, प्रसारमाध्यमे, जागतिकीकरण, परस्परावलंबी जग अशा अनेक अंगांनी विकास तपासून पाहिला आहे.

श्रीमंत राष्ट्रांमधील सर्व नागरिक सुखी आहेत का? जगातील प्रबळ लष्करी राष्ट्र शांत व सुरक्षित आहेत का?

समाजातील अशांततेच्या आणि असुरक्षिततेच्या कारणांचा नायनाट केला नाही, तर शांतता कशी प्रस्थापित होईल? मग अर्थशास्त्राचा अर्थ तरी काय? सेन यांनी ‘दारिद्र्य, युद्ध आणि शांतता’ या निबंधातून हिंसेचा अन्वय लावला आहे.

विकास ही संकल्पना केवळ आर्थिक नसून, त्यामध्ये संपूर्ण समाजाचा विकास अभिप्रेत आहे.

निर्जीव वस्तूंच्या उत्पादनाचे मोजमाप हे विकासाचे निर्देशक होऊ शकत नाही. त्यावरून सामान्य माणसाच्या परिस्थितीचा यत्किंचितही अदमास लागत नाही. जर मानवी समूहाच्या जीवनात गुणात्मक बदल झाला, तरच तो विकास अर्थपूर्ण असेल, या विषयावर अनेक वर्षांपासून सुरू असणाऱ्या वाद-संवादाला नव्वदच्या दशकात टोक आले.

त्या दशकात ब्रिटनच्या पंतप्रधान मार्गरेट थॅचर व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी मोकाट अर्थकारणाचा जाहीरनामा घोषित केला होता. ‘सरकारने कल्याणकारी कार्य थांबवावे. पाणी, शिक्षण, आरोग्य यांची हमी घेऊ नये. बाजारपेठेमधील हस्तक्षेप थांबवावा. ते काम खाजगी संस्थांवर सोपवावे.’ थॅचर-रेगन आणि मंडळींनी संयुक्त राष्ट्रसंघाची गरिबाभिमुख धोरणे बदलण्यास भाग पाडले.

‘१९८०चे दशक हे रोजगारहित विकासाचे दशक होते.’

अशीच स्थिती सुरू ठेवल्यास जगाची वाटचाल विध्वंसाच्या खाईकडे असेल, असा या मोकाट अर्थकारणावर घणाघाती हल्ला पाकिस्तानमधील अर्थवेत्ते डॉ. मेहबूब उल हक यांनी चढवला. त्यांनी अमर्त्य सेन, सुधीर आनंद, कीथ ग्रिफिन, फ्रान्सिस स्ट्युअर्ट यांच्या सहकार्याने विकासाची मीमांसा करणारा अभ्यासगट स्थापन केला.

डॉ. हक यांनी ‘शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, जळण, पर्यावरण, यांचा विचार करून माणसांची अवस्था ठरवली पाहिजे,’ हा सिद्धांत १९९०मध्ये मांडला आणि जगाच्या अर्थविचारांना कलाटणी दिली. पुढे त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाकरिता मनुष्यविकास निर्देशांक तयार केला. प्रो. अमर्त्य सेन यांनी त्यांचे घनिष्ठ मित्र डॉ. हक यांच्या विचारांना तात्त्विक अधिष्ठान मिळवून दिले.

तेव्हापासून अवघे जग मनुष्यविकास निर्देशांकांच्या घोषणेची दरवर्षी वाट पाहत असते. ‘प्रत्येक देशाचे प्रगती पुस्तक’ अशी ख्याती मनुष्यविकास निर्देशांकाला प्राप्त झाली आहे.

(या दोन अर्थतत्त्वज्ञांना जन्माला घालणारे भारत व पाकिस्तान हे सख्खे शेजारी, लष्करी सामर्थ्यामध्ये जगात आघाडीवर आणि मनुष्यविकासाच्या यादीमध्ये जगाच्या तळाशी आहेत.)

