* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: देणं - एक देणगी / Donate - a donation

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

१४/३/२६

देणं - एक देणगी / Donate - a donation

तुम्हाला आपल्या जीवनातून खरोखरच जास्तीचं काही लाभायचं असेल तर त्याला एकच मार्ग आहे - तुम्ही आपल्या स्वतःमधून काही इतरांना देऊन टाकायचं.


जीवना विषयीचा वर्षभर धडा शिकत आम्ही जो एकत्र प्रवास केला,त्यात तरूण जेसन स्टीव्हन्सची प्रगती मला तर स्मिमित करून गेली.त्याला अजून खूप दूरवर जायचं होतं,पण इंग्रजीत म्हणतात तशागत, बोगद्याच्या शेवटाला मला उजेड दिसत होता.कॉन्फरन्स टेबलाशी या एकत्रित प्रवासातला आमचा नववा महिना सुरू करायला आम्ही बसलो होतो. जेसनच्या चर्चेमध्ये,प्रवृत्तीमधे आणि वर्तणुकीमधे आश्चर्यकारक बदल झाला होता.या महिन्यात त्याच्यासाठी रेड स्टीव्हन्सच्या खजिन्यात काय असेल बरं,याची तो उत्सुकतेने वाट बघत असावासा दिसला. मी तरी नक्कीच वाट बघत होतो.


रिमोट कंट्रोलवरची योग्य कळ मिस् हेस्टिंग्जनं दाबली आणि पुन्हा एकदा व्हिडिओच्या पडद्यावर रेड स्टीव्हन्स दिसला.


"स्वप्न बघणारा म्हणून घेतलेल्या परिक्षेत यशस्वी झाल्याबद्दल जेसन तुझे मी अभिनंदन करतो.या कलेत निपुण झाला,असं मात्र समजू नकोस.तू व्यक्ती म्हणून जसा वाढत राहशील,त्याबरोबर स्वप्न पाहण्याचं तुझं सामर्थ्य आणि ती स्वप्न सत्यात आणण्याची तुझी हातोटी वृद्धिंगत होत राहील.


"या महिन्यात देणं ही एक देणगी आहे याबद्दल तू शिकावस असं मला वाटतं.आपण काही महिन्यांपूर्वी ज्याबाबत बोललो तसं हे एक विरोधाभासी तत्त्व आहे.पारंपारिक शहाणपणानुसार जितकं तुम्ही कमी द्याल, तेवढं जास्त तुमच्यापाशी राहील.याच्या विरूद्धही सत्य आहे.जेवढं जास्त तुम्ही द्याल,तेवढं जास्त तुमच्यापाशी असेल.समृद्धी आली की देण्याचं सामर्थ्य वाढतं,देत राहिलं की समृद्धी आणखी वाढते.मला हे फक्त आर्थिक बाबतीत म्हणायचं नाहीये.तुमच्या आयुष्याच्या सर्व पैलूंबाबत हे लागू पडतं.


"दाता होणं आणि ग्राहक होणं दोन्ही महत्त्वाचं असतं. जेसन,या जगात आर्थिकदृष्ट्या तुमच्याजवळ असलेलं सर्व काही मी तुला दिलेलं आहे.पण देणं ही एक सच्ची देणगी ठरायची असेल तर वस्तू किंवा पैशाबरोबर देणाऱ्याचे हात द्यावे लागतात.तसं करण्यात मी कमी पडलो.सर्वोत्तम देणगी,जिम स्टोव्हॅल,स्वाधारित कलासामग्री,डॉन बिलिंग्ज,अनुवाद - दिशा केळकर

EMBASSY BOOK DISTRIBUTORS


स्वीकारतांना तुझी वृत्ती जणु तुझा तो हक्क आणि विशेषाधिकार आहे अशी होती,त्यात कृतज्ञतेची भावना नव्हती.माझ्याकडून होती.कोरडी कर्तव्यदक्षता, आपल्या दोघांच्या या वृत्तीमुळे देणं ही एक सच्ची देणगी असते,तिच्या आनंदाला आपण दोघंही मुकलो.


