* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२०/१२/२३

माग सर्वव्यापी 'डॉपलर' चा Behind the ubiquitous 'Doppler'

वर्षभर बेकार राहिल्यावर अखेरीस लीथा नदीकाठच्या बुक या गावी एका सूतगिरणीत तो नाइलाजाने हिशोबनीस म्हणून रुजू झाला.युरोपात आपल्याजोगी नोकरी मिळणं शक्य नाही असं डॉपलरला वाटू लागले.

भाऊ योहान याच्याबरोबर डॉपलर म्युनिकला पोहोचला.

तिथे त्यांनी अमेरिकेच्या कौन्सुलरची भेट घेतली आणि अमेरिकेत नोकरी मिळू शकेल का याबद्दल चौकशी केली.

तेवढ्यात डॉपलरला त्याने आधी अर्ज केलेल्या दोन ठिकाणांहून होकार आले.बर्नमध्ये जास्त पगाराची नोकरी मिळत असूनही त्याने स्वित्झर्लंडऐवजी ऑस्ट्रियन साम्राज्यातल्या प्राग इथली कमी पगाराची नोकरी स्वीकारली.३० एप्रिल १८३५ मध्ये डॉपलर या नोकरीत रुजू झाला.त्यानंतर काही काळातच त्याला आणखी एका संस्थेत नोकरी करण्याची परवानगी मिळाली.


याच वर्षी त्याचं लग्नही झालं;पण दोन नोकऱ्या आणि प्रापंचिक जबाबदाऱ्या यांचा त्याच्या तब्येतीवर दुष्परिणाम व्हायला सुरुवात झाली.कार्ल क्रील या खगोलशास्त्रज्ञाने डॉपलरच्या मृत्यूनंतर व्हिएन्नास्थित इंपीरियल ॲकॅडमी ऑफ सायन्सेसच्या प्रधान सचिवांना लिहिलेल्या पत्रात डॉपलरच्या खालावत चाललेल्या प्रकृतीची माहिती कळते हे पत्रही इडन यांना पाहता आलं.या दोन नोकऱ्यांमध्ये डॉपलर ४०० विद्यार्थ्यांना शिकवत होता.त्याशिवाय तो खासगी शिकवण्या घ्यायचा.

प्रागमध्ये राहू लागल्यानंतर त्याने अमेरिकेत जाऊन नशीब आजमावण्याचा विचार डोक्यातून काढून टाकला.

प्रा.श्क्रोडर यांनी त्याला श्रद्धांजली वाहताना म्हटलं होतं,


'डॉपलर अमेरिकेस गेला असता तर कदाचित अधिक जगला असता.त्याच्या मृत्यूची बीजं प्रागमधल्या अतिश्रमात रोवली गेली.' 


त्यांचं म्हणणं एक प्रकारे खरंच होतं.अमेरिकेत त्या काळात शिक्षकांची कमतरता होती. त्यामानाने युरोपात शिक्षकांची कमतरता नव्हती. अमेरिकेत भरपूर पगार मिळत असे.तिथे डॉपलरला कदाचित कमी कष्ट उपसावे लागले असते.प्रागमध्ये असतानाच डॉपलरने पूर्णवेळ प्राध्यापकपदासाठी वेगवेगळ्या विद्यापीठांत अर्ज पाठवणं सुरू केलं.त्या काळी प्राध्यापक पदासाठी लेखी परीक्षा द्यावी लागत असे.जिथे जिथे डॉपलरने या परीक्षा दिल्या तिथे तिथे त्याला 'सर्वोत्कृष्ट' हा शेरा मिळाला;पण मुलाखतीमध्ये तो गडबडून जायचा.त्यातल्या बऱ्याच विद्यापीठांमध्ये आणि तंत्रशिक्षण महाविद्यालयांमध्ये इडन स्वतः जाऊन आले. दीडशे वर्षं झालेली असूनही या परीक्षा आणि मुलाखतीत कोण कोण परीक्षार्थी होते,कुणी कुणी त्यांच्या मुलाखती घेतल्या,तसंच त्यात कुणाला

कोणत्या कारणासाठी नकार देण्यात आला याच्या नोंदी त्यांना बघायला मिळाल्या. आपल्या भारतात हे घडू शकत का,असा सहज विचार हे वाचताना मनात डोकावल्या

शिवाय राहत नाही.


१८३७ मध्ये दोन घटना घडल्या.डॉपलरला रॉयल बोहेमियन सोसायटीचा सहसदस्य म्हणून निवडण्यात आलं.त्याच वर्षी त्याचा एक शोधनिबंध या संस्थेच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाला.त्यानंतर १८३९-४० या वर्षी पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी डॉपलरला त्याचं एक पोर्ट्रेट त्याच्या सन्मानार्थ भेट दिलं.डॉपलरचं ते शिळा प्रेसवरचं चित्र आणि त्याला मिळालेलं मानपत्र वगैरे सर्व गोष्टी त्याच्या वंशजांनी अजूनही जपून ठेवल्या आहेत.प्रागमध्ये १८४१च्या मार्च महिन्यात डॉपलर (पूर्ण) प्राध्यापक बनले.त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये वाढ झाली.

शिवाय ते 'रॉयल बोहेमियन सोसायटी ऑफ सायन्सेस'चं काम हौसेने करत होते. 'वाढतं काम आणि जबाबदाऱ्यांमध्ये सोसायटीचं काम हाच त्यांचा विरंगुळा होता',असं डॉपलरनंतर प्रागच्या तंत्रशिक्षण संस्थेत प्राध्यापक बनलेल्या आयव्हान स्टोलनी लिहून ठेवलं आहे.संस्थेतील काम संपलं की डॉपलर प्रयोगशाळेत परतून प्रकाशशास्त्रातील प्रयोग सुरू करत.प्रकाशाच्या साहाय्याने दूरच्या वस्तूंचं अंतर मोजण्याची पद्धत त्यांनी या काळात शोधली.प्रकाश अवगमनाचा अभ्यास केला, ध्वनीच्या अवगमनावर संशोधन केलं.या अवगमनात माध्यमाचा परिणाम किती हे बघितलं.छायाचित्रणाचा खगोलवेध घेण्याकरता उपयोग करता येईल,यासंबंधी टिपणं लिहिली. प्रकाश आणि दृष्टिसातत्याचा (स्ट्रोबोस्कोपिक इफेक्ट) पुनर्शोध लावला.(याआधी प्लेटो आणि स्टँफरनी त्यावर भाष्य केलं होतं.) याशिवाय विद्युतशास्त्र, भूवास्तवशास्त्र आदी इतर विषयांचाही त्यांनी अभ्यास केला.कार्ल क्रील यांनी डॉपलरच्या मृत्यूनंतर लिहिलं- 'त्यांना त्यांचं कुठलं संशोधन अधिक महत्त्वाचं वाटत होतं हे सांगणं अवघड आहे.डॉपलर कधीच कुणाशी फारसं बोलत नसत.मात्र,जे संशोधन जास्त आव्हानात्मक असेल त्यात त्यांना अधिक आनंद मिळत असावा असं वाटतं. डॉपलर यांच्या डोक्यात एखादी कल्पना आली की ती ते लगेच प्रसिद्ध करून टाकत.त्या कल्पनेचा विकास करून त्यावर प्रयोग करून ती पूर्णत्वाला गेल्यानंतर त्यांनी ते संशोधन प्रसिद्ध केलं असतं तर शास्त्रज्ञ म्हणून त्यांचं नाव किती तरी आधीच पसरलं असतं.'आता आपण पुन्हा ज्याच्या उल्लेखाने लेखाला सुरुवात केली त्या डॉपलरच्या सर्वांत प्रख्यात शोधनिबंधाकडे येऊ.डॉपलरनी प्रकाशाच्या तरंगांच्या सिद्धांतावर आयुष्यभर काम केलं.'


आपल्याला जो रंग दिसतो तो स्रोताच्या स्पंदनांच्या वारंवारतेवर अवलंबून असतो.या स्पंदनांमधील अंतर वाढलं की रंग बदलतो.जर स्रोत आणि निरीक्षक दोघंही स्थिर असतील तर निरीक्षणाची आणि स्रोताकडून होणाऱ्या प्रक्षेपाची वारंवारता समान असते.जर निरीक्षक स्रोताच्या दिशेने पुढे सरकला किंवा स्रोत निरीक्षकाजवळ येऊ लागला तर ही वारंवारता वाढेल.जर दोन्हीपैकी एक दूर जाऊ लागले तर ही वारंवारता कमी झाल्यासारखी भासेल.या प्रकारच्या बदलाच्या स्पष्टीकरणासाठी डॉपलरनी जहाजाचं उदाहरण वापरलं.


'जर एखादं जहाज आपल्या दिशेने येणाऱ्या लाटांच्या दिशेने जात असेल तर त्यावर विशिष्ट कालमर्यादेत जास्त लाटा जास्त जोरात आपटतील,याउलट तेच जहाज जर लाटांच्या प्रगतीच्या दिशेनेच पुढे सरकत असेल तर तेवढ्याच वेळात त्या जहाजावर कमी लाटा कमी जोराने आदळतील. जर पाण्यातील लाटांमध्ये असं घडतं तर हेच तत्त्व हवा आणि इतर माध्यमांनासुद्धा लागू पडायला हवं.'हाच तो डॉपलर परिणाम सांगणारा शोधनिबंध.


या शोधनिबंधाची मूळ प्रत इडन यांनी कशी शोधली याची हकीकतही मोठी रोचक आहे. सुरुवातीला इडन यांना पुस्तकात छापण्यासाठी या शोधनिबंधाची छायाचित्रित प्रत व्हिएन्ना विद्यापीठाकडून मिळाली होती,पण त्यांचं एवढ्याने समाधान झालं नव्हतं.ते सॉल्झबुर्ग विद्यापीठाच्या ग्रंथालयात पोहोचले.ग्रंथालयाच्या यादीत डॉपलरच्या मूळ शोधनिबंधाची प्रत आहे,असं त्या यादीतून स्पष्ट होत होतं.त्या काळात डॉपलर जर्मनीत राहत असल्याने तिथला पत्ता त्यांनी दिला होता.इडनना दुसऱ्या दिवशी डॉपलरच्या मूळ शोधनिबंधाची प्रत घरी नेण्यासाठी मिळाली.'ती प्रत घरी आणून मी उघडली.

