लक्षात ठेवा,दुसरे लोक पूर्णपणे चुकीचे ठरू शकतात; पण त्यांच्या नजरेत ते मुळीच चुकीचे नसतात. त्यांच्यावर टीका करू नका.कोणीही मूर्ख असं करू शकतो.त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा.केवळ समजदार,सहिष्णू आणि विरळ लोकच असं करायचा प्रयत्न करतात.समोरची व्यक्ती असा व्यवहार का करते आहे किंवा असा का विचार करते आहे याच्या मागे कोणते ना कोणते कारण असते त्या कारणाला समजून घ्या आणि तुम्हाला त्याच्या कार्याची किल्ली मिळून जाईल. स्वतःला इमानदारीने त्याच्या जागी ठेवण्याचा प्रयत्न करा.स्वतःला हे विचारा जर मी त्याच्या जागेवर असतो,तर त्याला कसं वाटलं असतं ? जर तुम्ही असं कराल तर चिडण्यापासून तुमचा बचाव होईल आणि आपला वेळही वाचवाल.
कारण कारणात रस घेऊन तुम्ही परिणामावर टीका करण्यापासून वाचू शकाल.याशिवाय यामुळे मानवीय संबंधाची तुमची कलाही वेगाने विकसित होईल.
केनेथ एम.गुडने हाउ टू टर्न पीपल इन्टु गोल्ड पुस्तकात लिहिलं आहे,एका मिनिटकरता थांबून विचार करा. तुमची तुमच्यामध्ये रुची खूप आहे;पण दुसऱ्यांच्या बाबतीत ती खूपच कमी आहे.
जगामध्ये प्रत्येक व्यक्ती असाच विचार करते.जर तुम्ही हे माहीत करून घेतलं तर लिंकन आणि रुजवेल्टसारखं तुम्हीपण मानवीय संबंधाचा एकुलता एक पाया समजू शकाल.तुम्ही समजू शकाल की लोकांना प्रभावित करण्याकरता तुम्हाला समोरच्याचा दृष्टिकोन सहानुभूतीपूर्वक समजला पाहिजे.
हेम्ससटेड,न्यू यॉर्कचा सॅम डगलस त्याच्या पत्नीला सांगायचा की,तो लॉनच्या स्वच्छतेसाठी मेहनत करून स्वतःचा वेळ वाया घालवतो आहे.त्याची पत्नी आठवड्यातून दोनदा लॉनचे तण साफ करत होती,खत घालत होती,गवत कापत होती.इतक्या मेहनतीनंतर पण लॉनची अवस्था तशीच दिसायची,जशी की ती चार वर्षं आधी होती,जेव्हापासून ते त्या घरात राहायला आले होते.सॅमची ही गोष्ट ऐकल्यावर त्यांच्या पत्नीला खूप राग यायचा आणि त्यांची पूर्ण संध्याकाळ वाया जायची.
आमच्या कोर्समध्ये भाग घेतल्यावर डगलसला जाणवलं की,तो इतक्या वर्षापासून मूर्खासारखा व्यवहार करतो आहे.त्याने हा स्वप्नातही विचार नव्हता केला की पत्नीला हे काम करताना आनंद येत असेल आणि याकरता आपल्या मेहनतीच्याबद्दल तारीफ ऐकायला आवडेल.
डिनरच्या नंतर एका संध्याकाळी त्याच्या पत्नीने सांगितले की,ती त्या लॉनमधून तण स्वच्छ करायचं म्हणतीये आणि तिने आपल्या पतीलाही बरोबर चलण्याविषयी आग्रह केला.आधी तर पतीने नाही म्हटलं पण नंतर विचार केल्यावर तो तिच्या बरोबर लॉनमध्ये गेला आणि तण उपटायला आपल्या पत्नीला मदत करू लागला.
जाहीरच आहे की,पत्नी खूश झाली आणि दोघांनी कठोर परिश्रम करत आणि बरोबर गप्पा मारत एक तासाचा वेळ घालवला.
