माझा दृष्टिकोन नेहमीच थोडा जास्तच वेगळा राहिला आहे.मार्क फ्रॉस्ट ( आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा आभार अज्ञाताचा शोध घेत फिरणाऱ्या अवलियांच्या कहाण्या अर्थात हटके भटके,लेखक निरंजन घाटे,प्रकाशक समकालीन प्रकाशन या पुस्तकातील १७ कहाण्या आपण वाचल्या,आजची ही शेवटची कहाणी.. तुम्ही हळूहळू अखंड पुस्तक वाचलेत.अधूनमधून तुम्ही स्वतःची पाठ थोपटायला हवी.कारण तुम्ही जे करू शकणार नाही असं काही लोकांना वाटत होतं,त्या गोष्टी तुम्ही करून दाखविले आहे.त्यामुळे स्वतःचा अभिमान बाळगा.आज तुम्ही जिथे आहात तिथे येण्यासाठी तुम्ही आजवर बराच संघर्ष केलाय. या गोष्टींची दखल घेतल्याने तुम्हाला समाधान मिळेल आणि तुमची ऊर्जा वाढेल.) मागील लेखावरून पुढे..। केलं,पण ईस्ट इंडिया कंपनीने त्याला परवानगी नाकारली.बर्टन रजेवर असला तरी ईस्ट इंडिया कंपनीचा नोकर होता.कंपनीच्या मते हा प्रकल्प फारच धोकादायक होता.मात्र,कंपनीने अरबी भाषेचा अभ्यास करण्यासाठी बर्टनला एक वर्षाची रजा देण्याचं मान्य केलं,बर्टनने ही रजा आपली योजना राबवण्यासाठीच घालवली.त्याने आता आपल्या योजनेत बदल करून जो प्रवास करायचा ठरवला तो त्याच्या पूर्वनियोजित योजनेपेक्षा अधिक धोकादायक होता.त्याने एंप्टी क्वार्टर पार करून पुढे बिगर मुस्लिमांना प्रवेशबंदी असलेल्या मक्का आणि मदिना या इस्लामी पवित्र स्थळांमध्ये जायचं मनाशी ठरवलं होतं.या वेळीही बर्टनने पुन्हा मिर्झा अब्दुल्ला हे नाव धारण केलं.या स्थळांना भेट देणाऱ्या वार्षिक तीर्थयात्रेत त्याने स्थान मिळवलं.आचार,
विचार,भाषा, उच्चार यांत थोडीशी जरी चूक झाली तरी दगडाने ठेचून मारून टाकण्याचीच शिक्षा मिळू शकते याची त्याला पूर्ण कल्पना होती.असला उद्योग यापूर्वी कुणी केला नव्हता आणि त्यानंतरही कुणी केलेला नाही. बर्टनने ही यात्रा यशस्वीरित्या पार पाडली,याचं कारण त्याचं भाषाप्रभुत्व,
इस्लामी चालीरीतींचा सूक्ष्म अभ्यास आणि त्याचा असाधारण धाडसी स्वभाव.त्याच्या या साहसाने त्याला जागतिक कीर्ती मिळवून दिली.काबाचं जवळून दर्शन घेणारा तो एकमेव बिगरइस्लामी गृहस्थ आहे.बर्टन अरबस्तानातून निघून थोड्या काळासाठी कैरोत थांबला.रजा संपताच तो मुंबईत परतला.मुंबईत त्याने 'पर्सनल नॅरेटिव्ह ऑफ अ पिलग्रिमेज टु एल-मदिना अँड मक्का' हा ग्रंथ तीन खंडांत लिहून पूर्ण केला.रजेनंतर नोकरीवर रुजू न होण्यासाठी त्याने लवकरच दुसरं कारण शोधलं.त्याने कंपनीकडे तेव्हा सोमालियात असलेल्या आणि नंतर इथिओपियात गेलेल्या प्राचीन 'हरार' या शहराचा शोध घेण्याची मोहीम काढायचा प्रस्ताव सादर केला.या शहरात तोपर्यंत कुणीही युरोपियन व्यक्ती गेलेली नव्हती.काही युरोपियन प्रवाशांनी तसा प्रयत्न जरूर केला होता,पण त्यात ते अपयशी झाले होते. त्या वेळी मुंबई इलाख्याच्या कार्यकारी सभेतले एक सदस्य जेम्स ग्रँट लुम्सडेन हे बर्टनला मित्र मानत होते.त्यांच्या प्रयत्नांमुळेच कदाचित हा प्रस्ताव विनाविलंब मान्य केला गेला.१ ऑक्टोबर १८५४ या दिवशी बर्टन मुंबईहून जहाजातून एडनला पोहोचला.इथे तो महिनाभर थांबला.हरारच्या प्रवासासाठीची माहिती मिळवणं आणि तयारी करणं यासाठी त्याने या काळात परिश्रम घेतले.मोहिमेच्या पूर्वतयारीत कुठलीही कसूर ठेवणं त्याला मान्य नसे.मोहिमेचं निम्मं यश पूर्वतयारीत असतं,असं तो म्हणत असे.त्या महिन्याभरात सोमालियाची किनारपट्टी त्याने नजरेखालून घातली.मग सोमालिया, सोमाली जमाती आणि त्यांच्या चालीरीती यांची त्याने सर्व प्रकारे माहिती मिळवली.यात दंतकथा,आधीच्या प्रवाशांच्या आठवणी यांचाही समावेश होता.एडनमध्ये व्यापाराकरता येणाऱ्या सोमालींकडून एडनच्या वेश्यावस्तीत अनेक सोमाली तरुणी वेश्याव्यवसायाकरता दरवर्षी येतात,ही माहिती मिळताच तो त्या वेश्यांना भेटला.
