अनेक वर्षाआधी फिलाडेल्फिया पेपर 'इव्हिनिंग बुलेटीन'च्या विरुद्ध एक धोकादायक अफवा पसरवली जात होती.या दुर्भावनापूर्ण अफवा वेगाने पसरवल्या जात होत्या.जाहिरात देणाऱ्यांना हे सांगितले जात होतं की,आता वाचक या पेपरात कमी रुची घेतात,कारण यामध्ये जाहिराती खूप असतात आणि वाचायची सामग्री खूपच कमी असते.अफवा दाबण्याकरिता तत्काळ काही करणं जरुरीचं होतं.परंतु कसं ? पेपरने अफवेला उत्तर या प्रकारांनी दिलं.बुलेटिनने एक दिवस सगळ्या प्रकारच्या बातम्यांना कापलं,त्याचं वर्गीकरण केलं आणि त्याचं पुस्तकाच्या रूपात प्रकाशन केलं.या पुस्तकाचं नाव ठेवले गेलं 'वन डे'. या पुस्तकात ३०० पानं होती.याचा आकार हार्डकव्हर पुस्तकाप्रमाणेच होता.जर याला पुस्तकाप्रमाणे विकलं तर याची किंमत काही डॉलर्स असायला हवी होती;परंतु पेपरने या सगळ्या बातम्या आणि लेख एकाच दिवसात छापले होते.यांची किंमत काही डॉलर्स नाही,तर फक्त काही सेंटच होती.पुस्तक छापल्यावर हे तथ्य नाटकीय रूपात समोर आले की,बुलेटिन आपल्या वाचकांकरिता खूपच जास्त रोचक माहिती छापतात.
यामुळे तथ्य जास्तच उठावदारपणे जास्तच खमंगपणे अधिक प्रभावी ढंगात समोर आलं.आकडे किंवा वायफळ गोष्टींनी या अफवेला इतक्या चांगल्या तऱ्हेने उत्तर दिलं गेलं नसतं.हे नाटकीयतेचं युग आहे.फक्त खरं बोलणंच पुरेसं नसतं.खऱ्याला नाट्यरूपाने आणि वेधक प्रकारे सादर करायला पाहिजे.सिनेमात होतं. टीव्हीत होतं आणि जर तुम्ही लोकांच लक्ष आकर्षित करू इच्छिता तर तुम्हालापण हेच करावं लागेल.विंडो डिस्प्लेचे विशेषज्ञ नाटकीय शक्तीला जाणतात.उदाहरणार्थ,एक नवीन उंदीरमार औषधाच्या निमित्ताने आपल्या डीलर्सला विंडो डिस्प्लेचं जे सामान दिलं त्यात दोन जिवंत उंदीरपण होते.ज्या आठवड्यात जिवंत उंदीर शोकेसमध्ये ठेवले गेले,विक्री इतर वेळेपेक्षा पाचपट जास्त वाढली.
टीव्हीवर येणाऱ्या जाहिराती बघा,ज्यात सामान विकण्यासाठी नाटकीय तंत्राचा प्रयोग केला जातो.एक दिवस संध्याकाळी आपल्या टीव्हीसमोर बसा आणि या गोष्टीकडे लक्ष द्या की,जाहिराती देणारे कोणत्या प्रकारे त्यांच्या प्रॉडक्टची जाहिरात करतात.तुम्हाला माहिती होईल की,एक अँटॅसीड औषध एका टेस्ट ट्यूबमध्ये ॲसिडचा रंग बदलून देते.जेव्हा की याचं प्रतिवादी औषध असं नाही करू शकत. साबण किंवा डिटर्जंटाचा एक ब्रँड मळलेल्या शर्टाला चमकदार पांढरा करतो.जेव्हा की, दुसऱ्या ब्रँडच्या सफाईमध्ये पिवळेपणा आहे. तुम्ही हेही पाहाल की,एक कार अनेक वेळा फिरते आणि वळते.जे केवळ सांगण्यापेक्षा कितीतरी चांगलं आहे.तुम्हाला सामान खरेदी करण्यात खूश असणारे प्रसन्न चेहरे दाखवले जातात.याचप्रकारे प्रेक्षकांच्या समोर फायद्याचे नाटकीय प्रदर्शन केलं जातं आणि याच कारणामुळे लोक त्या सामानाला खरेदी करायला प्रेरित होतात.तुम्ही आपले विचार बिझनेस किंवा जीवनाच्या कोणत्याही दुसऱ्या गोष्टींनाही नाटकीय पूर्ण रूपात सादर करू शकता.हे सोपं आहे.जिम ईमैन्स रिकमंड,व्हर्जिनियामध्ये एनसीआर (नॅशनल कॅश रजिस्टर) कंपनीचे सेल्समन आहेत.