* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२३/१/२४

‘मॅट्रिक फेल’ विजय,पुस्तकांच्या विश्वात.. 'Matric Fail' Vijay,in the world of books..|

'गर्दीतून चालताना माणसांचा एकमेकाला धक्का लागतो;पण दाटीवाटीने भरारी घेणारे पक्षी एकमेकांना धडकत नाहीत.कारण,गर्दीत असूनही त्या प्रत्येकाने वैयक्तिक क्षेत्र जपलेले असते.त्यात दुसऱ्यांकडून घुसखोरी केली जात नाही.थव्यानं भरारी घेताना प्रत्येकाला पुढच्या-मागच्या बाजूच्याचे नैसर्गिक भान असते. त्यामुळे थव्याने वेग वाढविला वा कमी केला तरीही प्रत्येकजण एकमेकांशी जुळवून घेतात. म्हणून तो थवा एकसंध भरारी घेतो.यात आजूबाजूच्या पक्ष्यांमधील गती बदल अल्पांशात शेजाऱ्यांना समजतो,त्यामुळे मोठ्या थव्यातील पक्ष्यांची भरारी घेतानाची लहर १५ मिलिसेकंदापेक्षा कमी वेळा हललेली असते.ही दिगंबर गाडगीळ यांच्या 'पक्षीगाथा' पुस्तकातील  संशोधनात्मक मांडणी... अशा जगण्यातलं ज्ञान देणाऱ्या कित्येक

पुस्तकांमधील संदर्भ विजय गायकवाड यांना तोंडपाठ आहेत.


हातकणंगले तालुक्यातील टोप येथील या 'मॅट्रिक फेल'अवलियाला वाचनाचं प्रचंड वेड.वडील नेहमीच मोठ्यानं ग्रंथ वाचतात.ते कानावर पडत राहिल्यामुळे वाचनाला प्रारंभ झाला. त्यातच 'चौकट आणि थडगं यामध्ये काही फुटांचं अंतर असतं', हेन्री डेव्हिड थोरो यांच्या वाक्याने ते पुस्तकांशी अधिक जोडले गेले.


वाचनवेड्या विजय यांचा दिवस पहाटे चार वाजता सुरू होतो.नित्यनेमाने ते व्यायाम करतात.त्यानंतर आरशासमोर उभारून त्यातल्या प्रतिमेशी संवाद साधतात.'माझ्यातला मी माझ्यासाठी खूप काही करतो, हे जाणतो म्हणून त्याचे दररोज आभार मानतो.' त्यांना आलेली ही प्रचिती.त्यानंतर ते घराच्या मागे असलेल्या आडातून पाणी भरतात.तिथून पुढे एक ते दीड तास वाचन.साडेसातला ते शिरोली एम.आय.डी.सी.तील एका फौंड्रीमध्ये कामासाठी जातात.'बेभरवशाच्या नोकरीवर जातो,तेही भरवशाने.कारण,सोबत पुस्तकाने दिलेली ताकद असते.दिवसभर शारीरिक कष्टाचं काम करण्यासाठी.फौंड्रीतील उष्णतेचा शरीरावर परिणाम होऊनसुद्धा मी शांत आहे.कारण,माझ्या अंगात पुस्तकांनी शांतता भिनवलेली आहे.

( मानवी आयुष्यात शांतता महत्वाची असते.)

तुझ्यावर कोणाचाही प्रभाव असता कामा नये, तुझ्यावर केवळ तुझाच प्रभाव हवा.,'हे जगण्याचं तत्त्वज्ञान त्यांना पुस्तकांनी दिलंय.


सिमेंटच्या पत्र्याच्या दोन खोल्यांच्या घरात दाम्पत्यासह राहणाऱ्या विजय यांची राहणी साधी आहे.त्यांची खरी भूक आहे पुस्तक वाचनाची.महिन्याला तुटपुंजा पगार हातात पडतो.त्यातील दीड ते दोन हजार रुपये प्रतिमहिना ते पुस्तक खरेदीसाठी खर्चतात.असे करत करत आतापर्यंत त्यांच्या भांडारात ६० हजारांच्या पुस्तकांचा समावेश झाला आहे.सायंकाळी पाचपर्यंत ते कामावरून घरी येतात. तास - दीड तास ते पुस्तकात रमून जातात. पुस्तकं ही दिवसभर आलेला कामाचा शीण घालवून अंगात नवी ऊर्जा निर्माण करतात,असं त्यांचा अनुभव सांगतो.केवळ घेतलं पुस्तक आणि वाचून काढलं एवढंच न करता,ते त्यावर चिंतन करतात.त्यातील महत्त्वाचं साररूपात मोबाईलवर संग्रहित ठेवतात.त्यातून त्यांनी ब्लॉग लिहायला सुरुवात केली.आजपर्यंत त्यांनी २५० ब्लॉग लिहिले असून,त्याचे १३,८८० फॉलोअर्स आहेत.तसेच ते विविध विषयांवर व्याख्यानेही देतात.

'मला केवळ एकच गोष्ट माहीत आहे ती म्हणजे मला काहीही माहीत नाही.' हे सॉक्रेटिसचे पुस्तकातील प्रेरणादायी वाक्य त्यांच्यात वाचनाची ऊर्मी वाढविते.


'मेंदू व वर्तनासंबंधी हादरा देणारे संशोधन करीत गोलमन दाखवून देतात की,जेव्हा उच्च बुद्धिमत्तेचे लोक अडखळतात त्यावेळी मानवी मेंदूत असे घटक कार्यरत होतात ज्यामुळे साधारण बुद्ध्यांकाची व्यक्ती आश्चर्यजनकरीत्या बाजी मारून नेते.ते घटक म्हणजे आत्मजाणीव किंवा सजगता,स्वयंशिस्त आणि समानुभूती.हुशारीचा वा चलाखीचा नवा अर्थ सांगणारे हे घटक जन्माच्या वेळी निश्चित होत नसतात.बालपणीचे अनुभव या घटकांना आकार देत असले तरी मोठेपणी भावनिक बुद्धिमत्तेची जोपासना करून तिला बळकट करता येते आणि तिचा तात्कालिक फायदा आरोग्य, नातेसंबंध आणि काम यासाठी करून घेता येतो.'डॅनिअल गोलमन लिखित 'इमोशनल इंटेलिजन्स' या पुष्पा ठक्कर अनुवादित 'भावनिक बुद्धिमत्ता' पुस्तकाच्या पहिल्या पानावरील हे वाक्य.विजय यांनी वाचनातून मेंदूत साठविलेलं जीवनाचं अनमोल तत्त्वज्ञान त्यांनी कथन करत रहावं,इतकं सफाईदारपणे ते याविषयी बोलत राहतात.त्यांनी आतापर्यंत पाश्चात्य लेखकांची अनुवादित पुस्तकं वाचनावर जास्तीत जास्त भर दिला आहे.या लेखकांच्या मांडणीत संशोधनात्मक आणि नावीन्य असते,त्यामुळे ते त्यांना आवडते.


हेन्री थोरो यांच्या जयंत कुलकर्णी यांनी भाषांतरित केलेल्या 'वॉल्डन' या पुस्तकामध्ये जीवन कसं जगायचं आणि आपण कसं जगतो, यातील अंतर मांडले आहे.

थोरोंनी मांडलेल्या अशा कितीतरी विचारांचा पगडा विजय यांच्या मनावर पडला आहे.बेंझामिन फ्रँकलीन यांच्या 'मेल्यानंतर तुम्हाला भरपूर झोपायचे आहे. आतातरी जागे रहा,मिळालेला प्रत्येक क्षण मोलाचा आहे,तो उपयोगात आणा,'या विचाराला प्राधान्य दिलं पाहिजे,असं विजय यांचं मत आहे.


संग्रहातील काही पुस्तके-इगो इज द् एनिमी - रॉयन हॉलीडे,इमोशनल इंटेलिजन्स - डॅनियल गोलमन,जग बदलणारे ग्रंथ - दीपा देशमुख,ह्युमनकाइंड - रूट्बर्ग ब्रेगमन,कुरल - सानेगुरुजी,सजीव - अच्युत गोडबोले,

दगड - धोंडे,वारूळ पुराण-नंदा खरे, मृत्यू सुंदर आहे? - डॉ.रवींद्र श्रावस्ती,अभिनव जलनायक-सतीश खाडे,द सीक्रेट-रॉन्डा बर्न,चकवा चांदणं मारुती चितमपल्ली,द सेकंड सेक्स-सिमोन द बोव्हुआर,इसेंशियलिझम-ग्रेग मँकेआँन,आर्टिफिशिअल इंटेलिजन्स-अच्युत गोडबोले,

शरीर,गन्स,जर्म्स अँड स्टील-जेरेड डायमंड,द पावर ऑफ पर्सिस्टन्स-जस्टीन सँच,द आर्ट ऑफ रिसायलेन्स-गौरांगदास,द गॉड डेल्युजन - रिचर्ड डॉकिन्स, सर्वोत्तम देणगी-जिम स्टोव्हँल,थिंक लाईक अ विनर-डॉ.वॉल्टर डॉयले स्टेपलस्.


- भरत बुटाले- (लेखक, 'लोकमत'च्या कोल्हापूर आवृत्तीत वरिष्ठ उपसंपादक आहेत.)

Lokmat ePaper - http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_KOLK_20240121_18_7.


Dr. Deepak Shete: वाचनाचा दीपस्तंभ : विजय गायकवाड वाचनाच्या गोडीमुळे निर्माण होणारी सिद्धता दर्शवणारे माझे जिवलग मित्र विजय गायकवाड,टोप यांचा आज दै.लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेला वाचनीय लेख आपणही वाचून वाचण्याची सवय अधिक वृद्धीगत करावी.ही विनंती.


