* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: आव्हान द्या / Challenge

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१२/३/२५

आव्हान द्या / Challenge

जर अजून काही कामाला येणार नसेल तर हे करा.


चार्ल्स श्वाबचा एक मिल मॅनेजर होता.ज्याच्या मिलमध्येमजूर पुरसे उत्पादन करत नव्हते.श्वाबने मॅनेजरला विचारले,"असं का आहे की, तुमच्यासारखा सक्षम मॅनेजर असूनसुद्धा इथे पुरेसं उत्पादन होत नाहीये?" मॅनेजरने उत्तर दिले," मी नाही जाणत.मी मजुरांना समजावलं,प्रोत्साहित केलं,त्यांना लालूचपण दाखवली,मी त्यांना घाबरवलं-धमकावलं,

नोकरीवरून काढून टाकायची भीतीपण दाखवली;पण काही फायदा झाला नाही. ते कोणत्याही प्रकारे पुरेसं उत्पादन नाही करत." चर्चा संध्याकाळी होत होती आणि रात्रपाळीचे लोक कामावर येणार होते.श्वाबनी मॅनेजरकडून खडूचा तुकडा मागवला.मग त्याने आपल्या जवळ उभ्या असलेल्या मजुराला विचारलं,"आज तुमच्या शिफ्टने किती हिट्स केल्या?

'सहा' काही न सांगता श्वाबने खडूने फरशीवर मोठ्या अक्षरात लिहिले 'सहा' आणि तो गेला.(मित्र जोडा आणि प्रभावशाली बना.डेल कार्नेगी, मंजुल प्रकाशन)



जेव्हा रात्रपाळीचे लोक कामावर आले तेव्हा त्यांनी '६' लिहिलेलं बघितलं आणि विचारलं,याचा काय अर्थ आहे.


दिवसपाळीच्या लोकांनी सांगितले,"आज मोठे साहेब आले होते.त्यांनी आम्हाला विचारलं की, आमच्या शिफ्टने किती हिट्स केल्या? आम्ही त्यांना सांगितले,की आम्ही सहा हिट्स केल्यात. त्यांनी याच जमिनीवर तो आकडा लिहिला." दुसऱ्या दिवशीच्या सकाळी जेव्हा श्वाब परत मिलमध्ये आले,तेव्हा रात्रपाळीच्या शिफ्टने '६'ला मिटवून त्याच्या जागेवर मोठ्या अक्षरामध्ये '७' लिहिलं होतं.


जेव्हा दिवसपाळीचे लोक दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर आले,तेव्हा त्यांनी बघितलं की,फरशीवर मोठ्या अक्षरात '७' लिहिलं आहे.अच्छा,ते नाइट शिफ्टवाले समजत आहेत की,ते आमच्यापेक्षा जास्त योग्य आहेत.त्यांना धडा शिकवावाच लागेल. दिवस पाळीच्या लोकांनी उत्साहाने काम केले आणि जेव्हा ते घरी जाऊ लागले तर जाता जाता त्यांनी मोठ्या अक्षरात लिहून टाकलं '१०'. काम खूप वेगात होऊ लागलं.


काही काळानंतर ज्या मिलचं उत्पादन मर्यादेच्या उत्पादनापेक्षा खूप कमी होतं,त्याच्यात दुसऱ्या मिलपेक्षा जास्त उत्पादन होऊ लागलं.


या घटनेमुळे आम्हाला काय शिकवण मिळते? श्वाब म्हणतो की,काम करून घेण्याची एक पद्धत आहे. चढाओढीला प्रेरित करणे.पैसे कमवण्याची हीन चढाओढ असा अर्थ इथे अपेक्षित नाही,तर श्रेष्ठ होण्याच्या आकांक्षेशी आहे.


श्रेष्ठ होण्याची आकांक्षा ! आव्हान! उत्साही लोकांना प्रेरित करण्याचा अचूक मार्ग ! आव्हानाशिवाय थियोडोर रुजवेल्ट कधी अमेरिकेचे राष्ट्रपती बनू शकले नसते.क्युबाहून परत आल्यानंतर त्यांना न्यू यॉर्क स्टेटच्या गव्हर्नर पदाचा उमेदवार बनवलं गेलं.विपक्ष पार्टीने हे शोधून काढले की,ते या राज्याचे वैध नागरिक नव्हते. यावर रुजवेल्ट घाबरून गेले आणि आपलं नाव परत घेण्या बाबतीत विचार करू लागले,तेव्हा न्यू यॉर्कच्या अमेरिकन सीनेटर थॉमस कॉलियर फ्लॅटने त्याच्या समोर आव्हान ठेवलं.थियोडोर रुजवेल्टच्या समोर अचानक येऊन त्यांनी आपल्या जोरदार आवाजात म्हटले,"काय सान जुआन हिलचा हिरो डरपोक आहे.भित्रा आहे?" रुजवेल्टने मैदान सोडलं नाही आणि बाकी इतिहास आहे.एका आव्हानाने फक्त त्याचं जीवनच बदलले नाही तर त्याच्या देशाच्या भविष्यावर खूप जास्त प्रभाव पडला.