भाग समाप्त — विकासाचा खरा अर्थ माणसाच्या जीवनमानात आहे


शिक्षणातून विकासाची वाट

१. राष्ट्राची प्रगती केवळ आर्थिक निकषांवर नाही, तर मानवी जीवनात झालेल्या सुधारणांवरही मोजली गेली पाहिजे, या विचारातून डॉ. हक यांनी ‘मनुष्य विकास निर्देशांक’ विकसित केला व तो १९९० पासून संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकास कार्यक्रमाचा भाग बनला.

पहिला नंबर! सर्व जातिधर्मातील आबालवृद्धांना या पहिल्या नंबरची विलक्षण भुरळ आहे. त्यामुळे पहिल्या नंबरला भारतभूमीवर सदासर्वदा कमालीचा आदर आहे. हा ‘नंबरी भाव’ सर्वांच्या अंगवळणी पडला आहे. त्यामुळे अनेक भेदभाव जपले गेले आहेत. डॉक्टर, इंजिनियर, सी.ए., आय.टी. पदवीधर यांना घर व शाळेपासूनच विशेषत्व बहाल केले जाते.

The Country of First Boys या पुस्तकात अर्थतत्त्वज्ञ प्रा. अमर्त्यकुमार सेन म्हणतात, ‘समस्त भारतीयांना प्रदीर्घ काळापासून ‘पहिला क्रमांक’ या लक्षण समूहाने (सिंड्रोम) पछाडलेले आहे.’ ५० वर्षांपूर्वी विंदा करंदीकर यांनी याच भावनेतून ‘एटू लोकांचा देश’ ही कविता लिहिली होती.

राष्ट्रीय पातळीवर अतिशय उच्च पदे उपभोगलेल्या व्यक्तींना शाळेतील नंबरचा आणि गुणांचा विसर कधीही पडू शकत नाही. प्रगत देशांत असे फाजील लाड होत नाहीत.

भारताच्या संदर्भात सेन म्हणतात, ‘वैयक्तिक पातळीवर न थांबता या ‘लाडांनी’ संपूर्ण शिक्षण व्यवस्था बिघडवून टाकली आहे. केवळ अभिजनांच्या शिक्षणांची काळजी वाहणारी व्यवस्था प्राथमिक शिक्षणाची पुरेपूर उपेक्षा करते. आपल्या देशातील अकार्यक्षम व अतिशय सुमार प्राथमिक शिक्षणयंत्रणेमुळे कोट्यवधी मुले शिक्षणापासून दुरावतात. कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यातील हा मोठा अडसर आहे. मनुष्यबळाची अशी परवड करणारी अर्थव्यवस्था भक्कम होऊ शकत नाही.’

जपानमध्ये १८७२ साली ‘शिक्षणाविना कुठल्याही समूहातील एकही कुटुंब वा कुटुंबातील सदस्य अशिक्षित राहणार नाही,’ असा शिक्षणविषयक महत्त्वाकांक्षी जाहीरनामा प्रसृत केला गेला. त्यातून शिक्षणामधील त्रुटींकडे बारकाईने लक्ष दिले गेले. परिणामी, १९१० साली जपान संपूर्णपणे साक्षर होऊन आर्थिक झेप घेण्यासाठी सक्षम झाला.

या जपानच्या अनुभवापासून दक्षिण कोरिया, चीन, तैवान, हाँगकाँग, सिंगापूर, थायलंड या देशांनी स्फूर्ती घेऊन तोच कित्ता गिरवला. आर्थिक जागतिकीकरणाच्या काळात पूर्व आशियायी देशांचा चमत्कार जगासमोर आला, विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात शिक्षणात केलेल्या गुंतवणुकीची ती परिणती होती. त्यामुळे या देशांत नवीन रोजगाराच्या संधी सहज उपलब्ध झाल्या. निर्यात वाढली. आरोग्याच्या समस्या कमी झाल्या.

व्यक्ती, समाज व राष्ट्राच्या जीवनात विद्येमुळे कसा ‘अर्थ’ प्राप्त होतो, हे सेन उलगडून दाखवतात.

वैयक्तिक व सामाजिक जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडविण्याची किमया शिक्षणच करू शकते.

