* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: कृतज्ञता - एक देणगी / Gratitude - a gift

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

4/1/26

कृतज्ञता - एक देणगी / Gratitude - a gift

्पल्या जीवनात ज्या काळात आपण जास्त जास्त गोष्टींचा हव्यास करतो,तेव्हा आपल्याजवळ असलेल्या गोष्टींबद्दल आपण समाधानी असावे.असं केल्यानं खूपदा आपल्याला आढळतं की, आपलं जीवन आजच भरून पावलं आहे.


हाव्या महिन्यात आमच्या एकत्रित होणाऱ्या भेटीसाठी जेसन आला.मागच्या महिन्यात त्याचा जो धडा होता,त्याच्या असलेल्या गोष्टीच फक्त त्याला द्यायच्या होत्या,त्या त्याला महिनाभर देता येतील एवढ्या सापडल्या,याचा मला अजूनहि अचंबा वाटत होता.शिकलेल्या सर्व धड्यांचा मी विचार करत होतो, आणि मला आठवण झाली,की आता थोडेच धडे राहिले होते,आणि मग जेसनला रेड स्टीव्हन्सकडून सर्वोत्तम देणगी मिळणार होती.


माझ्या मनाची स्थिती जणू बेसबॉलमधल्या,ज्याची मेडन ओव्हर पूरी होत आल्यावर जशी होईल,तशी झाली, थोडीशी जरी चूक या टप्प्यावर झाली,तर हातातोंडाशी आलेल्या यशावर पाणी पडेल आणि कष्ट वाया जाणार असे होईल.जेसननं प्रत्येक महिन्याचं योजलेलं काम व्यवस्थित पार पाडलं होतं,आम्हा दोघांना एक काम तडीस नेल्यासारखं वाटलं,पण त्याच वेळेला असं वाटत होतं की आम्ही आधीच्या वेळेपेक्षा खूपच जास्त काही गमावण्याची शक्यता आहे.


मिस् हेस्टिंग्ज,जेसन आणि मी कॉन्फरन्स रूममधे जमलो होतो,तेव्हा मला वाटलं रेड स्टीव्हन्स आता आमच्या पुढ्यात काय घेऊन येतोय हे कळायला आम्ही सर्वच उत्सुक झालो होतो.मिस् हेस्टिंग्जने व्हिडिओ सुरू केला आणि रेड स्टीव्हन्सची परिचित छबी आमच्यासमोर आली.


"तुम्हाला सर्वांना शुभेच्छा,जेसनचं अभिनंदन आणि मिस्टर हॅमिल्टन आणि मिस् हेस्टिंग्जना धन्यवाद."


रेड स्टीव्हन्सन उजवा डोळा मिचकावला.पाच दशकांपेक्षा जास्त काळापासून त्याची ही लकब माझ्या परिचयाची होती.हे मिचकावणं कित्येक भाव सांगून जायचं.त्याच्या प्रेतयात्रेला जाऊन आल्यावर आता हे मिचकावण मला यापुढे कधीच दिसणार नाही,हे मला लक्षातच आलं नव्हतं.


त्याचं बोलणं सुरू झालं,"जेव्हा आपण आपलं मृत्युपत्र तयार करतो,आणि या व्हिडिओसारखी व्हिडिओ तयार करतो,तेव्हा आपोआपच आपण आपल्या सबंध आयुष्याचा विचार करतो.मी खूप ठिकाणी गेलोय, आणि खूप गोष्टींचा मी अनुभव घेतलाय,त्यामुळे की काय मी तर एकच जीवन जगलो हे लक्षात ठेवणं फार जड जातं.


"मी तरूण असतांनाची आठवण सांगतो,मी इतका गरीब होतो की,मला खायला अन्न मिळावं म्हणून दिवसभर कष्ट करावे लागायचे,आणि रात्री मी रस्त्याच्या कडेला झोपायचो.मला हे पण आठवतंय की अमीर उमराव,धनिक,श्रींमत यांच्या संगतीत मी होतो आणि अशा ऐषोआरामी जीवनाच्या सर्व गोष्टी मला ठाऊक होत्या.मी आज मागे वळून बघीतलं तर त्या गोष्टींबद्दल कृतज्ञतेनं माझं मन भरतं.


"मला वाटतं,ज्या काळाचे माझे भयंकर वाईट अनुभव आहेत,

त्या काळाच्या सुद्धा माझ्या काही आठवणी मात्र रम्य आहेत."


रेड थबकला,त्याच्या विचारांची जुळवाजुळव केली त्यानं,आणि दामटून बोलला तो."जेसन,या महिन्यात तू जो धडा शिकणार आहेस,त्याचा आवाका असा आहे की,त्यामुळे तुझ्या आयुष्यात ज्याचा पूर्ण अभाव आहे, त्याला स्पर्श होईल.तो अभाव असणारी गोष्ट म्हणजे कृतज्ञता.


