जेव्हा थियोडोर रुजवेल्ट व्हाइट हाउस मध्ये होते, तेव्हा त्यांनी स्वीकार केलं होतं की,जर ७५ टक्के संधी समोर असतील,तर अपेक्षेपेक्षा जास्त सफलता त्यांना मिळेल.जर विसाव्या शतकातल्या महान लोकांमधल्या एकाचे हे म्हणणे आले,तर मग तुम्ही आणि मी आहेच कोण ? जर ५५ टक्के संधी तुमच्यासाठी अनुकूल असतील,तर तुम्ही वॉल स्ट्रीटवर जाऊन एका दिवसात लाखो डॉलर्स कमवू शकता;पण जर असं नसेल तर मग तुम्हाला काय हक्क आहे की,तुम्ही दुसऱ्या लोकांना त्यांच्या चुका सांगाल ?
शब्दांनीच नाही;पण नजरेने,आवाजाच्या स्वरावरून, तुमच्या हावभावावरून तुम्ही लोकांना सांगू शकता की, ते चूक आहेत.जर तुम्ही त्यांची चूक सांगता,तर काय ते तुमच्याशी सहमत होतात? कधीच नाही.कारण तुम्ही त्यांची बुद्धिमत्ता,गर्व आणि आत्मसन्मान यांवर सरळ आघात केला आहे.यामुळे उलटून ते तुमच्यावर वार करू इच्छितील;परंतु या कारणामुळे ते आपल्या विचारांना कधीच बदलणार नाहीत.
तुम्ही जरी प्लेटो वा इमॅन्युअल कान्टच्या पुऱ्या तर्काना घेऊन त्यांच्यावर चढाई केली तरी ते आपले विचार बदलणार नाहीत.कारण तुम्ही त्यांच्या भावनेला ठेच पोचवली आहे.
या प्रकारांनी आपली गोष्ट कधीच सुरू करू नका,"मी तुमच्यासमोर अचूक गोष्ट सिद्ध करायला जातो आहे." ही चुकीची सुरुवात आहे.दुसऱ्या शब्दांमध्ये तुम्ही समोरच्याला हे सांगत आहात की,'मी तुमच्यापेक्षा जास्त स्मार्ट आहे.मी तुम्हाला एक-दोन गोष्टी अशा सांगायला जातो आहे,ज्यामुळे तुमचे विचार तुम्ही बदलाल?'
हे एक आव्हान आहे.यामुळे विरोध उत्पन्न होतो आणि यामुळे श्रोता तुम्हाला सांगायच्या आधीच तुमच्याबरोबर युद्ध करायला तत्पर होतो.
चांगल्याहून चांगल्या परिस्थितीतही लोकांचे समज किंवा विचारधारेला बदलणं कठीण आहे.मग याला अधिक कठीण का बनवायचं ? स्वतःच स्वतःला कमकुवत का बनवायचं ?
जर तुम्ही काही सिद्ध करायला जात आहात,तर कोणालाही त्याचा पत्ताही लागायला नको.याला चतुराईने,कुशलतेने अशा प्रकारे करायला हवं की, कोणाला याची जाणीवही झाली नाही पाहिजे.या विचारांना अॅलेक्झेंडर पोपने संक्षिप्तमध्ये या प्रकारे व्यक्त केलं.
शत्रू निर्माण करण्याचे अचूक उपाय आणि त्यापासून कसा बचाव करायचा ? मित्र जोडा आणि प्रभावशाली बना,डेल कार्नेगी,कृपा कुलकर्णी,मंजूल प्रकाशन
लोकांना कोणतीही गोष्ट अशा प्रकारे शिकवायला हवी की,त्यांना तो पत्ताही पण लागला नाही पाहिजे की,आपण काही शिकवायला जातो आहोत.
गॅलिलिओने तीनशे वर्षांपूर्वी हे म्हटलं होतं की,तुम्ही कुणालाच काही शिकवू शकत नाही.तुम्ही फक्त त्याला आपल्या आतून शिकण्यात मदत करू शकता.सॉक्रेटिस जे अॅथेन्समध्ये आपल्या अनुयायींना परत परत सांगत होते- 'मी केवळ एकच गोष्ट जाणतो आणि ती ही आहे की,मी काहीच जाणत नाही.'
