तिसरी लाट…१२.०४.२५ या लेखातील तिसरा भाग…
तरी वाढ,क्षय,अचानक होणारी कोलमड,यापासून ते गुंतागुंतीच्या नव्या पातळ्या,अचानक फुसके ठरणारे मोठे बदल,किंवा आधी क्षुद्र भासणाऱ्या परंतु एकदम मोठ्या,स्फोटक शक्तीत रूपांतर पावणाऱ्या घटना अशा गोष्टींचे समाधानकारक स्पष्टीकरण करण्याची त्यांची कुवत नाही.
आज वैश्विक क्रीडांगणाच्या एका कोपऱ्यात न्यूटनचे कोष्टक सोडवले जात आहे.यांत्रिक कार्यकारणभाव ह्या गोष्टीकडे काही घटनांचे स्पष्टीकरण म्हणून पहाण्यात येते.परंतु एकूण एक घटनांना ती लागू पडू शकत नाही. निसर्ग,उत्क्रांती,प्रगती,
काळ,स्थळ आणि भौतिक यांच्याबद्दलच्या आपल्या बदलत्या दृष्टिकोणांमुळे कार्यकारणभाव व अचानकता यांच्याबद्दल नवा दृष्टीकोण जुळवण्याची धडपड जगभरचे शास्त्रज्ञ व विचारवंत करत आहेत.
अनेक शास्त्रज्ञ यांत्रिकपणे न घडणाऱ्या जगणे,मरणे, वाढणे,
उक्रांन्त,क्रांत होणे अशा गोष्टींच्या कार्यकारणभावाच्या स्पष्टीकरणार्थ नव्या मार्गदर्शक तत्त्वांचा पुरवठा करीत आहेत.बेल्जिअन,नोबेल पुरस्कार प्राप्त,इलया प्रिगोजाइन यांनी क्रम व गोंधळ, यदृच्छा व आवश्यकता अशा गोष्टींचे धक्कादायक संश्लेषण पुढे करून त्यांचा कार्यकारणभावाशी असणारा संबंध सांगितला आहे.
काही प्रमाणात,तिसऱ्या लाटेच्या संस्कृतीतील कार्यकारणभाव सिस्टिम थिअरीच्या कल्पनेवर आधारलेला आहे.फीडबॅकची कल्पना याचे उत्तम उदाहरण म्हणजे घरात बसवलेला थर्मोंस्टँट याच्याद्वारे घरातील,खोलीतील तापमानाची पातळी एक सारखी राखली जाते.थर्मोस्टँटने भट्टो सुरू केली की तपमान वाढू लागते.
खोली पुरेशी उबदार झाली की ते भट्टी बंद करते.आणि ज्यावेळी तापमान खाली येते त्यावेळी हा बदल त्याला समजतो आणि ते भट्टी पुनःसुरू करते ! इथे फीडबॅक पद्धत वापरलेली आहे.
तिच्यामुळे समतोल राखला जातो.बदलावर मात केली जाते.
कारण इच्छित ठराविक पातळीला तेव्हा धोका निर्माण झालेला असतो.नकारात्मक फीडबॅक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पद्धतीचे काम स्थैर्य राखण्यापुरते मर्यादित असते. इ.स.१९४० या दशकाच्या अखेरीस व इ. स. १९५० च्या सुरूवातोच्या भागात या तत्त्वाची निश्चित कल्पना केली गेली आणि त्याची कसून तपासणो केली गेली.हे काम करणाऱ्या माहिती सैद्धान्तिकांनी व रचनात्रिचारवंतांनी- सिस्टिम थिकर्स या तत्त्वाच्या उदाहरणांचा व सम्यस्थळांचा शोध घेतला, तेव्हा त्यांना प्रत्येक क्षेत्रात भौतिक,शारीर,राजकीय इ.स्थैर्यकारी प्रणाली आढळून आल्या.ही निगेटिव्ह फोडबॅक पद्धत आपल्या भोवती सर्वत्रच चालू आहे.
इ. स. १९६० नंतर प्रो.मारुयाना यांनी असा विचार मांडला,की स्थैर्याचाच जास्त विचार करणे किंवा त्याच्यावर लक्ष केंद्रित करणे ही गोष्ट बदलासाठी पुरेशी नाही.त्यांनी म्हटले,की पॉसिटिव्ह फीडबॅकवर संशोधन होण्याची आता गरज आहे.या विधायक पद्धतीने होत असलेला बदल दबण्याऐवजी वाढवला जाईल.स्थैर्य टिकवून धरण्याऐवजी त्याला आव्हान दिले जाईल,ते चिरडून टाकले जाईल.या विधायकत्वामुळे किंचित मार्गच्युती होऊन ती एकूण रचनेत खूप मोठा आकार धारण करू शकेल.फीडबॅकच्या पहिल्या पद्धतीत बदल कमी केला जात होता,तर दुसऱ्या पद्धतोत तो मोठा केला जातो.त्यामुळे या दोन्हो पद्धतींचा काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे.पूर्वी ज्या कोड्यात टाकणाऱ्या प्रक्रिया होत्या व ज्यांच्यातील कार्यकारणभाव आकलत नव्हते,
त्यांच्यावर विधायक फोडबॅकने प्रकाश पडू शकतो.दुष्ट आणि सुष्ट चक्रांवर त्यांच्याद्वारे प्रकाश पडू शकतो.विधायक फीडबॅक पद्धतीने स्वतः खळबळयुक्त असलेल्या कोणत्याही प्रक्रियेचे स्पष्टीकरण होते.
