Religion is not a belief in certain supernatural occurrences, prayers and nor in the neccessity for certain cermonies; nor is it the superstition of ancient ignorance.
Religion is a certain relation established by man between his separate personality and the infinite universe or its Source, and man's purpose in life which resulting from that purpose.God is not a person and there is no personal immortality, but whenever anyone devotes his life to carry out his will, which is that love should grow within the individual,
the entire world,his work becomes indestructible and after his physical death will merge with the love existing in the cosmos,that is, with God. In this way a truly Christian life acquires a purpose, despite the inevitability of individual death, which makes life blissful and rob death of its sting.
These universal truths common to all religions are so simple,easily comprehensible and near to the heart of every man that they immediately compel recognition.We are of necessity led to recognise ourselves as a part of the whole- a part of something infinite. This infinite is God... to a ma materialist-matter; to an individualist-a magnified, non-natural man; to an idealist-his ideal,Love.
'गांधी नावाचे महात्मा' संपादक: रॉय किणीकर सहाय्यक:अनिल किणीकर,डायमंड पब्लिकेशन्स या पुस्तकातील… या पत्राचा मराठी भाषेमध्ये स्वैर अनुवाद केला आहे.आमचे मार्गदर्शक मित्र,लेखक,विचारवंत डॉ.रवींद्र श्रावस्ती यांनी त्यांचे विशिष्ट आभार व धन्यवाद..!!
धर्म म्हणजे विशिष्ट अलौकिक, दैवी घटनांवर विश्वास नव्हे ; विशिष्ट प्रार्थना आणि धार्मिक विधी करणेही नव्हे; अथवा अंधश्रद्ध प्राचीन अज्ञानही नव्हे; धर्म म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपल्या स्वतंत्र व्यक्तित्वाद्वारे अफाट विश्वाशी किंवा त्याच्या स्त्रोताशी विशिष्ट नाते निर्माण करणे होय ; तसेच व्यक्तीचा जगण्याचा उद्देश की ज्या विश्वातून तो आला आहे, त्याच्याशी नाते निर्माण करणे होय. देव हा एक व्यक्ती नाही आणि व्यक्तीला अमरत्व नाही; पण जेव्हा कोणीही व्यक्ती आपले आयुष्य देवाच्या इच्छेनुसार समर्पित करतो, आपल्या आत वाढत असलेल्या प्रेमाला जागून ; संपूर्ण जगात त्याचे काम अमर होते आणि त्याच्या भौतिक शरीराच्या मृत्यूनंतर त्याचे शरीर सृष्टीच्या प्रेमस्वरूपात म्हणजेच ईश्वरात विलीन होते. याप्रकारे खरे ख्रिश्चन म्हणून जगणे आपल्या जीवनात अर्थ प्राप्त करते, त्याला हेतू प्राप्त होतो ; व्यक्तीचा मृत्यू अटळ असला तरी जगणं आनंदमय होतं, व त्याद्वारे मृत्यूचा दंश देखील ते जगणं हिरावून घेऊ शकत नाही. सर्व धर्मांत आढळणारी ही विश्वव्यापक सत्ये दिसायला अगदी साधी आहेत ,कळायला सोपी आहेत. आणि प्रत्येकाच्या हृदयाजवळ जाऊन बसतील अशी आहेत व त्यांना समजून कार्य करायला बाध्य करतील अशी आहेत. आपण या अफाट अनंत विश्वाच्या पसार्याचे अभिन्न भाग आहोत याचा आम्हाला बोध झाला पाहिजे. ही अफाट अनंतता म्हणजेच ईश्वर आहे.. भौतिकावाद्याची भौतिकता, व्यक्तिवादाला अति महत्व देणार्या व्यक्ती , अनैसर्गिक व्यक्तित्व, आदर्शवादी लोक, यांंचा आदर्श जे प्रेम आहे, तेच ईश्वर आहे.
आदरणीय डॉ.रवींद्र श्रावस्ती साहेब
'यातनामुक्तीच्या विश्वात' या सदराखाली 'तरुण भारत संवाद' या वृत्तपत्रामध्ये आपली लेखमाला सुरू आहे.
वृत्तपत्राला 'ज्ञानाचे स्तोत्र' म्हटलं जातं आपली लेखमाला मी न चुकता आवर्जून वाचतो.वृत्तपत्र वाचणे हा एक शिष्टाचार आहे.'शरीर' या पुस्तकात एक मध्यवर्ती वाक्य आहे,ते म्हणजे 'प्रतिबंध हाच इलाज' आपल्या या अभ्यासपूर्ण लेखामुळे सर्वसामान्य माणुसही स्वतःच डॉक्टर बनून काळजी घेवू शकतो.एवढी ताकत आपल्या लेखामध्ये आहे.आजच्या जगामध्ये किरकोळ आजारी पडले तरीही महागड्या तपासण्या कराव्या लागतात.गरीब लोक दवाखान्याचे नाव काढताच त्यांचा रक्तदाब वाढायला लागतो.पूर्वी डॉक्टर व रुग्णांचे नातं वेदना
मुक्तीसाठीचं होतं.डॉक्टर हाच त्या रुग्णाचा पहिला नातेवाईक होता.आता तो व्यवसाय झालेला आहे.
