* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: प्रेम - एक देणगी / Love is a gift

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

6/2/26

प्रेम - एक देणगी / Love is a gift

प्रेम हा असा खजिना आहे की त्यासाठी आपल्याला काही देता येत नाही.तो देत राहण्यानेच खजिना खजिना रहातो.

मी जेसन स्टीव्हन्सच्या येण्याची वा वाट बघत होतो, तेव्हा माझ्या संमिश्र भावना होत्या हे मला कबूल केलंच पाहिजे.वर्षभर चाललेल्या या आमच्या शोधयात्रेत मागच्या महिन्यात जो आमचा सहप्रवास झाला,तो म्हणजे एक सुरूवात होती,हे मला माहीत होतं.जेसननं जी प्रगती केली होती,त्यामुळे मी हर्षभरित झालो होतो,आणि त्याच्या भविष्याबद्दल मला उत्साह आणि खात्री वाटत होती.कठीण पण अर्थपूर्ण प्रवास संपल्यावर येतो तो रितेपणाही मला जाणवू लागला.

मी आपला आयुष्यभराचा जिवलग रेड स्टीव्हन्स गमावून बसतोय की काय अशी एक प्रकारे माझी भावना झाली,कारण आता या दर महिन्याच्या सभेची वाट मला बघायला लागणार नव्हती.दुसऱ्या प्रकारे असंही झालं होती की जेसनबरोबर त्याच्या या रूपांतरातून जातांना असं घडलं की रेड स्टीव्हन्समधला उत्तम भाग कायम माझ्या सोबत असणार होता.

अंतर्गत फोनवरून मिस् हेस्टिंग्जनं,जेसन स्टीव्हन्स आला असल्याचं सांगितलं.त्या दोघांना मी कॉन्फरन्स रूममध्ये भेटलो,आणि माझी खात्री आहे की माझ्यासारख्याच त्याच्याही मनात संमिश्र भावना होत्या.

मिस् हेस्टिंग्जनं रेड स्टीव्हन्सच्या मृत्युपत्रासोबत तळघरात ठेवलेली व्हिडिओ टेप बाहेर काढली.हा खोका आमच्या कपाटात होता.मिस् हेस्टिंग्जचं हे नित्यकर्म आमच्या परिचयाचं झालं होतं.आमच्या कॉन्फरन्स रूमच्या टोकाला असलेल्या व्हिडिओ प्लेअरमध्ये तिनं ती ठेवली.

सर्वोत्तम देणगी,जिम स्टोव्हॅल,स्वाधारित कलासामग्री,डॉन बिलिंग्ज,अनुवाद - दिशा केळकरEMBASSY BOOK DISTRIBUTORS

मोठ्या पडद्यावर रेड स्टीव्हन्सची छबी साकारली.मला तो चांगला माहीत असल्यामुळे मी खात्रीने सांगतो की,आमच्यासारख्याच रेडच्याही भावना झाल्या होत्या.

रेडनं सुरूवात केली."जेसन,मला तुझं अभिनंदन करायचं आहे.तुझ्यासाठी मी योजलेल्या सर्वोत्तम देणगीच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत तू पोचलास.मागच्या महिन्यात एका दिवसाची देणगी हा घडा होता.त्यात जी शिकण्याची क्रिया सामावलेली होती,त्यातून तू खूप छान पार पडलास,मला तुझा अभिमान वाटतो.तू तुझ्या अखेरच्या दिवसासाठी काय योजना केलीस,ते मला माहित नाही.पण ते मिस्टर हॅमिल्टनला पसंत पडलं असावं.मला वाटतं,तू बहुधा माझ्याप्रमाणे साध्या आणि सरळ गोष्टीच त्या दिवसासाठी योजल्या असशील.

"आपण जसं जगायला हवं,तसं जर जगत राहिलो,तर प्रत्येक गोष्ट अशाच क्रमाक्रमाने होत रहाते,की आपल्या आयुष्याचा शेवटचा दिवस हा इतर कोणत्याही दिवसाप्रमाणेच असतो.नेहमी लक्षात ठेव की दीर्घ आयुष्याची ग्वाही आपल्याला कोणालाच नसते, आपल्याला फक्त आजची ग्वाही असते,दुसऱ्या कशाचीही नाही.