ते सांगतात की,त्यांनी नाटकीय प्रदर्शन करून कशा प्रकारे एकदा त्यांचा माल विकला.'मागच्या आठवड्यात मी शेजारच्या किराणा दुकानात गेलो आणि मी बघितलं की,तो आपल्या चेकआउट काउंटरवर जी कॅश रजिस्टर वापरत होता ते खूपच जुनं होतं.मी मालकाजवळ गेलो आणि त्याला म्हणालो जेव्हा जेव्हा तुमचा सामना ग्राहकांबरोबर होतो तेव्हा प्रत्येक वेळा तुम्ही काही शिक्के खाली पाडता.हे बोलत मी जमिनीवर काही पैसे खरंच फेकले. तत्काळ तो माझी गोष्ट लक्षपूर्वक ऐकायला लागला.खरंतर केवळ शब्दांनीपण त्यांचा इंटरेस्ट जागृत झाला असता;परंतु जमिनीवर पैशांच्या पडणाऱ्या आवाजाने त्याला पूर्णपणे बांधून टाकले होते.मी शेवटी त्याला त्याची सगळी जुनी मशिन्स बदलण्याची ऑर्डर घेण्यामध्ये सफल झालो.'हे घरगुती जीवनातपण कामास येते. जुन्या काळात जेव्हा कोणी प्रियकर आपल्या प्रेयसीसमोर प्रेम प्रस्ताव ठेवायचा,तर काय तो फक्त शब्दांच्या माध्यमानेच आपलं प्रेम व्यक्त करायचा? नाही! तो आपल्या गुडघ्यांवर खाली बसायचा.यावरून माहीत पडायचं की,तो खरंच गंभीर आहे.त्याची भावना खरी आणि प्रबळ आहे.आजकाल प्रेम प्रस्ताव ठेवण्याकरिता प्रेमी गुडघ्यांवर बसत नाही,तरी पण तो रोमँटिक वातावरण निर्माण करतो म्हणजे त्याचा प्रस्ताव स्वीकारला जाईल.
तुम्हाला जे हवं आहे,त्याची नाटकीय प्रस्तुती मुलांसमोरपण सफल होते.बर्मिधम,अलाबामाच्या जो. बी. फॅट ज्युनियरला मुलांकडून समस्या होत होती.त्यांचा पाच वर्षांचा मुलगा आणि तीन वर्षांची मुलगी आपली खेळणी आवरत नव्हते.याकरता त्यांनी एक 'ट्रेन' बनवली.जोई (कॅप्टन कॅसी जोन्स) आपल्या तीन चाकी सायकलवर इंजिनिअर बनला.जेनेटची वॅगन जोडलेली होती आणि संध्याकाळी ती सगळे 'कोळसे' आपल्या वॅगनमध्ये ठेवत होती आणि मग तिचा भाऊ तिला पूर्ण खोलीभर फिरवत होता.या प्रकारे खोलीची सफाई होत होती,तीपण न लेक्चर देता,न वाद घालता,न धमकी देता.
मिशावाका,इंडियानाची मेरी कॅथरीन वुल्फला आपल्या नोकरीत काही त्रास होता. याकरता तिने आपल्या बॉस बरोबर बोलायचं ठरवलं.सोमवारच्या सकाळी तिने त्यांची अपाँइटमेंट देण्याकरता म्हटलं; परंतु तिला सांगण्यात आलं की,ते खूपच व्यस्त होते आणि तिला त्या आठवड्यात दुसऱ्या कुठल्या दिवशी अपाँइटमेंट करता सेक्रेटरीबरोबर संपर्क करायला पाहिजे.सेक्रेटरीने सांगितले की, बॉसचं शेड्यूल खूप टाइट आहे;पण ती कशी तरी त्यांना भेटण्याचा प्रयत्न करेल.मिस वुल्फने सांगितले की,यानंतर काय झालं.!
पूर्ण आठवडा मला त्यांच्याकडून उत्तरच आलं नाही.
जेव्हापण मी तिला विचारत होतो तेव्हा काही ना काही कारण ती सांगायची,की बॉस तिला का नाही भेटू शकत आहे.शुक्रवारच्या सकाळीही मला काही निश्चित उत्तर मिळालं नाही.मी खरंचं त्यांना भेटू इच्छित होते आणि वीकेंडच्या आधीच मला त्यांच्याशी आपल्या समस्यांबद्दल चर्चा करायची होती.याकरता मी स्वतःला विचारलं की,मी कोणत्या प्रकारे प्रयत्न करू ज्यामुळे ते मला भेटायला तयार होतील.शेवटी मी एक औपचारिक पत्र लिहिलं.