उदा.शस्त्रस्पर्धा- दरवेळी रशियाने नवे एखादे शस्त्र तयार केले,की अमेरिका त्याच्याहून मोठे तयार करते.त्यानतर पुनः रशियाला त्याच्याहून मोठे शस्त्र तयार करण्याची स्फूति येते. ... जागतिक वेडेपणाचा जणू कळस गाठला जातो !
आपण जेव्हा या दोन्ही प्रकारच्या फीडबॅक पद्धतींचा एकत्रित अभ्यास करतो,तेव्हा या दोन्ही पद्धती मानवी मेंदूपासून अर्थकारणापर्यंतच्या गुंतागुंतीच्या रचनांमध्ये किती प्रभावीपणे कार्यान्वित असतात,हे समजून येते आणि त्यातून आश्चर्यकारक जाणीवा प्रकट होतात. खरोखर गुंतागुंतीच्या असलेल्या रचना किंवा संस्थांमध्ये बदल दडपणांची व बदलांना उत्तेजन देणाऱ्या अशा प्रणाली कळत नकळत कार्य करत असतात:एकमेकींवर परिणाम करत असतात हे आपल्याला समजून चुकल्यानंतर आपण ज्या जगात रहातो आहोत, त्याच्यातल्या गुंतागुंतीच्या एका वेगळ्याच पातळीचे आपल्याला दर्शन होते.कार्यकारण भावाबद्दलची आपली समज प्रगत झालेली आहे.
आपल्या आकलनात आणखीही भर टाकणारी गोष्ट म्हणजे बदल थांबवणारे किंवा कमी करणारे,तसेच ते वेगाने वाढते ठेवणारे घटक मुळात असतातच असे नाही.जीवशास्त्रीय किंवा सामाजिक संस्थात नंतरही ते प्रकट होऊन वाढीला लागू शकतात,हया गोष्टीची जाणीव होते.त्यामुळे अचानक घडणाऱ्या बदलांच्या विलक्षण घटनांची संगती लावणे आपल्याला शक्य होते. काही बदलांचा मागोवा घेणे कठीण का असते.हेही समजते.सरळ धीम्या गतीने चालणाऱ्या प्रक्रियेत अचानक होणारा आश्चर्यजनक बदल किंवा विलक्षण वेगाने अचानक धारण केली गेलेली शांतता का घडू शकते याबद्दल उलगडा होण्यास मदत होते.सुरुवातीला सारख्याच असणाऱ्या अवस्थांमधून घडणारे परिणाम एकदम वेगवेगळे असण्याबाबतचे स्पष्टीकरण होते.
तिसऱ्या लाटेतील कार्याकारणभावाला हळूहळू आकार येत चालला आहे.आणि त्याद्वारे या जगात गुंतागुंतीच्या असलेल्या एकमेकांवर परिणाम करणाऱ्या शक्तींचे जगात घडणाऱ्या आश्चर्यांचे,विश्वाच्या टेबलावरती चाललेल्या घटनांच्या बिलियर्ड बॉल्सच्या नर्तनाचे आणि इतर कितीतरी गोष्टींचे सष्टीकृत दर्शन घडते दुसऱ्या लाटेच्या कल्पनेतल्या साध्या यांत्रिक जगापेक्षा हे जग कितीतरी विलक्षण आहे.
तिसऱ्या लाटेतील कार्यकारणभाव जुन्या अचानकपणा अवश्यभाव अशा प्रकारच्या विरोधाभासाबद्दल काही नवीन खळबळजनक गोष्टी सांगून जातो.आणि याद्वारेच तात्विक संक्रमण घडू शकते.
नवा धडा…
फ्री युनिव्हर्सिटी ऑफ ब्रुसेल्स आणि युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास,ऑस्टिन येथे काम करणाऱ्या डॉ.इलया प्रिगोजाइन व त्यांच्या सहकाऱ्यांनी दुसऱ्या लाटेच्या काही गृहीतकांवर जेव्हा रासायनिक किंवा इतर रचना वैविध्याकडे व गुंतागुंतीकडे अधिक झे घेतात तेव्हा ते योगायोग व आवश्यकता यांच्या मिश्र परिणामामुळे होते असे दाखवून देऊन हल्ला केला.