- डॉ दिपक शेटे

- महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार


आज रविवार,दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजीच्या दैनिक लोकमत,कोल्हापूर आवृत्ती,पृष्ठ क्रमांक १८ वरती सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ राजर्षी शाहूजी छत्रपती महाराज यांच्या लोककल्याणकारी विचारांचे वलय असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील 'टोप' या गावचे आमचे मार्गदर्शक मित्र सन्माननीय श्री.विजय गायकवाड साहेब यांचे पुस्तकांच्या बद्दल प्रचंड प्रेम आणि पुस्तकांचे सखोल वाचन,चिंतन तसेच अनेक महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी केलेली भारदस्त भाषणे,रोज सकाळी सलगपणे ब्लॉग वर त्यांचे चिंतनशील लेखन यावर अत्यंत सखोलपणे भारदस्त असा लेख लोकमत कोल्हापूर आवृत्तीचे वरिष्ठ उपसंपादक श्री.भरत बुटाले साहेब यांनी लिहिलेला आहे.याबद्दल श्री.भरत बुटाले साहेबांचे मनःपूर्वक आभार खूप खूप अभिनंदन करावे वाटते.कारण आमचे मित्र श्री.विजय गायकवाड साहेबांनी अतिशय संघर्षातून आपला पुस्तक वाचनाचा छंद तळमळीने,नित्य नियमाने जोपासलेला आहे हे साधेसुधे काम नाही.

वाचनाचा छंद,वाचनाचे वेड जोपासणे म्हणजे ही तारेवरची कसरत आहे. कारण त्यासाठी पुस्तक विकत घ्यावी लागतात, अनेक पुस्तके वाचून त्या पुस्तकांतून महत्वाच्या विषयांची विभागणी मोठ्या कौशल्याने करावी लागते.ते आदराने आपल्या मेंदूत कल्पकतेने जपून ठेवावं लागतं.कठीण विषय वाचून त्यासाठी आपल्या जीवनातील जादाचा वेळ काढावा लागतो.ते पुस्तक त्यातील संदर्भ, त्यातील महत्वाचे विचार, महत्त्वपूर्ण माहिती जपताना पुस्तक सातत्याने पुन्हा पुन्हा वाचावी लागतात.काही विषय इतके गूढ, चिंतनीय असतात की,ते वाचताना खूप वेळ द्यावा लागतो.

आपल्या दैनंदिन जीवनातून हा वेळ काढणे म्हणजे आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मोठे कष्टाचे काम झाले आहे.एकतर आमचे मित्र श्री.विजय गायकवाड साहेब शारीरिक मेहनतीचे काम करुन सुद्धा थकून जात नाहीत तर पुन्हा नव्या जोमाने आपल्या वाचनाचे वेड मोठ्या कौशल्याने जपतात याबाबत त्यांचे मला खूप कौतुक वाटते.मी त्यांचा खूप आदर करतो.त्यांचे खूप खूप अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. आमचे मार्गदर्शक श्री.विजय गायकवाड साहेब यांना त्यांच्या वाचनाचे वेड,वाचनाचा छंद जपण्यासाठी नैसर्गिक न्याय प्रचंड साह्य करो हिच मनापासून सदिच्छा आहे.धन्यवाद


आपला स्नेहांकित, 

शीतल खाडे सांगली.


मॅट्रिकला फेल असल्यामुळे 'मी नववी पास आहे' असं सांगणारा हा व्यक्ती. एका कंपनीत मजुरीचे काम करतो. दिवसभर प्रचंड शारीरिक श्रम केल्यामुळे शरीर थकून जाते. शरीराला आरामाची गरज असते.झालेली झीज भरून काढण्यासाठी ऊर्जेची गरज असते.

यावेळी विजय गायकवाड यांना पुस्तकातून ऊर्जा मिळते.पुस्तकातून मिळालेली ऊर्जा मनासोबत शरीर टवटवीत करत जाते.थकवा कुठल्या कुठे दूर पळून जातो.मनाभोवती विचार पिंगा घालू लागतात.त्यातून चिंतन घडतं,चिंतनातून लेखन घडतं.लेखनासोबत हा माणूस खूप छान बोलतोही.आजच्या काळात वेळेअभावी बोलणं कमी होत जाताना न चुकता, न थकता नित्यनेमाने अनेकांसोबत प्रेममय संवाद करत जातो.यांनी पुस्तक फक्त वाचली नाहीत तर ते पुस्तक आत मुरवली आहेत.पुस्तक समजून घेतली आहेत.पुस्तकं त्यांच्याशी संवाद साधू लागली आहेत.यांच्या धकाधकीच्या काळात पुस्तकं न वाचण्याची अनेक सशक्त कारणे असतानाही हा माणूस कोणतेही कारण न स्वीकारता 'पुस्तक वाचणे' एवढेच स्वीकारतो.ही खूप मोठी गोष्ट वाटू लागते. अनेक कारणांवर विजय मिळवून 'पुस्तक वाचणारा' हा विजय आगळावेगळाच वाटू लागतो.


साहेब,आजची पहिली नजर या शब्दावरून फिरली आणि डोळे भरून आले. मनाला खूप आनंद झाला.

सन्माननीय उपसंपादक बुटाले साहेबांचे खूप खूप आभार.चांगल्या योग्य व्यक्तीचा सन्मान केलात, यामुळे अनेकांना ऊर्जा मिळेल. अनेक पुस्तकांना नवीन विजय मिळतील. लोकमतचे मनःपूर्वक धन्यवाद.


सॉक्रेटिस ( माधव गव्हाणे )


अगदीच..एका व्यासंगीचा दखल ही घेतली गेलीच पाहिजे..एका बाजूला मोबाईलमध्ये वाहत गेलेली पिढी आणि दुसऱ्या बाजूला हा अवलिया.. जिथे लोकं पुस्तकं सोडून मोबाईलमध्ये रमू लागली त्याच युगात आपण पुस्तकांना आपलसं केले..ही पुस्तकं नक्की तुमचंही पुस्तकं लिहीतील हे त्रिकालाबाधीत सत्य आहे...! कवी,संतोष शेळके,पांढराशुभ्र काळोख,नेरळ,मुंबई


पुस्तकात रमनारी माणसं तिन्ही काळाचे सारथी अन् समन्वयक असतात.ज्ञानाच्या प्रकाश वाटेवर स्वप्रकशित होऊन समाजाला अतः दीप भवः होण्यास प्रेरक,पूरक आणि प्रेरणादायी ठरतात. मागील ३ वर्षात भेट न झालेले पण नियमित मोबाइलवर संपर्कात असणारे असणारे माझे कोल्हापूरचे मित्रवर्य श्री. विजय गायकवाड यांचा मागील महिन्यात प्रत्यक्ष भेटीचा योग आला अन् आम्ही एकमेकांना प्रत्यक्ष भेटलो.. रोज लेखणीतून भेटणाऱ्या मित्राला प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद लेखणीबद्ध करणे अशक्यप्राय.आज या पुस्तकं वेड्या अन् लेखन प्रिय मित्राची नोंद दै. लोकमतने घेतली फार आनंद झाला.. दादा अभिनंदन. खुप खुप अभिनंदन अन् मणभर शुभेच्छा..!


कवी श्रावण सखुबाई रंगनाथराव भवर,

श्रावण सर.. संभाजी नगर


खुप खुप अभिनंदन सर,हा लेख वाचून मला अगदी गहिवरून आलं.तुमचा संघर्ष तुमचे पुस्तकावरील ते प्रेम `क्या बात'तुमच्या संपर्कात व मार्गदर्शनात असल्याचा अभिमान वाटतो....!!

पार्थ गाडेकर.. रायपुर


पुस्तके ही माणसाला काळाच्या महासागरातून सुरक्षित घेऊन जाणारी जहाजे आहेत.- विलास माने,पारगांव


तुमच्या सारख्या व्यक्तीचा सहवास असल्यावर माणुस कोणत्याही परिस्थितीत जीवनावर विजय मिळवेल कारण पुस्तक वाचन ही आपल्यातल्या यशाची पहिली पायरी आहे आणि सर्वात सोपा प्रगतीचा मार्गही आणि तो तुमच्याकडुन मिळतोय.. - -भारत गाडेकर,रायपुर


जीवन जगण्याचा  गुंता कसा सोडवायचा  हे सांगणार आणि सहज उपलब्ध असलेलं उत्तर म्हणजे पुस्तक...... एवढेच नव्हे तर मानवी आयुष्यातील प्रत्येक उत्कट व सौम्य भावना याचे वैचारिक पुरावे देणारा.... अथांग ज्ञानाचा महासागर म्हणजे पुस्तक.... व त्यातील प्रवासी म्हणजे आमचे विजयराव सर…!!

 - डॉ.संजय मोरे जीवशास्त्राचे प्राध्यापक,


वर्तमान पत्र वा पुस्तक 

अथवा असो कागद कोणताही,

मोगरा असो वा चाफा,

सुगन्ध दरवळावा दिशा चोही.!

 खूप शुभेच्छा साहेब 

दादासाहेब ताजणे,सेलू


दादा,आपण मला भेटलेला एक अनमोल हिरा आहात.आम्ही बालपणापासून पूस्तकांच्या सानिध्यात राहिलोत पण त्यांच्याशी सख्यत्व जमवू शकलो नाहीत. पण आपण अनेक वर्ष त्यांच्या प्रवासापासून दूर राहून सुध्दा त्यांचे सखा झालात. जीवनाच्या वाटेवरचा खरा अर्थ तुम्हांला कळाला.ग्रंथ हेच जीवन जगण्याचा आनंद देतात हे आपण सिध्द केल आहे.ग्रंथाच्या सहावासातून तुम्ही स्वतः च एक कधी न संपणारा ग्रंथ झालात.आपल्या ध्येयवेड्या वाचनाने मी प्रेरित झालो आहे.

विनम्र, सुभाष बाबाराव ढगे,परभणी

टीप: हे ईमेल https://www.vijaygaikawad.com वरील संपर्क फॉर्म गॅझेट मार्गे पाठवलेले आहे.


आमचे सन्मित्र,वाचनमित्र विजय गायकवाड,टोप यांच्या अफाट वाचनाची लोकमत या वृत्तपत्राने घेतलेली दखल…!

डॉ.रवींद्र श्रावस्ती.. मृत्यू सुंदर आहे?