शिक्षण हा अग्रक्रम नसणारे देश विकास घडवू शकत नाहीत; परंतु मोकाट अर्थव्यवस्थेचे पाठीराखे तथाकथित ‘इंटरनॅशनल स्कूल’चा सुळसुळाट पाहून थरारतात. त्यांना शिक्षणदेखील पूर्णपणे बाजारपेठेच्याच हातात सोपवायचे आहे. शिक्षणप्रसार हा दारिद्र्य निर्मूलनातील कळीचा व अटळ भाग आहे, याची जाण असणाऱ्या अॅडम स्मिथलासुद्धा अशी भांडवलशाही अभिप्रेत नव्हती.

भारतात प्राथमिक शिक्षण सार्वत्रिक करण्यातील मोठा अडसर, पायाभूत रचना हाच आहे. अजूनही शिक्षणाच्या महामार्गावर कित्येक जाती-जमातींमधील पहिली पिढी येऊ शकत नाही. भटके व आदिवासींना शिक्षणात सामावून घेण्यासाठी उदार व लवचीक धोरण आवश्यक आहे; परंतु ती प्राथमिकता नसल्यामुळे शिक्षणातील दरी वाढतच आहे.

याची खंत बाळगणाऱ्या प्रा. सेन यांनी प्राथमिक शिक्षण, प्राथमिक आरोग्यसेवा आणि लिंगसमानता रुजविण्यासाठी नोबेल पुरस्काराची पूर्ण रक्कम घालून १९९८मध्ये ‘प्रतिची’ या संस्थेची स्थापना केली. (१९१३ साली रवींद्रनाथ टागोर यांनी नोबेल पुरस्काराची रक्कम ‘शांतीनिकेतन’ स्थापण्यासाठी दिली होती.)

बिहार, झारखंड, ओरिसा, पश्चिम बंगाल या राज्यांत, ‘अतिशय हलाखीतील पालक कमालीच्या हालअपेष्टा सहन करत मुलांना शिकवण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत असतात. प्राथमिक शाळेत दाखल करण्यासाठी भरमसाठ देणग्या मागितल्यामुळे शाळेपासून वंचित राहणाऱ्यांची संख्या वाढत आहे,’ असे या संस्थेचे सर्वेक्षण सांगते.

शिक्षक आणि आरोग्य सेवकांना अर्पण केलेल्या या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर, दिल्लीतील वाहतुकीच्या रस्त्याच्या कडेला अंगाचे मुटकुळे करून हाताच्या आधारावर डोके टेकवत गृहपाठ करणाऱ्या चिमुकलीचे छायाचित्र आहे.

पाचव्या शतकात साहित्य, भाषाशास्त्र, वास्तुकला, शिल्पकला, खगोलशास्त्र, औषधी विज्ञान, सार्वजनिक आरोग्य ह्या विषयांमधील जगभरातील अभ्यासकांना उच्च शिक्षण मिळवण्याकरिता नालंदा हे एकमेव विद्यापीठ उपलब्ध होते. चीन, जपान व इतर आशियाई देशांमधील विद्यार्थी तेथे अध्ययनासाठी येत असत.

११९०पासून झालेल्या हल्ल्यांमुळे, सुमारे ७०० वर्षे चाललेली अध्ययन व अध्यापन यात्रा खंडित झाली. (ऑक्सफर्डची स्थापना ११६७, केंब्रिज स्थापना — १२०९) अशा या ऐतिहासिक नालंदा विद्यापीठाचे पुनरुज्जीवन करण्याची कल्पना सेन अनेक वर्षांपासून मांडत होते.

२००७मध्ये आशियाई राष्ट्रांच्या परिषदेमध्ये फिलिपाइन्स, चीन, जपान, कोरिया, सिंगापूर या देशांनी नालंदा विद्यापीठाच्या पुनर्स्थापनेचा ठराव मंजूर केला. पुढे जागतिक पातळीवरील तज्ज्ञांची निवड करून कार्यकारी समिती तयार केली आणि त्याचे नेतृत्व प्रा. सेन यांच्याकडे चालून आले.

तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदीसुद्धा) यांनी सदैव व सर्व प्रकारचे पाठबळ दिले. सिंगापूरचे परराष्ट्रमंत्री जॉर्ज यो हे उत्साहाने सहभागी झाले.