डॉपलर यांच्या हस्ताक्षरातील ती प्रत पाहताच मी शहारलो',असं इडन नमूद करतात. पुस्तकात समाविष्ट करण्यासाठी त्यांनी त्या प्रतीची छायाचित्रं काढली आणि डॉपलरशोधात रस असलेल्यांनाही ती प्रत आवर्जून दाखवली. आणखी एक गंमत म्हणजे नंतर इडन आणि त्यांच्या मुलाने डॉपलरच्या मूळ शोधनिबंधाचा अनुवाद करेपर्यंत या निबंधाचा इंग्रजी अवतार प्रसिद्ध झाला नव्हता.पुढे या शोधनिबंधाच्या सर्व पानांची छायाचित्रं असलेलं डॉ.अलेक इडन लिखित डॉपलरचं चरित्र नोव्हेंबर १९८८ मध्ये प्रसिद्ध झालं.या पुस्तकाची प्रत घेऊन इडन सॉल्झबुर्ग विद्यापीठाच्या ग्रंथालयात पोहोचले.ग्रंथपालांचे आभार मानत त्यांनी मूळ शोधनिबंध आणि त्यांच्या पुस्तकाची प्रत ग्रंथपालांना दिली.तेव्हा ग्रंथपाल म्हणाले,"तुम्ही इथून गेलात की हा शोधनिबंध मी दुर्मिळ पुस्तकांच्या विभागात समाविष्ट करणार आहे.त्याचं महत्त्व लक्षात आणून पुस्त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो." पुढे इडन यांचं पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर काही काळातच त्यांना या शोधनिबंधासंबंधी आणखी एक अमूल्य ठेवा पाहायला मिळाला.झेकोस्लोव्हाकियन ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने इडनना व्याख्यानासाठी बोलावलं.त्यांच्या पुराभिलेखागारात इडनना संदर्भ बघण्याची परवानगी देण्यात आली.तिथे डॉपलर यांनी शोधनिबंध सादर केलेल्या सभेचा वृत्तान्त इडन यांना वाचायला मिळाला.या वृत्तान्तावर २५ जून १८४२ अशी तारीख घातलेली होती.तिथे जून खोडून वरच्या बाजूला 'मे' अशी दुरुस्ती केली होती.त्या एक पानी वृत्तान्तानुसार या सभेला फक्त पाच व्यक्ती हजर होत्या.


इकडे १८४४ च्या उन्हाळ्यामध्ये डॉपलर यांची प्रकृती झपाट्याने ढासळू लागली.त्यांना उपचारांसाठी सॉल्झबुर्गला जायचं असल्यामुळे त्या वर्षी त्यांनी विद्यार्थ्यांची परीक्षा जरा लवकरच घेतली.तोंडी परीक्षेलाही फाटा दिला.त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना फारच कमी गुण मिळाले.पालकांनी विद्यापीठाकडे तक्रार केली. विद्यापीठाने तो निकाल रद्द करून चौकशी समिती नेमली.या प्रकारामुळे वैतागलेल्या डॉपलरनी प्राग सोडायचा निश्चय केला.ती संधी त्यांना १८४७ साली मिळाली. शेमनित्झ (आता बान्स्का स्टाव्हनिका) इथल्या अकॅडमी ऑफ मायनिंग अँड फॉरेस्ट्रीमध्ये गणिताच्या प्राध्यापकपदी त्यांना नेमणूक मिळाली; पण शेमनित्झचा मुक्काम त्यांना मानवला नाही.त्या वेळी हंगेरीत राजसत्तेविरुद्ध उठाव झाला होता. क्रांतिकारक आणि राजनिष्ठ सैनिक यांच्यात सतत लढाया चालू होत्या.रीही इडन यांना डॉपलरनी लिहिलेली आणि त्यांच्या नावे आलेली सर्व पत्रं बघता आली हे विशेष.

१८४८ च्या अखेरीस डॉपलरना व्हिएन्नाच्या तंत्रविज्ञान संस्थेत प्राध्यापकपद मिळालं.इथे डॉपलर यांच्यावर प्रशासकीय कामाचाही भार होता. त्यामुळे आधीच तब्येतीच्या तक्रारींनी त्रस्त असलेल्या डॉपलरची प्रकृती खालावू लागली. त्यातच डॉपलर परिणामाच्या सत्यतेवर आक्षेप घेणाऱ्यांची संख्या वाढत होती.त्यांना डॉपलर निरुत्तर करत होते हे खरं;पण सर्व कामं सांभाळून रात्री उशिराने या विरोधकांना उत्तर देण्याचं काम चाले.या काळात डॉपलरना एक शिष्य मिळाला.त्याचं नाव ग्रेगॉर मेंडेल.पुढे हा अनुवंशशास्त्रज्ञ म्हणून गाजला.डॉपलर रोज दोन तास त्याला पदार्थविज्ञानाचे धडे देत असत.

१८५२ च्या पूर्वार्धात डॉपलरनी जोसेफ पेट्झवाल यांनी केलेल्या टीकेला उत्तर देणारे दोन निबंध लिहून हातावेगळे केले.हे त्यांचे अखेरचे शोधनिबंध ठरले. 


ऑक्टोबर १८५२ रोजी शिक्षण मंत्रालयाने डॉपलरना सहा महिन्यांची वैद्यकीय रजा मंजूर केली.लोंबार्डी-व्हेन्झी या इटलीमधील संस्थानात डॉपलर उपचारांसाठी दाखल झाले.इथेसुद्धा बराच खटाटोप करून डॉपलरचं निधन नक्की कधी आणि कुठे झालं याबाबतची कागदपत्रं इडन यांनी शोधली.डॉपलर यांच्या अखेरच्या दिवसांचा घटनाक्रम शोधणं सोपं नव्हतं.डॉपलर व्हेनिसमध्ये वारले,

यापलीकडे त्यांच्या अखेरच्या दिवसांची कुणालाच माहिती नव्हती.एवढंच काय,त्यांची कबरही सापडत नव्हती.त्यामुळे आपण लिहिलेल्या पहिल्या चरित्रात चुकीची माहिती असल्याचं इडन मोकळ्या मनाने कबूल करतात.इडन यांनी शोधलेल्या कागदपत्रांनुसार व्हेनिसमध्येच १७ मार्च १८५३ रोजी पत्नीच्या मांडीवर डोकं ठेवून डॉपलरनी अखेरचा श्वास घेतला.


डॉ.इडन हे खरं तर एक नामांकित मेंदू आणि चेतासंस्था तज्ज्ञ.त्यांच्याकडे शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची रांग लागलेली असे.त्यांनी आपलं काम बाजूला ठेवून डॉपलर यांचा शोध घेत फिरण्याचं खरं तर काही कारण नव्हतं.पण आपण ज्या माणसाच्या मूलभूत संशोधनावर आधारित तंत्रज्ञानाचा वापर करतो आहोत त्याची ओळख जगाला करून दिली पाहिजे,

या एका कर्तव्यभावनेतून त्यांनी पार पाडलेली शोधयात्रा केवळ अतुलनीय !


आकर्षित झालेला आत्मा रसातळाकडे झुकला,तो अज्ञानाच्या साहसासाठी आसुसला.- श्री.अरबिंदो


१९.१२.२३ या लेखातील दुसरा व शेवटचा भाग


१८/१२/२३

सर्वव्यापी 'डॉपलर' चा / Behind the ubiquitous 'Doppler'

ॲलेक इडन ..


विज्ञानातील अनेक संकल्पनांचा शोध भारतातच लागला,असे दावे केले जातात.पण त्या संकल्पनांचं मूळ शोधत पुरावे गोळा करण्याचे कष्ट आपल्या कोणी इतिहासप्रेमीने घेतल्याचं ऐकिवात नाही.या पार्श्वभूमीवर परदेशातला एखादा शास्रज्ञ उठतो आणि परक्या देशातल्या भलत्या ज्ञानशाखेच्या शास्त्रज्ञाचं मूळ शोधत फिरतो,ही गोष्ट केवळ अजब म्हणायची


२५ मे १८४२ हा दिवस विज्ञानाच्या क्षेत्रातील एक अविस्मरणीय दिवस मानला जायला हवा. त्या दिवशी एका पाथरवटाच्या मुलाने प्रागमधील रॉयल बोहेमियन सोसायटीच्या सभेत एका शोधनिबंधाचं वाचन केलं.त्या निबंधाचं शीर्षक होतं,'ऑन द कलर्ड लाइट्स ऑफ द डबल स्टार्स अँड सर्टन अदर हेवनली बॉडीज'. शोधनिबंध वाचणाऱ्या तरुण शास्त्रज्ञाचं नाव होतं क्रिस्तियान डॉपलर हा शोधनिबंध दीडशे वर्षांनंतरही विज्ञानात एक महत्त्वाचा टप्पा मानला जाईल असं त्या काळात स्वतः डॉपलरलासुद्धा वाटलं नसेल!


'द्वैती तारे आणि इतर आकाशस्थ पिंडांच्या रंगीत प्रकाशाविषयी' असं अवघड नामाभिधान मिरविणाऱ्या या सिद्धांतात आज ज्याला 'डॉपलर तत्त्व' असं म्हटलं जातं ती संकल्पना अतिशय सोप्या भाषेत मांडलेली होती.या संकल्पनेचा उपयोग पुढे संरक्षण साधनांमध्ये उपयुक्त ठरलाच;पण त्याखेरीज खगोलशास्त्र, पदार्थविज्ञान,

दिशादर्शन,भूशास्त्र आणि मुख्यतः वैद्यकाच्या अनेक शाखांनी या डॉपलर परिणामाचा फायदा करून घेत प्रगती केली. वैद्यकशास्त्रात 'डॉपलर सोनोग्राफी' हा शब्द परवलीचा बनला आहे.प्रसूतिशास्त्रात गर्भाच्या आरोग्याची देखरेख करण्यासाठी ते आज अनिवार्य साधन आहे.याशिवाय हृदयविकार, रक्तवाहिन्यांचे विकार,मेंदू आणि चेतासंस्थेचं रोगनिदान,तसंच शस्त्रक्रिया अशा अनेक ठिकाणी डॉपलर परिणाम कळीचं काम करतो आहे.त्यामुळेच आज सर्वसामान्यांच्या तोंडीही 'डॉपलर सोनोग्राफी' हा शब्द सहज ऐकू येतो. पण हा डॉपलर कोण होता,असं विचारलं तर आपल्या सर्वांचीच बोलती बंद होऊन जाईल. जगभरात;एवढंच नव्हे,तर डॉपलरच्या मायदेशी- ऑस्ट्रियातही १९८८ पर्यंत डॉपलर जवळपास विस्मरणात गेला होता.डॉपलरच्या संकल्पना वापरल्या जात होत्या;पण त्याचा इतिहास मात्र जग विसरलं होतं.