मला केवळ एकच गोष्ट माहित आहे ती म्हणजे मला काहीही माहीत नाही. सर जशी सॉक्रेटिसकडून तुम्हाला प्रेरणा मिळते तसीच आम्हाला विजय गायकवाड सरांकडून प्रेरणा मिळते.


दादासाहेब गाडेकर,रायपुर




२१/१/२४

चुका सुधारल्या जाऊ शकतात.!! Errors can be corrected.!!

माझ्या एका चाळीस वर्षाच्या मित्राचा साखरपुडा झाला.

ज्या मुलीशी साखरपुडा झाला,तिच्या सांगण्यानुसार तो नृत्य शिकायला गेला. "देवालाच ठाऊक आहे की मला नृत्य शिकायची खूपच आवश्यकता होती,"त्याने आपली कहाणी ऐकवताना म्हटलं,"मी चाळिसाव्या वर्षीसुध्दा तसेच नृत्य करीत होतो जसे वीस वर्षांपूर्वी करत होतो,

जेव्हा मी ते शिकायला सुरुवात केली होती. म्हणजेच मला नृत्य अजिबात येत नव्हतं.मी ज्या शिक्षिकेकडे प्रथम गेलो तेव्हा बहुधा तिने खरे सांगितले होते की मला नृत्य अजिबात येत नाही. मला माझे आधीचे शिकलेले सर्व काही विसरायला हवे आणि नव्याने नृत्य शिकण्यास सुरुवात करायला हवी.पण तिचं हे म्हणणं ऐकून माझा फारच हिरमोड झाला.माझ्यात शिकण्याची इच्छाच उरली नाही.म्हणून मी शिक्षिकाच बदलली.


"दुसऱ्या शिक्षिकेनं कदाचित माझं मन राखायला मला खोटा दिलासा दिला,पण मला तिचं बोलणं आवडलं.तिने निर्विकारपणे सांगितले की माझे नृत्य जरी जरा जुन्या पध्दतीचे असले तरी माझ्यात नृत्यकलेची मूलभूत समज आहे आणि मला माझे नृत्य सुधरण्यासाठी फार कष्ट पडायचे नाहीत.पहिल्या शिक्षिकेने माझ्या दोषांवर भर दिला होता,म्हणून माझा उत्साह थंड पडला होता.दुसरीने बरोबर उलटं केलं.ती माझ्या कामाची स्तुती करायची आणि माझ्यातील दोष सौम्य करून सांगायची.ती मला नेहमी म्हणत असे,'तुम्ही एक जन्मजात नर्तक आहात, तुम्हाला उपजतच ताल अन् लयीची समज आहे.'साधा विचार केला तर मला माहीत आहे की मी चौथ्या श्रेणीचा एक बेकार नर्तक आहे आणि तसाच नेहमी राहीन;तरी पण मला हा विचार करून चांगलं वाटतं की कदाचित ती खरंही म्हणत असेल.ही गोष्ट तर पक्की आहे की तिला असे बोलायचे पैसे मिळताहेत,पण असा विचार करून काय फायदा?


"काहीही असो,मला आता हे ठाऊक आहे की मी आता एक बरा नर्तक झालोय.पण तिच्या स्तुतीशिवाय मी असा नर्तक बनलोच नसतो.माझ्यात स्वाभाविक लयीची समज आहे असं म्हटल्यामुळे माझ्यात आशा निर्माण झाली. त्यामुळे मला प्रेरणा मिळाली.त्यामुळेच मला स्वतःला सुधारण्याची इच्छा जागृत झाली."


आपली मुले किंवा आपले कर्मचारी यांना जर तुम्ही असं सांगाल की ते मूर्ख व अज्ञानी आहेत, त्यांच्यात अजिबात प्रतिभा नाही आणि ते जे काही करताहेत,ते चूक करताहेत;तर या त-हेने तुम्ही सुधारणेची प्रत्येक शक्यता नष्ट करता.पण जर तुम्ही बरोबर याच्या उलट तंत्राचा वापर केलात,म्हणजेच तुम्हाला समोरच्या माणसाच्या क्षमतेवर विश्वास आहे,त्याच्यात कठीण काम करण्याची अविकसित योग्यता आहे असा विश्वास त्याला दिलात,तर त्याचा परिणाम हा होईल की दिवस-रात्र मेहनत करून तो उत्तम काम करेल.लॉवेल थॉमस,जे मानवीय संबंधात अतिशय निष्पात आहेत,याच तंत्राचा वापर करत होते.ते लोकांत आत्मविश्वास जागवत असत,तुम्हाला साहस व आस्थेच्या माध्यमातून प्रेरित करत.


उदाहरणार्थ,मी मिस्टर व मिसेस थॉमसबरोबर वीकेंड घालवला होता.शनिवारी रात्री त्यांनी मला शेकोटीसमोर खेळीमेळीचे ब्रिज खेळायचे आमंत्रण दिले.ब्रिज?अरे,नाही! नाही! मी नाही! मला ब्रिज थोडंसुध्दा कळत नव्हतं.हा खेळ मला नेहमीच एखाद्या गुप्त रहस्यासारखा वाटे. अशक्य!लॉवेलने उत्तर दिलं,"अरे डेल,यात काही कठीण नाही! ब्रिजमध्ये फक्त लक्षात ठेवण्याची आणि कॉमनसेन्सची गरज आहे.तुम्ही स्मरशक्तीवर खूप लेख लिहिले आहेत आणि तुमच्या बुद्धीला तर सगळेच मानतात.ब्रिज तर तुमच्या डाव्या हातचा मळ आहे.तुम्ही तो कौशल्याने खेळू शकता." आणि मला काही समजायच्या आतच मी जीवनात प्रथमच ब्रिज खेळायला बसलो होतो.यामागचं कारण एकच होतं की,लॉवेलने मला हे सांगून दिलं होतं की ब्रिज खेळणं माझ्या डाव्या हाताचा मळ आहे.


ब्रिजवरून मला एली कल्बर्टसनची आठवण येते,ज्यांच्या ब्रिजच्या पुस्तकांचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.या पुस्तकाच्या १० लाखांपेक्षा अधिक प्रती खपल्या आहेत. कल्बर्टसननी या खेळाला कधीच आपला व्यवसाय बनवला नसता,जर एका तरुण स्त्रीने त्यांना त्यांच्यातल्या प्रतिभेची खात्री दिली नसती.


जेव्हा ते अमेरिकेत १९२२ मध्ये आले तेव्हा त्यांनी तत्त्वज्ञान आणि समाजशास्त्राच्या शिक्षकाची नोकरी शोधायचा प्रयत्न केला; इतकंच काय तर त्यांनी कोळसा विकायचा प्रयत्न केला व त्यातही ते अपयशी ठरले.नंतर त्यांनी कॉफी विकायचा प्रयत्न केला आणि त्यातही अपयशी ठरले.त्यांनी थोडंफार ब्रिज खेळलं होतं,पण त्यांना त्यावेळी ही जाणीव झाली नव्हती की ते एके दिवशी ते शिकवूसुद्धा शकतील.ते केवळ ब्रिजचे एक वाईट खेळाडूच नव्हते,तर खूप हटवादीसुद्धा होते.ते इतके सारे प्रश्न विचारत आणि प्रत्येक डावानंतर इतकी चिरफाड करीत की कुणीच त्यांच्यासोबत खेळायला तयार नसत.

मग ते एका सुंदर ब्रिज शिक्षिका जोसेफाइन डिलनला भेटले. दोघांमध्ये प्रेम जमलं आणि त्यांनी विवाह केला. जोसेफाइननं बघितलं की तो आपल्या पत्त्यांचं किती कसून विश्लेषण करतो आणि तिने आपल्या पतीला हा विश्वास दिला की त्याच्यात या खेळाबद्दल विशेष प्रतिभा दडलेली आहे. कल्बर्टसनं मला सांगितलं की या प्रोत्साहनामुळे आणि केवळ त्याचमुळे त्याने ब्रिज आपला व्यवसाय म्हणून निवडला.


क्लेरेंस एम.जोन्स सिनसिनाटी,ओहियोमध्ये आमच्या अभ्यासक्रमाचे शिक्षक होते.त्यांनी सांगितलं की कशा

त-हेने प्रोत्साहन दिल्याने आणि चुकांना सुधारणे सोपे करून सांगितल्याने त्यांच्या मुलाचे जीवन पूर्ण बदलून गेले."१९७० मध्ये माझा १५ वर्षीय मुलगा डेव्हिड माझ्यासह राहण्यास सिनासिनाटीमध्ये आला. त्याने जीवनात अनेक समस्यांचा सामना केला होता.१९५८ मध्ये एका कार-अपघातात त्याच्या डोक्याला इजा झाली होती.त्याच्या मस्तकावर आजही खाच आहे.१९६० मध्ये त्याच्या आईशी माझा घटस्फोट झाला.त्या नंतर डेव्हिड आपल्या आईबरोबर डल्लासमध्ये राहू लागला.


पंधरा वर्षापर्यंत त्याने आपले बहुतांश शालेय जीवन त्या शाळांमध्ये घालवलं.जिथे मंद गतीने शिकणाऱ्यांसाठी विशेष वर्गांचे आयोजन केले जाते.कदाचित डोक्यावरच्या निशाणीमुळे शाळेच्या लोकांनी हा निर्णय घेतला असावा की त्याच्या मेंदुला इजा झाली आहे आणि त्याचं डोकं सामान्य स्तरावर काम करीत नाही.तो आपल्या वयाच्या इतर मुलांपेक्षा दोन वर्षे मागे होता,म्हणून तो सातवीतच होता.पण त्याला अजूनपर्यंत पाढे पाठ झाले नव्हते.त्याला आपल्या बोटांवर मोजता येत नव्हतं आणि तो मुश्किलीने वाचू शकत होता."एक चांगली गोष्ट मात्र होती.त्याला रेडिओ आणि टीव्ही सेटवर काम करणं खूप आवडायचं.