केवळ व्यापारच नाही, तर ज्ञानसाधनासुद्धा विविध देशांना एकत्र आणू शकते, हे दाखवून देण्यासाठी अनेक नवनवीन कल्पना घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षणसंस्था निर्माण करण्याचे अथक प्रयत्न चालू होते. मोदी सरकार आल्यानंतर अनेक हस्तक्षेपांमुळे त्याला कशी खीळ बसली, याची सविस्तर कैफियत सेन यांनी मांडली आहे.

सर्व सीमांच्या पलीकडे जाऊन विचार करणारी प्रा. सेन, डॉ. अनिल काकोडकर व रघुराम राजन, ही प्रभावळ राष्ट्राचे भूषण असते. त्यांना नाकारून त्यांचे वैयक्तिक नुकसान काहीच होत नाही. राष्ट्राची मात्र अपरिमित हानी होते.

‘रागमाला’ या आत्मचरित्रात रविशंकर यांनी ‘टागोर यांचा जन्म पाश्चिमात्य देशात झाला असता, तर त्यांना शेक्सपियर व गटे यांच्या मालिकेत स्थान लाभले असते,’ असे म्हटले आहे.

सेन म्हणतात, ‘हा दावा अतिशयोक्त असला, तरी त्यातून टागोरांच्या विचारांची महती आजही टिकून असल्याकडे रविशंकर लक्ष वेधू इच्छितात. केवळ भारत व बांगला देशच नाही, तर जपान व चीनमध्ये सुद्धा आजदेखील टागोर यांच्या लघुकथा, कविता, निबंध व पत्रव्यवहारांना वाचकवर्ग लाभत आहे.’

खुल्या मनाने प्रत्येक बाबीची कसून चिकित्सा करण्याचे स्वातंत्र्य हे रवींद्रनाथांचे विलक्षण वैशिष्ट्य होते. याबाबत ते काळाच्या खूपच पुढे होते.

१९३४मध्ये ‘बिहारचा भूकंप म्हणजे जातिभेद पाळण्याची परमेश्वराने दिलेली शिक्षा आहे,’ असे गांधीजी म्हणाले होते. याला जाहीर उत्तर देताना ‘जातिप्रथा ही वाईटच आहे; परंतु भूकंप हा नैसर्गिक आहे, दोन्हींचा एकमेकांशी अजिबात संबंध नाही,’ असे रवींद्रनाथांनी स्पष्टपणे सांगितले होते.

गांधीजींविषयी असलेल्या अतीव आदरामुळे त्यांना ‘महात्मा’ या उपाधीने गौरवणाऱ्या रवींद्रनाथांनी त्यांच्याशी असणारे मतभेद वेळोवेळी निःसंकोचपणे व्यक्त केले. व्यक्ती वा सत्ता यांच्यामुळे दबून न जाता सुसंस्कृतपणे मतभिन्नता जपण्याच्या स्वातंत्र्याला रवींद्रनाथांनी मूलभूत हक्क मानले.

सेन यांनी ‘टागोर यांनी कोणता बदल घडवला?’ या निबंधात रवींद्रनाथांच्या विचारांमधील अभिजाततेची महती उलगडून दाखविली आहे. पौर्वात्य व पाश्चात्त्य विचार, नवता व परंपरा, निसर्ग व मानव, व्यक्ती व समाज, बुद्धी व भावना ही सारी द्वैते मिटवून त्यांच्यात अद्वैत साधत भारताला त्यांनी आधुनिक व उदार विचार दिला.

‘क्षुद्र भिंतीविना अखंड जग, मुक्त ज्ञान आणि भयशून्य मन’ ही रवींद्रनाथांची आकांक्षा पसायदानासारखी त्रिकालाबाधित राहणार आहे.

‘कोणाच्या आधारे करू मी विचार, कोण देईल धीर माझ्या जीवा, शास्त्रज्ञ, पंडित नाही मी एक वाचक, याती शुद्ध एक ठाव नाही.’

संत तुकाराम यांनी सांगितलेली अशी अवस्था, आपल्यासाठी अनेक वेळा होते. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील घटना व प्रसंग साधारणपणे सारखेच असतात. सर्वसाधारण व्यक्ती घटनांच्या खोलात जात नाहीत. एखाद्या घटनेमुळे अस्वस्थ झाल्यास वैयक्तिक निष्कर्ष काढत व्यक्तीला अथवा नशिबाला जबाबदार धरून हा प्रवास थबकतो.