तो इतिहास पहिल्यांदा जगासमोर आणला तो ॲलेक इडन या अमेरिकी न्यूरोसर्जनने प्रा.इडन आपल्या कामात डॉपलर तंत्रज्ञानाचा वापर करत होते.त्याचा वापर करून अत्याधुनिक तंत्र विकसित करण्यातही त्यांचा हातभार होता.उदा.गर्भावस्थेत मेंदूला व्यवस्थित रक्तपुरवठा न झाल्याने गर्भात दोष तयार होतो आणि परिणामी गर्भ दगावतो.गर्भ दगावण्याच्या एकूण घटनांमध्ये अशा घटनांचं प्रमाण तब्बल पाच टक्के होतं.हे प्रमाण कमी करता यावं यासाठी इडन यांच्यासह अन्य दोन संशोधकांनी सोनोग्राफी आणि डॉपलर परिणाम एकत्र करून एक नवं तंत्र विकसित केलं होतं.या तंत्राबद्दल व्याख्यान देण्यासाठी इडन यांना डल्लास बेधील टेक्सास विद्यापीठाच्या संशोधन केंद्रातून आमंत्रण आलं होतं.डॉ.कॅप क्लार्क या इडन यांच्या गुरूंनीच ही व्याख्यानमाला आयोजित केली असल्याने ते आमंत्रण स्वीकारणं इडन यांना भाग होतं.व्याख्यान त्यांनी विकसित केलेल्या नव्या तंत्राबद्दल द्यायचं असलं तरी त्याची सुरुवात डॉपलर तंत्राबद्दल आणि डॉपलर या शास्त्रज्ञाबद्दल माहिती देऊन करावी,असं इडन यांच्या मनात आलं.डॉपलरबद्दल माहिती सांगून त्याच्या संशोधनातून नवनवीन तंत्रं कशी विकसित होत गेली हे सांगणं आपलं कर्तव्य आहे असं त्यांना वाटत होतं.म्हणून त्यांनी डॉपलरबद्दल माहिती काढायला सुरुवात केली. लवकरच त्यांच्या लक्षात आलं की डॉपलरचं खरं नाव आणि जन्मतारखेपासूनच माहितीत गोंधळ आहे.त्याचं जन्मगाव,जन्मतारीख आणि जन्मनाव याबाबत एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकासह इतर चार मान्यवर संदर्भग्रंथांमधील माहितीत ताळमेळ नव्हता. काही ठिकाणी डॉपलरचं नाव योहान क्रिस्तियान डॉपलर असं होतं,तर इतरत्र ते क्रिस्तियान योहान तेच जन्मतारखेबद्दल काही ठिकाणी डॉपलरचा जन्म सॉल्झबुर्ग इथे १८०३ मध्ये झाला,अशी माहिती मिळत होती,तर इतरत्र हे वर्ष १८०५ किंवा १८०८ असंही नोंदवलेलं होतं. त्याचं वर्णन कुठे जर्मन पदार्थवैज्ञानिक आणि गणिती असं केलं गेलं होतं,तर कुठे त्याची नोंद ऑस्ट्रियन पदार्थवैज्ञानिक अशी होती.असाच घोळ त्याच्या मृत्यूच्या स्थळाबद्दल आणि तारखेबद्दलही होताच.त्याचा मृत्यू व्हेनिसमध्ये झाला,असं बहुतेक माहितीस्रोतांचं म्हणणं असलं तरी तो व्हिएन्ना किंवा प्रागमध्ये मरण पावला,अशीही माहिती उपलब्ध होती.दुसरीकडे इडन आपल्या विद्यार्थिदशेपासून जो वैद्यकीय शब्दकोश वापरत होते त्यात डॉपलर परिणामाला अमेरिकन गणिती क्रिस्तियान डॉपलर (१८०३- १८५३) यांचं नाव देण्यात आलं होतं. दुसऱ्या एका विश्वकोशात डॉपलरचं वर्णन 'ऑस्ट्रियात जन्मलेला गणिती आणि पदार्थवैज्ञानिक' असं होतं.मात्र,त्यापुढे त्याने अमेरिकेत राहून केलेल्या कार्याबद्दल माहिती होती,पण डॉपलरच्या अमेरिकेतल्या वास्तव्याबद्दलची माहिती इडन यांना कुठेच आढळली नाही.चार-पाचशे वर्षांचा (गोरा) इतिहास प्राणपणाने जपणाऱ्या अमेरिकेत कुठेही डॉपलरचं स्मारक किंवा त्याच्या नावाची एकही संस्था नाही हे कसं,हा प्रश्नही इडनना सतावू लागला.


त्यामुळे व्याख्यानाची तयारी बाजूला ठेवून इडन यांनी चक्क डॉपलर यांची माहिती काढण्यासाठी अभ्यास रजा घेऊन युरोपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.सॉल्झबुर्ग,

व्हिएन्ना,प्राग आणि व्हेनिस ही चार शहरं डॉपलरच्या इतिहासाशी जोडलेली होती.ही शहरं प्रख्यात असली तरी ती पर्यटनाच्या दृष्टीने डॉपलरशी संबंधित ठिकाणांचे पत्ते शोधून तिथल्या रहिवाशांकडून दोनशे वर्षांपूर्वी वास्तव्यास असलेल्या एका जवळजवळ अप्रसिद्ध माणसाची माहिती मिळवणं हे सोपं काम नव्हतं.

प्रत्येक ठिकाणी त्यांना आश्चर्याचे धक्के बसत होते.काहींनी डॉपलर हे नाव ऐकलं होतं खरं,पण त्यापलीकडे त्यांना डॉपलरची काहीच माहिती नव्हती.

'डॉपलर? म्हणजे तो पदार्थवैज्ञानिक? तो सॉल्झबुर्गचा होता होय ? असेल असेल!' 'डॉपलर परिणाम ? हो,शाळेत काही तरी शिकलोय,पण आता त्याबद्दल काही आठवत नाही बुवा!'अशा प्रतिक्रिया त्यांना ऐकायला मिळत होत्या

बहुतेकांनी डॉपलर हे नाव 'सोनोग्राफी'च्या संदर्भात ऐकलं होतं.फक्त एकानेच 'हवामानाच्या अंदाजात त्याचा उपयोग करताहेत म्हणे!' अशी प्रतिक्रिया दिली.पण तरीही इडन यांनी नेटाने डॉपलरबद्दल माहिती असणारी मंडळी शोधून काढली.या सर्वांनी मिळून उपलब्ध माहितीच्या आधारे डॉपलरचं एक छोटेखानी चरित्र लिहिलं होतं.इडन यांच्या व्याख्यानासाठी तेवढी माहिती पुरेशी होती.पण अजूनही त्या चरित्रात अनेक गाळलेल्या जागा होत्या.व्याख्यान पार पडलं, पण इडनना स्वस्थता लाभेना.ते पुन्हा एकदा युरोपात दाखल झाले.त्यांचा पहिला मुक्काम होता सॉल्झबुर्गला. सॉल्झबुर्गमध्ये डॉपलर ज्या घरात जन्माला आला तिथे दर्शनी भागात त्याच्या नावाची फरशी बसवण्यात आल्याचा संदर्भ इडन यांना नगरपालिकेच्या दफ्तरी सापडला.'१९०३ मध्ये डॉपलरच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ही फरशी बसवण्यात आली होती. 'डॉपलरच्या जन्मशताब्दीचं स्मरण कुणाला झालं याची माहिती मात्र उपलब्ध झाली नाही',असे डॉ.इडन लिहितात.ते घर 'डॉपलर हाऊस' म्हणून कुणालाच ठाऊक नव्हतं.त्याची ओळख गेली शंभराहून अधिक वर्ष तिथे राहणाऱ्या 'जेझेल्सवर्गर' यांचं घर म्हणूनच होती. जेझेल्सबर्गर कुटुंब सॉल्झबुर्गमधलं एक मोठं व्यापारी कुटुंब होतं.त्यांनी एकोणिसावं शतक सरता सरता ते घर विकत घेतलं होतं.युद्ध संपलं तेव्हा त्याची मालकी फ्राऊ लिझेलोट्टे जेझेल्सबर्गर लानिक यांच्याकडे होती.युद्धात त्या घराचं नुकसान झाल्यामुळे ते पाडायचं ठरत होतं;पण फ्राऊ लिझेलोटेंनी तसं घडू दिलं नाही. इडन त्यांना भेटले तेव्हा त्या पंचाहत्तरीच्या होत्या.घर वाचवण्यासाठी त्या खूप झगडल्या होत्या.ते घर ज्या चौकात आहे त्या चौकालाही डॉपलरचं नाव दिलेलं नाही.तो चौक हान्स माकार्ट प्लाट्झ म्हणून प्रसिद्ध होता. सॉल्झबर्गमध्ये क्रिस्तियान डॉपलरचं नाव दिलेली केवळ एक गल्ली अस्तित्वात होती;तीही शहराच्या आडबाजूला.१९०३ मध्ये डॉपलरची जन्मशताब्दी साजरी करण्यात आली त्या वेळी प्रागमध्ये त्याच्या शोधनिबंधांचा एकत्रित संग्रह तसंच त्याच्या वैज्ञानिक कार्याचं महत्त्व सांगणारं परिशिष्ट असलेला ग्रंथ प्रसिद्ध करण्यात आला होता,याचा शोध इडन यांना या मोहिमेत लागला. त्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत प्रा.एफ.जे. स्टुडनिक यांनी म्हटलं होतं,'मोझार्टमुळे प्रसिद्ध असलेल्या त्या शहरात (सॉल्झबुर्ग) डॉपलरच्या कीर्तीला साजेलसं स्मारक होईल अशी आशा करू या. साल्झाक नदीच्या काठच्या त्या रम्य शहरात शंभर वर्षांपूर्वी एका सामान्य पित्याच्या पोटी जन्मलेल्या या असामान्य पुत्राची त्याच्या जन्मगावाने योग्य ती दखल घ्यायला हवी.'

यानंतर इडन जसजसे डॉपलरबद्दलची माहिती खोदत गेले तसतसे त्यांना एकावर एक धक्के बसू लागले.

खाणींमधला संगमरवर काढून त्याच्या वस्तू बनवणाऱ्या पाथरवट डॉपलर घराण्यातील इतर सदस्यांची सॉल्झबुर्गमध्ये भरपूर माहिती उपलब्ध होती,पण एखाद्या नामांकित घराण्यातील वाया गेलेल्या मुलाचा उल्लेख जसा टाळला जातो,तशी परिस्थिती शास्त्रज्ञ डॉपलरबाबत होती.डॉपलर कुटुंब मूळचं ऑस्ट्रिया-बव्हेरियाच्या सीमाप्रदेशातलं.ते १६७० मध्ये सॉल्झबुर्गजवळच्या वीहॉस्सेन या खेड्यात आलं.त्याच वर्षी तिथल्या चर्चमध्ये अँड्रियस डॉपलरचा मारियाशी विवाह झाल्याची नोंद सापडते.हा अँड्रियस ग्रॉसगमेन इथल्या ॲडम टॉपलरचा मुलगा.ही मंडळी आधी टॉपलर असं आडनाव लावत.

ॲडम हा शेतकरी होता.ॲडम टॉपलरचं कुटुंब १६३५ सालच्या प्लेगच्या साथीत गेलं होतं.त्याने वडिलोपार्जित शेती करायला सुरुवात केली,तरी अँड्रियसला संगमरवरी मूर्ती बनवण्याची कला अवगत होती. ॲडम टॉपलरच्या वडिलांचं नाव लिओनहार्ट टॉपलर,त्यांचा पहिला उल्लेख ग्रॉसगमेन इथे १६०५ मध्ये आढळतो.

वीहॉस्सेनला आल्यावर टॉपलर हे नाव डॉपलर झालं.

डॉपलर कुटुंबीयांच्या वंशवृक्षाची माहिती इडन यांनी अतिशय तपशिलात नोंदवली आहे.त्यावरून त्यांनी किती परिश्रमपूर्वक आणि खोलात जाऊन काम केलं होतं हे स्पष्ट होतं,त्याचप्रमाणे युरोपमध्ये जुन्या नोंदी किती काळजीपूर्वक ठेवल्या जातात हेही दिसून येतं.१६७५ मध्ये दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर अँड्रियस आणि मारिया यांचा मुक्काम हिम्मेलराइश या नव्या वसाहतीत हलला.

तिथे १६७७ मध्ये त्यांना मुलगा झाला- जॉर्ज.या जॉर्जचा पणतू म्हणजे क्रिस्तियान,१७९२ मध्ये या मूर्तिकारांच्या घराण्यातल्या योहान इव्हेंजेलिस्ट डॉपलरचं थेरेसा सिल्युस्तर हिच्याशी लग्न झालं. या जोडप्याचं तिसरं अपत्य २९ नोव्हेंबर १८०३ या दिवशी सकाळी अकराच्या ठोक्याला जन्माला आलं.तो क्रिस्तियान.या मुलाला डॉपलर कुटुंबाच्या छिन्नी- हातोडा या पारंपरिक अवजारांपेक्षा कागद,दौत,टाक या साधनांमध्ये जास्त रस होता.लहानपणी क्रिस्तियान सतत आजारी पडत असे.