या सोमाली मुलींकडून त्याला 'स्त्रियांच्या सुंतां' बद्दलची (शिश्निकाछेदनाबद्दलची) माहिती मिळाली. मुस्लिमांमध्ये बऱ्याच ठिकाणी अशी प्रथा पाळली जात होती.सुंता न केलेल्या मुलींना अशुद्ध मानलं जात असे आणि अशा स्त्रीच्या पोटी जन्माला आलेली मुलं म्हणजे तिच्यासाठी अपमानास्पद गोष्ट समजली जायची.सुंता केलेल्या मुलींच्या लग्नानंतरच्या यातना किती मरणप्राय असतात याचं वर्णन करताना बर्टन आपला नेहमीचा तटस्थपणा सोडून अतिशय तीव्र शब्दांत या प्रथेची निंदा करतो.
पाश्चात्त्य मानवशास्त्रज्ञांना बर्टनच्या नोंदी प्रसिद्ध होईपर्यंत अशा प्रथेची अत्यल्प कल्पना होती.केवळ ऐकीव माहितीच्या आधारावर त्यांनी या प्रथेबद्दल लिहायचं टाळलं होतं.बर्टनच्या नोंदी प्रसिद्ध झाल्यानंतर या प्रथेला अधिकृतरीत्या शास्त्रीय ग्रंथांतून जागा मिळू लागली. 'अरेबियन नाइट्स' या आपल्या पुस्तकाच्या पाचव्या खंडात चारशे पंचाहत्तराव्या रात्रीनंतर या प्रथेबद्दलचं विस्तृत टिपण बर्टनने लिहिलं आहे.ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस एका अरब व्यापाऱ्याच्या वेषात बर्टन एडनहून आपल्या नियोजित मोहिमेसाठी निघाला.सोमालीलँडच्या किनाऱ्यावरील प्रीला या बंदरात तो उतरला.तिथेच त्याने वाटाडे,उंट आणि पुढील प्रवासाला लागणारा शिधा गोळा करण्यासाठी महिनाभर मुक्काम ठोकला.
इथे सोमाली जनसामान्यांच्या चालीरीती आणि भाषेबरोबरच स्थानिक सोमाली महिलांचा त्याचा अभ्यास सुरूच होता.