असामान्य व्यक्ती खोलवर बुडी मारून त्या प्रसंगामागील कारणांचा शोध घेतात. त्यांच्यामुळे महाकाय व्यवस्थेचे आकलन होते. जटिलता, गुंतागुंत, अव्यवस्था ध्यानात येते. प्रश्नाचे स्वरूप आणि उत्तरांची दिशा समजते.

समाजाला विचारांचा आणि विवेकाचा आधार देऊ शकणारे विचारवंत अतिशय दुर्मीळ असतात. वाणी आणि लेखणी यांतून वर्तमानाचा अन्वय घेऊन भविष्यासाठी कृतिआराखडा देणारे प्रा. सेन यांच्यासारखे तत्त्वज्ञ दुर्लभ असतात.

महान कलावंत प्रदीर्घ कालखंडभर एखाद्या संकल्पनेचा विस्तार करीत जातात, निरनिराळ्या पद्धतींनी ती समजावून सांगतात. यातून रागमालिका, चित्रमालिका व वास्तुसंकुलं निर्माण होतात.

गेल्या ४४ वर्षांपासून प्रा. सेन, दारिद्र्यामागील अनेक कारणांचा सखोल मागोवा घेत नवीन पद्धतीने विश्लेषण करीत आहेत. एकाच वेळी तज्ज्ञ व सामान्यांशी संवाद साधताना तशीच मालिका सादर करीत आहेत.

विलंबित, द्रुत, टप्पा, तराणा, या सर्व रीतींनी एकच राग ऐकण्याचा अवर्णनीय आनंद शब्दातीत आहे. त्या दर्जाचा आनंद प्राप्त करायचा असेल, तर सुज्ञांनी हे पुस्तक वाचलेच पाहिजे.

भाग समाप्त — विद्येमुळे व्यक्ती, समाज आणि राष्ट्राच्या जीवनाला प्राप्त होणारा ‘अर्थ’


संपादकीय तथ्यपडताळणी

१. अमर्त्य सेन यांचे अर्थशास्त्रातील योगदान

स्थिती : निश्चित

अमर्त्य सेन यांना १९९८चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कल्याण अर्थशास्त्रातील योगदानासाठी देण्यात आला. त्यांच्या संशोधनात दारिद्र्य, विषमता, सामाजिक निवड आणि दुष्काळ यांचा विशेष अभ्यास होता. कल्याण मोजताना केवळ उत्पन्न न पाहता व्यक्तीच्या प्रत्यक्ष संधी व क्षमतांचा विचार करावा, हा त्यांच्या विचारांचा महत्त्वाचा भाग आहे.


२. मनुष्यविकास निर्देशांक आणि महबूब उल हक

स्थिती : निश्चित

१९९०च्या पहिल्या Human Development Report मध्ये विकासाकडे केवळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या दृष्टीने न पाहता मानवी जीवनातील संधी, आरोग्य, शिक्षण आणि योग्य जीवनमान यांचा विचार करण्याची भूमिका मांडण्यात आली. महबूब उल हक यांच्या नेतृत्वाखाली हा दृष्टिकोन UNDPच्या विकासविचारात केंद्रस्थानी आला. अमर्त्य सेन यांच्या capability approach चा त्यावर महत्त्वाचा बौद्धिक प्रभाव होता.

म्हणून लेखातील “हक यांनी निर्देशांक विकसित केला आणि सेन यांनी त्याला तात्त्विक अधिष्ठान दिले” हा मुख्य आशय मोठ्या प्रमाणात बरोबर आहे.


३. थॅचर–रेगन आणि ‘मोकाट अर्थकारण’

स्थिती : अंशतः बरोबर / लेखकाचे विश्लेषण

मार्गरेट थॅचर आणि रोनाल्ड रेगन यांच्या काळात बाजाराभिमुख आर्थिक धोरणांना मोठे महत्त्व मिळाले, हे ऐतिहासिकदृष्ट्या मान्य आहे. मात्र “त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाची गरिबाभिमुख धोरणे बदलण्यास भाग पाडले” हा शब्दशः कारण-परिणामाचा दावा अधिक गुंतागुंतीचा आहे. त्यामुळे तो लेखकाचा राजकीय-आर्थिक विश्लेषणात्मक निष्कर्ष म्हणून वाचणे योग्य आहे.