त्यामुळे तो अतिशय अशक्त होता.मूर्तिकला हे तसं ताकदीचं काम असल्यामुळे तो त्या कामापासून दूरच राहिला. प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर वडिलांनी क्रिस्तियानला सॉल्झबुर्ग इथल्या जर्मन शाळेत पाठवलं.

त्याला लहानपणापासूनच गणिताचं वेड होतं.या जर्मन शाळेत त्याचा हा कल ओळखू येऊ लागला आणि तिथूनच क्रिस्तियानच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.


१८२२ मध्ये डॉपलरला पुढील शिक्षणासाठी व्हिएन्नाला पाठवण्यात आलं.व्हिएन्ना येथील बहुउद्देशी तंत्रवैज्ञानिक संस्थेतल्या नोंदी इडन यांना बघायला मिळाल्या.डॉपलर हा अभ्यासू, कष्टाळू,प्रामाणिक विद्यार्थी असल्याची नोंद या शाळेच्या दप्तरी आढळते.पण डॉपलरला मात्र इथलं शिक्षण रुचत नव्हतं.ते चाकोरीबद्ध आणि एकसुरी असल्यामुळे तो पुन्हा सॉल्झबुर्गला परतला.त्याचं प्रगतिपुस्तक पाहून डॉपलरला इतरांपेक्षा कमी काळात इथला अभ्यासक्रम पूर्ण करण्याची खास परवानगी देण्यात आली होती असं लक्षात येतं.या काळात डॉपलर स्थानिक रुपर्ट महाविद्यालयात पदार्थविज्ञान आणि गणितावर व्याख्यानं देत असे,एवढी प्रगती त्याने केली होती. शिवाय त्यातून त्याच्या शिक्षणाचा खर्च भागवला जात होता ते वेगळंच.त्या काळी पदवीसाठी तत्वज्ञान विषय शिकणं सक्तीचं असे. तत्त्वज्ञान शिकता शिकता डॉपलरने फ्रेंच, इटालियन आणि इंग्रजी भाषाही शिकून घेतल्या. याच काळात डॉपलर कविता करू लागला होताच,पण त्याच ललित लेखनही प्रसिद्ध होऊ लागलं होतं.यातल्या काही कविता आणि लेखनाचे नमुने डॉपलरचा नातू ॲडॉल्फने जपून ठेवले आहेत,असं इडनना या शोधाशोधीत कळलं.अर्थातच इडन यांनी ॲडमडॉल्फना गाठलं.ॲडॉल्फ यांनी जे निबंध जपून ठेवले होते त्यातला एक इडनना महत्त्वाचा वाटला.तो म्हणजे, 'ऑन अ स्ट्रेंज कॅरॅक्टरिस्टिक ऑफ द ह्युमन आय'. हा निबंध १८२५ ते १८२८ दरम्यानचा असावा.

सॉल्झबुर्गमधलं शिक्षण संपल्यावर १८२९ मध्ये डॉपलर सहाय्यक व्याख्यातापदावर व्हिएन्नाच्या तंत्रशिक्षण संस्थेत रुजू झाला.डॉ.इडनही व्हिएन्नातल्या या संस्थेत पोहोचले.

तिथेही डॉपलरसंबंधी बरीच कागदपत्रं तपासता आली.

डॉपलरने या तंत्रशिक्षण संस्थेत शुद्ध गणितातल्या सहायक व्याख्यातापदासाठी अर्ज केला होता.

(हटके भटके-निरंजन घाटे-समकालीन प्रकाशन)


तिथले गणिताचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख यांनी डॉपलरसह एकूण चारजणांची मुलाखत घेतली.डॉपलरबद्दल त्यांनी हा शेरा लिहिला आहे- 'डॉपलरने एक वर्ष सॉल्झबुर्गमध्ये लॅटिन शिकण्यात घालवलं, त्यामुळे त्याचा गणिताशी वर्षभर संबंध तुटलेला आहे.त्यामुळे तो व्याख्यातापदाला न्याय देऊ शकणार नाही.'त्या फायलीत डॉपलरला मिळालेल्या पहिल्या नकारपत्राची प्रतसुद्धा जपून ठेवलेली आहे.


जून १८२९ मध्ये डॉपलरने त्याच संस्थेतील प्राध्यापक ॲडाम फॉन बुर्ग यांच्याकडे पुन्हा एक अर्ज पाठवला.

फॉन बुर्गनी डॉपलरला सॉल्झबुर्ग इथे तो लॅटिन शिकत असतानाही गणिताचे पाठ दिले होते.फॉन बुर्गनी डॉपलरची आपला सहायक म्हणून नेमणूक केली.पगार होता.प्रतिवर्षी ६०० गिर्ड्स आणि घरभाडे भत्ता ६० गिर्ड्स.शिवाय त्याला काही शिकवण्या घेण्याची परवानगीही मिळाली.ही नेमणूक दोन वर्षांसाठी होती. १८३१ मध्ये त्याला आणखी दोन वर्षांसाठी याच पदावर नेमणूक मिळाली. याच काळात डॉपलरने आपला पहिला शोधनिबंध प्रसिद्ध केला. 'अ काँट्रिब्युशन टु द थिअरी ऑफ पॅरलल्स' असं या निबंधाचं शीर्षक होतं. पुढच्या वर्षी त्याचा स्थिरविद्युतनिर्मिती मागचं तत्त्व मांडणारा शोधनिबंधही त्याच तंत्रनिकेतनाच्या वार्षिक अंकात प्रसिद्ध झाला. डॉपलरच्या नेमणुकीची मुदत संपत आली तेव्हा त्याने नोकरीसाठी वेगवेगळ्या संस्थांमध्ये अर्ज करायला सुरुवात केली;पण त्याला नवी नोकरी मिळत नव्हती.


उर्वरित भाग २१.१२.२३ या लेखामध्ये..


१६/१२/२३

लोकांना त्यांचा आत्मसन्मान राखू द्या! Let people keep their self respect!

अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.जनरल इलेक्ट्रिक कंपनीला चार्ल्स स्टीनमेट्जला विभाग प्रमुखाच्या पदावरून काढायचे नाजूक काम करायचे होते.स्टीनमेट्ज वीजेच्या कामात तरबेज होता,पण कॅलक्युलेटिंग विभागाच्या प्रमुखाच्या रुपात अपयशी ठरला होता.पण कंपनीला त्याला नाराजही करायचे नव्हते.तो खूप कामाचा माणूस होता आणि संवेदनशीलही म्हणून त्यांनी त्याला एक नवीन पद दिले.त्यांनी त्याला जनरल इलेक्ट्रिक कंपनीचा कंसल्टिंग इंजिनियर बनवले. त्याचे काम तेच होते जे तो आता करत होता, तरी त्याचे पद बदलले होते आणि यानंतर त्याच्या जागी दुसऱ्या माणसाला विभागप्रमुख बनवलं गेलं.स्टीनमेट्ज खुश होता.जी. ई. कंपनीचे अधिकारीही खुश होते.त्यांनी आपल्या संवेदनशील अधिकाऱ्याला नाराज केल्यावाचून विभाग प्रमुखाच्या पदावरून हटवून दिलं होतं आणि त्याचा आत्मसन्मान राखू दिला होता.मित्र जोडा,डेल कार्नेगी,अनु-कृपा कुलकर्णी,मंजुल पब्लिशिंग हाऊस लोकांना त्यांचा आत्मसन्मान राखू द्या! हे कितीतरी महत्त्वपूर्ण आहे!आणि आमच्यापैकी किती कमी लोक याबाबत विचार करून ते लक्षात ठेवतात?आम्ही दुसऱ्यांच्या भावनांना आपल्या पायतळी तुडवत जातो,स्वतःची मनमानी करतो,लोकांच्या चुका काढतो,धमक्या देतो,दुसऱ्यांसमोर आपल्या मुलांवर किंवा कर्मचाऱ्यावर टीका करतो आणि कधी हा विचारच करत नाही की आम्ही त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवत आहोत.


जर आपण विचार केला,तर समोरच्या व्यक्तीचा दृष्टिकोन समजू शकतो आणि शांततेने समस्या सुटू शकते.


जेव्हा कधी आम्ही एखाद्या कर्मचाऱ्याला रागावत असू किंवा नोकरीतून काढून टाकण्याचे अप्रिय काम करत असू,तेव्हा आम्हाला हे लक्षात ठेवलं पाहिजे."कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढून टाकण्यात कोणाला मजा येत नाही.

नोकरीतून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्याला तर यात फारच कमी मजा येते." (मी इथे एका पब्लिक अकाउंटंट मार्शल रा.ग्रॅजरच्या पत्राचा अंश देतोय.) "आमचा व्यवसाय बहुतांश हंगामी आहे.म्हणून जेव्हा आयकराची गर्दी ओसरून जाते, तेव्हा आम्हाला अनेक लोकांना कामावरून काढावं लागतं.


"आमच्या व्यवसायात अशी म्हण आहे,की कुणालाच कुऱ्हाड चालवण्यात आनंद होत नाही. परिणामतःअशी परंपरा विकसित झाली आहे की या कामाला जितक्या लवकर उरकता येईल तेवढं लवकर उरकायचं आणि साधारणतःअशा तऱ्हेनं करायचं. "बसा,मिस्टर स्मिथ.

हंगाम संपला आहे आणि आता आमच्यापाशी तुम्हाला देण्यासारखं काही काम नाही.उघडच आहे की तुम्हाला पण हे ज्ञातच होतं की तुम्हाला या व्यस्त हंगामासाठी कामावर ठेवलं गेलं होतं.या लोकांवर याचा प्रभाव निराशेचा व्हायचा आणि त्यांची मानहानी केली गेली असं त्यांना वाटायचं.यापैकी बहुतेक लोक जन्मभर अकाउंटिंग क्षेत्राशी संलग्न असतात आणि ते अशा कंपनीविषयी खास आस्था बाळगत नाहीत,जी त्यांना इतक्या सामान्य प्रकारे कामावरून काढून टाकते.मी इतक्यातच असा निर्णय घेतलाय की आमच्या हंगामी कर्मचाऱ्यांना कामावरून काढताना अधिक कूटनीती आणि बुद्धीचा बापर करायला हवा.म्हणून मी हिवाळ्याच्या दरम्यान प्रत्येक माणसाकडून केल्या गेलेल्या कामाचा कसून आढावा घेऊन त्यावर चिंतन करीत असे आणि मी त्यांच्याशी अशा त-हेने बोलत असे.


"मिस्टर स्मिथ,तुमचं काम खरोखर चांगलं आहे (जर ते खरंच चांगलं असेल तर) जेव्हा आम्ही तुम्हाला नेवार्कला पाठवलं होतं तेव्हा तुमचं काम कठीण होतं.तुम्ही तिथे खूपच चांगल्या तऱ्हेने काम करून आपले कौशल्य दाखवून दिलंत. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो.

तुमच्यात क्षमता आणि योग्यता आहे.तुम्ही कुठेही काम केलंत तरी तुम्ही खूप पुढे जाल.ही कंपनी तुमच्यावर विश्वास दाखवते आणि तुम्हाला सोडूही इच्छित नाही आणि तुम्ही हे विसरू नये असे आम्हास वाटते.

