जर तुम्ही रागावलेला आहात आणि जर तुम्ही समोरच्याला दोन-चार गोष्टी ऐकवून देता आहात,तर यामध्ये तुमच्या मनातला राग तर निघून जाईल;पण समोरच्या व्यक्तीला काय वाटेल? समोरच्याला पण तुमच्या एवढा आनंद मिळेल का? तुमच्या रागानी,तुमच्या शत्रुत्वपूर्ण व्यवहाराने तो तुमची गोष्ट मानेल का ?
वुडरो विल्सनने सांगितलं होतं : जर तुम्ही माझ्या दिशेने मूठ वळवून येता,तर मी तुम्हाला विश्वास देतो की,मीसुद्धा माझी मूठ उगारेन;पण जर शांतपणे येऊन मला तुम्ही हे सांगता की,चला, आपण बसून यावर चर्चा करू आणि जर आमच्यात काही मतभेद असतील,तर हे समजायचा प्रयत्न करू की कोणकोणत्या मुद्यावर मतभेद आहेत.आम्हाला हा पत्ता लागेल की,आपले खूपच मुद्दे एकसमान आहेत आणि आपल्या दोघांत खूपच कमी मुद्यांवर मतभिन्नता आहे आणि जर आमच्यात धैर्य आहे,
स्पष्टपणे भावना व्यक्त करायची इच्छा आहे आणि आपण भेटून-बसून चर्चा करायला तयार आहोत,तर आपण आपल्या मतभेदांना दूर करू शकतो."
वुड्रो विल्सनच्या या गोष्टीचं जॉन डी.रॉकफेलर,जुनियरहून कोणतंही चांगलं उदाहरण होऊ शकत नाही.१९१५ साली रॉकफेलरला कोलोरॅडोमध्ये तिरस्का नजरेने बघितले जात होते.दोन वर्षांपासून रॉकफेलरच्या कंपनीत संप चालला होता.रागानी बिथरलेले मजूर कोलोरॅडो फ्यूल अँड आयरन कंपनीहून जास्त पगार मागत होते.रॉकफेलरच्या हातात त्या कंपनीचे नेतृत्व होते.मजुरांनी यंत्र आणि इमारतींची तोडफोड केली आणि पोलिसांना बोलवायला लागलं.खूप खूनखराबी झाली.संप करणाऱ्या मजुरांवर गोळ्या चालवल्या गेल्या आणि अनेक मजूर बळी गेले.
अशा वेळी जेव्हा वातावरणात इतका द्वेष पसरला होता,
की रॉकफेलर संप करणाऱ्याबरोबर आपलं म्हणणं पटवून देण्याचा प्रयत्न करत होते आणि तसं त्यांनी केलंही.
कसं ? अनेक आठवडे खर्च केल्यावर रॉकफेलरने संपवाल्यांच्या प्रतिनिधींना बोलवलं.त्यांचं हे भाषण एक मास्टरपीस आहे.याचा आश्चर्यकारक परिणाम झाला.
यामुळे द्वेषाच्या त्या तुफानी लाटा शांत झाल्या ज्या रॉकफेलरला बुडवणार होत्या.त्यांच्या भाषणानी त्यांच्या प्रशंसकांची संख्या वाढली.यामध्ये तथ्यांना धरून असं प्रस्तुत केलं गेलं होतं की,संप करणारे कर्मचारी चुपचाप आपल्या कामावर परत गेले आणि त्यांनी पगारवाढी
बद्दल एकही अवाक्षर काढलं नाही,ज्याबद्दल त्यांनी एवढा दंगा केला होता.या ऐतिहासिक भाषणाची सुरुवात पुढे दिली आहे.असं बघा की,यामध्ये मित्रत्वाची किनार आहे.
रॉकफेलर त्या लोकांबरोबर बोलत होते,जे काही दिवस आधी त्यांचा गळा घोटण्याची भाषा करत होते आणि अशी इच्छा करत होते की, त्यांना झाडाला टांगून फाशी द्यावी;परंतु रॉकफेलर इतके चांगले मित्रत्वपूर्ण होते,इतके उदार होते की,जसे काही ते मेडिकल मिशनरीला संबोधित करत होते.त्यांच्या या भाषणात या प्रकारची वाक्यं होती : मला अभिमान आहे की मी इथे आहे.मी तुमच्या घरी पाहुणा बनून गेलो होतो.मी तुमच्या बायका-मुलांना भेटलो आहे.आपण इथे काही अनोळखी लोकांप्रमाणे नाही आहोत,तर मित्रांप्रमाणे भेटत आहोत आणि आपलं हित समान आहे आणि आपल्या सदाचरणामुळेच मी इथे आहे.रॉकफेलरने आपल्या भाषणाची सुरुवात साधारण या प्रकाराने केली,"माझ्या जीवनातील हा एक महत्त्वपूर्ण दिवस आहे.पहिल्यांदाच मला या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींशी भेटण्याचं सौभाग्य मिळत आहे.मला तुम्हाला भेटल्यामुळे अभिमान वाटतो आहे आणि मी ही भेट जीवनभर कधीच विसरणार नाही.जर ही बैठक दोन आठवडे आधी झाली असती,तर मी तुमच्या समोर कोणी अनोळखी माणूस म्हणून उभा असतो आणि फक्त काही लोकांनाच ओळखू शकलो असतो; पण मागच्या आठवड्यात मी दक्षिणेकडे कोळसा क्षेत्रात सगळ्याच कँपमध्ये फिरलो आणि मी तुमच्या सगळ्यांच्या घरी जाऊन व्यक्तिगत सगळ्यांना भेटलो आहे आणि मी तुमच्या कुटुंबियांनाही भेटलो.आपण इथे अनोळखी लोकांसारखे नाही; पण मित्रत्वाच्या नात्याने भेटतो आहोत आणि मी याच मित्रत्वाच्या वातावरणात तुम्हाला आणि आपल्या परस्पर हितांच्या संबंधांबद्दल काही चर्चा करणार आहे.कारण ही कंपनीच्या ऑफिसर्सची आणि कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींची मीटिंग आहे.
