धुळीचे लहानसहान कण हवेत उडत आहेत आणि पुन्हा खाली येत आहेत,वाळवंटाच्या या सागरात निसर्ग एकवटून प्रवाहित होतो आहे.एक जीवाच्या शक्तिनीशी लाकूड तोडतो,तर दुसरा स्वतःचे सर्वस्व देतो.जन्माच्या वेळी दोघांनाही माहित नव्हते,की त्यांना काय बनायचे आहे.एक जीवनाची लहर विसरला आहे,तर दुसरा वाऱ्याने सळसळतो आहे.तो झाडावर घाव घालतो आणि त्यातून आपले आयुष्य सावरतो.कितीतरी झाडांची कत्तल त्यानी केली,झाडांचा मात्र संघर्ष सुरूच आहे.या संघर्षात झाड ताठ उभे आहे आणि लोकांना सावलीसह फुलफळे देते आहे.त्याच्या सावलीत अनेक थकलेले प्रवासी श्रांत होतात आणि पुढे जातात.वृक्ष असो वा लाकडूतोड्या,
दोघेही वाळूचे वरखाली होणारे कणच आहेत.तो अधिकाधिक घाव घालतो आणि खूप लाकडे-फळे जमा करतो.हे सारे करताना,तो सारे जंगल पालथे घालतो,खूप भटकतो.त्याचा मात्र आपल्या जगण्यावर विश्वास आहे.तो एकाच जागी स्थिर आहे.त्याची आणखीन आणखीनची हाव काही संपत नाही.झाडाला त्याचा राग येत नाही.वृक्ष त्या मारेकऱ्यालाही खूप भरभरून देत असतो.आता वसंत ऋतूत वृक्षाला वैभवशाली बहर आलेला,तो ते डोळे भरून पाहतो आहे.तो सौंदर्याचा विपुलतेचा साक्षात्कार पाहताना,तो इतका भारावतो की,हातातल्या कुऱ्हाडीने घाव घालायचेच विसरतो.तो क्षण त्याच्या आयुष्यात आमूलाग्र परिवर्तन घेऊन येतो.
तो वृक्ष आपल्या फांद्यांनी त्याला जवळ घेतो आणि म्हणतो... 'हे माणसा,किती हाव तुझी? हा हव्यासच तुला दुःखी करतो आहे.किती संपादन करणार आहेस? या संपादनात तू सारे काही नष्ट करतो आहेस.क्षणभर थांब आणि निसर्गाशी तुझा असलेला संबंध जाणून घे.तूही माझ्यासारखाच या निसर्गाचे अपत्य आहेस. या पृथ्वीवर प्रेम कर ! पृथ्वीवर तू पाहूणा आहेस. पाहुण्याला साजेशी तपःपुतता ठेव ! निसर्गाबरोबरचं,साऱ्या सजीव
सृष्टीबरोबरचं तुझं नातं तुटत चाललेलं आहे.' तो ते ऐकतो,आवाक होतो.इतके दिवस आपण काय करत होतो ? तो पश्चात्तापाने आणि मोठ्या अपराधीभावाने त्या वृक्षासमोर गुडघे टेकतो.तो आता ढसढसा रडतो आहे.
त्याच्या मनात येतं,काय करून बसलो हे मी? अखेर त्याच्या सद् सद् विवेकाला,सत्याला खडबडून जाग येते.तो त्या झाडाला म्हणतो, 'आकाशासारखा तू विशाल हृदयी सदभावी आहेस ! माझ्यासारख्या क्षुद्र मारेकऱ्याला तू प्रेमाने जवळ घेतलेस आणि खऱ्या अर्थपूर्ण जगण्याची तू मला आठवण करुन दिलीस ! मी मात्र वेड्यापिशा झालेल्या घोड्याप्रमाणे उधळलेलो होतो.तू मात्र माझे घाव शांतपणे झेललेस,पण माझ्यावर कधी हात उगारला नाहीस.सर्वांनाच भरभरून सावली,फुले फळे देणाऱ्या हे उदार-त्यागी क्षमाशील वृक्षा,तू नेहमीच आनंदाने-सुखासमाधानाने बहरलेला असतोस.तुझ्यातील सुपीकता व विपुलता तू सर्वांना मुक्त हाताने वाटून टाकतोस ! तुझ्याशी, निसर्गाशी असलेल्या संबंधातील संपूर्णत्वाची, एकत्वाची जाणीव,मला हळूहळू होऊ लागली आहे.मी मात्र,माझ्या कुऱ्हाडीने मोठ्या हावरटपणाने निसर्गाशी नाते तोडत होतो.तू खऱ्या अर्थाने वैभवशाली आहेस आणि खरोखरीच महान आहेस ! तुझ्या वेदना,तुझी दुःखे,
मी कधीच समजूनच घेतली नाहीत.आता मला तुझ्याशीच सख्य जोडायचे आहे,तुझाच हिस्सा बनायचा आहे.निसर्ग हा माझ्याच जीवनाचा एक भाग आहे,हेच मी विसरलो होतो. मी या बीजातून-निसर्गातून वाढलो आहे,हे माझ्या आता लक्षात आले आहे.'