४. १९८०चे दशक आणि रोजगार

स्थिती : संदर्भाधारित / पुरावा अपुरा

‘१९८०चे दशक हे रोजगारहित विकासाचे दशक होते’ हे एक व्यापक मूल्यांकन आहे. याला सार्वत्रिक, निर्विवाद ऐतिहासिक तथ्य म्हणून मांडण्यासाठी देशनिहाय रोजगाराच्या आकडेवारीची आवश्यकता आहे. त्यामुळे हे वाक्य लेखकाच्या संदर्भातील आर्थिक मूल्यांकन म्हणून ठेवणे योग्य.


५. जपानची १८७२ची शिक्षणव्यवस्था

स्थिती : अंशतः बरोबर

जपानने १८७२मध्ये आधुनिक राष्ट्रीय शिक्षणव्यवस्थेची पायाभरणी करणारा Gakusei अर्थात Education System Order जारी केला. त्यातून देशभर शाळांची रचना उभारण्याचा प्रयत्न झाला. १८८६मध्ये प्राथमिक शिक्षणव्यवस्था अधिक व्यवस्थित करण्यात आली आणि सक्तीच्या शिक्षणाचा विस्तार झाला.

मात्र “१९१० साली जपान संपूर्णपणे साक्षर झाला” हा अचूक दावा स्वतंत्र स्रोतांमधून येथे निश्चित करता आला नाही. त्यामुळे तो पुरावा अपुरा म्हणून नोंदवणे योग्य.


६. प्रतिची संस्था आणि नोबेल पुरस्काराची रक्कम

स्थिती : अंशतः बरोबर

अमर्त्य सेन यांनी १९९८च्या नोबेल पुरस्कारानंतर मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेतील काही भाग वापरून Pratichi Trustशी संबंधित काम सुरू केले. त्यांच्या स्वतःच्या नोबेल चरित्रात साक्षरता, प्राथमिक आरोग्यसेवा आणि लिंगसमानतेसाठी पुरस्काराच्या रकमेचा उपयोग केल्याचे स्पष्ट आहे.

मात्र प्रतिचीच्या अधिकृत संकेतस्थळानुसार Pratichi (India) Trust ची स्थापना १९९९मध्ये झाली, त्यामुळे लेखातील “१९९८मध्ये संस्थेची स्थापना” या तारखेला दुरुस्तीची आवश्यकता आहे.


७. नालंदा विद्यापीठ

स्थिती : मुख्य आशय निश्चित; काही तपशील वादग्रस्त/अतिशयोक्त

नालंदा हे प्राचीन भारतातील अत्यंत महत्त्वाचे बौद्ध शिक्षणकेंद्र होते. UNESCOनुसार नालंदा महाविहाराचा शैक्षणिक इतिहास साधारण पाचव्या ते तेराव्या शतकापर्यंतच्या दीर्घ कालखंडाशी संबंधित आहे आणि चीन, कोरिया, जपान, तिबेट, मंगोलिया, श्रीलंका व आग्नेय आशियातून विद्वान तेथे येत होते.

आधुनिक नालंदा विद्यापीठाच्या अधिकृत इतिहासानुसार पुनरुज्जीवनाची कल्पना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी २००६मध्ये मांडली; २००७च्या East Asia Summit प्रक्रियेत त्याला पाठबळ मिळाले. भारताच्या सरकारने २००७मध्ये Amartya Sen यांच्या अध्यक्षतेखाली Nalanda Mentor Group स्थापन केला.

त्यामुळे लेखातील सेन यांच्या भूमिकेचा मुख्य भाग निश्चित आहे.

मात्र “नालंदा हे एकमेव विद्यापीठ होते”, “११९०पासून हल्ले सुरू झाले” आणि “सुमारे ७०० वर्षांची यात्रा एका विशिष्ट घटनेमुळे खंडित झाली” हे तपशील अधिक सावधपणे मांडणे आवश्यक आहे. UNESCOचा अधिकृत इतिहास नालंदेच्या ऱ्हासाला तेराव्या शतकातील विध्वंस व त्यानंतरच्या त्यागाशी जोडतो.