"तुम्ही जेव्हा कोणाला काही देता तेव्हा त्यामागची प्रवृत्ती योग्य असली पाहिजे,त्यामागे कोरडी कर्तव्यदक्षता नको.माझं अख्खं जीवन मी लोकांना द्यायला शिकलो.वस्तू देणं आणि आपला हिस्सा दुसऱ्या लोकांना देणं या आपल्या विशेषाधिकारापासून दूर राहण्याची मी कल्पनाच करू शकत नव्हतो.


"देण्यामधलं मुख्य तत्त्व म्हणजे जे द्यायचं ते मुद्दलात खास तुमचं असलं पाहिजे,तुमच्या कमाईचं किंवा तुम्ही बनवलेल किंवा चक्क तुमचा एक हिस्सा असलेलं.


"या महिन्यात मी तुला देणे ही की देणगी होते,याचा धडा देणार आहे.पण जर तू मी तुला दिलेले पैसे दिलेस, किंवा त्या पैशातून एखादी वस्तू घेऊन दिलीस तर ते तत्त्वाला सोडून होईल.म्हणून येते तीस दिवस तू रोज दुसऱ्याला तुझं असलेलं काहीतरी बक्षीस म्हणून द्यायचे आहेस."


जेसन ओठातल्या ओठात पुटपुटला,"माझं असं काहीच नाहीये."


रेडच्या आवाजाने त्याला मध्येच तोडलं."हं,मला कळतंय,तू बहुधा विचार करतोयस की आपलं स्वतःचं असं काय आहे की जे दुसऱ्याला देता येईल.दुसऱ्याला देता येतील,आणि त्या केवळ तुझ्याच असतील अशा गोष्टींचा शोध घेतलास की तुला देणं या देणगीच्या खजिन्याची किल्ली सापडेल.आणि पूर्वी कधी माहीत नसलेल्या एका आनंदाच्या राज्यात तुला सहजगत्या प्रवेश मिळेल.मी तुला ठेवलेली सर्वोत्तम देणगी मिळावी म्हणून तुला अशीच वाट चालत रहायची असेल,तर या महिन्याच्या शेवटी महिन्याच्या प्रत्येक दिवशी तू काय दिलंस त्याचा अहवाल तू मिस्टर हॅमिल्टनना द्यायचा आहेत.नेहमीप्रमाणे,मी तुला यश चिंतीतो." टेप संपली आणि जेसन किंचाळून बोलला,"रेड आजोबांनी दिलेलं नाही असं रोजच्या रोज देण्यासारखं माझ्याकडे आहे तरी काय? माझ्याकडे जे जे आहे ते सगळं त्यांनीच दिलेलं आहे."


मी मिनीटभर विचार केला आणि उत्तर दिलं,"पन्नास वर्षांहून जास्त काळ मी रेड स्टीव्हन्सला ओळखत होतो.तो कडक शिस्तीचा असला तरी न्यायप्रिय होता. तुला साध्य करून घेता न येण्यासारख्या गोष्टींची तो कधीच मागणी करणार नाही."


कॉन्फरन्स रूममधून जेसन हळूहळू चालत बाहेर पडला.तो कुठवर आला आहे याचा मी विचार केला, आणि आशा वाटली,की त्या टप्प्यावर प्रवास थांबणार नाही.पुढचा महिनाभर मी सारखा विचार करत होतो. ज्याला त्याच्याजवळच्या एकूणएक गोष्टी दुसऱ्या कोणी दिलेल्या आहेत,ती स्वतःची अशी असलेली गोष्ट कशी कोणाला देऊ शकेल ? मी अगदी मान्य करतो,काही गोष्टींची कल्पना करता करता माझी दमछक झाली. मला आशा वाटत होती की स्वतःची शक्कल लढवून जेसन नीट काही करत असेल.मला ठाऊक होतं की


माझा सर्वात जुना आणि सर्वात प्रिय असलेला, त्याच्याबाबत असलेली माझी कर्तव्याची जाणीव आणि माझी निष्ठा यामुळे या खेपेचं मूल्यांकन मी निःपक्षपातीपणाने,कर्तव्यबुद्धीने करणार होतो.