यानंतर त्याने बगिच्यात काम करून आपल्या पत्नीला नेहमीच मदत केली आणि आपल्या पत्नीची प्रशंसा करत सांगितलं की,सफाईच्या नंतर त्यांचं लॉन पहिल्यापेक्षा चांगलं दिसू लागलंय.त्यांनी सांगितलं, काँक्रीटसारख्या कडक जमिनीतसुद्धा त्याच्या पत्नीच्या मेहनतीमुळे लॉनची हालत खूपच सुधारली आहे. परिणामतःदोघांचे वैवाहिक जीवन सुखी झाले कारण की,डगलस आपल्या पत्नीच्या दृष्टिकोनातून बघायला शिकला होता.
आपलं पुस्तक ग्रेटिंग थ्रू टू पीपलमध्ये डॉ.जेराल्ड एस. निरेनबर्ग लिहितात,चर्चेमध्ये सहयोग तेव्हा मिळतो जेव्हा तुम्ही हे दाखवता की,तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या भावना आणि विचारांना आपल्या भावना आणि विचारांच्या त-हेने महत्त्वाच्या मानता.जर तुम्हाला असं वाटतं की,समोरचा श्रोता तुमच्या विचारांना पसंत करेल तर तुम्हाला तुमची चर्चा या प्रकारांनी सुरू करावी लागेल की,समोरचा तुमच्या चर्चेची दिशा समजू शकेल. तुम्हाला जे म्हणायचं आहे ते म्हणताना या गोष्टीची कल्पना करा की,जर तुम्ही श्रोत्यांच्या जागी आहात तर तुम्ही काय ऐकणं पसंत कराल.श्रोत्याच्या दृष्टिकोनातून पाहिल्यावर श्रोताही तुमच्या दृष्टिकोनाचा स्वीकार करतो.
मला आपल्या घराजवळच्या पार्कमध्ये फिरायला आणि घोड्यावर रपेट मारायला खूप आवडतं.एक ओकचं झाड असं आहे ज्याचं मला विशेष प्रेम आहे;पण प्रत्येक ऋतूत मी हे पाहून दुःखी होतो की पार्कात नेहमीच आग लागते ज्याच्या कारणामुळे अनेक झाडं आणि झुडपं जळून राख होतात.ही आग सिगारेट पिणाऱ्यांमुळे नाही लागत.जंगलात आग नेहमीच मुलं करत असलेल्या शेकोटीमुळे लागते.जे तिथे पिकनिक मनवायला येतात आणि अंडी किंवा फ्रैंकफर्टर बनवण्याकरता आग पेटवतात.अनेक वेळा तर आग इतकी भीषण लागते की,अग्निशामक दलाला बोलवावं लागतं.पार्कात एका कोपऱ्यात एक बोर्ड लागला आहे ज्यात लिहिलं आहे की,आग लावण्यावर दंड आकारला जाईल आणि त्याला शिक्षा दिली जाईल;पण हा साइनबोर्ड अशा ठिकाणी लावला गेला आहे जिथे कोणाची नजर पडणार नाही आणि जास्त करून लोक याला बघू शकत नाहीत.पार्काच्या सुरक्षेकरता एक पोलीसपण पहाऱ्यावर असतो;पण तो आपल्या कामाकडे गंभीरपणे बघत नाही आणि यामुळेच दर वर्षी आग लागते.एकदा तर मी पोलिसाकडे धावत गेलो व त्याला सांगितलं की, पार्कमध्ये आग लागली आहे.ती जोरात पसरते आहे आणि याकरता फायर ब्रिगेडवाल्यांना लगेच फोन करायला पाहिजे;पण पोलिसाने उदासीनतेने उत्तर दिले की,हे त्याचं काम नाहीये.कारण ती जागा त्याच्या एरियात येत नाही.हे ऐकून मी खूपच उद्विग्न झालो आणि यानंतर त्या पार्कची जबाबदारी स्वतःवर घेतली. सुरुवातीला तर मी दुसऱ्या लोकांचा दृष्टिकोन समजण्याचा प्रयत्नच करत नव्हतो.जेव्हा पण मी आग पेटवताना बघायचो,तेव्हा मी दुःखी होऊन जायचो आणि त्यांना धमकी द्यायचो की पार्कात आग पेटवल्यामुळे त्यांना शिक्षा पण होऊ शकते आणि मी कोण्या अधिकाऱ्यासारखा आवाज काढून त्यांना आग विझवायचा आदेश देत होतो आणि मी त्यांना हे पण सांगायचो की,जर त्यांनी आग नाही विझवली तर मी त्यांना अटक करवीन.मी त्यांचा दृष्टिकोन समजण्याचा प्रयत्न न करताच आपल्या आतला राग काढत राहायचो.परिणाम? ते माझी गोष्ट ऐकायचे मन मारून अन् चिडून माझी गोष्ट मानायचे.होऊ शकतं की,माझ्या निघून जाण्यानंतर ते परत आग पेटवत असतील आणि त्यांना हे वाटत असेल की पूर्ण पार्कला आग लागली पाहिजे.