तो टीव्ही तंत्रज्ञ बनू इच्छित होता.मी त्या क्षेत्रात त्याला प्रोत्साहित केलं आणि त्याला सांगितलं की त्याचे प्रशिक्षण सफल व्हायला त्याचं गणित चांगलं असणं आवश्यक होतं.मी निर्णय घेतला, की मी त्याला या विषयात पारंगत व्हायला त्याची मदत करेन.


आम्ही फ्लॅश कार्डाचे चार संच घेऊन आलो:गुणाकार,

भागाकार,बेरीज आणि वजाबाकी करण्यासाठी जेव्हा आम्ही कार्डाचा उपयोग करीत असू,तेव्हा आम्ही बरोबर उत्तरांना एका वेगळ्या जागी ठेवत असू.जेव्हा डेव्हिड एखाद्या कार्डाचं अचूक उत्तर देऊ शकत नसे, तेव्हा आम्ही तो पत्ता पुन्हा बाजूला ठेवायचो.ही प्रक्रिया तोपर्यंत चाले,

जोपर्यंत त्याचं उत्तर अचूक येत नसे.प्रत्येक वेळी अचूक उत्तर दिल्यावर मी त्याची खूप स्तुती करीत असे.विशेषतः तेव्हा जेव्हा तो मागील कार्डचं अचूक उत्तर देऊ शकला नसे.प्रत्येक रात्री आम्ही सगळी कार्ड संपून जाईपर्यंत हा खेळ खेळायचो.रोज रात्री आम्ही स्टॉपवॉच घेऊन या कामाची नोंद ठेवत असू.मी त्याला वचन दिलं होतं की जेव्हा तो सर्व कार्डाचं अचूक उत्तर आठ मिनिटात देईल अन् त्याचं एकही उत्तर चूक येणार नाही,तेव्हा आम्ही ते रोज रात्री करण्याचं थांबवू.हे डेव्हिडसाठी अशक्य लक्ष्य होतं.पहिल्या रात्री या प्रक्रियेला ५२ मिनिटं लागली,

दुसऱ्या रात्री ४८,मग ४५, मग ४४,४१ आणि मग ४० मिनिटं.कमी झालेल्या वेळेबद्दल आम्ही रोज सेलिब्रेशन करायचो.मी आपल्या पत्नीला फोन करून हे सांगत असे.मी आपल्या मुलाला कवटाळत असे आणि आम्ही नाचत असू.महिन्याअखेर तो सर्व कार्डाची उत्तरं आठ मिनिटांपेक्षा कमी वेळात देऊ लागला.जेव्हा त्याच्यात एखादी छोटी सुधारणा होई तेव्हा ते गणित पुन्हा सोडवण्याचा तो आग्रह धरायचा.त्यानं हा अद्भूत शोध लावला की शिकण्यात किती मजा येते आणि ते किती सोपं आहे."स्वाभाविकच त्याला गणितात खूप चांगले गुण मिळाले.हे आश्चर्यकारक आहे की जेव्हा तुम्हाला गुणाकार करता येतो तेव्हा गणित किती सोपं होऊन जाते.जेव्हा गणितात त्याला बी ग्रेड मिळाली तेव्हा तो चकित झाला.असं आजवर कधीच झालं नव्हतं.

त्याच्यात इतर बदलही अविश्वसनीय वेगाने घडून आले.त्याची अभ्यासाची गती खूप वाढली आणि तो आपल्या चित्रकलेच्या जन्मजात गुणांचा अधिक चांगल्या त-हेने प्रयोग करू लागला. 


शालेय सत्राच्या शेवटच्या महिन्यांमध्ये त्याच्या विज्ञानाच्या शिक्षकाने त्याच्यावर एक मॉडेल बनवण्याची जबाबदारी सोपवली.त्याने एक जटिल मॉडेल बनवण्याची निवड केली.त्यासाठी चित्रकला व मॉडेल बनवण्याची क्षमता हवी होती आणि ॲप्लाईड मॅथ्समधील निपुणतासुद्धा हवी होती.शाळेच्या विज्ञान-मेळ्यात त्याच्या मॉडेलला प्रथम पुरस्कार मिळाला;तर पूर्ण सिनासिनाटी शहरातून तिसरा पुरस्कार मिळाला.


"यामुळे पूर्ण चित्रच पालटलं.हा तोच मुलगा होता जो दोन वर्ग मागे पडला होता,ज्याला 'डोक्याने कमी बुद्धीचा' म्हटलं जात होतं.त्याचे सहपाठी त्याला 'फ्रैंकस्टाईन' म्हणून चिडवत असत आणि म्हणत असत,डोक्यावर घाव आल्यावर त्याचा मेंदू बाहेर वाहून गेला असावा. अचानक त्याला आढळून आलं की तो खरोखर शिकू शकतो.काही करून दाखवू शकतो. परिणामी,आठवीच्या शेवटच्या सत्रात त्याला पूर्ण हायस्कूलमध्ये नेहमी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळाल्या.त्याला नॅशनल ऑनर सोसायटीसाठी निवडलं गेलं.एकदा जेव्हा त्याला आढळून आलं की शिकणं सोपं आहे, त्यानंतर त्याचं पूर्ण जीवनच बदलून गेलं.जर तुम्हाला दुसऱ्यांना सुधारण्यात मदत करायची असेल तर लक्षात ठेवा-


इतरांना प्रोत्साहित करा.त्यांना हे सांगा,की चूक सुधारणे सोपे आहे.


११.०१.२४ या लेखातील पुढील भाग..


१९/१/२४

आठवणीतील ‘दीप’स्तंभ.. The 'deep' pillar of memory..


" इतिहास ही असामान्य गोष्ट असते.पण जर तो खरा असेल तर ! - लिओ टॉलस्टॉय अशाच एका खऱ्या इतिहासाची गोष्ट…


मला अजून आठवतय मी हायस्कूलमध्ये शिकत असताना घरामध्ये आम्ही सर्वजण "शब्दांच्या भेंड्या "खेळत होतो, पासून दीपक माझी ताई म्हणाली,सरते शेवटी मी पप्पांना सहज म्हटलं माझं,नाव दीपक का ठेवलं पप्पा शिक्षक ते म्हणाले,


केलै वै मौर कार्य कहे संध्या रवी

सुनिया जगत रहे निरुत्तर

 माटीर प्रदवीप छिले छे कहिल स्वामी 

आमार हे टकू करिब ता अभि

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची बंगाली भाषेतील ही अतिशय सुंदर कविता या कवितेत गुरुदेव म्हणतात अस्ताला जाणारा सूर्य आपली जागा कोण घेणार हा प्रश्न विचारतो तेव्हा विनम्रपणे छोटीशी पणती म्हणते आपल्या परिने मी उजेड पसरवण्याचे काम करेन.


तो "दीप" तू बनाव म्हणून तुझे नाव "दीपक " ...

प्राथमिक शिक्षिका असलेल्या माझ्या आईने (श्रीमती रजनी शेटे) गणिताची आवड बालपणापासूनच लावली आणि तेव्हापासूनची मित्रांनो ....गणित विषय मला आवडू लागला.आईला मिळत असलेला गावातील मानसन्मान आणि वडिलांची प्रगल्भ विचारधारा,मला नेहमीच शिक्षक बनवण्यास प्रवृत करत होती.त्यातचं आजोबा,आई,वडील,भाऊ,मावशी, काका,बहिण,भाऊजी हे सर्वजण शिक्षक आमच्या सर्वांच्या रक्तातच शिक्षकी पेशा भिनलेला आहे.वंशावळच म्हणा हवं तर . 

चला तर मग शिक्षक बनवूया ...

आईसारखं आणि प्रगल्ब विचार ठेवू या  वडिलांसारखे आणि बनलो शिक्षक ...नव्या उमेदीने नव्या जोमाने गणित विषयाचा शिक्षक झालो खरा ...


पण गणिताची भीती वाटणारे विद्यार्थी .. नावडीचा विषय म्हणणारे विद्यार्थी ... 

मला जमत नाही आणि कळत नाही म्हणणारे विद्यार्थी ... काय आणि कसं करावं ..


"खरा गणिती हा उत्साह मुर्ती असला पाहिजे,

उत्साहाशिवाय गणित नाही."- नोव्हॅलिस 


मग नाविन्याचा शोध घेत विविध उपक्रम,वाचन,कृती,

प्रात्यक्षिक,कथा,गोष्टी,घटना, प्रशिक्षणे,क्लुप्त्याचा शोध इत्यादीची कास हाती घेतली आणि विद्यार्थ्यांना गणित विषय आवडीचा बनावा यासाठी प्रयत्न सुरू केले .

अकॅडमी महोत्सव,बेंचना लेखक कवी शास्त्रज्ञांची नावे,

भूमिती आकृत्यांना आपली नावे,गणित कोश,गणित शुद्धलेखन स्पर्धा,कौन बनेगा गणित चॅम्पियन,गणित प्रश्नमंजुषा इत्यादी उपक्रमांची निर्मिती झाली.शालेय स्तरावर विविध उपक्रम राबवण्यासाठी संस्था अध्यक्ष डी.एस . घुगरे सचिव एम ए .परीट यांचे प्रोत्साहन मिळाले.गणित विषयात जास्तीत जास्त उपक्रम राबवल्याबद्दल 'महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड ' मध्ये माझी नोंदही झाली.या सर्वांचे फलित म्हणून आज अखेर २३ वर्ष गणित विषयाचा शालांत परीक्षेचा शाळेचा निकाल शंभर टक्के आहे.गणिताचे अध्ययन आणि अध्यापन करत असताना गणित विषय विद्यार्थ्यांना आवडावा यासाठी  विविध क्लुप्त्यांचा वापर  करत होतो.