मी हा दावा नाही करत की,मी सॉक्रेटिसपेक्षा जास्त बुद्धिमान आहे.याकरता मी लोकांना हे सांगायचं बंद केलं आहे की,ते किती चूक आहेत आणि यामुळे मला खूपच फायदा मिळाला.
जेव्हा कोणी व्यक्ती असं सांगतो जी तुमच्या दृष्टीने चुकीची आहे;पण तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता की ते चुकीचे आहेत,
तेव्हाही या प्रकारे सांगणं चांगलं नाही का होणार : " या,आपण आता बघू.माझं मत तुमच्यापेक्षा वेगळं आहे;पण मी चुकीचाही असू शकतो.मी अनेक वेळा चुकीचा ठरतो आणि जर चूक माझी आहे,तर मी आपली चूक सुधारीन.या,आपण तथ्यांचं अवलोकन करू." आमच्या क्लासच्या एका सदस्याने,मोन्टालाच्या कार डीलर हेरॉल्डचा प्रयोग केला.त्यांनी सांगितलं की, ऑटोमोबाईल बिझनेसच्या तणावग्रस्त वातावरणात ते कायमच ग्राहकांच्या तक्रारींवर जास्त लक्ष देऊ शकत नसत आणि त्यात ते उदासीनताच दाखवत होते.या कारणामुळे बिझनेसमध्ये नुकसान व्हायला लागले, ग्राहक रागवायला लागले आणि वातावरण बिघडायला लागले.त्यांनी आमच्या वर्गाला सांगितलं,"माझ्या शैलीने फायदा होत नाही,हे मला जाणवल्यावर मी आपलं तंत्र बदलून टाकलं.मी आपल्या ग्राहकांना हे म्हणायला सुरुवात केली,'आमच्या डीलरशीपमुळे इतक्या चुका झाल्यात की,मला बऱ्याचदा लाजिरवाणं व्हावं लागतं. तुमच्या बाबतीतही बहुतेक आमची चूक झाली आहे. मला याबाबतीत सविस्तरपणे सांगा.'या शैलीमुळे ग्राहकाचा राग लगेच थंड होत होता आणि जेव्हा तो आपली तक्रार सांगायचा तो जास्तच तर्कशुद्ध पद्धतीने सांगायचा.
खरंतर अनेक ग्राहकांनी तर मला इतक्या चांगल्या त-हेने त्यांचं म्हणणं ऐकल्याबद्दल धन्यवादही दिलेत.दोन ग्राहक तर आपल्या मित्रांनाही बरोबर घेऊन आले म्हणजे ते इतक्या चांगल्या ठिकाणाहून कार खरेदी करू शकतील.आजच्या स्पर्धेच्या युगात आम्हाला या प्रकारच्या ग्राहकाची गरज आहे आणि मला विश्वास आहे की,जर आम्ही ग्राहकांच्या विचारांच्या प्रति सन्मान दाखवू आणि त्यांच्या बरोबर कूटनीती व शिष्टाचाराचा व्यवहार करू तर आम्ही आपल्या प्रतिस्पर्थ्यांच्या पुढे निघून जाऊ शकतो.
जर तुम्ही हे आधीच कबूल केलं की,तुम्ही चुकू शकता तर तुम्ही कधी संकटात नाही पडणार.यामुळे भांडण्याची संभावना संपेल आणि यामुळे तुमच्या प्रतिस्पर्ध्यालाही प्रेरणा मिळेल की तोसुद्धा तुमच्या एवढाच मोकळा,निष्पक्ष आणि विशाल हृदयाचा होऊन जाईल.