परिणामी,लोक नोकरी सुटल्यावरसुध्दा चांगला अनुभव घेऊन जात.त्यांची मानहानी झाल्यासारखं त्यांना वाटत नसे. त्यांना जाणीव असे की जर आमच्याकडे त्यांच्या योग्यतेचं काम असतं तर आम्ही निश्चितपणे त्यांना काढलं नसतं आणि आम्हाला पुन्हा त्यांची गरज भासली तर ते आमच्याकडे प्रेमाने येतात.आमच्या वर्गात एका सत्राच्या दरम्यान दोन सदस्य चर्चा करत होते.


चर्चेचा विषय होता,चूक काढण्याचा नकारात्मक प्रभाव आणि समोरच्याचा आत्मसन्मान राखल्यामुळे होणारा सकारात्मक प्रभाव.हॅरिसबर्ग,पेनासिल्वानियाच्या फ्रेड क्लार्कने आम्हाला त्याच्या कंपनीतली एक घटना ऐकवली.


 "आमच्या कंपनीच्या एका प्रॉडक्शन मीटिंगमध्ये व्हाईस प्रेसिडेंट उत्पादनाच्या प्रक्रियेबद्दल एका सुपरवायझरला सरळ सरळ प्रश्न विचारत होते. त्यांचा आवाज आक्रमक होता आणि त्यांना सुपरवायझरची चूक झाली आहे हे सांगण्याचा स्पष्ट हेतू होता.तो आपल्या सहकर्मीसमोर बोलणी खाण्यापासून वाचू बघत होता,म्हणून तो सरळ उत्तरं देत नव्हता.यामुळे व्हाईस प्रसिडेंटला राग आला आणि ज्यांनी त्याला खूप रागावलं आणि त्याच्यावर खोटं बोलण्याचा आरोपही लावला.या बोलाचालीत पूर्वीचे कामाचे संबंध काही क्षणातच संपून गेले.सुपरवायजर खूपच चांगला कर्मचारी होता आणि खूप कष्टाळूही होता,पण त्या घटनेनंतर तो आमच्या कंपनीच्या काही कामाचा राहिला नाही.काही महिन्यांनी तो आमच्या कंपनीला सोडून प्रतिस्पर्धी कंपनीत काम करू लागला, जिथे तो उत्तम काम करतो आहे."आमच्या वर्गातली अजून एक सदस्या ॲना मॅजोनने तिच्या कंपनीत झालेल्या अशाच एका घटनेबद्दल सांगितलं;पण पध्दती आणि परिणाम किती वेगळे होते! मिस मॅजोन एका फूड पॅक करणाऱ्या कंपनीत मार्केटिंग स्पेशालिस्ट होती.तिला असं एक मोठं काम सोपवलं गेलं होतं ज्यात तिला एका नवीन उत्पादनाचा टेस्ट मार्केटिंग रिपोर्ट सादर करायचा होता.तिने क्लासला सांगितलं,"जेव्हा टेस्टचा अहवाल आला तेव्हा माझे धाबे दणाणले.मी योजना बनवण्यात एक मोठी चूक केली होती, ज्यामुळे मला पूर्ण चाचणी पुन्हा करावी लागली असती.एवढंच नाही,तर माझ्यापाशी मीटिंगच्या आधी ही गोष्ट बॉसला सांगण्यासाठी अवधी नव्हता.कारण ज्या मीटिंगमध्ये मला अहवाल प्रस्तुत करायचा होता,ती लगेचच सुरू होणार होती.जेव्हा मला अहवाल प्रस्तुत करण्यास सांगितलं गेलं तेव्हा मी भितीने थरथर कापत होते.मी हा निश्चय केला होता की मी अश्रू ढाळणार नाही आणि लोकांना असं म्हणायची संधी देणार नाही,की स्त्रिया जास्त भावुक असल्यामुळे मॅनेजमेंटचं काम चांगल्या त-हेनं करू शकत नाहीत.मी माझा अहवाल सारांश रूपात प्रस्तुत केला आणि म्हटलं की माझी एक चूक झाली ज्यामुळे मला पुढच्या मीटिंगच्या आधी ही टेस्ट पुन्हा एकवार करावी लागेल.मी बसले आणि मला अपेक्षा होती की यावर माझे बॉस खूप रागावतील."


परंतु त्यांनी उलट मला माझ्या कामासाठी धन्यवाद दिले.ते म्हणाले,की नवीन प्रकल्पात चूक होणं सर्वसाधारण गोष्ट आहे.ते असंही म्हणाले,की त्यांना पूर्ण खात्री आहे की मी जेव्हा पुन्हा ती चाचणी करेन तेव्हा मी सफल आणि योग्य ठरेन.कंपनीला उपयोगी ठरेल.त्यांनी आपल्या सहकाऱ्यासमोर मला आश्वस्त केलं की त्यांना माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि ते जाणतात की मी पूर्ण क्षमतेने माझं काम केलं आहे.तेसुद्धा म्हणाले की,माझ्यात क्षमता नव्हती हे कारण नसून मला कमी अनुभव होता हे खरं कारण होतं."मी मीटिंगहून परतताना आकाशात उडत होते.मी निश्चय केला की इतक्या चांगल्या बॉसवर मी कधीही खाली पाहण्याचा प्रसंग आणणार नाही." आम्ही बरोबर असलो आणि समोरचा चूक असला तरी त्याचा अहंकार

दुखावण्याचा आम्हाला काय हक्क आहे?आम्ही त्याला आपला आत्मसन्मान राखण्याची संधी का देत नाही? फ्रेंच एव्हिएशन पायोनियर आणि लेखक रूपात प्रस्तुत केला आणि म्हटलं की माझी एक चूक झाली ज्यामुळे मला पुढच्या मीटिंगच्या आधी ही टेस्ट पुन्हा एकवार करावी लागेल. मी बसले आणि मला अपेक्षा होती की यावर माझे बॉस खूप रागावतील."


"परंतु त्यांनी उलट मला माझ्या कामासाठी धन्यवाद दिले.ते म्हणाले, की नवीन प्रकल्पात चूक होणं सर्वसाधारण गोष्ट आहे.ते असंही म्हणाले, की त्यांना पूर्ण खात्री आहे की मी जेव्हा पुन्हा ती चाचणी करेन तेव्हा मी सफल आणि योग्य ठरेन. कंपनीला उपयोगी ठरेल. त्यांनी आपल्या सहकाऱ्यासमोर मला आश्वस्त केलं की त्यांना माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि ते जाणतात की मी पूर्ण क्षमतेने माझं काम केलं आहे. तेसुद्धा म्हणाले की, माझ्यात क्षमता नव्हती हे कारण नसून मला कमी अनुभव होता हे खरं कारण होतं.


"मी मीटिंगहून परतताना आकाशात उडत होते.मी निश्चय केला की इतक्या चांगल्या बॉसवर मी कधीही खाली पाहण्याचा प्रसंग आणणार नाही." आम्ही बरोबर असलो आणि समोरचा चूक असला तरी त्याचा अहंकार दुखावण्याचा आम्हाला काय हक्क आहे? आम्ही त्याला आपला आत्मसन्मान राखण्याची संधी का देत नाही? फ्रेंच एव्हिएशन पायोनियर आणि लेखक ॲटोनिया द सेंट एग्जपरीने लिहिलं होतं,


 "मला असं काही बोलायचा अधिकार नाहीए, ज्यामुळे एखाद्याच्या नजरेतून तो उतरून जाईल. या गोष्टीमुळे काही फरक पडत नाही की मी त्याच्याबद्दल काय विचार करतोय,परंतु ह्या गोष्टीने नक्की फरक पडतो की तो स्वतःबाबत काय विचार करतोय.

कुणाच्याही आत्मसन्मानाला ठेच पोहोचवणे हा मोठा अपराध आहे."


०८.१२.२३ या लेखमालेतील पुढील भाग..



१४/१२/२३

एक माणुकीची शाल.. उत्तरार्ध A manuki shawl.. Late Such

आज बाबांना सोडायला जायचं.आमची पहाटेपासूनच लगीन घाई सुरू झाली...प्रवासात जेवण लागेल म्हणून मनीषाने स्वयंपाक केला.ब्रश घेतला का ?  साबण ? टॉवेल कुठे ठेवला आहेस ?  आणि कपडे ?आम्ही एकमेकांना विचारून सामानाची पुन्हा पुन्हा खात्री करत होतो. नुसत्ती गडबड ... काय न्हवंच ! गेल्यावर बाबांना पुन्हा एकदा अंघोळ घातली आणि एकेक पांढरा शुभ्र कपडा अंगावर चढवला...बाबांचं रुपडं पालटलं.... हा नव्या रुपातला फोटो काढून बाबांना दाखवला त्यांचा स्वतःचाच विश्वास बसेना फोटो पाहून. 


त्यांना गहिवरुन आलं. मनीषाच्या डोळ्यात पाणी दिसलं.मी तिला खुणेनेच विचारलं,'काय झालं ?' 


मनीषा चे वडील म्हणजे तिचं सर्वस्व ! 

ती त्यांना तात्या म्हणते. परंतु गेल्या कित्येक महिन्यांपासून ती माहेरी जाऊ शकली नाही.


मी पुन्हा तिला खुणेनंच  विचारलं,'काय झालं ?' 


हुंदका आवरत ती एकच शब्द बोलली "तात्या"...! प्रत्येक मुलगी आपल्या वडिलांना हाक मारताना डॅडी,पप्पा,

बाबा,अण्णा,तात्या, नाना,दादा,भाऊ यापैकी अशाच एका नावाने हाक मारते ! नीट बघितलं तर हे फक्त दोन अडीच शब्द... ! पण हेच अडीच शब्द म्हणजे प्रत्येक मुलीच सर्वस्व... ! या दोन अडीच शब्दात मुलीचं आख्खं जग सामावलेलं असतं. 


या दोन-अडीच शब्दांना मायेच्या पाकात मुरवलं, खस्ता खायच्या तव्यावर जरा भाजलं,मुलगी सासरी जाताना रडला होता,त्यातल्या एका थेंबाचं मीठ टाकलं आणि घासलेल्या टाचांतुन निर्माण झालेल्या आगीत थोडं शेकलं,की तयार होतो त्या पदार्थाचं नाव म्हणजे "बाप" ! 


आमच्या दोघांच्याही आयुष्यात आजच्या दिवशी ही व्यक्ती बाप म्हणून आली ! 


निघता निघता बाबांनी मनीषाला जवळ बोलावलं,तिचे हात घेऊन स्वतःच्या कपाळाला लावले... आणि काही चिल्लर तिच्या हातात कोंबली.आणि भरल्या गळ्याने म्हणाले, 'सोहमला काहीतरी खाऊ घेऊन जा घरी बेटा, माझ्याकडे जेवढे होते ते सर्वच देतोय... !


प्रत्येक वेळेस बाबा सर्वांना सर्वच देत आले होते, आम्हालाही यावेळी सर्वच दिलं... ! ही चिल्लर कपाळाला लावुन माझ्या बॕगेत मी जपुन ठेवली आहे,मरेपर्यंत ठेवणार... ! जगातलं सगळं धन माझ्या या छोट्याशा बॕगेत सामावलं होतं...! 


आज पयल्यांदाच आपुन बी लय श्रीमंत हाय याची जाणिव झाली ! 