"मला असंही वाटतं की,जरा लक्ष दिलंस तर तुला कळेल की आयुष्याच्या शेवटच्या दिवसासाठी काही योजून ठेवण्यासारखं काहीच नसतं,ते आज किंवा उद्यापण करण्यासारखं असतं.कसं कोण जाणे,पण मला वाटतं की आयुष्यातल्या दुःखद गोष्टी या मोठ्या अपयशांमुळे नाही,तर चुकलेले छोटे छोटे आनंद आणि न मिळालेले सहानुभूतिचे आविष्कार यातून बनतात."

रेड स्टीव्हन्स थांबला.त्याच्या आणि आम्हा सर्वांच्या भावना त्या अंधाऱ्या खोलीतही मला जाणवत होत्या.त्यानं बोलण चालू ठेवलं,"जेसन,या शेवटच्या महिन्यात मी तुला जी सर्वोत्तम देणगी देत आहे त्याच्या एका भागाची मी तुला ओळख करून देणार आहे.या भागात इतर सर्व देणग्यांचा समावेश होतोच,पण त्याखेरीज तू आपल्या जीवनात जे जे करशील, मिळवशील किंवा माहीत करून घेशील त्याचाही समावेश होतो.हा भाग म्हणजे प्रेम एक देणगी.

" जीवनात जे जे चांगलं,आदरणीय हवं हवंस वाटणारं असतं,त्याचा पाया प्रेम हा असतो.जे जे वाईट किंवा दुःखदायक असतं,त्याचं कारण प्रेमाचा त्याच्या जगण्यात पूर्ण अभाव हे असतं.”

आपल्या समाजात प्रेम हा शब्द चुकीच्या अर्थाने किंवा अती सढळपणाने वापरला जाणारा शब्द आहे.कित्येक गैरमहत्त्वाच्या छोट्या छोट्या गोष्टी आणि छोटे छोटे उपक्रम यांनाही तो लावतात.पण प्रेम-एक देणगी याविषयी मी बोलतो ते प्रेम म्हणजे एक स्वाभाविक चांगुलपणा असतो.गाभ्याशी प्रेम असतं तेव्हा हा चांगुलपणा त्याचा एक भाग असतो.

"या वर्षभरात ज्या ज्या इतर गोष्टींचा तू अनुभव घेतलास,त्या प्रत्येक गोष्टीत प्रेमाचा अंतर्भाव होता. आता येत्या तीस दिवसांत या गोष्टींमध्ये प्रेमाचा अंतर्भाव कसा होता,याचा माग तू घ्यायचा आहेस,मी ही तुझ्याकडून अपेक्षा करतो.तुला जे सापडलं,त्याची यादी करून तू मिस्टर हॅमिल्टनला सादर करायचीस.

"नीट लक्षात ठेव की तुझी वर्तणूक आणि तुझं काम यांची अजूनही तपासणी होते आहे.”

जर अगदी या बाराव्या महिन्यातही कसोटीस उतरला नाहीस तर तुला मी योजलेली सगळीच्या सगळी सर्वोत्तम देणगी मिळणार नाही,माझी सुचना तुला घाबरवण्यासाठी नाही.तुझ्यापुढे व्यक्त करता येईल अशी सर्वोच्च दर्जाची ती माझी प्रेमभावना आहे.त्या दर्जाप्रत मला तुला न्यायचे आहे."

रेड स्टीव्हन्सची प्रतिमा लोप पावली.पुन्हा एकदा पडदा रिक्त झाला.

काही मिनिटं जेसन स्तब्ध बसून होता.मला माहित होतं, की तो गहन विचारांमध्ये बुडलेला होता.शेवटी आम्ही सर्वजण उठलो,आणि शांतपणे कॉन्फरन्स रूममधून बाहेर पडलो.जणू काही रेड स्टीव्हन्सला श्रद्धांजली वहायला आम्ही जमलो होतो.माझ्या खूप जुन्या आणि खूप प्रिय असलेल्या मित्राला ही योग्यच प्रशंसा होती.

महिन्याच्या शेवटच्या दिवशी मिस् हेस्टिंग्ज माझ्या कार्यालयात जेसनला पुढे घालून आली.ती दोघं नेहमीच्या जागी बसली,आणि आम्ही शुभेच्छांची देवघेव केली.मी छातीठोकपणे सांगतो की,जेसन मनात खूपकाही वागवत असला पाहिजे.

जेसननं बोलायला सुरूवात केली,"मिस्टर हॅमिल्टन आणि मिस् हेस्टिंग्ज,गेल्या वर्षभराचा उपक्रम माझ्यासाठी काय घेऊन आला हे सांगायला माझ्याजवळ शब्दच नाहीत.एक वर्षापूर्वी मी जो होतो तो माणूस मी अगदी नाही.मी मानतो की,बऱ्याच अर्थी आज माझा वाढदिवस आहे.तुम्ही दोघं त्याचा एक भाग झाल्याबद्दल मला तुमचे आभार मानायचे आहेत."