अनेक वर्षं गेल्यानंतर मला मानवी संबंधांच्या बाबतीत ज्ञान झालं आणि मी समोरच्या दृष्टिकोनातून गोष्टींना बघायच्या प्रवृत्तीला विकसित केलं आणि कूटनीतीचा प्रयोग करायला सुरुवात केली. ऑर्डर द्यायच्याऐवजी मी जवळ जाऊन या प्रकारचं बोलत होतो :
"मजा करताय,मुलांनो? खायला काय बनवता आहात? जेव्हा मी छोटा होतो तेव्हा मलापण आग पेटवायला मजा यायची आणि मला आजपण पसंत आहे;पण तुम्ही लोक बहुतेक हे नाही जाणत की पार्कमध्ये आग लावणं धोकादायकही होऊ शकतं.मला माहिती आहे की,तुम्ही लोक काही नुकसान करू इच्छित नाही;पण दुसरी मुलं इतकी सावधान नाही राहत.ते येतात आणि बघतात की तुम्ही आग लावलीत.मग तेपण शेकोटी पेटवतात आणि घरी जाताना ते या आगीला विझवत नाहीत,ज्यामुळे सुकलेल्या पानांना आग लागते आणि झाडंही जळतात.जर आपण सावधानी बाळगली नाही तर होऊ शकतं की,सगळीच झाडं जळून जातील. जंगलात आग लावण्याच्या गुन्ह्यामुळे तुम्हाला शिक्षाही होऊ शकेल;पण मी ऑर्डर नाही देऊ शकत आणि तुमच्या आनंदात बाधाही आणू इच्छित नाही.मला असं वाटतं की,तुम्ही पिकनिकचा पूर्ण आनंद लुटावा;पण काय हे चांगलं होणार नाही की,तुम्ही तुमच्या आसपासचा सुकलेला पाला पाचोळा दूर कराल आणि जाताना आगीवर धूळ टाकाल ? पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा शेकोटी पेटवाल तेव्हा त्या पहाडावरच्या बनलेल्या सँडपिट मध्ये आग लावा.यामुळे काही नुकसान होणार नाही.ऐकण्याकरता धन्यवाद,मुलांनो, मजा करा."
दोन्ही शैलीत कितीतरी फरक होता.या प्रकारच्या शैलीमुळे मुलं सहयोग करायच्या मूडमध्ये यायची.ती उदास होत नव्हती,ती माझ्यावर चिडत नव्हती,त्यांना आदेशाचं पालन करण्याकरता जबरदस्ती केली नव्हती. त्यांना आपली लाज वाचवायचा मोका मिळाला होता. त्यांनाही चांगलं वाटत होतं आणि मलाही चांगलं वाटत होतं,कारण मी त्यांच्या दृष्टिकोनातून विचार केल्यानंतरच परिस्थितीचा सामना केला होता.
