* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: आठवणीतील ‘दीप’स्तंभ.. The 'deep' pillar of memory..

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१९/१/२४

आठवणीतील ‘दीप’स्तंभ.. The 'deep' pillar of memory..


" इतिहास ही असामान्य गोष्ट असते.पण जर तो खरा असेल तर ! - लिओ टॉलस्टॉय अशाच एका खऱ्या इतिहासाची गोष्ट…


मला अजून आठवतय मी हायस्कूलमध्ये शिकत असताना घरामध्ये आम्ही सर्वजण "शब्दांच्या भेंड्या "खेळत होतो, पासून दीपक माझी ताई म्हणाली,सरते शेवटी मी पप्पांना सहज म्हटलं माझं,नाव दीपक का ठेवलं पप्पा शिक्षक ते म्हणाले,


केलै वै मौर कार्य कहे संध्या रवी

सुनिया जगत रहे निरुत्तर

 माटीर प्रदवीप छिले छे कहिल स्वामी 

आमार हे टकू करिब ता अभि

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची बंगाली भाषेतील ही अतिशय सुंदर कविता या कवितेत गुरुदेव म्हणतात अस्ताला जाणारा सूर्य आपली जागा कोण घेणार हा प्रश्न विचारतो तेव्हा विनम्रपणे छोटीशी पणती म्हणते आपल्या परिने मी उजेड पसरवण्याचे काम करेन.


तो "दीप" तू बनाव म्हणून तुझे नाव "दीपक " ...

प्राथमिक शिक्षिका असलेल्या माझ्या आईने (श्रीमती रजनी शेटे) गणिताची आवड बालपणापासूनच लावली आणि तेव्हापासूनची मित्रांनो ....गणित विषय मला आवडू लागला.आईला मिळत असलेला गावातील मानसन्मान आणि वडिलांची प्रगल्भ विचारधारा,मला नेहमीच शिक्षक बनवण्यास प्रवृत करत होती.त्यातचं आजोबा,आई,वडील,भाऊ,मावशी, काका,बहिण,भाऊजी हे सर्वजण शिक्षक आमच्या सर्वांच्या रक्तातच शिक्षकी पेशा भिनलेला आहे.वंशावळच म्हणा हवं तर . 

चला तर मग शिक्षक बनवूया ...

आईसारखं आणि प्रगल्ब विचार ठेवू या  वडिलांसारखे आणि बनलो शिक्षक ...नव्या उमेदीने नव्या जोमाने गणित विषयाचा शिक्षक झालो खरा ...


पण गणिताची भीती वाटणारे विद्यार्थी .. नावडीचा विषय म्हणणारे विद्यार्थी ... 

मला जमत नाही आणि कळत नाही म्हणणारे विद्यार्थी ... काय आणि कसं करावं ..


"खरा गणिती हा उत्साह मुर्ती असला पाहिजे,

उत्साहाशिवाय गणित नाही."- नोव्हॅलिस 


मग नाविन्याचा शोध घेत विविध उपक्रम,वाचन,कृती,

प्रात्यक्षिक,कथा,गोष्टी,घटना, प्रशिक्षणे,क्लुप्त्याचा शोध इत्यादीची कास हाती घेतली आणि विद्यार्थ्यांना गणित विषय आवडीचा बनावा यासाठी प्रयत्न सुरू केले .

अकॅडमी महोत्सव,बेंचना लेखक कवी शास्त्रज्ञांची नावे,

भूमिती आकृत्यांना आपली नावे,गणित कोश,गणित शुद्धलेखन स्पर्धा,कौन बनेगा गणित चॅम्पियन,गणित प्रश्नमंजुषा इत्यादी उपक्रमांची निर्मिती झाली.शालेय स्तरावर विविध उपक्रम राबवण्यासाठी संस्था अध्यक्ष डी.एस . घुगरे सचिव एम ए .परीट यांचे प्रोत्साहन मिळाले.गणित विषयात जास्तीत जास्त उपक्रम राबवल्याबद्दल 'महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड ' मध्ये माझी नोंदही झाली.या सर्वांचे फलित म्हणून आज अखेर २३ वर्ष गणित विषयाचा शालांत परीक्षेचा शाळेचा निकाल शंभर टक्के आहे.गणिताचे अध्ययन आणि अध्यापन करत असताना गणित विषय विद्यार्थ्यांना आवडावा यासाठी  विविध क्लुप्त्यांचा वापर  करत होतो.