अंतर्गत चलबिचल किंवा बाह्यशक्तींचा,किंवा दोन्हीचाही परिणाम होऊन जुना तोल ढळतो,आणि त्याचा परिणाम म्हणून नेहमीच गोंधळ माजतो किंवा कोलमड निर्माण होते असे नाही,तर पुष्कळदा एका अतिशय उच्च पातळीला पोचणारी संपूर्णतया नवी रचना उभारली जाते.ही नवी रचना जुन्या रचनेहून अधिक भिन्न असते, तिच्यातही अंतर्गत क्रिया-प्रतिक्रिया चालू असतात आणि तो गुंतागुंतीही असते.त्यामुळे तिला स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी अधिक ऊर्जा व माहिती व इतर साधनमय आधाराची आवश्यकता निर्माण होत असते.
प्रिगोजाइन म्हणतात की खुद्द उत्क्रांती हो गोष्ट अधिकाधिक गुंतागुंतीची व वैविध्यपूर्ण होत जाणारी जीवशास्त्रीय किंवा सामाजिक प्रक्रिया म्हणून ओळखली जावी.या प्रक्रियेचे फलित म्हणून नवोनच उच्च प्रतीची रचना घडते.म्हणजेच प्रिगोजाइनच्या कल्पनेप्रमाणे - राजकीय,तात्त्विक व शास्त्रीय दृष्टीकोणातून आपण चंचलतेतून शिस्त निर्माण करत असतो.म्हणजेच गोंधळातून सुव्यवस्था निर्माण करत असतो.
परंतु एक गोष्ट खरी,की आपण उत्क्रांतीला साचेबंद चौकटीत जखडून टाकू शकत नाही.प्रिगोजाइनच्या अभ्यासात यदृच्छा व आवश्यकता यांची केवळ युतीच सुचवली गेली नसून त्यांचे एकमेकांशी असणारे संबंध अत्यावश्यक बाब म्हणून दर्शवण्यात आले आहेत.
प्रिगोजाइननी असा निष्कर्ष काढला आहे,की कार्यकारणभावाचे कडक नियम आजच्या संदर्भात आपल्या विशिष्ट अवस्थांमध्ये बद्ध करणारे असेच आहेत.केवळ विशिष्ट परिस्थितीमधील विशिष्ट बाबींनाच ते लागू पडतात.बदलाच्या वर्णनांची ते जणे चेष्टाच करतात... गुंतागुंतीचे शास्त्र एका नव्याच दृष्टीकोणाप्रत आपल्याला घेऊन जाते.... शिवाय नेहमीच कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या अस्थैर्याची शक्यता असते.आणि तिच्यातूनच नवीन यांत्रिकतेचा जन्म होतो.
खरे म्हणजे सारे विश्व आपल्यापुढे खुले ठाकलेले आहे. (आपल्या जिज्ञासेला भरपूर आव्हान आहे.)
जे उद्यमवास्तव एकेकाळी अतिशय प्रभात्री,परिपूर्ण, सर्वसमावेशक आणि विश्व व त्याचे घटक कशा प्रकारे एकत्र 'जुळवले गेलेले आहेत' याचे स्पष्टीकरण करणारे असे वाटत होते,ते खरोखरच अतिशय उपयुक्त ठरले. परंतु वैश्विकतेबाबतचे त्याचे ठाम विचार आता हादरून जात आहेत.उद्या आपण मागे वळून पाहू लागलो तर दुसऱ्या लाटेचा उच्च आदर्शवाद हा केवळ दुसऱ्या लाटेच्याच संपूर्ण पात्रतेचा होता असे आढळून येईल.
दुसरी लाट मरत चालल्यामूळे आज लाखो लोकांची अवस्था गोंधळल्यासारखी झालेली आहे.हातातून निसटून चाललेले काही ना काही पकडून ठेवण्याची त्यांची केविलवाणो धडपड चालू आहे.नव्या जगासाठी नवीनच सुयोग्य अशी संस्कृती उभारण्याऐवजी,या बदलत्या परिस्थितीत जुन्याच कल्पना आणून रोवण्याचो,मूलतः अगदी वेगळ्या परिस्थितीत आयुष्य जगलेल्या पूर्वजांच्या,जुन्या खुळचट कल्पनांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी त्यांचा आटापिटा चालू असतो !
दुसऱ्या लाटेचा उच्च आदर्शवाद कोसळत चालला आहे. ह्या आदर्शवादाचे प्रतिबिंब औद्योगिकीकरणाने ज्या रीतीने जगाची रचना मानली व मांडली त्या रीतीत पडलेले आढळते.निसर्गाची उभारणी सुट्या,वैशिष्ट्यपूर्ण कणांतून झाली असल्याबाबतचो प्रतिमा,कल्पना सुट्या स्वयंपूर्ण देशांतून प्रकट होणाऱ्या याबाबतच्या कल्पनांतून झालेली आढळून येत असे.आता निसर्ग व भौतिक याबाबतची आपली प्रतिमा बदलून गेली आहे. देशाबाबतच्या कल्पनेतही बदल होत चालला आहे. घडत असलेला हा बदल हे तिसऱ्या लाटेच्या संस्कृतीकडे टाकलेले आणखी एक अर्थपूर्ण पाऊल ठरत असल्यास नवल नाही !