यामुळे तुमच्या सद्इच्छेच्या कारणामुळेच मी इथे आहे.
कारण की दुर्भाग्यानी मी या दोन्ही श्रेणीत येऊ शकत नाही; पण मला असं वाटतं की,मी तुमच्या अंतरंगाशी जोडलेला आहे आणि एक प्रकारे मी स्टॉकहोल्डर्स आणि डायरेक्टर्सचा प्रतिनिधी आहे." हे शत्रूला मित्र बनवण्याच्या कलेचे उत्तम उदाहरण नाही आहे काय ?असं समजा की,
रॉकफेलरने दुसऱ्याच शैलीत चर्चा केली असती,असं समजा त्यांनी संपवाल्यांना दोषी ठरवलं असतं,त्यांच्या समोर विनाशकारी तथ्य सांगितलं असतं,त्यांना धमकी दिली असती,असं समजा त्यांनी आपल्या आवाजातल्या भावाने किंवा हावभावाने हे सांगितलं असतं की ते चूक आहेत, समजा की त्यांनी तर्कशास्त्राच्या एकूण एक नियमांचा प्रयोग करून हे सिद्ध केलं असतं की कामगार चूक होते, तर काय झालं असतं? त्याचा परिणाम हा झाला असता की दोन्ही पक्षांत तणाव वाढला असता, द्वेष वाढला असता, विद्रोह वाढला असता.जर कोण्या मनुष्याच्या मनात तुमच्या्बद्दल दुर्भावना आणि द्वेष आहे तर तुम्ही तर्कशास्त्राच्या आधाराने आपली गोष्ट मनवू शकत नाही.रागवणारे आई-बाप,फटकारणारे बॉस आणि नवरा तसंच चिडचिड्या बायकांना हे समजलं पाहिजे की,लोक आपले विचार बदलत नाहीत.जबरदस्तीचे प्रयोग करून त्यांना यापासून आपण परावृत्त नाही करू शकत की, ते तुमच्या-माझ्याबरोबर सहमत होतील;
पण जर आम्ही त्यांच्या प्रति नम्रपणे आणि मित्रत्वाच्या नात्याने व्यवहार केला तर होऊ शकतं.आम्ही त्यांच्या
कडून आपली गोष्ट मनवून घेऊ शकू.लिंकनने हीच गोष्ट शंभर वर्षाअगोदर सांगितली होती.हे आहेत त्यांचे शब्द :
एक जुनी आणि खरी म्हण आहे, एक गॅलन व्हिनेगरपेक्षा मधाचा एक थेंब जास्त माश्या पकडू शकतो.या प्रकारेच जर तुम्हाला कोणाचं मन जिंकायचं असेल,त्यालाआपल्या पक्षात आणायचं असेल,तर आधी त्याला जाणीव करून द्या की,तो तुमचा मित्र आहे.हाच तो मधाचा थेंब आहे जो त्याच्या हृदयाला हात घालेल आणि हाच तो महान रस्ता आहे ज्याच्याद्वारे तुम्ही त्याच्या विचारांना बदलू शकता.