१८५५च्या फेब्रुवारीपर्यंत ही कष्टप्रद मोहीम संपवून बर्टन एडनला परतला.एडनहून तो इंग्लंडला पोहोचला तेव्हा क्रिमियन युद्ध सुरू झालं होतं.त्याने या युद्धात आघाडीवर जाण्यासाठी अर्ज केला.त्या वेळचे ब्रिटिश सेनानी लॉर्ड रॅग्लान यांचा इंडियन आर्मीतल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर अजिबातच विश्वास नव्हता.तरीही ईस्ट इंडिया कंपनीने त्याला या युद्धात लढण्यासाठी रजा दिली आणि बर्टन क्रिमियाला जाणाऱ्या जहाजात बसला.तुर्की गैरसैनिकी घोडदळात तो सामील झाला.या तुर्की घोडदळाचं नेतृत्व बेंगॉल आर्मीचे एक कर्नल बीटसन करत होते.या बेशिस्त घोडदळात इतका गोंधळ होता,की त्यांच्यामुळे युद्धकार्यात अडथळेच जास्त येत होते.सहा महिन्यांमध्येच कंटाळून या घोडदळाला रामराम ठोकून बर्टन इंग्लंडला परतला. इंग्लंडला परतल्यावर त्याने 'फर्स्ट फुटस्टेप्स इन ईस्ट आफ्रिका ऑर अॅन एक्स्प्लोरेशन ऑफ हरार' हे पुस्तक लिहिलं. १८५६ साली प्रसिद्ध झालेल्या त्याच्या या ग्रंथात त्याने सोमाली स्त्रियांवर एक अख्खं प्रकरण लिहिलेलं आहे.हे पुस्तक त्याने लुम्सडेन या त्याच्या मित्राला कृतज्ञतापूर्वक अर्पण केलं आहे.काही काळानंतर बर्टन परत आफ्रिकेत जायचा विचार करू लागला.आफ्रिकेचा शोध घेणाऱ्या प्रत्येक भूसंशोधकाचं स्वप्न त्याला आता खुणावत होतं.हे स्वप्न म्हणजे नाईल नदीच्या उगमस्थानाचा शोध.याच काळात त्याच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान असलेल्या इझाबेल अरुंडेलबरोबर त्याचा साखरपुडा पार पडला. इ. स. १८५६ मध्येच त्याने नव्या मोहिमेची योजना नक्की केली.या मोहिमेसाठी त्याला खूपच मदत मिळू लागली होती.ईस्ट इंडिया कंपनीने त्याला दोन वर्षांची भरपगारी रजा मंजूर केली होती.तो मुंबईला पोहोचला.
मोहिमेसाठीची शिधासामग्री आणि इतर साधनं जमवून आपल्या जॉन स्पेके नावाच्या सहकाऱ्याबरोबर त्याने मुंबई सोडली आणि तो झांजीबारला पोहोचला.झांजीबार हा त्याचा मुख्य तळ असणार होता.इथून त्याची नाईलचा उगम शोधण्याची मोहीम सुरू होणार होती.झांजीबारमधील त्या सहा महिन्यांमध्ये बर्टनने तो पुढे ज्या भागात प्रवास करणार होता त्या भागाचा इतिहास, भूगोल तिथल्या चालीरीती,बोलीभाषा,प्राणी,वनस्पती आणि हवामान यांची माहिती तर गोळा केलीच;पण त्याचबरोबर स्थानिकांच्या नैतिकतेच्या कल्पना समजावून घेतल्या.हा शेवटचा मुद्दा अनोळखी भूप्रदेशात फार महत्त्वाचा ठरतो. झांजीबार बेटाबद्दलच्या त्याच्या नोंदी त्याने ग्रेट ब्रिटनच्या 'रॉयल जिओग्राफिकल सोसायटी'ला पाठवल्या. त्या कुणाच्या चुकीने मुंबईच्या 'रॉयल एशियाटिक सोसायटी'मध्ये पोहोचल्या हे कळायला मार्ग नाही,पण त्या तिथेच बरीच वर्षं पडून होत्या.
अखेरीस इ. स. १८७२ मध्ये या नोंदींवर आधारित 'झांजीबार सिटी,आयलंड कोस्ट' हे पुस्तक प्रसिद्ध झालं.
बर्टन आणि त्याचा सहकारी स्पेके शेवटी जून १८५७ ला झांजीबारहून नाईल नदीचा उगम शोधण्याच्या मोहिमेला निघाले.बर्टन हा चांगला प्रशासक नाही हे या मोहिमेने सिद्ध केलं.स्वतःवरचा प्रचंड विश्वास आणि कर्तबगारीचा अभिमान यामुळे तो जे निर्णय घ्यायचा ते त्याच्या सहकाऱ्यांना आणि मदतनीसांना तो ऐन वेळी सांगायचा.त्या निर्णयांची कारणमीमांसाही तो कधी करत नसे.त्यामुळे संघभावना निर्माण करण्यात तो अपयशी ठरत असेच,पण त्यामुळे काही वेळा गोंधळही निर्माण व्हायचा.त्याच्या उद्धटपणामुळे त्याचे सहकारी खरं तर वैतागले होते.स्पेकेने तर बर्टनशी बोलणंच थांबवलं होतं. या मोहिमेत दोघांनी मिळून 'लेक टांगानिका'चा शोध लावला. त्यानंतर बर्टन तापाने वारंवार आजारी पडू लागला.म्हणून त्याला मोहीम अर्धवट सोडून इंग्लंडला परतावं लागलं.स्पेकेने मात्र ही मोहीम पुढे चालूच ठेवली.लेक व्हिक्टोरियातूनच नाईल नदी उगम पावते हे त्याला सिद्ध करायचंच होतं. आपल्याला सोडून स्पेके ही मोहीम पुढे नेतोय याची बोच बर्टनच्या मनात कायमची राहून गेली. इंग्लंडला परतल्यानंतर त्याने विश्रांती घेता घेता 'द लेक रिजन्स ऑफ सेंट्रल आफ्रिका' हा ग्रंथ लिहून पूर्ण केला. स्पेके नाईलचा उगम शोधायचा प्रयत्न करत असताना ब्रिटनमध्ये स्वस्थ बसून राहणं बर्टनला पटणारं नव्हतं. अस्वस्थ बर्टनने मग नवी योजना आखली.त्याने परत आजारपणाच्या रजेचा अर्ज केला.