जेव्हा आम्ही समोरच्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून गोष्टींन बघतो,तेव्हा आमच्या व्यक्तिगत समस्या आणि तणावही कर्मी होतो.न्यू साउथ वेल्स,ऑस्ट्रेलियाच्या एलिझाबेथ नोवाकाला आपल्या कारचे पैसे भरायला सहा आठवडे उशीर झाला.त्यांनी सांगितलं "एका शुक्रवारी माझ्याकडे अकांउंटचा फोन आला की, जर मी सोमवारच्या सकाळपर्यंत १२२ डॉलर जमा नाही केले,तर कंपनी कारवाई करेल.यादरम्यान मी पैशाची व्यवस्था नाही करू शकले.
यामुळे जेव्हा सोमवारच्या सकाळी त्यांचा फोन परत आला तेव्हा मी वाईटातल्या वाईट परिणामांची कल्पना करायला लागले;
पण विचलित होण्याऐवजी मी त्याच्या दृष्टिकोनातून परिस्थितीला बघितलं.मी त्याला झालेल्या त्रासासाठी माफी मागितली.मी सांगितलं की,त्यांच्या ग्राहकांमध्ये मीच सगळ्यात जास्त त्रास देत असेन.कारण मी बहुतेक आपलं पेमेंट उशिरा करते.तत्काळ त्याच्या आवाजात फरक पडला आणि त्याने मला आश्वस्त केलं की अशी काही गोष्ट नाहीये.काही लोक तर खूपच त्रास देतात. त्यांनी मला अनेक उदाहरणं दिली की,अनेक वेळा तर ग्राहक गैरव्यवहारावर उतरतात,खूप खोटं बोलतात आणि जास्त करून तर त्याच्याशी बोलायला टाळतात. मी काहीच बोलले नाही.मी फक्त ऐकत राहिले आणि त्याला त्याच्या समस्या सांगण्याचा पूर्ण मोका दिला.मग माझ्या काहीच न सांगण्यावरून पण त्याने म्हटलं की, जर मी लगेच पूर्ण पैसे नाही दिले तरी चालतील.मी फक्त या महिन्याच्या शेवटापर्यंत फक्त २० डॉलर्स जमा करावेत आणि बाकीचे पैसे आपल्या सोयीने द्यावेत."
मित्र जोडा आणि प्रभावशाली बना,डेल कार्नेगी,
मंजुल प्रकाशन)
उद्या कोणाला आग लावायला मना करण्यापूर्वी किंवा सामान विकत घेण्यापूर्वी किंवा आपल्या प्रिय चॅरिटीमध्ये दान देण्याच्या आधी तुम्ही जरा थांबून आपले डोळे बंद करून समोरच्याच्या दृष्टीने गोष्टींना बघण्याचा प्रयत्न कराल का? स्वतःला विचारा की, समोरचा हे का करण्याची इच्छा करेल? याला वेळ लागेल;पण यामध्ये आपले शत्रू नाही निर्माण होणार आणि तुम्हाला चांगले परिणाम मिळतील.
यामुळे तणाव कमी होईल आणि तुमच्या चपलापण झिजणार नाही.
हार्वर्ड बिझनेस स्कूलचे डीन डॉनहॅमचं सांगणं होतं,
"मी कोणत्याही मीटिंगच्या आधी एखाद्या व्यक्तीच्या ऑफिसच्या समोरच्या फुटपाथवर दोन तासांपर्यंत फिरणं पसंत करेन;पण मी या गोष्टीची कल्पना केल्याशिवाय आत नाही घुसणार की मी काय सांगणार आहे आणि त्याची आवड आणि लक्ष्याच्या बाबतीत माझ्या ज्ञानाच्या आधारावर समोरचा त्याचं काय उत्तर देईल."
तुम्ही या पुस्तकातून फक्त एक गोष्ट शिकाल - नेहमी आपल्या दृष्टिकोनाबरोबर समोरच्याच्या दृष्टिकोनाचा पण विचार करा आणि समोरच्याच्या दृष्टिकोनातून बघा - जर तुम्ही या पुस्तकातून फक्त ही गोष्ट शिकलात तरी यामुळे तुमच्या करियरमध्ये खूप प्रगती होऊ शकते.
एक फॉर्म्युला जो तुमच्याकरिता चमत्कार करेल.
प्रामाणिकपणे समोरच्या व्यक्तीचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करा....