महिन्याच्या शेवटच्या दिवशी जेसन परतला.तो आणि मिस हेस्टिंग्ज माझ्या लिहिण्याच्या टेबलाशी माझ्यासामोर बसले.आम्ही परस्परांना औपचारिकपणे शुभेच्छा दिल्या.जेसन म्हणाला, "हे पहा,तुम्हाला मी सांगतो की माझ्याकडून मी अगदी शिकस्त केली.रेड आजोबांच्या मनात होतं त्याप्रमाणे माझी सगळी देणी होती की नाही,याची मला खात्री वाटत नाहीये.हे अगदी सोपं नव्हतं."


"मी हसलो आणि म्हणालो,"शिकण्याजोगा असतो तो कुठलाच घडा कधीच सोपा नसतो."


जेसननं एक कागद काढून उघडला आणि त्याचा अहवाल तो वाचायला लागला : "माझ्या स्वतःच्या असलेल्या तीस गोष्टी,ज्या मला दुसऱ्याला देता येतील अशा,की ज्या मला रेड आजोबांनी दिलेल्या नाहीत, अशांची जुळवाजुळव करणे फार कठीण होते.पण ते मी केलंय.


"पहिल्या दिवशी मी बाजारपेठेत गेलो आणि पहिल्या रांगेतच गाडी नेऊन उभी करायला मला जागा मिळाली. मी गाडीबाहेर पडत होतो,तेव्हा मला एक वयस्क जोडपं गाडी लावायला जागा शोधत असतांना दिसलं.मी माझी गाडी काढून त्यांना तिथे जागा करून दिली.आणि मी माझी गाडी मागे जाऊन उभी केली."


जेसननं माझ्याकडे संमतीच्या अपेक्षेने पाहिलं.मी नुसती मान हलवली आणि म्हटलं,"चालू दे पुढे."


"दुसऱ्या दिवशी मी ऐन गावात गेलो असतांना वादळ झालं.एका तरूण स्त्रीजवळ छत्री नव्हती.मी माझ्या छत्रीचा उपयोग तिच्याबरोबर केला.तिसऱ्या दिवशी मी रूग्णालयात जाऊन रक्तदान केले.चौथ्या दिवशी मी शेजाऱ्याला भेटलो.त्याला नवीन टायर्स विकत घ्यायचे होते.गावात जवळच खरोखर चांगला सेल लागला होता,त्याबद्दल मी त्याला सांगितले.पाचव्या दिवशी गाडीपर्यंत सामान न्यायला मी एका वृद्ध बाईला मदत केली.सहाव्या दिवशी माझ्या शेजारच्या बाईंना त्यांच्या मित्रमैत्रीणींबरोबर बाहेर जायचे होते.मी तेवढा वेळ त्यांच्या मुलांवर लक्ष ठेवले.सातव्या दिवशी मी अंधांच्या केंद्रावर गेलो आणि दृष्टी नसलेल्या विद्यार्थ्यांना काही लेख वाचून दाखवले.

आठव्या दिवशी मी एका खानावळीत जेवण वाढायला मदत केली.आणि नवव्या दिवशी एका मित्राला एक लहानसं टिपण आणि एक कविता करून पाठवली.