माझ्या लक्षात आलं की जेसनचे डोळे पाणावले होते, आणि त्याच वेळी मिस् हेस्टिंग्जच्या अ‍ॅलर्जीनं उचल खाल्ली होती.माझाही गळा भरून आला,हे मी कबूल करतो.जेसननं खोल श्वास घेतला आणि त्याचा अहवाल सुरू केला.

"या वर्षाच्या पहिल्या महिन्यात,मला राग आला होता, आणि कुटुंबातल्या प्रत्येकाला जसा वाटा मिळाला तसा वाटा मिळाला नसल्यामुळे मनानं बंड केलं होतं.एका अख्ख्या वर्षाचा तेव्हा मी तो चक्रम बेत समजत होतो. त्याबद्दल मला कळल्यावर तर मी फारच वैतागलो होतो. मग मी टेक्ससला गस् कॉल्डवेलकडे काम एक देणगी कशी असते ते शिकायला गेलो.

"जेव्हा गस् कॉल्डवेलने मला खड्डे खणून कुंपण करायची आज्ञा केली,तेव्हा प्रेम या गोष्टीशी मी अगदी अपरिचित होतो.पण मागे वळून पाहिलं की कळतंय, की गस् कॉल्डवेलच्या मनात रेड आजोबांबद्दल गाढ प्रेम होतं आणि ते त्यांनी माझ्यापर्यंत पोचवलं.रेड आजोबांनी काम-एक देणगी हा जो धडा माझ्यासाठी योजला होता तो मी नीट शिकावा म्हणून त्यांनी भरभरून प्रेम केलं माझ्यावर,काम नीट नेटकं करण्यानं एक प्रकारचं प्रेम मिळतं हे पण मी शिकलो.दिवसभर श्रम केल्यावर तुम्ही थांबता आणि सरळ बळकट कुंपणावरून,जे कुंपण तुम्ही स्वतःबांधलंय त्यावरून सूर्य मावळतांना बघता,तेव्हा तुम्हाला जगाचा व्यवहार सुरळीत चालल्याची जाणीव होते.

" पैसा- एक देणगी हा धडा मी ज्या महिन्यात शिकलो तेव्हा मी शिकलो की,पैशावर प्रेम करण्यानं एका पोकळ,अर्थहीन जीण्याकडे आपण जातो.पण आपण जेव्हा लोकांवर प्रेम करायला शिकतो,आणि पैशाचा साधन म्हणून वापर करतो,तेव्हा सर्व गोष्टी यथार्थ दृष्टीने पाहिल्या आहेत असं वाटतं.

" मित्र-एक देणगी हा धडा मी ज्या महिन्यात शिकलो, तेव्हा आपण इतरांवर कशा रीतीने प्रेम दाखवू शकतो हे मी प्रथमच शिकलो.आपण जेव्हा फक्त स्वतःबद्दलच चिंता करतो तेव्हा आपण नेहमी हिरमुसलेले राहतो. पण जेव्हा आपण इतरांचा आणि त्यांच्या भल्याचा विचार आधी करतो,तेव्हा आपलं आणि त्यांचही भलं होतं.

" शिकणं - एक देणगी असल्याचं शिकतांना मला असा शोध लागला की,ज्या लोकांजवळ पैसे नाहीत,पण शिकण्याची ओढ आणि शिक्षणावर प्रेम आहे ते लोक सधन असतात.हे ज्ञानावरचं प्रेम माझ्या जीवनांत झिरपलं,आणि मी किती स्वकेंद्रित होतो की ज्यामुळे, मी परंपरेने वर्षानुवर्षे आपल्यापर्यंत पोचलेलं शहाणपण दुर्लक्षित ठेवलं,आणि स्वतःला नाशाप्रत ढकलत राहिलो,हे जाणवलं.

" प्रश्न - एक देणगी यातून मी असं शिकलो की, प्रश्न,अडथळे म्हणजे आपल्यासमोर येणारी आव्हानं,याखेरीज दुसरं काहीच नसतं.या वर्षापूर्वी प्रश्नांना मी काहीतरी पूर्णपणे वाईट गोष्ट असं मानायचो.एक ब्याद समजून तिची वासलात लावायचो,किंवा त्याहूनही वरकडी म्हणजे त्याच्याकडे पूर्णतःपाठ फिरवायचो.पण जेव्हा आपण आपल्या प्रश्नांकडे जिव्हाळ्याने बघतो, तेव्हा असं लक्षात येतं की,या दुनियेत एक सुंदर आखणी आहे.प्रश्न तुमच्यासमोर येतो,त्याचा उद्देश, तुम्हाला काही धडा शिकवावा असा असतो,आणि तुम्ही अधिक चांगली व्यक्ती बनावं,असा असतो.