८. आधुनिक नालंदा विद्यापीठ

स्थिती : निश्चित

भारतीय संसदेने Nalanda University Act, 2010 मंजूर केला आणि आधुनिक नालंदा विद्यापीठाची स्थापना संस्थात्मक स्वरूपात झाली. अधिकृत माहितीनुसार पहिले विद्यार्थी सप्टेंबर २०१४मध्ये दाखल झाले.


९. अमर्त्य सेन आणि ‘The Country of First Boys’

स्थिती : निश्चित

The Country of First Boys and Other Essays हे अमर्त्य सेन यांचे पुस्तक Oxford University Pressने २०१५मध्ये प्रकाशित केले. पुस्तकात दारिद्र्य, विषमता, भूक, निरक्षरता, जागतिकीकरण, माध्यमे, स्वातंत्र्य, अन्याय आणि सामाजिक वगळणे यांसारख्या विषयांवरील निबंधांचा समावेश आहे.


संदर्भ व स्रोत

ऑनलाइन मूळ स्रोत:

१. Amartya Sen — Nobel Prize, 1998 — अधिकृत माहिती
Nobel Prize — Amartya Sen, 1998

२. UNDP — Human Development Report 1990
UNDP — Human Development Report 1990

३. UNDP — Human Development: Mahbub ul Haq आणि मानवी विकास दृष्टिकोन
UNDP — Human Development Reports

४. Pratichi — संस्थेची अधिकृत माहिती
Pratichi — About Us

५. Nalanda University — History and Revival
Nalanda University — History and Revival

६. UNESCO — Archaeological Site of Nalanda Mahavihara
UNESCO — Nalanda Mahavihara

७. Amartya Sen — The Country of First Boys and Other Essays
Oxford University Press — The Country of First Boys

८. Japan National Archives — 1872 Education System
Japan National Archives — Gakusei, 1872


ऐतिहासिक संदर्भभूमी

अमर्त्य सेन यांच्या विकासविचाराचा केंद्रबिंदू “माणसाचे जीवन किती समृद्ध झाले?” हा प्रश्न आहे. केवळ राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन किंवा संपत्ती वाढली म्हणून विकास झाला असे मानता येत नाही. आरोग्य, शिक्षण, सामाजिक संधी, स्वातंत्र्य आणि व्यक्तीला आपल्या इच्छेनुसार जीवन जगण्याची वास्तविक क्षमता यांनाही विकासाच्या मोजमापात स्थान मिळाले पाहिजे. UNDPच्या १९९०च्या पहिल्या मानव विकास अहवालातही विकास म्हणजे लोकांच्या निवडी व संधींचा विस्तार अशी भूमिका स्पष्ट करण्यात आली.

याच व्यापक विचारपरंपरेत महबूब उल हक आणि अमर्त्य सेन यांचे कार्य महत्त्वाचे ठरते. सेन यांना १९९८मध्ये कल्याण अर्थशास्त्रातील योगदानासाठी नोबेल पुरस्कार मिळाला.

शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक समानता या विषयांकडे सेन यांनी केवळ कल्याणकारी खर्च म्हणून नव्हे, तर मानवी क्षमतांच्या निर्मितीचा भाग म्हणून पाहिले. त्यांच्या नोबेल पुरस्कारानंतरच्या कार्यातही साक्षरता, प्राथमिक आरोग्यसेवा आणि लिंगसमानता यांना महत्त्व दिले गेले.


काय निश्चित? काय वादग्रस्त?

निश्चित

  • अमर्त्य सेन यांना १९९८चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला.

  • त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू कल्याण, दारिद्र्य, विषमता, सामाजिक निवड आणि मानवी क्षमता हा आहे.

  • महबूब उल हक यांच्या नेतृत्वाखाली मानवी विकासाचा दृष्टिकोन UNDPमध्ये १९९०पासून प्रभावी झाला.

  • १९९०चा Human Development Report हा या नव्या दृष्टिकोनाचा महत्त्वाचा टप्पा होता.

