* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: शून्य गुण,पूर्ण विद्यार्थी : Zero marks,perfect student 

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

१४/२/२६

शून्य गुण,पूर्ण विद्यार्थी : Zero marks,perfect student 

नरसंहाराची साक्षीदार / Witness to the genocide या लेखमालेतील तिसरा भाग हा १५.०२.२६ रोजी प्रकाशित होईल.१३.०२.२६ या दिवशी एक तातडीचा,जिव्हाळ्याचा लेख प्रकाशित करीत आहे.- विजय गायकवाड


https://www.vijaygaikwad.com हा जगातील वाचकांनी भरभरून लोकप्रिय केलेला ब्लॉग,२० देशांमध्ये,२४९ भाषांमध्ये,वाचला जाणारा.. या ब्लॉगवर व्यक्तीने भेट दिली आणि त्यांना काही महत्वाचं काही गवसलं नाही असं कधीच होत नाही.हेच ते या ब्लॉगचे एकमेव वैशिष्ट्य..याच ठिकाणी उजव्या बाजूला Popular Posts हा विभाग आहे.या विभागामध्ये तेच लेख असतात.जे वारंवार जास्तीत जास्त प्रमाणात जास्त देशांमध्ये वाचले जातात.सध्या या ब्लॉगवर ६३२ लेख तर हा लेख प्रकाशित होईपर्यंत वाचकांनी भेट दिलेली संख्या ६८ हजार.।।


सध्या Popular Posts या विभागात …!!


१.अभ्यासाचे महत्त्व /Importance of study


https://www.vijaygaikawad.com/2024/10/importance-of-study.html?m=1


२.विज्ञान संप्रेषण व जागरूकता science communication and awareness


https://www.vijaygaikawad.com/2025/09/science-communication-and-awareness.html?m=1


३.मानवी संस्कार /Human rites


https://www.vijaygaikawad.com/2024/11/human-rites.html?m=1


हे तिन्हीही लेख लिहिले आहेत.आमचे लाडके मित्र डॉ.दीपक शेटे यांनी तर ह्या व्यक्तीला भेटलं की ब्रायन ट्रेसी यांचे तत्वज्ञान समोर येते.


यश म्हणजे स्वातंत्र्य,स्वतंत्र असणं हा जीवनातील सगळ्यात मोठा आनंद आहे.आपल्या मनात जे येईल ते करायला आपण मुक्त आहोत असं वाटणं म्हणजे स्वातंत्र्य..! हे तत्त्वज्ञान मला त्यांच्या पहिल्या भेटीत गवसले.त्यांची माझी भेट ही अजुनही माझ्यासाठी ताजीच आहे.


मी पाहिलेला भला माणूस....?


खरोखरच आपण भला माणूस पाहू शकतो का? तर याचे उत्तर आहे हो.. भली माणसं पुस्तकात जागोजागी दिसतात. आपण त्यांना वाचत वाचत मोठे होतो. पण आपण काही भला माणूस होत नाही.नुसतचं वाचण्याचा हा दिर्घ परिणाम..

आपण आता वाचतोय डॉ.दीपक शेटे यांचा चौथा लेख..!


शून्य गुण,पूर्ण विद्यार्थी : Zero marks,perfect student - मूल्यांकन व्यवस्थेचा पुनर्विचार


रशियाच्या शिक्षण पद्धतीत परीक्षेचा कमाल गुण ५ असतो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे—एखाद्या विद्यार्थ्याने उत्तरपत्रिका पूर्णपणे कोरी दिली तरी त्याला २ गुण दिले जातात.मॉस्को विद्यापीठात शिकायला गेलो त्या पहिल्याच दिवशी हे कळल्यावर मी अक्षरशः चकित झालो. मला ते अजिबात तर्कसंगत वाटले नाही.कोणी काहीही लिहिले नाही, तर त्याला शून्यच मिळायला नको का?


कुतूहलापोटी मी माझे प्राध्यापक डॉ. थिओडोर मेद्रायेव यांना विचारले,


"सर, एखादा विद्यार्थी काहीही लिहित नाही, तरी त्याला २ गुण देणे कसे योग्य आहे?"


डॉ. मेद्रायेव हसले. शांत आणि विचारपूर्वक आवाजात ते म्हणाले,


"शून्य म्हणजे अस्तित्वच नसणे. एखादी व्यक्ती प्रयत्न करत असताना ती शून्य कशी असू शकते? जरा विचार कर ...


 हा लेख सोशल मीडियावर वाचण्यात आला मग वाटलं आपण याच्यावर चिंतन करावं आणि लिहावं..