एक माजी विद्यार्थी अचानक मला भेटला काय करतोस म्हणल्यावर स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय असं तो म्हणाला,सर तुम्ही शाळेमध्ये शिकवताना वापरलेल्या क्लुप्त्याचा मला फार उपयोग होतो असं तो सहज म्हणून गेला.कॉलेज संपल्यावर मुले विविध स्पर्धा परीक्षा करिता जादाचे तास लावतात.आपल्या शालेय मुलांना आपण विविध स्पर्धेतील विविध गणितीय क्लुप्त्या समजावल्या तर त्यांचं भविष्य उज्वल होईल या भावनेतून वैदिक गणितावर आधारित 'अंकवेल' या पहिल्या पुस्तकाचा जन्म झाला.महाराष्ट्र राज्य गणित महामंडळाच्या गोंदिया येथील अधिवेशनात त्यावेळचे केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या शुभहस्ते प्रकाशन झाले व उत्कृष्ट पुस्तकाबद्दल माझा लेखक म्हणून सन्मान केला व माझ्या लेखनाला एक वेगळीच उभारी मिळाली.गणित नियम व सूत्रे,मॅथेमॅटिक्स रूल्स अँड फॉर्मुलास,गणित कोश,गणित शुद्धलेखन इत्यादी पुस्तकांचे लेखन माझ्याकडून झाले.मुलांचे मोबाईल वेड जाणून घेऊन  'क्यू आर ' कोडच्या मदतीने दहावीची पुस्तक एका पानात ... केले तर सुमारे अडीच हजार तासांचे व्हिडिओ असणारे एलईडी पुस्तकाची निर्मिती ही माझ्या हातून झाली.देशात हा बहुदा पहिलाच प्रयोग असावा.राष्ट्रीय गणित दिनानिमित्त एका पत्रकाराने मला प्रश्न विचारला ,

उद्या आहे गणिताचा पेपर पोटात माझ्याकडे येऊन देखील कार्य ढोपर . ..

 सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का 

अशी विद्यार्थ्यांची आणि माझी ही स्थिती आजअखेर आहे आपण काय वेगळं करणार आहात?माझ्या तोडून सहजच गेलं."प्रात्यक्षिकावर भर देणारे गणित"

आणि जन्म झाला ॥ गणितायन ॥ 

डीएम लॅब चा ...मापनातून गणिताचा जन्म झाला खरा पण मापनाचा इतिहास मुलांना माहिती आहे का तो समजला तर गणिताचे मूळ समजेल....

पायली,अडीशेर,मापटे,कोळवे,नेळवे इत्यादी मापे लहानपणी पाहिली होती.आज कुठे आहेत ? चला तर शोध घेऊया ... आणि संग्रह करूया …


सुमारे १४ वर्षे शाळेच्या (दीपावली व उन्हाळी सुट्टी ) सुट्टीच्या कालावधीमध्ये कोणतीही रजा न घेता देशातील कन्याकुमारी,राजस्थान,मध्य प्रदेश,महाराष्ट्र,कर्नाटक,

दिल्ली,उत्तर प्रदेश इत्यादी ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या मापनाचा संग्रह आज अखेर करत आहे.


[ प्रसंग -  उद्या दिवाळी पाडवा आहे तरी तुम्ही जुने मापनाचे साहित्य शोधण्यासाठी मुंबईला  चाललात ... माझ्या पत्नीच्या डोळ्यातील पाणी आजही मला या लेखाच्या निमित्ताने समोर दिसत आहेत.]


स्वखर्चाची सुमारे तब्बल ३५ लाख रुपयाची स्व:घरी तयार केलेली गणित लॅब आज महाराष्ट्राचे वेगळेपण ठरत आहे.साडेतीनशे वर्षांपूर्वीची विविध मापे, ब्रिटिशकालीन विविध राजाची वजने व मापे, विविध देशांच्या मोजमापनातील पट्ट्या, (scales [जर्मनी,अमेरिका,

इंग्लंड,भारत,डेनमार्क इ .] ,वाळूचे घड्याळ,सावलीचे घड्याळ (अमेरीका),तसेच विविध कंपन्यांची विविध देशाची सुमारे ३०० घड्याळे,१०० वर्षांचे पितळी कॅलेंडर,मोजमापनाचे रंगीत २७५ तक्ते,विविध देशातील पाउंड व किलोचे तराजू,एका विशिष्ट व आवडत्या अंकांच्या नोटांचा संग्रह,विविध देशातील नोटा,दुर्मिळ नाण्यांचा संग्रह,विविध देशातील पेन्सिल्स व पेन,दगडी पाटी,१८९८ चे गणित पुस्तकासह अत्यंत गणित दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह,याचबरोबर महात्मा गांधी व विविध देशातील पोस्ट तिकिटे व फर्स्ट डे कव्हर्स (६५००),दोन किलोमीटरच्या अक्षर दिसणारे दुर्मिळ दुर्बीण व विविध आकाराच्या वेगवेगळ्या देशांच्यातील दुर्बिनस व इतर विविध दुर्मिळ साहित्याचा संग्रह आहे.


गुंजा पासून २०० तोळ्यापर्यंतची मापे,पायली पासून छटाक पर्यंतची मापे,विविध घड्याळे,नाणी नोटांचा संग्रह,विविध देशातील पोस्ट तिकिटे,एक आण्यापासून पाच हजार रुपये पर्यंतचे स्टॅम्प,विविध तराजू, विविध देशातील पट्ट्या,यांच्या विषयीचा इतिहास ऐकताना व प्रत्यक्ष अनुभव घेताना तब्बल पाच तास कधी गेले कळलंच नाही. - माननीय श्री .डी एस पवार (अध्यक्ष,एस.एस.सी बोर्ड कोल्हापूर ) 


न पाहिलेली मापे ..त्यांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थी व शिक्षक  घेतलेले पहाताना ...भटकंती केलेल्या चे सार्थक झाल्याचे वाटते.


 ३५ लाखात सुमारे ७० तोळे सोने घालून मिरवता आलं असतं पण माझी सहचरणी सौ. सुजाता शेटे हिने माझ्या वेडेपणातच धन्यता मानली हेही माझ्यासाठी नवलच आहे.तिचा हा त्याग माझ्या एवढाच मोलाचा आहे ही मी प्रांजळपणे मान्य करतो.


गणितायन ही ओळख फक्त कोल्हापूर पर्यंत न राहता राज्यभर होत आहे याचा सार्थ अभिमान मला वाटत आहे.सुमारे १५००० संशोधक, प्राध्यापक,गणित अभ्यासक,अधिकारी,पालक, विद्यार्थीनी आज अखेर त्याचा लाभ घेतल्याचा मला आनंद होत आहे.ही सेवा विनामूल्य आहे ती फक्त गणित प्रेमापोटी ...


विविध व्याख्याने प्रशिक्षणे,समीक्षण,मार्गदर्शन या कालावधीमध्ये मी घेतली व दिली.स्टार अकॅडमी ची स्थापना करून शिक्षणातील तारे शोधण्याचा अथक प्रयत्न करत विविध पुरस्काराने त्यांना सन्मानित करीत आहे.माजी चेअरमन,विद्यमान संचालक - करवीर आणि हातकणंगले तालुका शिक्षक सेवक सहकारी पतसंस्था,

जिल्हा कार्याध्यक्ष - शिक्षक सेना, जिल्हाध्यक्ष -अंधश्रद्धा निर्मूलन  व वैज्ञानिक दृष्टिकोन समिती,कोल्हापुर,उपाध्यक्ष - मनीष शिक्षण प्रसारक मंडळ इत्यादी पदावर काम करताना त्यांनाही न्याय देण्याचे काम माझ्यातून होत आहे

एम.एस.सी,बी.एड या शिक्षणावर  शिक्षक असणारा मी पीएचडी,एम ए (एज्युकेशन) डीसीपी,डीएसएम,

पत्रकारिता इत्यादी कोर्सही या कालावधीत पूर्ण केले.


राष्ट्रीय १३६ इतर पुरस्काराने सामाजिक संस्थांनी केलेला सन्मान,टीव्ही चॅनलवरील बातम्या व मुलाखती,

रेडिओवरील मुलाखती व वेळोवेळी वर्तमानपत्रातून आलेल्या बातम्या माझ्या कार्याची प्रतिबिंब दर्शवत

आहेत.


कोण सूर्य बनतं

कोण मशाल बनतं

मी फक्त

वडिलांच्या आशेची पणती बनूनी नकळत प्रकाश देत आहे ... 

"दीप" तेवत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.


डॉ दिपक मधुकर शेटे.

महाराष्ट्र शासन राज्य गौरव पुरस्कार २०२२

सहाय्यक शिक्षक आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज मिणचे.


इतिहास शोधायला निघालो की इतिहास जवळच सापडतो...!

१७/१/२४

दगड गिळणारे समुद्री वाघ Stone-swallowing sea tigers

दक्षिण अमेरिकेत समुद्री वाघांची एक विशिष्ट जात आहे.हे वाघ जंगलांमध्ये राहतात.या वाघांचे वैशिष्ट्य असं असतं,की पाणबुड्यांप्रमाणे समुद्राच्या तळाशी जाऊन ते माशांची शिकार करतात आणि ते खातात!या विशिष्ट जातीच्या जंगलात राहणाऱ्या वाघांच्या पोटामध्ये साधारणपणे प्रवाळासारख्या काही दगडगोट्यांचा साठा असतो! समुद्रतळाशी जाणारा पाणबुड्या पाण्याखाली विनासायास जाता यावं म्हणून आपल्या पाठीवर ज्याप्रमाणे एक खास प्रकारची वजनपेटी बांधतो,

त्याप्रमाणे या समुद्री वाघांच्या पोटातले दगडगोटे त्यांना समुद्राच्या पाण्यात तळाशी डुब्या मारण्याच्या दृष्टीने उपयोगी पडतात.समुद्रतळाशी सहजतेनं जाता यावं म्हणून हे समुद्री वाघ मुद्दामच प्रवाळाचे दगडगोटे गिळतात;आणि आपल्या पोटामध्ये त्याचा साठा करून ठेवतात.जंगलात राहणाऱ्या समुद्री वाघांनी गिळलेले दगडगोटे त्यांना अपायकारक ठरत नाहीत;परंतु प्राणिसंग्रहालयात बंदिस्त केलेल्या समुद्री वाघांसाठी ही सवय घातक ठरते.