  • जपानने १८७२मध्ये आधुनिक राष्ट्रीय शिक्षणव्यवस्थेची पायाभरणी केली.

  • नालंदा हे प्राचीन भारतातील अत्यंत महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय शिक्षणकेंद्र होते.

  • आधुनिक नालंदा विद्यापीठाच्या पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेत अमर्त्य सेन यांची महत्त्वाची भूमिका होती.

अंशतः बरोबर

  • प्रतिचीची स्थापना १९९८मध्ये झाली — नोबेल पुरस्कार १९९८चा असला तरी Pratichi (India) Trustची स्थापना १९९९ची असल्याचे संस्थेच्या अधिकृत माहितीत आहे.

  • जपान १९१०मध्ये पूर्णपणे साक्षर झाला — हा अचूक दावा अधिक स्वतंत्र पुराव्याने तपासणे आवश्यक आहे.

  • नालंदाच्या विध्वंसाची एकरेषीय तारीख व कारण सांगणे इतिहासाच्या अधिक गुंतागुंतीच्या प्रक्रियेला सोपे करते.

वादग्रस्त / लेखकाचे विश्लेषण

  • थॅचर–रेगन धोरणांमुळे संयुक्त राष्ट्रसंघाची गरिबाभिमुख धोरणे बदलण्यास भाग पाडली गेली, हा दावा.

  • “नालंदा हे एकमेव विद्यापीठ होते” हा शब्दशः दावा.

  • “भारत आणि पाकिस्तान मनुष्यविकासाच्या यादीत जगाच्या तळाशी आहेत” हे कोणत्या वर्षाच्या निर्देशांकाचा संदर्भ आहे यावर अवलंबून बदलणारे विधान आहे.

  • अमर्त्य सेन यांच्या विचारांना विशिष्ट राजकीय निर्णयांमुळे “खीळ” बसली, हा लेखातील राजकीय निष्कर्ष स्वतंत्र पुराव्याने तपासण्यासारखा आहे.

पुरावा अपुरा

  • “१९१०मध्ये जपान संपूर्णपणे साक्षर झाला” हा अचूक वर्षाधारित दावा.

  • लेखातील काही व्यक्तींच्या उद्धरणांचे शब्दशः मूळ इंग्रजी संदर्भाशी जुळणारे स्वतंत्र प्रमाणीकरण.



आदरणीय विजयजी, 


अतिशय विचारप्रवर्तक, अस्वस्थ करणारा आणि पुन्हा पुन्हा वाचावा असा लेख.


तुमच्या लेखाचे मला सर्वाधिक कौतुक यासाठी वाटते की तुम्ही अवघड विषयाला अवघड भाषेत मांडलेले नाही. ससाणा, डोळा, भक्ष्य, पिल्ले, जनुके, डार्विन आणि निसर्गातील क्रौर्य या साध्या प्रतिमांमधून तुम्ही एक मोठा तात्त्विक प्रश्न वाचकासमोर ठेवला आहे.


सहेतुकता आहे की नाही, हा प्रश्न जितका महत्त्वाचा आहे; त्याहून महत्त्वाचे म्हणजे आपल्याला जगात दिसणाऱ्या ‘हेतू’चा अर्थ आपण कसा लावतो, हा प्रश्न आहे.


लेख वाचून एकच जाणवते...


निसर्गाची गूढता कमी करण्यासाठी विज्ञान जन्मलेले नाही; ती गूढता समजून घेण्याची आपली नजर अधिक प्रगल्भ करण्यासाठी ते आहे.


निसर्गाच्या अद्भुत रचनेमागे ईश्वरी हेतू आहे की उत्क्रांतीची अनाकलनीय किमया—हा प्रश्नच या लेखाला विलक्षण खोली देतो. वाचून संपणारा नव्हे, तर वाचल्यानंतरही मनात दीर्घकाळ घुमत राहणारा हा विचारप्रवर्तक लेख आहे.


आणि


निसर्ग आपल्याला उत्तरांपेक्षा प्रश्न अधिक देतो आणि कदाचित त्या प्रश्नांना प्रामाणिकपणे सामोरे जाणे, हाच खरा विवेक आहे.

सुनील घायाळ (होशिंग)