"दहाव्या दिवशी मी शेजाऱ्यांची मुले शाळेत पोचवायचे काम स्वीकारले.मिशनऱ्यांची समाजकार्य करणारी जी सालवेशन आर्मी ही संस्था असते.तिला देणगी मिळालेले सामान बांधाबांधी करून हलवायला मी मदद केली.अकरा,बारा आणि तेरा या दिवशी मी माझ्या घरात एका सांस्कृतिक विनिमयाच्या कार्यक्रमांतर्गत काही परदेशी विद्यार्थ्यांची उतरण्याची सोय केली. चौदाव्या दिवशी इथल्या स्काऊट पथकाची साप्ताहिक सभा घेण्यात मदत केली.पंधराव्या दिवशी मला दिसलं की एका माणसाची गाडी सुरू होत नव्हती कारण त्याची बॅटरी संपली होती.मग मी धक्का दिला.त्यामुळे गाडी सुरू झाली.सोळाव्या दिवशी रूग्णालयात असलेल्या असलेल्या बऱ्याच लोकांची मी पत्रे लिहिली. सतराव्या दिवशी मी इथल्या पांजरपोळास गेलो आणि तिथल्या काही कुत्र्यांना बागेत फिरवून आणले.वारंवार प्रवास केल्यामुळे मला विमान कंपनीने काही फुकट प्रवासाचे पासेस दिले होते.एका शाळेच्या बँड पथकाला कॅलिफोर्नियाला परेडसाठी जायचे होते.मी त्यांना ते पासेस दिले.एकोणिसाव्या दिवशी मी एका आश्रमात गेलो.तेथे अपंग आणि वृद्ध माणसांना जेवण देण्यात मदत केली.


"एका स्काऊटच्या लहान मुलांच्या पथकाला मी मासेमारी करायला आणि छावणीतल्या वास्तव्याला घेऊन गेलो.हे मी वीस,एकवीस,बावीस आणि तेवीस या दिवशी केलं. या आधी मासेमारी करायला किंवा छावणीमध्ये राहायला मी कधीच गेलो नव्हतो. चोविसाव्या दिवशी मी चर्चमध्ये जाऊन सदस्यांनी देऊन टाकलेल्या घरगुती वस्तूंची विक्री करण्यात मदत केली.पंचवीस आणि सव्वीस या दिवशी एक पथक जे हाबिटाट फॉर ह्युमॅनिटी (म्हणजे मनुष्य जातीसाठी निवासस्थाने) यासाठी काम करतात त्यांना मदत केली. सत्ताविसाव्या दिवशी एका धर्मादाय काम करणाऱ्या मंडळाला स्वागत समारंभ करण्यासाठी माझ्या घराचा वापर करू दिला.अठ्ठाविसाव्या दिवशी माझ्या शेजाऱ्याला त्याच्या आवारातला पालापाचोळा गोळा करायला मदत केली.

एकोणतिसाव्या दिवशी मी काय केलं माहिती आहे,बघा तुमचा विश्वास बसतो का, प्राथमिक शाळेचा बेकिंग सेल होता,तिथं बिस्किटं भाजायला मदत केली."


या टप्प्यावर जेसननं अहवाल वाचणं थांबवलं. एकोणतीस दिवस ज्यानं काही ना काही दिलंय त्यानं तिसाव्या दिवशी काहीच केल नाही असं काही माझ्या मनात येईना.शेवटी न रहावून मी विचारलं,"जेसन, तिसाव्या दिवसाचं काय ?"


जेसन हसून म्हणाला, "आज तिसावा दिवस आहे. आणि मी तुमच्यासाठी आणि मिस् हेस्टिंग्जसाठी काही बिस्किटं आणली आहेत.मी बेक सेल साठी घरी तयार केली ती."


जेसनच्या पायाशी एक पिशवी होती.इतका वेळ काही माझं तिच्याकडे लक्ष गेलं नव्हतं.तिच्यात त्यानं हात घातला आणि आम्हालां प्रत्येकाला थोडी बिस्किटं दिली.


जेसननं महिन्याभरासाठी नेमून दिलेलं काम पार पाडलेलं पाहून माझा जीव भांड्यात पडला.मी बिस्किटाचा एक तुकडा तोंडात टाकला आणि म्हणालो, "जमलंय बऱ्यापैकी,पण तुझ्या स्वप्नांमध्ये बेकींगचा समावेश नाही,ते एक बरं आहे."


आम्ही सर्वजण हसलो.आणि मग दुपारभर जेसन त्याला भेटलेल्या निरनिराळ्या माणसांबद्दल बोलत राहिला.महिनाभरात त्यानं त्याचं काय काय दिलं, याबाबत तो सांगत होता.एखादी छोटीशी गोष्ट जरी दिली,तरी घेणाऱ्याला ती किती महत्त्वाची देणगी होते याची मला आठवण झाली.


■■■ समाप्त ■■■