एक माजी विद्यार्थी अचानक मला भेटला काय करतोस म्हणल्यावर स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय असं तो म्हणाला,सर तुम्ही शाळेमध्ये शिकवताना वापरलेल्या क्लुप्त्याचा मला फार उपयोग होतो असं तो सहज म्हणून गेला.कॉलेज संपल्यावर मुले विविध स्पर्धा परीक्षा करिता जादाचे तास लावतात.आपल्या शालेय मुलांना आपण विविध स्पर्धेतील विविध गणितीय क्लुप्त्या समजावल्या तर त्यांचं भविष्य उज्वल होईल या भावनेतून वैदिक गणितावर आधारित 'अंकवेल' या पहिल्या पुस्तकाचा जन्म झाला.महाराष्ट्र राज्य गणित महामंडळाच्या गोंदिया येथील अधिवेशनात त्यावेळचे केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या शुभहस्ते प्रकाशन झाले व उत्कृष्ट पुस्तकाबद्दल माझा लेखक म्हणून सन्मान केला व माझ्या लेखनाला एक वेगळीच उभारी मिळाली.गणित नियम व सूत्रे,मॅथेमॅटिक्स रूल्स अँड फॉर्मुलास,गणित कोश,गणित शुद्धलेखन इत्यादी पुस्तकांचे लेखन माझ्याकडून झाले.मुलांचे मोबाईल वेड जाणून घेऊन  'क्यू आर ' कोडच्या मदतीने दहावीची पुस्तक एका पानात ... केले तर सुमारे अडीच हजार तासांचे व्हिडिओ असणारे एलईडी पुस्तकाची निर्मिती ही माझ्या हातून झाली.देशात हा बहुदा पहिलाच प्रयोग असावा.राष्ट्रीय गणित दिनानिमित्त एका पत्रकाराने मला प्रश्न विचारला ,

उद्या आहे गणिताचा पेपर पोटात माझ्याकडे येऊन देखील कार्य ढोपर . ..

 सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का 

अशी विद्यार्थ्यांची आणि माझी ही स्थिती आजअखेर आहे आपण काय वेगळं करणार आहात?माझ्या तोडून सहजच गेलं."प्रात्यक्षिकावर भर देणारे गणित"

आणि जन्म झाला ॥ गणितायन ॥ 

डीएम लॅब चा ...मापनातून गणिताचा जन्म झाला खरा पण मापनाचा इतिहास मुलांना माहिती आहे का तो समजला तर गणिताचे मूळ समजेल....

पायली,अडीशेर,मापटे,कोळवे,नेळवे इत्यादी मापे लहानपणी पाहिली होती.आज कुठे आहेत ? चला तर शोध घेऊया ... आणि संग्रह करूया …


सुमारे १४ वर्षे शाळेच्या (दीपावली व उन्हाळी सुट्टी ) सुट्टीच्या कालावधीमध्ये कोणतीही रजा न घेता देशातील कन्याकुमारी,राजस्थान,मध्य प्रदेश,महाराष्ट्र,कर्नाटक,

दिल्ली,उत्तर प्रदेश इत्यादी ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या मापनाचा संग्रह आज अखेर करत आहे.


[ प्रसंग -  उद्या दिवाळी पाडवा आहे तरी तुम्ही जुने मापनाचे साहित्य शोधण्यासाठी मुंबईला  चाललात ... माझ्या पत्नीच्या डोळ्यातील पाणी आजही मला या लेखाच्या निमित्ताने समोर दिसत आहेत.]


स्वखर्चाची सुमारे तब्बल ३५ लाख रुपयाची स्व:घरी तयार केलेली गणित लॅब आज महाराष्ट्राचे वेगळेपण ठरत आहे.साडेतीनशे वर्षांपूर्वीची विविध मापे, ब्रिटिशकालीन विविध राजाची वजने व मापे, विविध देशांच्या मोजमापनातील पट्ट्या, (scales [जर्मनी,अमेरिका,

इंग्लंड,भारत,डेनमार्क इ .] ,वाळूचे घड्याळ,सावलीचे घड्याळ (अमेरीका),तसेच विविध कंपन्यांची विविध देशाची सुमारे ३०० घड्याळे,१०० वर्षांचे पितळी कॅलेंडर,मोजमापनाचे रंगीत २७५ तक्ते,विविध देशातील पाउंड व किलोचे तराजू,एका विशिष्ट व आवडत्या अंकांच्या नोटांचा संग्रह,विविध देशातील नोटा,दुर्मिळ नाण्यांचा संग्रह,विविध देशातील पेन्सिल्स व पेन,दगडी पाटी,१८९८ चे गणित पुस्तकासह अत्यंत गणित दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह,याचबरोबर महात्मा गांधी व विविध देशातील पोस्ट तिकिटे व फर्स्ट डे कव्हर्स (६५००),दोन किलोमीटरच्या अक्षर दिसणारे दुर्मिळ दुर्बीण व विविध आकाराच्या वेगवेगळ्या देशांच्यातील दुर्बिनस व इतर विविध दुर्मिळ साहित्याचा संग्रह आहे.