जायची वेळ झाली आणि इतका वेळ थांबवून ठेवलेल्या हुंदक्यांचे बांध आता मात्र  फुटले ... !


काहीवेळा बांध फुटणंच चांगलं... ! 

योग्य वेळी बांधुन ठेवतो तो बांध !


बाबांना आम्ही ताईंकडे रवाना केलं... गाडी दिसेनाशी होईपर्यंत बाबांचा हात खिडकी बाहेरून हलत होता... !


ते नजरेआड झाले... भरलेल्या डोळ्यांना पुढचं काहीच दिसेना...आमच्यासोबत एक सहृद आले होते आम्हाला आशीर्वाद द्यायला.ते निघाले,म्हणाले, डाॕक्टर येतो आता, घरी जावुन पुजा अर्चा आटोपुन आॕफिसला पळायचंय. 


त्यांना निरोप देवुन आम्ही चालु लागलो... चालता चालता,आज सकाळपासून आपण काय काय केलं याचा विचार करायला लागलो... ! बाबांना स्नान घातले म्हणजे आपल्याला आता कुठे जाऊन अभिषेक करायची गरज नाही... ! साबण लावून बाबांच्या अंगावरची घाण साफ केली, बाबा सुगंधी झाले आणि जाता जाता आमचेही हात सुगंधी करुन गेले.... चला, म्हणजे अगरबत्ती लावायची आता गरजच नाही ... ! 


बाबांना दुपारचा जेवणाचा डब्बा दिला आहे, काही फळं दिली आहेत.... अरे आपण तर नैवेद्य सुद्धा वाहिला की.... ! बाबांनी त्यांची चिल्लर आमच्या झोळीत टाकली होती...  अरे वा... आपल्याला प्रसाद सुद्धा मिळाला की ! 


जातांना आपण बाबांना वाकुन नमस्कार केला... त्यांनी दोघांच्याही डोक्यावर हात ठेवुन जवळ घेतलं होतं... अगं बघ मनिषा... म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष आशिर्वाद सुद्धा मिळाला की.... ! अरेच्च्या,आपल्याही नकळत,आपली पुजाअर्चा अगोदरच आटोपली आहे,चल पळु आता पुढल्या कामाला... !


मी टाळी घेण्यासाठी माझा हात पुढे केला, हातावर टाळी देत मनीषा ने माझा हात पकडला... सुगंधी झालेले आमचे हात एकमेकांच्या हातात घेवुन आम्ही निघालो पुढची पुजा गाठण्यासाठी .... ! 


८ सप्टेंबर २०२०


ईद मुबारक ... !


मै आपके लिए इबादत करुँ... या आप मेरे लिए पुजा करें... 


दोनो एक बराबर है... 


मै आपको भाई कहुँ... आप मुझे भाऊ कहो... 


दोनो एक बराबर है... 


मै आपको इन्सान कहुँ आप मुझे माणुस कहो 


दोनो एक बराबर है... 


आप मेरेलिए मस्जिद में दिया जलाये हम मंदीर में आपके लिए घुटने टेंके 


दोनो एक बराबर है...


मै खजुर खाऊँ... आप लड्डु खाओ...


दोनो एक बराबर है... 


मै आपको राम पुकारुँ.., आप मुझे रहीम बुलाओ


दोनो एक बराबर है... 



मनत्रयोदशी ...!!!


आज धन्वंतरी प्रकट दिन... 


धन्वंतरी म्हणजे जगातले पहिले डॉक्टर...


सर्व वैद्यांचे देव... !!!


आज शुक्रवार,आज धनत्रयोदशी सुद्धा आहे...! 


आणि आज शुक्रवार म्हणजे आमचा रक्तदान करण्याचाही  ठरलेला दिवस आहे ... ! 


सगळीकडे दिवाळीची धामधूम सुरू आहे, आपापल्या परीने प्रत्येक जण दिवाळी साजरी करीत आहे... ! दर आठवड्यातील शुक्रवार प्रमाणे आजही आमच्या भिक्षेकऱ्यांनी रक्तदान करून दिवाळी साजरी केली.एक वैद्य म्हणून धन्वंतरी ची पूजा आम्ही अशा प्रकारे साजरी केली.... !


आज म्हणे धनाचं पूजन करतात... 


आम्ही ज्यांच्यासाठी काम  करतो त्यांच्याकडे धन नाही पण सात्विक मन आहे... ! 


"धनाचं पुजणं" म्हणजे जर *धनत्रयोदशी* असेल....तर, "मनाला जपणं" ही *मनत्रयोदशी* असेल का ? "पुजणं" आणि "जपणं" ... दोन्ही शब्दांत, शब्दांची फक्त अदलाबदल  आहे... !


पण, अर्थ मात्र जमीन आसमानाइतके भिन्न... ! 


'पुजण्यामध्ये' आशिर्वादाची अपेक्षा असते...काहीतरी मागणं असतं... ! 


'जपण्यामध्ये' मागणी काहीच नसते.... असतं फक्त मनापासुन देणं... !!


मनापासुन कुणाला जपण्याची सुरुवात होते... त्याचं आख्खं आयुष्यंच मग "आशिर्वाद" होवुन जातं.... ! मागण्यासारखं काही उरतच नाही मग... !!! मागणंच संपलं तर पुजणं राहत नाही... तिथुन सुरु होतं मग जपणं... ! 


आपणांस दिवाळीच्या शुभेच्छा !!!


डाॕ.मनिषा व डाॕ.अभिजीत सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स' भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर

१२/१२/२३

15 आॕगस्ट माझाही स्वातंत्र्य दिन 15th August is also my independence day..

१५ ऑगस्ट !!! 


ही नुसती तारीख नव्हे,आपणा सर्व भारतीयांच्या मनावर सुवर्णाक्षराने कोरलेला हा अभिमानाचा दिवस ! याच तारखेला एकेवर्षी भारत स्वतंत्र झाला होता... आणि एकेवर्षी मी सुद्धा


भारत इंग्रजांच्या गुलामगिरीत होता आणि मी माझ्याच


सुरुवातीला इंटरनॅशनल कंपनीमध्ये मी महाराष्ट्र प्रमुख होतो.महिन्याचं उत्पन्न ३ ते ४लाख ! 


पण यांतही समाधानी नव्हतो ! 

भरपूर पैसे कमावणे,वर ...वर... वर जाणे ...आणखी वरचे पद मिळवणे... ! 


घर गाडी बंगला घेणे..आज महाराष्ट्र प्रमुख आहे, उद्या भारताचा प्रमुख होणे...जमलंच तर परवा जगातील काही देशांचासुद्धा प्रमुख होणे  ... !


जग जिंकायला निघालेला सिकंदर होतो मी !

फरक इतकाच,तो सिकंदर घोड्यावर होता, आणि दिडशहाणा मी...  गाढवावरहे गाढव मीच होतो आणि गाढवावर बसलेला दिडशहाणाही मीच !


एके दिवशी,आयुष्याच्या वाटेत  भेटलेल्या भीक मागणाऱ्या एका आजोबांनी या दिड शहाण्या सिकंदराची नशा उतरवली...! 


माणूस म्हणून जगण्याचे सूत्र सांगितलं... ! 


ॲलोपॅथी,होमिओपॅथी,नॕचरोपॕथी आणि इतर कुठल्याही पॕथीपेक्षा Sympathy आणि Empathy (अनुभुती आणि सह अनुभुती) या पॕथी वापरणं हे माणुस असल्याचं लक्षण असतं हे  त्यांनी माझ्यावर ठसवलं... !  वेद शिकण्यापेक्षा एखाद्याची वेदना समजून घेणं, हे वैद्य असल्याचं खरं लक्षण,हे त्यांनीच मनावर  बिंबवलं ! डोंगरावर चढणार्‍या माणसाचे पाय ओढुन त्याला पाडण्यापेक्षा, जमिनीवर पडलेल्या एखाद्या निराधाराचे हात ओढुन त्याला उभं करणं यातच खरा पुरुषार्थ असतो... पुरुषार्थाची व्याख्या नव्यानं त्यांनी मला सांगितली... !


ते खरंतर भिक्षेकरी नव्हते,ते उच्चशिक्षित होते. या गोड व्यक्तीमधुन मधुर रस चावुन चावुन ओरबाडुन घेवुन उसाच्या चोयटीसारखं त्यांच्या भाऊबंदांनी त्यांना रस्त्यात फेकलं होतं !बाबांनी सांगितलेल्या त्या बाबी त्यावेळी कानात आल्या होत्या... पण मनात नाही... ! 

मी धावत होतो शर्यतीत...!

शर्यतीची नशा होती ...!! 

पैसे... पद... प्रतिष्ठा ... मी एकेक गड जिंकत चाललो होतो... पण मन भरत नव्हतं !

हे सगळं कमावून झाल्यावर

एके दिवशी भेटायला गेलो त्यांना... आणि समजलं,की मला मुलगा समजणारे "ते" बाबा बेवारस म्हणुन रस्त्यावर "मेले"... ! 


हो... स्वर्गवासी होणं, कैलासवासी होणं आणि देवाघरी जाणं ही प्रतिष्ठितांची मक्तेदारी ...! 


"मेला" हा शब्द प्रतिष्ठा नसणारांसाठीच ठेवणीत ठेवलाय.


ते मरुन गेले... आणि जातांना भिका-यांच्या डाॕक्टरला जन्माला घालुन गेले... ! 


मी त्यांचा मुलगा म्हणुन जिवंत असुनही ते बेवारस म्हणुन गेले... ! ज्यांनी त्यांना रस काढून हाकलुन दिलं होत, त्यां लोकांत आणि माझ्यात फरक काय ?


मी अंतर्मुख झालो !


पुर्वी दिलेले त्यांचे विचार आता कानातुन मनात यायला लागले... Heart पासुन हृदयात यायला लागले... ! त्यांच्या विचारांचं मनन चिंतन व्हायला लागलं, माझ्याही नकळत .... ! आणि या दिडशहाण्या सिकंदराची नशा पुर्ण उतरली ! जग जिंकण्यापेक्षा, जगातला "माणुस" जिंकावा किंवा माणुसकीचं "जग" जिंकावं...! 

उतरलेल्या नशेनं हेच शिकवलं ! 


आणि, हा दिडशहाणा सिकंदर त्या  गाढवावरून उतरला आणि १४ ऑगस्टला त्याने या इंटरनॅशनल संस्थेचा राजीनामा दिला.आणि १५ ऑगस्ट २०१५ला  भिकाऱ्यांचा डॉक्टर म्हणून तो रस्त्यावर आला... ! स्वतःच स्वतःवर लादलेल्या गुलामगिरीतुन तो मुक्त झाला... !


मीच आखुन घेतलेल्या पद-पैसा-प्रतिष्ठा या शर्यतीतुन मी स्वतंत्र झालो १५ आॕगस्ट २०१५ ला.... म्हणुन  हा माझ्या दृष्टीने माझाही स्वातंत्र्य दिन... ! या अगोदर असलेले सर्व दिवस माझ्यासाठी पैसा असुनही "दीन" होते... 


१५ आॕगस्ट २०१५ नंतर ते पैसा नसुनही "दिन" झाले ! जवळचे लोक म्हणतात... हरलास तु आभ्या ! 


नाही...! 


शर्यतीत किती धावायचं ? कसं धावायचं ? यापेक्षा कुठं थांबायचं ... ? हे कळणं जास्त महत्वाचं ! योग्य ठिकाणी हरावंच लागतं... !