पत्रात मी लिहिलं की,मी त्यांची व्यस्तता समजू शकते; परंतु मला खूपच महत्त्वाच्या कामासाठी भेटायचं आहे.मी पत्राबरोबर स्वतःचा पत्ता लावलेला लिफाफापण ठेवून दिला.या लिफाफ्यात एक फॉर्मपण ठेवला.ज्याला ते स्वतः भरू शकत होते किंवा आपल्या सेक्रेटरीकडून भरवून मला पोस्ट करू शकले असते.फॉर्ममध्ये मी लिहिलं होतं...मिस वुल्फ,मी तुम्हांला या वेळी… वाजून…
मिनिटांनी…भेट देऊ … शकतो.(मित्र जोडा,डेल कार्नेगी)
मी ११ वाजता हे पत्र आपल्या बॉसला पाठवले आणि २ वाजता मी आपल्याला मेलबॉक्स चेक केला.तिथं माझा पत्ता लागलेला लिफाफा आला होता.त्यांनी स्वतःच माझा फॉर्म भरला होता आणि हे सुचवलं होतं की,ते मला त्याच दुपारी भेटू शकतील आणि मला माझी गोष्ट सांगण्या
करता दहा मिनिटांचा वेळ दिला होता. मी त्यांना भेटले आणि एका तासाहून जास्त वेळपर्यंत बसून माझी समस्या सोडवली.जर मी घटनेला नाटकीय ढंगांनी व्यक्त करून त्यांना हे नसतं पटवलं की,मी त्यांना खरंच भेटू इच्छिते तर बहुतेक मी अपॉइंटमेंटची आतापर्यंत वाट बघत बसले असते.जेम्स बी.बॉयन्टनला एक मोठा मार्केट रिपोर्ट द्यायचा होता.त्याच्या फर्मने आताच कोल्ड क्रिमच्या एका अग्रणी बँडचे गहन अध्ययन केले होते.या बाजारात स्पर्धेच्या बाबतीत डाटा लगेच हवा होता.संभाव्य ग्राहक जाहिरात जगतातला सगळ्यात मोठा आणि भयानक लोकांमधला एक होता आणि सुरू करायच्या आधीच त्याची पहिली युक्ती अपयशी ठरली.
मिस्टर बॉयन्टन सांगतात की,जेव्हा मी पहिल्यांदा त्याला भेटायला गेलो,तर मी फालतूच्या वादात गुंतून गेलो.आम्ही शोधाच्या पद्धतीवर निरर्थक वाद घालत राहिलो.ते वादात हार मानायला तयार नव्हते.त्यांनी मला सांगितले की,मी चूक होतो आणि मी हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की मी बरोबर होतो.शेवटी मी जिंकलो आणि मला समाधानपण मिळाले;परंतु माझा वेळ संपून गेला होता. इंटरव्ह्यू संपलेला होता आणि मी आपल्या कामात असफल झालो होतो.
दुसऱ्यांदा मी त्याला आकडे किंवा डाटाच्या जाळात नाही अडकवलं.जेव्हा मी या माणसाला भेटायला गेलो,तेव्हा मी गुणवत्तेला नाटकीय प्रकारे प्रस्तुत केले.जेव्हा मी त्याच्या ऑफिसमध्ये शिरलो तेव्हा तो फोनवर व्यस्त होता.जेव्हा त्याची चर्चा संपली तेव्हा मी आपली सुटकेस उघडली आणि कोल्ड क्रीमचे बत्तीस डबे काढून त्यांच्या टेबलावर ठेवून दिले.सगळ्याच कंपन्यांना तो जाणत होता.कारण ते सगळेच त्याच्या क्रीमचे प्रतिस्पर्धी होते.
प्रत्येक डब्यावर मी एक टॅग लावला.ज्यात आमच्या सर्व्हेचे परिणाम लिहिलेले होते आणि प्रत्येक टॅग आपली कहाणी संक्षिप्त आणि नाटकीय रूपाने सांगत होता.
मग काय झालं? वादाला काही जागाच उरली नव्हती? हे काही तरी नवीन होतं.काहीसं वेगळ होतं.त्यांनी कोल्ड क्रीमवर लागलेल्या पहिल्या टॅगला उचललं.टॅगवर लिहिलेल्या माहितीला वाचलं आणि त्याने सगळे टॅग वाचून टाकले. मित्रत्वाची चर्चा सुरू झाली.त्यांच्या नंतर त्याने काही प्रश्न विचारले.त्यांची जिज्ञासा वाढली. त्यांनी मला गुणांबद्दल सांगायला सुरुवातीला फक्त दहा मिनिटांचा वेळ दिला होता;परंतु दहा मिनिटे संपली.वीस मिनिटे संपली.चाळीस मिनिटं संपली आणि एका तासानंतरपण आम्ही बोलतच होतो.मी या वेळी गुणांना (तथ्यांना) प्रस्तुत करत होते.जे मी पहिल्यांदा केले होते;परंतु या वेळी मी नाटकीय रूपाचा सहारा घेतला होता.त्यामुळे कितीतरी जास्त फरक पडला.