सामान्य माणसं आजारपणाची रजा विश्रांतीसाठी आणि उपचारांसाठी घेतात.बर्टन ही रजा नवे भूप्रदेश बघणं, एखादी नवी भाषा शिकणं आणि स्वतःच्या ज्ञानात भर घालणं यासाठी वापरत असे.खरं तर बर्टनचा साखरपुडा झालेला होता; पण लग्नासाठी न थांबता तो अमेरिकेत पोहोचला.इथे प्रथम तो सॉल्ट लेक सिटीत गेला.मॉर्मन पंथीयांचं हे शहर त्या पंथाचा संस्थापक ब्रिगहॅम यंगने इ. स. १८४७ मध्ये वसवलं होतं.अमेरिकेत बर्टनने 'स्टेज कोच'मधून (बग्गी) भरपूर प्रवास केला. स्थानिक अमेरिकी आदिवासींना (रेड इंडियन) तो भेटला.त्यांच्या चालीरीती,
राहण्याच्या पद्धती वगैरेंच्या नोंदीही त्याने ठेवल्या.मॉर्मनांच्या बहुपत्नित्वाबद्दलही त्याने बरंच काही लिहून ठेवलंय.अमेरिकेतून परतल्यावर २२ जानेवारी १८६१ या दिवशी वयाच्या चाळिसाव्या वर्षी बर्टन विवाहबद्ध झाला.याच वेळी ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यातून त्याचं नाव वगळण्यात आलं. कारण १८५८मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचं सैन्य रॉयल आर्मीमध्ये सामावून घेतलं गेलं.त्यांच्या नियमात रिचर्डच्या रजा बसत नव्हत्या.वडिलोपार्जित घर असलं तरी वेगवेगळ्या मोहिमांचा खर्च केल्यामुळे बर्टनने काहीच रोख रक्कम शिल्लक ठेवलेली नव्हती. मग आर्थिक बाजू सावरण्यासाठी त्याने पश्चिम आफ्रिकेतील 'फर्नांडो पो' आणि 'दाहोमी' या ठिकाणी परराष्ट्रखात्यात राजदूत म्हणून नोकरी केली. ही ठिकाणं मलेरिया,पीतज्वराच्या प्रादुर्भावाने अतिशय धोकादायक समजली जातात.नोकरी करत असतानाही तो नायजेरिया, काँगो,अंगोला इ.ठिकाणी जाऊन आला. तिथल्या लोकांचं निरीक्षण करून त्यावर त्याने लिखाणही केलं.इथल्या वास्तव्यात त्याने लहान मुलांना 'हिजडा' बनवण्याच्या पारंपरिक क्रूर प्रथेचाही अभ्यास केला आणि त्यातील बारकाव्यांसहित त्याची आपल्या पुस्तकात नोंद केली.अशा प्रकारचा मुलांचा व्यापार रोखण्यासाठी त्याने आपल्यापरीने बरेच प्रयत्नदेखील केले.तेथील राजाला भेटून ही प्रथा थांबवण्याची विनंती केली;पण त्याला यश आलं नाही.पुढे तिथून त्याची बदली काही काळासाठी ब्राझीलला झाली.शेवटी इ. स. १८६४ मध्ये तो इंग्लंडला परतला.बर्टन इंग्लंडमध्ये राहायला आला त्या वेळी त्रेचाळीस वर्षांचा होता. आयुष्यभर त्याने जे कष्ट उपसले त्यामुळे त्याच्या प्रकृतीवर चांगलाच दुष्परिणाम झाला होता. ब्राझीलमध्ये कार्यरत असताना त्याला जडलेला आजार त्याची पाठ सोडायला तयार नव्हता.यानंतरच्या त्याच्या सर्व भटकंतीत त्याची पत्नी सतत सावलीसारखी त्याच्याबरोबर वावरली.दक्षिण अमेरिकी भूखंडामध्ये ब्राझीलचा अंतर्भागातील भटकंती तसंच अर्जेंटिना,