कुठं आणि कधी हरायचं हे ज्याला कळतं तो कायम जिंकतो,कारण शर्यतीत धावणाराला हे कधीच कळत नाही... की शर्यत लावणारा स्वतः कधीच पळत नाही ! 


एखाद्याला आपल्या पुढं जाताना बघुनही आपल्याला आनंद झाला तर समजावं... आपण आत्ता खरे "मोठे" झालो...बाकी वय बीय सारं झुठ ,वय फक्त केस पांढरे करण्यापुरतं येतं... जेव्हा ते मन शुभ्र करेल... तेव्हा त्याची किंमत.! नाहीतर नुसताच तो गणितातला एक फालतु आकडा !! दरवेळी मी सर्वांना दर महिन्याचा लेखा-जोखा सादर करत असतो.


१५ ऑगस्ट २०१५  ला मी इंटरनॅशनल संस्थेमधला जॉब सोडला होता,अंगावरची झूल काढली होती.मी स्वतः मुक्त झालो होतो यादिवशी आज बरोबर या गोष्टीला पाच वर्षे पूर्ण झाली,म्हणून साधारण पाच वर्षाचा लेखाजोखा आज अगदी थोडक्यात सादर करत आहे...


वाटेत भेटलेल्या भीक मागणा-या आजोबांना आदरांजली वहायची म्हणुन भीक मागणा-या समुहासाठी मी काम करायचं ठरवलं. 


ते तर गेले... पण त्यांच्यासारखे अजुन खुप आहेत... त्यांतल्या एखाद्याला हात देवु, या विचारांतुन ...! 


या समुहासाठी काहीतरी काम करायचं म्हणून रस्त्यावर फिरायला सुरुवात केली.  


सुरुवातीला मला सुद्धा कशाचीही माहिती नव्हती.मी भीक मागणारांमध्ये  मिसळायचा प्रयत्न करु लागलो. 


सुरूवातीला लाज वाटायची...!  


डोक्यावर कॅप,डोळ्यावर गॉगल आणि चेहऱ्यावर रुमाल बांधून मी त्यांच्यात मिक्स होण्याचा प्रयत्न करायचो.  


मुखवटा लावला होता... ! 


पण मला भीक मागणा-या  लोकांनी त्यांच्यात मिसळू दिलं नाही.त्यांना वाटायचं,हा पोलिसांचा खबऱ्या असेल आणि आपल्याला पकडून देईल पोलिसांत, भीक मागतो म्हणुन ... !(कारण भीक मागणं हा गुन्हा आहे कायद्यानं ) किंवा कदाचित आपल्या बरोबर धोका करून, आपली जमा झालेली भीक घेऊन कुठेतरी पळून जाईल हा भामटा ...! डाॕक्टर आहे हा xxx,गोड बोलुन आपल्या किडन्या काढून विकेल,रक्त विकेल, अजुन काही काही पार्ट काढुन हा बाजारात विकेल.... यांत आपण मरुन जाऊ... याचा भरवसा काय ? 


किंवा आपल्या पोरीबाळींना कुठेतरी फसवेल, फसवुन "धंद्याला" लावेल. (मी अगोदर शरीर विक्रय करणा-या मुलींचं पुनर्वसन करणा-या एका संस्थेत बुधवार पेठेत काम करायचो.या ताईंमध्ये माझी उठबस होती,त्यांना वाटायचं, हा माझा "धंदा" आहे, आणि मी मधला दलाल !)


या सर्व गैरसमजापोटी,या लोकांनी मला त्यांच्यात येण्यास पूर्णपणे बंदी घातलीधमक्या दिल्या,शिव्याही दिल्या.खूप वेळा अंगावर धावुन सुद्धा आले,काही लोक तर चप्पल दाखवायचे किंवा अंगावर थुंकायचे...! 


मी त्यांच्यात येवुच नये,यासाठी ते हरत-हेनं मला विरोध करायचे ! 


मी पूर्णपणे निराश झालो होतो. 


या लोकांसाठी मी माझी खुर्ची आणि प्रतिष्ठा पणाला लावली होती. माझ्या चार ते पाच लाखांच्या उत्पन्नावर पाणी सोडलं होतं...


मी पूर्णपणे निराश झालो ! 


धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशी अवस्था झाली.कुत्रं तरी बरं,त्याला कुणीतरी हाड् म्हणुन का होईना, तुकडा तरी टाकतं... मला ते ही मिळेना ! 

एकीकडे काहीही कमवत नव्हतो आणि ज्यांच्यासाठी काम करायचं म्हणुन नोकरी सोडली, ते लोक मला भाव देत नव्हते,नव्हे ते मलाच हाकलून लावायचे, जसा काही मीच भिकारी होतो... ! 


या काळात भिक्षेक-यांपेक्षा  वाईट अवस्था झाली माझी !


मी खरोखरचा बेरोजगार, 

बेनाम  झालो होतो... 


१४ आॕगस्ट पुर्वी लोक अपाॕइंटमेंट घेवुन आदरानं भेटायला यायचे ...१५ आॕगस्ट नंतर भिक्षेकरी लोक पण मला हाकलुन द्यायचे... माझ्यावर थुंकायचे ! 


किती विरोधाभास !


लाखोंचा पगार थांबल्यामुळे,माझं घर डबघाईला आलं... कालचा साहेब,आज भिकारी झाला !


एका रात्रीत रावाचा रंक होतो... आणि रंकाचा रावही होवु शकतो... ही म्हण मला माहीत होती... ! 


मी रावाचा रंक झालो होतो,त्या काळात, एका भिका-यांचं उत्पन्न माझ्यापेक्षा जास्त होतं ... !


अशा परिस्थितीत,डॉक्टर मनीषा धावुन आली. अर्धांगिनी असण्याचं कर्तव्य तीनं निभावलं ! तीने आर्थिक स्थिती सावरण्याचा प्रयत्न केला... 


आई-वडील डॉक्टर पीडी सोनवणे आणि सौ.

भारती सोनवणे यांनी मानसिक आधार दिला. 


माझा भाऊ अमित सोनवणे आणि बहीण दिप्ती सोनवणे यांनी चोहोबाजुंनी आधार दिला...!

पण तरीही मी पुर्ण ढासळलो होतो... ! आर्थिक आणि मानसिक ! यांतुनही मी रस्त्यांवर फिरायचो भिक्षेक-यांत....आणि मला ओळखणारे लोक मात्र माझी खिल्ली उडवायचे... 


काय हो, महाराष्ट्र प्रमुख,आज रस्त्यावर कसे काय तुम्ही...? खी.खी.. खी... हसत  लोक टोमणा मारायचे... !


एसी हाफीसात बसणारे तुमी... आज गटाराजवळ बसले, वास घेत गटाराचा ... आरारारा.... वाईट वाटतं बुवा तुमचं... खी..खी... खी...! 


काय वो सर... आज भिका-यांत बसले तुम्ही...? काय पाळी आली राव तुमच्यावर...  खी..खी... खी...! कशाचा सर रे तो ...? खी..खी... खी...


हि,  खी... खी... खी... मी आयुष्यात कधीही विसरु शकत नाही !!!


मात्र या खी... खी... खी...ने इरादे अजुन मजबुत केले ! 


मित्र म्हणायचे,काय बे,आब्या उतरली का रे मस्ती तुजी ?


साल्या,लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत,तु मोटा तीस मार खान निघालास होय ? स्वतःला शाना समजतो का रे ?एवढी मोठी नोकरी सोडलीस ? मर साल्या आता,नोकरी  सोडून जो शहाणपणा केला आहेस भोग त्याची फळं... त्याच लायकीचा आहेस xxxx तु... !


हि xxxx शिवी मनात रुतुन बसलीय, काट्यासारखी ... !


हि शिवी मी मनात जपुन ठेवलीय... फ्रेम करुन आणि या फ्रेमवर मी खुप प्रेम करतो ! 


मी पुर्ण डिप्रेस झालो होतो,डिप्रेस करणारे माझेच होते...!


बुडण्याचं दुःखं नसतं... मरण्याचंही नसतं, पोहता येत नाही याचंही दुःखं मुळीच नसतं... पाण्यात ढकलणारा जेव्हा आपलाच असतो ते खरं दुःखं !


मी या दुःखात बुडुन गेलो !  


तरीही निर्लज्जासारखं,मला हाकलून देणाऱ्या भिक्षेक-यांमध्ये  मी रोज रोज जायचो.नाही नाही ते त्यांचं ऐकून घ्यायचो,त्यांच्या पोटभर शिव्या खायचो,रात्री झोप लागायची नाही,कारण शिव्याशाप खावुनही शेवटी पोट रिकामंच असायचं.... ! 


हे असं एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर तब्बल ३१ महिने चाललं... ! 


एकेदिवशी,अंगावर अक्षरशः किडे पडलेले, फुटपाथवर २४ वर्षे पडलेले एक आजोबा होते, त्यांच्या पाच फुटांवर सुद्धा कुणीही जात नसे.त्यांचं सर्व ड्रेसिंग करून,त्यांना स्वच्छ करून "आपलं घर" च्या विजय फळणीकर सरांकडे एका वृद्धाश्रमात ठेवलं. 


या बाबांना पूर्ण माणसात आणलं....! 


ते गेले, तेव्हा त्यांचा मुलगा म्हणुन त्यांचे अंत्यसंस्कारही केले.... ! भीक मागणाऱ्या समूहाने हे सर्व पाहिलं... ! 

यानंतरही या समुहाने मी भिक्षेक-यांसाठी केलेल्या अनंत गोष्टी दुरुन दुरुन पाहिल्या... !


आणि हळूहळू माझ्याबद्दलचं त्यांचं मत बदलत गेलं...! यार ... हे सालं आपल्यातलंच हाय... ह्यो आपल्यासाटीच कायतरी करतोय ... ! 


इतकी साधी गोष्ट त्यांना कळायला ३१ महिने गेले होते... आणि हे त्यांना कळेपर्यंत मी पण ख-या अर्थानं भिकारी झालो होतो... ! हळूहळू मला त्यांनी आपल्या मध्ये ऊठ-बस करण्याची मनापासुन परवानगी दिली. 


आॕगस्ट २०१५ ते मार्च २०१८ अशी अडीच वर्षे मी फक्त त्यांच्यात मिक्स होण्यासाठी झुंजत होतो...! 


हा काळ माझ्यासाठी अत्यंत वाईट होता... खडतर होता... ! त्यांच्याशी नातं निर्माण करण्यासाठी आणि विश्वास निर्माण करण्यासाठी मला अडीच  वर्षे झुंज द्यावी लागली.या काळात त्यांच्याशी नातं निर्माण करण्यासाठी मी त्यांच्याबरोबर सतत बसत असे, उठत असे, जेवत असे,खात असे...! 


भिक्षेक-यांनी माझी अशी अडीच  वर्षे कठोर परीक्षा पाहून मला त्यांच्यातला एक होण्याची संधी दिली... !


भिकारी होणंही इतकं सोपं नसतं तर ! त्यासाठी पण परिक्षा असतात... MPSC आणि UPSC पेक्षा अवघड ! यासाठीही कठोर परिश्रम असतात तर !!! 


साधारण एप्रिल २०१८ पासून माझं डॉक्टर फाॕर बेगर्स म्हणून खऱ्या अर्थाने काम सुरू झालं. 