एका इंग्लिश सफारी पार्कमध्ये ओटो नावाचा एक समुद्री वाघ होता.एकदा त्याची भूकच एकदम खूप कमी झाली.एकदोन मासळ्या खाल्ल्या,की त्याचं पोट भरू लागलं;पण थोड्याच वेळानंतर त्याची भूक अशी काही उफाळून यायची,की जणूकाही त्यानं 'चायनीज डिनर' घेतलेलं असावं! त्या वाघाची निगा राखणाऱ्यांनी त्याला भूक न लागण्याबद्दल फारशी काळजी केली नाही.कारण त्या वाघाचं वजन चांगलं वाढत होतं ! पण पुढे एक दिवस ओटो अचानक मरण पावला.!


ओटो अचानक कशामुळं मरण पावला,हे शोधून काढण्यासाठी त्याची शवपरीक्षा करण्याकरता मला बोलावण्यात आलं.त्याच्या पोटाचं विच्छेदन करणं जरूरी आहे,असं मला दिसून आलं. कारण त्याच्या पोटाचा भाग फुगीर दिसत होता. म्हणून मग मी त्याच्या पोटावर शवविच्छेदनाच्या तीक्ष्ण सुरीनं आडवा छेद घेतला.त्याच्या पोटाची बाह्य त्वचा मी उघडली आणि आत पाहिलं.मात्र मी आश्चर्यानं चाटच पडलो !


समुद्री वाघाचं पोट सामान्यतः माणसाच्या पोटाएवढंच असतं;परंतु ओटोच्या पोटाचा विस्तार एका बाजूला त्याच्या हृदयापर्यंत तर दुसऱ्या टोकाला थेट गुद्द्वारापर्यंतच्या आतड्यापर्यंत इतका विलक्षण पसरलेला,होता! वरच्या त्वचेखालच्या त्याच्या अंतरत्वचेचं आवरण ताणल्यासारखं दिसत होतं.अंतरत्वचेचं पोटाचं हे आवरण इतकं विलक्षण ताणलं गेलं होतं,की ते जवळजवळ एखाद्या पातळ कागदासारखंच दिसत होतं!त्या अंतरत्वचेचा मी जेव्हा छेद घेतला तेव्हा मला आश्चर्याचा दुसरा धक्का बसला.त्याच्या पोटामधून प्रवाळाचे शेकडो लहान-मोठे दगड निघाले! त्या दगडांनी त्याच्या पोटाची सगळी पोकळी पूर्णपणे व्यापून टाकली होती.त्याच्या पोटातले ते दगड-खड़े मी बाहेर काढले,तेव्हा त्याची रास झाली.किती दगड त्याच्या पोटातून निघाले असतील?चार लिटर मापाच्या तीन बादल्या भरतील एवढे दगड त्याच्या पोटातून निघाले! त्या दगडांचं वजन जवळजवळ पंधरा किलो भरलं!


ज्या हौदात ओटोला ठेवलेलं होतं,त्या हौदाच्या तळाशी समुद्रतळासारखं वातावरण निर्माण व्हावं म्हणून प्रवाळाच्या खड्यांचं आच्छादन घातलेलं होतं.ओटोनं आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार ते दगड-खडे गिळले होते;पण ते प्रमाणाबाहेर त्याच्या पोटात गेले होत;आणि म्हणूनच पोटामधल्या कोमल त्वचेवर आणि आतड्यांमध्ये प्रचंड ताण निर्माण झाल्यामुळे ओटोचा मृत्यू ओढवला होता.त्या पार्कमधल्या इतर समुद्री वाघांकडे मी आपलं लक्ष वळवलं.ते सगळे तसे तंदुरुस्त दिसत होते,तरीपण त्यांची निगा राखणाऱ्या प्रशिक्षकाला मी विचारलं,'इतर समुद्री वाघांच्या तब्येतीमध्ये तर काही गडबड नाहीयना?'


'नाहीतर !' भुवया अकुंचित करत तो मला म्हणाला,'फक्त एक मिमी नावाची मादी सोडली, तर इतर वाघांच्या तब्येतीमध्ये काही गडबड नाहीये.मात्र मिमीची अवस्थाही अलीकडे ओटोसारखीच झालीय बघा! हल्ली तिची भूक मंदावलीय!' मी त्याला मिमीला बोलवण्यास सांगितलं.

तलावाच्या प्रदर्शनमंचावर मिमी इतर समुद्री वाघांबरोबर बसली होती.प्रशिक्षकाने तिला हाक मारताच ती मंचावरून हळूहळू उतरून खाली आली.प्रथम ती एका बाजूला ठेवलेल्या माशांच्या बादलीकडे गेली.ती जेव्हा आमच्या जवळून बादलीकडे गेली,तेव्हा वाळूचे, प्रवाळाचे खडे असेल्या समुद्रकिनाऱ्यावर लाट येऊन आदळते तेव्हा जसा आवाज होतो,तसा आवाज तिच्या पोटातून मला स्पष्ट ऐकू आला. माशांच्या बादलीकडे जाऊन बादलीतले मासे मिमीने फक्त ढंगले आणि ती वळली.तेव्हा मग प्रशिक्षकानं तिला जवळ बोलावलं.सुस्त नि हलके-हलके पावलं टाकत ती आमच्याजवळ आली.प्रशिक्षकाच्या मदतीनं मी प्रथम मिमीशी दोस्ती जुळवली.तिच्या डोक्यावरून,अंगावरून प्रेमानं हात फिरवला,तिला थोपटलं.तशी अगदी गरीब वाघीण होती.मग मी अगदी हळूच तिच्या पोटावरून हात फिरवण्यास नि ते हलकेहलके चाचपण्यास सुरुवात केली.मी तसं केलं तेव्हा काचेच्या गोट्या असलेल्या पिशवीमध्ये हात घातल्यावर त्या गोट्यांचा जसा आवाज येतो, तसा काहीसा आवाज ऐकू आला.मिमीच्या पोटातही प्रवाळाचे खडे भरलेले होते,हे उघडच होतं! मी ताबडतोब मिमीच्या पोटावर ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला.


त्याप्रमाणे मिमीला बेशुद्ध करून मी तिच्या पोटावर शस्त्रक्रिया केली आणि एकएक करून तिच्या पोटामधून मी एकशे चोवीस दगड काढले! त्या सगळ्या दगडांचं मिळून एकूण वजन सात किलोपेक्षाही थोडं जास्त भरलं! तिच्या पोटामधले सगळे दगड काढून टाकल्यानंतर पोटातल्या जखमेवर टाके घालून मी ती शिवून टाकली.

इतर समुद्री वाघांच्या बाबतीतही अशी दुर्घटना घडू नये म्हणून त्यांच्या हौदांच्या तळाशी असलेले प्रवाळाचे खडे-दगड यांचा थर काढून टाकण्याच्या सूचना मी तिथल्या व्यवस्थापकांना दिल्या.माझ्या सूचना त्यांनी ताबडतोब अमलात आणल्या.ऑपरेशननंतर काही दिवसांतच मिनी पूर्णपणे तंदुरुस्त झाली. तिला पहिल्याप्रमाणेच भूक लागू लागली;आणि ती पूर्ववत उत्साहानं वावरू लागली.


कित्येकदा दुसरे काही प्राणीसुद्धा अवाच्या सव्वा खाणं खातात.खातात कसले चक्क हादडतातच! काही काही वेळा काही प्राणी काही विचित्र वस्तू गिळून टाकतात.

त्यामुळे कधी अनवस्था प्रसंग ओढवतो,तर कधी आश्चर्यकारक रीतीनं त्या प्राण्याला काहीच होत नाही! तुमचा विश्वास बसणार नाही,परंतु बेलव्हयूमधल्या एका हत्तीनं एकदा चक्क एक छत्रीच गिळून टाकली होती! पण ती छत्री यथावकाश नैसर्गिक वाटेनं बाहेर पडली आणि त्या हत्तीला काहीही इजा झाली नाही! याउलट क्लीथॉर्पस् इथल्या एका मोठ्या आणि वृद्ध सील माशानं एकदा चुकून एक लोकरी जाकीट गिळलं होतं,पण ते त्याच्या घशातच अडकलं आणि त्यामुळं गुदमरून,श्वास अडून त्याला मृत्यू आला.आता आधुनिक विज्ञानानं एवढी आघाडी मारली आहे की,प्राण्यांनी गिळलेल्या वस्तू त्यांच्या पोटातून बाहेर काढण्याकरता ऑपरेशन करण्याची जरूर पडत नाही.या कामाकरता हल्ली आम्ही जास्त करून गॅस्ट्रोस्कोप नावाचं एक विलक्षण यंत्र उपयोगात आणतो.या यंत्राची नळी प्राण्यांच्या तोंडामधून घशातून थेट त्याच्या पोटापर्यंत पोचवता येते;आणि मग त्याद्वारे आश्चर्यजनक उपचार करून त्या प्राण्यानं गिळलेली वस्तू या उपकरणाच्या साहाय्यानं बाहेर काढता येते! या उपकरणाच्या नळीच्या अग्रभागी एक छोटासा दिवा असतो.त्यामुळे त्याची लवचिक नळी प्राण्याच्या घशामधून पोटापर्यंत सरकवल्यानंतर उपकरणाच्या बाह्य भागात असलेल्या एका दुर्बिणीच्या लेन्समधून प्राण्याच्या पोटातला अंतर्भागही पाहता येतो. उपकरणाच्या अग्रभागी असलेला दिवा प्रकाश फेकतो व त्यामुळे प्राण्याच्या शरीरातला कोणताही अंतर्गत भाग स्पष्टपणे दिसू शकतो. या उपकरणाच्या नळीमधून प्राण्याच्या पोटामध्ये पाण्याचे हलके फवारे मारता येतात आणि जरूर तो भाग धुऊन काढता येतो.त्याचबरोबर या उपकरणाच्या नळीच्या अग्रभागी एक 'फुगा नलिका' असते.उपकरणाचा अग्रभाग प्राण्याच्या शरीरात पोचवल्यानंतर उपकरणाच्या बाहेर असलेल्या एका नॉझलमधून हवा फुंकून या 'फुगा नलिकेचा' फुगा फुगवता येतो आणि त्याद्वारे प्राण्याच्या शरीरांतर्गत असलेले भाग 'चाचपून' पाहता येतात,विविध अवयवांची तपासणी करता येते.या उपकरणाच्या बाह्य भागावर असलेल्या 'नेत्रक- लेन्स'मुळं प्राण्याच्या शरीराचा कोणताही भाग मोठा होऊन सुस्पष्टपणे दिसू शकतो.