शिक्षणव्यवस्थेत गुण हा शब्द अत्यंत प्रभावी आहे.

तो केवळ विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेवर उमटणारा आकडा नसून,अनेकदा तो विद्यार्थ्याच्या आत्मविश्वासावर,

शिकण्याच्या प्रवृत्तीवर आणि भविष्यातील वाटचालीवर खोल परिणाम करणारा घटक ठरतो. म्हणूनच "रिकाम्या उत्तरपत्रिकेला शून्य गुण द्यावेत की किमान गुण?" हा प्रश्न तांत्रिक नसून मूल्याधिष्ठित आहे.


आजची मूल्यांकन व्यवस्था प्रामुख्याने उत्पादन-केंद्रित (product-oriented) आहे. विद्यार्थी काय लिहितो, किती अचूक लिहितो, हे मोजले जाते; पण तो शिकण्याच्या प्रक्रियेत कुठे आहे, त्याने किती प्रयत्न केले, त्याला कोणत्या अडचणी आहेत—याकडे दुर्लक्ष होते. परिणामी गुण म्हणजे न्याय नसून, अनेकदा निवड आणि नाकारण्याचे साधन बनते.


शून्य गुण : अपयश की अस्तित्व नाकारणे?गणितात शून्य ही एक आवश्यक संकल्पना आहे.पण शिक्षणात शून्य गुण देताना त्याचा अर्थ केवळ "उत्तर अयोग्य" एवढाच राहत नाही. 


तो विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणारा संदेश असा असतो— "तू काहीच केले नाहीस. तुझी किंमत शून्य आहे."


मानसशास्त्रीयदृष्ट्या हा संदेश धोकादायक आहे.अनेक विद्यार्थी शून्य गुणांना अपयश म्हणून नाही, तर स्वतःच्या क्षमतेवरील अंतिम शिक्का म्हणून स्वीकारतात. अशा वेळी शिकण्याची जिज्ञासा कमी होते, आत्मविश्वास ढासळतो आणि काही विद्यार्थ्यांसाठी शिक्षणापासून दुराव्याची प्रक्रिया सुरू होते.


शिक्षणाचा उद्देश जर विद्यार्थ्यांना पुढे नेण्याचा असेल, तर शून्य गुण हा पूर्णविराम ठरतो—जिथे प्रत्यक्षात अल्पविराम अपेक्षित असतो.


किमान गुण देणे : सवलत नव्हे, मान्यता रिकाम्या उत्तरपत्रिकेला किमान गुण देण्याच्या कल्पनेविषयी एक गैरसमज आहे—


की यामुळे निकष सैल होतील, विद्यार्थ्यांमध्ये आळस वाढेल आणि गुणवत्तेवर परिणाम होईल.

खरं तर किमान गुण देणे म्हणजे यश देणे नाही.

ते म्हणजे एवढी मान्यता देणे की—


"तू या प्रक्रियेचा भाग आहेस. तू प्रयत्नाच्या प्रवासात आहेस."


विद्यार्थी परीक्षा केंद्रात पोहोचतो, उत्तरपत्रिका स्वीकारतो, प्रश्न वाचतो—हे सर्व प्रयत्नच आहेत. उत्तर लिहिता न आल्यामुळे त्याचे मूल्यमापन ज्ञानाच्या अभावावर व्हावे, पण मानवी अस्तित्व नाकारून नव्हे.


किमान गुण ही दयाळूपणाची कृती नसून,

ती शिकण्याच्या प्रक्रियेचा सन्मान करणारी भूमिका आहे.


भारतीय शिक्षणव्यवस्थेत हा प्रश्न अधिक तीव्र का आहे?


भारतात परीक्षा केवळ शैक्षणिक मूल्यांकन नसून, ती सामाजिक आणि कौटुंबिक अपेक्षांशी जोडलेली आहे. गुणांवरच प्रवेश, संधी, प्रतिष्ठा आणि आत्ममूल्यांकन ठरते. अशा परिस्थितीत शून्य गुण हा केवळ आकडा राहत नाही—तो दबाव, न्यूनगंड आणि भीती निर्माण करणारा घटक ठरतो.


म्हणूनच भारतासाठी परदेशी मूल्यांकन पद्धतीची तशीच्या तशी अंमलबजावणी योग्य नाही. मात्र, त्या पद्धतीमागील मानवी दृष्टिकोन स्वीकारणे अत्यावश्यक आहे.