बिझनेस एक्झिक्युटीव्हना कळलंय की संपकर्त्यांच्या प्रति मित्रत्वाच्या वागणुकीने फायदाच होतो.उदाहरणार्थ,व्हाइट मोटर कंपनीचे २,५०० कर्मचारी जेव्हा पगार वाढवण्या
करीता आणि युनियन शॉपच्या मागणीला घेऊन संपावर गेले,तर कंपनीचे प्रेसिडेंट रॉबर्ट एफ.क्लॅकनी आपलं स्व नाही गमावलं. त्यांनी त्यांच्यावर टीका नाही केली, त्यांना घाबरवलं-धमकावलं नाही, त्यांनी साम्यवाद किंवा तानाशाहीचा उल्लेखपण केला नाही.याच्याऐवजी त्यांनी उलट संपवाल्यांचे कौतुकच केले.त्यांनी क्लीवलँडच्या पेपरमध्ये एक जाहिरात प्रकाशित केली,ज्यात संपवाल्यांच्या शांतिपूर्ण मार्गाने हरताळ करण्याकरता त्यांची प्रशंसा केली गेली. संपवाल्यांना बेकार बसलेले बघून त्यांनी त्यांच्याकरता दोन डझन बेसबॉल बॅट आणि ग्लोव्हजसुद्धा खरेदी केले आणि त्यांना रिकाम्या जागांवर बेसबॉल खेळण्याचं सुचवलं. बॉलिंगमध्ये इंटरेस्ट घेण्याकरता त्यांनी एका बॉलिंग जॅलीला भाड्यानीपण घेतले आणि कामगारांना तिथं खेळण्याचे आमंत्रण दिले.
ब्लॅकच्या मित्रत्वाच्या सुरुवातीने तोच असर झाला जो मित्रत्वामुळे नेहमी होतो.याला उत्तर म्हणून कामगारांनीही मित्रत्वाचंच उत्तर दिलं. संपवाल्यांनी फावडी,कुदळी उचलल्या आणि फॅक्टरीच्या चारी बाजूंना जमा असलेले कागद, माचिस,सिगरेट थोटकांचा कचरा साफ केला. कल्पना करा की,संपावर गेलेले कामगार जास्त पगार आणि युनियनच्या मान्यतेकरता संघर्ष करत फॅक्टरीच्या आसपास जमलेल्या कचऱ्याला साफ करत होते.या प्रकारची घटना अमेरिकेच्या औद्योगिक संपामधल्या मोठ्या आणि तुफानी इतिहासात कधीच घडली नव्हती. हा संप एका आठवड्यातच संपला आणि कडवटपणा किंवा तणाव निर्माण होण्याचा तर काहीच प्रश्नच नव्हता.
डॅनियल वेब्स्टर जे ईश्वरासारखे दिसायचे आणि देवदूतांसारखे गोष्टी करायचे,जगातल्या नावाजलेल्या वकिलांमधले एक होते; पण ते आपल्या सगळ्यात सशक्त तर्वांना या प्रकारे मित्रत्वाच्या टिपणीने सुरुवात करायचे : ज्युरीला या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे, बहुधा यामुळे हे कळून येईल किंवा आम्हालाही तथ्य विसरायला नाही पाहिजे किंवा तुमच्यासारखे बुद्धिमान लोक सहजपणे या तथ्यांच्या महत्त्वांना समजू शकतात. कुठेही कोणतीही आक्रमकता नाही,कुठेच कोणता दबाव नाही,आपले विचार दुसऱ्यांवर थोपवण्याचा कुठलाच हेतू नाही. वेब्स्टरच्या याच दोस्तीच्या शांत आणि मृदू शैलीमुळे ते इतके सफल आणि महान वकील बनले.हे होऊ शकतं की,तुमच्या जीवनात संप तोडण्याची किंवा कोणत्याही खटल्याची बाजू मांडण्याची नौबत न येवो;पण जर तुम्हाला तुमचं भाडं कमी करायचं असेल,तेव्हा ही मित्रत्वाची शैली तुमच्या कामाला येईल का? या बघू या.
ओ.एल.स्ट्रॉब एक इंजिनिअर होते.ते आपल्या घराचं भाडं कमी करायला बघत होते;परंतु ते हेही जाणत होते की,त्यांचा घरमालक खूपच कडक होता.मिस्टर स्ट्रॉबनी आमच्या क्लासमध्ये सांगितलं,मी घर मालकाला लिहून दिलं की,मी आपली लीझ संपल्यानंतर घर रिकामं करू इच्छितो.खरी गोष्ट तर ही होती की,मी सोडू इच्छित नव्हतो.जर माझं भाडं कमी झालं असतं, तर मी आनंदाने तिथेच राहिलो असतो;पण याची काही संभावना नव्हती.
दुसऱ्या भाडेकरूनी पण असाच प्रयत्न केला होता आणि ते सफल झाले नव्हते.सगळ्यांनी मला हेच सांगितलं की, मालकाकडून भाडं कमी करवणं,खरंतर शक्य नाही;पण मी स्वतःला म्हणतो,'मी लोकांना प्रभावित करण्याचा कोर्स करतो आहे,याकरता मी आपल्या घर मालकावर काही सिद्धान्ताचा प्रयोग करून हे बघेन की,ते सिद्धान्त किती काम करतात.' पत्र मिळताच तो आपल्या सेक्रेटरी बरोबर माझ्याकडे आला.मी दरवाज्यातच मित्रत्वाचं अभिवादन करून त्याचं स्वागत केलं.
शिल्लक राहिलेला भाग २२.०४.२४ या दिवशीच्या लेखांमध्ये..