थोडक्यात या यंत्रामुळं प्राण्याच्या शरीरामध्ये 'डोकावता' येतं.इतकंच नव्हे तर या यंत्राच्या उपयोगानं प्राण्याच्या पोटात कोणत्याही ठिकाणी होणारा रक्तस्राव थांबवता येऊ शकतो.बायोप्सी (जीवोती परीक्षा) साठी दूषित भागातल्या पेशी काढून बाहेर आणता येतात;आणि आत अडकलेल्या कोणत्याच्या वस्तूवर पकड जमवून ती बाहेर काढता येते! या यंत्राचे इतके विविध उपयोग आहेत.


अगदी सुरुवातीसुरुवातीला आम्ही ज्या प्राण्यांवर या अजब उपकरणाचा उपयोग केला त्यामध्ये ब्रांडी नावाच्या एका डॉल्फिन माशाचा समावेश होता! या माशाची केस जरा अवघड नि विचित्रच होती.पाल्मानोवा, माजोर्कामधल्या मरीनलँड इथल्या डॉल्फिनेरियममधल्या मत्स्यक्रीडापटूं मधला ब्रांडी हा डॉल्फिन मासा तर सुपरस्टारच होता. पाण्यात व्हॉलीबॉल खेळणं,रबरी रिंगा फेकीचा खेळ खेळणं,मोठ्या रबरी कड्यांमधून आरपार उड्या मारणं असे विविध खेळ हा मासा फार चित्ताकर्षक पद्धतीनं सादर करत असे. सामान्यतः डॉल्फिन मासा हा जात्याच अतिशय बुद्धिमान असतो.त्याच्या जोडीलाच खेळकरपणाचा गुणही निसर्गानं त्याला बहाल केलेला असल्यानं तो शिकवलेली कोणतीही गोष्ट चटकन शिकतो;पण ब्रांडी डॉल्फिन माशाची बुद्धिमत्ता फार असामान्य होती.साहजिकच इतर सर्व माशांमध्ये तो अधिक क्रीडानिपुण ठरला होता;पण खेळताखेळता या माशानं एकदा पंधरा सेंटीमीटर व्यासाचं प्लॅस्टिकचं खेळाचं एक कडं चुकून गिळलं! या कड्यानं तो एक विशिष्ट खेळ दाखवत असे,तर हे कडं त्याच्या पोटात गेलं.सुरुवातीसुरुवातीला तर ब्रांडी नेहमीप्रमाणे खात- पीत राहिला आणि आपलं क्रीडानैपुण्य सादर करत राहिला.त्याच्या पोटात गेलेलं ते कडं,नरम,मुलायम प्लॅस्टिकचं होतं;परंतु हळूहळू ब्रांडीच्या पोटातल्या तीव्र आम्लपाचक रसामुळे हे मऊ नरम कडं कडक बनत गेलं.ते कडक बनल्यावर त्याच्या आतड्यात एका ठिकाणी रुतून बसलं. साहजिकच ते त्याला खुपू लागलं.त्याचं पोट दुखू लागलं.त्याला भूक लागेनाशी झाली;आणि त्याच्या क्रीडानैपुण्यात अनियमितता आली. नेहमी उत्साहानं खेळणारा ब्रांडी आता सुस्तपणे तलावामध्ये पडून राहू लागला.या माशाचं काहीतरी बिघडलंय हे त्याच्या ट्रेनरच्या ध्यानात आलं आणि त्यानं लगेच आम्हाला बोलावणं पाठवलं.अँड्र्यू ग्रीनवूड आणि डेव्हिड वाईल्ड हे दोघं मरीनलॅण्डमधल्या डॉल्फिनेरियममध्ये पोहोचल्यानंतर ब्रांडीला ताबडतोब तलावातून बाहेर काढण्यात आलं.अँड्र्यूनं ब्रांडीचा जबडा उघडला;आणि जेलीनं गुळगुळीत केलेली गॅस्ट्रोस्कोपची नळी त्याच्या घशातून आत सरकवली.यंत्राची नळी हळूहळू आत सरकत त्याच्या पोटापर्यंत पोहोचली.तेव्हा डेव्हिड वाईल्डनं नेत्रकभिंगाला डोळा लावला.त्याला ब्रांडीच्या पोटाचा अंतर्भाग दिसू लागला;पण त्याच्या पोटातल्या पाचकरसामुळे नळीच्या तोंडाला असलेलं भिंग धूसर बनलं,तेव्हा पाण्याचा स्प्रे सोडून वाईल्डनं ते स्वच्छ करून घेतलं.गॅस्ट्रोस्कोपमुळे त्याला ब्रांडीच्या पोटातला सगळा भाग स्पष्ट दिसू लागला.सूज आल्यामुळे त्याच्या पोटातल्या अंतरत्वचेचा भाग गॅस्ट्रोस्कोपच्या नळीच्या अगदी निकट आला होता.लवकरच पोटाच्या एका आतल्या भिंतीमध्ये त्या कड्यामुळे झालेली पहिली जखम वाईल्डला दिसली.त्याने नळी आणखी थोडी पुढे सरकवली आणि तिचा अग्रभाग पुन्हा चारी बाजूला फिरवला.तेव्हा एका ठिकाणी त्याला काळ्या रक्ताच्या गुठळ्या दिसल्या.त्यातलं बरचसं रक्त ब्रांडीनं पचवलं होतं.त्या (प्राणिमित्रांच्या जगात,विजय देवधर)

गुठळ्यांमध्ये वाईल्डला ब्रांडीच्या पोटात गेलेलं प्लॅस्टिकचं ते कडं दिसलं.चयापचय क्रियेमुळे ते कडं पोटाच्या अंतरत्वचेमध्ये घासलं जात होतं; आणि त्यामुळे तिथे जखमा होऊन रक्तस्राव होत होता.ते कडं नेमकं कुठं आहे हे कळल्यानंतर वाईल्डनं ग्रॅस्ट्रोस्कोपची नळी बाहेर काढून घेतली.नंतर मग त्या नळीच्या टोकाला तारेचा एक विशिष्ट हुक लावून ती नळी त्यानं पुन्हा ब्रांडीच्या पोटात सारली.

नेत्रकभिंगाला लावून नळीला लावलेला तारेचा हुक त्यानं मोठ्या कौशल्यानं त्या कड्यापाशी पोहोचवला आणि तो त्या कड्यात अचूक अडकवला कडं हुकामध्ये पक्कं अडकल्यानंतर मग त्यानं गॅस्ट्रोस्कोपची लवचिक नळी हळूहळू बाहेर ओढून घेण्यास सुरुवात केली.प्लॅस्टिकचं ते कडं घशापर्यंत येताच ब्रैडीनं ते नैसर्गिक प्रेरणेनं बाहेर ओकून टाकलं.ते कडं बाहेर पडताच ब्रांडीला एकदम बरं वाटू लागलं.ब्रांडीच्या पोटामधल्या आम्लामुळे ते कडं चांगलंच कडक झालं होतं.त्याचा परीघ धारधार बनला होता आणि त्यामुळेच ब्रांडीच्या पोटात जखमा झाल्या होत्या.औषधांमुळे आणि विशेषतः पचनाच्या त्या गोळ्यांमुळे ब्रांडीच्या पोटातल्या जखमा बऱ्या झाल्या आणि लवकरच तो खडखडीत बरा होऊन पूर्ववत् आपलं क्रीडानैपुण्य दाखवू लागला. त्याच्यामध्ये परत पूर्वीचा उत्साह आला आणि तो अगदी तंदुरुस्त बनला.आता जेव्हा केव्हाही एखाद्या प्राण्याची भूक कमी झाल्याची बातमी आम्हाला मिळते, तेव्हा आम्ही गॅस्ट्रोस्कोप हे उपकरण आमच्याबरोबर नेहमी नेतो.कारण प्राण्यांनी गिळलेल्या काही वस्तूंमुळेच त्यांची सामान्यतः अशा प्रकारची तक्रार सुरू झालेली असते.


१५/१/२४

बिबट्यांच्या पिल्लांचं पुनर्मिलन Reunion of Leopard Cubs

▶ एके दिवशी अचानक पुण्याचे उपवनसंरक्षक सत्यजित गुजर यांचा फोन आला."वाघोली गावाजवळ बिबट्याची दोन पिल्लं आईपासून दुरावली आहेत आणि त्यांना आपल्या मदतीची गरज आहे.लवकरात लवकर ऑफिसला ये." तसाच तडक गणेश खिंडीतल्या वन विभागाच्या कार्यालयात गेलो.सहाय्यक वनसंरक्षक मधुकर तेलंग माझीच वाट पाहत होते.सत्यजितने माझ्यासाठी छानसा लेमन टी मागवला.तो स्वादिष्ट चहा पिऊन मी आणि तेलंगसाहेब त्यांच्या शासकीय सुमोने मोहिमेवर निघालो. पुणे-नगर रोडवर नेहमीप्रमाणेच प्रचंड ट्रॅफिक होतं.त्यामुळे वाघोलीला पोचायला आम्हाला खूप वेळ लागला.तिथून केसनंद फाट्यावर उजवीकडे वळून न्हावी सांडस नावाच्या छोट्या गावात पोहोचलो.

जागोजागी प्रचंड प्रमाणात उसाची शेती दिसत होती.