आकड्यांपलीकडे जाणारे मूल्यांकन : गरज आणि दिशा,भारतीय शिक्षणव्यवस्थेसाठी योग्य मार्ग असा असू शकतो—


अंतिम परीक्षेपेक्षा सतत व सर्वांगीण मूल्यमापन

प्रयत्न, सातत्य आणि सहभाग यांना महत्त्व शून्य गुणांऐवजी Feedback-based remarks अपयशानंतर पुनर्प्रयत्न आणि सुधारण्याच्या संधी अशा पद्धतीमुळे गुणवत्ता कमी होत नाही; उलट विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची जबाबदारी आणि आत्मविश्वास वाढतो.


निष्कर्ष..!!


खरा प्रश्न हा नाही की— रिकाम्या उत्तरपत्रिकेला किती गुण द्यावेत?

खरा प्रश्न हा आहे—

अपयशाच्या क्षणी आपण विद्यार्थ्याला पुढे जाण्याची दिशा देतो का?

जोपर्यंत एखादी व्यक्ती प्रयत्न करत आहे,

तोपर्यंत तिला संपूर्ण नकार नव्हे,

किमान मान्यता मिळायलाच हवी.

कारण— शिक्षण हे आकड्यांसाठी नसते.

ते माणसासाठी असते.

आणि माणूस—

तो कधीच शून्य नसतो.


-डॉ.दिपक शेटे ( गणितायन लॅब  निर्माते )

गणित शिक्षक आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज मिणचे.


दादा सप्रेम नमस्कार,अभ्यासाचे महत्त्व हा आपला लेख लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनात नव संजीवनी आणल्याशिवाय राहणार नाही.असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे संत तुकारामांच्या या काव्यपंक्तीचा परामर्श विस्ताराने आपण या लेखातून केला आहे. येणाऱ्या शेकडो पिढ्यांना हा अभ्यासाचा सुकर मार्ग दाखवणारा मैलाचा दगड ठरेल.


विनम्र,

सुभाष बाबाराव ढगे | subhashdhage1110@gmail.com

टीप: हे ईमेल https://www.vijaygaikawad.com वरील संपर्क फॉर्म गॅझेट मार्गे पाठवलेले आहे.


शिक्षण संदेश…


शिक्षणाचा एक अर्थ दर्शनाचा होतो.डॉ. दीपक शेटे यांना भेटल्यानंतर तो जाणवतो.त्यांनी ज्या पद्धतीने वरती विवेचन केलेले आहे,ते विचार करायला लावणारे आहे.या अनुषंगाने एक नोंद या ठिकाणी देत आहे.


गो.ना. मुनघाटे गुरुजींचे आत्मचरित्र ' माझी काटेमुंढरीची शाळा ' या पुस्तकाची हेरंब कुलकर्णी यांनी लिहिलेली प्रस्तावना वाचत असताना एक अतिशय सुंदर वाक्य वाचनात आले आणि एकदम थाडकन उडालोच. या वाक्याच्या भोवती बराच वेळ घुटमळलो.स्वतःच्या कर्तव्याची आणि पार पाडत असलेल्या जबाबदारीची जाणीव या वाक्याने करून दिले.आपण आपलं कर्तव्य पाडताना काय करायला पाहिजे ज्यामुळे आपलं कार्य अधिक प्रसन्न,चांगले आणि ज्यांच्यासाठी करतोय ते अधिक हितकारक होईल यावर विचार करायला भाग पाडणारे हे वाक्य...


  • आपल्या विद्यार्थ्यांवरचे निरतिशय प्रेम एवढी शिक्षक होण्याची एकमेव पूर्वअट आहे.जे. कृष्णमूर्तीना एक विद्यार्थी विचारतो की, 'आम्हांला खेळण्यात जितका आनंद वाटतो, तितका अभ्यासात का वाटत नाही ?' कृष्णमूर्ती म्हणतात 'तुझ्या शिक्षकांना शिकवण्यात आनंद वाटत नाही म्हणून तुम्हांला शिकण्यात आनंद मिळत नाही.' ते पुढे म्हणतात, 'एखादी गायिका बैठकीवर गाणे. म्हणण्यापूर्वी हजारो तास रियाज करते. गाणे तिच्या श्वासात आलेले असते. त्यामुळेच ती जेव्हा गायला बसते तेव्हा श्रोते ते गाणे कित्येक वर्षे गुणगुणत राहतात. असे तुझे शिक्षक जेव्हा शिकवण्यावर प्रेम करतील तेव्हा बाळा, शिक्षण हे तुझ्यासाठी खेळण्याइतकेच आनंदी झालेले असेल...!!