"काय विडंबना आहे,काय विचित्र गंमत आहे पहा,या जगात ज्यांनी खूप कृतज्ञ असावं,ते जवळ जवळ अजिबात कृतज्ञ नसतात,आणि असेही खूप लोक असतात की जे जवळजवळ कंगाल असूनही अत्यंत कृतज्ञभावनेने जगत असतात. .


"मी तेव्हा तरूणच होतो.नुकताच स्वतःच्या पायावर उभा राहून जग जिंकू बघत होतो.तेव्हा मला एक गृहस्थ भेटला.त्याचं वर्णन आजच्या जगात बेघर असं करता येईल.मग पाह्यलं तर असे कित्येक लोक होते तेव्हा,की जे इथे तिथे बारीक सारीक काम करीत देशभर भटकत होते.तो मंदीचा काळ होता,आणि ही बरीच भटकी आणि उचलेगिरी करणारी माणसं चांगली सुशिक्षित होती,आणि त्यांच जीवन समृद्ध अनुभवांचं होतं,


"जवळजवळ वर्षभर मी आणि जॉश सहप्रवासी होतो. तेव्हा तो वयस्क वाटायचा मला पण मी तेव्हा अपरिपक्व वयाचा होतो,

त्यामुळे माझा कदाचित अंदाज चुकीचाही असेल,मला भेटलेल्या माणसांमध्ये तो असा एकमेव माणूस असेल की,ज्याच्याबाबत मी छातीठोकपणे सांगू शकतो की त्याच्या वाट्याला एकही वाईट दिवस आला नव्हता,आणि जर का त्याचा कधी दिवस वाईट गेलाच असेल तर त्याची कधीच दिसण्याजोगी खूण नसायची,

आम्ही इकडे तिकडे प्रवास करायचो,तेव्हा आम्हाला कधी भिजायला व्हायचं,कधी थंडीनं आम्ही कुडकुडायचो,तर कधी भुकेनं व्याकूळ असायचो.पण जॉशचा मूड कधी जायचा नाही.तो सर्वांशी चांगल्याच गोष्टी बोलायचा.


सर्वोत्तम देणगी,जिम स्टोव्हॅल 


"शेवटी,मी जेव्हा टेक्ससमध्ये कायम वास्तव्य करायचं आणि तेथे माझं नशीब आजमवायचं ठरवलं,तेव्हा मी आणि जॉशमधली साथ संपली,कुठे स्थिरस्थावर व्हायचं त्याच्या रक्तातच नव्हतं.आमचा वियोग होण्याच्या वेळी मी त्याला विचारलं,तो सदा असा मस्त मूडमध्ये का बरं असायचां ? त्यानं मला सांगितलं की त्याच्या आईने त्याला जो वारसा दिला होता,त्यांत मृत्युपत्रांतर्गत एक सुवर्णयादी होती.


त्यानं मला उलगडून सांगितलं की,तो बिछान्यात रोज सकाळी उठल्याबरोबर,जिथे तो असेल,तिथंही झोपेतून उठल्याबरोबर डोळ्यासमोर मनानं एक सोनेरी फलक आणतो,त्यावर त्याच्या आयुष्यात त्यानं ज्यांच्याबद्दल विशेष कृतज्ञ असावं अशा दहा गोष्टी लिहिलेल्या आहेत.त्यानं मला सांगितलं की,त्याच्या आईनं असं तिच्या आयुष्यभर अगदी रोज केलंय.त्यानं त्याच्या आईसोबत असं केलेलं असल्यामुळे त्यानं एकही दिवस चुकवलेला नाही.


जवळजवळ साठ वर्षांपूर्वी या उपक्रमात मी पण जॉशबरोबर असायचो.त्यामुळे की काय मी पण एकही दिवस चुकवला नाहीये,

आणि म्हणून मी आज या टप्प्यावर इथवर येऊन उभा आहे काही दिवशी मी खूपशा छोट्याछोट्या गोष्टींबद्दल आभारी असतो.आणि कधीकधी माझं जीवन आणि माझ्या भोवतालच्या सगळ्या गोष्टी याबद्दल मला विलक्षण धन्यता वाटते."


रेडनं घसा साफ केला,तो एक घोटभर पाणी प्यायला,जरा सावरला आणि पुढं बोलू लागला "जेसन,आज मी ती सुवर्णयादी मृत्युपत्राद्वारे तुझ्याकडे सुपुर्द करतो आहे.जॉशची आई,नंतर जॉश,त्याच्यामार्फत मी आणि आता तू,असा या यादीचा शंभर वर्षांहून जास्तच काळ प्रवास झालाय.जॉशच्या आईला हा उपक्रम कसा सापडला,हे मला माहित नाही,म्हणून ही गोष्ट मला माहित आहे त्यापेक्षाही जुनी असू शकेल.