मृतकवी
झाड आणि लाकूडतोड्या या (वरील) कवितेचा एक अन्वयार्थ
जन्मापासून जीवनाचा प्रारंभ होतो आणि मग आपले पुढील जीवन,तसेच आपले सारे अस्तित्त्व हे निसर्ग नियमांनी कळत नकळत बांधले जाते.जन्म,पौगंडावस्था,
तारुण्य,प्रौढत्त्व,वृद्धत्त्व आणि मृत्यू ही सारी स्थित्यंतरे आहेत.या स्थित्यंतरातून प्रत्येकाला जावेच लागते.
वाळवंटातल्या वाळूचे कण,उधळले जातात,वर उडतात आणि धुराळा पुन्हा खाली येतो.असे सतत चालू असते.
जगताना आपण विविध भूमिकात जगत असतो.या भूमिकांत जगत असताना,स्वच्या जाणिवांच्या विस्तारा
नुसार तुमच्यात परिवर्तन घडत जाते.
जबाबदारीतही काहींना बांधल्यासारखे वाटते. पण काही जण,आपला तो स्वधर्म आहे,आपले ते कर्तव्य आहे,असे म्हणून एका बांधिलकीने जगत राहतात.
माणूस जेव्हा जन्मतो,तेव्हा त्याला आपल्या आत असलेल्या चैतन्याची जाणीव नसते.अनेकदा आपली जीवनावरची पकड ढिली होते आणि मग समुद्राच्या लाटा जशा वर-खाली होतात, तसेच आपण जीवनप्रवाहात हेलकावे खात राहतो.खरे तर,या प्रवासाला विश्रांतीस्थल असे नसतेच.फक्त प्रवास करणेच,आपल्या हाती असते.काही जण आपल्या अपयशाबद्दल नशीबाला दोष देतात,तर काही लोक मोठ्या वैफल्यग्रस्ततेत जगत राहतात.काही जण स्वतःच्या जीवनदृष्टीनुसार जगत राहतात.अशी माणसे आपल्या मूल्यांशी एकनिष्ठ रहात, हेतूपूर्ण जीवन (एखाद्या विशाल वृक्षाप्रमाणे) जगतात.काही मात्र जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद लुटतात.पण काही जण त्यांच्या इच्छेनुसार-हावेनुसार जगू शकत नाहीत.काहींना जीवनाचा अर्थ अवतीभोवतीच्या लोकांची सेवा करण्यात मिळतो.ते इतरांना त्यांच्या इच्छा-स्वप्नांना पूर्तता करण्यासाठी मदत करतात.फळाने लगडलेले प्रत्येक झाड प्रवाशांना सावली आणि फळ देते आणि आपले आयुष्य कृतार्थतेने जगते.
जशी झाडाची वाढ होते,तशी त्याची सावलीही वाढत जाते.त्यामुळे थकले भागलेले प्रवासी झाडाच्या सावलीत निमिषभर विश्रांती घेतात आणि पुन्हा ताजेतवाने होऊन आपल्या प्रवासात प्रारंभ करतात.काही माणसे श्रीमंत- वैभवशाली असतात.प्रत्येक माणूस हा दुसऱ्यापासून वेगळा असतो.प्रतिकूल- अनुकूल वेळातही काहीजण अचूक निर्णयाने जीवनाला सामोरे जातात.