आपला रुग्ण आपल्याकडून दुसऱ्या ठिकाणी जाऊ नये म्हणून त्याला जास्तीची किंवा अनावश्यक अँटोबायोटिक्स देवून बरं केलं जातं.पण आपल्यासारखे दुर्मीळ डॉक्टर अजून आहेत,जे संवादातून, विश्वास देवून रुग्णांवर उपचार करतात. आधार देतात. त्यामुळे रुग्णाला जास्त खर्च न पडता तो लवकर बरा होतो व डॉक्टरांच्या ऋणात राहतो.हिप्पोक्रेट्सच्या मते," निरोगी माणसाच्या शरीरात सगळे अवयव सुसंगतपणे वागत असतात.पण जेव्हा माणूस आजारी पडतो तेव्हा हा समतोल ढासळलेला असतो.आपलं शरीर स्वतःच स्वतःला बरं करायचा प्रयत्न करत असतं आणि आपण त्या शरीराला बरं होण्यासाठी योग्य वातावरण निर्माण केलं पाहिजे." हिप्पोक्रेट्स यांचं हे म्हणणं फक्त डाॅक्टरांनाच दिशादर्शक नाही तर सर्वांनाच आहे.
आज प्रत्येक डॉक्टराला पदवी मिळते तेव्हा
हिप्पोक्रेट्सची जी Oath (शपथ) आहे , ती घ्यावी लागते. असे सांगतात की ती हिप्पोक्रेट्सनं लिहिलेलीच नाही..! त्याच्या मृत्यूनंतर किमान सहा शतकांनी ती लिहिली गेली आहे.गेल्या हजारो वर्षांमध्ये त्या शपथेत अनेक बदल झालेले असले तरी आजही प्रत्येक डॉक्टरला या व्यवसायात पडण्यापूर्वी ती शपथ घ्यावी लागते.
त्या मूळच्या शपथेचा सारांश असा : मी अपोलो देवतेची शपथ घेऊन सांगतो, की मी माझ्या वैद्यकीय व्यवसायाशी अतिशय प्रामाणिक राहीन. तसंच मी हे काम करत असताना ज्या ज्या लोकांशी माझा संबंध येईल त्या सर्वांशी मी सहानुभूतीनं वागेन. मी भ्रष्टाचार करणार नाही.मी माझ्या ज्ञानाचा वापर फक्त आजारी माणसांना बरं करण्यासाठी करेन.मी कुणालाही कधीही विषारी औषध देणार नाही.मी कुठल्याही स्त्रीला तिच्या गर्भाचा नाश होण्यासाठी कधीही कुठलंही औषध देणार नाही. मी रुग्णांच्या खासगी बाबींविषयी किंवा त्यांच्या आजारांविषयी दुसऱ्यांशी उगीच चर्चा करणार नाही.मी कोणत्याही घरात गेलो तर तिथे मी रुग्णाला बरं करण्याचा सर्वतोपरीनं प्रयत्न करेन. मी जाणूनबुजून काहीही वेडंवाकडं करणार नाही.''सजीव' पुस्तकातील ही प्रतिज्ञा व हे उतारे ज्या क्षणी वाचले त्याच क्षणी आपले लेख व आपण दिसलात.आपले लेख सत्याची प्रचिती देतात.
आपणास व आपल्या लिखाणास माझा संवेदनशील सलाम व पुढील वाटचालीस मनस्वी शुभेच्छा."जर तुम्ही महान पावलांचा पाठलाग करत असाल तर तुम्ही महान पावलांचे ठसे सोडता."अर्नेस्ट अग्येमांग येबोह यांचं हे वाक्य आहे. हे ठसे सोडण्याचे कार्य दैनिक तरुण भारत हे वृत्तपत्र करीत आहे. त्याबद्दल या समूहाचे आदरणीय संपादक, उपसंपादक, कार्यालयीन स्टाफ या सर्वांचे आभार ! विशेषतः धन्यवाद यासाठीही की काय वाचावं अशा विचारात असणाऱ्या लोकांच्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे दैनिक तरुण भारत संवाद ! असे वैचारिक लेख प्रकाशित करून सर्वसामान्य वाचकांना असामान्य माणूस बनवण्यासाठीच्या प्रक्रियेमध्ये आपला वाटा खूप मोठा आहे. "कोणीही तुमच्या मेंदूत सत्य ओतणार नाही.हे तुम्हाला स्वतःसाठी शोधायचे आहे." हे 'नोम चोम्स्की' यांचं विधान यासाठी आपले वृत्तपत्र कार्यरत राहो,यासाठी शुभेच्छा!थांबतो.आपले शतशःआभार धन्यवाद !