"ते काही असू दे,मी आता तुझ्याकडे सोपवतोय आणि सुरूवातीला तू दक्षता बाळगलीस,


तर लवकरच ती गोष्ट तुझ्या श्वासोच्छ्वासाप्रमाणे केवळ तुझी होऊन जाईल."


"या महिन्यात तुझ्याकडे ज्याज्या गोष्टी आहेत,आणि त्यांच्याबाबत तू आभारी असावंस अशा गोष्टींचा तू विचार करायचा आहेस.

महिन्याच्या शेवटी तू जेव्हा परत येशील तेव्हा त्या सोनेरी यादीचा तुझा तर्जुमा मिस्टर हॅमिल्टनला उलगडून सांगायचा.मी आशा करतो की तुझ्या उरलेल्या आयुष्यभर तू हा उपक्रम राबवशील आणि मग आज जसा तो वारसा कुणाला सोपवण्याची विशेष संधी मला मिळते आहे,तशी परत तुलाही ती मिळेल."


रेडची छबी मावळली आणि पडदा रिकामा झाला.


दुसऱ्या दिवशी माझ्या नेहमीच्या सवयीने मी बरोबर पाच वाजता उठलो.गजराच्या घड्याळाशिवाय मी कित्येक वर्षे असा उठत आलोय.रेडनं जेसनला सांगितलेल्या सोनेरी यादीविषयी मी विचार करत पडून राहिलो,आणि अंथरूणाच्या बाहेर येईपर्यंत मी माझी स्वतःची यादी जुळवू लागलो.


अंथरूणातून बाहेर पडायला पूर्वी लागायचा त्यापेक्षा जास्तच वेळ आत्ता,म्हणजे ऐंशी वर्षांचा झाल्यावर लागायला लागला.म्हणून मग माझ्या लक्षात आलं की रोज रेड स्टीव्हन्सचा कृतज्ञतेचा धडा गिरवायला माझ्यापाशी खूप वेळ होता.


महिन्याचा शेवट जसजसा जवळ येऊ लागला.तसतशी मला जेसन स्टीव्हन्सची आठवण येऊ लागली. माझ्याप्रमाणे त्याचीही सोनेरी यादी करण्यात रोज प्रगती होत असावी,अशी मला आशा वाटत होती.मला चिंताच होती खरं तर,कारण प्रत्येक गोष्टींवर हक्क असल्यागत त्याची सगळी जिंदगी गेली होती.


महिन्याच्या शेवटच्या दिवशी जेसन जरा लवकरच आला.त्याच्या डोळ्यात चमक होती,आणि त्याची चाल जरा उडतीच होती.माझी चिंता जरा कमी झाली. जेसननं आणि मी हस्तांदोलन केलं,आणि त्यानं मिस् हेस्टिंग्जला अभिवादन केलं.मी माझ्या टेबलाशी बसलो, जेसननं मिस् हेस्टिंग्जसाठी खुर्ची सरकावली,आणि स्वतः तिच्या शेजारच्या रिकाम्या खुर्चीत स्वारी विराजमान झाली.


मी तर सांगूनच टाकलं,"वा छान मूडमध्ये दिसतोयस आज,जेसन."


तो मोठ्यानं हसला आणि म्हणाला,"मला कल्पना नव्हती,एवढी खूप कारणं निघालीयेत माझा मूड चांगला व्हायला."


जेसननं त्याची सोनेरी यादी सांगायला सुरूवात केली. "या महिन्यात अगदी रोज मी अशा गोष्टींचा विचार करीत होतो की ज्यांच्याकरिता मी कृतज्ञ असायला हवं. त्या इतक्या मोठ्या संख्येनं आहेत,याची मला कधीही कल्पना नव्हती.


"अगदी प्रथम म्हणजे,माझं आरोग्य.माझं आरोग्य नेहमी ठीकच असतं.गेले दहा महिने रेड आजोबांच्या मृत्युपत्राच्या कारणाने निरनिराळ्या लोकांना मी भेटलो, ज्यांना काही ना काही प्रकृतीच्या तक्रारी होत्या,म्हणून मी माझ्या चांगल्या आरोग्यासाठी नेहमीच कृतज्ञ राहीन."


"त्या खालोखाल,मी माझ्या तारूण्यासाठी कृतज्ञ आहे. आतापर्यंत आयुष्यात मी बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टींना मुकलो आहे.पण मला वाटतं,तारूण्यामुळे कुठलाही अडथळा पार करता येईल.