विश्वास आणि श्रद्धा यात मोठा फरक असतो. तुमच्या श्रद्धा,तुमचे अवघे जीवन बदलून टाकतात.आपली प्रत्येकाची कशा न कशावर तरी श्रद्धा असते.विश्वासाने जीवन एका सातत्याने जगणे,हे एक वेगळे आव्हान आहे. विश्वासातून आपल्याला श्रद्धेत स्थित्यंतरित व्हायचे आहे.महान श्रद्धा या मोठ्या ऊर्जेतूनच आकाराला येतात.आपण स्वतःवर, स्वीकारलेल्या मार्गावर श्रद्धा ठेवत,एका सृजनशीलतेतून,तसेच मोठ्या समंजसतेने जगले पाहिजे.तशी ही कहाणी वृक्ष आणि लाकूडतोड्याची असली,तरी ती अनेक दिशांनी व दृष्टीनी वाचकाला समृद्ध करते.धुळीचे लहानसहान कण हवेत उडत आहेत आणि पुन्हा खाली येत आहेत,वाळवंटाच्या या सागरात निसर्ग एकवटून प्रवाहित होतो आहे,असा कवितेचा प्रारंभ आहे.एक जीवाच्या शक्तिनीशी तो लाकूड तोडतो आहे,तर दुसरा स्वतःचे सर्वस्व देतो.जन्माच्या वेळी दोघांनाही माहित नव्हते, की त्यांना काय बनायचे आहे ते! एक जीवनाची लहर विसरला आहे,तर दुसरा वाऱ्याने सळसळतो आहे.तो झाडावर घाव घालतो आणि त्यातून आपले आयुष्य सावरतो.कितीतरी झाडांची कत्तल तो करतो. झाडांचा मात्र संघर्ष सुरूच आहे. या संघर्षात झाड ताठ उभे आहे आणि लोकांना सावलीसह फुलेफळे देते आहे. त्याच्या सावलीत अनेक थकलेले प्रवासी श्रांत होतात आणि पुढे जातात.वृक्ष असो वा लाकडूतोड्या,
दोघेही वाळूचे वरखाली होणारे कणच आहेत.तो अधिकाधिक घाव घालतो आणि खूप लाकडे-फळे जमा करतो.हे सारे करताना, तो सारे जंगल तो पालथे घालतो,
खूप भटकतो.वृक्षाचा मात्र आपल्या जगण्यावर विश्वास आहे.तो एकाच जागी स्थिर आहे. त्याची आणखीन आणखीनची हाव काही संपत नाही.झाडाला त्याचा राग येत नाही.वृक्ष आपल्या मारेकऱ्यालाही खूप भरभरून देत असतो.वसंत ऋतूत वृक्षाला वैभवशाली बहर आलेला एके क्षणी त्या लाकूडतोड्या दिसतो.ते सौंदर्य तो डोळे भरून पाहतो आणि पाहताना इतका भारावतो की,
हातातल्या कुऱ्हाडीने घाव घालायचेच विसरून जातो.तो क्षण त्याच्या आयुष्यात आमूलाग्र परिवर्तन घेऊन येतो.तो वृक्ष आपल्या फांद्यांनी त्याला जवळ घेतो आणि म्हणतो,
'हे माणसा, किती हाव तुझी ? हा हव्यासच तुला दुःखी करतो आहे.किती संपादन करणार आहेस? या संपादनात तू सारे काही नष्ट करतो आहेस.क्षणभर थांब आणि निसर्गाशी तुझा असलेला संबंध जाणून घे.तूही माझ्यासारखाच या निसर्गाचे अपत्य आहेस.या पृथ्वीवर प्रेम कर ! पृथ्वीवर तू पाहूणा आहेस. पाहुण्याला साजेशी तपःपुतता ठेव ! निसर्गाबरोबरचं,साऱ्या सजीव
सृष्टीबरोबरचं तुझं नातं तुटत चाललेलं आहे.'तो ते ऐकतो,आवाक होतो. इतके दिवस आपण काय करत होतो? तो पश्चात्तापाने आणि मोठ्या अपराधीभावाने त्या वृक्षासमोर गुडघे टेकतो.तो आता ढसढसा रडतो आहे. त्याच्या मनात येतं, काय करून बसलो हे मी? अखेर त्याच्या सद्सदविवेकाला,सत्याला खडबडून जाग येते. तो त्या झाडाला म्हणतो, 'आकाशासारखा तू विशाल हृदयी सदभावी आहेस ! माझ्यासारख्या क्षुद्र मारेकऱ्याला तू प्रेमाने जवळ घेतलेस आणि खऱ्या अर्थपूर्ण जगण्याची तू मला आठवण करुन दिलीस! मी मात्र वेड्यापिशा झालेल्या घोड्याप्रमाणे उधळलेलो होतो. तू मात्र माझे घाव शांतपणे झेललेस, पण माझ्यावर हात उगारला नाहीस. सर्वांनाच भरभरून सावली, फुले फळे देणाऱ्या हे उदार-त्यागी क्षमाशील वृक्षा, तू नेहमीच आनंदाने-सुखासमाधानाने बहरलेला असतोस. तुझ्यातील सुपीकता व विपुलता तू सर्वांना मुक्त हाताने वाटतोस ! तुझ्याशी,निसर्गाशी असलेल्या संबंधातील संपूर्णाची, एकत्वाची जाणीव,मला हळूहळू होऊ लागली आहे. तू खऱ्या अर्थाने वैभवशाली आहेस आणि खरोखरीच महान आहेस ! तुझ्या वेदना,तुझी दुःखे, मी कधीच समजून घेतली नाहीत. आता मला तुझ्याशी सख्य जोडायचे आहे,तुझाच हिस्सा बनायचा आहे. निसर्ग हा माझ्याच जीवनाचा एक भाग आहे,हेच मी विसरलो होतो.मी या बीजातून निसर्गातून वाढलो आहे,हे उशीरा का होईना माझ्या आता लक्षात आले आहे.'
आत्मसंवादातून व अभ्यासातून जीवनाला एक अलौकिक सूर गवसू शकतो.इतकेच नव्हे तर, नवनव्या बोधांची प्राप्ती होऊ शकते. तेव्हा नव्याने,मोठ्या जाणतेपणाने जगण्यास प्रारंभ करा.
मुख्य आशयसूत्रांची कविता अनुपम कुर्लवाल