जर तुम्हाला पूर्ण खात्री आहे की,समोरचा चूक करतोय आणि तुम्ही त्याला सरळ सरळ हे सांगता तर काय होतं? एक उदाहरण बघा.मिस्टर एस.न्यू यॉर्कचे तरुण वकील होते.एकदा ते युनायटेड स्टेट्स सुप्रीम कोर्टात एका महत्त्वाचा खटल्यात (लास्टगार्टन विरुद्ध लीअ कॉर्पोरेशन २८० यू.एस.३२०) वाद घालत होते. या खटल्यात खूप संपत्ती तर पणाला लागली होतीच, न्यायाचा एक महत्त्वाचा प्रश्न गुंतलेला होता.वादाच्या वेळी सुप्रीम कोर्टाच्या एका जजने त्यांना विचारले, "अॅडमिरेल्टी लॉमध्ये वेळेची सीमा सहा वर्षांची असते, हो ना?" मिस्टर एस.थांबले,
त्यांनी जजकडे एक क्षणभर पाहिलं आणि मग स्पष्टपणे सांगितलं, "युअर ऑनर,अॅडमिरल्टी लॉमध्ये कुठलीच सीमा असत नाही?" पूर्ण कोर्टात शांतता पसरली.आमच्या वकिलाने सांगितलं आणि खोलीचं तापमान शून्यावर आलं.मी बरोबर होतो.न्यायाधीश चूक होते आणि मी त्यांची चूक त्यांना सांगून टाकली;पण काय यामुळे त्यांचा व्यवहार माझ्याबरोबर मैत्रीचा झाला? नाही.मला आताही भरोसा आहे की,तो खटला मीच जिंकलो असतो.मी याच्या आधी इतका छान वाद कधीच घातला नव्हता;पण मी आपली गोष्ट मनवायला सफल झालो नाही.निकाल माझ्या विरुद्ध झाला.
मी एका ज्ञानी आणि प्रसिद्ध जजला हे सांगण्याची चूक केली होती की, तो चुकीचा होता.खूप कमी लोक तार्किक असतात. आपल्यातले जास्त लोक पूर्वग्रहामुळे ग्रस्त असतात. आपल्यात पहिल्यापासून ईर्षा,शंका,भीती आणि अहंकार असतो आणि जास्त करून लोक आपला विचार बदलवायला बघत नाही मग प्रश्न त्यांच्या हेअर स्टाइलचा असू दे.धर्माचा असू दे,साम्यवादाचा असू दे वा त्यांच्या सिनेमातल्या हिरोचा असू दे.त्यामुळे तुमची जर इच्छा आहे की,लोकांच्या चुका तुम्ही सांगाव्या तर प्रत्येक सकाळी न्याहारीच्या आधी पुढे लिहिलेला उतारा वाचा. याला जेम्स द्रार्वे रॉबिन्सनचे ज्ञानवर्धक पुस्तक द माइंड इन द मेकिंगमधून घेतलं आहे.
आपण कुठल्याही विरोधी किंवा तीव्र भावनेच्या आपल्या विचारांना नेहमी बदलत असतो;पण जर आम्हाला कोणी सांगितलं की,आम्ही चुकीचे आहोत तर या आरोपामुळे चिडून जातो आणि आपल्या हृदयाला कडक बनवतो.आपण आपल्या समजुती बनवण्याच्या वेळी अविश्वसनीयरीत्या बेपर्वा असतो;परंतु जर कोणी आमच्या चुकीच्या विश्वासाला दूर करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्या विचारांच्या प्रति जास्तीच्या आसक्तीचा अनुभव करायला लागतो.स्पष्ट रूपात आम्हाला आपल्या विचारांवर प्रेम नसतं,तर आपल्या आत्मसन्मानावर प्रेम असतं.
जे अशा वेळी आम्हाला धोक्याचं दिसायला लागतं... मानवीय संबंधांमध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण शब्द 'माझं' हा असतो आणि शहाणपणा यातच आहे की,याचा सामना कुशलपणे केला पाहिजे.याची शक्ती एकसारखीच असते.मग मामला 'माझं' जेवण,'माझा' कुत्रा,'माझं' घर, 'माझे' वडील,'माझा' देश,किंवा 'माझा' देव यांच्याशी संबंधित असो.आम्ही न फक्त या गोष्टीने चिडतो की, मंगळावरच्या कालव्याच्या बाबतीत आमचे विचार किंवा आमचा 'अॅपिक्टेटस' या शब्दाचा उच्चार चूक आहे किंवा सेलिसिनची चिकित्सकीय उपयोगितेच्या बाबतीत आमचे विचार चुकीचे आहेत किंवा वॉटरलूची तारीख आम्हाला बरोबर माहिती नाही.आम्ही यावर विश्वास ठेवत राहणं पसंत करतो की,आम्ही ज्याला खरं मानतो तेच खरं आहे आणि जेव्हा आमच्या मान्यतांवर शंका घेतली जाते,तेव्हा आम्ही उत्तेजित होऊन जातो आणि आम्ही याला चिकटून राहण्याकरता वेगवेगळे बहाणे शोधायला लागतो.परिणाम हा होतो की,आमची तथाकथित तर्क करण्याची शक्ती आपल्या वर्तमान मान्यतांकरता तर्क शोधण्यात खर्च होते.