गेल्या अनेक वर्षांमध्ये इथल्या शेतकऱ्यांनी ज्वारी-बाजरीची पारंपरिक शेती सोडून पैशांच्या आशेने उसाची लागवड केली होती.उसाचं उत्पन्नही चांगलं येत होतं.पण अलीकडच्या काळात जुन्नर आणि भीमाशंकरच्या जंगलांतल्या बिबट्यांनी इथल्या उसाच्या शेतांमध्ये बस्तान बसवायला सुरुवात केली होती.त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांना नवाच घोर लागला होता.दुपारच्या सुमारास आम्ही घटनास्थळी पोहोचलो.झालं असं होतं,की ऊसतोडणी कामगारांनी पन्नासएक फूट रुंदीचा लांबलचक पट्टा कापून टाकला होता.ज्या लाइनवरून त्यांनी पट्टा कापायला घेतला तिथून तीन-चार फुटांतच दाट उसामध्ये बिबट्याची मादी दोन पिल्लांसह विश्रांती घेत होती. कोयत्याने ऊस छाटतानाचे सपासप आवाज, कामगारांचा गलका आणि ट्रॅक्टरच्या घरघराटामुळे तिला पिल्लांसहित पळून जाता आलं नाही.त्यामुळे पिल्लं तिथेच सोडून ती पसार झाली.सूर्य थोडा वर आल्यावर मात्र तिच्या पिल्लांना भूक लागली आणि आईची आठवण आली. त्यांनी आपल्या आईला आवाज द्यायला सुरुवात केल्यावर लोकांना त्यांचं अस्तित्व लक्षात आलं आणि त्यांनी ताबडतोब वनविभागाला कळवलं.


वास्तविक काही शेतकऱ्यांनी या मादीला काही दिवसांपूर्वीच पाहिलं होतं.आदल्या दिवशी तिथे बिबट्याला पकडायचा पिंजराही आणून ठेवला होता;पण त्यात ती सापडली नव्हती.आईपासून दुरावलेल्या या पिल्लांना वन विभागाच्या लोकांनी पिंजऱ्याजवळ आणून ठेवलं होतं.ही पिल्लं सावलीसाठी पिंजऱ्याच्या खाली असलेल्या जागेमध्ये जाऊन बसली होती. त्यामुळे कुणालाच सहजी दिसत नव्हती,मात्र अधूनमधून त्यांच्या आईला ती हाक मात्र देत होती.हलकेच पिंजऱ्याखाली हात घालून एकेकाला बाहेर काढलं आणि मांडीवर घेतलं. दोन्ही पिल्लं छान गुबगुबीत होती.त्यांचे घारोळे डोळे उघडलेले होते.साधारण अर्धा किलो वजनाची ती पिल्लं दोन आठवड्यांची दिवसांची असावीत.असं मला वाटलं.

मायेचा हात मिळाल्याने ती काहीशी आश्वस्त झाली.

तिथेच मला दोन वाट्या दिसल्या आणि मला हसू आवरेना.पुण्याहून निघताना इथल्या कर्मचाऱ्यांना दूध आणि कोमट पाणी समप्रमाणात घेऊन पिल्लांना पाजावं,असा निरोप द्यायला मी सत्यजितला सांगितलं होतं. पण माझी ही सूचना त्यांच्यापर्यंत पोहोचताना काही तरी गडबड झाली असावी.तिथल्या कर्मचाऱ्यांनी पिल्लांसमोर एका वाटीत दूध आणि दुसऱ्या वाटीत कोमट पाणी ठेवलेलं दिसत होतं.ते एकत्र केलेलं नव्हतं.शिवाय या तान्ह्या पिल्लांना वाटीतून पाणी पिणं कसं कळावं? त्यामुळे आम्ही पोहोचलो तेव्हा ती चांगलीच भुकेजलेली होती.सुदैवाने जवळच्या एका घरात बाळाची दूध पिण्याची बाटली मिळाली.एका शेळीचं दूध काढलं आणि त्यात पाणी टाकून बाटलीत भरलं.बाटली त्यांच्या तोंडासमोर धरली;पण प्रतिसाद शून्य ! त्यांना भूक तर प्रचंड लागलेली दिसत होती.कारण एव्हाना त्यांच्या ओरडण्याचा व्हॉल्युम वाढलेला होता.मग मी माझी जुनी आयडिया वापरली. सॅकमधला टर्किश नॅपकिन कोमट पाण्यात भिजवून पिळून काढला.


एका पिल्लाला मांडीवर घेतलं.त्याच्या तोंडात बाटलीचं बूच सारलं आणि ओलसर खरखरीत नॅपकिन त्याच्या डोक्यावरून हलकेच फिरवला.

माझ्या मांडीला आईची कूस आणि टर्किशच्या स्पर्शाला जीभ मानून त्याने पचक पचक करत बाटलीतलं दूध प्यायला सुरुवात केली. 


दहा मिनिटांत दोघांचीही पोटं भरली आणि ती पुन्हा शहाण्यासारखी पिंजऱ्याखालच्या सावलीत जाऊन झोपली.दुपारचे दोन वाजले होते. आम्हीही जवळच्या टपरीवजा हॉटेलमध्ये भेळ खाऊन पेटपूजा आटोपली आणि पुढच्या कामाला लागलो.परतल्यावर आम्ही परिसराची पाहणी केली.उसासाठी पाणी धरलेल्या शेतात ओलसर जमिनीवर बाळांच्या आईच्या पाऊलखुणा आम्हाला काही ठिकाणी दिसून आल्या;परंतु त्यांच्या तुटक अस्तित्वामुळे तिच्या चालण्याची दिशा समजणं अवघड होते.संपूर्ण क्षेत्राचा सर्व्हे करून आम्ही परत आलो.एव्हाना पिल्लांना पुन्हा भूक लागली होती.त्यामुळे ती मोठमोठ्याने माँव माँव करू लागली होती. आम्ही लगोलग त्यांचं दुसरं फीडिंग उरकून घेतलं.आता आम्ही त्या कामात तरबेज झालो होतो.दूध पिऊन झाल्यावर पिल्लं पुन्हा पिंजऱ्याखाली जाऊन झोपली.त्यानंतर आम्ही स्थानिकांशी चर्चा केली.संध्याकाळी कुणीही एकट्या- दुकट्याने फिरू नये,शक्यतो घरीच थांबावं,असं फर्मान तिथल्या तरुण सरपंचाने काढलं.त्यानुसार सगळे इमानदारीने आपापल्या घरात टीव्ही बघत बसले.काही जवान मंडळी मात्र बिडीकाडी ओढत,तंबाखू चघळत गावाच्या वेशीवर गप्पाटप्पा करत बसली.


संध्याकाळचे सहा वाजले होते.ऊसतोडणीचं कामही थांबलं होतं.पिल्लांना शेवटचं फीडिंग करावं म्हणून मी एका पिल्लाला मांडीवर घेतलं. पिंजऱ्यापाशी मी,

तेलंगसाहेब आणि वन विभागाच्या सेवेत रुजू झालेल्या दोन तरुण मुली होत्या.आमची सुमो साधारण १०० मीटरवर उभी होती.तिथे काही कर्मचारी आणि गावातली पुढारी मंडळी थांबली होती.अख्खा परिसर निर्मनुष्य होता.मी एका पिल्लाचं फीडिंग संपवून दुसऱ्याला मांडीवर घेतलं.तेवढ्यात सुमोपाशी थांबलेल्या लोकांना आमच्या दिशेने हातवारे करायला सुरुवात केली.ते आम्हाला मागे वळून बघायला सांगत होते.आम्ही मागे वळून पाहिलं, तर पिल्लांची आई स्वतःच त्यांना न्यायला आली होती.तिच्या बाळांना आम्ही नक्की काय करतोय हे ती पाहत होती. 


आमच्यापासून ती फक्त पन्नास मीटरवर असेल. बिबटीण एवढ्या जवळ आलेल्या पाहून दोन तरुण मुली घाबरल्या.

परिस्थिती अवघड झाली होती.या मुलींनी पळापळ केली असती तर त्या मादीने त्यांना मुळीच सोडलं नसतं.आणि माझ्या हातात तर तिची पिल्लं होती.तो क्षण आम्हा सर्वांच्याच जीवनमरणाचा होता.पण वन विभागात २५-३० वर्ष काम केलेल्या अनुभवी आणि धाडसी तेलंगसाहेबांनी ही सिच्युएशन अतिशय जबाबदारीने हाताळली.तिथेच पडलेला लांबलचक ऊस त्यांनी मुलींच्या हाती सोपवला आणि त्यांना सुमोच्या दिशेने जायला सांगितलं.उसाचं दांडकं स्वतःच्या शरीराभोवती गरागरा फिरवत त्या दोघी शांतपणे सुमोपर्यंत सोयरे वनचरे,अनिल खैरे,समकालीन प्रकाशन,

पुणे..पोहोचल्या.आता मी,तेलंगसाहेब आणि बिबट्यांचे दोन बछडे एवढेच तिथे उरलो. स्थानिकांकडून पैदा केलेल्या एका बास्केटमध्ये त्या दोन्ही पिल्लांना व्यवस्थित ठेवलं आणि आम्हीही सुमो गाठली.सर्वांना सावकाश तिथून रफा दफा होण्याचा संदेश दिला.कारण आम्ही तिथेच थांबलो असतो तर कदाचित ती बिबटीण पिल्लांना न घेताच निघून जाण्याची शक्यता होती.त्यामुळे बिलकूल आवाज न करता आम्ही तिथून निघालो.सर्व लोक आपापल्या घरी परतले.आम्हीही पुण्याला परत आलो.



दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता फोन आला.

बिबट्याच्या पिल्लांची आई पिल्लांना सुखरुप घेऊन गेल्याचा निरोप मिळाला.या निरोपामुळे आम्हाला खूपच आनंद झाला. यापूर्वी आईपासून दुरावलेल्या दहा-बारा बिबट्यांच्या पिल्लांना जगवण्याचं अवघड काम आम्ही कात्रजच्या वन्यजीव अनाथालयाला मोठ्या हिकमतीने केलं होतं.पण पिल्लांचं बालपण आईशिवाय जाणं चुकीचंच.त्यामुळे मातेपासून बिछडलेल्या बछड्यांचं पुनर्मिलन झाल्याचा आनंद और होता!