"तिसरी बाब म्हणजे,माझं घर.मी त्यासाठी कृतज्ञ आहे. रेड आजोबांच्या दातृत्वामुळे हे सुंदर घर शक्य झालं. मला इतके दिवस त्याचं महत्त्व कळलंच नव्हतं,खरं तर कळायला हवं होतं,पण मृत्युपत्राच्या या सर्वोत्तम देणगीमुळे मला इतरांसोबत त्यात राहता आलं आणि त्याचं महत्त्व कळलं.


"चौथा क्रमांक येतो माझ्या मित्रांचा.मी त्यांचा ऋणी आहे."


त्यानं मिस् हेस्टिंग्जकडे आणि माझ्याकडे पाहिलं आणि तो पुढं वाचू लागला."तुम्ही दोघं ब्रायन, गस् कॉल्डवेल, रेड स्टीव्हन्स होममधली मुलं आणि मला नीट सांगता येत नाहीये,पण एक खास कारणास्तव - माझे रेड आजोबा.


"पाचवी गोष्ट म्हणजे,माझं शिक्षण,यासाठी मी धन्य आहे.जरी मी कॉलेजमध्ये फार लक्ष दिलं नाही तरी पुढे काही शिकायचं म्हटलं,शिक्षण आणि विद्या यांना माझ्या आयुष्याचा एक खराखुरा भाग करायचं तर,त्याची सामग्री मला मिळाली.


"सहावं स्थान,माझ्या रेड आजोबांमुळे मी वर्षानुवर्षे जिथं जिथं हिंडलो,जे जे अनुभवलं,त्याचं मी ऋण मानतो.


"मी माझ्या गाडीचे आभार मानतो,सातव्या क्रमांकाने. अगदी विश्वासाची,विसंबून रहावं अशी,आणि चालवायला गंमत वाटते अशी आहे ती.ब्रायनकडून मला ठाऊक झालं की,माझ्यासारखे सगळे नशिबवान नसतात.


"आठवा क्रमांक येतो माझ्या कुटुबाचा,इतकी वर्ष मी त्यांची किंमत नेहमी ओळखत नव्हतो.पण मी आता इतक त्याबद्दल शिकलोय की मी जास्त चांगल्या प्रकारे त्यांच्याबरोबर राहीन,आणि त्याच वेळेला नव्या नव्या लोकांबरोबर संबंध जोडून कौटुंबिक नातं निर्माण करीन.


"इतकी वर्ष रेड आजोबांनी मला जो पैसा दिला, त्याबद्दल मी फार धन्य आहे.हा क्रमांक नववा.पण याहून जास्त महत्त्वाचं,म्हणजे रेड आजोबांच्या प्रयत्नांमुळे पैशाचे विविध उपयोग आणि पैशाची किंमत मी शिकलो.याबद्दल भविष्यकाळात मला जास्त शिकायचंय आणि माझ्याजवळ असलेला पैसा अधिक शहाणपणानं कसा वापरायचा हे पण मी शिकणार आहे.


"आता शेवटचा क्रम दहावा.सर्वोत्तम देणगीकडे जाणाऱ्या प्रत्येक पायरीबद्दल मी धन्य आहे.मी रेड आजोबांचे आभार मानतो.त्यांनी माझ्या आयुष्याचा विचार करून विचारांची जुळवाजुळव केली.

त्यांची इच्छा अंमलात तुम्ही दोघांनी आणलीत.यासाठी मी तुमचे आभार मानतो.


मिस् हेस्टिंग्जनं त्याला रोखलं आणि ती म्हणाली, "जेसन,काय छान यादी आहे ही! सोनेरी यादी. कृतज्ञता,ही एक देणगी तुला चांगली समजली आहे."


जेसन हसला आणि म्हणाला,"मिस् हेस्टिंग्ज, खरोखर आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे मला असं खूप सांगण्यासारखं होतं.आपण ज्यांच्यासाठी कृतज्ञ रहावं, अशा कितीतरी गोष्टी आहेत,त्यांना दहापर्यंत मर्यादित ठेवणं फार कठीण आहे."


मी जेसनचं अभिनंदन केलं,आणि जेसननं निरोप घेण्याआधी आम्ही सर्वांनी हस्तांदोलन केलं.मी स्वतःला बजावलं की,दुसऱ्या दिवशी सकाळी जी सोनेरी यादी करीन त्यात जेसन आणि रेड स्टीव्हन्स दोघंही असतील. आणि मी ज्या गोष्टींसाठी स्वतःला धन्य मानावं अशा गोष्टींचा मी विचार करू लागलो.


●●● समाप्त ●●●