प्रसिद्ध मनोवैज्ञानिक कार्ल रॉजरने आपलं पुस्तक ऑन बिकमिंग अ पर्सनमध्ये लिहिलं आहे.
मी तर या गोष्टीला खूप महत्त्व देतो की,मी स्वतःला समोरच्याच्या नजरेने समजण्याची अनुमती देतो.मी मागच्या वाक्याला ज्या त-हेने म्हटले आहे ते तुम्हाला विचित्र वाटलं असेल.दुसऱ्याला समजायला आम्हाला स्वतःला अनुमती द्यावी लागते ? मला वाटतं की,हेच बरोबर आहे.बहुतेक गोष्टींच्या बाबतीत (जे आम्ही दुसऱ्या लोकांकडून ऐकतो) आमची पहिली प्रतिक्रिया मूल्यांकन किंवा निष्कर्ष काढण्याची असते आणि आम्ही समजण्याची मेहनतच नाही करत.जेव्हा एखादी व्यक्ती काही भावना,विचार किंवा विश्वासाला व्यक्त करतात तेव्हा आमची प्रवृत्ती लगेच हे जाणून घ्यायची असते की,'ही बरोबर आहे','हे मूर्खतापूर्ण आहे','हे असामान्य आहे','हे अतार्किक आहे','हे चुकीचे आहे','हे बरोबर नाही आहे'.कधी तरीच आम्ही स्वतःच स्वतःला या गोष्टीची अनुमती देतो की,आम्ही समोरच्याला पूर्ण रितीने समजण्याचा प्रयत्न करू आणि हे जाणून घेऊ की,समोरच्याचा दृष्टिकोन काय आहे.
मी एकदा एका इंटेरियर डेकोरेटरकडून आपल्या घराकरता नवीन पडद्याची सजावट केली.जेव्हा बिल आलं,तेव्हा मला जोरात झटका बसला.
काही दिवसांनी माझी एक मैत्रीण आली आणि तिने खोलीत लावलेले नवे पडदे बघितले.जेव्हा तिला किंमत कळली तेव्हा ती म्हणाली,"अच्छा! इतके महाग? मला वाटतं की
दूकानदाराने तुम्हाला लुटलं!" हे खरं होतं का? हो,तिने मला खरं सांगितलं होतं;पण खूप कमी लोक हे स्वीकारू शकतात की,ते या प्रकारे मूर्ख बनले आहेत.यामुळे माणूस होण्याच्या नात्याने मी स्वतःचा बचाव करायला सुरुवात केली.मी तिला म्हटलं की, चांगल्या क्वालिटीचं सामान महागच येतं आणि कलात्मक वा सुंदर वा चांगलं सामान फूटपाथवर नाही मिळत.दुसऱ्या दिवशी माझी आणखीन एक मैत्रीण आली आणि तिने पडद्यांची मनसोक्त तारीफ केली.तिने उत्साही स्वरात सांगितलं की,जर मीसुद्धा माझ्या घरात इतके सुंदर पडदे लावू शकली असती तर? त्या वेळी माझी प्रतिक्रिया पूर्णपणे वेगळी होती.मी म्हटलं,"खरं सांगू,मला तर असं वाटलं की,मी याची खूपच जास्त किंमत दिली.यांना विकत घेऊन मी पस्तावलो आहे." जेव्हा आपण चूक असतो,तेव्हा आपण मनातल्या मनात आपली चूक मान्य करतो.हेच नाही जर समोरचा समजूतदारपणे आणि कूटनीतीने काम करेल,तर आपण त्याच्या समोरही आपली चूक कबूल करू शकतो आणि आपल्या खरेपणावर आणि उदारतेवर अभिमान बाळगू शकतो.
शिल्लक भाग पुढील लेखामध्ये...