गुंजा पासून २०० तोळ्यापर्यंतची मापे,पायली पासून छटाक पर्यंतची मापे,विविध घड्याळे,नाणी नोटांचा संग्रह,विविध देशातील पोस्ट तिकिटे,एक आण्यापासून पाच हजार रुपये पर्यंतचे स्टॅम्प,विविध तराजू, विविध देशातील पट्ट्या,यांच्या विषयीचा इतिहास ऐकताना व प्रत्यक्ष अनुभव घेताना तब्बल पाच तास कधी गेले कळलंच नाही. - माननीय श्री .डी एस पवार (अध्यक्ष,एस.एस.सी बोर्ड कोल्हापूर ) 


न पाहिलेली मापे ..त्यांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थी व शिक्षक  घेतलेले पहाताना ...भटकंती केलेल्या चे सार्थक झाल्याचे वाटते.


 ३५ लाखात सुमारे ७० तोळे सोने घालून मिरवता आलं असतं पण माझी सहचरणी सौ. सुजाता शेटे हिने माझ्या वेडेपणातच धन्यता मानली हेही माझ्यासाठी नवलच आहे.तिचा हा त्याग माझ्या एवढाच मोलाचा आहे ही मी प्रांजळपणे मान्य करतो.


गणितायन ही ओळख फक्त कोल्हापूर पर्यंत न राहता राज्यभर होत आहे याचा सार्थ अभिमान मला वाटत आहे.सुमारे १५००० संशोधक, प्राध्यापक,गणित अभ्यासक,अधिकारी,पालक, विद्यार्थीनी आज अखेर त्याचा लाभ घेतल्याचा मला आनंद होत आहे.ही सेवा विनामूल्य आहे ती फक्त गणित प्रेमापोटी ...


विविध व्याख्याने प्रशिक्षणे,समीक्षण,मार्गदर्शन या कालावधीमध्ये मी घेतली व दिली.स्टार अकॅडमी ची स्थापना करून शिक्षणातील तारे शोधण्याचा अथक प्रयत्न करत विविध पुरस्काराने त्यांना सन्मानित करीत आहे.माजी चेअरमन,विद्यमान संचालक - करवीर आणि हातकणंगले तालुका शिक्षक सेवक सहकारी पतसंस्था,

जिल्हा कार्याध्यक्ष - शिक्षक सेना, जिल्हाध्यक्ष -अंधश्रद्धा निर्मूलन  व वैज्ञानिक दृष्टिकोन समिती,कोल्हापुर,उपाध्यक्ष - मनीष शिक्षण प्रसारक मंडळ इत्यादी पदावर काम करताना त्यांनाही न्याय देण्याचे काम माझ्यातून होत आहे

एम.एस.सी,बी.एड या शिक्षणावर  शिक्षक असणारा मी पीएचडी,एम ए (एज्युकेशन) डीसीपी,डीएसएम,

पत्रकारिता इत्यादी कोर्सही या कालावधीत पूर्ण केले.


राष्ट्रीय १३६ इतर पुरस्काराने सामाजिक संस्थांनी केलेला सन्मान,टीव्ही चॅनलवरील बातम्या व मुलाखती,

रेडिओवरील मुलाखती व वेळोवेळी वर्तमानपत्रातून आलेल्या बातम्या माझ्या कार्याची प्रतिबिंब दर्शवत

आहेत.


कोण सूर्य बनतं

कोण मशाल बनतं

मी फक्त

वडिलांच्या आशेची पणती बनूनी नकळत प्रकाश देत आहे ... 

"दीप" तेवत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.


डॉ दिपक मधुकर शेटे.

महाराष्ट्र शासन राज्य गौरव पुरस्कार २०२२

सहाय्यक शिक्षक आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज मिणचे.


इतिहास शोधायला निघालो की इतिहास जवळच सापडतो...!