पेरू व पॅराग्वेत नोकरी आणि भटकंती केल्यावर तो दमास्कसला गेला. तिथून आइसलंड,पुन्हा आफ्रिकेत गोल्डकोस्टशिवाय इतरही अनेक ठिकाणं त्याने पालथी घातली.त्यानंतर त्याने केलेल्या लिखाणात तो जोश ती खदखद नव्हती.त्याच्या पूर्वीच्या लिखाणाच्या तुलनेत हे लेखन फारच आळणी होतं.त्याचं खरं लेखन ते जेव्हा 'त्रिएस्ते'मध्ये राहायला लागले तेव्हा सुरू झालं.त्रिएस्तेमध्ये बर्टनने 'वन थाउजंड अँड वन अरेबियन नाइट्स'च्या भव्य लेखनाला सुरुवात केली. जगभरातल्या कामशास्त्रावरच्या साहित्याचा अनुवाद या पुस्तकात केला गेला आहे.हे लेखन सटीप असून दहा खंडांत आहे.या लेखनावर प्रचंड टीका झाली तरी ते अमाप खपलं.
त्यातून त्याला अकरा हजार स्टर्लिंग पौंड उत्पन्न मिळालं.
आजही या ग्रंथाच्या नवनव्या आवृत्त्या बाजारात येतात. अनेक देशांत,अनेक भाषांत त्याची भाषांतरं झाली, आजही होत आहेत.मुख्य म्हणजे यातल्या स्त्रिया जे लैंगिक स्वातंत्र्य उपभोगतात त्यामुळे व्हिक्टोरिया राणीच्या कालखंडातील सनातनी नैतिक कल्पनांना हादरा बसला आणि स्त्रीस्वातंत्र्य म्हणजे काय हे ब्रिटिश स्त्रियांना प्रथमच लक्षात आलं.
आज बर्टनने केलेल्या 'अनंगरंग रतिशास्त्र','अरेबियन नाइट्स' आणि 'दपफ्र्युम्ड गार्डन' यांच्या अनुवादांमुळेच तो लोकांच्या स्मरणात आहे.बर्टनची मक्का आणि मदिनेची वारी,टांगानिका सरोवराचा शोध आणि इतरही अनेक बाबींमुळे त्याला कीर्ती मिळाली;पण हे तीन अनुवाद म्हणजे त्याची कायमस्वरूपी स्मारकं आहेत.१९ ऑक्टोबर १८९० रोजी रिचर्ड बर्टनचं निधन झालं. त्यानंतर पुढचे सोळा दिवस नवऱ्याची बदनामी होईल या भीतीने त्याच्या खानदानी ब्रिटिश पत्नीने,इझाबेलने,त्याच्या कागदपत्रांचे गड्ढे, त्याच्या नोंदी आणि त्याने गोळा केलेली सगळी ग्रंथसंपदा नष्ट केली.आपल्या नवऱ्याची लैंगिक विकृती या लेखनाच्या स्वरूपात प्रकट होते,हे लेखन कपोलकल्पित आहे,असं समजून बर्टन यांचं जेवढं लेखन सापडलं ते तिने जाळून टाकलं.यात 'द पफ्र्युम्ड गार्डन'च्या अनुवादाचा कच्चा खर्डाही होता.मृत्यूच्या आदल्याच दिवशी रिचर्डने 'द पफ्र्युम्ड गार्डन्स'चं हस्तलिखित प्रकाशकाच्या स्वाधीन केलं होतं म्हणून ते वाचलं.पुढे या घटनेचं वर्णन 'ब्रिटिश मानवशास्त्रीय इतिहासातील सर्वांत काळा दिवस' असं केलं गेलं. इझाबेलने रिचर्डच्या स्मरणार्थ त्याच्या कबरीवर संगमरवराची एक छत्री उभारली.लंडनच्या नैऋत्य भागातल्या मॉर्टलेक कबरस्थानात ही छत्री अजूनही उभी आहे इझाबेलला मात्र तिचा नवरा त्याच्या अफाट लिखाणामुळे अमर झालाय हे कधी उमगलंच नाही. •
समाप्त.. धन्यवाद..!!