प्राचीन ग्रीसमध्ये किंग्जगार्डचं आदर्श वाक्य होतं,'भितात सगळेच;

परंतु बहादूर लोक आपल्या भीतीला एका बाजूला ठेवतात आणि पुढे जातात. अनेक वेळा तर ते मरून जातात; परंतु जीत नेहमी त्यांचीच होते.'आपल्या भीतीला जिंकण्याच्या संधीपेक्षा मोठं आव्हान आणखीन काय असू शकते ?


जेव्हा अल स्मिथ न्यू यॉर्कचे गव्हर्नर होते,तेव्हा त्यांनी पण आव्हान देण्याची युक्ती केली.त्या वेळेस सगळ्यात कुख्यात सिंग सिंग जेलमध्ये कोणी वॉर्डन नव्हता.जेलच्या भिंतींना घेऊन अनेक अफवा आणि स्कँडल हवेत पसरवल्या जात होत्या. स्मिथला सिंग सिंगच्या वॉर्डच्या रूपात एका दमदार माणसाची गरज होती.एका लोहपुरुषाची;परंतु कोण? त्यांनी न्यू हैम्प्टनच्या लुइस आर.लॉजला बोलावलं.


"सिंग सिंगच्या वॉर्डन बनण्याच्या बाबतीत तुमचा काय विचार आहे?" त्यांनी स्मित हास्य करत लुइसला विचारलं,लुइस अवाक झाला.सिंग सिंगच्या संकटाची त्याला जाणीव होती.

एक राजनैतिक नेमणूक होती आणि राजनेत्यांच्या मूडवर निर्भर करीत होती.खूप वॉर्डन आले होते आणि येऊन गेले होते.त्यामधून एक तर तीन आठवड्यांपर्यंतच टिकू शकला होता.त्याला आपल्या करियरबाबत चिंता होणं अगदी स्वाभाविक होतं.हे संकट ओढावून घ्यायचं ?


स्मिथने तो मागे पुढे पाहत होता ते पाहिलं.तो आपल्या खुर्चीच्या मागे टेकला आणि हसला," हे बघ तरुण माणसा,मी तुला दोष देत नाही की तुला भीती वाटतेय.काम खूप कठीण आहे.तिथे जाण्याकरता आणि टिकून राहण्याकरता एका खूपच दमदार माणसाची गरज आहे." म्हणून तो गेला आणि तो तिथे टिकला;तिथेच राहून तो त्याच्या वेळेचा एक प्रसिद्ध वॉर्डन बनला.त्याचं पुस्तक '२०,००० इयर्स इन सिंग सिंग'च्या लाखो प्रती खपल्या.रेडिओ बातम्यांनी आणि जेलच्या त्याच्या गोष्टींना डझनवारी सिनेमांना प्रेरित केले. अपराध्यांचे 'मानवीयकरणा'चे त्याचे उपाय जेल क्षेत्रात चमत्कारात गणले गेले.महान फायरस्टोन टायर अँड टायर कंपनीचे संस्थापक हार्वे एस. फायरस्टोनने सांगितले आहे,"मी हे नाही मानत की पगार आणि केवळ पगारामुळेच चांगल्या लोकांना आपल्या कंपनीत आणू शकतो किंवा त्यांना तिथे ठेवलं जाऊ शकतं.

मला वाटतं की,खरं आकर्षण तर कामाचं स्वरूप आहे." 


महान बिहेव्हियरल साइंटिस्ट फ्रेडरिक हर्जबर्ग या गोष्टीशी सहमत आहेत. त्यांनी हजारो लोकांच्या काम करण्याच्या दृष्टिकोनांचे बारकाईने अध्ययन केले, ज्यात फॅक्ट्रीच्या मजुरांना घेऊन सिनियर एक्झिक्युटीव्हपण होते. तुम्हाला काय वाटतं की, त्यांच्या शोधात कोणतं तत्त्वं सगळ्यात प्रेरक राहिलं असेल. त्यांच्या कामाची कोणती बाजू त्यांना सगळ्यात अधिक आनंद देत होती? पैसा? कामाचं चांगलं वातावरण? सुविधा? नाही,यापैकी काहीच नाही. ते सगळ्यात मोठे तत्त्व ज्यामुळे लोकांना प्रेरणा मिळते ते होतं कामाची प्रवृत्ती. जर काम वेधक आणि आव्हानात्मक आहे, तर लोक ते काम करायला प्रेरित होतील आणि चांगल्या त-हेने करायला प्रोत्साहित होतील.


हेच प्रत्येक सफल व्यक्ती पसंत करते.आव्हान,आत्म -

अभिव्यक्तीची संधी,ती संधी ज्यामुळे तो आपली किंमत,

आपली श्रेष्ठता सिद्ध करू शकेल. जिंकून दाखवू शकेल.या कारणामुळेच तर चढाओढ इतकी लोकप्रिय आहे.श्रेष्ठ होण्याची आकांक्षा महत्त्वपूर्ण होण्याची आकांक्षा.