" कुटुंब - एक देणगी या धड्यानं मला असं शिकवलं की जगण्यावर प्रेम करायचं असलं तर तुम्ही जगण्यातली मौज लुटायला हवी.आपण जेव्हा चांगल्याला आणि वाईटालाही हसू लागतो, तेव्हाच जीवन आपल्याला जे प्रेम देतं ते जाणवतं.

" स्वप्न - एक देणगी या विषयात मी जसा जसा खोल उतरायला लागलो,तसं मला समजलं की आपल्या भोवतालचं जे जे असतं,त्यावर प्रेम करावं, म्हणून आपल्याला जीवन दिलं गेलंय.आपल्या अंतर्यामी जे वाटतं,त्याचा बाह्य आविष्कार म्हणजे आपला कल,आपली स्वप्न आणि आपली ध्येयं असतात.

देणं - एक देणगी याचा मी अनुभव घेण्याआधी मला वाटायचं की आपण जर काही देऊन टाकलं तर आता ते दुसऱ्याच्या मालकीचं होतं.आणि पूर्वी तुमच्याजवळ जेवढं होतं त्याच्यापेक्षा आता तुमच्याजवळ कमी असणार.

वास्तविकपणे,तुम्ही प्रेमानं काही देता,तेव्हा देणारा आणि घेणारा यांच्याजवळ जास्तच जमा होत.सुरूवातीपेक्षा.

" कृतज्ञता - एक देणगी या धड्यातून मी हे शिकलो की आपल्याला मिळालेल्या हेवा करण्यासारख्या आणि कौतुकास्पद गोष्टी आठवल्या,आणि त्यांचा आनंद लुटला तर आपल्याला प्रेमाची जाण आणि अनुभव मिळतो.'

" सरतेशेवटी एका दिवसाची देणगी या धड्यानं मला शिकवलं की,जगण्यातले फक्त चोविस तास राहिले आहेत असं समजायचं आणि मला शक्य तितकं प्रेम जाणवून आणि अनुभवून घ्यायचंय,जेणेकरून मी ते सहज हस्तांतरित करीन."

जेसन थांबला,आणि त्यानं घसा साफ केला.त्यानं प्रेम - एक देणगी याच्यात विशेष नैपुण्य मिळवलंय असं मला मनापासून वाटत असल्याचं मी त्याला सांगणार तोच त्यानं बोलणं सुरू केलं.

" प्रेम - एक देणगी याच्या व्याख्येचं शब्दांकन करण्याचा प्रयत्न मला कोणी करायला सांगितला तर मला रेड आजोबांनी माझ्यासाठी जे काही केलं,त्याचं उदाहरण देता येईल.मला या गेल्या वर्षात जे जे त्यांनी दिलं,जे जे माझ्यासाठी केलं,तेच याचं उदाहरण.आपण जेव्हा दुसऱ्या कोणावर खरंखुरं प्रेम करतो,तेव्हा आपण एक वेगळी व्यक्ती बनतो,आणि तशीच ती माणसं पण वेगळी बनतात.

"रेड आजोबांनी मला सर्वोत्तम देणगी देऊन त्यांचं माझ्यावरचं प्रेम उघड केलं,त्यामुळे माझ्यात कायमचं परिवर्तन झालं आणि बघा मी कोण झालो."

जेसननं उठून मिस् हेस्टिंग्जला उराउरी धरलं,वळून लिहिण्याच्या टेबलाच्या माझ्या बाजूस आला,आणि मला त्यानं कडकडून मिठी मारली.आमच्या दोघांचे त्याने,आम्ही जे जे केलं त्यासाठी आभार मानले,आणि भविष्यात तो आमच्या संपर्कात राहणार आहे,याची तो वाट बघत असल्याचं सांगितलं.

जेसननं दरवाजाच्या कडीला हात घातला तेव्हा,त्याला थांबवत मी म्हणालो,"एक मिनीटभरच थांब,जेसन. तुला माहित नाही अशी,सर्वोत्तम देणगीची आणखी एक पायरी आहे."

●●● समाप्त ●●●