* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: पुन्हा बेडूक-बाबा / Frog-dad again

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

7/3/26

पुन्हा बेडूक-बाबा / Frog-dad again

रॅफ नोकोबीला फिरायला गेला होता.त्याची योजना जमिनीवर आकार घ्यायला लागायची होती,पण बिल् रॉबिन्सनं प्रचार भरपूर केला होता."दोनही जगांमधलं सर्वोत्तम",दक्षिणेच्या विकासाचा आणि पर्यावरण रक्षणाचा मानदंड,त्याचा म्हणे पुलित्झर पुरस्कारासाठी विचार होत होता.खुद्द संडरलंड असोसिएट्सला नेचर काँझर्व्हन्सीचा 'हरित-पर्ण' पुरस्कार मिळणं शक्य होतं.रॅफला अनेक जागांकडून भाषणं द्यायची आमंत्रणं येत होती.आणि यातच आईवडिलांना भेटणं,नोकोबीला भेटून येणं,हेही रॅफ जमवत होता.

अशीच एक संध्याकाळ.सावल्या लांबलेल्या.झाडी काळवंडू लागलेली.रॅफ जंगलातून पायवाटेजवळच्या आपल्या कारजवळ आला.तीन माणसं तिथे उभी होती. रेव्हरंड वेन लेबो,बो रेनी आणि तिसरा एक विशीच्या आतला तरुण.बोटभर दाढी.काळा चष्मा. रुंद कडेची हॅट.तिघंही कारची वाट अडवून उभे.

रॅफ मनातून घाबरला.पळावं का जंगलात ? पण एखादे वेळी ते नुसतेच 'झालं गेलं,गंगेला मिळालं' करायला आले असतील.मग पळून जाणं फारच विचित्र ठरेल, किंवा मागच्या भेटीसारखी नुसती तोंडातोंडी करायची असेल.आणि हा काऊबॉय हॅटवाला नवा पोरगा कोण?

शक्य तितक्या तटस्थ आवाजात रॅफनं विचारलं, "रेव्हरंड लेबो,ना? काय करू तुमच्यासाठी?"

तुझ्याशी बोलायचं आहे." लेबो तुटकपणे म्हणाला.

"आवडलं असतं,मला बोलायला.पण जरा घाईत आहे. नंतर कधीतरी भेटू." रॅफ त्यांना वळसा घालून गाडीकडे जात म्हणाला.

"नाही. आत्ता." लेबो पुन्हा म्हणाला.रेनीनं शर्टाची एक घडी बाजूला केली;कमरपट्ट्यात एक आखूड नळीचं पिस्तूल होतं,ते दाखवायला.

"बाप रे!" रॅफ मनात म्हणाला. "बरं,बोला,जर इतकं निकडीचं असेल तर..."

"आधी काहीतरी दाखवायचं आहे,तुला." लेबोनं मानेनं जंगलाकडे खूण केली.रॅफला समजेना,काय असेल ते. पोलिसात रिपोर्ट करायला हवा होता,असं मात्र वाटून गेलं.

"कुठे जायचं आहे?" त्यानं विचारलं.

"नदीकडे." लेबो म्हणाला.म्हणजे त्यांना काय करायचं आहे हेही ते लपवत नाही आहेत, रॅफच्या मनात आलं.मला नाहीसं करणार आहेत !

पण नोकोबी परिसर त्यांच्यापेक्षा रॅफला चांगला माहीत होता.कुठे निसटायचं,कसा आडोसा शोधायचा,सारं त्याच्या डोक्यात रचलं जायला लागलं.दोघांकडे तरी पिस्तुलं होती.मोठा धोका होता.पण वाटेत एकदोन जागी 'डोम्स' होते.खाली लहानसं तळं,आणि त्यातून वर आलेली दाट अशी हार्डवुड वृक्षाची राई.जर असा एखादा डोम त्या तिघांपुढे आला,तर आपण पलीकडे पळून वाट काढू शकू.

जरा वाट चालल्यावर रॅफनं करंगळी दाखवली.लेबो थांबला.म्हणाला, "जरा दूर जा.पण काही शहाणपणा करू नको!" काऊबॉय हॅटवाल्याला म्हणाला, "संकी, त्याच्यामागे जा.काही गडबड केली तर गोळी घाल त्याला!"

रॅफ पायवाट सोडून डोमभोवतीच्या झाडोऱ्यात शिरला. "पुरे! थांब!" संकी म्हणाला.रॅफनं पँटचं झिप खेचल्यासारखं केलं आणि जरा वळून संकीकडे पाहिलं, जवळच होता.पण दोघं लेबो आणि रेनीपासनं थोडे दूर आले होते.पिस्तुलं सगळी अजूनही पट्ट्यांमध्येच होती.

"थांब संकी, साप!" रॅफ म्हणाला,आणि संकीला जोरानं धक्का दिला.तो खाली पडायच्या आतच रॅफ डोमला वळसा घालून जिवाच्या आकांतानं जंगलाकडे पळत सुटला.

मंकी सावरून त्यानं पिस्तुल काढायच्या आत रॅफन जंगल गाठलं होतं.

रेनीनं रेफच्या वेगाचा अंदाज घेत जंगलात जरा पुढे गोळ्या झाडल्या.आडांमधून पळणाऱ्या हरणांवरही ही यक्ती फारशी यशस्वी ठरत नाही,आणि इथे तर अशा युक्त्या जाणणारा माणूस त्या टाळत होता.

लेबो आणि मंडळी डोमला वळसा घालून येईपर्यंत त्यांच्या पन्नासेक पावलं पुढे रॅफ पळत होता.त्याला कुठे जायचं ते माहीत होतं,तर पाठलाग करणारे चाचपडत होते.लवकरच शिकार आणि शिकारी यांच्यातलं अंतर शंभरेक पावलं झालं.

आता पाठलाग करणाऱ्यांनी पसरून जास्त भाग व्यापणारा पाठलाग सुरू केला.ते रॅफला नदीकडे लोटायच्या प्रयत्नात होते.तो थेट नदीकडे गेला.तर लवकरच त्या तिघांच्या जाळ्यात अडकणार होता. त्याला फार चांगलं पोहताही येत नव्हतं !

पण मधल्या काळात रॅफला पाठलाग करणाऱ्यांच्या सवयी आणि कौशल्याची पातळी समजू लागली होती. लेबो वयस्क होता,आणि बहुधा त्याच्याकडे पिस्तूलही नव्हतं.इतर दोघे मात्र अनुभवी शिकारी होते,पण पिस्तूल हे शिकारीचं हत्यार नव्हतं! आता प्रयत्नानं रॅफ बेडूक-बाबाच्या घराकडे पळत होता.इतर माणसांना भेटणं,हा पाठलागापासून वाचायचा सर्वांत भरवशाचा मार्ग होता;भलेही माणूस बेडूक-बाबासारखा घनचक्कर का असेना !

आडवंतिडवं पळत,मधूनच एखाद्या गोळीच्या आवाजानं दचकत रॅफ बेडूक-बाबाच्या घरापुढच्या धक्क्याजवळ पोचला.त्याची चाहूल बेडूक-बाबाला लागली असावी, कारण तो दारातच उभा होता.अगदी नेमका मागे पाहिला होता तेव्हासारखाच दिसत होता.मळकट टीशर्टवर मात्र पाच वर्तुळं चितारलेली होती,आणि 'अटलँटा १९९६' असं लिहिलं होतं.एखादा दगड असावा तसा निश्चल उभा होता बेडूक-बाबा.

"प्लीज मला मदत करा! काही माणसं मागे लागली आहेत,मारणार आहेत मला!" धापा टाकत रॅफ म्हणाला.

बेडूक-बाबानं निर्विकारपणे पाहिलं,आणि बाजूला सरकला.रॅफ आत जाताच बेडूक-बाबानं एका मोठ्या कपाटाकडे हात केला.आत कळकट फडकी,हत्यारं, मासे पकडायचे रॉड्स वगैरे कचरा होता. "आत जा, आणि गप्प बैस." बेडूक-बाबानं आज्ञा केली.

दोनच मिनिटांत धापा टाकत रेनी आणि संकी आत आले.बेडूक-बाबाला म्हणाले, "आम्ही पोलीसचे अधिकारी आहोत.एक गुन्हेगार पळून इकडे आला आहे.आमचे साहेबही मागून येताहेत."

बेडूक-बाबा मख्ख उभा होता. आणखी दोनतीन मिनिटांत लेबो आला,घामानं भिजलेला आणि धापा टाकत असलेला.

"स्टेट पोलीस ! पेट्रोल पंप लुटून आलाय,तो माणूस. पाहिला का ? आम्हाला मदत करा" लेबो म्हणाला.

"ओळखपत्रं?" बेडूक-बाबानं विचारलं.

"कारमध्ये राहिली.लवकर मदत करा." लेबो म्हणाला. रेनी त्याला मानेनं खुणावत होता,की रॅफ घरातच आहे. "करता का मदत?" लेबोनं विचारलं.

"हो!" म्हणत बेडूक-बाबानं स्टँडवर ठेवलेली शॉटगन उचलली.कपाटाकडे पाहात म्हणाला, "ए बारक्या! बाहेर ये!"

रॅफ गप्प राहिला,तसा बेडूक-बाबा ओरडला, "येतोस, की दारातूनच गोळ्या खाणार आहेस?"

हात वर करून रॅफ बाहेर आला.थकवा आणि भीतीनं अर्धमेला झाला होता.पुढ्यात कोण कुठे आहे,तेही समजायला त्याला वेळ लागला.

पुढ्यात होता बेडूक-बाबा,शॉटगन त्याच्यावर रोखून. त्याच्यामागे लेबो आणि साथीदार.पण आता पिस्तुलं हातात नव्हती.ती कमरेला खोचून वर शर्ट सोडले होते, काट्याकुट्यांनी फाटलेले,माती-चिखलाचे डाग पडलेले.

"एक जण जाऊन नदीवर कोणी आहे का ते पाहून या. हाक मारून सांगा मला." बेडूक-बाबा म्हणाला.

रेनीनं अंगठ्यानं संकीला बाहेर जायला सांगितलं. मिनिटभरात हाक आली,"कोणी नाही!"

बेडूक-बाबानं तत्काळ वळून रेनीच्या छातीत गोळी घातली.तो धडपडत मागे पडला,हातपाय बाहेर फेकलेले.रॅफच्या कानठळ्या बसल्या.एक आंचका देऊन रेनी शांत झाला.रक्तामांसाचं धुकं त्याच्यावर बसू लागलं.लेबो बाहेर पळायला लागला,तर बेडूक-बाबानं शॉटगन परत झाडली.लेबोच्या डाव्या बाजूला पाठीत गोळी लागली.तो तोंडावर पडला.

"काय झालं? काय झालं?" असं ओरडत संकी दारातनं आला,आणि बंदूक पुन्हा 'पंप्' करून बेडूक-बाबानं संकीला गोळी घातली.

त्याचं पिस्तूल हवेत उडलं,आणि तो पायऱ्यांवरून मागे पडला.रॅफ जागच्या जागी थिजला होता.हात अजूनही शरणागतीच्या मुद्रेत वर होते. आता आपला नंबर का? त्याच्या मनात आलं.

"हरामखोर ! माझ्या घरात येऊन माझ्याशी खोटं बोलतात ! मला मारून माझी जमीन हडपायची आहे, घाण करायला,सगळीकडे!" पुढ्यातल्या लढाईच्या मैदानाकडे पाहात बेडूक-बाबा बोलत होता.

"तुला नाही मारणार,पोरा.पण पुन्हा कधी इकडे आलास,तर तुलाही खतम करीन.तुला काय वाटलं, विसरलो मी,तू मागे आला होतास ते? खूप वर्ष झाली ना? आणि एक पाहा.हे जे काय झालं इथे,त्याबद्दल कोणालाही,काहीही सांगायचं नाही.एक शब्द जरी कुणापुढे बोललास,तर तू,तुझी खानदान,सारं संपवून टाकीन !"

"बेस्सर! येस्सर!" रॅफ म्हणाला.तो घामानं डबडबला होता.हात कापत होते.घशाला कोरड पडली होती. बेडूक-बाबा मात्र शांतपणे काडीनं दात कोरत होता. रॅफच्या अंगांगात सुटकेचा भाव दाटून आला.आता जायला हवं.पण त्याला आपला जीव वाचवणाऱ्याशी मैत्री करायची इच्छा होत होती.

"कोणी यांना शोधत आलं तर काय कराल?" रॅफनं त्या रक्ताळलेल्या प्रेतांकडे हात करत विचारलं.

"कोऽणी येणार नाही.याच्यांच्या मनात इकडे यायचं नव्हतं.तू आणि मी सोडून कोणाला काही माहीत नाही आहे.आणि यांच्या कोणा यारदोस्ताला ते इकडे आल्याचं माहीतही असेल,तर ते चूप बसतील.ते काही बोललेच,तर त्यांना ते या भानगडीत होते,हे कबूल करावं लागेल." बेडूक-बाबा शांत होता.

"पण नदीत टाकलं यांना,तर कुठेतरी,कोणाला तरी सापडतील ते."

"हे कुठे जात नाही आहेत.म्हणजे जातील नदीतच,पण सापडण्यातले नसतील.तुकडे करून ओल्ड बेन्ला खिलवीन.हजार पौंडात एक औंस कमी नाही आहे,तो. सगळं हजम करेल,अगदी हाडांसकट.इतर कचरा सगळा कॅफिशेस खातील.फक्त मगरीचं शेण जाईल नदीसोबत."

"आणि आता चालता हो,इथून.मी सांगितलं ते लक्षात ठेव.मी तुलाही या इतक्याच सहजपणे मारू शकतो आणि त्यानं माझी झोपही बिघडणार नाही!"

पडत्या फळाची आज्ञा घेऊन रॅफ निघाला.एक संकीची टोपी सोडली,तर संध्याकाळच्या घटनांचा मागमूसही उरला नव्हता.टोपीची विल्हेवाट लावणं कठीण नव्हतं. बेडूक-बाबापर्यंत कोणी पोचू शकणार नव्हतं.

पण रँफ परत आईवडिलांकडे नाही गेला,क्लेव्हिल् पार केलं,एक मोठी 'जॉनी वॉकर गोल्ड लेबल'ची बाटली घेऊन त्यानं मोबीलच्या वाटेवरचं एक मोटेल गाठलं.

कपडे काढून तो खाटेवर पडला,टीव्हीवर माणसं हसताहेत,बोलताहेत असा एक कार्यक्रम लावला,थेट बाटलीतून दारू प्यायला लागला.थकवा,उल्हास,दारू यानं गुंगी येताच बाटली बंद करून रॅफ झोपला.

स्काऊटच्या ट्रिपसोबत रॅफ नोकोबीत आला होता.

वारूळ पुराण,सातेरीचा वाडा झाला चिरेबंदी,माधव गाडगीळ, उदंड वारुळे जाहली ! ई.ओ.विल्सन, संक्षिप्त अनुवाद-नंदा खरे,मनोविकास प्रकाशन.

"हे भगवान! पाहा!" एक पोरगा म्हणाला.शेकडो मुंग्या एका लहान सरड्याला ओढून नेत होत्या. शकाही मुंग्या वारुळाकडे जाऊन "या!" असे संदेश देत होत्या. सरड्याला शेपूट नव्हतं.डोकंही धडापासून तुटत आलं होतं.कोणत्या तरी घारीनं मारलं असणार,आणि पडला असणार चोचीतून.

"हे! लाखो मुंग्या असतील।" पोरगा म्हणाला.दहाएक हजार,रॅफ स्वतःशी म्हणाला.

समाप्त