डॉक्टर होण्यासाठी, कलेक्टर होण्यासाठी किंवा एखादा ऑफिसर होण्यासाठी आधी तीन ते चार - पाच वर्षे कठोर अभ्यास करावा लागतो आणि त्यानंतरच पदवी हातात मिळते.मी सुद्धा अडीच तीन वर्षे कठोर परिश्रम घेऊन भिकाऱ्यांचा डॉक्टर ही पदवी मिळवली होती, उत्तम मार्कांनी मी पास झालो होतो ! 


मी भिका-यांचा डाॕक्टर झालो होतो... ! 


हि पदवी मात्र एकदा हातात पडल्यानंतर, मी मागं वळून पाहिलंच नाही. 


सांगायला अभिमान वाटतो की,आज या भिक्षेकरी कुटुंबाचा मी कुटुंबप्रमुख आहे.मला विचारल्याशिवाय आज  कोणतीही गोष्ट आज यांच्यात होत नाही...

यांच्यामध्ये सोयरीक जुळताना सुद्धा आज माझा शब्द शेवटचा धरला जातो.यांच्या पोरांची नावं मला विचारुन ठेवली जातात...! पोरी कुठलीही गोष्ट पहिल्यांदा आपल्या आईला सांगतात.पण,आज भिक्षेकरी पोरी मला नी मनिषाला आईअगोदर आम्हाला सारं सांगतात.!


आमी आईबाप होवुन गेलो अशा पोरींचे... 


बिन बाळंतपणाची मनिषा... आई झाली त्यांची ! 


लगीन झालेली बाई,सर्व गोष्टीं आपल्या नव-याला,नायतर आपल्या बापाला सांगते... 


पोरी मलाच बाप समजाया लागल्या.... आयशप्पत ... मी पन्न्नास वर्षाच्या विवाहित पोरीचा मी बाप झालो... ! 


बापापेक्षा पोरगी वयानं मोठी... पण म्हटलं ना ? वय हा फक्त एक आकडा ! नातं महत्वाचं... आणि नात्याला वय नसतं ! भिक्षेक-यांच्या  शंभराहुन अधिक  पोरांची नावं आज "अभिजीत" आहेत...पन्नासाहुन अधिक पोरींची नाव आज "मनिषा" आहेत... !


कोणताही  पुरस्कार फिका वाटतो मला यापुढं !


आज पाच वर्षानंतर माझं भिक्षेक-यांचं कुटुंब ११०० इतक्या लोकांचं आहे.यात मला २०० ते ३०० इतके आईबाप आहेत, तितकेच आजी-आजोबा आहेत आणि या वयामध्ये मला आणि मनिषाला २०० ते ३०० पोरं सुद्धा आहेत ! आज जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती मी असेन असं मला वाटतं !


या सर्वांशी मानसिक नाती जुळवता जुळवता १०० भिक्षेक-यांना वैद्यकीय सुविधा देत आहोत. 

यांच्या,म्हणजेच आमच्या ५२ पोराबाळांचे शिक्षण  करत आहोत,याहुन आनंद कोणता ?


डोळ्यांना दिसत नसल्यामुळे या भिक्षेकरी आजी

आजोबांचे रस्त्यांत अपघात होतात,यात त्यांचे जीव जातात,हातपाय मोडतात.... ते टाळावे म्हणून अशा ५५० लोकांचे डोळ्यांचे ऑपरेशन आपण करून दिले आहेत आणि आता अपघाताचे प्रमाण सुद्धा कमी झाले आहे. 


रस्त्यावर बेवारस म्हणून कित्येक वर्षे खितपत पडलेल्या १६ आजी आणि आजोबांना महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वृद्धाश्रमांमध्ये निवारा मिळवून दिला आहे.ते तिथे माझे आई बाप -  आजी आजोबा म्हणूनच राहतात. 


तीथं ते आडनाव "सोनवणे" म्हणुन लावतात ! 

सोनवणे आडनावाला याआधी इतका सन्मान कधी मिळाला नव्हता... !


यांत आईबापाला आधार दिला म्हणुन स्वतःला सुदैवी समजु की आईबापाला वृद्धाश्रमात ठेवावं लागतंय म्हणुन स्वतःला दुर्दैवी समजु... ?


या विचारांत आजही झोप लागत नाही मला !


हा भीक मागणारा समुह जर कष्टकरी झाला तरच समाज त्याला गावकरी म्हणून स्वीकारेल याची मला जाणिव झाली. भीक मागणारांना गावकरी बनवायचं हे ध्येय ठरवुन "भिक्षेकरी ते कष्टकरी आणि कष्टकरी ते गावकरी" हि आमच्या कामाची टॕगलाईन मी ठरवली ! 


माझ्या शब्दांना थोडी किंमत आहे हे कळल्यानंतर मी त्यांना भीक मागणं सोडायला प्रवृत्त केलं, णि त्यांना त्यांच्या कुवतीप्रमाणे वेगवेगळे व्यवसाय सुचवण्यात सुरुवात केली.याला यश येऊन ८५ कुटुंबांनी भीक मागणं सोडलं आहे आणि हि  कुटुंबं आज सन्मानाने जगत आहेत.रस्त्यावर चालणार्‍या या कामांमध्ये मला अनेक व्यक्ती आणि संस्था यांची मदत झाली.पब्लिक चॕरिटी कमिशनर आॕफिस, इन्कम टॅक्स ऑफिस, महिला व बालकल्याण, दिनानाथ मंगेशकर हाॕस्पिटल,लेले हाॕस्पिटल, पोलीस डिपार्टमेंट, पुण्यातील नामांकीत संस्था आणि व्यक्ती ! संस्थेतील बड्या अधिका-यांची नुसती भेट घेणं, "मुश्कील ही नही नामुमकीन है" ... तरीही हि मंडळी मला लहान पोरगं समजुन मला वेळ देतात... माझं ऐकुन घेतात... मदत करतात. मोठ्ठ्या खुर्चीतली ही सर्व माणसं  माझ्यासाठी मुद्दामहुन छोटी होतात ! 


लहान बाळाबरोबर खेळतांना आपणही लहान होतो तसंच...!!! 


कसे ऋण फेडावे यांचे ? 


याच प्रवासात आपल्यासारखे सहृद भेटले आणि आपण  माझ्यावर पूर्णपणे विश्वास टाकून संस्थेला देणगी देण्यासाठी सुरुवात केली.मी सुद्धा या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी करत असलेल्या कामाचा सर्व लेखा-जोखा दर महिन्याला सर्व सहृदांना  पाठवत असतो. मी करत असलेल्या कामाबद्दल सर्व बाबी प्रांजळपणे कळवतो आणि त्यांचा सल्ला सुद्धा घेतो.यातून कामांमध्ये एक पारदर्शीपणा राहण्यासाठी खूप मदत झाली, शिवाय हे काम फक्त डॉक्टरच नाही तर आपलंही आहे हे समाजाला वाटायला लागलं !


न फेडता येणा-या आपल्या ऋणांत आहे मी, माझा साष्टांग नमस्कार स्विकारावा ! 


हे सर्व करत असताना मी भीक मागणा-या व्यक्तींच्या हृदयापर्यंत  पोहोचण्याचा प्रयत्न करू लागलो. त्यांची सुखदुःख समजून घेण्याचा प्रयत्न करू लागलो.आणि यातूनच जन्म झाला माझ्या ब्लॉगचा... !


भारतात आणि भारताबाहेर हे ब्लॉग पोहोचू लागले. 

शाबासकी मिळू लागली आणि या अशा शाबासकी ने  माझा हुरूप आणखी वाढला. काही लोक माझे ब्लॉग स्वतःचे म्हणून त्यांच्या नावावर कॉपी करून पुढे पाठवतात.या गोष्टीचा मला मुळीच खेद नाही.... पण खेद याचा वाटतो की ते फक्त माझे ब्लॉग कॉपी करतात माझं काम नाही... ! ब्लॉग कॉपी करण्याबरोबरच माझं काम जेव्हा ते कॉपी करतील तो दिवस माझ्या आनंदाचा !

जवळचे लोक मला नेहमी विचारतात आभ्या, इतकं सगळं करून तू काय कमावलंस...? 


मी खूप काही कमावलंय...


आदरणीय सिंधुताई सपकाळ उर्फ माई यांनी मला मुलगा म्हणून मला स्वीकारलं,हे पुत्रत्व मी कमावलं ! आदरणीय राणीताई बंग यांचा हात डोक्यावर मायेने पडला,तो मायेचा हात मी कमावला ...! आदरणीय डॉक्टर प्रकाश आमटे यांनी हूरूप देऊन सामर्थ्य दिले,हात धरून शक्ती दिली, ती शक्ती मी कमावली...! 


शास्त्रज्ञ आदरणीय रघुनाथ माशेलकर यांनी पोटाशी धरुन उच्चारलेले I am proud of you my child हे शब्द, या शब्दांतुन child असणं मी कमावलं ! 


सुपर कॉम्प्युटर चे जनक श्री विजय भटकर म्हणाले होते, 'मी कॉम्प्युटर बनवला,पण तू माणूस घडवतो आहेस... ' मी हा "विजय" कमावला...!


विश्वास नांगरे पाटील सर म्हणाले होते,भारीच करतोय तु राव कायतरी,आयुष्यात कधी अडचण आली तर मला फोन कर... हा घे माझा पर्सनल नंबर... हा "विश्वास" मी कमावला... !


तुमच्यासारखे जवळचे लोक मी कमावले... ! 


जन्माला येताना माकड म्हणूनच जन्माला आलो... परंतु भीक मागणाऱ्या लोकांमध्ये राहून मी हळूहळू माणूस बनत गेलो... माणुस म्हणुन चेहरा मी कमावला... ! 


ते खरं रे आभ्या परंतु या बदल्यात तु गमावलंस किती.? 

अरे हो, खरंच मी खूप काही गमावलं सुद्धा आहे... 

ह्या कामानं मी... मी पणा गमावला ! आपण कुणीतरी आहोत याचा अहंकार मी गमावला ! केवळ स्वतःपुरतं जगायचं हा स्वार्थ मी याच कामा मध्ये गमावला ! 

स्वतःच्या चेहर्‍यावर लावलेला खोटा खोटा मुखवटा मी गमावला सर आणि साहेब यांची खोटी प्रतिष्ठा गमावली. !पोरा - लेकरा-  बाळा या उबदार शब्दात मी  विसावलोय आता...मला खुर्चीपेक्षा ... उकीरडा आवडायला लागलाय आता ! मला उष्टं... खरकटं... शिळं ... आणि नासकं जेवण आवडतं हल्ली आणि आवडत राहील, तोपर्यंत .... जोपर्यंत माज्या भिकारी आईबापाला सन्मान मिळत नाही तोपर्यंत ! माझा भिक्षेकरी जोपर्यत कष्टकरी होत नाही तो पर्यंत तो गांवकरी होणार नाही... ! 


माझ्या आईबापाला जेव्हा मी भिक्षेकरी म्हणुन स्वतंत्र करेन तोच माझा स्वातंत्र्य दिन असेल..!


मी तर सारा लेखाजोखा मांडलाय  थोडक्यात...

आता अजुन कमवायचं राहिलं काय... ? 

आणि गमवायचं राहिलं काय ?

माय बापहो...तुम्हीच निवाडा करा... !


जयहिंद !!! 


१५ आॕगस्ट २०२०


डाॕ.अभिजीत सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स

भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर